Saturday, August 17, 2013

पवारांच्या राजकारणाचा हिरवा रंग

दूर कुठेतरी म्यानमॅरमध्ये उसळलेल्या दंगलींच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात रजा अकादमीने मुंबईच्या आझाद मैदानावर काढलेल्या मोर्चाच्यावेळी  निष्पाप महिला पोलिसांवर झालेल्या अत्याचाराचे पवारांना अल्पकाळातच विस्मरण झालेले दिसते. लाठ्या, लत्थांचा प्रहार करून परिसरातले शहीदांच्या स्मृतिस्थान ध्वस्त करणारे गुन्हेगार अद्याप पोलिसांना गवसलेले नाहीत. जर मालेगावच्या प्रतिक्रियेदाखल मुस्लिम तरुणांचा भडका उडाल्यास त्यांचा दोष नसल्याचा दावा शरद पवार करणार असतील, तर मग रजा अकादमीच्या मोर्चातील दंगेखोरांनी माजवलेल्या धुमाकुळाच्या प्रतिक्रियेदाखल इतर समाजाचा भडका उडाला तर दोष कुणाला द्यायचा पवार साहेब? 19 निष्पाप मुस्लिम तरुणांना दोन वर्षे अकारण कारागृहात घालवावी लागणे हा जर त्यांच्या लेखी व्यवस्थेचा दोष असेल, तर मग साध्वी प्रज्ञासिंहांच्या बाबतीत त्याच व्यवस्थेने काय दिवे पाजळलेत याचा त्यांना का विसर पडावा? निर्दोष व्यक्तींना अकारण कारावास भोगावा लागणे हा व्यवस्थेचा दोष असेल, तर ऑगस्ट महिन्यात मुंबईत उसळलेल्या दंगलीतील गुन्हेगार अद्याप पोलिसांच्या हाती न लागण्यातही त्याच व्यवस्थेचा दोष आहे ना? पवारांना व्यवस्थेतले दोषही आता केवळ एकाच अँगलने दिसू लागले असतील, तर त्यामागची कारणे अबू आझमींना जाणवली, तीच घाणेरडी अन् पॉलिटिकलअसण्याची शक्यता अधिक आहे. 
 महाराष्ट्राच्या कथित जाणत्या राजालापरवा अचानक झालेली उपरती, त्यांना आलेले मुस्लिम प्रेमाचे भरते, मुळीच अनाकलनीय नाही. पवार कधीच अकारण, असंबद्ध बोलत नाही. तोल सुटल्याने ते बोलल्याचा गैरसमज लोकांना अनेकदा होत असला तरी, त्यात तथ्य नसते. पवार ते जाणीवपूर्वक, समजून उमजूनच बोललेले असतात, हाच आजवरचा इतिहास आहे.
‘‘मालेगाव प्रकरणी 19 मुस्लिम तरुणांना 2 वर्षे तुरुंगात काढावी लागली. संशयित अतिरेक्यांबरोबर गेलेली निष्पाप इशरत एन्काऊंटरमध्ये मारली गेली. हा आपल्या व्यवस्थेने केलेला अन्याय आहे. याचा राग मुस्लिम तरुणांच्या डोक्यात शिरला आणि त्यांनी काही कृत्य केले तर त्यांचा दोष काय...? ’’
अशा शब्दातले राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांचे परवाचे बरळणेही नेहमीप्रमाणे समजून उमजूनच केलेले असणार, याबाबत कुणाच्याही मनात संशय असायचे कारण नाही. अगदी मुस्लिम बांधवांच्या मनातही त्याबाबत गैरसमज नाही. पुढच्या वर्षी होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकींचे वेध पवारांना लागले असल्याचे त्यांच्या विधानातून स्पष्ट होत असल्याचे वक्तव्य अबू आझमी यांनी लागलीच केले आहे. आझमींची त्यापुढची विधाने त्यांच्या नेहमीच्या शैलीला साजेशी, मुस्लिमधर्जीण्या विचारांच्या परिघाबाहेर पलीकडे न जाणारी असली तरी पवारांनी जाणीवपूर्वक केलेल्या वायफळ बडबडीचे नेमके आकलन त्यांना झाले असल्याचे मात्र स्पष्ट होते.
ज्यात इशरत मारली गेली ते एन्काऊंटर न्यायालयाच्या म्हणण्यानुसार बनावट असेल, तर तिच्या मृत्युबद्दल कुणालाही वाईटच वाटायला हवे. तिच्या नाहक मृत्युसाठी जबाबदार असलेल्या सवार्ंंनाच कठोर शिक्षा व्हायला हवी. पण मालेगाव स्फोटाच्या ज्या प्रकरणात 19 निष्पाप मुस्लिम तरुणांना दोन वर्षे कारागृहात काढावी लागल्याबद्दल शरद पवारांनी नक्राश्रू ढाळले आहेत, नेमक्या त्याच प्रकरणात साध्वी प्रज्ञासिंहांनाही कारागृहात दिवस काढावे लागताहेत. पोलिसांना अद्याप साध्वींविरुद्ध आरोपपत्र दाखल करता आलेले नाही. पण पवारांनी अश्रू ढाळले ते 19 निष्पाप तरुणांसाठी. साध्वींबाबत त्यांच्या तोंडून चकार शब्द बाहेर पडला नाही. परवा तर नाहीच. पण त्यापूर्वीही कधीच नाही.  कसा पडणार? कुणाबाबत करुणा बाळगली तर उद्या मतांचा लाभ आपल्या पक्षाला होईल, याचे गणित नेहमीच चपखल मांडणार्‍या पवारांना साध्वींवर कारागृहात होत असलेल्या अत्याचाराच्या तुलनेत 19 निष्पाप मुस्लिम तरुणांबाबतचा पुळका अधिक महत्त्वाचा वाटला. त्यांनी तो जाहीर केला. पवार राजकारणात धूर्त अन् चाणाक्ष म्हणून ओळखले जात असले तरी, त्यांच्या विधानांचे अर्थ न कळण्याइतकी, जनताही आता खुळी राहिलेली नाही. त्यामुळे त्यांच्या या बरळण्याचे ज्यांना ज्यांना, जे जे म्हणून अर्थ कळायचे ते कळले. बहुधा अबू आझमींनाही त्याचा नेमका अर्थ कळला असावा...
दूर कुठेतरी म्यानमॅरमध्ये उसळलेल्या दंगलींच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात रजा अकादमीने मुंबईच्या आझाद मैदानावर काढलेल्या मोर्चाच्यावेळी  निष्पाप महिला पोलिसांवर झालेल्या अत्याचाराचे पवारांना अल्पकाळातच विस्मरण झालेले दिसते. लाठ्या, लत्थांचा प्रहार करून परिसरातले शहीदांच्या स्मृतिस्थान ध्वस्त करणारे गुन्हेगार अद्याप पोलिसांना गवसलेले नाहीत. जर मालेगावच्या प्रतिक्रियेदाखल मुस्लिम तरुणांचा भडका उडाल्यास त्यांचा दोष नसल्याचा दावा शरद पवार करणार असतील, तर मग रजा अकादमीच्या मोर्चातील दंगेखोरांनी माजवलेल्या धुमाकुळाच्या प्रतिक्रियेदाखल इतर समाजाचा भडका उडाला तर दोष कुणाला द्यायचा पवार साहेब? 19 निष्पाप मुस्लिम तरुणांना दोन वर्षे अकारण कारागृहात घालवावी लागणे हा जर त्यांच्या लेखी व्यवस्थेचा दोष असेल, तर मग साध्वी प्रज्ञासिंहांच्या बाबतीत त्याच व्यवस्थेने काय दिवे पाजळलेत याचा त्यांना का विसर पडावा? निर्दोष व्यक्तींना अकारण कारावास भोगावा लागणे हा व्यवस्थेचा दोष असेल, तर ऑगस्ट महिन्यात मुंबईत उसळलेल्या दंगलीतील गुन्हेगार अद्याप पोलिसांच्या हाती न लागण्यातही त्याच व्यवस्थेचा दोष आहे ना? पवारांना व्यवस्थेतले दोषही आता केवळ एकाच अँगलने दिसू लागले असतील, तर त्यामागची कारणे अबू आझमींना जाणवली, तीच घाणेरडी अन् पॉलिटिकलअसण्याची शक्यता अधिक आहे.
सांगली-मिरज असो वा मग धुळे. दंगली कुठल्याहंी असल्या तरी त्यातली मुस्लिमांची भूमिका अबू आझमींना नेहमीच निर्दोष वाटते. हे निर्दोषत्व न पटणारे असले तरी ते ठासून सांगण्याचा प्रयत्न ते सतत करत असतात. निर्दोषत्व अगदीच सिद्ध करता येण्यासारखे नसले, मुस्लिमांचा सहभाग उघडपणे दिसत असला तर मग ते, ही स्वाभाविक प्रतिक्रियाअसल्याचे सांगत पूर्वीच्या कुठल्यातरी घटनेवर, व्यवस्थेवर, कथित अन्यायावर त्याचे खापर फोडून मोकळे होण्याची भूमिका स्वीकारतात. इथल्या लोकशाही व्यवस्थेवर, धर्मनिरपेक्षतेवर ठाम विश्‍वास व्यक्त करत, या देशात मुस्लिमांवर होत असलेल्या कथित अन्यायाचा पाढा वाचण्यात ते जराही कसूर बाकी ठेवत नाहीत. स्वातंत्र्योत्तर काळात सातत्याने मुस्लिम धर्जीणे धोरण स्वीकारत आलेल्या काँग्रेसद्वारेही मुस्लिमांवर अन्यायच होत असल्याचे रडगाणे ते नेहमीच गात असतात. आझाद मैदानावरील मोर्चानंतर उसळलेल्या दंगलीतही त्यांना दोष व्यवस्थेतच दिसला. मोर्चेकर्‍यांनी महिला पोलिसांच्या अब्रूवर हात घातल्याच्या घटनांचे मात्र, त्यांना नेमके विस्मरण झाले. असे काही घडलेच नसल्याचा दावा करायला त्यांनी कमी केले नाही. अन् घडले असलेच, तर पोलिसांनी दोषींना कठोर शिक्षा करावी अशी परवलीची भाषा वापरून ते मोकळे झाले. आरोपींना पकडायला गेलेल्या पोलिसांना मुस्लिम वस्त्यांमध्ये मिळालेली वागणूक, त्यांच्यावर झालेले हल्ले, याबाबत ते चकार शब्द बोलत नाहीत. खरं तर शरद पवारही परवा त्यांचीच बोली, त्यांचीच भाषा बोलले. पण तरीही आझमींना ते भावले नाही. मुस्मिलांच्या मतांचे राजकारण करण्याचा परवाना कॉग्रेसला अन् आझमींच्या समाजवादी पार्टीला लाभलेला असताना त्यात वाटेकरी होण्याचा पवारांनी चालवलेला प्रयत्न रुचला नवासा बहुतेक त्यांना!
राज्यातल्या मुस्लिमाच्या शिक्षणापासून तर आर्थिक अवस्थेच्या वास्तवाचे वाभाडे काढणार्‍या सच्चर समितीच्या अहवालावर कार्यवाही करायला इथे कुणीच तयार नाही. वक्फ बोर्डांच्या जमिनी सत्तेतले नेते मिळून वाटून खात सुटले आहेत. जमिनीच्या व्यवहारात पैसे खाणार्‍या अधिकार्‍याला अ‍ॅण्टीकरप्शन विभागाच्या अधिकार्‍यांनी रंगेहात पकडले तरी सरकारमधील नेते त्यांना पाठीशी घालताहेत. अंबानींचा मुंबईतला इमला वक्फ बोर्डाच्या जमिनीवरच उभा राहिला आहे. तरी कुणी त्याबाबत बोलायला तयार नाही, जे बोलतात त्यांच्या भावना पाक नाही. इरादे नेक नाहीत, मुस्लिम बांधवांच्या आर्थिक आणि शैक्षणिक दुरवस्थेबाबत खंत बाळगायचे सोडून, आमच्या पक्षाच्या कार्यकारिणीत मुस्लिम सदस्य किती आहेत याची आकडेवारी मांडून स्वत:च स्वत:ची पाठ थोपटून घेणार्‍या राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय नेते तर परवा फारच उदार झाले होते. या राज्यातली मुस्लिमांचे दु:ख आता त्यांना बघवेनासे झाले आहे. त्यांची अवस्था बघून पवारांना हुंदका दाटून यायचा तेवढा बाकी राहिला होता.  आणि मग ते नाही नाही ते बरळले. आपल्या बोलण्याचे अर्थ काय निघतात, मुस्लिम मतांचे राजकारण करण्याच्या नादापायी आपणे नमके कशाचे समर्थन करत सुटलोय्, याचेही भान त्यांना राहिले नाही.  मुस्लिमांवरील अन्यायासाठी ज्याला दोष द्यायला निघालो, त्या व्यवस्थेचा आपण स्वत: गेली किमान पाच दशके भाग आहोत. इतक्या प्रदीर्घ कालावधीत आपल्याला ती कुचकामी व्यवस्था काकणभरही बदलवता आलेली नसल्याचे धगधगते वास्तव वाणीपुरत्या मर्यादीत राहिलेल्या मुस्लिमप्रेमाच्या आडून लपवता येईल असा गअह पवारांनी करून घेतलेला दिसतो. त्यांच्या विधानाने मुस्लिमेत्तर समाजाचा संताप तर अनावर झाला आहेच, पण खुद्द मुस्लिम बांधवांनाही त्यांचा हा पुळका निवडणुकीच्या तोंडावर उफाळून आलेले नक्राश्रू असल्याचे जाणवू लागणे, ही बाब पवारांनी मांडलेला मुस्लिमप्रेमाचा डाव राजकीय सारीपाटावर पाऽऽर उधळला गेल्याचे स्पष्टपणे सांगते आहे....

No comments:

Post a Comment