‘‘हो केली मारहाण. काय करायचं ते करून घ्या. या मराठी राज्यात मराठी तरुणांना न्याय मिळणार नसेल, तर दुसरं करायचं तरी काय आम्ही? आमच्या हक्कांवर गदा आणण्यासाठी आलेल्या परप्रांतियांना हुसकावून नाही लावायचं तर काय आरत्या ओवाळायला हव्या आम्ही त्यांच्या? आम्ही जे काही केलं, ते स्थानिक तरुणांवर होणार्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी केलं. ज्यांच्याकडे न्याय मागायला गेलो, त्या सरकारनं हात वर केल्यावर कायदा हाती घेण्याशिवाय दुसरा पर्याय तरी कोणता होता आमच्याकडे...?’’
असल्या बाणेदार वाक्यांची फेक करत एरवी जाहीर सभांमधून टाळ्या मिळवणार्या राज ठाकरेंनी यापैकी कुठलेही वाक्य न बोलता, मी तिथे नव्हतोच, माझा त्या घटनेत सहभाग नव्हता, त्यामुळे माझ्याविरुद्धची केस मागे घेण्यात येऊन आपल्याला या प्रकरणातून मुक्त करण्यात यावे अशी याचना केल्याची वार्ता काल कानावर पडली आणि भारतीय राजकारणाच्या अनोख्या शैलीचा पुन्हा एकदा प्रत्यय आला.
सुरूवातीला तर विश्वासच बसला नाही. वाटलं, छत्रपती शिवरायांच्या कर्तबगारीवर विश्वास असलेली माणसं ही. शिवबांच्या गनिमी काव्याचाच भाग असावा कदाचित. अन्यथा करारी बाण्याचे राज साहेब असली पुळचट विनवणी न्यायालयाला करतील? छे! कुठे तो बाणेदारपणा, कुठे ती परप्रांतियांविरुद्धच्या लढाईची भाषा, अन् कुठे ही याचना? राजसाहेबांच्या प्रतिमेला न शोभणारी. मराठीजनांच्या भावनांना ठेच पोहोचविणारी...
राज साहेब,
हा कसला मराठी बाणा?
आपल्या इथल्या राजकारणाची तर्हा जराशी न्यारीच आहे. इथे सार्या यातना
नेत्यांचा जयघोष करणार्या कार्यकर्त्याच्या वाट्यालाच येतात. कुठल्या आंदोलनात
पोलिसांच्या लाठ्या नेत्याच्या अंगावर बसल्याचे कधी कुणी ऐकले आहे? चेंगराचेंगरीत कुठल्या नेत्याला जीव गमवावा लागल्याची
वार्ता कधी कुणाच्या कानावर आली आहे? दंगलीत कुठला नेता मैदानात उतरल्याचे कधी कुणी बघितले आहे? आंदोलनकर्त्या समुहावर झाडल्या गेलेल्या बंदुकीच्या
गोळ्यांची दिशा आंदोलनाच्या नेतृत्वाच्या दिशेने वळल्याचे कधी आपण बघितले आहे? आंदोलनकर्त्यांना भडकावणारी नेत्यांची जमात नेमकी
पोलिसांच्या लाठीहल्ल्याच्या वेळी कुठे आणि कशी गायब होते, हे गुपित अद्याप कुणाला कळलेले नाही. पण पोलिसांच्या लाठ्या
असो की जमावाची दगडफेक,
बंदुकीच्या गोळ्या असो की कारागृहाची शिक्षा, यातली कुठलीच बाब नेत्यांच्या, विशेषत: राजकीय नेत्यांच्या वाट्याला कधीच येत नाही, हेच धगधगते वास्तव आहे. आणि कधी अपवादाने चुकून आलीच त्याच्या वाट्याला
एखाद्वेळी शिक्षा तर मग त्यातून त्याची सोडवणूक करण्यासाठी चालणारे डावपेच सामान्य
कार्यर्त्याच्या वाट्याला आल्याची उदाहरणे सहसा सापडत नाहीत.
पाच वर्षांपूर्वी रेल्वे भरती मंडळाच्या परीक्षेदरम्यान मनसेच्या
कार्यकर्त्यांनी मुंबईत घातलेल्या धुडगुसाच्यावेळी आपण तिथे हजर नव्हतो, त्या प्रकरणात आपला काही रोल नाही असली कारणे पुढे करत मनसेध्यक्ष
राज ठाकरे यांनी स्वत:ची या प्रकरणातून सोडवणूक करवून घेण्यासाठी न्यायालयात दाखल
केलेला अर्ज तमाम मराठीजनांच्या भावना दुखावणारा ठरला आहे. मराठी जनांचा आवाज
बुलंद करतात परप्रांतियांच्या विरोधात आग ओकणार्या राज ठाकरे यांच्या चिथावणीखोर
भाषणाने रक्त सळसळलेला कार्यकर्ता पेटून उठला. राज साहेबांच्या एका आदेशाची देर, त्याने रेल्वे स्थानकावर, परीक्षा केंद्रावर जाऊन मनातल्या परप्रांतियांविरुद्धच्या संतापाला वाट मोकळी
करून दिली. कुठे त्यांना मारहाण केली, तर कुठे त्यांना परीक्षा केंद्रांवरून हुसकावून लावले. तेव्हा देशभरात हाहाकार
माजला. कित्येकांनी शिव्याशाप दिलेत, तरी तमाम मराठीजनांनी या धाडसाचे कौतुक केले. राजसाहेबांची वाहवाही
झाली. नेता हवा तर असा,
असे शेरे मारले गेले. मराठी तरुणांवर होत असलेल्या
अन्यायाला वाचा फोडल्याबद्दल, त्यांच्या
हक्कावर गदा आणायला निघालेल्या परप्रांतियांना खदेडून लावल्याबद्दल प्रत्येक जण
राज साहेबांना गळ्यातला ताईत बनवून फिरू लागला.
पाच वर्षे मागे पडली. त्या मारहाणीत सहभागी असलेल्या तब्बल वीस तरुणांविरुद्ध
पोलिसांनी केसेस दाखल केल्या. न्यायालयाचे उंबरठे झिजवण्याची वेळ त्यांच्यावर आली. त्यावेळी साहेबांचा आदेश
शिरसावंद्य मानून मोठ्या उत्साहाने, निडरपणे परप्रांतियांविरुद्ध मैदानात उतरलेल्या कार्यकर्त्यांच्या डोक्यातली
झिंग नंतर खाड्कन उतरली. पण यावेळी एक चमत्कार घडला होता. कधी नव्हे, ते पहिल्यांदाच आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांसोबतच त्यांच्या
नेत्याविरुद्धही खटला दाखल झाला होता. आता काय होणार म्हणून सर्वांचे लक्ष या
केसकडे लागले होते. आता व्हायचे काय आहे त्यात? एरवी जाहीरपणे गरजणारा राजसाहेबांचा दणका न्यायालयाच्या कटघराही ठसा उमटवणार
असल्याचा विश्वास होता तमाम मराठीजनांना.
‘‘हो केली मारहाण. काय करायचं ते करून घ्या. या मराठी राज्यात मराठी तरुणांना
न्याय मिळणार नसेल,
तर दुसरं करायचं तरी काय आम्ही? आमच्या हक्कांवर गदा आणण्यासाठी आलेल्या परप्रांतियांना
हुसकावून नाही लावायचं तर काय आरत्या ओवाळायला हव्या आम्ही त्यांच्या? आम्ही जे काही केलं, ते स्थानिक तरुणांवर होणार्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी केलं.
ज्यांच्याकडे न्याय मागायला गेलो, त्या सरकारनं
हात वर केल्यावर कायदा हाती घेण्याशिवाय दुसरा पर्याय तरी कोणता होता आमच्याकडे...?’’ असल्या बाणेदार वाक्यांची फेक करत एरवी जाहीर सभांमधून
टाळ्या मिळवणार्या राज ठाकरेंनी यापैकी कुठलेही वाक्य न बोलता, मी तिथे नव्हतोच, माझा त्या घटनेत सहभाग नव्हता, त्यामुळे माझ्याविरुद्धची केस मागे घेण्यात येऊन आपल्याला या प्रकरणातून मुक्त
करण्यात यावे अशी याचना केल्याची वार्ता काल कानावर पडली आणि भारतीय राजकारणाच्या अनोख्या
शैलीचा पुन्हा एकदा प्रत्यय आला.
सुरूवातीला तर विश्वासच बसला नाही. वाटलं, छत्रपती शिवरायांच्या कर्तबगारीवर विश्वास असलेली माणसं ही. शिवबांच्या गनिमी
काव्याचाच भाग असावा कदाचित. अन्यथा करारी बाण्याचे राज साहेब असली पुळचट विनवणी
न्यायालयाला करतील?
छे! कुठे तो बाणेदारपणा, कुठे ती परप्रांतियांविरुद्धच्या लढाईची भाषा, अन् कुठे ही याचना?
राजसाहेबांच्या प्रतिमेला न शोभणारी. मराठीजनांच्या
भावनांना ठेच पोहोचविणारी...
इथल्या प्रशासकीय आणि न्यायव्यवस्थेची ठराविक, साचेबद्ध कार्यपद्धती आहे. त्याचा लाभ घेणार्यांपेक्षा गैरफायदा घेणारेच अधिक
आहेत. गुजरातेत नाही का तिस्टा सेटलवाड नावाच्या कथित समाजसेविकेनं नरेन्द्र
मोंदींना जेरीस आणण्यासाठी न्यायालयीन प्रक्रियेचा पुरेपूर वापर करून घेतला..? राज ठाकरेंविरुद्धही काय कमी ठिकाणी न्यायालयात प्रकरणे
दाखल करण्यात आलीत,
त्यांना जेरीस आणण्यासाठी? तर अशा कार्यपद्धतीला त्याच पद्धतीने, त्याच तोडीचे उत्तर देणेही कधीकधी गरजेचे असते. तांत्रिकदृष्ट्या विचार केला
तर राज ठाकरे यांच्या परवाच्या या अर्जात तसे चूक काहीच नाही. मुंबईच्या चेतना
महाविद्यालयात प्रसंग घडला तेव्हा ते खरोखरीच घटनास्थळी नव्हते. मग मी तिथे नव्हतो, असे म्हणत त्यांनी या केसमधून आपले नाव वगळण्याची मागणी
केली तर त्यात चूक कुठाय?
त्यांच्याविरुद्ध ठिकठिकाणी केसेस दाखल करून मराठीसाठी
चाललेल्या लढाईची मुस्कटदाबी करायला निघालेल्या लोकांना त्याच पद्धतीने उत्तर
द्यायला नको?
पण हे प्रकरण केवळ तांत्रिक बाबींपुरते मर्यादीत नाही. रणांगणावरच्या लढाईत
सेनापती सोबतीला असला की सैनिकांना बळ मिळते. तसेच राजकीय लढाईचे आहे. नेत्याची
साथ आहे म्हटल्यावर कार्यकर्त्यांना येणारा हुरूप वर्णनातीत असतो. राजसाहेबांच्या
नुसत्या भाषणांनीही भारावून, पेटून उठलेली
तरुणाई परीक्षेसाठी म्हणून वर्गात बसलेल्या परप्रांतियांना हाकलून लावत धुडगूस
घालते,
ते कुणाच्या बळावर? आपल्या नेत्याच्याच ना?
अशावेळी पाठीशी ठामपणे उभे राहात त्यांना बळ द्यायचे सोडून
राज साहेब आपल्या शिलेदारांना कारवाईच्या तोफेसमोर देऊन स्वत: मात्र मोकळे
होण्याचा मार्ग स्वीकारणार असतील, तर त्याचे
समर्थन कसे व्हावे?
मुंबईतल्या मराठीजनांची मक्तेदारीच ठाकरे कुटुंबाने गेली चार दशकं आपल्याकडे
घेतली आहे. तोडफोड तर तेव्हाही व्हायची. पण त्यातही बाळासाहेबांनी निदान कुटुंबसखी, शिववडापाव सारख्या उपक्रमातून स्थानिकांच्या पदरी काहीतरी
पडेल याची व्यवस्था झाली. पण मनसेची लढाई मात्र तोडफोड आणि अरेरावीच्या पलीकडे
जाताना दिसत नाही. परप्रांतियांविरुद्ध जनसमुदाय भडकावणार्या भाषणातून आणि मीडिया
मॅनेजमेंटच्या माध्यमातून मराठी मनं पेटून उठताना दिसतीलही. पण असल्या
पळपुटेपणातून भविष्यातली आंदोलनं उभी राहण्यापूर्वीच विझतील त्याचं काय?
No comments:
Post a Comment