Saturday, July 27, 2013

जनसमस्यांपेक्षाही वैयक्तिक प्रश्‍नांभोवती फिरताहेत लोकप्रतिनिधी

सध्याची विधानसभा अस्तित्वात आल्यानंतर विधानसभेच्या सभागृहात कुठल्या विषयावर बोलण्यासाठी क्षितिज ठाकूर यांनी पहिल्यांदाच तोंड उघडले होते आणि तोही विषय होता, तो एका पोलिस अधिकार्‍याने त्यांच्याशी केलेल्या गैरवर्तणुकीचा! एरवी या आमदारांनी आपल्या मतदारसंघाच्या प्रश्‍नांबाबत बोलण्यासाठी आवाज उठविल्याचे स्मरत नाही. एक पोलिस अधिकारी आपल्याशी चांगला वागला नाही, यावरून आवाज उठवण्यासाठी म्हणून तीन लक्ष लोकांनी त्यांना निवडून दिलं आहे का? मतदारसंघातल्या इतर प्रश्‍नांबाबत या सभागृहात बोलण्याची, आवाज उठवण्याची काहीच जबाबदारी नाही त्यांची? हे लोक जनतेचे प्रश्‍न मांडण्यासाठी निवडून आलेत, की स्वत:च्या इभ्रतीचे? तहसीलदारानं निमंत्रणपत्रिकेत नाव छापलं नाही, इन्स्पेक्टरने फोन उचलला नाही, जिल्हाधिकार्‍यांनी बैठकीत बोलावलं नाही, असं सांगत चालणार्‍या आमदारांच्या तक्रारी हक्कभंग सूचनेच्या आयुधाची धार बोथट करत आहेत. विधानसभाध्यक्ष अनेकदा त्याबाबत खंत व्यक्त करतात. पण, हा प्रकार थांबायला काही तयार नाही...
गेल्या कित्येक वर्षांपासून राष्ट्रकुल संसदीय मंडळाचा उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार बंद झाला आहे. काय कारण असेल त्याचं? सभागृहात आता उत्कृष्ट म्हणावेत असे संसदपटूच उरले नाहीत, की आणखी काही? जिवाचा कान करून ऐकावी अशी भाषणं सहसा होत नाहीत अलीकडे इथे. राज्याच्या एखाद्या प्रश्‍नावर जिवाचे रान करून, पोटतिडकीनं कुणी भांडत आहे, असं दृश्यही अपवादानेच बघायला मिळते. बडे बडे म्हणवणारे नेतेही स्वत:च्या मतदारसंघापलीकडे जाताना दिसत नाहीत.

 

याराज्यातल्या विरोधकांना संसदीय आयुधांचं गांभीर्य कळत नसल्याची खंत काल विधानसभाध्यक्षांनी व्यक्त केली. स्थगनप्रस्ताव म्हणजे विरोधकांच्या हाती असलेलं एक प्रभावी अस्त्र! अगदी सरकारविरुद्ध अविश्‍वास ठराव मांडला जावा इतकं त्याचं वजन आणि महत्त्व. तिकडे संसदेत स्थगनप्रस्ताव मांडला जाणार असल्याची नुसती वार्ता कानावर आली, तरी सरकार हादरते अन् इकडे विधानसभेत तर रोज किमान दहा स्थगनप्रस्ताव दाखल होतात! नियमांच्या निकषात बसत नसल्याचं कारण देऊन त्यातला प्रत्येक प्रस्ताव बेदरकारपणे फेटाळला जातो. तरीही दुसर्‍या दिवशी पुन्हा त्याच प्रकाराची पुनरावृत्ती होते. आता सदस्यांना नियम कळत नाही म्हणायचं, की सरकारला या विषयांचं गांभीर्य कळत नाही, असं म्हणायचं, हा प्रश्‍नच आहे. पण, स्थगनप्रस्ताव नावाचं एक महत्त्वपूर्ण आणि सशक्त संसदीय आयुध या वावटळीत पार क्षीण होत चाललं आहे, ही मात्र वस्तुस्थिती आहे.
हक्कभंग सूचनांचंही तसंच. आमदार म्हणून निवडून आलेल्या व्यक्तीला अमर्याद अधिकार असल्याचा गैरसमज त्या व्यक्तीने स्वत: करून घेतलेला असतोच. पण, सर्वसामान्य माणसाच्या मनातही हाच समज घर करून बसलेला असतो. अनेकदा नियम डावलून आपल्याला संधी आणि वागणूक मिळाली पाहिजे, अशी अपेक्षा लोकप्रतिनिधी बाळगून असतात. तसे घडले नाही, तर लागलीच त्यांचा गैरसमज होतो. इगो दुखावतो. तळतळाट होतो. गेल्या विधिमंडळ अधिवेशनात गाजलेले क्षितिज ठाकूर प्रकरण बघितले की, ही बाब प्रकर्षाने जाणवते. आ. क्षितिज ठाकूर यांना बघताच एक साधा पोलिस अधिकारी थेट शिवीगाळ करू लागण्याची शक्यता जराशी कमीच वाटते. त्यामुळे सुरुवात नेमकी कशी, कशावरून झाली, हा पोलिस अधिकारी एका आमदारावर बरसण्याइतका का चिडला, याच्याही खोलात शिरावे लागणार आहे. पण, प्रकरण टोकाला जाताच ठाकूर यांना लगेच त्यांच्या विशेषाधिकाराचे स्मरण व्हावे, सर्व आमदारांनी त्यांच्या पाठीशी उभे राहावे, प्रकरणाचा शेवट त्या पोलिस अधिकार्‍याला झालेल्या मारहाणीने व्हावा, हा इतिहास आहेच आपल्या नजरेसमोर.
सध्याची विधानसभा अस्तित्वात आल्यानंतर विधानसभेच्या सभागृहात कुठल्या विषयावर बोलण्यासाठी क्षितिज ठाकूर यांनी पहिल्यांदाच तोंड उघडले होते आणि तोही विषय होता, तो एका पोलिस अधिकार्‍याने त्यांच्याशी केलेल्या गैरवर्तणुकीचा! एरवी या आमदारांनी आपल्या मतदारसंघाच्या प्रश्‍नांबाबत बोलण्यासाठी आवाज उठविल्याचे स्मरत नाही. एक पोलिस अधिकारी आपल्याशी चांगला वागला नाही, यावरून आवाज उठवण्यासाठी म्हणून तीन लक्ष लोकांनी त्यांना निवडून दिलं आहे का? मतदारसंघातल्या इतर प्रश्‍नांबाबत या सभागृहात बोलण्याची, आवाज उठवण्याची काहीच जबाबदारी नाही त्यांची? हे लोक जनतेचे प्रश्‍न मांडण्यासाठी निवडून आलेत, की स्वत:च्या इभ्रतीचे? तहसीलदारानं निमंत्रणपत्रिकेत नाव छापलं नाही, इन्स्पेक्टरने फोन उचलला नाही, जिल्हाधिकार्‍यांनी बैठकीत बोलावलं नाही, असं सांगत चालणार्‍या आमदारांच्या तक्रारी हक्कभंग सूचनेच्या आयुधाची धार बोथट करत आहेत. विधानसभाध्यक्ष अनेकदा त्याबाबत खंत व्यक्त करतात. पण, हा प्रकार थांबायला काही तयार नाही...
गेल्या कित्येक वर्षांपासून राष्ट्रकुल संसदीय मंडळाचा उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार बंद झाला आहे. काय कारण असेल त्याचं? सभागृहात आता उत्कृष्ट म्हणावेत असे संसदपटूच उरले नाहीत, की आणखी काही? जिवाचा कान करून ऐकावी अशी भाषणं सहसा होत नाहीत अलीकडे इथे. राज्याच्या एखाद्या प्रश्‍नावर जिवाचे रान करून, पोटतिडकीनं कुणी भांडत आहे, असं दृश्यही अपवादानेच बघायला मिळते. बडे बडे म्हणवणारे नेतेही स्वत:च्या मतदारसंघापलीकडे जाताना दिसत नाहीत.
विधानमंडळ हे कायदेमंडळ आहे, पण कायदे तयार करताना इथे सखोल चर्चा होताना दिसत नाही. विरोधकांना जुमानायला सरकार तयार नाही अन् चर्चा करण्यात सत्ताधार्‍यांना रस नाही. जरासा गोंधळ झाला की, त्या गदारोळात महत्त्वाची विधेयकं भराभर मंजूर करवून घेण्यासाठी सरकारची चाललेली धडपड दुर्दैवी म्हणावी अशीच असते. एरवी लोकसभेचे उदाहरण देऊन तिकडची पद्धत, तिथल्या कार्यपद्धतीचे दाखले वारंवार दिले जातात. इथेही तसंच घडावं, अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. पण, लोकसभेच्या कार्यपद्धतीचे अनुकरण करण्याचा प्रयत्न सरकारी पातळीवर होताना मात्र दिसत नाही. लोकसभेत चर्चेविना कायदा कधीच मंजूर होत नाही. सदस्यांच्या गदारोळात तर तो कधीच मंजूर होत नाही. मग विधानसभेत गोंधळाचे निमित्त साधण्याच्या प्रयत्नात सरकार का असते? अगदी परवा सभागृहानं मंजूर केलेला प्रवीण दरेकरांच्या निलंबनाचा प्रस्ताव ज्या पद्धतीनं मंजूर झाला, तीच पद्धत लोकशाहीला अपेक्षित आहे का? दरेकरांनी सभागृहात अपशब्दाचा वापर केला की नाही, केला तरी नेमका तो मुख्यमंत्र्यांच्या संदर्भात केला का, या प्रश्‍नाचे उत्तर अद्याप संदिग्ध आहे. ते तसे बोललेच असतील, तर त्याचे समर्थन कुणीच करणार नाही. पण, एका आमदारावर असा उद्वेग व्यक्त करण्याची वेळ का यावी, याही प्रश्‍नाचे उत्तर मिळायला हवे. दिवाकर रावते आणि प्रवीण दरेकरांच्या निलंबनानंतर उमटलेल्या प्रतिक्रिया अतिशय बोलक्या आहेत. विधिमंडळाचे अध्यक्ष आणि सभापती यांच्याबाबत काहीही बोलता येत नाही. कारण तो त्यांचा आणि पर्यायाने विधिमंडळाचा अवमान मानला जातो. पण कुण्याही सामान्य माणसाला बोल लावण्याची गरजच पडणार नाही, अशी वर्तणूक असते या पदांवरील व्यक्तींची? दुर्दैवाने उत्तर नाही, असेच आहे. खरं तर ही दोन्ही संवैधानिक पदं आहेत. न्यायाधीशाची भूमिका त्यांच्याकडनं अपेक्षित आहे. एका राजकीय पक्षाच्या चिन्हावर निवडून आले असले तरी सभागृहात त्यांची भूमिका पक्षातीत असणे अपेक्षित आहे. पण सभागृहात गोंधळाची, सरकार अडचणीत येण्याची स्थिती निर्माण झाल्यावर या पदावरील व्यक्ती न्यायाधीशाची भूमिका वठवण्याऐवजी सत्ताधार्‍यांच्या बाजूने ठामपणे उभे राहण्याची जबाबदारी पार पाडताना बघितले की या पदाची संवैधानिक बूज ढासळत असल्याचे नकळत जाणवून जाते. विधान परिषदेत सिंचनावरची चर्चा टाळण्यासाठी आणि विधानसभेत मुंबईच्या प्रश्‍नांवर मुख्यमंत्र्यांच्या बाजूने किल्ला लढवण्यासाठी या पदावरच्या व्यक्तींनी केलेली धडपड जाणवण्याइतकी पक्षपाती आणि म्हणूनच चीड आणणारी, क्लेशदायक ठरली आहे... आजघडीला महाराष्ट्राच्या विधिमंडळाने मंजूर केलेली किमान अठरा विधेयके राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीसाठी दिल्लीत धूळ खात पडली आहेत. शेतकर्‍यांच्या जिव्हाळ्याचा असलेला सावकारी विरोधी कायदा सात वर्षांपासून, गोवंश रक्षणासाठीचा प्राणी-रक्षण कायदा अठरा वर्षांपासून स्वाक्षरीसाठी राष्ट्रपतींच्या कार्यालयात पडून आहे. एखाद्या राज्याच्या विधानमंडळाने मंजूर केलेले विधेयक कायद्यात परिवर्तित करण्यासाठी आवश्यक असलेली स्वाक्षरी करायला राष्ट्रपतींना सात-सात, अठरा-अठरा वर्षं लागू शकतात? हा वेग आहे आपल्या प्रशासनाच्या निर्णयप्रकियेचा?
विधानसभेच्या अधिवेशनाचा काळ म्हणजे काही सदस्यांच्या दृष्टीने अक्षरश: पिकनिक स्पॅन असतो. गावाकडून मुंबईत येऊनही ते सभागृहात कमी दिसतात. सभागृहात आले तरी ते बोलत नाहीत. दुसर्‍यांची भाषणं ऐकून घ्यायला आपल्या जागेवर बसत नाहीत. खडसे, मुनगंटीवार, फडणवीस, देसाई, नांदगावकर, गणपतराव, वायकर, दरेकर, पटोले यापलीकडे विरोधकांची बाजू लढवायला कुणी सरसावत नाही. सरकारी बाजूनेही तेच मलिक, तेच आव्हाड, तेच जगताप, तेच वडेट्टीवार... ज्यांच्याकडे तरुण पिढी मोठ्या आशेने बघते ती सभागृहातली तरुणाई तर जांभईपलीकडे तोंड उघडायला तयार नसल्याचे चित्र दुर्दैवी नाही तर काय म्हणायचे? प्रणीती शिंदे, क्षितिज ठाकूर, अमित देशमुख यांच्यासारख्या, घरातून राजकीय वारसा लाभलेल्या सदस्यांच्या कामगिरीतूनही त्यांच्या कर्तृत्वाचा ठसा उमटल्याचे दिसत नाही.
त्यामुळे विधानसभा म्हणजे गोंधळ, विधानसभा म्हणजे गदारोळ, वेलमध्ये येऊन चाललेल्या सदस्यांच्या घोषणा, एखाद्या सदस्याने केलेल्या उत्कृष्ट भाषणापेक्षाही त्याने मंचावर चढून अध्यक्षांसमोरचा राजदंड उचलला की बातमी ‘मोठी’ होते, हे ‘विलक्षण सत्य’ आता सर्वांच्या सवयीचा भाग झालेले. बहुधा विधानसभेच्या कामकाजाची अन् प्रश्‍न सोडवण्याची तर्‍हा ‘हीच’ असल्याचा समज उद्या नवीन पिढीचा झाला, तर त्याला जबाबदार कोण, या प्रश्‍नाचे उत्तर आहे कुणाकडे?

Friday, July 19, 2013

न्यायालय, आबा अन् डान्सबार...!

आर्थिक मिळकतीसाठी म्हणून आपल्याच समाजातल्या काही मुलींनी अर्धनग्नावस्थेत संगीताच्या तालावर थिरकायचे आणि चार पैसे खिशात असलेल्यांनी त्याची उधळण त्यांच्यावर करायची. कलेच्या कौतुकापेक्षाही वासनेच्या नजरेतून त्यांच्याकडे बघायचे, हे गृहमंत्र्यांप्रमाणेच या राज्यातल्या कुण्याही सभ्य माणसाला अमान्यच व्हावे. पण मग या मुलींवर अशी वेळ येऊ नये यासाठीची पर्यायी व्यवस्था न उभारताच त्यांच्या उपजिविकेचे विद्यमान साधन हिसकावून घेण्यात कसले आले व्यवहार चातुर्य? बंदीचा  निर्णय जाहीर केला, विधिमंडळात निर्णय झाला, कायदा आला तरी विरोधातले लोक उद्या कोर्टात जातील हे सरकारला समजले नसेल, समजूनही सरकारने त्याबाबतची उपाययोजना केली नसेल, तर आबांच्या नुसत्या घोषणांवर टाळ्या पिटून करायचे काय?
बरं गृहमंत्र्यांच्या निर्णयाची शंभर टक्के अंमलबजावणी होत असल्याची खात्री त्यांना तरी देता येईल? फार दूरचे जाऊ द्या जिथून त्यांच्या मंत्रालयाचा कारभार चालतोत्या मुंबईतले तरी डान्सबार पूर्णपणे बंद असल्याचा दावा त्यांना करता येईल? सरकार आणि पोलिसांच्या नाकावर टिच्चून काही बड्यांचे डान्सबार अद्याप सुरू आहेत. एवढा कायदा केल्यावरही काही लोकांचेडान्स बार सुरू कसे, या प्रश्‍नाचे उत्तर आहे गृहमंत्र्यांकडे? ज्यांना हात लावता येत नाही, अशा बड्या धेंडांचे वाट्टेल तसले धिंगाणे चालू द्यायचे अन् इतरांना मात्र कायद्याचा बडगा दाखवायचा, शहाणपणाचे डोज पाजायचे?

महाराष्ट्राचे सध्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या बोलघेवडेपणाचा फटका सरकारला बसला आहे. सात वर्षांपूर्वी डान्सबार बंद करण्याची लोकप्रियघोषणा केल्यानंतर मीडियातल्या कॅमेर्‍यांसमोर घालावला त्याच्या अर्धाही वेळ त्यांनी या संदर्भातला कायद्याचा मसुदा तयार करण्याच्या प्रक्रियेत लक्ष घालण्यासाठी दिला असता तरी न्यायालयात पराभव स्वीकारण्याची नामुष्की सरकारवर आली नसती. पण हे ठरले बोलबच्चन. कॅमेरा समोर आला की विषयानुरूप चेहर्‍यांवरचे भाव बदलत बोलण्याची बरीच प्रॅक्टीस झाली आहे एव्हाना त्यांना. विषय गंभीर आहे का, मग हसरा चेहराही लगेच सुतकी करायचा असतो हे ठावूक झाले आहे एवढ्या दिवसात त्यांना. पण डान्सबारच्या प्रकरणात सरकारने, विशेषत: गृहमंत्र्यांनी हवे तसे, हवे तेवढे गांभीर्य राखले नाही हेच खरे.
डान्स बारचा प्रश्‍न हा राज्यभरातल्या ७५ हजार बार बालांचा, त्यांच्या कुटुंबियांचा, शेकडो बार मालकांचा प्रश्‍न होता.सामाजिकरंग देत  असली प्रकरणे हाताळण्यात इथल्या कित्येक एनजीओ तरबेज झाल्या आहेत. प्रकरण भावनिक पातळीवर नेत न्यायालयाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होणार याची शक्यता सरकारने गृहीत धरायला हवी होती. पण राज्याचे गृहमंत्री त्यावेळी लाभलेल्या तात्कालिक प्रसिद्धीच्या झगमगाटातच मश्गूल राहिले. तिकडे यांच्याही नकळत विधि व न्याय विभागाने घोळ करून ठेवला अन् आता न्यायालयात तोंडघशी पडण्याची वेळ सरकारवर आली.
न्यायालयातल्या बहुतांश प्रकरणात सरकारच का हरते, या प्रश्‍नाचे उत्तर विधी व न्याय विभागाच्या कर्तबगारीतूनमिळाले आहे. या विभागाने कायद्याच्या मसुद्यात ठेवलेल्या त्रुटी हेरून न्यायालयात बार मालकांची बाजू मांडली गेली. कथित मानवतेच्या दृष्टिकोनातून निर्णय घेत न्यायालयाने बार मालक आणि बार बालांना न्यायदिला. नृत्य हा आर्थिक मिळकतीचा आपल्यासाठी उपलब्ध असलेला एकमेव मार्ग असल्याची बारबालांची भूमिका न्यायालयाने मानवीय दृष्टिकोनातून आज समजून घेतली असेल, तर सरकारला त्याचा विचार सात वर्षांपूर्वीच करायला हवा होता. डान्स बार बंद केल्यावर, उपजिविकेचे साधन म्हणून तिथे नृत्य करणार्‍या मुलींचे पुढे काय होईल याचा विचार सरकारच्या वतीने कुणी केला? हा केवळ बार मालकांचा विषय नव्हता. तरुणाईला बेभान करत संगीताच्या तालावर थिरकणार्‍या मुलींचा हा मर्यादीत प्रश्‍न नव्हता. बार मधले नृत्य बंद झाल्याने दारुड्यांचे तिथे नाचणार्‍या मुलींवर पैसे उधळणे तेवढे बंद झाले, पण पुढे काय? ७५ हजार मुलींच्या नृत्यावर बंदी आणल्यावर त्यांना उपजिविकेचे पर्यायी साधन उपलब्ध करून देण्याची जबाबदारी कुणाची होती? त्याबाबतचे दावे तर आबांनी तेव्हा खूप केले होते. आता ते सांगताहेत की बारबारलांच्या पुनर्वसनाची जबाबदारी गृहविभागाची नाही म्हणून? त्यांना स्वारस्य असलेल्या रोजगारासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण देण्याची तयारी सरकारची होती, पण एकाही बारबालेचा अर्ज प्राप्त झाला नसल्याचे तद्दन फालतू कारण आर. आर. पाटील आज सात वर्षांनी सांगताहेत? त्यांच्या पुनर्वसनाबाबत गेल्या कित्येक दिवसात साधी बैठक सुद्धा शासनस्तरावर झाल्याची बसल्याची बाब खुद्द पाटलांच्या बोलण्यातून परवा स्पष्ट झाली. मग कुठल्या जबाबदारीवर शासनाने डान्सबार बंद केलेत?
आर्थिक मिळकतीसाठी म्हणून आपल्याच समाजातल्या काही मुलींनी अर्धनग्नावस्थेत संगीताच्या तालावर थिरकायचे आणि चार पैसे खिशात असलेल्यांनी त्याची उधळण त्यांच्यावर करायची. कलेच्या कौतुकापेक्षाही वासनेच्या नजरेतून त्यांच्याकडे बघायचे, हे गृहमंत्र्यांप्रमाणेच या राज्यातल्या कुण्याही सभ्य माणसाला अमान्यच व्हावे. पण मग या मुलींवर अशी वेळ येऊ नये यासाठीची पर्यायी व्यवस्था न उभारताच त्यांच्या उपजिविकेचे विद्यमान साधन हिसकावून घेण्यात कसले आले व्यवहार चातुर्य? बंदीचा  निर्णय जाहीर केला, विधिमंडळात निर्णय झाला, कायदा आला तरी विरोधातले लोक उद्या कोर्टात जातील हे सरकारला समजले नसेल, समजूनही सरकारने त्याबाबतची उपाययोजना केली नसेल, तर आबांच्या नुसत्या घोषणांवर टाळ्या पिटून करायचे काय?
बरं गृहमंत्र्यांच्या निर्णयाची शंभर टक्के अंमलबजावणी होत असल्याची खात्री त्यांना तरी देता येईल? फार दूरचे जाऊ द्या जिथून त्यांच्या मंत्रालयाचा कारभार चालतोत्या मुंबईतले तरी डान्सबार पूर्णपणे बंद असल्याचा दावा त्यांना करता येईल? सरकार आणि पोलिसांच्या नाकावर टिच्चून काही बड्यांचे डान्सबार अद्याप सुरू आहेत. बारमध्ये सुरू असलेल्या डान्सची सीडी काढून काही आमदारांनी स्वत: गृहमंत्र्यांना काही दिवसांपूर्वी दिली होती. काय झाले त्याचे? कोणती कारवाई झाली त्यांच्यावर? एवढा कायदा केल्यावरही काही लोकांचेडान्स बार सुरू कसे, या प्रश्‍नाचे उत्तर आहे गृहमंत्र्यांकडे? ज्यांना हात लावता येत नाही, अशा बड्या धेंडांचे वाट्टेल तसले धिंगाणे चालू द्यायचे अन् इतरांना मात्र कायद्याचा बडगा दाखवायचा, शहाणपणाचे डोज पाजायचे?
बार बंद करण्याचा निर्णय झाला तेव्हा बारबालांच्या पुनर्वसनाचा दावा गृहमंत्र्यांनी केला होता. आता त्याची जबाबदारी ते का झटकत आहेत? त्यावेळी बारमध्ये नृत्य करून पोट भरणार्‍या मुलींचे वय आता सात-आठ वर्षांनी वाढले आहे. या काळात त्यांच्यासमोर उभ्या ठाकलेल्या समस्यांचा विचार कोणत्या सोशल अँगलने केला जाणार आहे? राहिला प्रश्‍न विधि आणि न्याय विभागाने तयार केलेल्या कायद्याच्या मसुद्यातल्या त्रुटींचा तर, याही कारणावरून सरकारला माफी देण्याची परिस्थिती आता राहिलेली नाही. मुळात सर्वोच्च न्यायालयाने नव्याने निकाल दिलेला नाही. उच्च न्यायालयाने यापूर्वीच दिलेला निर्णय कायम ठेवण्याचा फक्त या न्यायालयाचा निर्णय आहे. याचा अर्थ डान्सबार सरकारने घातलेली बंदी तर उच्च न्यायालयानेच यापूर्वी नाकारली आहे. मग उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात जातानाच्या काळात सरकारला आपल्या चुका दुरूस्त करता आल्या नाहीत. आणि आता सर्वोच्च न्यायालयाने थोबाडीत हाणण्यासाठी हात उगारला असताना गाल कुणाचा पुढे करायचा यावरून एकमेकांना खुणावणे सुरू आहे.
मुळात ही केवळ कायद्याने सुटणारी समस्या नाही हे सरकारने समजून घ्यायला हवे होते. नुसत्या प्रसिद्धीच्या मागे न लागता त्याचे सामाजिक आशाय लक्षात घेतले जायला हवे होते. हा मुलींसोबत त्यांच्या कुटुंबियांशीही जोडला गेलेला विषय आहे. त्यामुळे त्यांच्याही मानसिकतेचा विचार व्हायला हवा होता. डान्स बार, तिथं श्रीमंतीच्या तालावर नाचणारी गरिबी, वेश्या व्यवसायाला मिळणारी चालना, पोलिसांची हफ्तेखोरी आणि त्याहीपेक्षा बिघडणारे सामाजिक स्वास्थ्य, या पार्श्‍वभूमीवर बंदीच्या निर्णयाचे त्यावेळी सर्वदूर स्वागत झाले. सरकार मात्र, या स्वागताच्या मोहातच अडकून पडले. वास्तवतेचे भान मागे पडले. अन् बार मालकांनी, बालांच्या पोटाच्या भुकेचे इमोशनल मार्केटिक करून कायदा पायदळी तुडवत न्यायमिळवला. सरकार नुसते आशाळभूत नजरेनं पाहात राहिले. न्यायालयाच्या निकालाबद्दल काय बोलावे. सामान्यजनांना त्यावर भाष्य करता येत नाही म्हणतात. सामाजिक स्वास्थ्यापेक्षाही न्यायालयाला बारमालकांची बाजू महत्त्वाची वाटली, यातच सारे आले... यातही आता संतापजनक बाब अशी की, या राज्यात बारबालांची छमछम कुठल्याही परिस्थितीत सुरू होऊ देणार नाही, अशी लोकप्रिय पण तेवढीच पोकळ घोषणाबाजी नव्याने सुरू झाली आहे...

Saturday, July 13, 2013

रिकामा सरकारी बंगला आणि ढोबळेसाहेबांचा कणखर बाणा


आपली सरकारी यंत्रणा भारी लबाड अन् बेरकी आहे बघा. कालपर्यंत खुर्ची होती तुमच्याकडे तर सलाम ठोकायचेत तुम्हाला. आता पद गेल्यावर कसे फितूर झालेत सारे. दारातून लाल दिव्याची गाडी हलत नाही अन् बंगला रिकामा करण्याची वेळ येत नाही, तोच उलटलेत सारे तुमच्यावर. आता बंगला सरकारी म्हटल्यावर सारी सरंजामशाही सरकारचीच असणार. त्यात नवल कसले? इतके दिवस तुम्ही त्या बंगल्यात राहिलात. तिथल्या वातावरणात रुळलात. सारा बांगला सरकारी असूनही तुम्हाला ‘आपला’ वाटू लागला. तिथल्या एकूणएक वस्तूंशी जुळलेले नाते अंतर्मनात रुजले. या पार्श्‍वभूमीवर बंगला सोडताना गळ्यात दाटलेला हुंदका... या सार्‍या बाबींचे महत्त्व कळावे ते तुमच्यासारख्या हळव्या हृदयाच्या, कविमनाच्या साहित्यिकाला. रूक्ष मनाच्या, पीडब्ल्यूडीत काम करणार्‍या येर्‍यागबाळ्यांचे थोडीच काम आहे ते. पांढरे कागद काळे करत कसेबसे नोकरीतले दिवस चाललेत त्यांचे. मनाच्या पाट्या अजून कोर्‍या आहेत त्यांच्या. सजीवांचे अजिवांशी जडणारे नाते त्यांना कुठले आलेय् कळायला!




प्रति,
आदरणीय लक्ष्मणराव ढोबळे
मा. आमदार.
सप्रेम नमस्कार.
सरकारी बंगल्यातल्या चार-दोन वस्तू इकडे तिकडे झाल्यावरून परवा प्रसारमाध्यमांनी केलेला आपला उद्धार जराही नाही आवडला आपल्याला. चार आण्यांचं दिसलं की, बारा आण्यांचं छापायची अन् दाखवायचीच सवयच जडलीय् या खुळ्यांना. आता आमदार म्हणजे कोण? जनतेचे सेवक! सरकार कुणाचं? जनतेचं. जे सरकारचं, ते जनतेचं. जे जनतेचं ते सरकारचं. मग सरकारचं ते तुमचंही नाही का? तर हे मान्य करायलाच तयार नाहीत वेडे. आता बघाना! तुम्ही या राज्याचे मंत्री होतात. केवढी मोठी जबाबदारी सोपवली होती पवारसाहेबांनी तुमच्यावर. कुणीतरी कान भरलेत त्यांचे आणि रागावलेत ते तुमच्यावर. हिरावून घेतली लाल दिव्याची गाडी...
आपली सरकारी यंत्रणा भारी लबाड अन् बेरकी आहे बघा. कालपर्यंत खुर्ची होती तुमच्याकडे तर सलाम ठोकायचेत तुम्हाला. आता पद गेल्यावर कसे फितूर झालेत सारे. दारातून लाल दिव्याची गाडी हलत नाही अन् बंगला रिकामा करण्याची वेळ येत नाही, तोच उलटलेत सारे तुमच्यावर. आता बंगला सरकारी म्हटल्यावर सारी सरंजामशाही सरकारचीच असणार. त्यात नवल कसले? इतके दिवस तुम्ही त्या बंगल्यात राहिलात. तिथल्या वातावरणात रुळलात. सारा बांगला सरकारी असूनही तुम्हाला ‘आपला’ वाटू लागला. तिथल्या एकूणएक वस्तूंशी जुळलेले नाते अंतर्मनात रुजले. या पार्श्‍वभूमीवर बंगला सोडताना गळ्यात दाटलेला हुंदका... या सार्‍या बाबींचे महत्त्व कळावे ते तुमच्यासारख्या हळव्या हृदयाच्या, कविमनाच्या साहित्यिकाला. रूक्ष मनाच्या, पीडब्ल्यूडीत काम करणार्‍या येर्‍यागबाळ्यांचे थोडीच काम आहे ते. पांढरे कागद काळे करत कसेबसे नोकरीतले दिवस चाललेत त्यांचे. मनाच्या पाट्या अजून कोर्‍या आहेत त्यांच्या. सजीवांचे अजिवांशी जडणारे नाते त्यांना कुठले आलेय् कळायला!
तर ढोबळेसाहेब, सांगायचा मुद्दा असा की, तुमचे मंत्रिपद गेले. लाल दिव्याची गाडी गेली. मनाची तयारी होत नव्हती. पण, तरीही सरकारी बंगला सोडावा लागला. जिवाची केवढी घालमेल झाली असणार तुमच्या. पण, ते कोरड्या मनाने जगणार्‍या चाकरमान्यांना कसे कळणार? ते आपले निघाले बंगला रिकामा होताच सरकारी ड्युटी करायला. तुम्ही बंगला रिकामा करणार असल्याची सूचना त्यांना मिळाली होतीच. पण, तुम्ही तो पूर्णपणे ‘रिकामा’ केल्याचे बघून ते पुरते चाट पडले. बघतात तर काय, दारं, खिडक्यांवरचे पडदे गायब! छतावरचा पंखाही नाही. स्वयंपाकघरात जाऊन बघावे, तर सरकारी सिलेंडरही जागेवर नाही. अगदी हात धुवायचे बेसिनही दिसेना, तेव्हा मात्र त्यांचे धाबे दणाणले. सामान चोरीला गेलं म्हणावं, तर अलीकडे पडदे, पंखे, बेसिन असले सामान चोरून नेत नाहीत होत हो चोर. मग काय झालं असेल? सरकारी अधिकारी ते. अकलेचे तारे तोडण्यात त्यांचा हात कुणी धरावा? आता पाणी पुरवठा विभाग तुमच्याचकडे होता म्हणून आठवले बघा. पाण्याचे स्रोतच उपलब्ध नसलेल्या गावात पाण्याच्या टाक्या बांधून काढण्याचा विक्रम या विभागाच्या अधिकार्‍यांनी केल्याचे ज्ञात असेलच आपल्याला. तर असल्या कित्येक किमया करण्यात तरबेज असलेल्या सरकारी अधिकार्‍यांनी आपण सोडलेला बंगला पूर्णपणे ‘रिकामा’ बघून काही निष्कर्ष काढले. साहेबांना वर्दी दिली. खुज्या मनाच्या वेड्या अधिकार्‍यांनी पोलिसांकडे तक्रार नोंदविण्याची तयारीही चालवली होती बघा!
खरं तर हा सारा सरकारी मामला तुमच्यात आणि सार्वजनिक बांधकाम विभागात चालला होता. माध्यमांनी त्यात नाक खुपसायचं काही गरज होती का? पण, हे बेटे नाही तिथं कडमडतात. जरासं कुठे खुट्ट झालं की, लागलीच यांचे कान टवकारतात. सूत दिसायचीच देर की, यांनी स्वर्ग गाठलाच समजा! याही प्रकरणात सार्‍या माध्यमांनी उड्या घेतल्या. ढोबळेंनी सरकारी बंगल्यातून सात लाखांचे सामान नेल्याच्या वावड्या उठल्या. बातमी वार्‍यासारखी सगळीकडे पसरली. तुम्हाला बदनाम करण्याचा, तुमची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न तुमच्याच काही राजकीय विरोधकांनी चालवला असल्याचे गणित मांडले गेले. साराच संभ्रम निर्माण झाला होता. बरं, ही चाल कॉंग्रेसवाल्यांनी खेळली म्हणावे, तर बांधकाम विभाग आपल्या राष्ट्रवादीच्याच अखत्यारित आहे. आपले मित्र असलेले छगनराव भुजबळ त्या खात्याचा कारभार बघताहेत. तरीही ‘माजी मंत्र्यांनी सात लाखांचे सामान लंपास’ केल्याची ‘बातमी’ बाहेर आली.
कानांवर विश्‍वासच बसेना. लक्ष्मणराव ढोबळे म्हणजे वारकरी माणूस. ज्ञानोबा, तुकोबांची गाथा कीर्तनातून मांडणारा सच्च्या दिलाचा कार्यकर्ता. अण्णाभाऊ साठेंनी दाखवलेल्या मार्गावर चालणारा पाईक. खिडक्यांचे पडदे अन् हात धुवायचे बेसिन असले सामान त्यांच्या खिजगणतीतही बसत नाही. पण, या सार्‍या वस्तू बंगल्यात नसल्याची वार्ताही खरी होती. मनावर दगड ठेवून या वावड्यांवर विश्‍वास ठेवावा लागणार असे वाटत असतानाच, आपण मोठ्या दिलानं केलेला खुलासा वाचनात आला अन् जीव भांड्यात पडला.
मंत्रिपदावरून तुम्हाला काढल्यानं तुमचे समर्थक पार संतापले होते. त्यांनीच मनात साचलेला पक्षावरचा राग व्यक्त करण्यासाठी बंगल्यातल्या सामानाची तोडफोड केली. सामान अस्ताव्यस्त केले. सरकारी मालकीच्या संपत्तीची अशी नासधूस तुमच्याच्याने बघवली गेली नाही. ती इतरही कुणाच्या नजरेस पडू नये याची काळजी घेत अत्यंत जड अंत:करणाने तुम्ही सारे सामान बंगल्यातून हलवले. आता सात लाखांच्या किमतीचे नवीन सामान घेऊन सजवलेला बंगला पूर्ववत सरकारच्या स्वाधीन करण्याची कल्पना तुम्ही जाहीर केली आहे. तसे छगनरावांना यापूर्वीच कळवल्याचेही तुम्ही सांगितलंत. पण, मग आधीच ठाऊक असतानाही छगनरावांनी आपल्या अधिकार्‍यांना याची कल्पना का देऊ नये? त्यांचे अधिकारी का ही बातमी सगळीकडे सांगत सुटलेत? तसे बरे चालले आहे ना हो, तुमचे आणि छगनरावांचे? नाही, रिकाम्या बंगल्याची बातमी अगदी व्यवस्थितपणे बाहेर आली, म्हणून आपली शंका. दुसरं काय नाय. म्हणजे बंगल्यात एवढी तोडफोड झाली, तरी या कानाचा त्या कानाला पत्ता नाही अन् सामान नेल्याची बातमी मात्र सार्‍या राज्याला कळवायची ‘व्यवस्था!’ तुम्हा मोठ्या लोकांच्या राजकारणाचं आम्हा बापुड्यांना काही कळतच नाही बघा.
तर लक्ष्मणराव, आता कसं हायसं वाटलं बघा. तुम्हाला चोर ठरवायला निघालेल्यांच्या चांगलीच थोबाडीत हाणलीत तुम्ही. तुमच्या उदार आणि कणखर बाण्याचं दर्शन घडलं त्यातनं. सामान लंपास केलं म्हणता, हे घ्या, असं म्हणत सात लाख रुपये त्या पीडब्ल्यूडीच्या तोंडावर अस्से फेकून मारणार तुम्ही. स्वाभिमान म्हणतात तो हा. नाही तर तुमच्या पक्षाचे काही लोक नुसतीच बिरुदावली मिरवतात पक्षाच्या या घोषवाक्याची. तुम्ही मात्र इतरांपेक्षा वेगळे निघालात. एक मात्र खरे की, एवढा गाजावाजा होण्यापूर्वीच तुम्ही हे काम करून टाकायला हवं होतं. मागावर असलेल्या लोकांना मग संधीच मिळाली नसती. पण, यातून एक राजकारण मात्र तुम्हीही साधलंच म्हणा. तुमचे मंत्रिपद काढल्याने तुमचे समर्थक किती खवळले होते, संतापले होते, हे यानिमित्ताने साहेबांच्या कानावर गेलेच असणार. सात लाखांच्या तुलनेत ते जास्ती महत्त्वाचं आहे. पण, एक सांगा ढोबळेसाहेब! मंत्रिपद असताना शेकडो कार्यकर्त्यांना ज्या सरकारी बंगल्याने सांभाळले, पद गेले म्हणून त्यातल्या सामानाची तोडफोड करून राग व्यक्त करण्याची ही कुठली तर्‍हा तुमच्या समर्थकांची? ती काहीशी न्यारी आणि अनाठायी आहे असे नाही वाटत आपल्याला? तसे वाटत असेल, तर आपल्या या समर्थकांची समजूत काढायला हवी कधीतरी. नाही तर भविष्यात मंत्रिपद लाभताच पाच-दहा लाख रुपये बाजूला काढून ठेवावे लागतील तुम्हाला. बंगला सोडताना सरकारकडे भरावयाची नुकसानभरपाई म्हणून...!

तुमचा
एक समर्थक/ कार्यकर्ता

Sunday, July 7, 2013

‘जाती’त अडकलेला पुरोगामी महाराष्ट्र!

भटक्यांची जातपंचायतीची व्यवस्थाच उलथवून लावण्यापर्यंतच्या टोकाच्या सूचनाही आता समोर येताहेत. आपल्या बर्‍याच समाजधुरीणांना अशी एखादी घटना घडल्यावर असल्या सूचना करण्याची फुरसत होते. एरवी समाजचिंतनासाठी त्यांच्याकडे जरासाही वेळ नसतो. आता या घटनेच्या निमित्ताने अचानक जागृत झालेल्या धुरीणांचेही काहीसे तसेच आहे. ते आता एकदम जातपंचायतीच्या व्यवस्थेवर आघात करायला सरसावले आहेत. नाही म्हणायला, हा मागास समाजाने त्याच समाजातील घटकांवर केलेला अन्याय असल्याने राजकारण करण्यााची संधी अवचितच गमावल्याचे दु:ख काहींच्या चेहर्‍यावर उमटले आहे, तर दुसरीकडे राजधानीतल्या वातानुकुलीत केबिन्समध्ये बसून या राज्यातल्या मागास समाजाच्या प्रगतीचे दावे करणार्‍या राजकीय नेत्यांच्या थोबाडीत हाणण्याचे कामही या घटनेने केले आहे. पण त्याही पेक्षा, सामाजिक बहिष्काराच्या यातना वर्षानुवर्षे भोगलेल्यांनी आपल्या समाजबांधवांसाठी नेमक्या त्याच शिक्षेचा पर्याय शोधावा, ही बाब अधिक दुर्दैवी ठरली आहे.
 



विसरून निघाले
भेद जातीचे
नाते एकच आहे
फक्त मातीचे

असे वर्णन केले जाते, त्या वारीत सहभागी होत सारा वारकरी समुदाय सारे भेद मागे टाकून भक्तीरसात न्हाऊन निघत पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरीच्या दिशेने निघाला असताना या वर्णनाला छेद देणारे या राज्यातल्या काही लोकांचे वर्तन चव्हाट्यावर आणणार्‍या काही घटना क्लेशदायक म्हणाव्या अशाच आहेत. घटना वेगवेगळ्या असल्या तरी या राज्यातल्या कानाकोपर्‍यात वावरणार्‍या, स्वत:ला शीर्षस्थ म्हणवून घेणार्‍यांच्या मनातली जातयानिमित्ताने स्पष्ट झाली आहे. कुणाला दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनातल्या पुतळ्यातही टिळकांचे वावडे, कुणाला खुद्द बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या सिद्धार्थ कॉलेजच्या व्यवस्थापनात दलितांचे वावडे. तर कुणाला, आधीच भटके जीवन जगणार्‍या आपल्याच बांधवांना जातीबाहेर घालवण्याची झालेली दुर्बुद्धी...
कालपर्यंत बिहार, उत्तर प्रदेशातील गावपंचायतींवर चर्चा करत, त्यावर टिकेची झोड उठविणार्‍या महाराष्ट्राला त्याच्या प्रांतातील जात पंचायतींच्या बेमुर्वतखोर वागणुकीवर लगाम लावण्याची वेळ आली आहे. नाशिक जिल्ह्यातल्या एका घटनेने या महाराष्ट्रावर नेत्यांनी चढवलेला पुरोगामित्वाचा साज नुसता उतरवून टाकलला नाही, तर पार ओरबाडून काढून फेकला आहे.
कुडमुडे जोशी ही भटक्या विमुक्त समाजातली एक पोटजात. पाठीवर बिर्‍हाड घेऊन  पालावरचे जीवन जगणार्‍या भटक्यांनी कित्येक परंपरा जोपासल्या आहेत. जात पंचायत ही त्यापैकीच एक. या समाजातील लोक आपले निवाडे घेऊन सरकारी न्यायालयापेक्षाही या पंचायतीतच जात असल्याची बाब नवीन नाही. तिथं या निवाड्यांचा निकाललागत असला तरी प्रत्येकाला न्यायदिला जातोच असे मात्र नाही. कारण पंचायतींच्या शीर्षस्थ स्थानी परंपरेने विराजमान झालेल्या नेतृत्त्वाला काळानुरूप बदलता आलेलं नसल्याचे, बदल ही काळाची गरज असल्याचे भान त्यांना जपता आलेले नसल्याचे दुर्दैवी चित्र नाशकातल्या घटनेने स्पष्ट केले आहे.
 भटक्या समाजासाठी स्थापन करण्यात आलेल्या आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहिलेले बाळकृष्ण रेणगे यांनी व्यक्त केलेली एक प्रतिक्रिया बरीच बोलकी आहे. काही दिवसांपूर्वी मसणगोगी या भटक्यांच्याच एका जातीतील अशिक्षित पंचांनी एका बलात्कार पीडीत महिलेला समाजात सन्मानाने सामावून घेण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्याच्या नेमकी उलट वर्तणूक नाशकातल्या पंचायतीतल्या सुशिक्षित पंचांनी केली आहे. एका मुलीने आंतरजातीय विवाह केला म्हणून जात पंचायतीच्या खवळलेल्या सदस्यांनी या कुटुंबाला जातीबाहेर केल्याचे, वाळीत टाकल्याचे प्रकरण एकट्या कडमुडे जोशी जातीतील लोकांनाच नाही तर स्वत:ला प्रगत म्हणवून घेणार्‍या संपूर्ण समाजालाच आव्हान देणारे ठरले आहे. जे आत्मभान, जी सामाजिक जाणिव मसणगोजी जातीच्या पंचायतीच्या सदस्यांनी जपली, ती कुडमुडे जोशी जातीतील पंचायतीच्या सदस्यांना का जपता आली नाही?
या घटनेने अनेकानेक प्रश्‍न उपस्थित केले आहेत. भटक्यांची जातपंचायतीची व्यवस्थाच उलथवून लावण्यापर्यंतच्या टोकाच्या सूचनाही आता समोर येताहेत. आपल्या बर्‍याच समाजधुरीणांना अशी एखादी घटना घडल्यावर असल्या सूचना करण्याची फुरसत होते. एरवी समाजचिंतनासाठी त्यांच्याकडे जरासाही वेळ नसतो. आता या घटनेच्या निमित्ताने अचानक जागृत झालेल्या धुरीणांचेही काहीसे तसेच आहे. ते आता एकदम जातपंचायतीच्या व्यवस्थेवर आघात करायला सरसावले आहेत. नाही म्हणायला, हा मागास समाजाने त्याच समाजातील घटकांवर केलेला अन्याय असल्याने राजकारण करण्यााची संधी अवचितच गमावल्याचे दु:ख काहींच्या चेहर्‍यावर उमटले आहे, तर दुसरीकडे राजधानीतल्या वातानुकुलीत केबिन्समध्ये बसून या राज्यातल्या मागास समाजाच्या प्रगतीचे दावे करणार्‍या राजकीय नेत्यांच्या थोबाडीत हाणण्याचे कामही या घटनेने केले आहे. पण त्याही पेक्षा, सामाजिक बहिष्काराच्या यातना वर्षानुवर्षे भोगलेल्यांनी आपल्या समाजबांधवांसाठी नेमक्या त्याच शिक्षेचा पर्याय शोधावा, ही बाब अधिक दुर्दैवी ठरली आहे.
या सामाजातील बहिष्कारीत कुटुंबांच्या वाट्याला येणारे अनुभव दाहक असतात. या कुटुंबातील जिवंत व्यक्तींना गावातील समाजबांधवांच्या घरांचे उंबरठेच नाकारले जातात असे नाही, तर त्या घरातील मृत व्यक्तीवरील अंत्यसंस्काराकरता स्मशाणातली जागाही नाकारली जाते. अशी शिक्षा भोगण्याची वेळ आलेल्या कुटुंबाने थेट पोलिस ठाणे गाठले आणि कथित पुरोगामीत्वाच्या धुंदीत हवेत तरंगणार्‍या सार्‍या महाराष्ट्रासमोर प्रतिगामित्वाची साक्ष ठरलेली एक अनोखी व्यवस्था उभी राहिली. याता या प्रकरणात दोषींना शिक्षा होईल. न्यायासनावर बसून या कुटुंबाला दंड थोठावणारे कदाचित गजाआडही जातील. कदाचित बहिष्कारीत कुटुंबाला न्यायही मिळेल. पण त्याचे श्रेय देशाच्या न्याय व्यवस्थेचे असेल. ती किमया या बहिष्कृत कुटुंबाने दाखवलेल्या हिंमतीची असेल. सरकारचा, सरकारी व्यवस्थेचा, कथित समाजधुरीणांचा त्यात जरासाही वाटा नसेल.
महाराष्ट्र सदन
राज्य सरकारने दिल्लीत साकारलेले आलीशान महाराष्ट्र सदन निर्मितीपासूनच वादाच्या भोवर्‍यात सापडले आहे. निर्मितीचे कंत्रांट, त्यात झालेली खाबुगिरी यावर बरेच चर्वितचर्वण झालेले असताना आता या भव्य भवनात उभारण्यात आलेल्या पुतळ्यांवरनं वाद निर्माण झाला आहे. परवा या भवनाला भेट दिलेल्या लोकलेखा समितीच्या सदस्यांनी इथं राजमाता जिजाऊ, अण्णाभाऊ साठे, लोकमान्य टिळकांचे पुतळे का नाहीत, असा सवाल उपस्थित केला आहे. मराठी मुलुखाच्या, महाराष्ट्राच्या जडणघडणीत ज्यांचे योगदान वर्णनातीत आहे, अशा सर्वांचे पुतळे उभारण्यात आले असताना नेमक्या काही नावांचाचविसर प्रशासनाला कसा पडलाराज्याच्या सामान्य प्रशासन विभागाला नेमके त्यांचेच  विस्मरण कसे झाले? हे विस्मरण अनावधानाने घडले की राजकारण त्यात आडवे आले? हे नुसत्या राजकीय नेत्यांचेच कारस्थान आहे की अधिकार्‍यांच्या मनातली जात इथेही आडवी आलीयहे सार्‍या महाराष्ट्राला कळायला हवे. पुतळ्यांबाबतचा निर्णय घेणार्‍यांच्या बौद्धिक दारिद्रयाचे दर्शन यानिमित्ताने घडले असल्याचा आरोप करणार्‍यांना यात इतिहास बदलण्याच्या षडयंत्राचाही गंध येऊ लागला आहे....
एका कवीने केलेल्या पंढरीच्या वारीच्या वर्णनातील 

न भंगणारे
अभंग कीर्तनात
न दुभंगणारे
उमंग वर्तनात

या ओळी खोट्या ठरवण्याची धडपड इथे नेमके कोण करतयं हे एकदाचे स्पष्ट व्हायलाच हवे.