Friday, November 2, 2012



सातव्या सिलेंडरचे राजकारण!

स्थळ : मंत्रालय, वेळ : दुपारी २ च्या दरम्यानची. लेखक/दिग्दर्शक : राष्ट्रवादीचे नेते. सहभागी कलावंत : मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खा. सुप्रिया सुळे, आ. विद्याताई चव्हाण...
नाटकाचा अंक पहिला...
पवारकन्या सुप्रियाताई सुळे परवा जाम भडकलेल्या. जनतेच्या प्रेमापोटी मनात उफाळून आलेल्या संतापाला वाट मोकळी करून देण्यासाठी त्यांनी थेट मंत्रालय गाठले होते. आपल्या सहकार्‍यांसमवेत त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. नागरिकांना सवलतीच्या दरातले तीन सिलेंडर्स देण्याचा निर्णय घेण्यात पुरोगामी महाराष्ट्र असा पिछाडीवर का चाललाय्, असा रोख सवाल त्यांनी पृथ्वीराज चव्हाणांना विचारला. दस्तुरखुद्द खासदार सुप्रियाताईच हा सवाल विचारू लागल्यावर मुख्यमंत्री बिचारे काय बोलणार? बोबडीच वळली त्यांची. सवयीप्रमाणे बघतो, पाहतो, करतो, आपल्याला काहीतरी करावे लागेल, गरज पडली तर कायद्यात बदल करावे लागतील वगैरे वगैरे ठेवणीतली उत्तरे देऊन त्यांनी या ‘शिष्ट’मंडळाची बोळवण केली.
नाटक संपले आणि पडदा पडला असल्याने, सुटलो रे बाबा एकदाचे, असे म्हणत जरासे हाऽऽश, हुऽऽश करत उसंत घेत नाही, तोच तिकडे दुसर्‍या अंकाची तयारी चालली असल्याचे वृत्त येऊन धडकले आणि पुन्हा लगबग सुरू झाली.
===========
स्थळ : राष्ट्रवादीचे कार्यालय. वेळ : दुपारी ३ च्या दरम्यानची. लेखक/दिग्दर्शक : राष्ट्रवादीचे नेते. सहभागी कलावंत : नवाब मलिक, विद्याताई चव्हाण व पक्षाचे अन्य प्रवक्ते...
नाटकाचा अंक दुसरा...
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांविरुद्ध नवाब मलिकांचा थयथयाट. राज्यातील तमाम महिलावर्गाच्या वतीने विद्याताईंची भाषणबाजी. आता जनता पार संतापली आहे. राज्यातील सर्व ग्राहकांना सवलतीच्या दरातले तीन सिलेंडर्स देण्याचा निर्णय तातडीने घ्या, नाहीतर रस्त्यावर उतरू, कलेक्टरला घेराव घालू, असा विद्याताईंचा इशारा. मुख्यमंत्री फारच मंदगतीने काम करतात. त्यांनी आता कामाचा वेग वाढवला पाहिजे... इति नवाब मलिक. लागलीच टीव्हीवर बातम्यांच्या पट्‌ट्या सुरू. इकडे नाटक समाप्त.
========
देशभरातील गॅस कनेक्शनधारकांना सवलतीच्या दरातले केवळ सहाच सिलेंडर्स उपलब्ध करून देणार असल्याची घोषणा केंद्र सरकारने केल्यानंतर, सोनिया गांधींना कॉंग्रेसशासित राज्यांमधील जनतेचा अचानक कळवळा आला. कॉंग्रेसची राज्य सरकारे आपापल्या राज्यातील जनतेला सवलतीच्या दरातले अधिक तीन सिलेंडर्स उपलब्ध करून देतील, अशी गर्जना त्यांनी करून टाकली. गुजरातचे सरकार का असा निर्णय घेत नाही, असा सवालही त्यांनी त्या वेळी केला. बघा, कॉंग्रेसची सरकारं असली की कसा लाभ होतो, हे जनतेला सांगण्याची संधी साधली. एरवी सोनियांचा शब्द झेलण्यासाठी हाताची ओंजळ करून कायम सरसावून बसणार्‍या कॉंग्रेसजनांना, या वेळी मात्र तसे करणे जिकिरीचे होत आहे. तीन सिलेंडर्सच्या सब्‌सिडीची कोट्यवधी रुपयांच्या घरातली रक्कम जुळवायची कशी आणि कुठून, असा सवाल त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. त्यामुळे सोनियांचा आदेश जारी होऊन महिना उलटला, तरी या बापुड्यांना त्याची अंमलबजावणी काही करता येत नाहीय्. महाराष्ट्रात तर परिस्थिती आणखीच वेगळी आहे. इथे त्यांची राष्ट्रवादीच्या सोबतीने सत्तेतली भागीदारी आहे. तीन सिलेंडर्स देण्याचा आदेश सोनियाजींचा. अंमलबजावणी कॉंग्रेस-राकॉं दोघेही करणार आणि श्रेय मिळणार ते एकट्या कॉंग्रेसला? हे राष्ट्रवादीला कसे खपेल? मग श्रेय लाटण्याच्या वेगवेगळ्या क्लृप्त्या सुरू झाल्या.
राजकारण करण्यात शरद पवारांचा हात कोण धरणार? महाराष्ट्राचे अर्थमंत्रालय पवारांच्या राष्ट्रवादीकडे आहे. त्यांनी त्याचा पुरेपूर फायदा उचलण्याचे धोरण अवलंबिले आहे. आदेश भलेही सोनिया गांधींनी दिले असतील, पण आमच्या मर्जी आणि परवानगीशिवाय कॉंग्रेसला हा निर्णय घेता येणार नाही आणि श्रेय तर मुळीच लाटता येणार नाही, हे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कॉंग्रेस नेत्यांच्या पुरते लक्षात आणून दिले आहे. म्हणूनच आता सब्‌सिडीच्या मुद्यावरून तांत्रिक प्रश्‍न उपस्थित केले जाताहेत. जणूकाय स्वत:च्या खिशातूनच ही रक्कम द्यायची असल्याच्या थाटात अर्थमंत्रालयाचे अधिकारी, सब्‌सिडीची इतकी मोठी रक्कम आणायची कुठून, असा सवाल विचारत आहेत.
इकडे अर्थमंत्रालयाच्या माध्यमातून कॉंग्रेसच्या नाड्या आवळणार्‍या राष्ट्रवादीने बाहेर मात्र या मुद्यावर आपण जनतेसोबत असल्याची नाटकबाजी छान वठवली आहे. गरीब बिचार्‍या जनतेला तीन सिलेंडर्स देण्याचा निर्णय अजून का घेत नाही, असा सवाल या पक्षाचे नेते राज्याच्या मुख्यमंत्र्यांना, पर्यायाने कॉंग्रेसला जाहीरपणे विचारताहेत. दिवाळीपूर्वी निर्णय घ्या, नाहीतर रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असे इशारे या पक्षाचे नेते आपल्याच सरकारला देताहेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीत राष्ट्रवादीचे नेते सिलेंडरबाबत चकार शब्द काढत नाहीत आणि तिकडे पवारकन्या, महिलांची शिष्टमंडळे नेऊन मुख्यमंत्र्यांना निवेदनं सादर करताहेत...
राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या आपसातल्या आणि कॉंग्रेससोबतच्या राजकीय स्पर्धेतून सवलतीच्या दरातल्या सातव्या सिलेंडरचे राजकारण सध्या टिपेला पोहोचले आहे. खरेतर केंद्राच्या सहा सिलेंडर्सची मुदत अद्याप संपायची असल्याने राज्याच्या वाट्याच्या तीन सिलेंडरबाबतचा निर्णय घ्यायला सरकारकडे अजून पुरेसा अवधी आहे. अगदी येत्या डिसेंबरपर्यंत याबाबतचा निर्णय घेतला तरी चालण्यासारखे आहे. पण, दिवाळीपूर्वी जनतेला गोड बातमी दिली, तर त्याचा राजकीय लाभ मिळू शकतो, अशी गणितं मांडत, सध्या कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे राजकारण सुरू आहे. सोनिया गांधींनी तीन सिलेंडर्सचा निर्णय जाहीर करून आधीच खेचलेल्या षट्‌काराची बरोबरी करण्यासाठी राष्ट्रवादीची ही नाटकबाजी चालली आहे. सत्ता यांचीच, सरकार यांचेच, निर्णय घेण्याचे अधिकार यांचेच, अगदी ज्यांनी अंतिम निर्णय घ्यायचाय् ते अर्थमंत्रालयही यांच्याच ताब्यात, तरीही हेच सरकारकडे मागणी करताहेत. हेच आंदोलनाची भाषा वापरताहेत. कलेक्टरला घेराव घालू म्हणताहेत...
एक मात्र खरे की, या खेळीतून कॉंग्रेसची कोंडी करण्यात राष्ट्रवादीला यश मिळाले आहे. सोनिया गांधींनी जाहीर करूनही महाराष्ट्रातली कॉंग्रेस याबाबतचा निर्णय घेऊ शकत नसल्याचे चित्र जनतेसमोर उभे करण्यात राकॉंचे राजकारण सफल झाले आहे. आम्ही तर म्हणतोय्, पण मुख्यमंत्रीच निर्णय घेण्यात कमी पडत असल्याची ओरड त्यासाठीच तर चालली आहे... या राज्यातल्या जनतेला यांच्या राजकारणातलं काहीएक कळत नसल्याच्या गोड गैरसमजातून... 
सुनील कुहीकर 
९८८१७१७८३३


Sunday, September 9, 2012

अतिथी देवो भव!
राज साहेब, जय महाराष्ट्र! परवाचा तुमचा मराठी बाणा कमालीचा होता बघा.  शेजारच्या पाकिस्तानबाबत तमाम भारतीय जनांच्या मनातला संताप तुम्ही व्यक्त केला तेव्हा अक्षरशः ऊर भरून आला. सूरक्षेत्रातल्या पाकड्यांच्या सहभागावरून तुम्ही दिलेला कलर्स दम मस्त होता. जाम आवडला आपल्याला. इशारा देतानाचा तुमचा तो आवेश काय वर्णावा?  आशा भोसले सारख्या दिग्गज कलावंताला खडे बोल सुनावतानही जराही तमा न बाळगणारी तुमची ती तर्‍हा? आहाहा! दिल खूश हो गया अपना. (सॉरी! तुमच्या बाण्याचे भान ठेवून मराठीत बोलतो. मन कसं आनंदी झालं आपलं). मनात म्हटलं, नेता हवा तर असा. बड्या बड्यांना दम देणारा. क्षणात सुतासारखा सरळ करणारा. बास्स! आता बघा कशी सरळ येते ती बोनी कपूर आणि मंडळी, असं लोक बोलू लागले. सूरक्षेत्र प्रसारीत होणार नाही असं साहेब एकदा बोलले म्हटल्यावर त्यांचा शब्द अव्हेरून तो सुरू करण्याची कोणाची बिशाद आहे इथे? भारतीय जनमानसाच्या मानसिकतेचा गैरफायदा घेत कलेच्या नावावर धंदा करायला निघालेल्या कपूर कंपनीला तुम्ही दिलेली ललकारी भावली लोकांना. गेले ते आता कामातून. बुडाली त्यांची नौका अशा चर्चा चौकाचौकात, गल्लोगल्लीत, चहाच्या टपरीवर, पानाच्या दुकानांवर रंगू लागल्या. इशारा, तोही राज साहेबांनी दिलाय्‌ म्हटल्यावर समोरच्याचा खेळ खल्लास! असं तुमचे सैनिक छातीठोकपणे सांगू लागले. भारतीयांच्या मनातल्या रसिकतेची, कलेबद्दलच्या त्यांच्या आसक्तिची लक्तरे वेशीवर टांगायला निघालेल्या निर्मात्यांना, लोकांच्या भावना पायदळी तुडवून त्यात सहभागी होणार्‍या आशा भोसले यांच्यासारख्या कलावंताला, केवळ पैशाच्या हव्यासापायी त्याचे प्रक्षेपण करणार्‍या कलर्स वाहिनीला खर्ड्या शब्दात सुनावण्याची तलवारीच्या पातीसारखी आपली तळपती आणि धारदार तर्‍हा कशी सर्वांना भावली होती. लोकांच्या मनातलं जाणणारा, त्या भावनांना आपल्या शब्द आणि कृतीतनं आकार देणारा हा नेता असल्याचा प्रत्यय पुन्हा एकदा तमाम मराठीजनांना आला होता. पण...
एवढ्यात तुमच्या  इशार्‍याचे सूरक्षेत्रात पानिपत झाल्याची बातमी येऊन धडकली. मन सुन्न झाले. मनात विचारांचे काहूर माजले. काय झालं असेल बरं आपल्या राज साहेबांना असं? का माघारी फिरले असतील ते आपल्या इशार्‍यावरून? ङङ्गकृष्णकुंज' मध्ये भेटायला आलेल्या बोनी कपूर आणि कलर्स वाहिनीच्या अधिकार्‍यांनी केलेल्या वार्तालापातून तुमचं मतपरिवर्तन झाल्याची बातमी सुरूवातीला खरीच वाटेना. छे! साहेब म्हणजे ठाम विचारांचं प्रतिक. साहेब म्हणजे करारी बाण्याचे ज्वलंत उदाहरण. साहेबांचा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची पांढरी रेघ. कुण्या बोनी कपूरची ते बदलण्याची बिशाद नाही आणि ताकदही नाही. पण तुमचे मतपरिवर्तन झाले हे ही खरंच होतं. पाकिस्तानी कलावंतांच्या सहभागातून तयार झालेल्या सूरक्षेत्र या गायन स्पर्धेच्या कार्यक्रमाच्या कलर्स वाहिनीवरील प्रक्षेपणाला कालपर्यंत आपण चालवलेला विरोध अचानक गळून पड ल्याची बातमीही खरी होती. परवा परवा पर्यंत काय सॉलीड विरोध चालला होता तुमचा.  या कार्यक्रमातला सहभाग केवळ पैशासाठी असल्याबद्दल आशाताईंनाही चार शब्द सुनवायला तुम्ही कमी केले नाही.  मी पण कलावंत आहे, असे ठसक्यात सांगत त्यांना त्यांची जागा दाखवून दिलीत. हा कार्यक्रम प्रक्षेपित कराल तर याद राखा, कलर्स वाहिनीच्या कार्यालयाची तोडफोड होईल, या तुमच्या धमक्या पोकळ नव्हत्याच. उलट अर्थपूर्ण होत्या. त्यातला अर्थ कळल्यामुळेच बोनी कपूर आणि कंपनीने लागलीच तुमची भेट घेतली. कार्र्यक्रमाचे प्रक्षेपण होऊ ा अशी गळ घातली गेली. आता आपली संस्कृतीच अतिथी देवो भव चा मंत्र सांगणारी. पाकिस्तानी कलावंतांबद्दल हा मंत्र मान्य नसला, तरी बोनी कपूर आणि मंडळीच्या स्वागताच्यावेळी मात्र तुम्ही आपल्या या संस्कृतीची जाणीव ठेवली. त्यांचं स्वागत केलं. त्यांच्याशी झालेल्या गुजगोष्टीतून तुमचे वैचारिक परिवर्तन होत गेले आणि एका क्षणी या कार्यक्रमाला असलेला तुमचा विरोध पुरता मावळला. कमाल आहे त्या कपुरांच्या बोनीची. जे भल्या भल्यांना जमलं नाही ते त्यांनी करून दाखवलं. नाही तर राज साहेबांचं मतपरिवर्तन घडवणं कुण्या येर्‍यागबाळ्याचं काम नोहे.

हे मतपरिवर्तन नेमकं कसं आणि कशामुळं घडलं हा आता आम्हा बापुड्यांच्या उत्सूकतेचा आणि चर्चेचा विषय आहे. आणखी काही दिवस राहिलही तो तसाच चर्चेचा आणि उत्सूकतेचा विषय. पण आम्हा सामान्य जनांचं तुम्ही नका फार मनावर घेऊ राज साहेब. आमच्या 'नातला संताप लोकल मधल्या गर्दीत धे खाण्यात आणि चौकतल्या पानटपरीवर चकाट्या पिटण्यात केव्हा विरतो ते आम्हालाही कळत नाही. तुमच्या या  मतपरिवर्तनाचाही विसर पडेलच लवकरच आम्हाला...
तर सांगायचा मुद्दा असा की, कलर्स वाहिनीवरच्या सूरक्षेत्र या कार्यक्रमाविरुद्धचा तुमचा कालपर्यंतचा तो करारी बाणा बोनी कपुरांसोबतच्या चर्चेनंतर गर्भगळीत झाल्याची बातमी अचानक कानावर पडली. असं कसं झालं असेल असा प्रश्न मनाला सतावू लागला. राजकारणात काहीही घडू शकते याची कल्पना असली तरी आमच्या मनातली तुमची प्रतिमा जराशी वेगळीच. या प्रकरणात तुम्ही तुमचा शब्द फिरवल्याची बाब काही केल्या खरी वाटेना. पण, तुम्ही परवानगी दिलीय्‌ असं सांगत कपुरांचा बोनी हसत खेळत, दिमाखानं कृष्णकुंजतून बाहेर पडताना बघितला आणि मनाला सावरलं. भावना आवरत्या घेतल्या अन्‌ वस्तुस्थिती स्वीकारली. पाकिस्तानी कलावंतांना घेऊन कार्यक्रम तयार करताना निर्मात्याने केलेल्या मोठ्या प्रमाणातील आर्थिक गुंतवणुकीचे नुकसान होऊ नये अशा उदात्त हेतूने आपण त्यांची विनंती स्वीकारली आणि कार्यक्रम प्रक्षेपित करायला परवानगी बहाल केलीत. पाकिस्तानी कलावंतांना घेऊन कार्यक्रम तयार केल्याबद्दल त्यांनी तुमच्या निवासस्थानी सार्‍या देशाची माफी मागितली म्हणे. तुम्ही ठरलात विशाल हृदयी. लागलीच माफीनामा देऊन रवाना केलेत त्यांना. खरं सांगतो राज साहेब, सार्‍या देशाची माफी मागण्याचे एक नवीन ठिकाण या निमित्ताने तमाम भारतवासियांना कळले. शिवाय त्यांनी तुमच्या घरी येऊन सार्‍या देशाची माफी मागितली म्हणजे नेमके काय केले? निर्मात्याच्या आर्थिक नुकसानीचा विचार तुम्हाला आधी सूचला नाही का, निर्मात्याने माफी मागितली म्हणून पाकिस्तानी कलावंतांच्या सहभागाचा मुद्दा कुठे संपला, आणि परवानगी ायचीच होती तर मग आधी कशाला धमक्या दिल्या, असे काही बोचरे सवाल आता काही नतद्रष्टे लोक विचारतील. सार्‍या देशाच्या वतीने त्यांना माफ करण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला असे विचारायलाही हे नतद्रष्टे लोक कमी करणार नाहीत. पण राज साहेब, तुम्ही नका मनावर घेऊ त्यांचं. (अर्थात, तुम्ही मनावर घेतलं असतं तर सूरक्षेत्रच्या प्रक्षेपणाला परवानगी मिळालीच नसती, हा भाग वेगळा.) यापुढे पाकिस्तानी कलावंतांना घेऊन कार्यक्रम कराल तर याद राखा हा तुमचा नवीन इशारा पुढील कित्येक दिवस उत्साहात लोळवत ठेवणार आहे आम्हाला. भविष्यात पुन्हा संधी मिळताचपाकिस्तानविरुद्ध बोलणार आहातच तुम्ही. इशारे तर काय आपल्याकडे ढिगभर पडले आहेत. त्याचाही काळानुरूप वापर होईलच कधी ना कधी. आम्ही बापुडे अजूनही तुमच्या तडफदार, आवेशपूर्ण शैलीतल्या नवीन इशार्‍याच्या प्रतिक्षेत आहोत. यंदाच्या इशार्‍याचे सूरक्षेत्रात पानिपत झाल्याची वस्तुस्थिती विसरून....


सुनील कुहीकर
मुंबई.
९८८१७१७८३३

Monday, August 13, 2012

 उपाशी पोटी मोबाईल कशासाठी?
हर हाथ को काम ही दोन वर्षांपूर्वीच्या निवडणुकीतली घोषणा बदलून २०१४च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हर हाथमे फोन असे नवे ब्रीद केंद्र सरकारने जाहीर केले आहे. कधीकाळी शायनिंग इंडिया च्या संकल्पनेत दिसणार्‍या दृश्यांवर टिका करणारी राजकीय जमात आता तेच दृश्य प्रत्यक्षात साकारायला सरसावली आहे. त्यावेळच्या जाहिरातींमध्ये ग्रामीण भागात बैलगाडीतनं जाणार्‍या महिलेच्या, शेतात काम करणार्‍या शेतमजुराच्या हातात मोबाईल फोन दिसायचा.  काँग्रेसजनांनी तत्कालीन राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या या स्वप्नांवरही आसूड ओढले होते. एनडीए सरकारच्या प्राथमिकतेवर त्यावेळी प्रखर हल्ला केला जात होता. भुकेने व्याकूळ समाजाच्या हातात दिसणारा मोबाईल फोन हा सर्वच भाजपा विरोधकांनी थट्टेचा विषय केला होता. दुर्दैवाने शायनिंग इंडियातले नेमके तेच चित्र प्रत्यक्षात साकारण्याचा मानस आता जाहीर होताय्‌. या देशात मागील कालावधीत कितीतरी आंदोलनं झाली आहेत. आजही होताहेत. लोकपाल बिल आणण्यापासून, महागाई कमी करण्यापर्यंत आणि पेट्रोलचे दर कमी करण्यापासून तर भ्रष्टाचार संपविण्यापर्यंतच्या मागण्या आंदोलनकर्ते करताहेत. पण त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकारनं गांभियार्रनं पावलं उचलल्याचं चित्र बघायला मिळत नाही. या उलट देशातल्या कोणत्याही नागरिकाने कधी केल्याचे ऐकिवात नाही, अशी मोबाईल फोनची मागणी पूर्ण करण्यासाठी मात्र केंद्र सरकारने हिरीरीने घेतलेला पुढाकार संशयास्पद ठरला आहे. यातनं नेमकं काय साधलं जाणार आहे. आणि नेमक्या कोणाच्या हितासाठी ही योजना तयार करण्यात आली आहे, या प्रश्नाचे उत्तर स्पष्ट होण्याची गरज आहे. कारण वारंवार होणार्‍या जनहिताच्या मागण्यांकडे ढुंकूनही न पाहणारे प्रशासनातील कर्तबगार अधिकारी जेव्हा कोणीही मागणी केलेली नसताना  अशी एखादी एखादी योजना तयार करतात, तेव्हा त्यांचाच स्वार्थ त्यात दडलेला असतो हा आजवरचा इतिहास आणि तेच आतापर्यंतचे वास्तव आहे.
सुमारे दशकापूर्वी शायनिंग इंडिया तून झळकणार्‍या दृश्यांची काँग्रेसचे नेते खिल्ली उडवायचे. ज्या देशात खायला अन्न नाही, रोजगार नाही, जिथल्या ग्रामीण भागात आप  एसटीही पोहोचत नाही तिथे पहिली गरज कशाची आहे, असा शहाणपणाचा सवाल सार्‍या देशाला तेव्हा विचारला जात होता. नेमका तोच प्रश्न केंद्रातल्या कर्तबगार सरकारला आणि त्यांचे प्रशासन चालविणार्‍या ङङ्गडोकेबाज' अधिकार्‍यांना विचारण्याची वेळ आज आली आहे. दहा वर्षांपूर्वी सत्ता हाती नसल्यामुळे काँग्रेसला सतावणारी कोणतीच समस्या आता आपल्या देशात शिल्लक राहिलेली नाही? की अन्न, रोजगारापेक्षाही मोबाईल फोन ही इथल्या नागरिकाची प्राथमिक गरज असल्याचा समज इथल्या नेत्यांचा आणि अधिकार्‍यांचा झाला आहे? तसे नसेल तर उपद्‌व्याप नेमका कोणाच्या भल्यासाठी चाललाय हे तरी स्पष्ट झालं पाहिजे.
युनो ने नुकत्याच जारी केलेल्या एका अहवालानुसार जागतिक व्यापारपेठ ठरलेला भारत देश आर्थिक उलाढालीत जगात चौथ्या क्रमांकावर असला, तरी श्रीमंतीत तो जगात ९४व्या क्रमांकावर आहे. १९९९ मध्ये स्थापन करण्यात आलेल्या जी-२० या केवळ वीस देशांच्या फोरममध्येही श्रीमंतीबाबत आम्ही शेवटच्या क्रमांकावर आहोत. २०१५ मध्ये संपूर्ण जगातील गरिबांची संख्या १ अरब पर्यंत कमी करण्याचे जागतिक उद्दीष्ट युनोने समोर ठेवले आहे. या संभाव्य कमी संख्येत देखील सर्वाधिक गरीब अफ्रिका आणि दक्षिण अशियात असणार आहेत. अर्थातच दक्षिण आशियातील सर्वाधिक गरिबांची संख्या भारतात असेल असा अंदाज आताच व्यक्त करण्यात आला आहे. अगदी आजचा विचार केला तरी सव्वाशे कोटी लोकसंख्येच्या भारतातली २९.८ टे जनता गरीब आहे. युनोचा गरिबीचा निकष १.२५ डॉलर प्रतिदिन उत्पन्नाचा आहे. म्हणजे अंदाजे ६७ रुपये प्रतिदिन उत्पन्नाचा. यासंदर्भात जागतिक निकष धुडकावून आम्ही आमचे निकष २८ रुपयांवर आणून ठेवले आणि तेवढी रम कमावणारी व्यक्ती ङङ्गश्रीमंत' करून ठेवली.  दारिद्रय रेषेचे निकष खाली नेऊन ठेवायचे आणि लोक त्याच्या वर आले असल्याच्या आनंदात स्वतःची पाठ थोपटून घ्यायची असा कागदोपत्री श्रीमंतीचा खेळ चालला आहे इथं.
इथे प्रश्न हा आहे की, आम्हाला मोबाईल फोन ा अशी मागणी कुणीही केलेली नसताना ती पूर्ण करण्याचा हुरूप केंद्र सरकारला आला कुठून? ज्या मागण्या लोक रस्त्यांवर उतरून करताहेत त्याची काडीचीही दखल न घेणार्‍या सरकारला ही सुबुद्धी झाली कशी? वेगवेगळ्या नेत्यांच्या नेतृत्वातील आजवरच्या सरकारांचे निर्णय, त्यांची कार्यवाही बघितली की जनहिताच्या उद्देशाआड दडलेल्या त्यांच्या छुप्या अजेंड्याचे धगधगते वास्तव समोर येते.
ग्रामीण भागातल्या कित्येक नळ योजना पैशाअभावी रखडलेल्या या देशात पाणी विकणार्‍या तब्बल ७३ कंपन्यांचा धंदा मात्र तेजीत चालला आहे. त्यांना ना दुष्काळ आडवा येत, ना कधी पाणी कमी पडत, ना वाहतुकीची अडचण त्यांच्यासाठी उद्‌भवत. इथे सार्‍या अडचणी उभ्या ठाकतात त्या फक्त सरकारसमोर ! सरकारी असलेल्या बीएसएनएल वगळता इतर सर्व खाजगी मोबाईल कंपन्यांचा धंदा कसा मस्त चालला आहे.  विार्थी मिळत नाहीत म्हणून एकीकडे सरकारी शाळा ओस पडत असताना खाजगी शिक्षण संस्थांपुढच्या रांगा मात्र संपता संपत नाहीत. श्रीमंतांचा वावर असलेल्या विमानतळांवर सुविधांचा नुसता पाऊस बरसतो आणि  रेल्वे स्थानकांवरच्या समस्यांचा पाढयाची लांबी मात्र वाढतच जाते. देशभरातल्या आदिवासींना रोजगार उपलब्ध करून देणारे बांबू धोरण पाच पाच वर्षे धूळ खात पडले असते आणि आदर्श प्रकरणाची फाईल मात्र, सोळा वेगवेगळ्या विभागांचा प्रवास करून दोन दिवसात क्लिअर होऊन बाहेर येते. सरकार नेमके कोणासाठी राबते, या प्रश्नाचे उत्तर दोन परिस्थितींच्या या तफावतीत दडले आहे. आता स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर देशातल्या गोरगरिबांच्या हातात मोबाईल फोन सोपविण्याची योजनाही नेमकी गरिबांच्या हिताची आहे की देशातल्या खाजगी मोबाईल कंपन्यांच्या लाभाची, या प्रश्नाचे उत्तर येणार्‍या काळात मिळणार आहे.
शिवाय एक प्रश्न असा निर्माण होतो, की  ४० कोटी लोक दारीद्रय रेषेखाली जगणार्‍या, ७८ दशलक्ष लोक अनिकेत असलेल्या, भिकार्‍यांची संख्या लाजेने मान खाली घालावी इतकी मोठी असलेल्या, ६७२ रुपये हे सरासरी मासिक उत्पन्न असलेल्या, स्वातंत्र्याच्या ६५ वर्षातही अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण या मूलभूत सुविधाही पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून देण्यात अपयशी ठरलेल्या देशातील नागरिकांना पुरवावयाच्या सुविधांबाबत आपल्या सरकारची प्राथमिकता नेमकी कोणती असावी. जिथे अजूनही जाहिरातीतल्या पिचलेल्या माणसाच्या चेहर्‍यावरच्या सुरकुत्या तशाच कायम आहेत आणि डोक्यावर भांडं घेऊन दूरवरून पाणी आणणार्‍या ग्रामीण महिलांचे भाग्यही बदलल्याचे चित्र नाही, तिथे मोबाईल फोन उपलब्ध करून देणे ही सरकारच्या दृष्टिने पहिली प्राथमिकता असेल, तर त्या सरकारला, तिच्या सल्लागारांना आणि प्रशासनातील अधिकार्‍यांना साक्षात्‌ दंडवतच घातला पाहिजे. जिथली व्यवस्था अजून सरकारी स्वत धान्य संबंधितांपर्यंत पोहोचविण्यात यशस्वी ठरू शकलेली नाही, तिथे अशा कल्पक योजनांचे नियोजन करणार्‍या हुशार अधिकारी आणि राजकारण्यांना कोपरापासून हात जोडण्यापलीकडे करू काय शकतो आपण बापडे? 
याचा अर्थ आपल्या देशातल्या गरीब माणसाच्या हातात कधी मोबाईल फोन येऊच नये का? त्याला या सुविधांचा उपभोग घेण्याची संधी कधी मिळूच नये का, असाही प्रश्न यासंदर्भात उपस्थित होऊ शकतो. मानवीय दृष्टिने त्याचा विचार केला तर सरकारच्या या निर्णयाचे भावनिक समर्थन करण्यावाचून पर्याय उरत नाही. पण गरिबांना मोबाईल वाटणे हा त्यावरचा उपाय नाही आणि मुळातच मोबाईल फोन वाटणे हे सरकारचे काम नाही. त्यांना मोबाईल फोन स्वतःच्या पैशाने विकत घेण्याइतके सक्षम करणे ही सरकारची जबाबदारी आहे. ती पार पाडायचे सोडून सरकार, बिल भरण्याची क्षमता नसलेल्या लोकांच्या हातात मोबाईल फोन सोपवून स्वतःची पाठ थोपटून घेत असेल, तर राजकीय लाभाचा असला तरी हा निर्णय समर्थनीय ठरू शकत नाही. लोकांना फुकटात फोन देणे, वर पुन्हा त्याचे बिल भरण्यासाठी अर्थसंकल्पात निधीची तरतूद करणे ही बाब एकीकडे या देशातल्या इमानदारीने कर भरणार्‍या नागरिकांवर अन्याय करणारी, त्या कराच्या पैशाचा दुरूपयोग करणारी आणि ज्यांना ही सुविधा पुरविली जात आहे, त्यांना लुळे पांगळे करणारी आहे. बहुदा त्याच्या एका मताच्या मोबदल्यात तेवढेच सरकारला करायचे आहे...

सुनील कुहीकर
मुंबई.
९८८१७१७८३३

Friday, August 10, 2012

कृपाशंकरसिंह, गुलाबराव देवकर प्रकरणात महाराष्ट्राने अनुभवले
मुजोर राजकीय नेते, अगतिक व्यवस्था आणि हतबल जनता...!
तिकडे न्यायालय जामीन रद्द करावा की न करावा याबाबतचा निर्णय घेणार असताना पालकमंत्री जळगावात अधिकार्‍यांच्या बैठकी घेताहेत. जिल्हाधिकार्‍यांना आदेश देताहेत. त्यांना अटक करण्याची कारवाई ज्यांना करायची आहे, ते पोलिस अधीक्षक त्यांना सलाम ठोकताहेत. कालपर्यंत त्यांचा राजीनामा घेण्याची गरज नसल्याची मुजोरी करणारे राष्ट्रवादीचे नेते न्यायालयाच्या निर्णयाबरहुकूम राजीनामा लिहून घेण्याचे, नंतर तो दडवून ठेवण्याचे, तो स्वीकारण्याचा मुहूर्त पुढे ढकलत आमचा माणूस अजूनही मंत्री म्हणून कायम असल्याचे दावे छातीठोकपणे करताहेत....
दुसरीकडे, बेनामी संपत्तीवरून ज्यांच्यावर चौकशीचे बालंट आले आहे, ज्यांच्या घरात च जिवंत काडतुसे सापडलीत ते मुंबईतले एक प्रतिष्ठित आमदार पोलिसांच्या इफ्तार पार्टीत सन्मानाने मंचावर बसवले जात आहेत. ज्यांनी त्यांना अटक करायची ते पोलिसच हारतुरे देऊन त्यांचा सत्कार करताहेत....
राज्यमंत्री गुलाबराव देवकर आणि मुंबई प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष कृपाशंकर सिंह यांच्याबाबत गेल्या काही दिवसात अनुभवायला मिळालेले हे चित्र तमाम महाराष्ट्रवासियांचा अवमान करणारे, न्यायालयाला चपराक हाणणारे, पोलिसांची मुजोरी आणि हतबलता सिद्ध करणारे आणि त्याही उपर इथल्या व्यवस्थेची खिल्ली उडवणारे आहे.
जळगाव नगर परिषदेतील घरकुल घोटाळ्यात फौजदारी गुन्हा दाखल झालेले तत्कालीन नगराध्यक्ष आणि महाराष्ट्राचे विमान राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला, त्यांना अटक झाली, तरीही आपल्या मिस्टर क्लीन मुख्यमंत्र्यांना त्यांचा राजीनामा घेण्याची गरज वाटत नाहीय्‌. ते ज्या पक्षाचे प्रतिनिधीत्व करतात, त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कौतुक काय वर्णावे? त्या पक्षाचे नेते तर गुलाबरावांनी गैरकारभार केला म्हणचे जणू काय ऑलिम्पिकचे पदकच मिळवले असल्याच्या थाटात त्यांची पाठराखण चालवली आहे. आणि स्वतः देवकरांना आपण काही गैर केल्याचे मान्य नाही. त्यामुळे राजीनामा न देता  अजूनही ते खुर्ची बळकावून बसले आहेत.
या प्रकरणात पोलिसांचे अटकसत्र सुरू झाल्यानंतर सुरुवातीला न्यायालयाने सुरूवातीला ज्या परिस्थितीत जामीन मंजूर केला, तो नंतर नामंजूर करण्यात आल्याबरोबर जणू काय राज्यमंत्र्यांना ङङ्गबाईज्जत बरी' केल्याचा आव आणत राष्ट्रवादीची छाती दोन इंच फुगली. मंत्र्यांच्या राजीनाम्याची गरज नसल्याची भाषा स्वतः शरद पवार बोलू लागले. दोन दिवस कारागृहात राहून आलेला एक राज्यमंत्री मोठ्या दिमाखाने आपल्या विभागाचा कारभार पाहू लागला. विधिमंडळात थाटाने आमदारांच्या प्रश्नांची उत्तरे देऊ लागला. जणू काहीच घडले नसल्याच्या थाटातल्या त्यांच्या वागण्याला पक्षाकडूनही प्रबळ समर्थन मिळू लागले. दरम्यानच्या काळात जळगावच्या न्यायालयाने मंजूर केलेला जामीन उध न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने नामंजूर केला आणि  राष्ट्रवादीची पुन्हा धावपळ झाली. देवकरांकडून राजीनामा लिहून घेण्याचे नाटक नव्याने करण्यात आले. इतक्यात सर्वोध न्यायालयाने देवकरांची अटक पुढील काही दिवसांसाठी टाळण्याचे आदेश देताच राकाँ नेत्यांची मुजोरी पुन्हा सुरू झाली. त्यांनी पक्षाकडे दिलेला राजीनामा गुंडाळून बासनात ठेवण्यात आला. आता न्यायालयाच्या अंतिम आदेशानुसार नंतर त्याबाबतचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. देवकर अजूनही मंत्री असल्याचे सांगायला पक्षाचे नेते विसरलेले नाहीत....
काय तमाशा चालला आहे हा? ४८ तास कारागृहात राहून आलेली व्यक्ती इथे सरकारी नोकरीत कायम राहू शकत नाही आणि  राज्याच्या मंत्रिपदी मात्र कायम राहू शकते? जामीन मंजूर होतो की रद्द, यावर त्यांचा राजीनामा मंजूर करायचा की नाही हे ठरते? जामीन नामंजूर झाल्याची बातमी बाहेर येताच ङङ्गबेपत्ता' झालेले मंत्री अटक टळल्याच्या बातमीनंतर लागलीच अधिकार्‍यांच्या बैठकी घ्यायला हजर होतात. त्यांना आदेश देऊ लागतात. आपल्या समाजात लाल दिव्याच्या अधिकारातून लाभलेले संरक्षणाचे कडबोळे नैतिकता पायदळी तुडवण्याइतके मजबूत झाले आहे? खरं तर, एरवी मंत्र्यांना सलाम ठोकण्याची सवय जडलेली पोलिस यंत्रणा ज्या अर्थी या राज्याच्या एका राज्यमंत्र्याला अटक करते, त्याअर्थी त्यांच्याविरुद्ध तितके मजबूत पुरावे त्यांच्या हातात आलेले असणार. अशा सबळ पुराव्यांच्या आधारे झालेली अटक त्यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घ्यायला पुरेशी नाही? मग जामीनाच्या मंजुरी-नामंजुरीच्या तालावर राजीनाम्याचा कागद का नाचवला जातोय्‌? राजकीय नेत्यांच्या नीतीमत्तेची चाड इतकी लयाला गेली आहे की फौजदारी गुन्हे दाखल झालेले, कारागृहाची हवा खाऊन आलेले लोकही न्यायालयाने मंजूर-नामंजूर केलेल्या जामीनाच्या जोरावर सार्‍या जगाला शहाणपण शिकवू लागले आहेत? आणि राष्ट्रवादीला काय पडली गुलाबरावांना इतके पाठीशी घालण्याची? पक्षाच्या, जातीच्या राजकारणावर भ्रष्टाचार इतका हावी व्हावा? हा चमत्कार घडवून आणणार्‍या शरद पवारांनीच लोकांना उद्देशून केलेल्या भाषणांतून, या देशाला शूचिर्भूत राजकारणाची गरज असल्याची हास्यास्पद विधाने करायची?
तिकडे मुंबई प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष कृपाशंकरसिंहांना एका इफ्तार पार्टीत पोलिसांनी दिलेली सन्मानाची वागणूक अशीच वादग्रस्त ठरली आहे. ज्यांच्या बेनामी संपत्तीच्या तपासाचे आदेश खुद्द न्यायालयाने जारी केले आहेत, ज्यांच्या नावाने दोन दोन पासपोर्ट, दोन दोन पॅन कार्ड आढळून आले, ज्यांच्या घरात जिवंत काडतुसे आढळून आली, जे पोलिसांना सापडत नाही अशी ओरड खुद्द पोलिस करताहेत, त्यांचाच सत्कार करण्याची वेळ पोलिसांवर यावी?  फरार असलेल्या आमदार कृपाशंकरांना पोलिस विभागाने आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीचे रीतसर निमंत्रण मिळते, त्या निमंत्रणावरून ते  कार्यक्रमात जातीने हजरही होतात, मुख्यमंत्र्यांच्या बरोबरीने त्यांना मंचावर सन्मानाने स्थान दिले जाते, मुख्यमंत्र्यांच्या कानात गुजगोष्टी करताना त्याची छायाचित्रे टिपली जातात, या व्यक्तीच्या तपासाची जबाबदारी आपल्या विभागावर असल्याचा वरिष्ठ पोलिसांना काही काळ जाणिवपूर्वक विसर पडतो, कार्यक्रम आटोपून तपास यंत्रणेच्या नाकावर टिधून कृपाशंकर दिमाखाने निघून जातात आणि एक गुन्हेगार लोकप्रतिनिधी असा डोळ्यादेखत निघून जात असताना पोलिस त्याला सन्मानाने सलाम ठोकतात... काय पण थट्टा चालली आहे बघा लोकशाहीची! ज्यांच्या कोट्यवधीच्या बेनामी संपत्तीची चौकशी करायची आहे, ज्यांना भविष्यात अटक करायची त्यांना सलाम ठोकण्याची वेळ पोलिसांवर यावी?
या दोन्ही प्रकरणांमध्ये कायदा पायदळी तुडविण्याची, न्यायालयीन व्यवस्था न जुमानण्याची राजकीय नेत्यांची मानसिकता, त्यांची पाठराखण करण्याची पोलिसांची लाचारी. व्यवस्थेची अगतिकता आणि हा सारा प्रकार उघड्या डोळ्यांनी बघण्याची वेळ आलेल्या सामान्यजनांची हतबलता सिद्ध झाली आहे....

मुंबई.
९८८१७१७८३३

Saturday, June 9, 2012

आदर्श घोटाळा

आरोपपत्रासाठीचा विलंब संशयास्पदच!


करता कशाला त्यांच्या अटकेची नाटकं? शाळेप्रमाणे दोन दोन छड्या मारून सोडून दया सर्वांना. आणि हो! त्यांनाच कशाला, राज्यातल्या सर्व कारागृहात असलेल्या इतरही सर्व कैदया ना असेच छड्या मारून सोडून दया. गुन्हेगार ठरले असतानाही केवळ सत्तेच्या बळावर राजकीय कैदयाना कारागृहात सार्‍या सवलती, राजेशाही वागणूक मिळत असेल तर मग इतर कैदया वरच कशाला हवा काया बडगा ? आणि राजकीय गुन्हेगारांना अटक करण्याची नाटकं करता तरी कशाला? भ्रष्टाचार करणे हा त्यांचा जन्मसिद्ध अधिकार असल्याचे जाहीर करून, पुढील घोटाळ्यांसाठी जाहीर परवानगी बहाल करून टाका त्यांना...
अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतयार करणार्‍या गाजलेल्या आदर्श गृहनिर्माण सोसायटीच्या घोटाळ्यात नियमानुसार साठ दिवसांच्या आत सीबीआयने आरोपत्र दाखल न केल्यामुळे अटकेत असलेल्या सनदी अधिकार्‍यांसह नऊ जणांना जामीन देत कारागृहातून बाहेर काढण्याचे आदेश परवा न्यायालयाने जारी केल्यानंतर व्यक्त झालेली उपरोक्त प्रतिक्रिया बोलकी आहे.  सामान्य माणसाच्या मनात इथल्या राजकीय व्यवस्थेविरुद्ध खदखदणार्‍या संतापाची ती प्रतिक आहे.
खरंच, काय पण छान नाटकं चालली आहेत बघा! आधीच आदर्श घोटाळ्याप्रकरणी चौकशीचा फेरा संशय यावा इतक्या संथगतीने चालला आहे. सरकारने नेमलेल्या समितीला काय किंवा सीबीआयला काय, या प्रकरणात फार वेगाने फार पुढे जाता येत नाहीय्‌. अधून मधून न्यायालयाची चपराक बसल्याशिवाय, न्यायाधीशांनी कानउघाडणी केल्याशिवाय जराही पुढे सरकायचे नाही, असा निर्धार करूनच सारी यंत्रण मूग गिळून बसली असल्याचे चित्र आहे. मोठ्या मुश्किलीने ज्यांना ताब्यात घेतले, त्यांच्याविरुद्ध आरोपत्र दाखल करायला सीबीआयच्या कर्तव्यदक्ष अधिकार्‍यांना तब्बल साठ दिवस फुरसत होत नाही, हे काहीसे अनाकलनीय, नव्हे संशयाला वाट मोकळी करून देणारे चित्र आहे.
जयराज फाटक, रामानंद तिवारी, कन्हैय्यालाल गिडवाणी या दिग्गजांना हात लावणे तितकेसे सोपे नव्हते. न्यायालयाने चाबूक उगारला असला, तरी पुरावे असल्याशिवाय सीबीआयने या बड्या धेंड्यांना हात लावणे शक्यही नव्हते. अशा स्थितीत या बड्या लोकांना सीबीआयने अटक केली याचा अर्थ त्यांच्याविरुद्ध सबळ पुरावे हाती लागले होते. पण मग सबळ पुरावे हाती असताना या लोकांविरुद्ध साठ दिवसांच्या कालावधीत आरोपपत्र का दाखल झाले नाही, याचे उत्तर कोण देणार? सीबीआय कार्यालयात कामाचे ओझे वाढल्यामुळे असे घडले की कुठल्याशा राजकीय प्रभावामुळे हा चमत्कार घडून आला आहे? प्रकरण निपटविण्यासाठी जे थेट सीबीआयच्या अधिकार्‍यांनाच लाच देऊ करतात, अटकेनंतर कारागृहात जातानाही ज्यांच्या चेहर्‍यावरचे हसू ढळता ढळत नाही, ते  कन्हैय्यालाल गिडवाणी नावाचे व्यापारी वृत्तीचे राजकीय नेते काय काय चमत्कार घडवू शकतात हे त्यांच्या सूटकेतून सिद्ध झाले आहे, असे समजायचे का?सर्वसामान्य जनतेला घरं मिळत नाहीत, म्हाडाचे २५०, ३०० चौ. फूटांचे घर मिळाले तरी स्वर्ग गाठल्याच्या आनंदात रममाण होण्याची वेळ मध्यमवर्गीयांवर आली आहे, अशा मुंबई शहरातील महत्त्वाच्या, मोक्याच्या सार्‍या जागांवर बिल्डर्स, राजकीय नेते आणि सनदी अधिकार्‍यांच्या सोसायट्यांनी डल्ले मारले आहेत. सरकारी योजनांसाठी मुंबईत जागाच शिल्लक राहिली नसल्याची बोंब सर्वदूर सुरू असताना राजकीय नेते आणि सनदी अधिकार्‍यांचा सहभाग असलेल्या सोसायट्यांसाठी बर्‍या उपलब्ध होतात सरकारी जागा ! आदर्श सोसायटीतली कोट्यवधी रुपये किंमतीची घरं विकत घेणे काही राजकीय नेत्यांना आणि या सोसाटीसाठी मदत करणार्‍या सनदी अधिकार्‍यांना चांगले जमले. यातील आठ घरं तर नेमकी कुणी विकत घेतली हे कुणालाच ठावूक नाही. त्या अज्ञात व्यक्तींचे सत्य यायचे तेव्हा बाहेर येईल. पण ज्यांचे सत्य बाहेर आलेय्‌ त्यांचे काय, पुरावे हाती लागल्यावरही त्यांच्यावर कारवाई का होत नाही?
तसे आदर्शचे प्रकरण बरेच जुने आहे. ते चर्चेत दोन वर्षापूर्वी आले. लिहून घ्या या प्रकरणात कोणावरच कारवाई होणार नाही, असे कन्हैय्यालाल गिडवाणी त्यावेळीही पत्रकारांसमोर चुटक्या वाजवून सांगत होते... सत्तेच्या गुर्मीतून व्यक्त झालेले गिडवाणींचे हे बहुमोल वचन खरे करून दाखवण्याचा विडा तर उचललेला नाही ना सीबीआयने? तसे नसेल तर गिडवाणी, फाटक, तिवारींच्या अटकेनंतरच्या साठ दिवसात त्यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल न होण्याचे दुसरे कोणते महत्त्वपूर्ण आणि लोकांना पटेल असे कारण सांगता येणार आहे सीबीआयच्या अधिकार्‍यांना?
तिकडे राज्य सरकारने नेमलेल्या द्विसदस्यीय समिती चौकशी समितीला अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या मुहूर्तावर जागा लष्काराची नसल्याचा अंतरिम अहवाल सादर करण्याचा हुरूप येतो. सरकारला क्लिन चीट देण्यासाठी चाललेली या समितीची धडपड लपून राहिली नसताना इकडे सीबीआयने आरोपपत्र दाखल करण्याचासाठी लावलेला विलंब अनाकलनीय आहे. ज्या प्रकरणात तीन तीन माजी मुख्यमंत्र्यांची नावे घेतली जाताहेत, ज्या प्रकरणाकडे सार्‍या देशाचे लक्ष लागले आहे, त्या प्रकरणात गाजलेल्या झालेली ही अक्षम्य दिरंगाई आता संशयाच्या भोवर्‍यातही सापडली आहे.
कायदया वर बोट ठेवून या नऊ जणांच्या वकीलांनी सीबीआयची चूक उघडकीस आणून आपल्या अशीलांची सुटका करवून घेतली आहे. पाच पाच लाखांच्या जामीनावर ज्यांना सोडण्यात आले आहे. ज्यांनी आदर्श सोसायटीत कोटींचे घर घेतले त्यांना जामीनासाठीचे पाच लाख म्हणजे खसखस असणार हे स्पष्ट आहे.  पण कायातील तरतुदीचा लाभ आपल्या अशीलांना मिळवून देण्याची संधी वकीलांना मिळवून देण्यात सीबीआयच्या अधिकार्‍यांची भूमिकाच महत्त्वपूर्ण ठरली नाही ना, राजकीय दबावातून, कुणालातरी वाचविण्याच्या षडयंत्रातून जाणिवपूर्वक हा विलंब करण्यात आला नाही ना, हे देशवासियांना कळले पाहिजे. नाही तर लोकांच्या मनातला सीबीआयवरचा विश्वास उडायलाही फारसा वेळ लागणार नाही.


मुंबई.
९८८१७१७८३३

Friday, May 18, 2012

.

अमेरिकेतल्या विमानतळांवर सुरक्षा अधिकार्‍यांनी तासन्‌तास चालवलेल्या चौकशीच्यावेळी मुकाट्यानं उभा राहणार्‍या शाहरूखला भारतातल्या सुरक्षा रक्षकांवरच कसा हात उचलावासा वाटतो? क्रिकेटवरील प्रेमापेक्षाही पैशासाठी  स्पर्धेपुरता एका टीमचा ङङ्गमालक' झाल्याबरोबर तो स्वतःला सर्वेसर्वा कसा समजू लागतो? मैदानावरील प्रवेशाबाबतचे, स्टेडियममध्ये सिगारेट न ओढण्याचे नियम पाळण्याची जराही गरज त्याला का वाटत नाही? हा केवळ मप्रशनाचा तात्कालिक परिणाम आहे, की  मुळातच इथल्या व्यवस्थेला न जुमानण्याच्या वृत्तीतून आलेली ही मुजोरी आहे? भारतीय रसिक ज्यांना डोक्यावर घेऊन नाचतात ते पडावरचे कथित हिरो प्रत्यक्ष जीवनात कसे वागतात याचे हे उदाहरण आहे. दोन महिन्यापूर्वी एका खाजगी पार्टीत दारूच्या नशेत फरहा खानच्या नवर्‍याच्या थोबडीत लगावण्याच्या त्याच्या कृत्याच्या कृत्याची चर्चा आप थांबलेली नसताना वानखेडे स्टेडियममध्ये पाच वर्षांच्या प्रवेशबंदीची शिक्षा ओढावून घेणारी ही घटना शाहरूखबाबत घडली आहे.
..याच शाहरूखला डोक्यावर घेऊन नाचतो आपण?
भारतीय क्रीडा रसिकांच्या कमालीच्या क्रिकेटवेडाचा गैरफायदा घेत त्यांच्या खिशाला हात घालणार्‍या आणि त्यानिमित्ताने कोट्यवधी रुपयांचा धंदा करणार्‍या आयपीएल सामन्यातील कोलकाता नाईट राईडर्स या संघाचा मालक असलेल्या शाहरूख खानने परवा मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर घातलेला धिंगाणा आता पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचला आहे. प्रकरण पोलिस ठाण्यात पोहोचले म्हणून लागलीच शाहरूखवर कारवाई होईल असे मानण्याचे कारण नाही. फुटपाथवर झोपलेल्या लोकांच्या अंगावरून गाडी नेऊन त्यांना चिरडणार्‍या  सलमानवर गेली कित्येक वर्षे कारवाई झालेली नसताना, त्याचे काळवीटाच्या शिकारीचे प्रकरणही गंभीर असूनही बर्‍यापैकी थंड बस्त्यात गेले असताना, एका इसमाला बाईकने उडविणार्‍या जॉन अब्रहमवर कारवाई करायला आप कुणी धजावले नसताना, धाबुी आणि चार-दोन अर्वाध शिव्या हासडण्याच्या या ङङ्गमामूली' प्रकरणात राज्याचे कर्तबगार प्रशासन आणि आबा पाटलांची ङङ्गसक्षम' पोलिस यंत्रणा काही ठोस कारवाई करेल असा गैरसमज कुणी करून घेण्याची गरज नाही.
इथे प्रश्न पोलिसांनी शाहरूखवर कारवाई करण्याचा नाहीच. प्रश्न त्याच्या बेमुर्वतखोर वागण्याचा आहे.  सामना संपल्यानंतर रात्री बर्‍याच उशिरा दारूच्या नशेत आपले सहकारी आणि मुलांसह तो मैदानाच्या दिशेने निघाला. आयपीएलच्या स्पर्धेत सहभागी असलेल्या एका संघाचा मालकच मैदानाकडे निघाला म्हटल्यावर त्याला अडवणार कोण? बहुधा असाच प्रश्न त्याच्याही मनात  असावा. त्यामुळेच अगदी ङङ्गमालकाच्या' आवेशातच तो मैदानाच्या दिशेने निघाला. तिथल्या सुरक्षा रक्षकांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. त्यांची ही ङङ्गगुस्ताखी' एका टीम मालकाला कशी सहन व्हावी? एरवी खिजगणतीतही नसलेल्या या रक्षकांवर एक तुच्छ नजर टाकत शाहरूखने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. हे रक्षकही काल आपल्या कर्तव्याबाबत अधिकच जागरूक होते की काय कोण जाणे, पण त्यांनी शाहरूखच्या मैदानाकडील मुसंडीला जोरदार विरोध केला. एवढ्यात मुंबई क्रिकेट असोसिएशनचे काही पदाधिकारीही तिथे हजर झाले. पिऊन तऽऽर्र असला तरी शाहरूख मोठी असामी आहे याचे भान जपत या पदाधिकार्‍यांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. पण किंग खानांचा पारा आणखीच चढला. हे लोक भलेही एमसीएचे पदाधिकारी असतील, पण किंग खान म्हणजे एका टीमचा मालक. शरद पवार आदी राजकीय नेत्यांनी गेली काही वर्षे भारतात आरंभलेल्या क्रिकेटच्या धांतील तोही एक पार्टनर. त्याला अडविण्याची एमसीएच्या पदाधिकार्‍यांचीही काय बिशाद? बडी असामी असलेल्या शाहरूखने त्यांनाही चार-दोन शिव्या हासडल्या. ङङ्गइथेच गाडून टाकीन' अशी त्याची भाषा होती असं म्हणतात. दरम्यान रक्षकांना धाबुीही झाली. या प्रकाराने उपस्थित सारेच लोक चकीत झाले. पदाधिकारी व्यथित झालेत. एमसीएच्या काही पदाधिकार्‍यांना ही शिवीगाळ मनाला बोचली. या प्रकाराला माफी देणे योग्य ठरणार नसल्याचे मत व्यक्त झाले. आपण कुणाविरुद्ध तक्रार नोंदोवतोय्‌ आणि कुणाविरुद्ध बोलतोय्‌ याची कल्पना या पदादिकार्‍यांना नसावी असे कसे म्हणता येईल? सध्या क्रिकेटजगतावर खेळाडू आणि रसिकांच्या तुलनेत राजकीय नेते, बुकी, उोजक यांचा असलेला ताबा लक्षात घेता उा आपल्यावर हे प्रकरण कसे शेकू शकते, नेत्यांची नाराजी ओढावली जाणार याचीही पूर्ण कल्पना एमसीएच्या पदाधिकार्‍यांना असतानाही हे प्रकरण पोलिस ठाण्यात गेले. शाहरूखला वानखेडे स्टेडियमची दारेच बंद करण्याची भाषा बोलली जाऊ लागली याचा अर्थ प्रकरण खरंच तेवढं गंभीर असल्याचे मानले जात आहे.
मी घरीच होतो. सामना संपल्यावर मुलांना घ्यायला आपण स्टेडियममध्ये आलो, हे शाहरूखचे स्वतःचे विधान खरे मानले, तर त्याने या स्पर्धेची फ्रॅन्चायझी क्रिकेटवरील प्रेमापोटी नाही, तर केवळ पैशासाठी मिळवली, हे उघड सत्य आहे. जी टीम प्रत्यक्ष मैदानात उतरली होती, त्याचा मालक सामना सुरू असताना जर घरी बसला असेल, तर त्याचा दुसरा कोणता अर्थ निघतो? शरद पवारांचा क्रिकेटशी काय संबंध, हा कधीकाळी या देशातील भोळ्याभाबड्या लोकांना पडणारा प्रश्न मध्यंतरी टीना अंबानी, प्रिती झिंटा, शाहरूख यांच्याबद्दलही पडायचा. आताशा लोक समजदार झालेत. त्यांनाही आता असले क्लिष्ट प्रश्न पडेनासे झालेत. गेले काही वर्ष इतरांप्रमाणेच शाहरूखही या व्यवसायात उतरला आहे. क्रिकेटबद्दल भारतातल्या सर्वसामान्य क्रीडा रसिकांच्या मनात असलेल्या भावनेचा आयपीएलच्या माध्यमातून मांडण्यात आलेल्या बाजाराचा तोही एक गुंतवणूकदार आणि म्हणूनच कोट्यवधीच्या नफ्याचा भागीदार आहे. अशी गुंतवणूक करायला आणि नफा मिळवायला त्या व्यक्तीचा प्रत्यक्षात क्रिकेटच्या खेळाशी संबंध असण्याची गरज नाही. इतर कुठल्याही क्षेत्रातली यशस्वी कारकीर्द, प्रसिद्ध प्रतिमा आणि लोकप्रियता त्यासाठी पुरेशी आहे. पवारांनी मांडलेल्या क्रिकेटच्या व्यापारात कुणी सहभागी व्हायचे आणि कुणी नाही, हा ज्याच्या त्याच्या आर्थिक ऐपतीचा प्रश्न आहे. पण या लोकांचे सार्वजनिक जीवनातले वर्तन कसे असावे, याबाबत प्रश्न उपस्थित करण्याचा अधिकार तरी त्याच्या चाहत्यांना असावा की नाही?
अमेरिकेतल्या विमानतळांवर सुरक्षा अधिकार्‍यांनी तासन्‌तास चालवलेल्या चौकशीच्यावेळी मुकाट्यानं उभा राहणार्‍या शाहरूखला भारतातल्या सुरक्षा रक्षकांवरच कसा हात उचलावासा वाटतो? क्रिकेटवरील प्रेमापेक्षाही पैशासाठी  स्पर्धेपुरता एका टीमचा ङङ्गमालक' झाल्याबरोबर तो स्वतःला सर्वेसर्वा कसा समजू लागतो? मैदानावरील प्रवेशाबाबतचे, स्टेडियममध्ये सिगारेट न ओढण्याचे नियम पाळण्याची जराही गरज त्याला का वाटत नाही? हा केवळ मप्रशनाचा तात्कालिक परिणाम आहे, की  मुळातच इथल्या व्यवस्थेला न जुमानण्याच्या वृत्तीतून आलेली ही मुजोरी आहे? भारतीय रसिक ज्यांना डोक्यावर घेऊन नाचतात ते पडावरचे कथित हिरो प्रत्यक्ष जीवनात कसे वागतात याचे हे उदाहरण आहे. दोन महिन्यापूर्वी एका खाजगी पार्टीत दारूच्या नशेत फरहा खानच्या नवर्‍याच्या थोबडीत लगावण्याच्या त्याच्या कृत्याच्या कृत्याची चर्चा आप थांबलेली नसताना वानखेडे स्टेडियममध्ये पाच वर्षांच्या प्रवेशबंदीची शिक्षा ओढावून घेणारी ही घटना शाहरूखबाबत घडली आहे.
आताशा लोक आमीर आणि शाहरूख यांच्या वागण्याची तुलना करू लागले आहेत. चित्रपटातील त्याच्या अभिनय क्षमतेबद्दल पूर्ण आदर राखला तरीही, कुठे सामाजिक भान जपणारा आमीर आणि कुठे सार्वजनिक ठिकाणी एका मुलीला असभ्य भाषेत बोलणारा शाहरूख, असा प्रश्न साहजिकच उपस्थित होतो.  या असल्या लोकांना आपण डोक्यावर घेऊन नाचतो का, असाही प्रश्न स्वाभाविकच उपस्थित होतो. हा प्रश्न पडून ज्या दिवशी भारतीय रसिकजन कुण्याही व्यक्तीला या देशातल्या कायदा आणि व्यवस्थेपेक्षा मोठे करण्याइतके डोक्यावर घेणार नाहीत, तो सुदिन!
जाता जाता...
शाहरूख खानच्या वागण्याची गंभीर दखल घेत त्याला वानखेडेवर पाच वर्षांसाठी प्रवेशबंदी करण्याची शिक्षा मुंबई क्रिकेट असोसिएशनने ठोठावली असली तरी भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाचे उपाध्यक्ष आणि भारतीय क्रिकेटच्या बाजारीकरणाचे आणखी एक वाटेकरी राजीव शुक्ला यांनी या बंदीचा अंतिम निर्णय बीसीसीआय घेणार असल्याचे जाहीर केले आहे. शेवटी सारा मामला स्पर्धेच्या आर्थिक व्यवहाराशी संबंधित असल्याने शुक्लांना एमसीएच्या पदाधिकार्‍यांच्या अवमानापेक्षा, त्यांच्या भावनेपेक्षा आणि त्यांनी घेतलेल्या सामूहिक निर्णयापेक्षा एका टीमच्या मालकाची पाठराखण अधिक महत्त्वाची वाटणे स्वाभाविकच आहे. उा बीसीसीआयने या निर्णयाला केराची टोपली दाखवत शाहरूखची बाजू घेतली तर या वादात विजय शाहरूखचा झाला की क्रिकेटचा हे मात्र क्रिकेट रसिकांनाच ठरवायचे आहे....

मुंबई.
९८८१७१७८३३

Wednesday, April 18, 2012

कोण कुठली कॅग नावाची बाबूगिरीच्या प्रकियेतून काम करणारी एक यंत्रणा, सरकारचे इथे चुकले, तिथे चुकले असा अहवाल सादर करते. हे करायला नको होते, ते करायला हवे होते असे सल्ले देण्याची हिमत दाखवते? नारायणरावांसारख्या ङङ्गदादा' माणसाने बळकावलेल्या जमिनीची प्रकरणे बाहेर काढते? बहुधा यामुळेच की काय, पण सरकारवर, त्याच्या कारभारावर थेट टिका करायला धजावणार्‍या ङङ्गकॅग' सारख्या घटनात्मक संस्थांच्या अस्तित्वावरच घाला घालायला प्रसारमाध्यमातली काही मंडळी सरसावली आहे. थेट सरकारला आव्हान देणार्‍या या संस्था अस्तित्वात असाव्यात का, असल्याच तर त्यांनी सरकारची लक्तरे वेशीवर टांगावी का, असे ङङ्गलाखमोलाचे' प्रश्न या मंडळींनी उभे केले आहेत. या लोकांसमोर हे प्रश्न नेमके आजच कुणाच्या प्रेरणेने उभे ठाकलेत, हे सांगणे जिकरीचे आहे. पण सरकारी यंत्रणा आणि ती चालविणारे नेते बेलगाम वागले तरी चालेल, त्यांनी अगदी उच्छाद मांडला तरी चालेल, पण तो उच्छाद चव्हाट्यावर आणणारी कुठलीही यंत्रणा अस्तित्वात नको, अशी लोकशाहीचे ढोल पिटणार्‍या या मंडळीची धारणा झाली असल्याची बाब आता लपून राहिलेली नाही.

महाराष्ट्रातली भू-माफियागिरी
शरदरावांपासून विलासरावांपर्यंत, नारायणरावांपासून पतंगरावांपर्यंत, मनोहरपंतांपासून अजितदादांपर्यंत, अशोकरावांपासून छगनरावांपर्यंत सर्वांनाच जमीन प्रिय आहे. त्यातही जमीन सरकारी असेल, तर ती त्यांना अधिकच आवडू लागते. नजरेत भरलेल्या जमिनी बळकावण्याचे मनसुबे त्यांच्या मनात तयार होतात. त्यासाठी गरज पडली तर कायदे पायदळी तुडविण्याची त्यांची तयारी असते. त्या कुणाच्या नावाने बळकवायच्या यांची फारशी चिंता त्यांना सतावत नाही. कारण त्यासाठीच विविध शैक्षणिक, सामाजिक आणि व्यापारी संस्था त्यांनी केव्हाच दावणीला बांधून ठेवल्या असतात...
शरद पवारांच्या काळातले ङङ्गभूखंडाचे श्रीखंड' अख्ख्या महाराष्ट्रात गाजले. तरीही त्यांचे आणि एकूणच राजकीय नेत्यांचे जमीन पुराण मात्र संपता संपत नाही. वेगवेगळ्या शहरांमधल्या, राज्य किंवा राष्ट्रीय महामार्गांवरच्या प्राईम लोकेशन्सच्या जमीनी नेमक्या कुणाच्या घशात गेल्या आहेत, याचे जरासे अवलोकन केले की तमाम नेत्यांनी चालविलेली महाराष्ट्राची लूट क्षणात लक्षात येते.
केंद्र सरकारच्या स्तरावर आजवर झालेल्या वेगवेगळ्या घोटाळ्यांचे स्वरूप लक्षात घेतले, तर त्यातील बहुतांश खरेदीच्या, देवाण-घेवाणाच्या, दलालीच्या व्यवहारातले घोटाळे आढळून येतात. ४००० कोटींचे हर्षद मेहता प्रकरण, ९५० कोटींचा चारा घोटाळा, ५००० कोटींचे हवाला कांड, बोर्फोर्स तोफांच्या खरेदीतली दलाली, १७१ कोटींचे तेलगी प्रकरण, मायावतींचे ताज कॅरीडॉर प्रकरण, तर अगदी अलीकडच्या काळात उघडकीस आलेले स्पेक्ट्रम विक्रीचे घोटाळे यात आयएएस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्या भीडबाजार मधील जमीनीच्या प्रकरणाचा अपवाद वगळला, तर इतर बहुतांश प्रकरणात नेत्यांनी वेगवेगळ्या ङङ्गव्यवहारांमधून' पैसे लाटल्याचे स्पष्ट होते. महाराष्ट्रातील राजकीय नेते मात्र, या पद्धतीला अपवाद ठरले आहेत. त्यांनी पैसे लाटण्याची अनोखी शल शोधून काढली आहे. आणि ती शल आहे, मोक्याच्या जागांवरील मौल्यवान सरकारी जमिनी कवडीमोल दराने बळकावण्याची. गलेलठ्ठ पगार घेणार्‍या सनदी अधिकार्‍यांना बहाल करण्यात आलेल्या ङङ्गआदर्श' ची जागा असो, वा मग संजय देवतळे, वसंत पुरके यांच्या सारख्या ङङ्गगरीब' लोकांना घरे बांधण्यासाठी देण्यात आलेली एका खाजगी सोसायटीची जागा असो. पतंगराव कदमांना देण्यात आलेली लोहगावची जमीन असो किंवा मग पवार कुटुंबियांच्या लवासा प्रकल्पासाठी देण्यात आलेली तलावाची पाण्याखालील आदिवासींची जागा असो. अपवाद वगळता या राज्यातल्या जवळपास सर्व राजकीय नेत्यांनी पक्षाच्या भिंती तोडून, कायाची जराही तमा न बाळगता शासकीय जमिनी लाटल्या आहेत. निवडणूक लढवली रे लढवली, ती जिंकली रे जिंकली की यांचे एकच काम! शैक्षणिक संस्था स्थापन करणे, स्वातंत्र्याच्या सहा दशकांतही राज्याच्या कानाकोपर्‍यात शिक्षणाची व्यवस्था पोहोचविण्यात अपयशी ठरलेल्या सरकारकडे शिक्षणाच्या प्रसाराच्या नावाखाली जमिनी मागणे, त्या मिळाल्या रे मिळाल्या की मग त्या कवडीमोल दराने, बहुतांशी फुकटातच घेतलेल्या सरकारी जमिनीवर आपली किंमती शैक्षणिक दुकाने थाटणे. शिक्षणाशिवायही अन्य व्यवसाय तिथे करणे ...काय पण मस्त धंदा आहे ना?
राज्यातल्या ग्रामीण भागापर्यंत शिक्षणाचा प्रसार करणे सरकारला शक्य होणार नाही म्हणून खाजगी संस्थांच्या माध्यमातून शाळा, महाविालये उघडता यावीत यासाठी त्यांना अल्पदरात सरकारी जागा उपलब्ध करून देण्याची कल्पना वसंतदादा पाटील यांनी कधीकाळी मांडली होती. नंतरच्या काळात शिक्षणाच्या प्रसारापेक्षाही ङङ्गअल्पदरात सरकारी जमिनी लाटणारी' पिलावळं राजकारणात निर्माण झाली. आजची पंचतारांकीत महाविालये, त्याच्या भव्य आणि आलीशान इमारती, तिथली भरमसाठ फी बघितल्यानंतर, श्रीमंती थाटाच्या महाविालयांच्या माध्यमातून शिक्षणाचा व्यापार मांडणार्‍या व्यवस्थापनाकडे फक्त जमीन विकत घेण्यासाठीच पैसा नव्हता का, असा प्रश्न उपस्थित होतो. त्याहीपेक्षा शिक्षणाच्या नावाखाली बळकावलेल्या जमिनींचा अशैक्षणिक कारणांसाठी वापर करण्याची प्रथाही अलीकडे रुढ होऊ लागली आहे.
महाराष्ट्रात नागरीकरण झपाट्याने वाढत आहे. लोक मोठ्या प्रमाणात शहरांकडे धाव घेऊ लागले आहेत. परिणामी शहरांमध्ये जागेची कमतरता जाणवू लागली आहे. उपलब्धता कमी झाली की वस्तूची किंमत वाढते हे सूत्र इथेही लागू पडतेय्‌. मुंबई सारख्या शहरात तर जमिनीच्या किंमती खरोखरीच आकाशाला भिडलेल्या. अशा परिस्थितीत शहरातल्या आणि शहरालगतच्या मोक्याच्या जागांवर चाणाक्ष राजकीय नेत्यांची नजर न पडली तरच नवल! कुणी आजची तर कुणी भविष्यातली गरज लक्षात घेत जमिनी घशात घालणे सुरू केले आहे.
कॅगच्या यंदाच्या अहवालात राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, छगन भुजबळ, नारायण राणे, पतंगराव कदम, राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासह मंत्रिमंडळातील १० मंत्र्यांनी शासकीय जमिनी सवलतीच्या दरात लाटल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. मंत्रिमंडळातल्या सहकार्‍यांचीच दुकानदारी चव्हाटयावर आणणारा हा अहवाल दडपून ठेवण्याचे सरकारी मनसुबे उधळून लावत विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे आणि देवेन्द्र फडणवीस यांनी गेल्या आठवड्यात या अहवालाची सीडी अध्यक्षांच्या स्वाधीन करून खळबळ उडवून दिली.
तोंडी लावायला स्वतःसोबत चार-दोन सामाजिक, शैक्षणिक संस्थांसमोरही जमिनीचे तुकडे फेकले की आपलेही फावते, हे हुशार राजकीय नेत्यांच्या केव्हाच लक्षात आले आहे. त्यामुळे अशा संस्थांनी सरकारकडे जमिनी मागण्याचे प्रमाण अलीकडे बरेच वाढले आहे. या राज्याचे तत्पर सरकारही राजकीय नेत्यांनी केलेल्या मागण्यांची पूर्तता करण्यासाठीच जणू कार्यप्रवण झाले असल्याच्या थाटात त्यांचे अर्ज वेगवान गतीने मार्गी लावत सुटले आहे. त्यातही आमदारकी किंवा खासदारकी म्हणजे अशा जमिनी बळकावण्याचा जणू परवानाच!
लवासातली जमीन खरे तर आदिवासींची. कृष्णा खोरे प्रकल्पातली धरणाची कामे करण्याकरता अधिग्रहीत केलेली. पण त्यातली १२८ हेक्टर जमीन पवारांच्या लवासाला देण्यात आली आहे. ही जमीन पाण्याखालची आणि म्हणूनच बिनकामाची असल्याचे सांगून या जमीन वाटपाचे गांभिर्य कमी करण्याचा प्रयत्न रामराजे निंबाळकर करतात. पण तेवढ्या जागेवरचे अख्खे जलाशयच लवासाला बहाल करण्यात आल्याची बाब मात्र, जाणिवपूर्वक दडवले जाते. शासकीय जमिनी केवळ आम्हीच लाटल्या नाहीत, तर विरोधकांनाही दिल्या या नारायण राणेंच्या आरोपाने काही काळ राजकीय खळबळ उडेलही कदाचित! पण त्याने अजित पवारांची आर्थिक गुंतवणूक असलेल्या ए. जी. मर्कंटाईल या कंपनीला देण्यात आलेल्या कर्जत जवळच्या भिलवले धरणाजवळच्या कोटयवधी रुपये किंमतीच्या जमिनीच्या प्रकरणाचे गांभिर्य थोडीच कमी होणार आहे?
पुण्यात पवार, कदम, नाशकात भुजबळ, नागपुरात चतुर्वेदी, देशमुख, कोकणात राणे, लातुरात विलासराव.... अक्षरशः जहागिरदार्‍या वाटून घेतल्याच्या थाटात लूट चालवली आहे या राज्यात सत्ताधार्‍यांनी? आपापल्या परिसरात लूटीचे अधिकार बळकावून बसलेत सारे नेते? यांचेच अर्ज कसे मंजूर होतात आणि यांनाच कशा विनासायास मिळतात जमिनी? नेत्यांनी घातलेला हैदोस बघून अधिकारीही चेकाळलेत आता. त्यांचीही, विशेषतः जमिनीच्या व्यवहाराशी संबंध असलेल्या महसूल विभागातील अधिकार्‍यांचीही नावे जमिनी बळकावणार्‍यांच्या यादीत मोठ्या संख्येत समाविष्ट होऊ लागली आहेत आताशा. कुणाच्या राजाश्रयाने वाढतेय्‌ अधिकार्‍यांची हिंमत?
बेशरमकीचीही परिसीमा बघा! शरद पवार म्हणतात, अशा जमिनी देण्यात गैर काहीच नाही. या राज्यात भूखंडाचे श्रीखंड चाखण्याची सुरूवात करण्याचे श्रेय ज्यांना जाते, त्या पवारांची ही वचनामृते काय वर्णावी? त्यावर कडी नारायणरावांची. कॅगचा अहवाल म्हणजे काही आरोपपत्र नव्हे, ही त्यांनी महाराष्ट्रीय जनतेला दिलेली मौल्यवान माहिती सर्वांनी जतन करून ठेवावी अशीच आहे. बरोबरच आहे नारायणरावांचे! कोण कुठली कॅग नावाची बाबूगिरीच्या प्रकियेतून काम करणारी एक यंत्रणा, सरकारचे इथे चुकले, तिथे चुकले असा अहवाल सादर करते. हे करायला नको होते, ते करायला हवे होते असे सल्ले देण्याची हिमत दाखवते? नारायणरावांसारख्या ङङ्गदादा' माणसाने बळकावलेल्या जमिनीची प्रकरणे बाहेर काढते? बहुधा यामुळेच की काय, पण सरकारवर, त्याच्या कारभारावर थेट टिका करायला धजावणार्‍या ङङ्गकॅग' सारख्या घटनात्मक संस्थांच्या अस्तित्वावरच घाला घालायला प्रसारमाध्यमातली काही मंडळी सरसावली आहे. थेट सरकारला आव्हान देणार्‍या या संस्था अस्तित्वात असाव्यात का, असल्याच तर त्यांनी सरकारची लक्तरे वेशीवर टांगावी का, असे ङङ्गलाखमोलाचे' प्रश्न या मंडळींनी उभे केले आहेत. या लोकांसमोर हे प्रश्न नेमके आजच कुणाच्या प्रेरणेने उभे ठाकलेत, हे सांगणे जिकरीचे आहे. पण सरकारी यंत्रणा आणि ती चालविणारे नेते बेलगाम वागले तरी चालेल, त्यांनी अगदी उच्छाद मांडला तरी चालेल, पण तो उच्छाद चव्हाट्यावर आणणारी कुठलीही यंत्रणा अस्तित्वात नको, अशी लोकशाहीचे ढोल पिटणार्‍या या मंडळीची धारणा झाली असल्याची बाब आता लपून राहिलेली नाही. निर्लज्ज सरकारने आप हा अहवाल अधिकृतपणे विधिमंडळात मांडलेला नाही. आणि आता तर तो फेटाळून लावण्याचे षडयंत्र रचले जात आहे. मंत्र्यांना अडचणीत आणणारा अहवाल फेटाळून लावण्याची ही सरकारी तर्‍हा चीड आणणारी आणि लोकशाहीला घातक आहे.
राज्याच्या एका भागात, पोटाची खळगी भरण्यासाठी गहाण टाकलेली हाची शेतजमीन सावकाराच्या तावडीतून सोडवता सोडवता नाकीनऊ आलेला बळीराजा गळ्यात फास आवळून घेत आहे. आणि विलासराव देशमुख सुभाष घईंना सरकारची जमीन सहजपणे देऊन मोकळे होतात? श्रीमंतांच्या दिमतीला सज्ज होण्यासाठीच तयार झालेल्या आणि धर्मदाय कायदा धाब्यावर बसवून गरिबांना उपचार नाकारणार्‍या अंबानींच्या मुंबईतल्या रुग्णालयाला कशाला हवी स्वस्तातली सरकारी जमीन? पण आयजीच्या जीवावर उदार झालेल्या बायजीचे जाते काय जमिनी वाटत सुटायला? उदार सरकारने त्यांनाही देऊन टाकली जमीन....
विलासराव देशमुख यांच्या मांजरा एज्युकेशन सोसायटी करता
* स्पर्धेत ४ जण असताना मुख्यमंत्र्यांनी २८ सप्टेंबर २००५ ला मांजरा एज्युकेशन सोसायटीलाच जमीन प्राधान्याने देण्यात आली.
* मागील कालावधीत या जागेवर बांधकाम झालेले नाही. उलट आता बदलवून मागितली जात आहे..
*३० कोटीची जागा ६ कोटीमध्ये दिली आणि करारातील २ वर्षांत वापर झाली नाही, तर जागा शासनजमा होईल, हा अत्यावश्यक मुद्दा जाणीवपूर्वक गायब करण्यात आला.
छगन भुजबळ यांच्या मुंबई एजुकेशन ट्रस्ट करिता
* नाशिक येथे २००३ मध्ये ४१,३०० मीटर जागा सवलतीच्या दरात १.५५ लाख रूपयात दिली.
* समीर भुजबळ यांनी नाशिक येथील सार्वजनिक बांधकाम विभागाची ९१,३०० चौ. मी. जमीन गौण खजिनासाठी राखून ठेवलेल्या जागेची मागणी केली.
* त्यातील ५० हजार चौ. मी. जागा नियम धाब्यावर बसवून जानेवारी २००१ रोजी भुजबळांच्या अभियांत्रिकी महाविालयाला देण्यात आली.
* अर्थ सचिवांनी हरकत केराच्या टोपलीत टाकून या जागेच्या वितरणाचा निर्णय झाला आणि ९.३९ कोटींची जागा ९.०८ लाख अशा मातीमोल भावाने देण्यात आली.
* छगन भुजबळ बांधकाम मंत्री असताना त्यांच्याशी संबंधित ट्रस्टला जागा देण्याच्या प्रकारावर कॅगने ताशेरे ओढल्याचे म्हटले जाते.
नारायण राणे सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळ
१. समाजभवनासाठी १७१९.५ चौ. मी. जागा १०७१२ रूपये वार्षिक भाड्याने
२. जागेची किंमत ६.६८ कोटी 'ग्रांड इम्पेरीयल बॅक्वे' २ लाख रोजचे भाडे, रेस्टॉरंट आणि बारची व्यवस्था

वसंतदादा पाटील प्रतिष्ठान
१. बेकायदेशीर बांधकाम १७.३० कोटी थकले

पतंगराव कदम यांच्या भारती विापीठाकरिता
* ४.८० कोटींचे बाजार दर असलेली लोहगाव पुणे येथील १९,२०० चौ.मी. कमालीच्या सवलत दरात देण्यात आली. मात्र, त्या जागेचा वापर न केल्याने नियमानुसार परत घेण्याचा अहवाल सादर होऊन त्यावर आप कारवाई नाही.

रिलायन्स कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल
धर्मदाय कायाप्रमाणे ४० टक्के खाटा गरिबांसाठी आरक्षित ठेवण्याचा नियम धाब्यावर बसविणार्‍या कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलवर सरकारची मेहेरबानी झाली आहे. खाटांसाठी १५ हजार ते २० हजार असे हायफाय दर आकारणार्‍या या रुग्णालयाकरता हॉस्पीटलच्या जागेची मालकी बदलली गेली. त्यासाठी १७४.८८ कोटी भरणे आवश्यक असताना या हॉस्पीटलला त्यातून बरीच सवलत देण्यात आली असल्याचेही कॅगने म्हटले आहे.
नागपूर जिल्हा काँग्रेस कमिटी
* ११२६.४५ चौ. मी.चा प्लॉट कार्यालय काँग्रेसचे बांधण्याकरिता देण्यात आला.
* तेथे व्यापारी बांधकाम करून गाळे विकण्याचे काम या पक्षाने केले.
* २.०२ कोटींची जागा घेण्याचे टाळले जात आहे.

राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या विखे-पाटील फाऊंडेशन करिता
* पुणे येथे पदवी महाविालयाकरिता ५३९६ चौ. मी. जागा उपलब्ध करून देण्यात आली.
* सवलतीच्या दरात त्याची किंमत ९१ लाख होत असताना ही जागा केवळ १७ लाख रुपये आकारून सरकारचे ७३ लाखांचे नुकसान करण्यात आले आहे.

मराठवाडा मित्र मंडळ
* पुणे येथील प्राथमिक शाळा आणि हॉस्टेल करीता २००२ मध्ये दिली. २९,५५० चौ.मी. जागा हवेली येथे ४८०२ रूपयांना दिली.
* इंजिनियरींग आणि एम. बी. ए. कॉलेज उघडले. कोट्यवधी अनर्जित रक्कम बुडवली.

Saturday, March 31, 2012

राजा उदार झाला अन्‌ सिलेंडर फक्क्त बारा रुपयांनीच महागले!

राजा उदार झाला आणि महाराष्ट्रात स्वयंपाकाचा गॅस वीसच्या
ऐवजी फक्क्त बाराच रुपयांनी महागला. काय पण नाटकी आहेत राज्यातल्या सत्ताधारी पक्षाचे नेते! अजित पवारांनी गॅस सिलेंडरवर पाच टे कर आकारला तर
लागलीच माणिकराव ठाकरेंच्या नेतृत्वात काँग्रेसचे एक
शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या दरबारात हजर झाले. ही भाववाढ
योग्य नसल्याची जाणीव राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या अंतर्मनालाही लागलीच झाली. त्यांनीही अजित पवारांच्या या निर्णयाला विरोध
दाखविण्याच्ी हिंमत दाखवली. एरवी पवारांसमोर ब्र काढायलाही न धजावणार्‍या राष्ट्रवादीच्या चार दोन ठराविक नेत्यांनी या निर्णयाला असलेला आपला विरोध निदान विधिमंडळाच्या
रेकॉर्डवर नोंदविण्यापुरता तरी बोलून दाखवला. त्यांच्या
मागणीपुढे नमते घेत पाच टक्क्यांचा कर तीन टक्क्यांवर काय
आला तर या आनंदाचे भरते आले? लागलीच पवारांचे आभार मानणार्‍या जाहिराती दूरचित्रवाणीवरून झळकू लागल्या. पाच वाजता निर्णय अन्‌ सहा वाजता जाहिराती? कुणाला मूर्ख बनविण्याचा प्रकार चाललाय हा? आणि पवारांचे आभार कशासाठी, तर पाच टक्क्यांचा कर तीन टक्क्यांचा आणला म्हणून? पण सरतेशेवटी गॅस सिलेंडर महागले ते महागलेच त्याचे काय?
वीस रुपांची वाढ फार होते, त्यामुळे सिलेंडर फक्त बारा
रुपयांनीच महाग करावा, अशीच मागणी होती माणिकराव
ठाकरेंची? महागाईने पिचलेली जनता या दरवाढीवर क्षोभ व्यक्त
करेल याची जाणीव झाल्यानेच सत्तेतल्या या दोन्ही पक्षाच्या
नेत्यांनी विरोधाची नाटकं केलीत. पवारांनीही सार्‍या महाराष्ट्रावर उपकार केलच थाटात दरवाढ थोडीशी कमी करून स्वतःची पाठ थोपटून घेतली.
हे तर ङङ्गसेल'चा बाजार मांडणार्‍या व्यापार्‍यांसारखं झालं. वस्तूंचे
दर आधीच दुप्पट करून टाकायचे आणि नंतर तीच वस्तू पन्नास
टे सवलतीच्या दराने ङङ्गसेल'च्या नावावर खपवायची.
राज्याच्या अर्थमंत्र्यांनी तरी वेगळं काय काम केलं? सेल
लावणार्‍या त्या व्यापार्‍यांसारखंच लोकांना फसववलं.
काजूवरचा टॅक्स कमी करायचा आणि कापूस विकणार्‍या
शेतकर्‍यावर मात्र खरेदीकर लावायचा. गॅसवरचा वाढवायचा
अन्‌ शिजववण्यासाठी तयार पदार्थ तयार करणार्‍या पेप्सी
कंपनीला करातून सूट ायची हे कुठले धोरण? पेप्सी साठी
कमी करण्यात आलेला कर तीन टक्क्यांनी वाढवून गॅसवरील
कर न लादण्याचा निर्णय अर्थमंत्री का घेऊ शकले नाहीत, हा
प्रश्न त्यांचे अभिनंदन करणार्‍या, आभार मानणार्‍या वा लवून
मुजरा करणार्‍यांच्या मनात का उद्‌भवत नाही? की
मुख्यमंत्र्यांच्या दरबारी शिष्टमंडळ नेण्याची नाटकं
करणार्‍यांनाही ही फसवणूकच अपेक्षित होती?
राज्य सरकारला २७,७७७ कोटी रुपयांचा कर गेल्या वर्षभरात
वसूल करता आलेला नाही. शेअर बाजारातील व्यवहारावर ०.०५
टे कर लावण्याचा निर्णय घेणार्‍या अर्थमंत्र्यांना गेल्या वर्षभरात
हा कर लागू देखील करता आलेला नाही. का? शेअर बाजारातली गुंतवणूक आपल्या समाजातला कोणता वर्ग करतो ? त्यांना०.०५ टे देखील कर लागू करता येत नाही सरकारला? आणि सर्वसामान्य जनतेवर ५ टक्क्यांचा कर लादायला बरा
हुरूप येतो यांना!
मुळात, कुणाला लूटायचे अन्‌ कुणाला आश्रय ायचा, याबाबतची
सरकारची धोरणं स्पष्ट आहेत. राज्याच्या टोकावर वसलेल्या
आदिवासी माणसाचं बखोटं धरून त्याला पोलिस ठाण्यात
आणण्यासाठी इथे कायदा आडवा येत नाही. पण नक्षल्यांना
मदत करणारे, पैसा आणि शस्त्र पुरवणारे लोक कोण आहेत,
याची पूर्ण कल्पना असतानाही त्यांना हात लावायला मात्र यांची
हिंमत होत नाही. त्यासाठी पुरावे नसल्याची फडतूस कारणे
राज्याचे गृहमंत्री सांगतात?
सध्या एकमेकांवर कुरघोडी करण्यातच काँग्रेस आणि
राष्ट्रवादीचे नेते मश्गूल आहेत. गॅस दरवाढीचा निर्णय जाहीर
झाल्यावर काँग्रेसचे नेते मुख्यमंत्र्यांकडे धावून गेलेत, ते अर्थमंत्री
राष्ट्रवादीचे असल्यामुळे. काँग्रेसचे नेते या दरवाढीला विरोध
करून लोकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करताहेत
म्हटल्यावर राकाँच्या नेत्यांचे पोट दुखले नसते तरच नवल!
अर्थमंत्री स्वपक्षाचे असूनही त्यांच्या या दरवाढीला विरोध
करण्याची स्ट्रॅटेजी त्यांना ठरवावी लागली. दरवाढ यांनीच जाहीर
करायची, त्याला विरोधही यांनीच करायचा, दरवाढ कमी
करण्याची मागणीही यांनीच करायची आणि ती कमी करण्याचा
निर्णयही यांनीच घ्यायचा! ढोंगबाजीची मर्यादा गाठणारा हा संतापजनक प्रकार आहे. राज्यातील जनतेला गृहीत
धरण्याच्या शैलीचा हा परिणाम आहे. जनतेला त्याचे काही
वाटत नाही तोवर राज्यातल्या जनतेला मूर्ख समजून चाललेली ही नाटकबाजी भविष्यातही अशीच सुरू राहणार आहे.

जाता जाता....
राज्याचे मुख्यमंत्री बदलणार असल्याच्या चर्चेचे गुर्‍हाळ पुन्हा एकदा
सुरू झाले आहे. ऐन अधिवेशनाच्या काळात काही असंतुष्ट
आमदारांनी हिंमतीने विधानभवनातच एक बैठक घेतल्याची चर्चा
आहे. दिल्लीत सोनियादरबारी जाऊन आपली गार्‍हाणी मांडण्याचे
मनसुबेही त्यांनी जाहीर केल्याचे म्हटले जाते. त्यांच्या या ङङ्गधाडसाचे' कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. पण काँग्रेस पक्षात
मुख्यमंत्र्यांना नेमण्याचे वा हटविण्याचे अधिकार राज्यातल्या
आमदारांना असल्याचा एक ङङ्गविनोद' त्यातून लोकांना कळला
आहे. एक मात्र खरे की मुख्यमंत्र्यांनी आता त्या नाराज
आमदारांना गोंजारण्याची मोहीम आरंभली आहे.

सुनील कुहीकर
...यांच्या भरवशावर चाललीय अण्णांची लढाई?

मूठभर सामाजिक कार्य करताच ते पसाभर केल्याचा आवा ज्यांचा
चेहर्‍यावर उमटतो आणि मनात घर करतो, त्यांचा किरण बेदी आणि
केजरीवाल होतो. अण्णा हजारेंसारख्या उंचीच्या सामाजिक
कार्यकर्त्याच्या तपश्चर्येचे बळ लाभल्याने लोकपाल बिलाच्या
आंदोलनाला दिल्लीच्या रामलीला मैदानावर प्रचंड जनसमर्थन मिळाले
आणि अण्णांपेक्षांही त्यांच्या टीममधील नेत्यांचीच छाती गर्वाने फुगून
गेली. आंदोलनाला लाभलेले यश अण्णांच्या प्रतिमेवरील विश्वासाला
लाभलेले यश होते. पण त्यांच्या सभोवतालच्या कडबोळ्यातील
लोकांना ते त्यांचेच यश वाटू लागले आणि इथेच त्यांची फसगत
झाली.
केजरीवाल, किरण बेदी, स्वामी अग्रिवेश यांनी कुठलेच सामाजिक
काम केले नाही, असे नाही. त्यांच्या साामजिक जाणिवा बोथट आहेत
असेही नाही. पण अण्णांच्या तपश्चर्येचे बळ त्यांना नाही. अण्णांनी
आयुष्य वेचून कमावलेली उंची गाठायला त्यांना अजून बराच
अवकाश आहे. पण आंदोलनाला पाठिंबा देत रामलीला मैदानावर
जमलेल्या नुसत्या गर्दीनेच हे सारे नेते भारावले आणि त्यांचा तोल
ढासळला. हे सारे आपल्यामुळेच घडत असल्याचा त्यांच्या मनातला
भासही त्याला बराचसा कारणीभूत ठरला.आणि मग अण्णांना डावलून
हे कडबोळे काम करू लागले. पत्रकारांना अण्णांना भेटू देण्याचे हेच
लोक टाळू लागले. लोकांनी अण्णांना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरेही
माईक हिसकावून स्वतःच देऊ लागली. समोरची गर्दी स्वतः
जमवलेली नसली तरी ती बघून जो उत्साह या नेत्यांच्या मनात
संचारला, त्याच्या बळावर ते सरकार हादरविण्याची भाषा बोलू
लागले.
रामलीला मैदानावरीची गर्दी जर या नेत्यांनी जमवली होती, तर ती
काही दिवसांपूर्वीच्या जंतरमंतर वरील आंदोलनाच्या वेळीही त्यांना
जमविता यायला हवी होती, नंतरच्या मुंबईच्या आझाद मैदानावरील
आंदोलनाच्या वेळीही या नेत्यांना ती गर्दी जमवता आली नाही.
मुळात रामलीला मैदानावरील गर्दीचे श्रेय केंद्र सरकारने अण्णांना
केलेल्या अटकेचे, त्यातून लोकांच्या मनात उमटलेल्या संतापाचे
होते. त्यातून अण्णांनी कारागृहातच उपोषण आरंभल्याने लोकांच्या
मनातील त्यांच्या प्रतिमेला आणखीच चकाकी आलीकोणी तरी
आपल्या मनातल्या संतापाला वाट करून दिल्याच्या आनंदात
लोकाींनी अण्णांच्या नावाच्या टोप्या डोक्यावर मिरवत रस्त्यावर
उतरणे पसंत केले. त्यांच्या भोवतालच्या चौकडीला मात्र हे कधी
उमगलेच नाही. उमगले असेल, तरी त्यांनी त्या क्षणी तरी त्याचा
लाभ उचलण्याचे ठरविले असावे. कारण त्यावेळचे त्यांची भूमिका,
अण्णांना बाजूला ठेवून निर्णय घेण्याची त्यांची तर्‍हा तरी निदान हेच
सांगते.
पंतप्रधानांना आव्हान देणारी भाषा असो किंवा सरकार उलथवून
टाकण्याची घोषणा, सर्वच राजकीय नेत्यांबाबत अर्वाच्च्य शिव्यांची
लाखोली असो की मैदानावरील भव्य मंचावरील त्यांची नाटकं आणि
बेताल भाषणं या सर्वच बाबी आंदोलनाचे क्षणिक यश बघून
संचारलेल्या उत्साहातून आलेल्या होत्या.
एखाा देशातले स्वातंत्र्यांचे आंदोलन जनसमर्थनाशिवाय उभे राहात नाही. जनसमर्थन जुळवण्याचे काम सहज होऊन जात नाही. एखाा
मुद्दयावरून देशातले जनमत पेटवणे हे आगपेटीची काडी
पेटविण्याइतके सोपे नाही. त्यातही भारतासारख्या विशालकाय
देशात एखाा मुावर लोकांना एकत्र आणायचे, एखादे आंदोलन
उभारायचे तर, त्यासाठी नेताही तसाच हवा असतो. बाबा रामदेव
सारख्या पळपुट्यांचे ते काम नव्हे. अण्णा हजारे यांनी सामाजिक
कार्यासाठी वेचलेल्या आयुष्यातून ती ताकद कमावली हे खरे असले
तरी संपूर्ण देशाचे पाठबळ लाभण्याइतके मोठे काम त्यांचेही आप
झालेले नव्हते. माहितीच्या अधिकाराचे त्यांचे आंदोलन नाही
म्हणायला महाराष्ट्रापुरतेच मर्यादीत राहिले होते. लोकपाल
विधेयकाच्या माध्यमातून देशभर जनमत तयार करण्याची संधी
मिळणार होती. ती काही प्रमाणात उपयोगात आणली गेलीही. पण
अण्णा हजारेही प्रसिद्धीच्या मोहाला बळी पडले. आपल्या देशातली
मीडिया, विशेषतः इलेक्ट्रॉनिक मीडिया अजून बाल्यावस्थेत आले.
हवी तशी प्रगल्भता तिला आप यायची आहे. बाल्यावसथेतील या
मीडियाने उचलून धरलेल्या आंदोलनामुळे मिळू लागलेल्या यशानेत
अण्णा हजारेही हुरळून गेले आणि इथेच आंदोलन फसले.
देशपातळीवरील आंदोलने अशी मीडियाच्या प्रसिद्धीच्या बळावर उभी
राहात नाहीत. त्यासाठी ग्राऊंडवर्क करावे लागते. लागतात.
वैचारिक बैठक असलेल्या कार्यकर्त्यांची फळी उभी करावी लागते.
प्राणपणाने लढणारे सैनिक तयार करावे लागते. क्षणभराच्या
भारावलेपणातून रस्त्यावर उतरलेल्या आणि लाठीहल्ला होऊ लागताच पळून जाणार्‍या लोकांच्या भरवशावर कशी यशास्वी होतील
आंदोलने. पण दुर्दवाने अण्णांसारख्य उंची लाभलेल्या
कार्यकर्त्यालाही हे गमक उलगडले नाही. समोरची गर्दी, रोज
चाललेल्या टीव्हीवरच्या बातम्या, लोकांच्या डोक्यावरच्या त्यांच्या
नावाच्या टोप्या बघून क्षणभर तेही भारावून गेले. आणि त्यांच्या
सभोतलच्या ङङ्गटीम'बद्दल काय बोलावे? त्यांनी तर या सार्‍या बाबींचा
विचारच न करण्याचे ठरविले होते. त्याक्षणी सरकार आपल्यामुळे
हादरले असल्याचा भास त्यांना झाला. सरक रमधील हुशार आणि
चाणाक्ष राजकीय नेत्यांनी हे चांगलेच हेरले होते. म्हणूनच
पंतप्रधानांच्या एका पत्राने आंदोलन संपविण्याचे आणि लोकपाल
संसदेत अडकवून या कडबोळ्याला झुलवत ठेवण्याचे त्यांचे षडयंत्र
यशस्वी होऊ शकले आहे.

सुनील कुहीकर
राजा उदार झाला अन्‌ सिलेंडर फक्क्त बारा रुपयांनीच महागले!

राजा उदार झाला आणि महाराष्ट्रात स्वयंपाकाचा गॅस वीसच्या
ऐवजी फक्क्त बाराच रुपयांनी महागला. काय पण नाटकी आहेत राज्यातल्या सत्ताधारी पक्षाचे नेते! अजित पवारांनी गॅस सिलेंडरवर पाच टे कर आकारला तर
लागलीच माणिकराव ठाकरेंच्या नेतृत्वात काँग्रेसचे एक
शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या दरबारात हजर झाले. ही भाववाढ
योग्य नसल्याची जाणीव राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या अंतर्मनालाही लागलीच झाली. त्यांनीही अजित पवारांच्या या निर्णयाला विरोध
दाखविण्याच्ी हिंमत दाखवली. एरवी पवारांसमोर ब्र काढायलाही न धजावणार्‍या राष्ट्रवादीच्या चार दोन ठराविक नेत्यांनी या निर्णयाला असलेला आपला विरोध निदान विधिमंडळाच्या
रेकॉर्डवर नोंदविण्यापुरता तरी बोलून दाखवला. त्यांच्या
मागणीपुढे नमते घेत पाच टक्क्यांचा कर तीन टक्क्यांवर काय
आला तर या आनंदाचे भरते आले? लागलीच पवारांचे आभार मानणार्‍या जाहिराती दूरचित्रवाणीवरून झळकू लागल्या. पाच वाजता निर्णय अन्‌ सहा वाजता जाहिराती? कुणाला मूर्ख बनविण्याचा प्रकार चाललाय हा? आणि पवारांचे आभार कशासाठी, तर पाच टक्क्यांचा कर तीन टक्क्यांचा आणला म्हणून? पण सरतेशेवटी गॅस सिलेंडर महागले ते महागलेच त्याचे काय?
वीस रुपांची वाढ फार होते, त्यामुळे सिलेंडर फक्त बारा
रुपयांनीच महाग करावा, अशीच मागणी होती माणिकराव
ठाकरेंची? महागाईने पिचलेली जनता या दरवाढीवर क्षोभ व्यक्त
करेल याची जाणीव झाल्यानेच सत्तेतल्या या दोन्ही पक्षाच्या
नेत्यांनी विरोधाची नाटकं केलीत. पवारांनीही सार्‍या महाराष्ट्रावर उपकार केलच थाटात दरवाढ थोडीशी कमी करून स्वतःची पाठ थोपटून घेतली.
हे तर ङङ्गसेल'चा बाजार मांडणार्‍या व्यापार्‍यांसारखं झालं. वस्तूंचे
दर आधीच दुप्पट करून टाकायचे आणि नंतर तीच वस्तू पन्नास
टे सवलतीच्या दराने ङङ्गसेल'च्या नावावर खपवायची.
राज्याच्या अर्थमंत्र्यांनी तरी वेगळं काय काम केलं? सेल
लावणार्‍या त्या व्यापार्‍यांसारखंच लोकांना फसववलं.
काजूवरचा टॅक्स कमी करायचा आणि कापूस विकणार्‍या
शेतकर्‍यावर मात्र खरेदीकर लावायचा. गॅसवरचा वाढवायचा
अन्‌ शिजववण्यासाठी तयार पदार्थ तयार करणार्‍या पेप्सी
कंपनीला करातून सूट ायची हे कुठले धोरण? पेप्सी साठी
कमी करण्यात आलेला कर तीन टक्क्यांनी वाढवून गॅसवरील
कर न लादण्याचा निर्णय अर्थमंत्री का घेऊ शकले नाहीत, हा
प्रश्न त्यांचे अभिनंदन करणार्‍या, आभार मानणार्‍या वा लवून
मुजरा करणार्‍यांच्या मनात का उद्‌भवत नाही? की
मुख्यमंत्र्यांच्या दरबारी शिष्टमंडळ नेण्याची नाटकं
करणार्‍यांनाही ही फसवणूकच अपेक्षित होती?
राज्य सरकारला २७,७७७ कोटी रुपयांचा कर गेल्या वर्षभरात
वसूल करता आलेला नाही. शेअर बाजारातील व्यवहारावर ०.०५
टे कर लावण्याचा निर्णय घेणार्‍या अर्थमंत्र्यांना गेल्या वर्षभरात
हा कर लागू देखील करता आलेला नाही. का? शेअर बाजारातली गुंतवणूक आपल्या समाजातला कोणता वर्ग करतो ? त्यांना०.०५ टे देखील कर लागू करता येत नाही सरकारला? आणि सर्वसामान्य जनतेवर ५ टक्क्यांचा कर लादायला बरा
हुरूप येतो यांना!
मुळात, कुणाला लूटायचे अन्‌ कुणाला आश्रय ायचा, याबाबतची
सरकारची धोरणं स्पष्ट आहेत. राज्याच्या टोकावर वसलेल्या
आदिवासी माणसाचं बखोटं धरून त्याला पोलिस ठाण्यात
आणण्यासाठी इथे कायदा आडवा येत नाही. पण नक्षल्यांना
मदत करणारे, पैसा आणि शस्त्र पुरवणारे लोक कोण आहेत,
याची पूर्ण कल्पना असतानाही त्यांना हात लावायला मात्र यांची
हिंमत होत नाही. त्यासाठी पुरावे नसल्याची फडतूस कारणे
राज्याचे गृहमंत्री सांगतात?
सध्या एकमेकांवर कुरघोडी करण्यातच काँग्रेस आणि
राष्ट्रवादीचे नेते मश्गूल आहेत. गॅस दरवाढीचा निर्णय जाहीर
झाल्यावर काँग्रेसचे नेते मुख्यमंत्र्यांकडे धावून गेलेत, ते अर्थमंत्री
राष्ट्रवादीचे असल्यामुळे. काँग्रेसचे नेते या दरवाढीला विरोध
करून लोकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करताहेत
म्हटल्यावर राकाँच्या नेत्यांचे पोट दुखले नसते तरच नवल!
अर्थमंत्री स्वपक्षाचे असूनही त्यांच्या या दरवाढीला विरोध
करण्याची स्ट्रॅटेजी त्यांना ठरवावी लागली. दरवाढ यांनीच जाहीर
करायची, त्याला विरोधही यांनीच करायचा, दरवाढ कमी
करण्याची मागणीही यांनीच करायची आणि ती कमी करण्याचा
निर्णयही यांनीच घ्यायचा! ढोंगबाजीची मर्यादा गाठणारा हा संतापजनक प्रकार आहे. राज्यातील जनतेला गृहीत
धरण्याच्या शैलीचा हा परिणाम आहे. जनतेला त्याचे काही
वाटत नाही तोवर राज्यातल्या जनतेला मूर्ख समजून चाललेली ही नाटकबाजी भविष्यातही अशीच सुरू राहणार आहे.

जाता जाता....
राज्याचे मुख्यमंत्री बदलणार असल्याच्या चर्चेचे गुर्‍हाळ पुन्हा एकदा
सुरू झाले आहे. ऐन अधिवेशनाच्या काळात काही असंतुष्ट
आमदारांनी हिंमतीने विधानभवनातच एक बैठक घेतल्याची चर्चा
आहे. दिल्लीत सोनियादरबारी जाऊन आपली गार्‍हाणी मांडण्याचे
मनसुबेही त्यांनी जाहीर केल्याचे म्हटले जाते. त्यांच्या या ङङ्गधाडसाचे' कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. पण काँग्रेस पक्षात
मुख्यमंत्र्यांना नेमण्याचे वा हटविण्याचे अधिकार राज्यातल्या
आमदारांना असल्याचा एक ङङ्गविनोद' त्यातून लोकांना कळला
आहे. एक मात्र खरे की मुख्यमंत्र्यांनी आता त्या नाराज
आमदारांना गोंजारण्याची मोहीम आरंभली आहे.

सुनील कुहीकर

Friday, March 2, 2012

मुंबईचे वार्तापत्र
सुनील कुहीकर
----------------
कृपांवरील कारवाईची नाटकबाजी!
कृपाशंकरसिंहांवर कारवाई करण्याचे न्यायालयीन आदेश जारी होऊन तब्बल आठवडा उलटल्यानंतर पोलिस विभागाला त्यांच्या घरावर छापे मारण्याची सवड मिळाली आहे. या आठ दिवसात काँग्रेसच्या मुंबई प्रदेशाच्या माजी अध्यक्षांना सर्वोध न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याची, घरातले कागदोपत्री पुरावे नष्ट करण्याची ङङ्गसंधी' मिळाली. त्याचा पुरेपूर ङङ्गलाभ' घेण्यात आला आणि ज्यांच्यावर कारवाई करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती, ते पोलिस आयुक्त अरुण पटनाईक मात्र अतिशय बेजाबदारपणे हा प्रकार घडलाच नसल्याचा दावा करीत होते.
स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या नावे बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याचा आरोप असलेल्या तत्कालीन काँग्रेसाध्यक्षांवर कठोर कारवाई करण्याचे, त्यांची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश न्यायालयाने जारी केले. अगदी नाव घेऊन, अरुण पटनाईकांनी कृपांवर कारवाई करावी असेही या आदेशात स्पष्टपणे नमूद करण्यात आले होते. तरीही सरकार आणि पोलिस प्रशासन ढिम्म राहिले. आठ दिवस पर्यंत कोणतीही कारवाई झाली नाही. या काळात पोलिस विभाग आता पाश आवळणार असल्याच्या पोकळ बातम्या तेवढ्या पसरत राहिल्या. तोपर्यंत कृपाशंकरसिंह मात्र सर्वोध न्यायालयापर्यंत पोहोचले. आता ते स्वतः भूमिगत झालेत. त्यांच्या घरातली महत्त्वाची कागदपत्रेही गठ्या गठ्याने जाळली जाऊ लागली आहेत. ही कागदपत्रे जाळली जात असल्याची माहिती परिसरातील लोकांना कळली. पण पोलिस विभागाला मात्र त्याचा थांगपत्ताही लागला नाही.
या काळात एका भ्रष्टाचारी व्यक्तीवर कारवाई करण्याऐवजी महाराष्ट्राचे सरकार आणि राज्याचे मुख्यमंत्री इतर अतिशय महत्त्वाच्या कामात व्यस्त राहिलेत. महानगर पालिकांमध्ये महापौर कोणाला करावं, त्यासाठी राष्ट्रवादीशी आघाडी करावी की न करावी, कृपाशंकर सिंहांनी पक्ष पराभवाची ङङ्गनैतिक' जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिल्याने जी जागा रिकामी झालीय्‌, त्या जागेवर अशीच नैतिकता लाभलेला दुसरा कोणता नेता बसवावा अशा अनेक विवंचना सतावित असल्याने कृपांवरच्या कारवाईकडे लक्ष ायला मुख्यमंत्र्यांना फुरसतच मिळाली नाही. आता राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाच कृपांवरील कारवाईपेक्षा त्यांच्या उत्तराधिकार्‍याच्या नेमणुकीचा मुद्दा अधिक महत्त्वाचा वाटत असेल, तर ज्यांच्यावर प्रत्यक्ष कारवाईची जबाबदारी होती, त्या पटनाईकांना तो कवडीमोल वाटला तर नवल काय?
आदेश न्यायालयाचा नसता तर कदाचित पटनाईकांनी तो केव्हाच केराच्या टोपलीत टाकला असता. पण त्यांना नाईलाजाने तसे करता आले नाही. तरीही कायाच्या चौकटीत राहून कृपांना करता येईल तेवढी मदत त्यांनी केलीच म्हणतात! कृपा तर काय राजकारणी माणूस. त्यांनी आपल्यावरील कारवाई टाळण्यासाठी सर्व प्रयत्न केले. पोलिस विभागावर दिल्लीहून दबाव आणला. त्यामुळेच की काय पण, देशात नंबर वन असल्याचा दावा असलेल्या महाराष्ट्राच्या सक्षम पोलिस दलाला न्यायालयाच्या आदेशानंतरही सिंहांवर गुन्हे दाखल करायला पाच दिवस तर त्यांच्या घरांवर छापे मारायला नंतरचे तीन दिवस लागलेत!
मुंबईतील बांद्रा परिसरातील साईप्रसाद सोसायटीच्या भागातील ज्या बंगल्याच्या आवारात कृपांशी संबंधित महत्त्वपूर्ण कागदपत्रे त्यांच्या अनुपस्थितीत जाळली जात होती, त्या परिसरात उपस्थित पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याची बाब समोर आली आहे. काही सजग नागरिकांनी या प्रकरणी पोलिस ठाण्यात फोन केला, तर तिथेही फारसा प्रतिसाद मिळाला नाही. सोसायटीच्या सुरक्षा रक्षकांनी ङङ्गतो' कचरा असल्याचे सांगत हात झटकले. तर अरुण पटनाईकांनी हा प्रकार हसण्यावारी नेऊन प्रकरणाचे गांभिर्य कमी केले. कृपाशंकरसिहांना स्वतःच्या आणि परिवाराच्या बचावाची पुरेशी संधी देऊन, अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न करण्याकरिता पुरेसा वेळ देऊन, पुरावे नष्ट करता येतील अशी व्यवस्था करून न्यायालयीन आदेशाला आठ दिवस उलटल्यावर त्यांच्या घरांवर, कार्यालयावर छापे टाकण्यात आले आहेत. म्हणायला पोलिस विभागाने कारवाई केली आहे आणि म्हणायला कृपांना करता येईल तेवढी मदतही करून झाली आहे. त्यांच्या अटकपूर्व जामिनाच्या अर्जावर तातडीनं सुनावणी करण्यास न्यायालयानं नकार दिल्यानंतर जाग आलेल्या पोलिस विभागाने महाराष्ट्राच्या तमाम जनतेला मूर्ख समजून सुरू केलेली कारवाईची ही म्हणूनच केवळ नाटकबाजी ठरली आहे.
कधीकाळी एक सामान्य कार्यकर्तो म्हणून सुरू झालेली कृपाशंकर सिंहांची काँग्रेस पक्षातली कारकीर्द आमदारकी, राज्यमंत्री आणि मुंबई प्रदेश काँग्रेसाध्यक्षपदापर्यंत कशी पोहोचली, या काळात त्यांनी दिल्लीश्वरांची राखलेली मर्जी, वेळोवेळी मुंबईच्या दौर्‍यावर आलेल्या पक्ष नेत्यांची त्यांनी ठेवलेली बडदास्त सध्या चर्चेची ठरली आहे. बहुदा त्याचीच फलश्रुती म्हणून बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्ससारख्या मुंबईतील आलीशान आणि अतिशय महागड्या भागात त्यांना एकाहून अधिक कार्यालये आणि फ्लॅट्‌स मिळवता आले असावेत. मधू कोडा प्रकरणात त्यांचे नाव घेतले जात असतानाही त्यांच्यावर कारवाई मात्र झाली नव्हती. आता होत आहे, ती केवळ नाटकबाजी असल्याचा विरोधकांचा आरोप खरा की खोटा हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

मुंबई
९८८१७१७८३३