दिल्लीच्या जेएनयूमध्ये अचानक एक दिवस उदयाला आलेलं कन्हैयाचं नेतृत्व असो, त्याला पाठिंबा देण्यासाठी संबंध असलेल्या-नसलेल्या विद्यार्थ्यांनी ठिकठिकाणी काढलेले मोर्चे असो, की मग हैदराबादेत रोहित वेमुलासाठी उभे राहिलेले आंदोलन असो, यामागील शक्तीचा अंदाज घेतला की डाव्या विचारांच्या गर्दीतील या नव्या प्रवाहाची कल्पना येते. स्थानिक संस्कृती पायदळी तुडवून, तिथल्या लोकांना त्यांच्याच परंपरांविरुद्ध चिथावणीखोर भूमिका घेण्यास प्रवृत्त करणारी ही अफलातून तर्हा आहे. इंग्रजांनी या देशावर गाजविलेल्या दीडशे वर्षांच्या जुलमी राजवटीचे यश, जनमानस हाताळण्याच्या त्याच पद्धतीत दडले आहे. फे्रंच राज्यक्रांतीनंतर संपूर्ण जगातच पुरोगामित्वाचा टेंभा मिरवत, आधुनिक विचारांची मक्तेदारी आपल्यालाच लाभली असल्याचा आभास निर्माण करत काही, विशेषत: डाव्या विचारसरणीचे लोक सर्वदूर वावरत राहिले. भारतासारख्या देशात कायम जातीयवादी भूमिक स्वीकारूनही वर पुन्हा धर्मनिरपेक्षताचा सूर आळवण्यात लाभलेल्या ‘यशा’चे गमक ज्यांना गवसले, ती सारी पिलावळ याच रांगेत बसणारी. हा नवीन जमाव विचारांनी आहे डावाच. त्यांना कार्ल मार्क्स नाकारायचा नाहीच. फक्त त्यांना तो नव्याने, त्यांच्या पद्धतीने मांडायचा असतो. त्यांना पुंजीवादही संपवायचा नाही अन् साम्यवादाशीही त्यांचे वैर नाही. त्यांना आक्षेप फक्त त्या त्या देशांच्या सांस्कृतिक जडणघडणीवर असतो. ती मुळासकट उखडून फेकण्याचे हे मनसुबे आहेत. मनसुबे कसले, षडयंत्र आहे. आधुनिकतेच्या नावाखाली, क्रांतिकारी म्हणत स्वत:ला हव्या त्या विचारांची पेरणी समाजमनात केली, की संस्कृती, परंपरांविरुद्धचा लढा काहीसा सोपा होऊन जातो.“channels of social control are not police, law and economy, but it is culture”
प्रख्यात मार्क्सवादी अभ्यासक ग्रॅमची यांच्या या सिद्धांतानेच बहुधा, कामगार चळवळींचे नियंत्रण करण्याचे बळ त्या काळातील भांडवलदारांना लाभले आणि कामगारांच्या मनातल्या क्रांतीच्या कल्पना उंबरठ्याबाहेरच विसावल्या. त्या सिद्धांतावर चालणारी पिढी आता खूप वेगाने पुढे सरकते आहे. त्यातून साकारते आहे ती ‘न्यू लेफ्ट’ च्या संकल्पनेभोवती फिरणारी एक चळवळ. हो! ते डावेच आहेत. पण डाव्यातलेही नवे आहेत. या जगात अस्तित्वात असलेल्या प्रत्येकच बाबीवर त्यांचा आक्षेप आहे. अतिरेकी प्रतिकार करत अस्तित्वातील एखादी गोष्ट नाकारण्याच्या आणि गरज पडली तर त्याविरुद्ध बंड पुकारण्याच्या कार्यपद्धतीमुळे त्यांचे अस्तित्व काहींच्या लेखी पुरोगामित्वाचे प्रतीक ठरत आहे.
मध्यंतरी ‘किस ऑफ लव्ह’ नावाचे आंदोलन भारतातल्या काही मोठ्या शहरांमध्ये पार पडले. मुला-मुलींनी भर रस्त्यांवर उतरून एकमेकांवरील प्रेमाचे जाहीर प्रदर्शन मांडत, सर्वांदेखत एकमेकांचे पापे घेत, प्रचलित व्यवस्थेला आव्हान देण्याचा घाट घातला. खरं तर अलीकडच्या काळात समाज एवढा ‘प्रगत’ झाला आहे, की प्रेमाच्या नावाखाली सार्वजनिक ठिकाणी चालणारे तरुणाईचे चाळे, ही पोलिसांसह सर्वांच्याच नियंत्रणाबाहेरील बाब ठरू लागली आहे. पण ‘ही आमची संस्कृती नाही’ असे म्हणत काही लोक या प्रकाराला विरोध करतात ना, मग तो विरोध झुगारून लावायलाच हवा. ते खरं की खोटं, योग्य की अयोग्य, त्यात आपले हित आहे की अहित, यापेक्षाही सरसकट ती बाब झुगारून लावायची म्हणजे त्या कृतीला आपसूकच क्रांतीचा गंध येतो. क्रांती म्हटली की आपोआपच पेटलेली मनं अन् उगारलेल्या मुठींचे चित्र डोळ्यासमोर उभे राहाते. कितीही नाही म्हटलं तरी डाव्यांच्या तोंडी भाषा कायम गरिबांच्या हिताची राहिली असल्याने एकप्रकारच्या मानसिक पाठबळाची पार्श्वभूमीही कार्यकर्त्यांसाठी तयार होत जाते. हे नेमकं कोण, कशासाठी करतंय्, त्यामागे दडलेली शक्ती नेमकी कुणाची याचा मागमूसही लागत नाही कित्येकदा. दिल्लीच्या जेएनयूमध्ये अचानक एक दिवस उदयाला आलेलं कन्हैयाचं नेतृत्व असो, त्याला पाठिंबा देण्यासाठी संबंध असलेल्या-नसलेल्या विद्यार्थ्यांनी ठिकठिकाणी काढलेले मोर्चे असो, की मग हैदराबादेत रोहित वेमुलासाठी उभे राहिलेले आंदोलन असो, यामागील शक्तीचा अंदाज घेतला की डाव्या विचारांच्या गर्दीतील या नव्या प्रवाहाची कल्पना येते. स्थानिक संस्कृती पायदळी तुडवून, तिथल्या लोकांना त्यांच्याच परंपरांविरुद्ध चिथावणीखोर भूमिका घेण्यास प्रवृत्त करणारी ही अफलातून तर्हा आहे. इंग्रजांनी या देशावर गाजविलेल्या दीडशे वर्षांच्या जुलमी राजवटीचे यश, जनमानस हाताळण्याच्या त्याच पद्धतीत दडले आहे.
फे्रंच राज्यक्रांतीनंतर संपूर्ण जगातच पुरोगामित्वाचा टेंभा मिरवत, आधुनिक विचारांची मक्तेदारी आपल्यालाच लाभली असल्याचा आभास निर्माण करत काही, विशेषत: डाव्या विचारसरणीचे लोक सर्वदूर वावरत राहिले. भारतासारख्या देशात कायम जातीयवादी भूमिक स्वीकारूनही वर पुन्हा धर्मनिरपेक्षताचा सूर आळवण्यात लाभलेल्या ‘यशा’चे गमक ज्यांना गवसले, ती सारी पिलावळ याच रांगेत बसणारी. हा नवीन जमाव विचारांनी आहे डावाच. त्यांना कार्ल मार्क्स नाकारायचा नाहीच. फक्त त्यांना तो नव्याने, त्यांच्या पद्धतीने मांडायचा असतो. त्यांना पुंजीवादही संपवायचा नाही अन् साम्यवादाशीही त्यांचे वैर नाही. त्यांना आक्षेप फक्त त्या त्या देशांच्या सांस्कृतिक जडणघडणीवर असतो. ती मुळासकट उखडून फेकण्याचे हे मनसुबे आहेत. मनसुबे कसले, षडयंत्र आहे. आधुनिकतेच्या नावाखाली, क्रांतिकारी म्हणत स्वत:ला हव्या त्या विचारांची पेरणी समाजमनात केली, की संस्कृती, परंपरांविरुद्धचा लढा काहीसा सोपा होऊन जातो.
“once the society is transformed culturally totally, then it becomes easy to capture the political scenario of the country”
फ्रॅन्कफर्ट स्कूलचा हा सिद्धांत तर या अघोषित प्रवाहवजा आंदोलनाचे ब्रीद आहे. त्यामुळे थेट सत्ता काबीज करण्याची घाई त्यांना नाहीच इथे. इथला समाज त्याच्या मूळ संस्कृतीपासून तोडला की पुढचा मार्ग आपसूकच मोकळा होतो, हे ते पुरते जाणून आहेत. ती माणसंच मग त्यांच्या त्या कथित लढाईचे शिलेदार बनतात, हा अनुभवही गाठीशी असतोच त्यांच्या. आपलं ते सारं जुनं, बुरसटलेलं, टाकाऊ आणि दुसर्यांचं मात्र असेल तसं सारं स्वीकारार्ह, असं मानणार्यांची वानवा आहे कुठे इथे? अशा जमावाला जराशी हूल दिली, जोडीला इतिहास नाकारण्याची व्यूहरचना केली, टोकाच्या विघातक टीकेची झोड उठविण्याची नियोजनबद्ध चाल खेळली की, यश हमखास आपलेच. परवा दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीदिनी सोशल मीडियावर सर्वदूर त्यांच्याबाबत आदर व्यक्त करणार्या पोस्ट झळकल्या. पण त्यातही काहींना पोटशूळ उठलाच. दीनदयालजी नसते तर काय वंचितांचा विकास झाला नसता का, असल्या अर्थहीन, बिनपैशाच्या प्रश्नांची सरबत्ती करून भलेमोठे कर्तृत्व सिद्ध केल्याच्या थाटात ही मंडळी वावरत राहिली. आता गुलाम काश्मिरातील सर्जिकल स्ट्राईकबाबत पोटशूळ उठलेली जमातही हीच आहे. हे असंच सुरू आहे. गेल्या शतकातील नव्वदच्या दशकापासून या देशातील वेगवेगळ्या विद्यापीठांमधून सोशल स्टडिजच्या नावाखाली जे शिक्षण, प्रशिक्षण दिलं जात आहे, त्यातून घडणारी तरुणाई असंच बेफाम, बेलगाम, बेताल वागत, बोलत सुटली आहे. रोहित वेमुला असो की कन्हैया कुमार, त्यांच्या शैक्षणिक प्रक्रियेतले हे टप्पे शोधले की त्यांच्या आंदोलनामागील वैचारिक बैठक स्पष्ट होऊन जाते आणि आंदोलनांच्या निमित्ताने त्यांच्या सभोवताल जमलेल्या गोतावळ्याच्या विचारांची दिशाही तेवढ्याच प्रकर्षाने उजेडात येते.
सोशल स्टडिजच्या नावाखाली सुरू झालेल्या या धिंगाण्याचे परिणाम सुमारे दोन दशकांनंतर आता हळूहळू दिसायला लागले आहेत. संबंधितांकडून ज्या नियोजनबद्ध पद्धतीने ही बीजं रोवली गेली, कथित आधुनिकतेच्या आवरणाखाली विषवल्लीची पखरण ज्या बेमालूमपणे करण्यात आली, त्याचे परिणाम चित्रपटसृष्टीपासून तर पत्रकारितेपर्यंत आणि अभ्यासकांपासून तर इतिहासतज्ज्ञांपर्यंत सर्वदूर दिसताहेत. विचारांच्या त्या पगड्यातूनच, विचारांनी डाव्या असलेल्यांमधूनही या विचारसरणीची नवी जमात तर जगाच्या कानाकोपर्यात उदयास येत नाहीय् ना, असा सवाल उपस्थित होतो. विरोधकांचे विचार झुगारायचे, इतिहास अमान्य करायचा, परंपरा नाकारायच्या, समाजाच्या सांस्कृतिक जडणघडणीचा पाया उडवून लावायचा… आणि मग स्वत:ला हव्या त्या विचारांची पेरणी करत निघायचे. काही वर्षांनी मागे वळून पाहिले की, कळत नकळत कित्येकांनी स्वत:ला त्या प्रवाहात झोकून दिल्याचे, रोहित-कन्हैयासारखी फळं त्या चळवळीला लाभली असल्याचे दृश्य परिणाम दिसू लागतात…
या प्रक्रियेत जर्मनच्या हार्बर मार्सक्यूपासून तर फ्रान्सच्या मायकल फाऊपर्यंत अनेकांचे योगदान झालेले दिसते. विचारांमधून स्टालीन पूर्णपणे उखडून फेकण्यापासून, तर समाजाचे संपूर्ण ‘कल्चरल ट्रान्सफॉर्मेशन’ करण्यापर्यंतची प्रक्रिया, भारतासारख्या सर्वार्थाने विविधता लाभलेल्या देशात खोलवर रुजवणे तितकेसे सोपे नसले, तरी आपलं ते सारं झुगारायलाच निघालेली पिढी आणि स्वत:चा इतिहास, स्वत:चा स्वाभिमान, स्वत्वाची ओळख याबाबत फारसे गांभीर्य जपण्याची गरज कधी वाटत नाही, असा एक वर्ग या प्रवाहात सामील झाला हे मात्र, या विचारांचे यश ठरले… अल्पसे असले तरीही…
No comments:
Post a Comment