अमेरिकेला दहशतवादाची जाणीव व्हायला, त्याचे गांभीर्य कळायला कित्येक वर्षे जावी लागलीत. तिथल्या दोन इमारती जमीनदोस्त व्हाव्या लागल्यात. पण तोवर भारतासारखे जगातले इतर कित्येक देश दहशतवादाचा सामना करताना वेगवेगळ्या स्वरूपात त्याचे परिणाम भोगत राहिले होते. लष्कर-ए-तोयबा असो, वा मग इंडियन मुजाहिदीन, त्यांनी घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटांनी दरवेळी केवळ हादरण्याचाच अनुभव इथल्या सरकारांनी घेतला अन् जवळची लोकं कायमची गमावल्याचे दु:ख वाट्याला आले, ते सर्वसामान्य निष्पाप लोकांच्या! बरं ज्यांनी इतरांच्या कुरघोड्या करण्यासाठी या दहशतवादाला खतपाणी घातले, त्याही देशांचे फार बरे चाललेले आहे, असेही नाही. पाकिस्तान, इराक ही त्याची ज्वलंत उदाहरणे आहेत. ज्यांचे लाड पुरवताना कधीकाळी पाकिस्तानातील नेत्यांना फुरसत होत नव्हती, आज त्याच तालिबान्यांचे अड्डे नेस्तनाबूत करण्याची वेळ तिथल्या सरकारवर आली आहे. नेमके हेच इराकमध्येही घडत आहे. सीरियाविरुद्ध लढण्यासाठी समाजातल्या सुन्नी घटकाला भडकवून आयएसआयएस नावाची दहशतवादी संघटना तयार करताना, तिला दिवसागणिक वाढताना बघताना, त्यांच्या माध्यमातून शत्रूंची शकले पडताना बघून इराकच्या नेत्यांना आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या, आता तीच जमात आपल्याच देशाच्या मुळावर उठली आहे. आपल्याच देशाचे अस्तित्व संपवायला सरसावली आहे.
तिकडे अर्धाअधिक इराक दहशतवाद्यांच्या ताब्यात गेला असताना, आयएसआयएस नावाचे त्याच देशाने जन्माला घातलेले दहशतवादाचे भूत आता त्याच्याच मानगुटीवर बसलेले असताना, जगभरातील नावाजलेल्या दहशतवादी संघटनांनी ठिकठिकाणी महाविनाश घडविण्यास सक्षम अशी शस्त्रे मिळविण्यासाठी प्रयत्न चालविले असल्याचे वृत्त येऊन धडकले आहे. याचा भविष्यातील परिणाम काय असेल कुणास ठावूक, पण मुस्लिम राष्ट्रांच्या आशीर्वादाने, त्यांच्या छत्रछायेखाली, त्यांच्या सहमतीने जन्माला आलेली दहशतवादाची पिलावळ आता त्याच देशांच्या अस्तित्वावर घाला घालू लागली असल्याचे धगधगते वास्तव नव्याने जगापुढे आले आहे. केवळ लोकांचे मुडदे पाडून, रक्ताचा सडा टाकून, वेगवेगळ्या देशातली प्रशासने हादरवून, तिथली सरकारे अस्थिर करून, लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करून स्वत:चे अस्तित्व सिद्ध करण्याची या संघटनांची धडपड नेमकी कशासाठी? यांना दहशतवादाची पाळेमुळे रुजवायची आहेत, ती नेमकी कशासाठी? अमेरिकेत वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या दोन गगनचुंबी इमारती धाराशायी करून, हजारो लोकांचे बळी घेऊन दहशतवाद्यांनी नेमके काय सिद्ध केले? मुंबईवर २६/११ चा हल्ला करून काय दाखवले लष्कर-ए-तोयबाने जगाला? धार्मिक चौकटीच्या पलीकडे जाऊन दहशतवाद हिंसाचाराच्या कुशीत विसावू लागलाय् अलीकडे. कधी काळच्या स्वत:च्या स्वातंत्र्याच्या उद्देशाने तयार झालेल्या या कथित ‘जिहादी’ टोळ्या आता दुसर्यांचे स्वातंत्र्य हिरावून घेण्यासाठी टपलेल्या दिसताहेत. स्वत:चे अस्तित्व पणाला लावून सरकारकडून हवे ते घडवून आणण्यापेक्षाही घडविलेल्या बॉम्बस्फोटांतून रक्ताच्या थारोळ्यात साचलेला प्रेतांचा खच बघण्यात आसूरी आनंद मिळू लागलाय् या टोळ्यांच्या म्होरक्यांना. त्या आसूरी आनंदाच्या लाटेत स्वातंत्र्याचे उद्दिष्ट अन् धर्माची तत्त्वे केव्हाच वाहून गेलीत. तरीही जिहादाच्या या लढाईला रंग आणि आवरणं मात्र अजूनही धर्माचीच लाभली आहेत.
अमेरिकेला दहशतवादाची जाणीव व्हायला, त्याचे गांभीर्य कळायला कित्येक वर्षे जावी लागलीत. तिथल्या दोन इमारती जमीनदोस्त व्हाव्या लागल्यात. पण तोवर भारतासारखे जगातले इतर कित्येक देश दहशतवादाचा सामना करताना वेगवेगळ्या स्वरूपात त्याचे परिणाम भोगत राहिले होते. लष्कर-ए-तोयबा असो, वा मग इंडियन मुजाहिदीन, त्यांनी घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटांनी दरवेळी केवळ हादरण्याचाच अनुभव इथल्या सरकारांनी घेतला अन् जवळची लोकं कायमची गमावल्याचे दु:ख वाट्याला आले, ते सर्वसामान्य निष्पाप लोकांच्या! बरं ज्यांनी इतरांच्या कुरघोड्या करण्यासाठी या दहशतवादाला खतपाणी घातले, त्याही देशांचे फार बरे चाललेले आहे, असेही नाही. पाकिस्तान, इराक ही त्याची ज्वलंत उदाहरणे आहेत. ज्यांचे लाड पुरवताना कधीकाळी पाकिस्तानातील नेत्यांना फुरसत होत नव्हती, आज त्याच तालिबान्यांचे अड्डे नेस्तनाबूत करण्याची वेळ तिथल्या सरकारवर आली आहे. नेमके हेच इराकमध्येही घडत आहे. सीरियाविरुद्ध लढण्यासाठी समाजातल्या सुन्नी घटकाला भडकवून आयएसआयएस नावाची दहशतवादी संघटना तयार करताना, तिला दिवसागणिक वाढताना बघताना, त्यांच्या माध्यमातून शत्रूंची शकले पडताना बघून इराकच्या नेत्यांना आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या, आता तीच जमात आपल्याच देशाच्या मुळावर उठली आहे. आपल्याच देशाचे अस्तित्व संपवायला सरसावली आहे. सरकारची ताकद आणि कमजोरी दोन्ही ठावूक झाल्याने आणि दहशतवादी कृत्ये करताना देशाचा नकाशा प्रशासनापेक्षाही काकणभर अधिकच पाठ झाल्याने एकापाठोपाठ एक शहरं या टोळ्या ताब्यात घेऊ लागल्या आहेत. या दोन्ही प्रकरणांत अमेरिकेची सावध भूमिका संशयास्पद आहेच. पण, आज जगभरात फोफावलेला दहशतवाद हा जगातल्या कुठल्या ना कुठल्या देशाच्या सत्ताधारी नेत्यांच्या पापाचे फळ असल्याच्याच निष्कर्षाप्रत यावे लागते. बहुधा म्हणूनच आता सार्या जगाने एकत्रितपणे त्याचा सामना करण्याची वेळ आली आहे. नव्हे, तीच काळाची निकड झाली आहे.
एकीकडे इराक, पाकिस्तानसारख्या देशांविरुद्ध उलटलेल्या स्थानिक दहशतवादी टोळ्यांनी तिथली तिथली सरकारे अक्षरश: जेरीस आणली असताना जगातल्या इतर देशांविरुद्ध कायम फूत्कारणार्या टोळ्या आता आपल्या कार्यकक्षा रुंदावण्याच्या योजना आखताहेत; आणि दुर्दैव असे की, स्वत: दहशतवादाचे दुष्परिणाम भोगले असले, तरी पाकिस्तानची भारताविरुद्ध आणि इराकची सीरियाविरुद्ध लढण्याची खुमखुमी अद्याप जिरलेली नाही. त्यासाठी अजूनही याच दहशतवादी टोळ्या त्यांना त्यांच्या हाताशी हव्या आहेत. त्यामुळेच दहशतवादाचे अस्तित्व मुळापासून संपविण्याची तयारी त्यांचीही दिसत नाही. या देशांची ही मानसिकता, आंतरराष्ट्रीय राजकारणाचे त्यांचे डावपेच दहशतवाद्यांनी हेरले नसतील, असे कसे म्हणता येईल? उलट त्याची पुरेपूर जाणीव असल्यानेच तालिबानी आणि आयएसआयएससारख्या संघटना आपले अस्तित्व आणि भविष्याबाबत निश्चिंत आहेत. उलट आपल्या अस्तित्वाबाबत पूर्ण खात्री असल्याने आपल्या टोळ्यांच्या भविष्यातील विस्ताराच्या योजना आखण्यात ते मशगूल आहेत. २६/११ च्या मुंबई हल्ल्यानंतर ‘लष्कर’चे आपल्या देशातील अस्तित्वच नाकारणार्या पाकिस्तानच्या नाकावर टिच्चून या दहशतवादी संघटनेने आपले कार्य विस्तारले आहे. जमात-उद-दवा नामक संघटनेच्या जिहादी मनसुब्यांचा उल्लेख एका पाकिस्तानी लेखकाच्या एका पुस्तकातून नुकताच उद्धृत झाला आहे. मुंबई हल्ल्याचा सूत्रधार मानला जाणारा हाफिज सईद याच्या जमात-उद-दवा नामक संघटनेला अमेरिकेने नुकतेच आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना म्हणून जाहीर केले आहे. तर आपली हवाई आणि सागरी ताकद वाढविण्यासाठीच्या क्लृप्त्या लढविणे ‘जमात’ ने नुकतेच आरंभले आहे. संघटनेच्या बळाच्या वाढीची दहशतवाद्यांची ही युक्ती काही कुठल्याशा देशाची सत्ता हस्तगत करण्यासाठी योजलेली नाही, हे तर सूर्यप्रकाशाएवढे स्पष्ट आहे. मग का वाढवायचीय् या टोळ्यांना आपली ताकद? का विस्तारायच्या आहेत त्यांना आपल्या कार्यकक्षा? का हवी आहे त्यांना नवीन कार्यकर्त्यांची भरती? तर ते सारे यासाठी की, त्यांना अजून क्रूर कृत्ये भविष्यात करायची आहेत. जगभरातल्या विविध देशांमध्ये येत्या काळात अजून हिंसाचार घडवायचा आहे. नरसंहार करायचा आहे... त्यासाठी गरज पडली तर अण्वस्त्रसज्ज देखील त्यांना व्हायचे आहे... दहशतवाद्यांची ही तयारी म्हणजे, भारतासारख्या कायम दहशतवादाच्या सावटात वावरणार्या देशांसाठी धोक्याचा गंभीर इशारा आहे. बांगलादेशच्या सीमेवरून होणारी घुसखोरी, चीनच्या सीमेवरून होत असलेले अतिक्रमण, या पार्श्वभूमीवर दहशतवादाच्या या नव्या सज्जतेचाही सामना करण्याची तयारीही भारतातील सरकारला येत्या काळात करावी लागणार आहे. एकूण, पुढील काळ आव्हानात्मक असल्याचेच हे संकेत आहेत.
खरे तर दहशतवादाचा सामना करण्यासाठी, नव्हे तो मुळासकट निखंदून काढण्यासाठी केवळ बाधित देशांनीच नव्हे, तर सार्या जगानेच आता पुढाकार घ्यायला हवा. जोवर पाकिस्तान भारताच्या खोड्या काढतोय् तोवर दुरून तमाशा बघायचा, शांततेच्या गप्पा हाणायच्या आणि वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला झाला की मात्र रान माजवायचे, ही अमेरिकन खेळी या प्रकरणी उपयोगाची नाही. कुणाचे तरी पाठबळ, कुणाचा तरी मदतीचा हात हेच दहशतवाद्यांची पाळेमुळे रुजण्याचे मूळ कारण आहे. कुठलेही कारण नसताना त्याविरुद्ध लढण्याची वेळ आलेले भारतासारखे देश तर त्याविरुद्ध लढतीलच, पण भविष्यात आपलाही इराक, पाकिस्तान होऊ नये, असे वाटत असेल, तर दहशतवाद्यांना जन्माला घालणार्या देशांनीच आता आपल्या भूमिकेचा पुनर्विचार केला पाहिजे...
No comments:
Post a Comment