असं असेलच ना नवाब साहेब, तर मग चला सारे मिळून सुरू करूया, एक प्रथा… या समाजातल्या, इथल्या राजकारणातल्या प्रत्येक भ्रष्टाचार्याला हरामखोर म्हणण्याची. त्याची सुरुवात कुठून करायची तेवढं फक्त नवाब मलिकांनी सांगावं. पाऽऽर बोफोर्स, हर्षद मेहता प्रकरणांमध्ये गुंतलेल्या नेत्यांपासून यादी तयार करायला घ्यायची की अगदी परवा परवाच्या वाटणार्या आदर्श, कॉमनवेल्थ, टू-जी, कोळसा, सिंचन घोटाळ्यातील खादाड नेत्यांना नवाब मलिकांच्या मनातले नामाभिधान लावण्यास सुरुवात करायची? सत्ता हातात असेपर्यंत यातील एकाही घोटाळ्याविरुद्ध मलिकांनी कधी चकार शब्द काढल्याचे ऐकिवात नाही. तेव्हा कुण्या भ्रष्टाचार्याला हरामखोर ठरविण्याची कल्पना त्यांनी अशी जाहीरपणे बोलून दाखविल्याचीही वार्ता कानी नाही. त्या नवाबांना आता सत्ता हातून जाताच, भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्याची प्रेरणा अचानक का आणि कशी मिळाली, याबाबतचे आश्चर्य इथे कुणाच्याही मनात नाही. त्यासंदर्भातील संशयही इथे कुणी व्यक्त करणार नाही. त्यांना अडचणीचा ठरेल असा कुठलाच प्रश्नही कुणी विचारणार नाही, पण खुद्द कॅगने ठपका ठेवलेला या राज्यातला सिंचन घोटाळा ज्यांच्या कारकीर्दीत घडला, त्या राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या नावामागेही ही बिरुदावली लावण्याची तयारी आहे का मलिकांची, हे त्यांनी आधी जाहीरपणे स्पष्ट करावे. तसे नसेल, तर मग भ्रष्टाचाराविरुद्धचा त्यांचा संताप केवळ तोंडदेखलेपणाची साक्ष ठरतो. पक्ष कोणता हे बघून, नेत्यांची नावं बघून त्यांच्या मनातल्या संतापाची धार तीव्र किंवा बोथट होणार असेल, तर मग दुसरा काय अर्थ काढायचा त्यातून?‘‘हरामखोर हा शब्द आपण केवळ भ्रष्टाचार्यांसाठी वापरला’’, असे म्हणत त्या शिवराळ भाषेचे समर्थन करत असाल, तर मग या राज्याच्या मंत्रिमंडळातील भ्रष्टाचारी मंत्र्यांनाही आम्ही हरामखोर म्हणायचं का, असा लाखमोलाचा सवाल काल मोठ्या ठसक्यात विचारला राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नवाब मलिकांनी. मलिकांचा आक्षेप महादेव जानकरांनी परवाच्या त्यांच्या भाषणात अजित पवारांसाठी वापरलेल्या भाषेवर आहे. जानकरांनी वापरलेली भाषा योग्य नाहीच. अगदी तीव्र संतापातून ती बोलली गेली असली तरी समर्थनीय नाही आणि राजकारणातील सभ्यतेला धरून तर नाहीच नाही. पण राजकारणात वर्षानुवर्षे वावरणार्या एखाद्या बड्या नेत्याबाबत एखाद्या कार्यकर्त्याच्या तोंडी अशी शिवराळ भाषा का यावी, याचे कारणही शोधले पाहिजे ना मलिक साहेब कधीतरी? आणि राहिला प्रश्न या देशातील तमाम भ्रष्टाचार्यांना हरामखोर या विशेषणाने संबोधण्याचा, तर सूचना एकदम झकास आहे त्यांची. फक्त त्या ‘हरामखोरांची’ यादी इतिहासातल्या नेमक्या कोणत्या वर्षापासून अन् कोणत्या नेत्यापासून सुरू करायची, तेवढं त्यांनी सांगावं. आता भ्रष्टाचाराबद्दल एवढी प्रचंड चीड मनात दाटून आलीच आहे त्यांच्या, तर त्याविरुद्ध त्यांनी उगारलेल्या बडग्याच्या आड येण्याची हिंमत कुणी म्हणजे कुणीच करणार नाही… अगदी पवार सुद्धा… अशी आशा बाळगूया. या लढ्यात खुद्द मलिकही कुणाचीच तमा बाळगणार नाहीत… अगदी पवारांची सुद्धा… अशीही आशा बाळगूया, आपण सारे बापुडे! नाहीतर, जानकरांविरुद्ध हवेत तळपणारी तलवार अजित पवारांचं नाव समोर आलं की गुपचूप म्यान करायचेत् मलिक साहेब!
मुळात नवाब मलिक आणि त्यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला भ्रष्टाचाराचे अगदीच वावडे असल्याची बतावणी मलिकांनी उच्चरवात करावी, हाच मोठा विनोद आहे. या राज्यातल्या सिंचनाच्या सत्तर हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचे स्पष्टीकरण अजून ज्यांना देता आलेले नाही, उलट तलावात लघवी करण्याची भाषा वापरून लोकभावनेचा ज्यांनी अपमान केला, त्या अजित पवारांनी यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतिस्थळी शांततेत काही वेळ घालवून आत्मक्लेशाची नौटंकी केली की भ्रष्टाचाराचे त्यांच्यावरील आरोप आपसूकच धुतले जातात, असा गैरसमज झालाय् का या पक्षाच्या नेत्यांचा? असला गैरसमज त्यांनी स्वत:च्या सोयीने, व्यवस्थितपणे करून घ्यायचा आणि इतर तमामजनांनी माना डोलावून त्याचे समर्थन करायचे, अशी अपेक्षा आहे नवाब मलिकांची? असल्या कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे कुणाच्यातरी तासाभराच्या आत्मक्लेषाने निकाली निघतात नवाबांच्या लेखी?
गुलाबराव देवकरांचे प्रकरणही आठवत असेलच की मलिकांना! घरकूल घोटाळ्यात, उच्च न्यायालयाने अटकेचे आदेश दिले तरी त्यांचा राजीनामा घेण्याची गरज वाटली नव्हती या पक्षाच्या नेत्यांना. अगदी पोलिस ठाण्यातही लाल दिव्याच्या गाडीतून रुबाबात पोहोचले होते देवकर साहेब! मग जेव्हा सर्वोच्च न्यायालयाचा दट्ट्या आला तेव्हा कुठे लोकलाजेस्तव राजीनामा घेतला गेला देवकरांचा. असले एकापेक्षा एक नमुने बाळगणार्या राजकीय पक्षाच्या नेतृत्वाला भ्रष्टाचाराबाबत एवढा संताप केव्हापासून येऊ लागलाय् नबाव साहेब? राज्यातली सत्ता हातून गेल्यापासून की, ती आता पुन्हा हाती लागण्याची शक्यता दूरदूरपर्यंत दिसत नसल्याचे लक्षात आल्यापासून?
पवारांचे राज्य असलेल्या बारामतीत महादेव जानकर लोकसभेच्या निवडणुकीत साडे चार लाख मतं घेतात, यावरून पवारांची तिथली वर्षानुवर्षांची मक्तेदारी धोक्यात येत असल्याची बाब लक्षात आल्यावर, बारामतीतील राजकारणाचे वारे हळूहळू दिशा बदलत असल्याचे संकेत मिळाल्यानंतर, राजकारण आणि सहकार क्षेत्रातील गुंडगिरी आणि दहशतीच्या राजकारणाला कंटाळलेले लोक आता मतपेटीतून आपल्या भावना व्यक्त करू लागले असल्याची बाब त्यातून स्पष्ट झाल्यानंतर, दिसतील तिथे जानकरांची कोंडी करण्याचे धोरण पवार समर्थकांनी अनुसरले असेल, तर त्यात नवल नाहीच! ‘त्या’ वक्तव्यानंतर, घेरण्यासाठी म्हणून ज्या पद्धतीने जानकरांविरुद्ध सारी ताकद पणाला लावायला राष्ट्रवादी सरसावलेली दिसते आहे, ते बघितल्यानंतर या समर्थकांच्या मनात धुमसणारा जळफळाट लपूनही राहात नाही. त्यामुळे, निमित्त भ्रष्टाचाराविरुद्धच्या लढाईचे असले तरी राष्ट्रवादीच्या छुप्या अजेंड्यावरील टार्गेट कुणी औरच असल्याची बाबही तेवढीच स्पष्ट होऊन जाते. मलिकांच्या तोंडून व्यक्त होणार्या जानकरांविरुद्धच्या रोषाला ‘बारामती अँगल’ लाभला असल्याची बाबही अधोरेखित होतेच.
भ्रष्टाचाराविरुद्धच्या बाता तरी कोण करताहे बघा! आदिवासींचे हक्क पायदळी तुडवून पुण्याजवळ लवासा नावाची एक अलिशान नगरी कुणाच्या पुढाकाराने अन् कुणाच्या आशीर्वादाने उभी राहिली? इतक्या वर्षांत राज्यातल्या सहकार क्षेत्रातील बँका कुणाच्या नेतृत्वात बुडाल्या? कुणी लुटल्या त्या बँका? आणि मग, बुडालेल्या बँका जगवण्याच्या नावाखाली सरकारी तिजोरीतला पैसा त्या बुडीत बँकांवर उधळण्याची राजकारणातली तिरपी चाल कोण खेळत राहिलं इतकी वर्षे? ज्यांनी हा सारा प्रकार करून संपूर्ण राज्यातील जनतेच्या डोळ्यात कायम धूळ फेकली, बुडवण्याच्या इराद्यानेच ज्यांनी सहकार क्षेत्रं बळकट करण्याची नाटकं केली, त्या नेत्यांची कायम हुजरेगिरी करत राजकारणात तग धरून राहिलेल्या कार्यकर्त्यांनी व्यक्त करायचा भ्रष्टाचाराविरुद्धचा संताप? त्यांनी धमकी द्यायची भ्रष्टाचार्यांना हरामखोर म्हणून संबोधण्याची?
असं असेलच ना नवाब साहेब, तर मग चला सारे मिळून सुरू करूया, एक प्रथा… या समाजातल्या, इथल्या राजकारणातल्या प्रत्येक भ्रष्टाचार्याला हरामखोर म्हणण्याची. त्याची सुरुवात कुठून करायची तेवढं फक्त नवाब मलिकांनी सांगावं. पाऽऽर बोफोर्स, हर्षद मेहता प्रकरणांमध्ये गुंतलेल्या नेत्यांपासून यादी तयार करायला घ्यायची की अगदी परवा परवाच्या वाटणार्या आदर्श, कॉमनवेल्थ, टू-जी, कोळसा, सिंचन घोटाळ्यातील खादाड नेत्यांना नवाब मलिकांच्या मनातले नामाभिधान लावण्यास सुरुवात करायची?
सत्ता हातात असेपर्यंत यातील एकाही घोटाळ्याविरुद्ध मलिकांनी कधी चकार शब्द काढल्याचे ऐकिवात नाही. तेव्हा कुण्या भ्रष्टाचार्याला हरामखोर ठरविण्याची कल्पना त्यांनी अशी जाहीरपणे बोलून दाखविल्याचीही वार्ता कानी नाही. त्या नवाबांना आता सत्ता हातून जाताच, भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्याची प्रेरणा अचानक का आणि कशी मिळाली, याबाबतचे आश्चर्य इथे कुणाच्याही मनात नाही. त्यासंदर्भातील संशयही इथे कुणी व्यक्त करणार नाही. त्यांना अडचणीचा ठरेल असा कुठलाच प्रश्नही कुणी विचारणार नाही, पण खुद्द कॅगने ठपका ठेवलेला या राज्यातला सिंचन घोटाळा ज्यांच्या कारकीर्दीत घडला, त्या राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या नावामागेही ही बिरुदावली लावण्याची तयारी आहे का मलिकांची, हे त्यांनी आधी जाहीरपणे स्पष्ट करावे. तसे नसेल, तर मग भ्रष्टाचाराविरुद्धचा त्यांचा संताप केवळ तोंडदेखलेपणाची साक्ष ठरतो. पक्ष कोणता हे बघून, नेत्यांची नावं बघून त्यांच्या मनातल्या संतापाची धार तीव्र किंवा बोथट होणार असेल, तर मग दुसरा काय अर्थ काढायचा त्यातून?
चपलेवर मखमली कापड झाकून न.मलिक ला मारल्या सारख वाटल हो ....
ReplyDeleteSUNILRAO,MI SAMPURN LEKH VACHUN KADHHALA.ATYANT CHAPKHAL MARLI TYA MALIKCHYA DHUNGANAVR.CHHAN LIHILAS.KUNHALAHI BHYAYCHI GARAJ NAHI.
ReplyDelete