मुळात आपल्या समाजात एखाद्या मुलीची लिलावात विक्री होते, कुणीतरी तिला विकण्यासाठी बाजारात उभी करतो, चार लोक तिला मिळवण्यासाठी बोली लावतात, त्यातील सर्वाधिक रकमेत ती कुणाच्यातरी स्वाधीन केली जाते, हाच आक्षेपार्ह प्रकार आहे. असले कित्येक प्रकार यापूर्वी घडून गेले असतील. ते पोलिसांपर्यंत पोहोचले नाहीत म्हणून ते कुणाला कळलेही नाहीत. कालचा प्रकार उघडकीस आला म्हणून त्यावर निदान चर्चा तरी सुरू झाली आहे. आता चार दिवस त्यावर चर्वितचर्वण होईल. कदाचित सरकार जागे होईल तिथले. मोजक्या, ठरलेल्या प्रसंगातच जागे होण्याचा विडा उचलून बसलेले मानवाधिकारवालेही कदाचित तोंड उघडतील आता. माणसांचा बाजार मांडून माणुसकी हरवल्याचा दाखला देणार्यांची वानवा नव्हतीच कधी इथे. त्यांची लायकी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे एवढंच. मुकाट्यानं बघत राहिलेल्या षंढांची गर्दी पुरे झाली, पेटून उठलेल्या माणसांनी या घटनेविरुद्ध रान पेटवावे, एवढीच अपेक्षा आहे...
खरंच प्रगत झालोय् आम्ही? कुठल्या निकषावर मोजायची आमची प्रगती? इथल्या सरकारी कार्यालयातील बाबूंच्या खाबुगिरीच्या, की मुलींवरील बलात्काराच्या अलीकडच्या वाढत्या संख्येच्या? सदैव गुर्मीत जगणार्या बेमुर्वतखोर सरकारी यंत्रणेच्या, की लालफीतशाहीत बासनात गुंडाळून ठेवल्या गेलेल्या गोरगरिबांच्या कामाच्या फायलींच्या ढीगाच्या? सांगा ना! कशाच्या आधारावर छातीठोकपणे करतो आम्ही विकासाचे दावे? कालपर्यंतचे खडबडीत रस्ते आता गुळगुळीत झाले, अंधारात चाचपडणारी माणसं विजेच्या झगमगाटात वावरू लागली, शेतांची जागा उद्योजकांनी बळकावली. गावातल्या गल्ल्या जराशा रुंदावल्या, कालचे अरुंद रस्ते आता चौपदरी झाले. दुचाकी जाऊन चारचाकी वाहनं आलीत, रेल्वे आली, विमानं आली... या वावटळीत फक्त माणुसकी तेवढी रसातळाला गेली. तरीही आम्ही विकसित झालो असल्याचा दावा आहे आमचा!
अकरावीत शिकणार्या एका पोरीचा जाहीर लिलाव झाला परवा उत्तरप्रदेशातल्या एका गावातल्या बाजारात. तिचा बॉयफ्रेण्ड म्हणवणार्या एका हरामखोरानं ७० हजार रुपयांत तीन नराधमांच्या स्वाधीन केलं तिला. ती तर प्रेमात पडली त्याच्या. प्रेमात वेडं होत, मोठ्या विश्वासानं सर्वस्व स्वाधीन करून बसली मित्राच्या अन् त्यानं विश्वासघात करून तिला भर बाजारात बोली लावून विकलं! मानवी प्रवृत्तीच्या विविध तर्हांची मांडणी करण्याचा हा यत्न नाही. त्या सदरात तर बापानं पोटच्या गोळ्याची केलेली हेळसांडही मांडता येईल अन् पाझर न फुटलेल्या आईच्या मायेवरही प्रश्नचिन्ह उभे करता येतील. भावानं तोडलेल्या बहिणीच्या इभ्रतीच्या लचक्यांची कथाही कदाचित या सदरात बसविता येईल. पण, ज्यांच्या डोळ्यांदेखत संभल जिल्ह्यातील रामपुरात परवाचा प्रसंग घडला, त्या गर्दीचा एक भाग बनलेल्या षंढांचे काय? बाजारात भाजी विकावी तशी एक मुलगी विकली जाते, त्यासाठी जाहीरपणे लिलाव होतो, बोली बोलली जाते... हा सारा तमाशा आपल्या समोर घडताना बघूनही, त्यातील एकालाही विरोधात चकार शब्द काढावासा वाटला नाही, त्याचं काय?
रस्त्यानं जाताना अपघात घडलेला बघून हळहळ व्यक्त करत गुमान बाजूनं निघून जाणार्यांची जमात आमची. फुकटात काही मिळत असलं की हात पसरणारी अन् दानत दाखवण्याची वेळ आली, की कुठलासा बहाणा करून जबाबदारी टाळणारी. खिशात जरासा पैसा खुळखुळला की, गुर्मीत येणारी अणि समोरून खाकी वर्दीतला माणूस येताना दिसला की, दरदरून घाम फुटणारी. भिकार्याला भीक देताना नाक मुरडणारी आणि बड्या हॉटेलमधल्या वेटरला टीप देताना कॉलर अभिमानानं टाईट करणारी. टीव्हीवरच्या मालिकांमधील नात्यांची वीण सैल झाली की, बेचैन होणारी अन् वास्तवातील नात्यांबाबत तटस्थपणे वागणारी... क्वचितप्रसंगी पेटून उठणारी. सरकारवर चिडणारी. अधिकार्यांवर संतापणारी. व्यवस्थेविरुद्ध भडकणारी. आता कुणालातरी मदतीला धावताना बघितल्यानंतर शेतकर्यांच्या आत्महत्यांवरून कळवळून उठणारी... एरवी मेलेल्या भावनांच्या बाजारात वावरणारी मंडळी आम्ही. एरवी बघ्यांच्या गर्दीतला एक घटक आम्ही. नेत्याच्या जयजयकारासाठी त्याच्या प्रतीक्षेत ताटकळणारी अन् डोळ्यांसमोरून निघून जाणार्या त्याच नेत्याच्या ताफ्याच्या धुराळ्यात आपले भवितव्य धुंडाळणारी...
बर्याच वर्षांपूर्वीचा एक किस्सा सांगितला जातो. राजस्थानात गुरांचा लागावा तसा मुलींचा बाजार लागायचा. एका सामाजिक कार्यकर्त्यानं त्याची बातमी करण्यासाठी पुरावा म्हणून त्या बाजारात जाऊन मुद्दाम दोन मुली विकत घेतल्या. राज्याच्या राजधानीत येऊन पत्रकारांसमोर व्यथा मांडली. त्या बाजाराचा पर्दाफाश केला. त्याला वाटलं बस्स! आता त्या बाजारावर पोलिसांची धाड पडेल आणि सरेआम होणारी महिलांची विक्री लागलीच थांबेल. पण घडलं उलटंच. बाजार मांडणार्यांवर कारवाई झालीच नाही. उलट, दोन महिलांची खरेदी करून त्यांच्या मानवाधिकाराचे हनन केले म्हणून त्या कार्यकर्त्याच्या मागे पोलिसांचा ससेमिरा लागला! नंतरची कित्येक वर्षे त्याला स्वत:ला निर्दोष सिद्ध करण्यात घालवावे लागले. पण, तिथे महिलांचा खरंच बाजार भरतो, गुरांसारखी त्यांची खरेदी-विक्री होते, हे सांगणारा एकही ‘साक्षीदार’ न गवसल्यानं त्या प्रकरणात कुणावरच कारवाई होऊ शकत नसल्याची खंत व्यक्त करून पोलिस आपल्या जबाबदारीतून मोकळे झाले.
आज इतक्या वर्षांनंतर बदललेल्या स्वरूपात तसल्याच प्रसंगाची पुनरावृत्ती बघायला मिळाली. इथे पोलिसांनी चांगली भूमिका वठवली, त्या मुलीला घरी परतण्यासाठी मदत केली, हा फरक सोडला, तर या प्रगत म्हणवणार्या समाजात आजही एखाद्या मुलीचा लिलाव होऊ शकतो, कुणीतरी तिची खरेदी-विक्री करू शकतो, ही लाजिरवाणी वस्तुस्थिती कुठे बदलली आहे? त्या भयाण वास्तवाची खंत ना काल कुणाला होती, ना आज कुणाला ती असल्याचे जाणवते! तरीही पुरोगामित्वाचा टेंभा मिरवण्यात आघाडीवर असतात इथले लोक. एवढ्यातेवढ्यावरून पुरस्कार परत करायला सरसावलेल्या पांढरपेश्यांच्या गर्दीतूनही या प्रकरणी अगदी दबक्या आवाजातही कुणी निषेध नोंदविल्याचे ऐकिवात नाही. एरवी तरी काय, नावामागे लावायला हवी असलेली बिरुदावली मिळवण्यासाठी सरकारी यंत्रणेच्या मागेपुढे धडपडणार्या बहुतांश लाचारांची गर्दी ती. सामाजिक भावभावनांना तिथं कुठे स्थान? पण, सामान्यांच्या गर्दीतून तरी कुठे संताप व्यक्त होतोय्? त्यांच्या भावनांचा स्वर तरी कुठे कानावर पडतोय् या घटनेसंदर्भात?
एका पेपरात बातमी छापून आली, एका मुलीची ‘फक्त’ ७० हजार रुपयांत विक्री! तर यातील ‘फक्त’ शब्दावर आक्षेप नोंदवणारे, संताप व्यक्त करणारे चार-दोन लोकं दिसले कुठेतरी. त्यांचा आक्षेप मथळ्यातल्या शब्दांच्या वापरावर तेवढा होता. फक्त ७० हजारात, म्हणजे अधिक रकमेत ती विक्री व्हायला हवी होती का, या सवालातून मनातल्या भावना व्यक्त करणारी त्यांची भूमिका होती. संभलच्या रामपूरच्या बाजारात घडलेल्या त्या घटनेवर आक्षेप नोंदवणारी, त्या प्रकारानं अंगाची लाहीलाही झालेली, तो लिलाव बघून पेटून उठलेली, चवताळून उठलेली माणसं दिसलीच नाहीत कुठे!
मुळात आपल्या समाजात एखाद्या मुलीची लिलावात विक्री होते, कुणीतरी तिला विकण्यासाठी बाजारात उभी करतो, चार लोक तिला मिळवण्यासाठी बोली लावतात, त्यातील सर्वाधिक रकमेत ती कुणाच्यातरी स्वाधीन केली जाते, हाच आक्षेपार्ह प्रकार आहे. असले कित्येक प्रकार यापूर्वी घडून गेले असतील. ते पोलिसांपर्यंत पोहोचले नाहीत म्हणून ते कुणाला कळलेही नाहीत. कालचा प्रकार उघडकीस आला म्हणून त्यावर निदान चर्चा तरी सुरू झाली आहे. आता चार दिवस त्यावर चर्वितचर्वण होईल. कदाचित सरकार जागे होईल तिथले. मोजक्या, ठरलेल्या प्रसंगातच जागे होण्याचा विडा उचलून बसलेले मानवाधिकारवालेही कदाचित तोंड उघडतील आता. माणसांचा बाजार मांडून माणुसकी हरवल्याचा दाखला देणार्यांची वानवा नव्हतीच कधी इथे. त्यांची लायकी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे एवढंच. मुकाट्यानं बघत राहिलेल्या षंढांची गर्दी पुरे झाली, पेटून उठलेल्या माणसांनी या घटनेविरुद्ध रान पेटवावे, एवढीच अपेक्षा आहे...
रस्त्यानं जाताना अपघात घडलेला बघून हळहळ व्यक्त करत गुमान बाजूनं निघून जाणार्यांची जमात आमची. फुकटात काही मिळत असलं की हात पसरणारी अन् दानत दाखवण्याची वेळ आली, की कुठलासा बहाणा करून जबाबदारी टाळणारी. खिशात जरासा पैसा खुळखुळला की, गुर्मीत येणारी अणि समोरून खाकी वर्दीतला माणूस येताना दिसला की, दरदरून घाम फुटणारी. भिकार्याला भीक देताना नाक मुरडणारी आणि बड्या हॉटेलमधल्या वेटरला टीप देताना कॉलर अभिमानानं टाईट करणारी. टीव्हीवरच्या मालिकांमधील नात्यांची वीण सैल झाली की, बेचैन होणारी अन् वास्तवातील नात्यांबाबत तटस्थपणे वागणारी... क्वचितप्रसंगी पेटून उठणारी. सरकारवर चिडणारी. अधिकार्यांवर संतापणारी. व्यवस्थेविरुद्ध भडकणारी. आता कुणालातरी मदतीला धावताना बघितल्यानंतर शेतकर्यांच्या आत्महत्यांवरून कळवळून उठणारी... एरवी मेलेल्या भावनांच्या बाजारात वावरणारी मंडळी आम्ही. एरवी बघ्यांच्या गर्दीतला एक घटक आम्ही. नेत्याच्या जयजयकारासाठी त्याच्या प्रतीक्षेत ताटकळणारी अन् डोळ्यांसमोरून निघून जाणार्या त्याच नेत्याच्या ताफ्याच्या धुराळ्यात आपले भवितव्य धुंडाळणारी...
बर्याच वर्षांपूर्वीचा एक किस्सा सांगितला जातो. राजस्थानात गुरांचा लागावा तसा मुलींचा बाजार लागायचा. एका सामाजिक कार्यकर्त्यानं त्याची बातमी करण्यासाठी पुरावा म्हणून त्या बाजारात जाऊन मुद्दाम दोन मुली विकत घेतल्या. राज्याच्या राजधानीत येऊन पत्रकारांसमोर व्यथा मांडली. त्या बाजाराचा पर्दाफाश केला. त्याला वाटलं बस्स! आता त्या बाजारावर पोलिसांची धाड पडेल आणि सरेआम होणारी महिलांची विक्री लागलीच थांबेल. पण घडलं उलटंच. बाजार मांडणार्यांवर कारवाई झालीच नाही. उलट, दोन महिलांची खरेदी करून त्यांच्या मानवाधिकाराचे हनन केले म्हणून त्या कार्यकर्त्याच्या मागे पोलिसांचा ससेमिरा लागला! नंतरची कित्येक वर्षे त्याला स्वत:ला निर्दोष सिद्ध करण्यात घालवावे लागले. पण, तिथे महिलांचा खरंच बाजार भरतो, गुरांसारखी त्यांची खरेदी-विक्री होते, हे सांगणारा एकही ‘साक्षीदार’ न गवसल्यानं त्या प्रकरणात कुणावरच कारवाई होऊ शकत नसल्याची खंत व्यक्त करून पोलिस आपल्या जबाबदारीतून मोकळे झाले.
आज इतक्या वर्षांनंतर बदललेल्या स्वरूपात तसल्याच प्रसंगाची पुनरावृत्ती बघायला मिळाली. इथे पोलिसांनी चांगली भूमिका वठवली, त्या मुलीला घरी परतण्यासाठी मदत केली, हा फरक सोडला, तर या प्रगत म्हणवणार्या समाजात आजही एखाद्या मुलीचा लिलाव होऊ शकतो, कुणीतरी तिची खरेदी-विक्री करू शकतो, ही लाजिरवाणी वस्तुस्थिती कुठे बदलली आहे? त्या भयाण वास्तवाची खंत ना काल कुणाला होती, ना आज कुणाला ती असल्याचे जाणवते! तरीही पुरोगामित्वाचा टेंभा मिरवण्यात आघाडीवर असतात इथले लोक. एवढ्यातेवढ्यावरून पुरस्कार परत करायला सरसावलेल्या पांढरपेश्यांच्या गर्दीतूनही या प्रकरणी अगदी दबक्या आवाजातही कुणी निषेध नोंदविल्याचे ऐकिवात नाही. एरवी तरी काय, नावामागे लावायला हवी असलेली बिरुदावली मिळवण्यासाठी सरकारी यंत्रणेच्या मागेपुढे धडपडणार्या बहुतांश लाचारांची गर्दी ती. सामाजिक भावभावनांना तिथं कुठे स्थान? पण, सामान्यांच्या गर्दीतून तरी कुठे संताप व्यक्त होतोय्? त्यांच्या भावनांचा स्वर तरी कुठे कानावर पडतोय् या घटनेसंदर्भात?
एका पेपरात बातमी छापून आली, एका मुलीची ‘फक्त’ ७० हजार रुपयांत विक्री! तर यातील ‘फक्त’ शब्दावर आक्षेप नोंदवणारे, संताप व्यक्त करणारे चार-दोन लोकं दिसले कुठेतरी. त्यांचा आक्षेप मथळ्यातल्या शब्दांच्या वापरावर तेवढा होता. फक्त ७० हजारात, म्हणजे अधिक रकमेत ती विक्री व्हायला हवी होती का, या सवालातून मनातल्या भावना व्यक्त करणारी त्यांची भूमिका होती. संभलच्या रामपूरच्या बाजारात घडलेल्या त्या घटनेवर आक्षेप नोंदवणारी, त्या प्रकारानं अंगाची लाहीलाही झालेली, तो लिलाव बघून पेटून उठलेली, चवताळून उठलेली माणसं दिसलीच नाहीत कुठे!
मुळात आपल्या समाजात एखाद्या मुलीची लिलावात विक्री होते, कुणीतरी तिला विकण्यासाठी बाजारात उभी करतो, चार लोक तिला मिळवण्यासाठी बोली लावतात, त्यातील सर्वाधिक रकमेत ती कुणाच्यातरी स्वाधीन केली जाते, हाच आक्षेपार्ह प्रकार आहे. असले कित्येक प्रकार यापूर्वी घडून गेले असतील. ते पोलिसांपर्यंत पोहोचले नाहीत म्हणून ते कुणाला कळलेही नाहीत. कालचा प्रकार उघडकीस आला म्हणून त्यावर निदान चर्चा तरी सुरू झाली आहे. आता चार दिवस त्यावर चर्वितचर्वण होईल. कदाचित सरकार जागे होईल तिथले. मोजक्या, ठरलेल्या प्रसंगातच जागे होण्याचा विडा उचलून बसलेले मानवाधिकारवालेही कदाचित तोंड उघडतील आता. माणसांचा बाजार मांडून माणुसकी हरवल्याचा दाखला देणार्यांची वानवा नव्हतीच कधी इथे. त्यांची लायकी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे एवढंच. मुकाट्यानं बघत राहिलेल्या षंढांची गर्दी पुरे झाली, पेटून उठलेल्या माणसांनी या घटनेविरुद्ध रान पेटवावे, एवढीच अपेक्षा आहे...
No comments:
Post a Comment