कृपाशंकरसिंह, गुलाबराव देवकर प्रकरणात महाराष्ट्राने अनुभवले
काय तमाशा चालला आहे हा? ४८ तास कारागृहात राहून आलेली व्यक्ती इथे सरकारी नोकरीत कायम राहू शकत नाही आणि राज्याच्या मंत्रिपदी मात्र कायम राहू शकते? जामीन मंजूर होतो की रद्द, यावर त्यांचा राजीनामा मंजूर करायचा की नाही हे ठरते? जामीन नामंजूर झाल्याची बातमी बाहेर येताच ङङ्गबेपत्ता' झालेले मंत्री अटक टळल्याच्या बातमीनंतर लागलीच अधिकार्यांच्या बैठकी घ्यायला हजर होतात. त्यांना आदेश देऊ लागतात. आपल्या समाजात लाल दिव्याच्या अधिकारातून लाभलेले संरक्षणाचे कडबोळे नैतिकता पायदळी तुडवण्याइतके मजबूत झाले आहे? खरं तर, एरवी मंत्र्यांना सलाम ठोकण्याची सवय जडलेली पोलिस यंत्रणा ज्या अर्थी या राज्याच्या एका राज्यमंत्र्याला अटक करते, त्याअर्थी त्यांच्याविरुद्ध तितके मजबूत पुरावे त्यांच्या हातात आलेले असणार. अशा सबळ पुराव्यांच्या आधारे झालेली अटक त्यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घ्यायला पुरेशी नाही? मग जामीनाच्या मंजुरी-नामंजुरीच्या तालावर राजीनाम्याचा कागद का नाचवला जातोय्? राजकीय नेत्यांच्या नीतीमत्तेची चाड इतकी लयाला गेली आहे की फौजदारी गुन्हे दाखल झालेले, कारागृहाची हवा खाऊन आलेले लोकही न्यायालयाने मंजूर-नामंजूर केलेल्या जामीनाच्या जोरावर सार्या जगाला शहाणपण शिकवू लागले आहेत? आणि राष्ट्रवादीला काय पडली गुलाबरावांना इतके पाठीशी घालण्याची? पक्षाच्या, जातीच्या राजकारणावर भ्रष्टाचार इतका हावी व्हावा? हा चमत्कार घडवून आणणार्या शरद पवारांनीच लोकांना उद्देशून केलेल्या भाषणांतून, या देशाला शूचिर्भूत राजकारणाची गरज असल्याची हास्यास्पद विधाने करायची?
तिकडे मुंबई प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष कृपाशंकरसिंहांना एका इफ्तार पार्टीत पोलिसांनी दिलेली सन्मानाची वागणूक अशीच वादग्रस्त ठरली आहे. ज्यांच्या बेनामी संपत्तीच्या तपासाचे आदेश खुद्द न्यायालयाने जारी केले आहेत, ज्यांच्या नावाने दोन दोन पासपोर्ट, दोन दोन पॅन कार्ड आढळून आले, ज्यांच्या घरात जिवंत काडतुसे आढळून आली, जे पोलिसांना सापडत नाही अशी ओरड खुद्द पोलिस करताहेत, त्यांचाच सत्कार करण्याची वेळ पोलिसांवर यावी? फरार असलेल्या आमदार कृपाशंकरांना पोलिस विभागाने आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीचे रीतसर निमंत्रण मिळते, त्या निमंत्रणावरून ते कार्यक्रमात जातीने हजरही होतात, मुख्यमंत्र्यांच्या बरोबरीने त्यांना मंचावर सन्मानाने स्थान दिले जाते, मुख्यमंत्र्यांच्या कानात गुजगोष्टी करताना त्याची छायाचित्रे टिपली जातात, या व्यक्तीच्या तपासाची जबाबदारी आपल्या विभागावर असल्याचा वरिष्ठ पोलिसांना काही काळ जाणिवपूर्वक विसर पडतो, कार्यक्रम आटोपून तपास यंत्रणेच्या नाकावर टिधून कृपाशंकर दिमाखाने निघून जातात आणि एक गुन्हेगार लोकप्रतिनिधी असा डोळ्यादेखत निघून जात असताना पोलिस त्याला सन्मानाने सलाम ठोकतात... काय पण थट्टा चालली आहे बघा लोकशाहीची! ज्यांच्या कोट्यवधीच्या बेनामी संपत्तीची चौकशी करायची आहे, ज्यांना भविष्यात अटक करायची त्यांना सलाम ठोकण्याची वेळ पोलिसांवर यावी?
या दोन्ही प्रकरणांमध्ये कायदा पायदळी तुडविण्याची, न्यायालयीन व्यवस्था न जुमानण्याची राजकीय नेत्यांची मानसिकता, त्यांची पाठराखण करण्याची पोलिसांची लाचारी. व्यवस्थेची अगतिकता आणि हा सारा प्रकार उघड्या डोळ्यांनी बघण्याची वेळ आलेल्या सामान्यजनांची हतबलता सिद्ध झाली आहे....
मुंबई.
९८८१७१७८३३
मुजोर राजकीय नेते, अगतिक व्यवस्था आणि हतबल जनता...!
तिकडे न्यायालय जामीन रद्द करावा की न करावा याबाबतचा निर्णय घेणार असताना पालकमंत्री जळगावात अधिकार्यांच्या बैठकी घेताहेत. जिल्हाधिकार्यांना आदेश देताहेत. त्यांना अटक करण्याची कारवाई ज्यांना करायची आहे, ते पोलिस अधीक्षक त्यांना सलाम ठोकताहेत. कालपर्यंत त्यांचा राजीनामा घेण्याची गरज नसल्याची मुजोरी करणारे राष्ट्रवादीचे नेते न्यायालयाच्या निर्णयाबरहुकूम राजीनामा लिहून घेण्याचे, नंतर तो दडवून ठेवण्याचे, तो स्वीकारण्याचा मुहूर्त पुढे ढकलत आमचा माणूस अजूनही मंत्री म्हणून कायम असल्याचे दावे छातीठोकपणे करताहेत....
दुसरीकडे, बेनामी संपत्तीवरून ज्यांच्यावर चौकशीचे बालंट आले आहे, ज्यांच्या घरात च जिवंत काडतुसे सापडलीत ते मुंबईतले एक प्रतिष्ठित आमदार पोलिसांच्या इफ्तार पार्टीत सन्मानाने मंचावर बसवले जात आहेत. ज्यांनी त्यांना अटक करायची ते पोलिसच हारतुरे देऊन त्यांचा सत्कार करताहेत....
राज्यमंत्री गुलाबराव देवकर आणि मुंबई प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष कृपाशंकर सिंह यांच्याबाबत गेल्या काही दिवसात अनुभवायला मिळालेले हे चित्र तमाम महाराष्ट्रवासियांचा अवमान करणारे, न्यायालयाला चपराक हाणणारे, पोलिसांची मुजोरी आणि हतबलता सिद्ध करणारे आणि त्याही उपर इथल्या व्यवस्थेची खिल्ली उडवणारे आहे.
जळगाव नगर परिषदेतील घरकुल घोटाळ्यात फौजदारी गुन्हा दाखल झालेले तत्कालीन नगराध्यक्ष आणि महाराष्ट्राचे विमान राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला, त्यांना अटक झाली, तरीही आपल्या मिस्टर क्लीन मुख्यमंत्र्यांना त्यांचा राजीनामा घेण्याची गरज वाटत नाहीय्. ते ज्या पक्षाचे प्रतिनिधीत्व करतात, त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कौतुक काय वर्णावे? त्या पक्षाचे नेते तर गुलाबरावांनी गैरकारभार केला म्हणचे जणू काय ऑलिम्पिकचे पदकच मिळवले असल्याच्या थाटात त्यांची पाठराखण चालवली आहे. आणि स्वतः देवकरांना आपण काही गैर केल्याचे मान्य नाही. त्यामुळे राजीनामा न देता अजूनही ते खुर्ची बळकावून बसले आहेत.
या प्रकरणात पोलिसांचे अटकसत्र सुरू झाल्यानंतर सुरुवातीला न्यायालयाने सुरूवातीला ज्या परिस्थितीत जामीन मंजूर केला, तो नंतर नामंजूर करण्यात आल्याबरोबर जणू काय राज्यमंत्र्यांना ङङ्गबाईज्जत बरी' केल्याचा आव आणत राष्ट्रवादीची छाती दोन इंच फुगली. मंत्र्यांच्या राजीनाम्याची गरज नसल्याची भाषा स्वतः शरद पवार बोलू लागले. दोन दिवस कारागृहात राहून आलेला एक राज्यमंत्री मोठ्या दिमाखाने आपल्या विभागाचा कारभार पाहू लागला. विधिमंडळात थाटाने आमदारांच्या प्रश्नांची उत्तरे देऊ लागला. जणू काहीच घडले नसल्याच्या थाटातल्या त्यांच्या वागण्याला पक्षाकडूनही प्रबळ समर्थन मिळू लागले. दरम्यानच्या काळात जळगावच्या न्यायालयाने मंजूर केलेला जामीन उध न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने नामंजूर केला आणि राष्ट्रवादीची पुन्हा धावपळ झाली. देवकरांकडून राजीनामा लिहून घेण्याचे नाटक नव्याने करण्यात आले. इतक्यात सर्वोध न्यायालयाने देवकरांची अटक पुढील काही दिवसांसाठी टाळण्याचे आदेश देताच राकाँ नेत्यांची मुजोरी पुन्हा सुरू झाली. त्यांनी पक्षाकडे दिलेला राजीनामा गुंडाळून बासनात ठेवण्यात आला. आता न्यायालयाच्या अंतिम आदेशानुसार नंतर त्याबाबतचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. देवकर अजूनही मंत्री असल्याचे सांगायला पक्षाचे नेते विसरलेले नाहीत....तिकडे न्यायालय जामीन रद्द करावा की न करावा याबाबतचा निर्णय घेणार असताना पालकमंत्री जळगावात अधिकार्यांच्या बैठकी घेताहेत. जिल्हाधिकार्यांना आदेश देताहेत. त्यांना अटक करण्याची कारवाई ज्यांना करायची आहे, ते पोलिस अधीक्षक त्यांना सलाम ठोकताहेत. कालपर्यंत त्यांचा राजीनामा घेण्याची गरज नसल्याची मुजोरी करणारे राष्ट्रवादीचे नेते न्यायालयाच्या निर्णयाबरहुकूम राजीनामा लिहून घेण्याचे, नंतर तो दडवून ठेवण्याचे, तो स्वीकारण्याचा मुहूर्त पुढे ढकलत आमचा माणूस अजूनही मंत्री म्हणून कायम असल्याचे दावे छातीठोकपणे करताहेत....
दुसरीकडे, बेनामी संपत्तीवरून ज्यांच्यावर चौकशीचे बालंट आले आहे, ज्यांच्या घरात च जिवंत काडतुसे सापडलीत ते मुंबईतले एक प्रतिष्ठित आमदार पोलिसांच्या इफ्तार पार्टीत सन्मानाने मंचावर बसवले जात आहेत. ज्यांनी त्यांना अटक करायची ते पोलिसच हारतुरे देऊन त्यांचा सत्कार करताहेत....
राज्यमंत्री गुलाबराव देवकर आणि मुंबई प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष कृपाशंकर सिंह यांच्याबाबत गेल्या काही दिवसात अनुभवायला मिळालेले हे चित्र तमाम महाराष्ट्रवासियांचा अवमान करणारे, न्यायालयाला चपराक हाणणारे, पोलिसांची मुजोरी आणि हतबलता सिद्ध करणारे आणि त्याही उपर इथल्या व्यवस्थेची खिल्ली उडवणारे आहे.
जळगाव नगर परिषदेतील घरकुल घोटाळ्यात फौजदारी गुन्हा दाखल झालेले तत्कालीन नगराध्यक्ष आणि महाराष्ट्राचे विमान राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला, त्यांना अटक झाली, तरीही आपल्या मिस्टर क्लीन मुख्यमंत्र्यांना त्यांचा राजीनामा घेण्याची गरज वाटत नाहीय्. ते ज्या पक्षाचे प्रतिनिधीत्व करतात, त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कौतुक काय वर्णावे? त्या पक्षाचे नेते तर गुलाबरावांनी गैरकारभार केला म्हणचे जणू काय ऑलिम्पिकचे पदकच मिळवले असल्याच्या थाटात त्यांची पाठराखण चालवली आहे. आणि स्वतः देवकरांना आपण काही गैर केल्याचे मान्य नाही. त्यामुळे राजीनामा न देता अजूनही ते खुर्ची बळकावून बसले आहेत.
काय तमाशा चालला आहे हा? ४८ तास कारागृहात राहून आलेली व्यक्ती इथे सरकारी नोकरीत कायम राहू शकत नाही आणि राज्याच्या मंत्रिपदी मात्र कायम राहू शकते? जामीन मंजूर होतो की रद्द, यावर त्यांचा राजीनामा मंजूर करायचा की नाही हे ठरते? जामीन नामंजूर झाल्याची बातमी बाहेर येताच ङङ्गबेपत्ता' झालेले मंत्री अटक टळल्याच्या बातमीनंतर लागलीच अधिकार्यांच्या बैठकी घ्यायला हजर होतात. त्यांना आदेश देऊ लागतात. आपल्या समाजात लाल दिव्याच्या अधिकारातून लाभलेले संरक्षणाचे कडबोळे नैतिकता पायदळी तुडवण्याइतके मजबूत झाले आहे? खरं तर, एरवी मंत्र्यांना सलाम ठोकण्याची सवय जडलेली पोलिस यंत्रणा ज्या अर्थी या राज्याच्या एका राज्यमंत्र्याला अटक करते, त्याअर्थी त्यांच्याविरुद्ध तितके मजबूत पुरावे त्यांच्या हातात आलेले असणार. अशा सबळ पुराव्यांच्या आधारे झालेली अटक त्यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घ्यायला पुरेशी नाही? मग जामीनाच्या मंजुरी-नामंजुरीच्या तालावर राजीनाम्याचा कागद का नाचवला जातोय्? राजकीय नेत्यांच्या नीतीमत्तेची चाड इतकी लयाला गेली आहे की फौजदारी गुन्हे दाखल झालेले, कारागृहाची हवा खाऊन आलेले लोकही न्यायालयाने मंजूर-नामंजूर केलेल्या जामीनाच्या जोरावर सार्या जगाला शहाणपण शिकवू लागले आहेत? आणि राष्ट्रवादीला काय पडली गुलाबरावांना इतके पाठीशी घालण्याची? पक्षाच्या, जातीच्या राजकारणावर भ्रष्टाचार इतका हावी व्हावा? हा चमत्कार घडवून आणणार्या शरद पवारांनीच लोकांना उद्देशून केलेल्या भाषणांतून, या देशाला शूचिर्भूत राजकारणाची गरज असल्याची हास्यास्पद विधाने करायची?
तिकडे मुंबई प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष कृपाशंकरसिंहांना एका इफ्तार पार्टीत पोलिसांनी दिलेली सन्मानाची वागणूक अशीच वादग्रस्त ठरली आहे. ज्यांच्या बेनामी संपत्तीच्या तपासाचे आदेश खुद्द न्यायालयाने जारी केले आहेत, ज्यांच्या नावाने दोन दोन पासपोर्ट, दोन दोन पॅन कार्ड आढळून आले, ज्यांच्या घरात जिवंत काडतुसे आढळून आली, जे पोलिसांना सापडत नाही अशी ओरड खुद्द पोलिस करताहेत, त्यांचाच सत्कार करण्याची वेळ पोलिसांवर यावी? फरार असलेल्या आमदार कृपाशंकरांना पोलिस विभागाने आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीचे रीतसर निमंत्रण मिळते, त्या निमंत्रणावरून ते कार्यक्रमात जातीने हजरही होतात, मुख्यमंत्र्यांच्या बरोबरीने त्यांना मंचावर सन्मानाने स्थान दिले जाते, मुख्यमंत्र्यांच्या कानात गुजगोष्टी करताना त्याची छायाचित्रे टिपली जातात, या व्यक्तीच्या तपासाची जबाबदारी आपल्या विभागावर असल्याचा वरिष्ठ पोलिसांना काही काळ जाणिवपूर्वक विसर पडतो, कार्यक्रम आटोपून तपास यंत्रणेच्या नाकावर टिधून कृपाशंकर दिमाखाने निघून जातात आणि एक गुन्हेगार लोकप्रतिनिधी असा डोळ्यादेखत निघून जात असताना पोलिस त्याला सन्मानाने सलाम ठोकतात... काय पण थट्टा चालली आहे बघा लोकशाहीची! ज्यांच्या कोट्यवधीच्या बेनामी संपत्तीची चौकशी करायची आहे, ज्यांना भविष्यात अटक करायची त्यांना सलाम ठोकण्याची वेळ पोलिसांवर यावी?
या दोन्ही प्रकरणांमध्ये कायदा पायदळी तुडविण्याची, न्यायालयीन व्यवस्था न जुमानण्याची राजकीय नेत्यांची मानसिकता, त्यांची पाठराखण करण्याची पोलिसांची लाचारी. व्यवस्थेची अगतिकता आणि हा सारा प्रकार उघड्या डोळ्यांनी बघण्याची वेळ आलेल्या सामान्यजनांची हतबलता सिद्ध झाली आहे....
मुंबई.
९८८१७१७८३३
No comments:
Post a Comment