पण मग भारतातल्या श्रीमंतांचे कुठे घोडे मारले गेले होते? इथे तर ना युद्धाची परिस्थिती, ना अराजक माजलेले. मग तरीही त्यांना का सोडावासा वाटावा हा देश? भारत सरकारच्या आर्थिक मदतीच्या बळावर शिकण्यासाठी म्हणून विदेशात गेलेली तरुणाई तिथल्या झगमगाटाला भुलते, मग भारतात परतण्याचा त्यांचा बेत अलबतच रद्द होतो, ही बाब तितकीशी नवलाईची राहिलेली नाही आता. आजघडीला निदान पावणेदोन लाख भारतीय विद्यार्थी विदेशात शिकायला गेले आहेत कुठल्यातरी देशात. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यातील किती लोक भारतात परत येतील याचा अंदाज, त्यांच्या शिक्षणासाठी लक्षावधी रुपये खर्च करणार्या सरकारला सुद्धा बांधता येत नाही, हे वास्तव तितकेच दुर्दैवी आहे. त्यांच्या कृतघ्नतेची चर्चा करावी तेवढी कमीच ठरेल. पण केवळ इथले वातावरण भावले नाही म्हणून देश सोडायला निघालेल्यांचे काय? भारत माझा देश आहे, ही प्रतिज्ञा त्यांनी कधी मनापासून म्हटलीच नव्हती का? गे माय भू तुझे मी फेडीन पांग सारे, या ओळींमधून व्यक्त होणार्या भावनांनी कधी साद घातलीच नाही, या लोकांच्या मनाला? खिशात पैसा खुळखुळू लागला की प्रत्येक जण अशी बाहेर देशात रमण्याची स्वार्थी भाषा बोलू लागला, तर इथे कुणी राहायचं? अन् कुणासाठी आमच्या सैनिकांनी सीमेवर शत्रूंशी लढायचे? या देशात मिळत नाही असं सुख, चैन आणि उपभोगासाठी देशाच्या सीमा ओलांडणार्यांच्या तुलनेत वैराग्य अनुभवणारी इथली संतांची परंपरा खुजी ठरवायची का मग?
या देशात आपल्याला राहण्याजोगे वातावरण नसल्याचे आणि इथल्या राहणीमानाचा दर्जा सुमार असल्याचे कारण पुढे करून तब्बल चार हजार लोकांनी मागील काळात दुसर्या देशाचे नागरिकत्व स्वीकारले असल्याचा धक्कादायक अहवाल नुकताच समोर आला आहे. एकीकडे या देशात राहून, इथल्या सार्या व्यवस्थांचा उपभोग घेऊनही ‘भारत भाता की जय’ म्हणण्याची लाज वाटणारा मोठा समुदाय या देशात मोठ्या दिमाखात मिरवत असताना, आता या देशात राहण्याची लाज वाटू लागलेल्यांची संख्याही हळूहळू वाढत असल्याची दुर्दैवी वस्तुस्थिती समोर येतेय्. तिकडे इराक, सीरिया सारख्या युद्धग्रस्त देशातील लोकांनी सततच्या युद्धजन्य परिस्थितीला कंटाळून तो देश सोडण्याचा निर्णय घेणे एकवेळ समजण्यासारखे आहे, पण भारतासारख्या एरवी शांतताप्रियतेची ओळख लाभलेल्या देशात जन्माला आलेल्या काही लोकांना आपल्या अतिश्रीमंत थाटाला साजेशा अशा वातावरणाचा शोध असणे, इथल्या राहणीमानाला योग्य दर्जा लाभला नसल्याचा साक्षात्कार त्यांना होणे आणि परिणामस्वरूप त्यांनी हा देश सोडून इतर कुठल्याशा देशात स्थायिक होण्याचा मार्ग पत्करणे, हा सारा प्रकारच अजब मानवी प्रवृत्तीचे दर्शन घडविणारा आहे. विशेषत: भारतीय नागरिकांमध्ये, आपण अतिशय गरीब देशात जन्माला आलो असल्याची आणि इथल्यापेक्षा बाहेरच्या जगात अधिक सुख, समृद्धी, जीवनमानाचा उच्च दर्जा असल्याची साक्ष पटते आणि मग जगातील अन्य सारे देश भारतापेक्षा अधिक सरस ठरविण्याची अहमहमिका त्यांच्यात सुरू होते. यात आपल्या लोकांना नालायक ठरवत या देशाच्या नावे बोटे मोडण्याचा, इथल्या व्यवस्थेला शिव्यांची लाखोली वाहण्याचा, इथल्या राजकीय नेत्यांना शिव्या हासडण्याचा त्यांचा जाहीर कार्यक्रम यथासांग पार पडतो. कुठे ते अन् कुठे आपण, कुठे त्यांची प्रगती अन् कुठे आपली दयनीय अवस्था, कुठे त्यांचे विज्ञानाच्या साथीने वेगवानपणे सुसाट पळणे आणि कुठे आपले ते जाती-पातीच्या, कर्मकांडाच्या विळख्यात अडकून पडणे, कुठे तो तिथला श्रीमंतीचा झगमगाट अन् कुठे ते आपले गरिबीत खितपत पडणे अशा विविधांगी तुलनेत कित्येकांना आपलाच देश खुजा वाटू लागतो. इथे राहणेही नकोसे वाटू लागते. काहींसमोर याही परिस्थितीशी लढत नाईलाजाने इथेच जगण्यावाचून पर्याय नसतो, तर काहींना हातात खुळखुळणार्या पैशाच्या बळावर त्यातून सुटका मिळवण्याचा मार्ग सहज स्वीकारता येतो. आपला देश आपल्या लायकीचा नसल्याच्या दुर्दैवी भावनेतून मग येथून पलायनाचा कुणाचा तरी निर्णय होतो.
मुळातच हा प्रत्येकाच्या मानसिकतेचा प्रश्न आहे. पृथ्वीतलावर आपला कुठे जन्म व्हावा हे कुणाच्याच हातात नसतं. पण जगातल्या ज्या कुठल्या देशात आपला जन्म झाला असेल, तिथल्या भूमीशी नाते सांगण्याची परंपरा सारेच जोपासत असतील, असे कुठे आहे? गेल्या काही वर्षांत फ्रान्स, चीन, ग्रीस, रशिया, स्पेन, ब्राझील, इराक, सीरिया आदी देशांमधून शेकडो लोक कायमचे बाहेर पडले आहेत. कुठे ख्रिश्चन-मुस्लिमांमध्ये निर्माण झालेला गंभीर तणाव, तर कुठे युद्धाच्या सावटामुळे लोकांनी आपला देश सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पण मग भारतातल्या श्रीमंतांचे कुठे घोडे मारले गेले होते? इथे तर ना युद्धाची परिस्थिती, ना अराजक माजलेले. मग तरीही त्यांना का सोडावासा वाटावा हा देश? भारत सरकारच्या आर्थिक मदतीच्या बळावर शिकण्यासाठी म्हणून विदेशात गेलेली तरुणाई तिथल्या झगमगाटाला भुलते, मग भारतात परतण्याचा त्यांचा बेत अलबतच रद्द होतो, ही बाब तितकीशी नवलाईची राहिलेली नाही आता. आजघडीला निदान पावणेदोन लाख भारतीय विद्यार्थी विदेशात शिकायला गेले आहेत कुठल्यातरी देशात. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यातील किती लोक भारतात परत येतील याचा अंदाज, त्यांच्या शिक्षणासाठी लक्षावधी रुपये खर्च करणार्या सरकारला सुद्धा बांधता येत नाही, हे वास्तव तितकेच दुर्दैवी आहे. त्यांच्या कृतघ्नतेची चर्चा करावी तेवढी कमीच ठरेल. पण केवळ इथले वातावरण भावले नाही म्हणून देश सोडायला निघालेल्यांचे काय? भारत माझा देश आहे, ही प्रतिज्ञा त्यांनी कधी मनापासून म्हटलीच नव्हती का? गे माय भू तुझे मी फेडीन पांग सारे, या ओळींमधून व्यक्त होणार्या भावनांनी कधी साद घातलीच नाही, या लोकांच्या मनाला? खिशात पैसा खुळखुळू लागला की प्रत्येक जण अशी बाहेर देशात रमण्याची स्वार्थी भाषा बोलू लागला, तर इथे कुणी राहायचं? अन् कुणासाठी आमच्या सैनिकांनी सीमेवर शत्रूंशी लढायचे? या देशात मिळत नाही असं सुख, चैन आणि उपभोगासाठी देशाच्या सीमा ओलांडणार्यांच्या तुलनेत वैराग्य अनुभवणारी इथली संतांची परंपरा खुजी ठरवायची का मग? कुष्ठरोग्यांपासून तर वेश्यांच्या पोरांच्या सुखात आपलं सुख धुंडाळणारी, त्यांच्या चेहर्यावरच्या समाधानासाठी आपलं आयुष्य वेचणारी माणसं वेडी आहेत का मग? की बाहेरच्या देशात जायला पैसा नाही म्हणून थांबले आहेत हे सारे लोक इथं या देशात? अन् पैशाच्या जोरावर हवेत उडणारे पळपुटे खूप शहाणे ठरतात का त्यांच्या तुलनेत?
उपभोगातच सुख शोधणार्यांच्या व्यवहारी लोकांच्या गर्दीत मूर्ख ठरतील कदाचित इथल्या समाजासाठी आयुष्य वेचण्याकरता ‘तिकडे’ जाऊनही ‘इकडे’ परतलेली माणसं! त्यांना नाही जमलं ते व्यवहारी शहाणपण. ‘सारे जहॉं से अच्छा हिंदोस्तॉं हमारा’ या फक्त कागदावरच्या नीरस ओळी ठरल्यात काही लोकांसाठी. अन् काही ध्येयवेड्या माणसांच्या अंगावर उगाच काटा उभा राहातो, राष्ट्रगीताची नुसती धून वाजली तरी. इथले दारिद्र्य, जगण्याची संथ गती अन् साधेपणातही सौंदर्य शोधण्याची महात्मा गांधींची भूमिका केव्हाच मागे पडली अन् श्रीमंतीच्या मागे बेधुंद होत धावू लागलेत लोक. संथ गतीत सौंदर्य शोधण्याची गांधींची कल्पना खुळचटपणाची ठरतेय् काहींच्या लेखी. ते तर वेगाच्याही मागे सुसाट धावत सुटलेत. सारा देश स्वतंत्र व्हावा म्हणून समरात लढणारे लोक मूर्ख अन् त्यांनी इंग्रजांच्या तावडीतून मुक्त केलेला स्वतंत्र देश सोडून स्वत:च्या सुखासाठी भटकंतीला निघालेले तेवढे शहाणे ठरताहेत. यांच्या रक्षणासाठी काही लोक प्राणपणाने देशाच्या सीमेवर लढताहेत अन् त्यांच्या बलिदानाला बेदरकारपणे लाथ मारून काही लोक घर सोडून बाहेर पडताहेत.
अर्थात, कोणी कुठे राहायचे, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण निदान जाताना या देशाची बदनामी करून, स्वत:च्या पळपुटेपणाचे ओंगळवाणे समर्थन तरी करू नये कुणी. हा देश गरीब, भिकार्यांचा, घाणेरडा वगैरे होताच काही लोकांच्या लेखी... आता तो राहाण्याच्या लायकीचाही राहिला नसल्याचा कांगावा करून कुणी इथून बाहेर पडत असेल, तर तो इथल्या मातीला आई मानणार्यांचा, तिच्या रक्षणार्थ प्राणपणाने लढण्याचा निश्चय करून बसलेल्या कोट्यवधी लोकांचा धडधडीत अपमान आहे. या बेदरकार वागणुकीचे निदान समर्थन तरी होऊ नये. हा देश नव्हे, तेच या देशात राहाण्याच्या लायकीचे नाहीत, हेच त्यांना ठणकावून सांगितले पाहिजे...

No comments:
Post a Comment