ज्यांनी कोळशापासून तर अटलाण्टापर्यंत कोट्यवधी रुपयांचे घोटाळे केले, ज्यांनी टुजीपासून तर कॉमन वेल्थ गेम्सपर्यंत सर्वदूर खाबूगिरी केली, त्यांना ३६० कोटींच्या लाचेच्या प्रकरणाची जराही भीती न वाटणे हे तर ओघानेच आले. ज्यांनी कालपर्यंत कित्येक कोटींचे घोटाळे अगदी सहज पचवले, त्यांनी परवाच्या या आरोपांनी आपण जराही घाबरलेलो नसल्याचे छातीठोकपणे सांगणे यात नवल ते नाहीच! पण, त्यांनी या देशातील जनतेला गृहीत धरण्याची बाब मात्र आक्षेपार्ह आहे. आम्ही काय करायचे ते केले, पण आमच्यावर आरोप कराल तर याद राखा, अशा आशयाची भाषा कुणाच्या तोंडी येणे, हे त्यांनी इथल्या सर्वसामान्य माणसाला गृहीत धरण्याचाच प्रकार आहे. इथे अस्तित्वात असलेली लोकशाही व्यवस्था अव्हेरण्याचाही तो एक भाग आहे. कुठल्याही प्रकरणात इतर कुणाचेही नाव गोवले गेले तरी कुणाचेच काही बिघडत नाही. अगदी पंतप्रधानपदावर असताना डॉ. मनमोहनसिंगांचे नाव कोळसा घोटाळ्यात चर्चेत आले, तरी कुणालाच त्यात आक्षेपार्ह वाटले नाही. पण, हेच नेहरू-गांधी घराण्याशी संबंधित व्यक्तीबाबत घडले की, मात्र या पक्षातील प्रत्येकाचेच पित्त खवळते. राजाच्या बचावार्थ रिंगणात उतरणार्या प्याद्यांची संख्या मग अचानक वाढते. इटलीतील न्यायालयात उघडकीस आलेले सत्य मांडण्याचा प्रयत्न केला, तरी कॉंग्रेसच्या नेत्यांना खपत नाही? तसला प्रयत्न करणार्याची मुस्कटदाबी करण्यासाठी सरसावतात एकजात सारे? वर पुन्हा, आपण कुणालाच घाबरत नसल्याचा तोरा असतो त्यांच्या बोलण्यात? कुणाच्या जिवावर चालली आहे सोनिया आणि त्यांच्या चमच्यांची ही मुजोरी?
‘‘मी कुणालाच घाबरत नाही!’’ -ही सोनियांच्या मुखातून उद्धृत झालेली भाषा केवळ मुजोरीची नाही, ती कॉंग्रेसच्या नैसर्गिक स्वभावाची निदर्शक आहे. ऑगस्टा हेलिकॉप्टर खरेदीत भारतातील काही लोकांना लाच देण्यात आल्याच्या प्रकरणात, इटलीतील न्यायालयात चर्चेत आलेली काही नावे कॉंग्रेस पक्षातील सोनिया, अहमद पटेलांसह इतर काही नेत्यांच्या भोवती फिरणारी आहेत. हा काही विरोधकांनी केलेला राजकीय आरोप नाही, की त्यांना अडचणीत आणण्यासाठी कॉंग्रेस पक्षातूनच कुणी उलटवलेला डाव नाही. दस्तुरखुद्द सोनियांच्या माहेरदेशातील न्यायव्यवस्थेतून उघडकीस आलेले ते धडधडीत सत्य आहे! कोट्यवधीच्या या व्यवहारात लाच देणारी माणसं इटलीत शिक्षा भोगताहेत, तर मग ती लाच स्वीकारणार्या भारतातील कुणावरच काहीच कारवाई का होत नाही, हा खरा सवाल आहे. पण, या बोचर्या प्रश्नाचे उत्तर देण्याची जबाबदारी टाळून, आपण कुणालाच भीक घालत नसल्याची माजोरी भाषा सध्या सोनिया बोलताहेत.
जिथली एकतृतीयांश जनता दारिद्र्यरेषेखालील जीवन जगते, त्या देशातल्या गोरगरिबांचे प्रतिनिधित्व करणार्या राजकीय नेत्यांची हौस फिटवण्याकरिता त्यांच्या हवाई सफरीसाठी महागडे, अलिशान हेलिकॉप्टर्स विकत घेण्याचा निर्णय होतो. त्यासाठी नेमक्या इटलीतील कंपनीशी सौदा होतो. सौदा झाला तेव्हा सत्तेत नेमकी कॉंग्रेस असते अन् त्या पक्षाचे अध्यक्षपद सोनियांकडे असते आणि सोनियांचे नाते नेमक्या त्याच इटलीशी असते... हा सारा योगायोग कुणी जाणीवपूर्वक जुळवून आणलेला नाही. सौदा झाला हे खरे आहे नि लाच दिली-घेतली गेल्याचा आरोप तर खुद्द इटलीतील न्यायालयात सिद्ध झाला आहे! ज्या व्यवहारात तब्बल ३६० कोटी रुपयांची लाच दिली गेली, तो सौदा किती मोठा असेल, याची कल्पना करा. इतक्या मोठ्या रकमेची लाच दिली म्हणून इटलीत आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताहेत. प्रकरण न्यायालयात दाखल झाले आहे. तिकडे चर्चा होईपर्यंत इकडे कुणाला कानोकान खबरही होत नाही. पण, प्रकरणे दाबण्याची इकडच्यासारखी व्यवस्था नसल्याने तिकडे इटलीत मात्र त्यावर विस्तृत चर्चा झाली; आणि कित्येकांचे पितळ उघडे पडण्याची वेळ आली.
नेत्यांच्या हवाई सफरीसाठी महागडे हेलिकॉप्टर्स खरेदी करण्याची खरंच काही गरज होती का, सौदा किती मोठा होता, लाचेची रक्कम नेमकी कुणाचे खिसे गरम करून गेली... असल्या प्रश्नांची सरबत्ती तर ओघाने होईलच; पण एकूणच या सार्या प्रकरणात कॉंग्रेस पक्षाने आणि खुद्द सोनियांनी ज्या मुजोरीचा प्रयोग चालवला आहे, तो खरोखरीच आक्षेपार्ह आहे. लोकशाही व्यवस्थेत, सत्ताधारी कुणालाच घाबरत नसल्याची भाषा बोलत असतील, तर त्याला मुजोरी नाही तर काय म्हणायचे? याबाबत सुब्रह्मण्यम् स्वामींनी संसदेत काही मुद्दे मांडण्याचा प्रयत्न केला, तर त्यांना बोलूच न देण्याची, सभागृहाचे कामकाज बंद पाडण्याची तर्हा या पक्षाचे नेते अनुसरतात. हा तमाशा नेमका कशासाठी चाललाय्, हे चाणाक्ष लोकांच्या केव्हाच ध्यानात आले आहे. पण, ‘सौ चुहें खाके बिल्ली हजला जाण्याची’ जी कॉंग्रेसी नौटंकी सध्या सुरू आहे, त्यावरून इटलीच्या न्यायालयातील चर्चा खरी असल्याची ग्वाहीच अप्रत्यक्षपणे मिळू लागली आहे.
ज्यांनी कोळशापासून तर अटलाण्टापर्यंत कोट्यवधी रुपयांचे घोटाळे केले, ज्यांनी टुजीपासून तर कॉमन वेल्थ गेम्सपर्यंत सर्वदूर खाबूगिरी केली, त्यांना ३६० कोटींच्या लाचेच्या प्रकरणाची जराही भीती न वाटणे हे तर ओघानेच आले. ज्यांनी कालपर्यंत कित्येक कोटींचे घोटाळे अगदी सहज पचवले, त्यांनी परवाच्या या आरोपांनी आपण जराही घाबरलेलो नसल्याचे छातीठोकपणे सांगणे यात नवल ते नाहीच! पण, त्यांनी या देशातील जनतेला गृहीत धरण्याची बाब मात्र आक्षेपार्ह आहे. आम्ही काय करायचे ते केले, पण आमच्यावर आरोप कराल तर याद राखा, अशा आशयाची भाषा कुणाच्या तोंडी येणे, हे त्यांनी इथल्या सर्वसामान्य माणसाला गृहीत धरण्याचाच प्रकार आहे. इथे अस्तित्वात असलेली लोकशाही व्यवस्था अव्हेरण्याचाही तो एक भाग आहे. कुठल्याही प्रकरणात इतर कुणाचेही नाव गोवले गेले तरी कुणाचेच काही बिघडत नाही. अगदी पंतप्रधानपदावर असताना डॉ. मनमोहनसिंगांचे नाव कोळसा घोटाळ्यात चर्चेत आले, तरी कुणालाच त्यात आक्षेपार्ह वाटले नाही. पण, हेच नेहरू-गांधी घराण्याशी संबंधित व्यक्तीबाबत घडले की, मात्र या पक्षातील प्रत्येकाचेच पित्त खवळते. राजाच्या बचावार्थ रिंगणात उतरणार्या प्याद्यांची संख्या मग अचानक वाढते. इटलीतील न्यायालयात उघडकीस आलेले सत्य मांडण्याचा प्रयत्न केला, तरी कॉंग्रेसच्या नेत्यांना खपत नाही? तसला प्रयत्न करणार्याची मुस्कटदाबी करण्यासाठी सरसावतात एकजात सारे? वर पुन्हा, आपण कुणालाच घाबरत नसल्याचा तोरा असतो त्यांच्या बोलण्यात? कुणाच्या जिवावर चालली आहे सोनिया आणि त्यांच्या चमच्यांची ही मुजोरी? कुणासाठी खरेदी झाले हे हेलिकॉप्टर्स? जनतेच्या जिवावर मौज करणार्या नेत्यांसाठी? जिथे लक्षावधी लोकांना एकवेळच्या खाण्याची ददात आहे, त्या देशातल्या नेत्यांना ही चैन परवडते तरी कशी? आणि आता लाचेच्या प्रकरणाची चर्चाही झालेली नकोय् यांना?
तसेही या घराण्यातल्या प्रत्येकालाच हा देश आपली खाजगी मालमत्ता वाटत राहिला आहे. त्या भावनेतूनच त्यांनी किमान पाच दशकं इथला कारभार प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष रीत्या चालवला. तो कारभार चालवताना ना इथल्या राजकीय विरोधकांची त्यांनी कधी तमा बाळगली, ना इथल्या सामान्य माणसाचे हित त्यांनी कधी जपले. बहुधा त्यामुळेच की काय, पण त्यांच्या सत्तेच्या काळात ‘गरिबी हटाव’चा नारा दिला गेला वेगळ्याच लोकांसाठी आणि प्रत्यक्षात श्रीमंती लाभली ती वेगळ्याच समूहाला! राज्यघटनेची सतत ग्वाही देत इथले कायदे पायदळी तुडवताना तर त्यांनी कशाचीच पत्रास बाळगली नाही. ना कॉंग्रेस पक्षाच्या तिजोरीतून नॅशनल हेरॉल्डला पाचशे कोटी रुपये काढून देताना त्यांना काही वावगे वाटले, ना देशातील इतर नेत्यांच्या बरोबरीने रॉबर्ट वढेरांना उच्च दर्जाच्या सोयी उपलब्ध करून देण्यात त्यांना कधी काही गैर वाटले. आता अटलाण्टा प्रकरणात लाच स्वीकारली जाण्याची बाबही त्यांना त्याच सहज वळणार न्यायची आहे. जणू यात फारसे महत्त्वाचे काहीही घडलेले नसल्याचे सांगण्याचा हा प्रयत्न आहे. यातील धगधगते वास्तव कवडीमोल ठरवण्याचा हा डाव आहे. राजकीय वळण देत या सौद्यामागे दडलेल्या ‘व्यवहाराचे’ गांभीर्य नष्ट करण्याचे हे षडयंत्र आहे. हे करतानाही यांची भाषा मगरुरीची आहे. इथली व्यवस्था, इथली यंत्रणा, इथले कायदे न जुमानण्याची माजोरी त्यातून ध्वनित होते. इटलीतील न्यायव्यवस्था काही भारत सरकार नियंत्रित करीत नाही. उलट, जोडलेच जायचे असतील तर इटलीशी संंबंध सोनियांचेच जोडले जाऊ शकतात. या पार्श्वभूमीवर, तिथल्या न्यायालयातील चर्चेचे संदर्भ भारतातील तत्कालीन सत्ताधारी कॉंग्रेस पक्षाशी आणि त्याच्या शीर्षस्थ नेत्यांशी जोडले जात असतील आणि तरीही ती चर्चा, त्यातील आरोप, तथ्य फालतू ठरवण्याचे प्रयत्न कुणी करत असेल, तर हा निर्लज्जपणाचा कळस आहे. कॉंग्रेसच्या नेत्यांनी ही भूमिका स्वीकारणे समजण्यासारखे आहे. पण, मग पुढारलेपण मिरवणार्या आणि सध्याच्या सरकारच्या सर्जनशीलतेवर ऊठसूट प्रश्न उपस्थित करणार्या कथित पुरोगाम्यांचे काय? या प्रकरणी ते आवाज उठवणार, की त्यांनाही कॉंग्रेसची मुजोरी मान्य आहे, हेही स्पष्ट झाले पाहिजे...