केजरीवाल अन् संजय निरुपम म्हणजे जाज्वल्य राष्ट्रभक्तीची प्रतीकंच की नाही? आयुष्यच वेचलं आहे त्यांनी या देशासाठी! शिवाय राजकारणी लोक ते! त्यामुळे स्वत: थंड हवेच्या खोलीत बसून, विपरीत परिस्थितीत सीमेवर लढणार्या आपल्या सैनिकांच्या देशभक्तीवर शंका घेण्याचा अधिकारच गवसला आहे त्यांना. तो अधिकार त्यांनी परवा गाजवला. म्हणाले, आपल्या सैनिकांनी सीमेपलीकडे जाऊन सर्जिकल स्ट्राईक केले हे खरे कशावरून? पुरावे कुठायत् त्या कारवाईचे? खरं आहे. सरकारचं चुकलंच. अशी कुठलीही लष्करी कारवाई करताना, ती गुप्त ठेवायची असली तरी त्याचे व्हिडीओ शुटिंग करून ठेवण्याची काळजी सरकारने घ्यायला हवी होती. कारण सीमेपलीकडील लोकांना नसले, तरी आपल्या देशातील काही हरामखोरांना त्याचे पुरावे नेहमीच लागतात, हे सरकारने लक्षात ठेवायला हवं होतं. कालपर्यंतच्या कायमच्या बोटचेप्या धोरणापेक्षा, शत्रूवर थेट चाल करून जाणारे यंदाचे हे सर्जिकल स्ट्राईक या देशातील बहुतांश जनतेला भावले असले, त्या कारवाईमुळे संपूर्ण देशभरात आनंदाची लाट उसळली असली, लोक सरकारला अक्षरश: डोक्यावर घेऊन नाचू लागले असले, ही कारवाई करणार्या सैनिकांबद्दल नितांत आदराची भावना सर्वदूर मनामनातून व्यक्त होत असली, प्रत्येकाची मान अभिमानाने उंचावली असली, तरी या देशातले काही नतद्रष्ट लोक राजकारणाच्या चष्म्यातूनच सर्व गोष्टी बघतात, हे पंतप्रधानांनी ध्यानात ठेवायला हवं होतं.
राजकारणापुढे देशाच्या सैनिकांना, त्यांच्या देशभक्तीलाही कवडीमोल ठरवणार्या हरामखोरांच्या तोंडावर फेकून मारा ते पुरावे. भारतीय सैन्यदलातील वीर जवानांनी प्राणांची बाजी लावून केलेल्या कारवाईत दहशतवाद्यांची, गुलाम काश्मिरातील तळं उद्ध्वस्त झाल्याची बाब प्रत्यक्षदर्शी सांगताहेत. ही कारवाई झाल्यानंतर आपले कापले गेलेले नाक झाकण्यासाठी आणि चव्हाट्यावर आलेली इभ्रत वाचवण्यासाठी पाकड्यांनी सूर्योदयापूर्वीच्या अंधारात चाचपडत, इतस्त: विखुरलेली दहशतवादाच्या हिरव्या पिलावळीची पार्थिवं अंत्यसंस्कारासाठी कशी वेचून वेचून ट्रकमध्ये जमा करून नेलीत, त्याचे वर्णन तिथले लोक करताहेत. त्या घटनेबाबत आजूबाजूच्या लोकांनी दिलेली इत्थंभूत माहिती पत्रकारांना मिळाली. फक्त ती अरविंद केजरीवाल अन् संजय निरुपम यांच्यापर्यंत अजून पोहोचलेली नाही! केजरीवाल अन् संजय निरुपम म्हणजे जाज्वल्य राष्ट्रभक्तीची प्रतीकंच की नाही? आयुष्यच वेचलं आहे त्यांनी या देशासाठी! शिवाय राजकारणी लोक ते! त्यामुळे स्वत: थंड हवेच्या खोलीत बसून, विपरीत परिस्थितीत सीमेवर लढणार्या आपल्या सैनिकांच्या देशभक्तीवर शंका घेण्याचा अधिकारच गवसला आहे त्यांना. तो अधिकार त्यांनी परवा गाजवला. म्हणाले, आपल्या सैनिकांनी सीमेपलीकडे जाऊन सर्जिकल स्ट्राईक केले हे खरे कशावरून? पुरावे कुठायत् त्या कारवाईचे? खरं आहे. सरकारचं चुकलंच. अशी कुठलीही लष्करी कारवाई करताना, ती गुप्त ठेवायची असली तरी त्याचे व्हिडीओ शुटिंग करून ठेवण्याची काळजी सरकारने घ्यायला हवी होती. कारण सीमेपलीकडील लोकांना नसले, तरी आपल्या देशातील काही हरामखोरांना त्याचे पुरावे नेहमीच लागतात, हे सरकारने लक्षात ठेवायला हवं होतं. कालपर्यंतच्या कायमच्या बोटचेप्या धोरणापेक्षा, शत्रूवर थेट चाल करून जाणारे यंदाचे हे सर्जिकल स्ट्राईक या देशातील बहुतांश जनतेला भावले असले, त्या कारवाईमुळे संपूर्ण देशभरात आनंदाची लाट उसळली असली, लोक सरकारला अक्षरश: डोक्यावर घेऊन नाचू लागले असले, ही कारवाई करणार्या सैनिकांबद्दल नितांत आदराची भावना सर्वदूर मनामनातून व्यक्त होत असली, प्रत्येकाची मान अभिमानाने उंचावली असली, तरी या देशातले काही नतद्रष्ट लोक राजकारणाच्या चष्म्यातूनच सर्व गोष्टी बघतात, हे पंतप्रधानांनी ध्यानात ठेवायला हवं होतं. त्यांच्या दृष्टीनं पाकिस्तानला दिलेल्या चोख प्रत्युत्तराबाबत आनंद व्यक्त करून, या मुद्यावर हा सारा देश एक असल्याचे दर्शन घडवण्यापेक्षाही, कारवाईवर शंका उपस्थित करून राजकारणाचा डाव खेळणे अधिक महत्त्वाचे असते, हे लक्षात न येणे हे खरे तर सरकारचे अपयशच! सर्जिकल स्ट्राईकला लाभलेल्या अभूतपूर्व यशापेक्षाही मोठे. हो! ज्यांनी आयुष्यभर राजकारणाच्या पलीकडे काहीच केले नाही, स्वत:च्या स्वार्थासाठी विचारांची कास बाजूला ठेवून वाट्टेल त्यांच्या पखाली वाहण्यात ज्यांना कधी लाज वाटली नाही, खुर्च्या मिळविण्यासाठी नेत्यांना कुर्निसात करत आयुष्य घालविण्यासही ज्यांनी कधी कशाची पत्रास बाळगली नाही, त्या संजय निरुपमांचं समाधान झालं नाही, तर अर्थच काय उरतो लष्कराच्या या सर्जिकल स्ट्राईकला! खोकलण्यातच हयात चाललेल्या केजरीवालांसारख्यांना असल्या कारवाईचेही पुरावे लागतात. ‘‘सीमेवर लढताना शहीद झालेल्यांना आम्ही थोडीच सांगितलं होतं सैन्यात दाखल व्हायला…’’ असं म्हणणारी काही निलाजरी लोकं इथं आहेत. इथल्या समाजाच्या दुर्दैवानं ती माणसं नावाजलेली आहेत. डोक्यावर उचलून धरत आम्हीच मोठी केलेली ओम पुरी सारखी माणसं बेताल बडबड करत सुटतात. आपण काय बोलतो, कोणाबद्दल बोलतो, याचे भान राखण्याचीही गरज यशाच्या उन्मादात गुरफटलेल्या या लोकांना वाटत नाही. प्रसंगी आपल्या देशाला कमी लेखून दुसर्यांची तळी उचलत उदारमतवादी धोरणांचा पाढा वाचण्यात धन्यता मानणारी ही मंडळी. त्यांचीही दखल सर्जिकल स्ट्राईकची योजना सिद्ध करण्यापूर्वी सरकार आणि लष्करी अधिकार्यांनी घ्यायला हवी होती. नाही का? शेवटी काय, त्यांच्या बरळण्यातून पाकिस्तानची बाजू उचलून धरली जात असेल, तरी काही बिघडत नाही. इथल्या जाती-पातीच्या राजकारणातला त्यांचा डाव जास्त महत्त्वाचा. आपले विचार किती उच्च पातळीचे आहेत, याचे दर्शन त्यांनी जगाला घडवणे अधिक महत्त्वाचे. नाही का? ९/११ च्या घटनेनंतर, योग्य संधीच्या शोधात कितीतरी दिवस घालवल्यावर एक दिवस अमेरिकेने लादेनला पाकिस्तानात जाऊन ठेचला. त्याचे बेवारस शव बेमुर्वतपणे समुद्रात फेकून दिले. अमेरिकेच्या त्यासंदर्भातील दाव्यावर प्रश्नचिन्ह उभे करण्याची गरज तिथल्या एकाही राजकीय नेत्याला, तिथल्या कलाजगतातल्या एकाही कलावंताला वाटली नाही! दुर्दैवाने भारतातली परिस्थिती तशी नाही. इथे लोकशाहीचा विपर्यास आहे. म्हणूनच निर्ढावलेल्या उपटसुंभांची झालेली भरमसाठ गर्दीही आहे. म्हणूनच आपल्याच सरकारविरुद्ध इथं लोक अद्वातद्वा बोलतात. घरावर तुळशीपत्र ठेवून बाहेर पडलेल्या, सीमेवर लढणार्या आपल्याच सैनिकांच्या देशभक्तीवर जाहीरपणे शंका व्यक्त करण्याचे धाडस कुणीतरी करून जातो. आता एकच करा. प्रखर ‘राष्ट्रभक्तीने भारावलेल्या’ लष्कर-ए-तोयबाच्या कार्यकर्त्यांनी गुलाम काश्मिरातील कारवाईत ‘शहीद’ झालेल्या दहशतवाद्यांची (सॉरी! निरुपम साहेब. दहशतवादी नव्हे, राष्ट्रभक्तांची!) प्रेतं कशी जमा केली त्याचं वर्णन सांगणार्या त्या प्रत्यक्षदर्शींपुढे नेऊन उभं करा त्या निरुपम आणि केजरीवालांना! या देशातल्या तमामजनांचा त्यांच्या सैनिकांवर पूर्ण विश्वास आहे. अगदी मनापासून आहे. त्यांच्याबाबत आदर आहे लोकांच्या मनात. उगाच का, सर्जिकल स्ट्राईकच्या नुसत्या बातमीनेही धमण्यांतले रक्त सळसळायला लागले लोकांच्या? उगाच का, शेजारचा चीन त्या पाकड्यांच्या बाजूने उभा राहिलाय् म्हटल्यावर चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची भाषा स्वयंस्फूर्तीने बोलू लागलेत लोक? आमच्या सैनिकांच्या देशभक्तीवर शंका घेणार्या उपटसुंभांचे राजकारण त्यांना लखलाभ. ओम पुरींच्या हृदयात पाकिस्तानी कलावंतांसाठी ऐनवेळी उफाळून आलेले प्रेमाचे भरते, त्यांना लखलाभ. बाकी, राहिला प्रश्न या देशातील सर्वसामान्य नागरिकांचा, तर त्यांना या सर्जिकल स्ट्राईकबाबत कुठलेच पुरावे नको आहेत. त्यांचा आपल्या सरकारवर, त्याहीपेक्षा जिवावर उदार होऊन सीमेवर लढणार्या आमच्या सैनिकांवर पूर्ण विश्वास आहे. याहीउपर ज्यांना शंका असेल, त्यांनी खुशाल पुरावे मागत किंवा जमा करत हिंडावे. फक्त अशा, देशभक्तीही राजकारणाच्या तराजूनेच मोजू बघणार्या, पाकिस्तानच्या तोंडी शोभणारी भाषा भारतात बोलणार्या निर्लज्जांच्या पेकाटात लाथ मारत, त्यांना धडा कसा शिकवायचा ते मात्र जनतेने ठरवावे…
Nice article sir...
ReplyDelete