याच्या त्याच्या माध्यमातून, कुणाच्यातरी वशिल्याने एकदा का सरकारी नोकरी मिळाली की मग कोणीच आपले काहीच बिघडवू शकत नसल्याच्या तोर्यात मिरवणारी बाबूगिरीची ही प्रवृत्ती अनेकदा कित्येकांना त्रस्त करून सोडते, नव्हे अक्षरश: रडकुंडीला आणते. सरकारी कार्यालयातले सामान्यजनांचे हेलपाटे हा त्या घटकाच्या नाहक मगरुरीचा परिपाक असतो. पहिल्या प्रयत्नात, वेगात लोकांची कामे उरकली तर जणू काय फाशीची शिक्षाच होईल, अशा थाटात ही मंडळी वागते. एकाच कामासाठी लोकांना वारंवार सरकारी कार्यालयाच्या पायर्या चढाव्या लागतील, याची व्यवस्था यांनी प्रचलित व्यवस्थेतून व्यवस्थितपणे उभारली आहे. आपल्या वागणुकीतून सरकारच्या वाट्याला नाहक बदनामी येते, साहेबांवर अकारण अकार्यक्षमतेचा ठपका बसतो, याच्याशी काहीही घेणेदेणे नसते या घटकाला. तो आपला त्याच्याच पद्धतीने वागत असतो. जगाच्या भावभावनांशी काडीचा संबंध नसल्यासारखा. त्यांच्या गरजांशी काहीएक घेणेदेणे नसल्यासारखा.सामान्य माणसाला कायम छळणार्या बाबू नावाच्या या घटकाला वठणीवर आणणे ही खरं तर, व्यवस्थेचा बळी ठरलेल्या प्रत्येकाच्या मनातली भावना. दात-ओठ खात चरफडत राहण्यापलीकडे त्याला काही करता येत नाही म्हणून, नाही तर या देशातल्या प्रत्येक सामान्य माणसाने त्याला सतावणार्या शासकीय कार्यालयातील या माजोर्या व्यवस्थेला धडा शिकवण्याचा निर्धार आयुष्यात कधीतरी अमलात आणला असता.
सरकारी बाबू म्हणजे एकदम ताकदवान माणूस! लोकांची कामे करणे वा ती लालफीतशाहीत गुंडाळून बासनात ठेवण्याचे श्रेय, अपश्रेय ते त्याचेच. त्यांनी परवानगी दिली तरच साहेबांपर्यंत पोहोचण्याची सोय, अन्यथा तुमच्या कामाची वाट लागलीच समजा. कधी कधी असे जाणवते की, बाबू हा कर्मचारी असण्यापेक्षाही ती एकप्रकारची मानसिकता आहे. त्यामुळेच की काय पण, कार्यालय सरकारी असो की खाजगी तिथला ‘बाबू’ वागतो सारखाच. लोकांची कामं अडवून धरण्याची त्याची तर्हा तिकडे आहे, तशीच इकडेही आहे. त्यातही सरकारी कार्यालयात तर सबकुछ हा बाबूच असल्यामुळे त्याच्या वागण्याची तर्हाही काहीशी तोर्यातली असते; अन् तेवढीच अफलातूनही. त्याच्या वागण्याचा परिणाम तिथल्या कामांवर जाणवतो. त्याने मनावर घेतले तर काम पुढे सरकणार, त्याने ठरवले तर तेच काम रखडणार. साहेबांपुढेही त्याचीच चलती अन् लोकांना त्यांच्या कामासाठी ताटकळत ठेवणारा घटकही तोच. मंत्रालयात साचणारा फायलींचा ढीग आणि त्या पुढे नेण्याच्या-अडवून धरण्याच्या वेगाची मीमांसा केली, तरी इथे काही विशिष्ट लोकांचे काम कसे लागलीच फत्ते होते आणि इतर कित्येकांच्या कामांच्या फाईली कशा वर्षानुवर्षे धूळ खात पडून राहतात, याचा अंदाज बांधता येईल आपल्याला.
बाबूगिरी कोर्टातली असो की मग जिल्हाधिकार्यांच्या कचेरीतली, ती तालुक्याच्या ठिकाणची असो की मग थेट दिल्लीतली, कामांबाबतची ही ‘सरकारी तर्हा’ सर्वदूर सर्वसामान्यांना छळणारीच ठरली आहे. भरमसाट पगार, तरीही कामाच्या बाबतीत सर्वत्र बोंब, रेंगाळलेली कामे अन् फायलींच्या ढिगाखाली होणारी महत्त्वपूर्ण निर्णयांची ऐशीतैशी, सगळीकडे हाच तमाशा आहे. पगाराच्या तुलनेत कामं करत नसली तरी ही जमात आहे मात्र भारी. लय भारी. त्याच्याविरुद्ध ब्र काढण्याची हिंमत होत नाही इथे कुणाचीच. कारण आज विरोधात काही बोलाल, तर उद्या ही मंडळी तुम्हाला कुठे, कशी गोत्यात आणेल, सांगता येत नाही. कारण कामं अडवून धरायची झाली तर कायदे, नियमातल्या तरतुदींचा सुयोग्य वापर यांच्याइतका दुसर्या कुणालाही ठावूक नसेल कदाचित! साहेब म्हणवणार्या भल्याभल्यांनी, कित्येक मंत्र्यांनी चांगलाच अनुभव घेतला आहे, प्रशासनातील या बाबूगिरीचा. कायम दुसर्यांवर अन्याय करीत राहिलेला हा घटक, त्याच्यावर कारवाई होण्याची वेळ आली की मात्र पुरता चवताळून उठतो. तेव्हा मात्र, त्याला त्याच्यावरील अन्यायाची जाणीव अतिशय तीव्रतेने झालेली असते. त्याने स्वत: आजवर कित्येक फाईली आणि त्यायोगे कित्येक महत्त्वाचे निर्णय त्याच्या या कार्यशैलीतून अडवून धरले असले, तरी त्याच्या स्वत:च्या बाबतीतले निर्णय अडलेले मात्र त्याला जराही खपत नाही.
वर्षानुवर्षे हे असंच चाललं आहे. सरकारे बदलली. राज्यकर्ते बदलले. प्रत्येकाने आपापल्या परीने बदल घडवण्याचा प्रयत्न केला. पण ही ‘सरकारी सिस्टिम’ मात्र होती तशीच राहिली. ती, ना काल बदलली, ना उद्या ती बदलेल, याची काही चिन्हे आज दिसताहेत. पण जेव्हा एखादी यंत्रणा बदलण्याचा, परिवर्तन घडवण्याचा निर्धार झालेला असतो, तेव्हा संबंधितांचे चवताळणे गृहीत धरूनही काही निर्णय कठोरपणे घ्यावे लागतात. तेवढ्याच निर्धाराने ते निर्णय राबवावे लागतात. सरकारी यंत्रणेतील बाबूगिरीवर परवा पंतप्रधानांनी उगारलेले आसूड म्हणूनच महत्त्वपूर्ण आणि या व्यवस्थेला कंटाळलेल्या सामान्य माणसाला दिलासा देणारे ठरले आहेत. ज्यांच्याबाबत सतत तक्रारी येताहेत, जे लोक गलेलठ्ठ पगाराच्या सरकारी नोकरीने माजले आहेत, आपण जनतेचे सेवक असल्याचे ज्यांना विस्मरण झाले आहे, त्यामुळे कार्यालयात वरिष्ठांचे ऐकण्याची ज्यांना गरज वाटत नाही, इतकेच काय पण, ज्यांना महिन्याकाठी नियमितपणे वेतन घेऊनही त्याच्या बदल्यात कार्यालयातली कामे करण्याचीही गरज वाटत नाही, सरकारी कार्यालयातील अशा तमाम मंडळींना धडा शिकवण्याचा, त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याचा सल्ला खुद्द पंतप्रधानांनी विविध विभागांच्या सचिवांना दिला आहे.
एकदा यंत्रणेचा, त्याच्या कार्यपद्धतीचा अभ्यास झाला की माशी नेमकी कुठे शिंकते आहे, मेख नेमकी कुठे मारली जात आहे, लोकांची कामे नेमकी कुठे अडत आहेत, हे ूलक्षात यायला फारसा वेळ लागत नाही. इतक्या वर्षांच्या प्रशासनिक अनुभवातून पंतप्रधानांनाही नेमका धागा सापडलेला दिसतोय्. त्यामुळे सरकारी कार्यालयातील कामकाजाची शैली सुधारायची, तिथल्या कामात वेग आणायचा, तर त्याच्या आड येणार्यांवर सर्वप्रथम प्रहार केला पाहिजे, कामचुकार बाबूगिरीवरचा वार हा त्याचा पहिला टप्पा आहे, हे त्यांनी जाणले. आणि त्यानुरूप पावले उचलण्याचा सल्लाही आपल्या सहकार्यांना त्यांनी दिला.
याच्या त्याच्या माध्यमातून, कुणाच्यातरी वशिल्याने एकदा का सरकारी नोकरी मिळाली की मग कोणीच आपले काहीच बिघडवू शकत नसल्याच्या तोर्यात मिरवणारी बाबूगिरीची ही प्रवृत्ती अनेकदा कित्येकांना त्रस्त करून सोडते, नव्हे अक्षरश: रडकुंडीला आणते. सरकारी कार्यालयातले सामान्यजनांचे हेलपाटे हा त्या घटकाच्या नाहक मगरुरीचा परिपाक असतो. पहिल्या प्रयत्नात, वेगात लोकांची कामे उरकली तर जणू काय फाशीची शिक्षाच होईल, अशा थाटात ही मंडळी वागते. एकाच कामासाठी लोकांना वारंवार सरकारी कार्यालयाच्या पायर्या चढाव्या लागतील, याची व्यवस्था यांनी प्रचलित व्यवस्थेतून व्यवस्थितपणे उभारली आहे. आपल्या वागणुकीतून सरकारच्या वाट्याला नाहक बदनामी येते, साहेबांवर अकारण अकार्यक्षमतेचा ठपका बसतो, याच्याशी काहीही घेणेदेणे नसते या घटकाला. तो आपला त्याच्याच पद्धतीने वागत असतो. जगाच्या भावभावनांशी काडीचा संबंध नसल्यासारखा. त्यांच्या गरजांशी काहीएक घेणेदेणे नसल्यासारखा.
सामान्य माणसाला कायम छळणार्या बाबू नावाच्या या घटकाला वठणीवर आणणे ही खरं तर, व्यवस्थेचा बळी ठरलेल्या प्रत्येकाच्या मनातली भावना. दात-ओठ खात चरफडत राहण्यापलीकडे त्याला काही करता येत नाही म्हणून, नाही तर या देशातल्या प्रत्येक सामान्य माणसाने त्याला सतावणार्या शासकीय कार्यालयातील या माजोर्या व्यवस्थेला धडा शिकवण्याचा निर्धार आयुष्यात कधीतरी अमलात आणला असता. पण जगण्याच्या स्वत:च्या विवंचनेतून बाहेर पडण्याची फुरसत होत नसल्याने, मनातल्या संतापाला वाट मोकळी करून देण्याची संधीच त्याला कधी गवसत नाही; आणि तशी संधी कधी गवसलीच, तरी दरवेळी मुठी आवळून अन्यायाविरुद्ध एल्गार पुकारण्याची हिंमत प्रत्येकात आहे कुठे? अन्याय सहन करण्यातच आयुष्य चाललेय् इथे कित्येकांचे. त्यामुळे आता या बाबूगिरीवर आळा घालण्याची, सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेरची, पण तरीही त्याच्या मनात घर करून बसलेली भावना, कुणीतरी प्रत्यक्षात बोलतोय् म्हटल्यावर, त्याला मनापासून आनंद होणे स्वाभाविकच. त्यामुळे बाबूगिरीवर प्रहार करण्याची पंतप्रधानांची भावना त्याला भावली आहे. कधीतरी याच बाबूगिरीचा फटका बसल्याने निर्माण झालेल्या, मनातल्या संतापाच्या लाटेला, यानिमित्ताने व्यक्त होण्याची संधी त्याच्या लेखी आता गवसते आहे. कालपर्यंत त्याने मूग गिळून सहन केलेल्या बाबूगिरीच्या अन्यायाला त्यायोगे वाचा फुटणार आहे...