Monday, August 12, 2013


  गुजरातेतील काही गावे तर विदेशी नागरिकांची मुले जन्माला घालण्याच्या उद्योगासाठीच ओळखली जाऊ लागली आहेत. भरपूर पैश्यांच्या मोबदल्यात विदेशी नागरिकांना आपली मुले दत्तक देण्याच्या धंद्यातआता त्यांच्यासाठी मुले जन्माला घालून देण्याच्या प्रकाराची भर पडत आहे. गरीबीने लाचार झालेले लोक पैश्यासाठी किडनी विकत असल्याची, रक्त देत असल्याची उदाहरणे नवी नाहीत. त्यात आता आणखी एका नवीन मार्गाची भर पडल्याचे चित्र बघायला मिळत आहे. 
दुसर्‍याच कुणाचे तरी मूल एखाद्या महिलेने आपल्या उदरात नऊ महिने सांभाळण्याचे मोलअपत्यविहीन दाम्पत्यांसाठी फार मोठे आहे. त्यामुळे हा प्रकार पूर्णपणे बंद व्हावा असे कदाचित कुणी म्हणणार नाही. पण एखाद्याच्या पदरात अपत्याचे दान टाकण्याच्या सामाजिक भावनेपुरती सरोगसी मर्यादीत राहिलेली नाही. या प्रकाराला नकळत धंद्याचे स्वरूप प्राप्त होत चालले आहे. ज्यांच्याकडे पैसा आहे, अशांनी आपलेमूल सांभाळण्यासाठी आईचे उदरही पैसा फेकून किरायाने घ्यावे आणि हा प्रकार सर्रास प्रचलीत व्हावा, कालपर्यंत फिगर बिघडू नये म्हणून बाळाला दूध पाजण्याचे टाळणारी सुखवस्तू घरातली महिला आता मुलं जन्माला घालण्याच्या भानगडीत न पडता सरोगसीचा पर्याय शोधू लागली असेल, तर ही बाब समाजस्वास्थ्यासाठी योग्य की अयोग्य याचा विचार धुरीणांनी आत्ता, या क्षणापासून केला पाहिजे. 

धंद्याच्यावाटेनं चाललेली सरोगसी!

शाहरूख खान स्वत:च्या अभिनयाने, कर्तबगारीने प्रसिद्ध पावलाच, पण त्याहीपेक्षा छोट्या वा मोठ्या पडद्याबहेरही तो आपल्या वागणुकीमुळे चर्चेत राहिला आहे. कधी अमेरिकेच्या विमानतळावर झालेल्या झाडाझडतीच्या बातमीने त्याच्या बाबतीत भारतीय जनमानसात दया निर्माण केली. तर कधी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सुरक्षा कर्मचार्‍याला त्याने केलेल्या मारहाणीने लोकांना संतप्त केले. सध्या शाहरूख सरोगसीमुळे चर्चेत आला आहे. शाहरूखच्या घरात आलेल्या नव्या पाहुण्याने आल्या आल्याच वादळ निर्माण केले आहे. या बाळाच्या जन्मापूर्वी शाहरूखने सरोगेट आईच्या उदरातील बाळाची गर्भलिंग तपासणी केल्याच्या आरोपावरून सामाजिक कार्यकर्त्या वर्षाताई देशपांडे यांनी त्याच्याविरुद्ध दंडाधिकारी न्यायालयात एक तक्रार दाखल केली आहे. न्यायालयानेही या प्रकरणाची दखल घेत शाहरुख आणि त्याची पत्नी गौरी यांना नोटीस बजावली हे. या प्रकरणाचा निकाल काय लागायचा तो लागेल. त्यावेळी त्याची चर्चाही होईल. पण आजघडीला या सरोगसी प्रकरणाने अनेकानेक प्रश्‍न उपस्थित केलेत, ही वस्तुस्थिती आहे.
सरोगेट म्हणून निवडलेल्या स्त्रीच्या गर्भाशयामध्ये कृत्रिम पद्धतीनेबाबा होऊ इच्छिणार्‍या पुरुषाचे वीर्य सोडले जाते. सरोगेट स्त्रीचे स्त्रीबीज आणि बाबा होऊ इच्छिणार्‍या पुरुषांच्या शुक्रजंतूचा संयोग होऊन भ्रूण तयार होते. वैद्यकीय देखरेखीखाली सरोगेट स्त्रीची काळजी घेतली जाऊन, नऊ महिने पूर्ण झाल्यानंतर ती सरोगेट स्त्री बाळाला जन्म देते आणि जन्मलेलं बाळ संबंधित दाम्पत्याकडे सोपविले जाणे, ही सरोगसीची पद्धती शाहरूखने का वापरली हे कळायला मार्ग नाही. पण आपल्या देशातच नव्हे, तर राज्यात सुद्धा अलीकडच्या काळात व्यापक स्वरूप प्राप्त करीत असलेल्या एका व्यवसायाचे गांभीर्य या निमित्ताने नव्यानेे चर्चेत आले आहे. खरं तर आमीर खानची दुसरी बायको-किरण रावसाठीही याच पद्धतीने मूल मिळवले गेले. पण तेव्हा त्याची एवढी चर्चा झाली नाही. सरोगसी मार्गाचा  शाहरूखने केलेला वापर मात्र बरा फेमस झाला. अन्यथा आपल्या समाजातल्या कित्येक तरुणींनी सरोगेट मदर  होण्याचा व्यवसाय निवडला असल्याची बाब आपल्या ध्यानीही आली नसती.
सुमारे वर्षभरापूर्वी एक अशासकीय विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मांडण्याची तयारी विरोधी पक्षाने केली होती. विषय होता सरोगेट मदर चा. विषय जरासा क्लिष्ट होता. शिवाय सनसनाटी नव्हता. त्यामुळे, हे काय नवीन, अशा प्रश्‍नाचे भाव चेहर्‍यावर उमटलेल्या अनेकांनी त्याकडे दुर्लक्ष केले. पण गेल्या काही वर्षात सरोगसी मदर हा सरकारने दखल घ्यावी इतका व्यापक मुद्दा झाला असल्याची बाब या अशासकीय विधेयकाच्या निमित्ताने स्पष्ट झाली. बेरोजगारी आणि गरीबीने भारतीय मानवी समुहासमोर उभ्या केलेल्या दीनवाण्या मजबुरीतून ज्या ज्या बाबी करण्याची वेळ आणली, त्यात सरोगसीचाही समावेश व्हावा. पण इतक्या गंभीर विषयासंबंधी कुठलाही कायदा अस्तित्वात नाही. केंद्रात कायदा तयार करण्याची प्रक्रिया गेली किमान पाच वर्षे सुरू आहे. या व्यवसायातून उद्भवणार्‍या मानवी, वैद्यकीय, सामाजिक, आर्थिक आणि भावनिक गुंतागुंतीच्या समस्यांवरचा तोडगा शोधण्याची गरज सत्तेत बसलेल्यांच्या गावीही नाही. प्रसिद्धीच्या हव्यासापायी शाहरूख विरुद्ध दाखल झालेली तक्रार त्याने केलेल्या गर्भलिंग परीक्षणाविरुद्ध आहे. सरोगसी प्रकरण योग्य की आयोग्य, याबाबतीत तिथेही मौनच पाळण्यात आले आहे. शिवाय दोन मुले घरात असताना, म्हणजेच बायको मुलांना जन्माला घालण्यास सक्षम असताना शाहरूखला तिसरे मूल, तेही सरोगसी पद्धतीने का हवे होते, या प्रश्‍नाचे समाधानकारक उत्तर शोधण्याच्या गरजही अद्याप कुणालाच वाटत नाहीय्. स्वत: शाहरूखही अडचणीचा हा प्रश्‍न सतत टाळतच आला आहे. त्याने केलेल्या गर्भलिंगचाचणीचे समर्थन करण्याचा प्रश्‍नच उद्भवत नाही. पण, ज्या डॉक्टरने हे परीक्षण केले, त्याच्याविरुद्ध कारवाईची साधी मागणीही कुणी करीत नाही. केवळ प्रसिद्धीयोग साधण्यासाठीच शाहरुखविरुद्ध तक्रारी गुदरल्या जात असल्याचा अर्थ यातनं कुणी काढला तर गैर काय?
शाहरूखचे पोर या पद्धतीने जन्माला आले म्हणून प्रसिद्धीचे भाग्य सरोगसी शब्दाला लाभले. अन्यथा आपल्या समाजात आताशा या पद्धतीने शेकडो बालके जन्माला येत असल्याची बाब कुणाच्या खिजगणतीतही नव्हती. कालपर्यंत चित्रपट आणि वाहिन्यांवरच्या मालिकांमधून कधीतरी हाताळला जाणारा, म्हणूनच मध्यमवर्गीय समाजासाठी  अप्रूप ठरलेला हा प्रकार एव्हाना गंभीर स्वरूप धारण करून उभा ठाकला असल्याची बाब दूरदूरपर्यंत कुणाला माहित नव्हती. चार पैसे पदरी पडावेत म्हणून लग्नानंतरच काय पण लग्नापूर्वीही तरुणी आपल्या गर्भाशयाचा नऊ महिने, नऊ दिवसांसाठी वापर करू देण्यात तयार होताहेत. गुजरातेतील काही गावे तर विदेशी नागरिकांची मुले जन्माला घालण्याच्या उद्योगासाठीच ओळखली जाऊ लागली आहेत. भरपूर पैश्यांच्या मोबदल्यात विदेशी नागरिकांना आपली मुले दत्तक देण्याच्या धंद्यातआता त्यांच्यासाठी मुले जन्माला घालून देण्याच्या प्रकाराची भर पडत आहे. गरीबीने लाचार झालेले लोक पैश्यासाठी किडनी विकत असल्याची, रक्त देत असल्याची उदाहरणे नवी नाहीत. त्यात आता आणखी एका नवीन मार्गाची भर पडल्याचे चित्र बघायला मिळत आहे. 
दुसर्‍याच कुणाचे तरी मूल एखाद्या महिलेने आपल्या उदरात नऊ महिने सांभाळण्याचे मोलअपत्यविहीन दाम्पत्यांसाठी फार मोठे आहे. त्यामुळे हा प्रकार पूर्णपणे बंद व्हावा असे कदाचित कुणी म्हणणार नाही. पण एखाद्याच्या पदरात अपत्याचे दान टाकण्याच्या सामाजिक भावनेपुरती सरोगसी मर्यादीत राहिलेली नाही. या प्रकाराला नकळत धंद्याचे स्वरूप प्राप्त होत चालले आहे. ज्यांच्याकडे पैसा आहे, अशांनी आपलेमूल सांभाळण्यासाठी आईचे उदरही पैसा फेकून किरायाने घ्यावे आणि हा प्रकार सर्रास प्रचलीत व्हावा, कालपर्यंत फिगर बिघडू नये म्हणून बाळाला दूध पाजण्याचे टाळणारी सुखवस्तू घरातली महिला आता मुलं जन्माला घालण्याच्या भानगडीत न पडता सरोगसीचा पर्याय शोधू लागली असेल, तर ही बाब समाजस्वास्थ्यासाठी योग्य की अयोग्य याचा विचार धुरीणांनी आत्ता, या क्षणापासून केला पाहिजे.
वर्षा देशपांडे यांनी दाखल केलेल्या तक्रारीची दखल अपेक्षेप्रमाणे न्यायालयाने घेतली आहे. पण प्रसिद्धीमूल्यांकच्या पलीकडे जाऊन, या प्रकरणाची दखल सर्वच पातळींवर घेतली जाण्याची गरज आहे. सरोगसीच्या बाबतीत आजतारखेला महाराष्ट्रातच काय, पण देशातही कुठलाही कायदा अस्तित्वात नाही. प्रकार अलीकडच्या काळातला असल्याने कालपर्यंत तशा कुठल्या कायद्याची कुणाला गरज वाटली नसेल, तर ते समजण्यासारखे आहे. पण आता त्याचा वापर अर्थार्जनासाठी होऊ लागलाय् म्हटल्यावर शासकीय आणि सामाजिक पातळीवर हा चिंतेचा विषय होण्याची गरज आहे. शाहरूख प्रकरणामुळे याविषयाबाबत अचानक जागृत झालेल्या सर्वांनीच याबाबतीत पावलं उचलणे ही काळाची गरज आहे...

No comments:

Post a Comment