बरं गांधीहत्येचे नेहरू आणि तत्कालीन कॉंग्रेसनेत्यांनी केलेले राजकारणही बघा किती निम्न पातळीचे होते. ज्याने गांधीहत्येची जबाबदारी स्वीकारली, तो नाथुराम गोडसे स्वत:चे नाते ज्या संघटनेशी सांगत होता, ती िंहदू महासभा 1950 पर्यंत नेहरुंच्या सरकारमध्ये सहभागी होती. त्याचे सदस्य मंत्री म्हणून नेहरूंसमवेत, त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत होते आणि ज्यांचा या घटनेशी काहीही संबंध नसल्याचे खुद्द गृहमंत्रालयाचा अहवाल सांगत होता, त्या रा. स्व. संघाच्या स्वयंसेवकांची मात्र देशभर धरपकड झाली, त्या संघाला मात्र, न केलेल्या गुन्ह्यासाठी बंदीचा सामना करावा लागला. या बंदीमुळे संघ तीन दशके मागे गेल्याची खंत प.पु. गोळवलकर गुरूजींनी बोलून दाखवली होती. 1925 मध्ये सुरू झालेले कार्य 1960च्या दशकात 30 वर्षे मागे गेल्याची खंत गुरूजी व्यक्त करतात...या कार्याची आता नव्याने, शुन्यापासून सुरूवात करावी लागणार, एवढाच त्याचा अर्थ. राष्ट्रभक्तीने भारावलेल्या कार्यकर्त्यांच्या एका संघटनेचे, दोन तपांच्या साधनेतून साकारलेले बळ असे कुणाच्यातरी राजकारणातून, षडयंत्रातून, व्यक्तीगत द्वेषातून क्षीण व्हावे यासारखे दुर्दैव कोणते असू शकेल?
एका माथेफिरूने हातातल्या बंदुकीतून डागलेल्या गोळ्यांनी मृत पावलेले महात्माजींचे पार्थीव धारातीर्थी पडून अजून काहीच क्षण उलटले असतील, पण कसे कुणास ठावूक घटनेनंतर काही क्षणातच लॉर्ड माऊंटबॅटन आणि पंडित नेहरू घटनास्थळी दाखल झाले होते. नाही म्हणायला ही बाब आश्चर्यजनक होती आणि तेवढीच संशयास्पदही. काही क्षणापूर्वीच गांधीजींसोबत कडाक्याचे भांडण होऊन निघून गेलेले सरदार पटेलही माघारी फिरून तिथे पोहोचले होते. अद्याप कुणालाच कशाचाच मागमूस लागलेला नव्हता. काय घडले, कसे घडले याचा अंदाज सध्याच बांधणे जिकिरीचे झालेले असताना माऊंटबॅटन मात्र, तिथे उपस्थित पत्रकारांना हत्या नेमकी कुणी केली याबाबतची माहिती ठामपणे सांगू शकले होते. घटनेनंतरच्या अवघ्या तासाभराच्या अंतरात त्याचे खापर सरदार पटेलांवर फोडण्याची व्यवस्था कुणाच्यातरी राजकारणातून एव्हाना साध्य झाली होती. त्यानंतर गृहमंत्री सरदार पटेलांनी आरंभलेल्या कार्यवाहीतून एक चौकशी समिती गठीत झाली. संजीवी नामक वरिष्ठ अधिकार्याने 27 फेब्रुवारी 1948 ला म्हणजे गांधीहत्येनंतर केवळ 29 दिवसांच्याआत एक अहवाल देशाच्या तत्कालीन गृहमंत्र्यांना आणि पटेलांच्या सूचनेवरून तत्कालीन पंतप्रधानांना देखील सादर केला. गांधीहत्येशी रा. स्व. संघाचा िंकवा एक संघटन म्हणून िंहदू महासभेचा काहीएक संबंध नसल्याच, स्पष्टीकरण अगदीच स्पष्ट शब्दात त्या अहवालात नमूद करण्यात आले होते. याचा अर्थ एवढाच की, त्या दिवसापासूनच नेहरू आणि पटेलांना गांधीहत्येशी रा. स्व. संघाचा काडीचाही संबंध नसल्याचे वास्तव व्यवस्थीतपणे ठावूक होते. तरीही गांधीहत्येचा मुद्दा उपस्थित झाला की संघाच्या नावाने बोटे मोडण्याची एकही संधी नेहरूंनी कधी दवडली नाही. संघाबद्दलचा नेहरूंच्या मनातला दुस्वास, एका अर्थाने संघाच्या दिवसागणिक वाढत चाललेल्या ताकदीची भीती या माध्यमातून सतत व्यक्त होत राहिली. वस्तुस्थिती तर पटेलांनाही माहीत होती. एका क्षणी नेहरूंच्या राजकारणात स्वत: पटेलच या हत्येच्या आरोपात गुंतवले गेल्याने बॅकफूट जात दुसर्याच कुणाच्यातरी नावाने शंख करीत राहणे ही पटेलांचीही राजकीय गरज ठरली असावी कदाचित त्यावेळी. पण एकमात्र खरे की, कॉंग्रेसचे नेतृत्त्व करताना, महात्म्याच्या मृत्यूचे निमित्त साधत संघावर वार करण्याची जी तर्हा नेहरूंनी अनुसरली, नेमकी तीच पद्धत त्या घराण्यातील त्यांचे वारसदारही कमीअधिक प्रमाणात वेळोवेळी अंमलात आणत राहिलेत नंतरच्या काळात. इंदिरा गांधींनीही त्याचीच री ओढली आणि आता इतक्या वर्षांनंतर राहुल गांधीही तीच भाषा बोलताहेत. गांधीहत्येच्या 29व्या दिवशी त्यांच्या स्वत:च्या यंत्रणेने निर्दोषत्व बहाल केलेले असतानाही रा. स्व. संघावर हल्ला करत राजकारण करण्याचा डाव या पक्षाचे नेते पुढची आणखी किती वर्षे खेळत राहणार आहेत, त्यांचे त्यांनाच ठावूक. त्यामुळे, भविष्यात या पक्षाच्या तमाम नेत्यांनी एकदा संजीवी यांचा अहवाल नजरेखालून घालून मगच गांधीहत्येबाबत बोलावे असे त्यांना सांगण्याची वेळ आली आहे.
‘‘ गांधीजींची हत्या कुण्या व्यक्तीने केली आहे. रा. स्व. संघ वा िंहदू महासभेला त्यासाठी जबाबदार धरण्याचे कारण नाही. उलट पूर्वकल्पना असती तर या दोन्ही संघटनांमधील कितीतरी लोक गांधीजींचे प्राण वाचविण्यासाठी पुढे आले असते. नव्हे, प्रसंगी त्यांनी गांधीजींसाठी बलिदानही केले असते. एखाद्दुसर्या महाराष्ट्रीयन माणसाने केलेल्या या कृत्यासाठी संपूर्ण महाराष्ट्राला वेठीस धरण्याची भूमिकाही कुणी स्वीकारण्याची गरज नाही.’’
हे मत आणि हा विश्वास कुण्या साधारण व्यक्तीने व्यक्त केलेला नाही. हा विश्वास खुद्द गांधींजींचे पुत्र देवदास गांधी यांनी ‘हरीजन’मधून व्यक्त केला आहे. गांधीहत्येनंतर 15 फेब्रुवारी 1948रोजी प्रसिद्ध झालेल्या हरीजन च्या अंकात प्रकाशित लेखात वरील अर्थाचा परिच्छेद त्यांनी उद्धृत केला आहे.
गांधीजींच्या हरीजन मधून मतं मांडणार्यांच्या मनात किल्मीषं नव्हती. सरकारी अहवालात कुठे काही ठपका नव्हता, तरीही पंडित नेहरू आणि त्यांच्या कॉंग्रेस पक्षाने मात्र, रा. स्व. संघाबद्दलचा दुस्वास कायम मनात जपला. दिवसागणिक त्याची तीव्रता वाढत जाईल, याचीही व्यवस्था त्यांनी बेमालूमपणे केली. नोव्हेंबर 1947 मध्ये पंजाबात झालेल्या एका जाहीर सभेत संघ आणि अकाली दलाला चिरडून टाकण्याची भाषा नेहरूंनी जाहीरपणे बोलून दाखवली होती. नंतरच्या काळातही त्यांच्या तोंडून ती कायम व्यक्त होत राहिली. संजीवी यांच्या अहवालातील वास्तव ठावूक असतानाही त्यांनी त्यांची भाषा बदलली नाही. निमित्त गांधी हत्येचे असो की मग आणीबाणीचे, कॉंग्रेसनेत्यांच्या मनातील संघाबद्दलचा दुस्वास या देशाने सतत अनुभवला.
ज्यांचा काही संबंध नाही त्या संघाला गांधींच्या मृत्यूसाठी जबाबदार ठरवत स्वत: नेहरू मात्र गांधीविचारांचा समूळ नायनाट करायला सज्ज झाले. एरवी रशियाची नक्कल करत त्यांनी स्वीकारलेला साम्यवाद अन् औद्योगिक क्रांती काय गांधीजींच्या विचारांशी सुसंगत होती? की नेहरूंच्या मनातली शहरीकरणाची कल्पना गांधींच्या ग्रामविकासाशी सांगड घालणारी होती? वास्तव तर हेच आहे की 2 सप्टेंबर 1946ला देशाच्या हंगामी सरकारचे नेतृत्त्व स्वीकारल्यापासूनच नेहरूंनी त्यांचे इप्सित साधले होते. तेव्हापासूनच गांधी विचारांची झूल पांघरणे त्यांनी स्पष्टपणे नाकारले होते. प्रत्यक्षात स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तर ही बाब अधिक प्रकर्षाने जाणवू लागली होती. स्वत: गांधीजींनीही याबाबतची खंत व्यक्त केलेली होती. कालपर्यंत आपल्या शब्दाला िंकमत देत वागणारे नेहरू अलीकडे लॉर्ड माऊंटबॅटन आणि लेडी माऊंटबॅटन यांच्या कलाने वागत असल्याची गांधीजींच्या मनातली खंत त्यांचे खाजगी सचिव प्यारेलाल यांच्या लिखाणातूनही पुरेशी स्पष्ट होते. लोकमान्य टिळकांनंतर स्वातंत्र्याचा लढा या देशाने ज्यांच्या नेतृत्त्वात लढला, इतकेच नव्हे तर स्वातंत्र्यप्राप्तीचे सारे श्रेय ज्यांना देण्यात आले, ते महात्मा गांधी 15 ऑगस्टला दिल्लीत उल्हासात संपन्न झालेल्या स्वातंत्र्योत्सवात उपस्थित का नव्हते, कोणत्या उद्विग्नतेमुळे त्यांनी स्वत:ला त्यापासून दूर ठेवले, या प्रश्नांची उत्तरे भारतीयांना मिळाली पाहिजेत. पण स्वातंत्र्य मिळाल्याच्या आनंदात आणि त्याहीपेक्षा सत्ता लाभल्याच्या उन्मादात ‘काहींना’ गांधीजींच्या अनुपस्थितीची खंत फारशी जाणवली नाही.
स्वातंत्र्यवीर सावरकरांना गांधी नको होते, असा आरोप केला जातो. पण मग स्वतंत्र भारताचा कारभार चालवताना नेहरू-पटेलांना तरी गांधी कुठे हवे होते? स्वातंत्र्यसमरात उतरलेली कॉंग्रेस विसर्जित करण्याचा निर्णय असो वा मग ग्रामविकासाची कल्पना, गांधीजींच्या विचारांना, त्यांच्या निर्णयांना तिलांजली कुणी दिली हे तर सारा देश जाणतो. पण विरोधाभास असा की, ज्यांनी गांधींचे विचार त्यांच्या हयातीत झिडकारले, ते त्या विचारांच्या पालखीचे भोई म्हणून आयुष्यभर मिरवीत राहिले अन् गांधीजींच्या मनातल्या अनेक संकल्पना ज्यांनी कृतीतून अंमलात आणल्या त्यांच्यावर मात्र न केलेल्या कृत्याचा ठपका बसला.
बरं गांधीहत्येचे नेहरू आणि तत्कालीन कॉंग्रेसनेत्यांनी केलेले राजकारणही बघा किती निम्न पातळीचे होते. ज्याने गांधीहत्येची जबाबदारी स्वीकारली, तो नाथुराम गोडसे स्वत:चे नाते ज्या संघटनेशी सांगत होता, ती िंहदू महासभा 1950 पर्यंत नेहरुंच्या सरकारमध्ये सहभागी होती. त्याचे सदस्य मंत्री म्हणून नेहरूंसमवेत, त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत होते आणि ज्यांचा या घटनेशी काहीही संबंध नसल्याचे खुद्द गृहमंत्रालयाचा अहवाल सांगत होता, त्या रा. स्व. संघाच्या स्वयंसेवकांची मात्र देशभर धरपकड झाली, त्या संघाला मात्र, न केलेल्या गुन्ह्यासाठी बंदीचा सामना करावा लागला. या बंदीमुळे संघ तीन दशके मागे गेल्याची खंत प.पु. गोळवलकर गुरूजींनी बोलून दाखवली होती. 1925 मध्ये सुरू झालेले कार्य 1960च्या दशकात 30 वर्षे मागे गेल्याची खंत गुरूजी व्यक्त करतात...या कार्याची आता नव्याने, शुन्यापासून सुरूवात करावी लागणार, एवढाच त्याचा अर्थ. राष्ट्रभक्तीने भारावलेल्या कार्यकर्त्यांच्या एका संघटनेचे, दोन तपांच्या साधनेतून साकारलेले बळ असे कुणाच्यातरी राजकारणातून, षडयंत्रातून, व्यक्तीगत द्वेषातून क्षीण व्हावे यासारखे दुर्दैव कोणते असू शकेल? त्याहीपेक्षा दुर्दैवी अन् संतापजनक बाब अशी की सूडाचे हे राजकारण अजूनही संपण्याचे नाव घेत नाहीय्. राहुल गांधी यांच्या परवाच्या वायफळ बडबडीतून दुसरा कुठला अर्थ काढायचा?
गांधीहत्या घडली त्यावेळी सारा देश शोकसागरात बुडाला होता. त्या परिस्थितीतही मनाचा जो संयम ‘हरीजन’ला राखता आला, तो इतर अनेकांना राखता आला नाही. या देशातल्या मुस्लिमलीग पासून तर कम्युनिस्टांपर्यंत आणि समाजवाद्यांपासून तर विविध विचारवंतांपर्यंत सर्वांनीच काशाचाच विचार न करता संघाला वाळीत टाकण्याची भूमिका स्वीकारली होती. अशा स्थितीत आपण गुन्हा केलेला नाही हे सांगणे एवढेच संघाच्या हाती होते. अगदी परवा परवा गृहमंत्रालयाचा तो अहवाल उघड होईपर्यंत बॅकफूटवर जात निर्दोषत्वाची भूमिका मांडण्यापलीकडे काहीच करता येत नसल्याचा अनुभव संघाचे स्वयंसेवक घेत होते. त्याला इलाजही नव्हता. त्यामुळे मागणी, अटक, सत्याग्रहाच्या माध्यमातून, लादलेली बंदी उठविण्याचा आग्रह ते धरत राहिले. संघासाठी नंतरचीही कित्येक वर्षे गांधीहत्येबाबतचे निर्दोषत्व सिद्ध करण्यातच खर्ची पडली होती. पण सत्य माहीत असताना ज्यांनी ते दडवून ठेवत राजकारण केले, संघाच्या नाहक बदनामीचे षडयंत्र रचले, त्या नेहरूंचे काय? नेहरू तर नेहरू पण मग पटेलांनी तरी का मौन बाळगावे त्या क्षणी? ते का पंडितजींच्या उच्चरवातील बिनबुडाच्या आरोपांना साथ देत राहिले? आणि या देशातील विचारवंत? त्यांनाही या षडयंत्रामागील नेहरूंच्या घाणेरड्या राजकारणाचा गंध येऊ नये? की संघावर आरोप केले की राजकारण-समाजकारणात बरेच काही साधता येते, हे ध्यानात घेऊन मूग गिळून गप्प राहिलेत सारे आजवर? आणि आता इतक्या वर्षांनंतरही वास्तव झुगारून त्याच आरोपांचा कित्ता गिरवताना राहुल गांधींनाही काहीच गैर वाटत नाही? या परिस्थितीत एक प्रश्न उपस्थित होतोच... राहुल गांधींनी गिरवलेला हा कित्ता फक्त निराधार आरोपांचा आहे की मग नेहरूंनी संघाविरुद्ध आरंभलेल्या राजकीय षडयंत्राचा...?
MANANIY SUNIL KUHIKARJEE,AAPAN LIHILELA HA LEKH KITI MOLACHA AHE KI TYAT SATYA KATHA AHE.KALNETUN SAKARLELE BHUT JYANCHYA MANGUTIVAR BASALE AHE KIVHA JYANI SWATAHUN BHUTACHE SONG GHETLE AHE,TYAMCHYAVAR KARYA ARTHANE,BHUTATKI HATVINYACHA UPACH KARNE,HE SOYICHE THARLE ASTE.DURDAIVA ASE KI ASE GHADLE NAHI.MHANUNACH APLYALA AJHI YA NAKLI BHUTACHA TRAS SAHAN KARAVA LAGAT AHE.ANEK DHANYAVAD,ASA SATYA MAHITIPURN LEKH PRAKASHIT KARUN JANTELA SATYACHI JANIV KARUN DILYABADDAL.GAJANAN RAJURKAR MAHARAJ.
ReplyDelete