तिकडे सैन्यात जागा रिकाम्या आहेत अन् इथल्या तरुणांना आयटीच्या पलीकडे शिक्षणाचे दुसरे क्षेत्रच ठावूक नसल्यागत स्थिती आहे. चकाट्या पिटत, तंबाखू चोळत पानटपर्यांवर आयुष्याचा महत्त्वपूर्ण वेळ वाया घालवणे मान्य असणारे लोक फक्त समाजासाठी वेळ देण्यास असमर्थ ठरताहेत. इकडे एमबीबीएसच्या ऍडमिशनला लागणार्या रांगेची लांबी मोजता येत नाही अन् तिकडे सुदूर गावाकडल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात सेवा द्यायला मात्र डॉक्टर्स उपलब्ध नाहीत, असा काहीसा विचित्र विरोधाभास आहे. वेल्थ, वाईन, वूमनच्या चौकटीबाहेरची स्वप्नही तरुणाई बघताना दिसत नाही. सर्वांनाच भरमसाठ पैसा कमवायचाय् अन् जमलंच तर हा देश सोडून विदेशात स्थिरस्थावर व्हायचं आहे. स्वातंत्र्याचा लढा लढायचा त्यांनी लढला, त्यासाठीचे बलिदान करायचे त्यांनी केले, आता आपल्याला कशाशीच काहीही घेणेदेणे नसल्याच्या आविर्भावात वागताहेत सारे. आजही समाजातल्या वेगवेगळ्या समस्यांविरुद्धचा लढा लढण्याची जबाबदारी आपली मुळीच नसल्याच्याच थाटात जगताहेत इथले तरुण. हाच युवक कुणी भडकवले तर पेटून उठणार. कुणीतरी पेटवलेल्या ठिणगीचा वणवा करण्यासाठी जिवाचा आटापिटा करणार. कुणाच्यातरी आदेशावरून दंगली करणार? निदान काश्मिरात तरी हेच चित्र आहे. आपल्याच देशाचे सरकार त्यांना ‘आपले’ वाटत नाही. ‘आपल्याच’ सरकारविरुद्ध लढा पुकारताना जराशी खंत वाटत नाही. शस्त्र हाती धरून कुठल्याशा स्वातंत्र्याची स्वत:च्या आकलनापलीकडची भाषा ते बोलतात, तेव्हा त्यांचा बोलविता धनी कुणी वेगळाच असल्याचे स्पष्ट झाल्यावाचून राहात नाही. गरज आपल्या हातातल्या दगडांची नाही, आवश्यकता आपल्या हाती सोपवण्यात आलेल्या शस्त्राची नाही, या समाजासाठीच्या आपल्या समर्पणाची आहे, ही बाब या तरुणाईच्या लक्षात आणून देण्याची गरज म्हणूनच महत्त्वाची आहे. देशासाठी हसत हसत फासावर जाणार्या वीरांच्या धमण्यांत वाहणारे रक्त वेगळेच होते. आम्हाला फासावर जाण्यास तर कुणीच सांगत नाहीय्. तशी गरज नाही अन् कुणाची अपेक्षाही नाही. पण निदान त्या स्वातंत्र्यवीरांचा वारसा चालवण्याचा निर्धार तरी करूया!
उसळत्या रक्तात मा, ज्वालामुखीचा दाह दे
वादळाची दे गती, पण भान ध्येयाचे असू दे
वादळाची दे गती, पण भान ध्येयाचे असू दे
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या अभ्यासवर्गात उमटणार्या गीतांच्या स्वरांमध्ये वातावरण भारावून टाकण्याची ताकद होती. धमण्यांतले रक्त सळसळायला लावण्याची, प्रचंड शक्ती लाभलेल्या आणि तरीही भरकटलेल्या तरुणाईला जगण्याची दिशा देण्याची ताकद त्या शब्दांमधून आपसूकच गवसते. परवा काश्मिरातल्या तरुणाईला पंतप्रधानांनी तरी दुसरं काय सांगितलं? ज्या वयात हातात पुस्तकं धरायची, लॅपटॉप, क्रिकेटची बॅट धरायची त्या वयात आपल्याच सरकारविरुद्ध पेटून उठलेली पोरं रस्त्यावर उतरून दगडफेक करून प्रशासनाविरुद्ध क्षोभ व्यक्त करताना बघितली की मन विषण्ण होणे स्वाभाविकच! कोण कुठला बुरहान वाणी संथ राहून याच देशाच्या विरुद्ध तरुणाईला भडकवतो अन् मागचा-पुढचा विचार न करता लोक त्याच्या पाठीशी उभे राहातात? अर्थही ठावूक नसलेल्या जिहादची भाषा बोलतात? कशासाठी हवाय जिहाद अन् कोणाविरुद्ध? उत्तर कुणालाच ठावूक नाही. तरीही प्रशासनाविरुद्धचे भारी संख्येतले मोर्चे तसेच कायम आहेत अन् बुरहानच्या अंत्ययात्रेला जमणारी गर्दीही तशीच आहे. प्रचंड आणि भरकटलेली... कोणाच्या तोंडी शोभावी मानवतेची भाषा अन् कोणी गवसणी घालायची मानवाधिकाराला? निष्पाप लोकांचे अकारण मुडदे पाडणार्या दहशतवाद्यांनी? त्यांनी उभारलेल्या कथित आंदोलनाची पूर्वपीठिका माहीत नसताना त्यांच्या पाठीशी उभे राहिलेल्या तरुणांनी सांगायचे लोकशाहीचे तंत्र? भावनेच्या बळावर कोणातरी विरुद्ध आधीच पेटून उठलेल्या कुठल्याही जमावाला आणखी भडकवणे फारच सोपे असते. त्यातही धर्माचा आधार घेतला की मग तर विचारायलाच नको. वणवा पेटवणे अगदीच सुकर होऊन जाते. काश्मिरात नेमके तेच चालले आहे. कुणाविरुद्ध उभे ठाकलोय् आणि कशासाठी लढतोय् हेही माहीत नसलेल्या युवकांना भडकवण्याचे, भरकटत ठेवण्याचे काम काही शहाणे लोक धर्माच्या नावाखाली बेमालूमपणे करताहेत. या तरुणाईला सावरलं पाहिजे. पुढच्या चार दिवसांनी सत्तरावा स्वातंत्र्यदिन साजरा होईल सार्या देशात. या स्वातंत्र्याचा अर्थ उमगला पाहिजे या समूहाला. स्वातंत्र्यसमरात प्राणांची आहुती समर्पित करणार्या, घरादारावर तुळशीपत्र ठेवून या देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणपणाने लढलेल्या, प्रसंगी फासावर गेलेल्या, परकीयांच्या गोळीबारात शहीद झालेल्या वीरांच्या त्यागाची परतफेड अशी आपल्याच देशाविरुद्ध उभे राहून ही तरुणाई करणार असेल, तर मग आशेने बघायचे कुणाकडे? यांना असे आपल्याच देशाविरुद्ध दंड थोपटून मैदानात उतरलेले बघण्यासाठी म्हणून लढलेत का ‘ते’ इंग्रजांविरुद्ध? हे असे धर्माच्या नावाने लढायला निघालेल्यांची गर्दी बघून, ‘मातृभूमी के काम न आए वह जवानी बेकार है’, असे म्हणत देशासाठी सरसावलेले लोक मूर्ख ठरवायचे का मग आता?
अपने हसते शैशवसे, अपने खिलते यौवनसे
प्रौढतापूर्ण जीवनसे, हम करे राष्ट्रका अर्चन
अपने हसते शैशवसे, अपने खिलते यौवनसे
प्रौढतापूर्ण जीवनसे, हम करे राष्ट्रका अर्चन
अशा शब्दांमधून अंगार फुलवत राष्ट्रभक्तीचा शंखनाद करणार्यांच्या समर्पणातून हा समाज उभा राहिला आहे. स्वातंत्र्याचा समर त्यातून जिंकता आला आहे या देशाला. तब्बल साडेबाराशे वर्षांच्या पारतंत्र्यातून आता कुठे हा देश मुक्त झाला आहे. हे स्वातंत्र्य अबाधित राखण्याची जबाबदारी इथल्या सार्या समाजाची आहे. जगातील सर्वाधिक तरुणांच्या या देशातील युवकांची भूमिकाही त्याला साजेशीच हवीय्. आज क्रीडा क्षेत्रापासून तर संशोधनापर्यंत अन् कलाजगतापासून तर सीमेवर लढण्यापर्यंत सर्वदूर तरुणांची निकड आहे. ती गरज हवेत भिरकावून आपल्याच समाज आणि देशाविरुद्ध लढायला निघालेल्या युवकांना त्यांचे ध्येयाचे भान जपायला सांगणार कोण? गोडवे भगतसिंह, राजगुरू, आझादांनी लढलेल्या लढाईचे गायचे आणि मूठमाती मात्र त्यांच्याच आशा-आकांक्षांना द्यायची, ही कुठली तर्हा झाली? कालपर्यंतच्या चुकलेल्या धोरणांचा परिपाक म्हणा वा मग आखणी काही, पण आधीच या देशातल्या तरुणांच्या वाट्याला आलेली बेरोजगारीची परिस्थिती अतिशय वेदनादायी आहे. त्यात भरकटलेपणाची भर पडली आहे ती वेगळीच. तिकडे सैन्यात जागा रिकाम्या आहेत अन् इथल्या तरुणांना आयटीच्या पलीकडे शिक्षणाचे दुसरे क्षेत्रच ठावूक नसल्यागत स्थिती आहे. चकाट्या पिटत, तंबाखू चोळत पानटपर्यांवर आयुष्याचा महत्त्वपूर्ण वेळ वाया घालवणे मान्य असणारे लोक फक्त समाजासाठी वेळ देण्यास असमर्थ ठरताहेत. इकडे एमबीबीएसच्या ऍडमिशनला लागणार्या रांगेची लांबी मोजता येत नाही अन् तिकडे सुदूर गावाकडल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात सेवा द्यायला मात्र डॉक्टर्स उपलब्ध नाहीत, असा काहीसा विचित्र विरोधाभास आहे. वेल्थ, वाईन, वूमनच्या चौकटीबाहेरची स्वप्नही तरुणाई बघताना दिसत नाही. सर्वांनाच भरमसाठ पैसा कमवायचाय् अन् जमलंच तर हा देश सोडून विदेशात स्थिरस्थावर व्हायचं आहे. स्वातंत्र्याचा लढा लढायचा त्यांनी लढला, त्यासाठीचे बलिदान करायचे त्यांनी केले, आता आपल्याला कशाशीच काहीही घेणेदेणे नसल्याच्या आविर्भावात वागताहेत सारे. आजही समाजातल्या वेगवेगळ्या समस्यांविरुद्धचा लढा लढण्याची जबाबदारी आपली मुळीच नसल्याच्याच थाटात जगताहेत इथले तरुण. हाच युवक कुणी भडकवले तर पेटून उठणार. कुणीतरी पेटवलेल्या ठिणगीचा वणवा करण्यासाठी जिवाचा आटापिटा करणार. कुणाच्यातरी आदेशावरून दंगली करणार? निदान काश्मिरात तरी हेच चित्र आहे. आपल्याच देशाचे सरकार त्यांना ‘आपले’ वाटत नाही. ‘आपल्याच’ सरकारविरुद्ध लढा पुकारताना जराशी खंत वाटत नाही. शस्त्र हाती धरून कुठल्याशा स्वातंत्र्याची स्वत:च्या आकलनापलीकडची भाषा ते बोलतात, तेव्हा त्यांचा बोलविता धनी कुणी वेगळाच असल्याचे स्पष्ट झाल्यावाचून राहात नाही. गरज आपल्या हातातल्या दगडांची नाही, आवश्यकता आपल्या हाती सोपवण्यात आलेल्या शस्त्राची नाही, या समाजासाठीच्या आपल्या समर्पणाची आहे, ही बाब या तरुणाईच्या लक्षात आणून देण्याची गरज म्हणूनच महत्त्वाची आहे. देशासाठी हसत हसत फासावर जाणार्या वीरांच्या धमण्यांत वाहणारे रक्त वेगळेच होते. आम्हाला फासावर जाण्यास तर कुणीच सांगत नाहीय्. तशी गरज नाही अन् कुणाची अपेक्षाही नाही. पण निदान त्या स्वातंत्र्यवीरांचा वारसा चालवण्याचा निर्धार तरी करूया!
विसरू दे माझ्यातला मी, तेथ भक्ती उसळू दे
रंग तू, मी रंगणारा, दंग त्यातच होऊ दे
असं म्हणत, काहीशी बेभान होत ही तरुणाई सरसावेल त्या दिवशी त्यांना हा देशही आपला वाटेल अन् इथले सरकारही. दिशा गवसली, जगण्याला अर्थ गवसला की मग हातातल्या दगडांचीही शस्त्रे होतील अन् त्यांचा वर्षाव होईल... शत्रूंवर! देशवासीयांसाठी मात्र, हातातल्या त्या दगडांची जागा पुस्तकांनी, लॅपटॉपनेच घ्यावी. सध्यातरी गरज त्याचीच आहे. तसे झाले तर, तरुणाईला लाभलेल्या वादळाच्या गतीला ध्येयाचे भान जपण्याचे सामर्थ्य प्राप्त होईल, ते वेगळेच...!
विसरू दे माझ्यातला मी, तेथ भक्ती उसळू दे
रंग तू, मी रंगणारा, दंग त्यातच होऊ दे
असं म्हणत, काहीशी बेभान होत ही तरुणाई सरसावेल त्या दिवशी त्यांना हा देशही आपला वाटेल अन् इथले सरकारही. दिशा गवसली, जगण्याला अर्थ गवसला की मग हातातल्या दगडांचीही शस्त्रे होतील अन् त्यांचा वर्षाव होईल... शत्रूंवर! देशवासीयांसाठी मात्र, हातातल्या त्या दगडांची जागा पुस्तकांनी, लॅपटॉपनेच घ्यावी. सध्यातरी गरज त्याचीच आहे. तसे झाले तर, तरुणाईला लाभलेल्या वादळाच्या गतीला ध्येयाचे भान जपण्याचे सामर्थ्य प्राप्त होईल, ते वेगळेच...!
मला आवडला लेख !
ReplyDeleteNice Article :-)
ReplyDeleteI have posted the complete song on my blog.
joshmanish.blogspot.com