साधेपणाने जगणारे गांधी कुणाला स्वीकारता आले, कुणाला जगता आले सांगा? नेहरूंना की इंदिरा गांधींना? ते तर कायम राजेशाही थाटात जगले, वावरले. त्यांच्या नंतरच्या पिढ्याही त्याच गांधींच्या पुण्याईवर तसलेच राजेशाही थाटातले जीवन जगताहेत. गांधींच्या सत्याग्रह अन् उपोषणाची सर्वाधिक खिल्ली आजवर कुणी उडवली हे तर जगजाहीर आहे. भारतीय विचारांच्या आधारे भारताची पुनर्बांधणी करण्याचा गांधींचा आग्रह कुणी स्वीकारला सांगा? म्हणूनच असेल कदाचित, पण, या देशातल्या सामान्य माणसाच्या मनात गांधी, हत्येनंतरच्या सातव्या दशकातही अजून जिवंत आहे. त्यांच्यावर बंदुकीच्या गोळ्या डागणार्यांची तळी कुणी उचलून धरण्याचा प्रश्नच नाही. पण, मुद्दा असा आहे की, गांधींच्या विचारांची महती सांगण्याच्या निमित्ताने गोडसेला शिवीगाळ करण्याची संधी साधण्याचे आणि त्याआडून कुणावर तरी निशाणा साधण्याची संधी कायम शोधत राहणार्यांनी गांधींचा विचार स्वत:च्या जीवनात कधी आचरणात आणला? नाथुरामच्या कथित समर्थकांना गांधी कळला नसल्याचा कुणाचा दावा असेल, तर मग ज्यांनी सतत गांधीजींचा ‘वापर’ केला, त्यांना तरी त्यांच्या विचारांचे गांभीर्य कुठे कळले आहे? त्यांनी तरी ‘गांधी’ कुठे आचरणात आणला आहे? भिंद्रानवाले मोठा करून राजकारण साधण्याचा मुद्दा असो, की मग इंदिराहत्येनंतर झालेल्या शिखांच्या कत्तलीचे जाहीर समर्थन असो, यात गांधींच्या विचारांचे दर्शन घडते कुठे?
यंदाच्या अखिल भारतीय मराठी साहित्य सम्मेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस पुन्हा बरळलेत. कधी नव्हे एवढी प्रसिद्धी, संमेलनाच्या मुहूर्तावर केलेल्या वादग्रस्त विधानामुळे वाट्याला आल्याने, बहुतेक प्रसिद्धीचा तो आडवळणावरचा मार्ग चोखाळण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला दिसतो. संमेलनापूर्वी त्यांना, या देशाचे पंतप्रधान एकेरी संबोधण्याइतके कमी महत्त्वाचे वाटले, आता त्यांना नाथुराम गोडसेमध्ये देशातला पहिला दहशतवादी दिसला आहे! आपल्या बेताल बडबडीतून वादग्रस्त विधाने बाहेर पडतील याची काळजी घेत बरळणे सुरू ठेवले की, प्रसिद्धीचा योग आपसूकच चालून येतो, असा समज झालेल्या सबनीसांना, प्रसिद्धीचे तंत्र एव्हाना चांगलेच अवगत झालेले दिसते. इंदिरा गांधींनी लादलेल्या आणिबाणीचे अगदीच समर्थन करता येत नाही म्हणून तोंडदेखलेपणाने त्याच्या निषेधाची औपचारिकता पार पाडायची आणि मग ओघानेच आल्यागत गोडसेंचाही विषय हाताळायचा. हाताळता हाताळता तो जमेल तेवढा मोठा करत न्यायचा, ही तर्हा आता जुनी झाली आहे. फक्त परवा सबनीसांनी ती नव्याने वापरली आहे, एवढेच.
गांधीहत्येचे कुणी समर्थन करण्याचे कारण नाही. नाथुराम गोडसेंच्या आरत्या ओवळण्याचाही प्रश्न उद्भवत नाही. पण, जे जे म्हणून लोक गोडसेला विरोध करण्यासाठी म्हणून गांधींचे मोठेपण सांगण्याचा प्रयत्न करतात, त्यांनी तरी मुळात ‘गांधी’ कुठे जपला आहे? त्यांनी तर ‘गांधी’ कायम वापरला आहे.
निवडणुकी जिंकण्यासाठी ज्यांनी दंगली घडवल्या ते सांगणार गांधीजींच्या अहिंसेचे मर्म? ज्यांनी या देशावर आणिबाणी लादली ते घालतील महात्म्याच्या अंतरंगातील हळव्या भावनांची सांगड? ज्यांनी कायम त्यांच्या विचारांची हत्या केली, अवहेलना केली, तेच गांधींच्या विचारांची महती छातीठोकपणे सांगत फिरतात, तेव्हा खरी गंमत असते. आयुष्याच्या उत्तरार्धात नेहरूंच्या वागणुकीतून जी अवहेलना महात्मा गांधींच्या अनुभवास आली ती बघता, गोडसेंच्या विरोधात उभी राहिलेली जमात गांधींच्या बाजूने कधी नव्हतीच, त्यांनी फक्त आपल्या राजकारणापुरता ‘गांधी’ वापरून घेतल्याचीच बाब वारंवार स्पष्ट होते.
गांधीजींच्या जीवनातला एक प्रसंग सांगितला जातो. अलाहाबादला असताना एका सकाळी स्नान आटोपून बाहेर पडलेले गांधीजी काहीसे अस्वस्थ होते. त्या अस्वस्थतेपायी त्यांच्या येरझारा चालल्या होत्या. ते बघून मोतीलाल नेहरूंनी त्यांना सवाल केला. काय झालं ते विचारलं. थोडेसे ओशाळवाणेपणाने महात्मा म्हणाले- ‘‘गड्या, आज मी आंघोळीला जरा जास्तच पाणी वापरले. मी योग्य केलं नसल्याची खंत मला काही केल्या स्वस्थ बसू देत नाहीय्.’’ त्यावर पंडित नेहरूंनी त्यांची खिल्ली उडवली. नेहरू म्हणाले- ‘‘काय बोलताय् तुम्ही? पाण्याची चिंता? तिही अलाहाबादेत. जिथे गंगा, यमुना दुथडी भरून वाहतात, तिथे आंघोळीला बादलीभर पाणी अधिकचं वापरलं म्हणून इतकं बेचैन व्हायचं?’’ गांधी म्हणाले- ‘‘इथली गंगा आणि यमुना काही एकट्या मोहनदास करमचंद गांधीसाठी वाहत नाहीत. त्यावर सर्वांचा अधिकार आहे. मी एकट्यानं त्या पाण्याचा गरजेपेक्षा जास्त वापर करणं केव्हाही वाईटच...’’
इतक्या साधेपणाने जगणारे गांधी कुणाला स्वीकारता आले, कुणाला जगता आले सांगा? नेहरूंना की इंदिरा गांधींना? ते तर कायम राजेशाही थाटात जगले, वावरले. त्यांच्या नंतरच्या पिढ्याही त्याच गांधींच्या पुण्याईवर तसलेच राजेशाही थाटातले जीवन जगताहेत. गांधींच्या सत्याग्रह अन् उपोषणाची सर्वाधिक खिल्ली आजवर कुणी उडवली हे तर जगजाहीर आहे. भारतीय विचारांच्या आधारे भारताची पुनर्बांधणी करण्याचा गांधींचा आग्रह कुणी स्वीकारला सांगा? म्हणूनच असेल कदाचित, पण, या देशातल्या सामान्य माणसाच्या मनात गांधी, हत्येनंतरच्या सातव्या दशकातही अजून जिवंत आहे. त्यांच्यावर बंदुकीच्या गोळ्या डागणार्यांची तळी कुणी उचलून धरण्याचा प्रश्नच नाही. पण, मुद्दा असा आहे की, गांधींच्या विचारांची महती सांगण्याच्या निमित्ताने गोडसेला शिवीगाळ करण्याची संधी साधण्याचे आणि त्याआडून कुणावर तरी निशाणा साधण्याची संधी कायम शोधत राहणार्यांनी गांधींचा विचार स्वत:च्या जीवनात कधी आचरणात आणला? खुद्द सबनीसांची कधी सलगी झाली त्या विचारांशी? त्यांना कधी जाणवला गोडसेतला दहशतवादी? नाथुरामच्या ‘त्या’ कृत्याचा त्यांच्या मनातला संताप व्यक्त व्हायला मुहूर्त का लागावा कुठलातरी? नाथुरामच्या कथित समर्थकांना गांधी कळला नसल्याचा कुणाचा दावा असेल, तर मग ज्यांनी सतत गांधीजींचा ‘वापर’ केला, त्यांना तरी त्यांच्या विचारांचे गांभीर्य कुठे कळले आहे? त्यांनी तरी ‘गांधी’ कुठे आचरणात आणला आहे? भिंद्रानवाले मोठा करून राजकारण साधण्याचा मुद्दा असो, की मग इंदिराहत्येनंतर झालेल्या शिखांच्या कत्तलीचे जाहीर समर्थन असो, यात गांधींच्या विचारांचे दर्शन घडते कुठे?
‘चले जाव’ आंदोलनादरम्यान एका उत्साही कार्यकर्त्याने आवेशात येऊन पोलिस चौकी जाळून इंग्रज सरकारविरुद्ध प्रक्षोभ व्यक्त केला होता. आपल्याच कार्यकर्त्याने केलेल्या त्या हिंसाचाराचा मूक निषेध करत चौरीचौरातला सत्याग्रह क्षणात मागे घेणार्या गांधींच्या विचारांचे समर्थक म्हणायचे कुणाला इथे? नक्षल्यांच्या हिंसाचाराचे आडमार्गाने समर्थन करणार्या धुरीणांना, की आणिबाणी लादून हुकुमशाही गाजविणार्यांना? गोडसे आणि त्याच्या कृत्याचे समर्थन कुणी आडमार्गानेही करता कामा नये. पण, मग दरवेळी ‘गांधी’ पायदळी तुडविणार्यांचे समर्थन तरी कसे करायचे, सबनीससाहेब?
गांधीजींनी एका मर्यादेबाहेर जाऊन मुस्लिमांचे तुष्टीकरण केल्याच्या भावनेतून कुणाच्या मनात संतापाची भावना असेलही कदाचित. पण, त्यांनी या देशाच्या हितार्थ नेहमीच कल्पना मांडली ती ‘रामराज्या’ची, ‘रहीमराज्या’ची नव्हे! पण, इथे तर अनेकांना रामराज्याची कल्पना मानवत नाही. ती स्वीकारली की मग हिंदुत्ववाद स्वीकारल्याचा भास होतो त्यांना. त्यामुळे अंगावर पडलेले झुरळ झटकावे अशा थाटात ते रामराज्याची कल्पना झिडकारतात. एकीकडे ‘गांधी’ स्वीकारल्याची नौटंकी करायची. उच्चरवात त्याचा कंठशोष करायचा अन् दुसरीकडे त्यांनी मांडलेली रामराज्याची कल्पना मात्र नाकारायची, हे कसे चालेल? बरं, कायम त्यांच्या तसबिरी भिंतींवर लावून त्यांच्या साक्षीने सत्तेचा कारभार चालविणार्यांनी, गांधीजींची ग्राम विकासाची कल्पना अंमलात आणल्याचे तरी चित्र कुठे आहे? याच्या उलट समाजातल्या शेवटच्या माणसाच्या विकासाची कल्पना मांडणारे आणि त्यातून ‘गांधी’ आचरणात आणणारे लोक तर ‘वेगळेच’ आहेत. तरीही त्यांच्या कपाळी कायम शिक्का असतो गांधींच्या विचारांचे विरोधक असल्याचा!
महात्मा गांधींचे नाव घेऊन सत्ता बळकावणार्या कालपर्यंतच्या नेत्यांनी सरकारी कारभार चालवताना गांधीजींचा विचार किंचितसाही अंमलात आणला असता, तर आज खेडी बकाल अन् शहरातल्या झोपडपट्ट्या भकास झाल्या नसत्या. तसे घडले असते, तर विकासाचा असमतोलही निर्माण झाला नसता अन् आत्महत्या करण्याची वेळही इथल्या शेतकर्यांवर आली नसती. पण, गांधीनामाचा कायम जप करणार्यांनीच गांधींच्या स्वप्नातली खेडी उजाड केली. फक्त राजकारण साधण्यासाठी तोंडी लावायला ‘गांधी’ वापरला, तर याच्यापेक्षा वेगळे काय घडणार आहे?

No comments:
Post a Comment