पृथ्वीराज चव्हाण म्हणतात त्याप्रमाणे जादूटोणा कायद्याला विरोध करणार्यांनीच डॉ. दाभोळकरांवर गोळ्या झाडल्याचे मान्य केले तरी त्यांनी चालवलेल्या राजकारणाचे समर्थन कोणाला आणि कसे करता येईल? चव्हाणांना आणि त्यांच्या पक्षाच्या सहकारी नेत्यांना हा कायदा गेली आठ वर्षे पारित करून घेता आला नाही. या कायद्याला काही लोकांचा, काही राजकीय पक्षांचा विरोध असल्याचे सांगितले जाते. असे होते तर मग २००५ मध्ये विधानसभेत हे विधेयक मंजूर कसे झाले? आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे आघाडी सरकार विरोधकांच्या मतांची एवढी कदर केव्हापासून करायला लागले? इथे तर सभागृहात विरोधकांनी नुसता गोंधळ घालायचाच अवकाश की, लागलीच आपल्याला हवी ती विधेयके त्या गदारोळात, चर्चेविना, घाईगर्दीने मंजूर करून घेण्याकरता सरकारी पक्ष अगदी तयारच असल्याच्या थाटात वागतो. असे करताना त्यांना कधीच काही वाटत नाही. नेते आणि गर्भश्रीमंतांच्या खाजगी विद्यापीठात गोरगरीब आणि मागासवर्गींयांसाठी आरक्षण नाकारणारे विधेयक यांना विरोधकांच्या नाकावर टिच्चून, गोंधळात मंजूर करून घेता येते. सार्वजनिक पाण्याच्या वापराचा प्राधान्यक्रम बदलत शेतकर्यांचा हक्क डावलणारा निर्णय मध्यरात्री उशिरा चार-दोन सदस्यांच्या उपस्थितीत कसा मुजोरीने मंजूर करण्यात आला हे सार्या महाराष्ट्राने अनुभवले आहे. आणि जादूटोणा विरोधी विधेयक मंजूर करायला मात्र विरोधकांची सहमती आवश्यक असल्याच्या तद्दन फालतू बाता मारल्या जाताहेत. कुणाला मूर्ख बनवले जात आहे इथे? हे विधेयक मंजूर झालेले नेमके कुणाला नको आहे, हे सर्वसामान्य लोकांना कळत नाही, असे वाटते की काय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना ? हे विधेयक एकदा विधानसभेत मंजूर झाल्यावरही गेली आठ वर्षे का रखडले? कोण आडवे आले त्यात? या विधेयकाला किंवा त्यातल्या काही तरतुदींना विरोध करणारे लोक धर्मांध असतील तर कॉंग्रेसचे कोणकोणते नेते कोणकोणत्या बाबांकडे आशीवार्द घ्यायला जातात याची यादी एकदा काढून बघा जरा. राज्याच्या मुख्यमंत्री पदावर असताना कुट्टूपूर्तीतील सत्य साईबाबांच्या दरबारात कोण हजेरी लावत होते, मध्यप्रदेशातील एका कथित राजकीय महाराजांकडे कॉंग्रेसचे कोणकोणते नेते अजूनही रांगा लावतात हे ही कळू द्या जनतेला!
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. नरेंद्र
दाभोळकर यांच्या निर्घृण हत्येने सारा महाराष्ट्र शोकाकूल झाला असताना या
राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी चालवलेेले त्या हत्येचे राजकारण दुर्दैवी अन्
तेवढेच संतापजनक ठरले आहे. दाभोळकरांच्या हत्येची थेट गांधी हत्येशी तुलना
करून समाजमन, प्रस्तावीत जादूटोणा विरोधी कायद्याला विरोध
करणार्यांविरुद्ध पेटविण्याचा डाव मुख्यमंत्र्यांनी यानिमित्ताने खेळला
आहे. अद्याप डॉक्टरांच्या हत्येची सूत्रे पोलिसांच्या हाती लागलेली नाहीत.
हत्येमागील कारणही अजून तपासातून पुढे आलेले नाही. तरीही मुख्यमंत्र्यांना
या हत्येमागे ‘षडयंत्र’ असल्याचे स्पष्टपणे जाणवले आहे. त्यामागे धर्मांध
शक्ती, नव्हे गांधीहत्येच्या विचारांचे लोक असल्याचे ते बोलत सुटले आहेत.
ज्या षडयंत्राबाबत ते एवढ्या ठामपणे बोलताहेत, त्या षडयंत्रात सामील
लोकांपर्यंत कायद्याचे हात अद्याप का नाही पोहोचलेत? तसे तर तीन
वर्षांपूर्वीच्या जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातील गुन्हेगारांपर्यंतही
कायद्याचे हात अद्याप पोहोचलेले नाहीत. तिथे डॉक्टरांच्या
मारेकर्यांपर्यंत अठ्ठेचाळीस तासात पोलिस पोहोचतील अशी अपेक्षा बाळगण्याचे
कारण नाही. इथे प्रश्न फक्त एवढाच आहे की दाभोळकरांच्या हत्येबाबत इतकी
ठाम वक्तव्ये करण्याइतकी ठोस माहिती उपलब्ध असलेल्या मुख्यमंत्र्यांनी
मारेकर्यांची माहिती देणार्यांसाठी दहा लाखांचे बक्षीस का जाहीर केले? की
पुराव्यांशिवायच बेताल बडबड करत सुटलेय् या राज्याचे सक्षम नेतृत्त्व?
दाभोळकरांच्या हत्येचा जेवढा करावा तितका
निषेध कमीच आहे. विचारांची लढाई अशी बंदुकींनी लढण्याचा अन् त्यामाध्यमातून
कुणाचे विचार संपवण्याचा प्रयत्न कुणी करत असेल, तर ते लोक मूखार्ंंच्या
नंदनवनात जगताहेत असेच म्हणावे लागेल. पण मारेकरी अद्याप हाती लागलेले
नसल्याने हत्येमागील कारण अजून स्पष्टही झालेले नाही. ज्या जादूटोणा विरोधी
कायद्याचा संदर्भ डॉ. दाभोळकरांच्या हत्येसाठी दिला जातोय्, तो तितकासा
तर्कशुद्ध वाटत नाही. मुळात हा कायदा विधिमंडळाच्या एका सभागृहात आठ
वर्षांपूर्वीच मंजूर झाला आहे. विधिमंडळाच्या वरिष्ठ सभागृहाने म्हणजेच
विधान परिषदेने मात्र, त्यात काही सुधारणा व्हाव्यात म्हणून अभ्यासाकरता ते
विधेयक एका समितीकडे पाठवण्याची शिफारस केली होती. त्यानंतर तो पुन्हा
मांडला जाणे, त्यावरील चर्चा आणि प्रत्यक्षात मंजुरी ही प्रक्रिया गेली
तब्बल आठ वर्षे प्रलंबीत आहे. या काळात या कायद्याचे समर्थक आणि विरोधक या
दोघांनीही आपापली बाजू सरकारदरबारी मांडण्याचे कायदेशीर मार्ग चोखाळले
आहेत. त्यात अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पदाधिकारी अर्थातच कायदा संमत
व्हावा या बाजूने ठामपणे उभे राहिले आहेत. श्याम मानव असोत वा डा.ॅ दाभोळकर
यांनी सातत्याने या कायद्याची बाजू आणि त्यासाठीचे तर्क मांडलेत.
विरोधकांनी कायद्याबाबतची त्यांच्या मनातली भीती व्यक्त केली. यात
कायद्याचा मसुदा तयार करण्यापासून तर तो मंजूर करण्यापर्यंतच्या प्रक्रियेत
प्रमूख भूमिका एकट्या डॉ. दाभोळकरांची असल्याची वस्तुस्थिती नाही. उलट तो
मंजूर करण्यात वा न करण्यात महत्त्वाची भूमिका तर राज्य सरकारची आहे. शिवाय
या विधेयकाबद्दल ज्या पद्धतीने सरकार अलीकडच्या काळात वागत राहिले, ज्या
शिताफीने सरकारने विधिमंडळाच्या यंदाच्या पावसाळी अधिवेशनात हे विधेयक
मांडण्याचे टाळले, त्यावरून सरकारला हा कायदा इतक्यातच मंजूर व्हावा असे
वाटत असल्याचे कुठेही जाणवत नव्हते. उलट करता येईल तेवढी चालढकलच नेते करीत
होते. असे असताना या कायद्याला विरोध करणारे लोक एक दिवस अचानक, या
कायद्याचे अनेकांपैकी एक असलेले समर्थक म्हणून दाभोळकरांवर गोळ्या झाडून
त्यांचे कार्य संपविण्याचा प्रयत्न करतील, ही बाब तर्काच्या कसोटीवर अशक्य
वाटते.
तरीही पृथ्वीराज चव्हाण म्हणतात
त्याप्रमाणे जादूटोणा कायद्याला विरोध करणार्यांनीच डॉ. दाभोळकरांवर
गोळ्या झाडल्याचे मान्य केले तरी त्यांनी चालवलेल्या राजकारणाचे समर्थन
कोणाला आणि कसे करता येईल? चव्हाणांना आणि त्यांच्या पक्षाच्या सहकारी
नेत्यांना हा कायदा गेली आठ वर्षे पारित करून घेता आला नाही. या कायद्याला
काही लोकांचा, काही राजकीय पक्षांचा विरोध असल्याचे सांगितले जाते. असे
होते तर मग २००५ मध्ये विधानसभेत हे विधेयक मंजूर कसे झाले? आणि
कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे आघाडी सरकार विरोधकांच्या मतांची एवढी कदर
केव्हापासून करायला लागले? इथे तर सभागृहात विरोधकांनी नुसता गोंधळ
घालायचाच अवकाश की, लागलीच आपल्याला हवी ती विधेयके त्या गदारोळात,
चर्चेविना, घाईगर्दीने मंजूर करून घेण्याकरता सरकारी पक्ष अगदी तयारच
असल्याच्या थाटात वागतो. असे करताना त्यांना कधीच काही वाटत नाही. नेते आणि
गर्भश्रीमंतांच्या खाजगी विद्यापीठात गोरगरीब आणि मागासवर्गींयांसाठी
आरक्षण नाकारणारे विधेयक यांना विरोधकांच्या नाकावर टिच्चून, गोंधळात मंजूर
करून घेता येते. सार्वजनिक पाण्याच्या वापराचा प्राधान्यक्रम बदलत
शेतकर्यांचा हक्क डावलणारा निर्णय मध्यरात्री उशिरा चार-दोन सदस्यांच्या
उपस्थितीत कसा मुजोरीने मंजूर करण्यात आला हे सार्या महाराष्ट्राने
अनुभवले आहे. आणि जादूटोणा विरोधी विधेयक मंजूर करायला मात्र विरोधकांची
सहमती आवश्यक असल्याच्या तद्दन फालतू बाता मारल्या जाताहेत. कुणाला मूर्ख
बनवले जात आहे इथे? हे विधेयक मंजूर झालेले नेमके कुणाला नको आहे, हे
सर्वसामान्य लोकांना कळत नाही, असे वाटते की काय महाराष्ट्राच्या
मुख्यमंत्र्यांना ? हे विधेयक एकदा विधानसभेत मंजूर झाल्यावरही गेली आठ
वर्षे का रखडले? कोण आडवे आले त्यात? या विधेयकाला किंवा त्यातल्या काही
तरतुदींना विरोध करणारे लोक धर्मांध असतील तर कॉंग्रेसचे कोणकोणते नेते
कोणकोणत्या बाबांकडे आशीवार्द घ्यायला जातात याची यादी एकदा काढून बघा जरा.
राज्याच्या मुख्यमंत्री पदावर असताना कुट्टूपूर्तीतील सत्य साईबाबांच्या
दरबारात कोण हजेरी लावत होते, मध्यप्रदेशातील एका कथित राजकीय महाराजांकडे
कॉंग्रेसचे कोणकोणते नेते अजूनही रांगा लावतात हे ही कळू द्या जनतेला!
समाजातली अंधश्रद्धा संपली पाहिजे, नरबळी,
अनिष्ट रुढी, परंपरा संपल्या पाहिजेत याबाबत कुणाचेच दुमत असण्याचे कारण
नाही. हा कायदा एवढा चांगला असताना लोक त्याला विरोध का करताहेत. लोकांच्या
मनात शंका असतील तर त्या दूर करण्यासाठी सरकारने काय प्रयत्न केले?
हत्येनंतर दाभोळकरांना पुरोगामी विचारांसाठीचे हौतात्म्य बहाल करायला
निघालेल्या मुख्यमंत्र्यांच्या लेखी निधनापूर्वी दाभोळकरांची किंमत किती
होती हे वेगळ्याने सांगायला नको. भेटीकरता मुख्यमंत्र्यांच्या दालनासमोर
डॉ. दाभोळकर तासतासभर ताटकळत बसलेले लोकांनी कित्येकदा बघितले आहेत.
याबाबतची खंत खुद्द श्रीमती दाभोळकरांनी अंत्यविधिच्यावेळी बोलून दाखवली
आहे. त्यावेळी मूग गिळून मौन साधणार्या पृथ्वीराज चव्हाणांना तिथनं बाहेर
पडताच कॉंग्रेसच्या सभेत अचानक स्फुरण चढले. या हत्येची तुलना थेट
गांधीहत्येशी करावीशी वाटली त्यांना. या राज्यातल्या तमाम धर्मांध शक्ती
संपवून टाकण्याचा निर्धार करून टाकला त्यांनी. बरं, धर्मांध शक्ती कोण,
याचेही उत्तर यांच्या लेखी ठरलेले आहे. आरएसएसच्या नावाने बोटे मोडली,
विश्वहिंदु परिषदेला चार शिव्या हासडल्या, सनातन, हिंदु जनजागरण समिती अशा
मोजक्या काही संस्थांना धारेवर धरले की झाले. फावले सारे.
चव्हाण साहेब, देशाबाहेरील दंगलीच्या
निषेधाचे निमित्त पुढे करून वर्षभरापूर्वी मुंबईत अक्षरश: धिंगाणा
घालणार्या रजा अकादमीच्या कार्यकर्त्यांना अजून हात लावू शकलेले नाहीत हो
तुमचे पोलिस. महानगर पालिकेच्या निवडणुकीत नांदेडमध्ये ओवैसींच्या
पिलावळीने जाती-धर्माच्या नावावर मनामनात आग पेटवली तरी त्यांचे काहीही
वाकडे करू शकलेले नाही हो तुमचे निर्लज्ज प्रशासन. बंदीची भाषा तर कधीकाळी
सीमीबाबतही वापरली गेली होती. काय झाले त्याचे? बहुधा विसर पडला असावा
मुख्यमंत्र्यांना त्याचा. आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर दाभोळकरांच्या
दुदैवी हत्येचे अस्त्र आयतेच हाती लागल्याच्या असुरी आनंदात कॉंग्रेसचे
नेते वावरताहेत. मुख्यमंत्र्यांच्या बडबडीचा राजकीय अर्थ तरी यापलीकडे
जाताना दिसत नाही...