हा सारा प्रकार बघितला की असं वाटावं की, स्वत:जवळ उडवायला उरतेच काय या समाजाकडे? आणि तसं करायला वेळ तरी कुठाय् इथे कुणाकडे? पण, मग कोंबड्यांच्या लढाईला जमणारी गर्दी बघितली, जुगाराच्या अड्ड्यांवर खाली चादर टाकून त्यावर पिसलेल्या पत्त्यांच्या संगतीने जमणारा नोटांचा थर बघितला की, साराच भ्रमनिरास होतो... उगाच ही माणसं खुळी वाटायला लागतात. त्या गर्दीत सारी माणसं अन् माणुसकीही, ते भाबडेपण अन् ते रांगडेपणही हरवल्यागत वाटते. घरातली आपली माणसं उपाशी ठेवून बाहेरच्या गुत्तेवाल्याचे पोट भरायला निघालेल्यांना दूषणे नाही तर आणखी काय द्यायचे? प्रचंड मेहनत आणि स्वत:च्या घामातून पिकवलेला शेतमाल महत्प्रयासाने विकून खिशात आलेले चार पैसे खुशाल कोंबड्यांच्या लढाईवर उधळण्याच्या प्रवृत्ती आणि सवयीचे समर्थन तरी कसे करायचे? बरं, यांना वेड्यातही काढता येत नाही. कारण एरवी शहाण्यांनाही बुचकळ्यात पाडण्याइतपत शहाण्यासारखी वागतात ती! पण, कधीकधी मात्र... हे चित्र बघितले की नकळत त्या मित्राचे शब्द खरे वाटतात... या लोकांना गरीब तरी कसे म्हणायचे? खरंच आहे. स्वत:ची हलाखीची परिस्थिती विसरून जुगारावर पैसा ‘उधळणार्यांना’ गरीब कसे म्हणायचे?
इथे गरिबी आहे कुठे? साधी कोंबड्यांची लढाई बघण्यासाठीही शेकडोंची गर्दी जमते आणि हजारो रुपये उडवतात लोक. तिकडचा लावण्यांचा फड असो वा मग इकडचा झाडीपट्टीतील नाटकांचा मौसम; त्यात रंगणारा रसिक गर्दीच्या शेवटच्या रांगेनंतर रंगणार्या जुगाराच्या अड्ड्यांवर जमणार्या माणसांमध्ये रंगतो आणि त्यांच्याकडून उडवला जाणारा पैसा बघितला की, बघणार्यांची बोटं नकळत तोंडात घातली जातात...
ग्रामीण भागात गरिबीचे प्रमाण बरेच असल्याच्या मुद्यावर वाद घालताना परवा एका सामाजिक कार्यकर्त्याने भीषण वास्तव समोर मांडले. घरात अठराविश्वे दारिद्र्य असताना दारूच्या गुत्थ्याकडे वळणारे पाय अन् तिथंही होणारी उधळपट्टी काही कमी नसते राव. कुणाच्याही भांडणात डोकावणारी, कुणाच्याही आनंदात आनंद अन् दु:खात दु:ख मानणारी ही मंडळी, गावरान, गावठी, गावंढळ म्हणून हिणवली जात असली, तरी ती मनानं खूप साधी, भाबडी, इमानदार, सज्जन अन् तेवढीच स्वाभिमानी अशी ही मंडळी, दिवसभर शेतावर राबराब राबणारी. कपाळावरच्या घामानं शेतातली माती भिजवणारी अन् त्यातनं उद्याची पहाट उगवणारी... खरं म्हणजे त्यांच्या वाट्याला आलेलं जिणं, दुर्लक्षित राहिलेली त्यांची परिस्थिती, खुंटलेला विकास, त्यातून उपेक्षित राहिलेला समाज आणि त्यातनंच समाजाच्या वाट्याला आलेली फरफट...
हा सारा प्रकार बघितला की असं वाटावं की, स्वत:जवळ उडवायला उरतेच काय या समाजाकडे? आणि तसं करायला वेळ तरी कुठाय् इथे कुणाकडे? पण, मग कोंबड्यांच्या लढाईला जमणारी गर्दी बघितली, जुगाराच्या अड्ड्यांवर खाली चादर टाकून त्यावर पिसलेल्या पत्त्यांच्या संगतीने जमणारा नोटांचा थर बघितला की, साराच भ्रमनिरास होतो... उगाच ही माणसं खुळी वाटायला लागतात. त्या गर्दीत सारी माणसं अन् माणुसकीही, ते भाबडेपण अन् ते रांगडेपणही हरवल्यागत वाटते. घरातली आपली माणसं उपाशी ठेवून बाहेरच्या गुत्तेवाल्याचे पोट भरायला निघालेल्यांना दूषणे नाही तर आणखी काय द्यायचे? प्रचंड मेहनत आणि स्वत:च्या घामातून पिकवलेला शेतमाल महत्प्रयासाने विकून खिशात आलेले चार पैसे खुशाल कोंबड्यांच्या लढाईवर उधळण्याच्या प्रवृत्ती आणि सवयीचे समर्थन तरी कसे करायचे? बरं, यांना वेड्यातही काढता येत नाही. कारण एरवी शहाण्यांनाही बुचकळ्यात पाडण्याइतपत शहाण्यासारखी वागतात ती! पण, कधीकधी मात्र... हे चित्र बघितले की नकळत त्या मित्राचे शब्द खरे वाटतात... या लोकांना गरीब तरी कसे म्हणायचे? खरंच आहे. स्वत:ची हलाखीची परिस्थिती विसरून जुगारावर पैसा ‘उधळणार्यांना’ गरीब कसे म्हणायचे?
No comments:
Post a Comment