मुंबईचे वार्तापत्र
सुनील कुहीकर
----------------
कृपांवरील कारवाईची नाटकबाजी!
कृपाशंकरसिंहांवर कारवाई करण्याचे न्यायालयीन आदेश जारी होऊन तब्बल आठवडा उलटल्यानंतर पोलिस विभागाला त्यांच्या घरावर छापे मारण्याची सवड मिळाली आहे. या आठ दिवसात काँग्रेसच्या मुंबई प्रदेशाच्या माजी अध्यक्षांना सर्वोध न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याची, घरातले कागदोपत्री पुरावे नष्ट करण्याची ङङ्गसंधी' मिळाली. त्याचा पुरेपूर ङङ्गलाभ' घेण्यात आला आणि ज्यांच्यावर कारवाई करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती, ते पोलिस आयुक्त अरुण पटनाईक मात्र अतिशय बेजाबदारपणे हा प्रकार घडलाच नसल्याचा दावा करीत होते.
स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या नावे बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याचा आरोप असलेल्या तत्कालीन काँग्रेसाध्यक्षांवर कठोर कारवाई करण्याचे, त्यांची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश न्यायालयाने जारी केले. अगदी नाव घेऊन, अरुण पटनाईकांनी कृपांवर कारवाई करावी असेही या आदेशात स्पष्टपणे नमूद करण्यात आले होते. तरीही सरकार आणि पोलिस प्रशासन ढिम्म राहिले. आठ दिवस पर्यंत कोणतीही कारवाई झाली नाही. या काळात पोलिस विभाग आता पाश आवळणार असल्याच्या पोकळ बातम्या तेवढ्या पसरत राहिल्या. तोपर्यंत कृपाशंकरसिंह मात्र सर्वोध न्यायालयापर्यंत पोहोचले. आता ते स्वतः भूमिगत झालेत. त्यांच्या घरातली महत्त्वाची कागदपत्रेही गठ्या गठ्याने जाळली जाऊ लागली आहेत. ही कागदपत्रे जाळली जात असल्याची माहिती परिसरातील लोकांना कळली. पण पोलिस विभागाला मात्र त्याचा थांगपत्ताही लागला नाही.
या काळात एका भ्रष्टाचारी व्यक्तीवर कारवाई करण्याऐवजी महाराष्ट्राचे सरकार आणि राज्याचे मुख्यमंत्री इतर अतिशय महत्त्वाच्या कामात व्यस्त राहिलेत. महानगर पालिकांमध्ये महापौर कोणाला करावं, त्यासाठी राष्ट्रवादीशी आघाडी करावी की न करावी, कृपाशंकर सिंहांनी पक्ष पराभवाची ङङ्गनैतिक' जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिल्याने जी जागा रिकामी झालीय्, त्या जागेवर अशीच नैतिकता लाभलेला दुसरा कोणता नेता बसवावा अशा अनेक विवंचना सतावित असल्याने कृपांवरच्या कारवाईकडे लक्ष ायला मुख्यमंत्र्यांना फुरसतच मिळाली नाही. आता राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाच कृपांवरील कारवाईपेक्षा त्यांच्या उत्तराधिकार्याच्या नेमणुकीचा मुद्दा अधिक महत्त्वाचा वाटत असेल, तर ज्यांच्यावर प्रत्यक्ष कारवाईची जबाबदारी होती, त्या पटनाईकांना तो कवडीमोल वाटला तर नवल काय?
आदेश न्यायालयाचा नसता तर कदाचित पटनाईकांनी तो केव्हाच केराच्या टोपलीत टाकला असता. पण त्यांना नाईलाजाने तसे करता आले नाही. तरीही कायाच्या चौकटीत राहून कृपांना करता येईल तेवढी मदत त्यांनी केलीच म्हणतात! कृपा तर काय राजकारणी माणूस. त्यांनी आपल्यावरील कारवाई टाळण्यासाठी सर्व प्रयत्न केले. पोलिस विभागावर दिल्लीहून दबाव आणला. त्यामुळेच की काय पण, देशात नंबर वन असल्याचा दावा असलेल्या महाराष्ट्राच्या सक्षम पोलिस दलाला न्यायालयाच्या आदेशानंतरही सिंहांवर गुन्हे दाखल करायला पाच दिवस तर त्यांच्या घरांवर छापे मारायला नंतरचे तीन दिवस लागलेत!
मुंबईतील बांद्रा परिसरातील साईप्रसाद सोसायटीच्या भागातील ज्या बंगल्याच्या आवारात कृपांशी संबंधित महत्त्वपूर्ण कागदपत्रे त्यांच्या अनुपस्थितीत जाळली जात होती, त्या परिसरात उपस्थित पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याची बाब समोर आली आहे. काही सजग नागरिकांनी या प्रकरणी पोलिस ठाण्यात फोन केला, तर तिथेही फारसा प्रतिसाद मिळाला नाही. सोसायटीच्या सुरक्षा रक्षकांनी ङङ्गतो' कचरा असल्याचे सांगत हात झटकले. तर अरुण पटनाईकांनी हा प्रकार हसण्यावारी नेऊन प्रकरणाचे गांभिर्य कमी केले. कृपाशंकरसिहांना स्वतःच्या आणि परिवाराच्या बचावाची पुरेशी संधी देऊन, अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न करण्याकरिता पुरेसा वेळ देऊन, पुरावे नष्ट करता येतील अशी व्यवस्था करून न्यायालयीन आदेशाला आठ दिवस उलटल्यावर त्यांच्या घरांवर, कार्यालयावर छापे टाकण्यात आले आहेत. म्हणायला पोलिस विभागाने कारवाई केली आहे आणि म्हणायला कृपांना करता येईल तेवढी मदतही करून झाली आहे. त्यांच्या अटकपूर्व जामिनाच्या अर्जावर तातडीनं सुनावणी करण्यास न्यायालयानं नकार दिल्यानंतर जाग आलेल्या पोलिस विभागाने महाराष्ट्राच्या तमाम जनतेला मूर्ख समजून सुरू केलेली कारवाईची ही म्हणूनच केवळ नाटकबाजी ठरली आहे.
कधीकाळी एक सामान्य कार्यकर्तो म्हणून सुरू झालेली कृपाशंकर सिंहांची काँग्रेस पक्षातली कारकीर्द आमदारकी, राज्यमंत्री आणि मुंबई प्रदेश काँग्रेसाध्यक्षपदापर्यंत कशी पोहोचली, या काळात त्यांनी दिल्लीश्वरांची राखलेली मर्जी, वेळोवेळी मुंबईच्या दौर्यावर आलेल्या पक्ष नेत्यांची त्यांनी ठेवलेली बडदास्त सध्या चर्चेची ठरली आहे. बहुदा त्याचीच फलश्रुती म्हणून बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्ससारख्या मुंबईतील आलीशान आणि अतिशय महागड्या भागात त्यांना एकाहून अधिक कार्यालये आणि फ्लॅट्स मिळवता आले असावेत. मधू कोडा प्रकरणात त्यांचे नाव घेतले जात असतानाही त्यांच्यावर कारवाई मात्र झाली नव्हती. आता होत आहे, ती केवळ नाटकबाजी असल्याचा विरोधकांचा आरोप खरा की खोटा हे लवकरच स्पष्ट होणार आहे.
मुंबई
९८८१७१७८३३
No comments:
Post a Comment