Friday, September 21, 2018

निमित्त अनुप जलोटांच्या लग्नाचे...

पाश्चात्त्यांचे अंधानुकरण करताना किंवा एरवीही अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा उदोउदो करतानाएखाद्याच्या खाजगी आयुष्यात नेमके किती खोलवर शिरायचेत्याची जाहीर रीत्या किती वाच्यता आणि चर्चा करायचीयाचे तारतम्य कुणीच बाळगत नाहीत्या चर्चेची उपयोगिता हा तर आणखीच वेगळा मुद्दा आहेसध्याच्या चर्चेचा अनुप जलोटांवर किती परिणाम झालायाचे मोजमाप करायला कुठलेही परिमाण उपलब्ध नाहीअन्यथा आपण उगाच तोंडाची वाफवेळ किती वाया घालवतो आहोतयाची कल्पना तरी आली असती लोकांनाएरवी वैचारिक प्रगल्भतेच्या गप्पा मारतातच लोकतर मग त्यांच्या त्यांच्या खाजगी जीवनाचा एक भाग म्हणून सोडून देता येणार नाही हा मुद्दा आपल्यालाबरंआयुष्यात दोन-तीन लग्नं केलेली माणसं काय कमी आहेत समाजातएक गायकया पलीकडे अनुप जलोटांचं स्थान काय आहे तुमच्या-आमच्या जीवनातगायनाच्या क्षेत्रात त्यांनी भजन हा प्रकार निवडलाउत्तम दर्जाच्या कलेचे सादरीकरण करीतकितीतरी दिवसपर्यंत लोकांचे मनोरंजन केलेभरपूर पैसा कमावलापणशेवटी जलोटा हे केवळ एक गायक आहेतते काही साधुसंत नाहीतहेही समजून घेतले पाहिजेसंतपदाला पोहोचलेल्या व्यक्तींना अवचित स्फुरलेल्या पंक्तीतून वाहणारी भक्तिधारा सुरांच्या माध्यमातून वर्षानुवर्षे लोकांपर्यंत पोहोचविल्यानंतरही ईश्वरचरणी लीन होण्याची पात्रता त्यांच्या अंगी आली नाही म्हणून त्यांना हिणवतानातसली पात्रता आपण स्वतकमावली असल्याचा दावा करण्याचे धारिष्ट्य किती लोकांना दाखवता येईल


जगातले इतर सगळे प्रश्न संपले अन्‌ आता फक्त अनुप जलोटांच्या तिसर्या लग्नाचाच तेवढा मुद्दा संपूर्ण समाजासाठी ऐरणीवर असल्याच्या थाटात वागतो आहोत आपण सारेसध्या इतके त्याचे चर्वितचर्वणइतका त्याच्यावरचा विनोद चालला आहे कीबस्स!दुसरा कुठला मुद्दा शिल्लकच राहिला नसल्याच्याचेच चित्र आहे सर्वदूरबहुधा हेच भारतीय समाजाचे वैशिष्ट्य असावेवर्तणुकीतील वैचित्र्याचे दर्शन घडविणारेसोयकाळ अन्‌ व्यक्तिपरत्वे विचारांची दिशा बदलणारेपाश्चिमात्यांच्या आधुनिक नपेक्षामुक्त जीवनशैलीचेतिथल्या झगमगाटाचे प्रचंड आकर्षणजगण्याची ती निर्बंध तर्हा भावलेल्या आपल्या लोकांना तिथली शिस्ततिथल्या लोकांची सचोटीमेहनत या बाबींचे मात्र कमालीचे वावडेआम्हाला जागोजागी दारूची दुकानंही हवीत अन्‌ समाज निर्व्यसनी राहिला पाहिजे याबाबतचा आमचा दुराग्रहही तितकाच टोकाचाकाळवीट शिकार प्रकरणात सलमान खानला विनासायास जामीन मिळण्याचेही इथे कुणालाच आश्चर्य वाटत नाहीकारण समाजाच्या लेखी ती आसामीच इतकी मोठी कीतिने फार काळ कारागृहात राहणेसलमान आणि त्याच्या नातेवाईकांना तर सोडाचपण दस्तुरखुद्द आम जनतेलाही मान्य नसतेपंडित नेहरूनेहरूनंतर इंदिरा,इंदिरानंतर राजीवराजीवनंतर सोनियांनी आणि त्यांना होता नाही आले तरी आता त्यांचे ‘सुपुत्र राहुल यांनी भारताचे पंतप्रधान होणे क्रमप्राप्त असल्याचानव्हेतो गांधी कुटुंबाचा अधिकार असल्याचा गैरसमज करून बसलेला हा समाजइथले नियम आणि कायदे बड्या धेंडांनी पाळण्याची गरज नसल्याच्या भ्रमातही वावरतोनव्हेतसे त्याचे ठाम मत असतेकारणसमानतेच्या कितीही बाता हाणल्या जात असल्या तरी मुळातश्रेष्ठ आणि कनिष्ठांसाठीचे स्वतंत्र निकष समाजमनात फार पूर्वीपासून घर करून बसले आहेत.
 
स्वत:ला वास्तवात शक्य नसलेल्या सर्वच गोष्टींबाबतची स्वप्नं आणि समाधान हा समाज अलीकडचे चित्रपटदूरचित्रवाणीवरील मालिकांमधील अत्याधुनिकतेची झालर लेऊन सादर झालेली कथानकं अन्‌ झगमगाटात धुंडाळत राहतोत्याच वेळी वैयक्तिक आणि सामाजिक जीवनातील आचरणाबाबतच्या संस्कारांशीही त्याचा कडवा संघर्ष चाललेला असतोचांगल्या-वाईटांच्या संकल्पनांबाबत मनात कुठेच संभ्रम नसलाबहुतांश लोक त्यातील चांगल्याच बाबींची निवड करीत असलेतरी वाईटाची कास धरणार्यांना करावयाच्या शिक्षेबाबत मात्र त्याची भूमिका दुटप्पी होत जातेगुन्हा करणारी व्यक्ती कोणयावरून त्या शिक्षेची तीव्रता ठरतेस्वत:चे आकलनशक्तीआर्थिक परिस्थितीव्यक्तिमत्त्व आणि एकूणच परिघाबाहेरच्या ठरलेल्या गोष्टींबाबत सर्वसामान्य माणसांची अवस्था फार बिकट होतेसामाजिक वर्तणुकीबाबत तो बराचसा खबरदारीजबाबदारीचे भान राखून असतोत्या परिस्थितीत इतर कुणी विपरीत वागले की मात्र त्याची अस्वस्थता वाढत जातेपुष्कळदा समाजस्वास्थ्य बिघडण्याची िंचता त्यामागे दडलेली असतेतर कित्येकदा तसल्या वागण्याबाबतच्या कुतूहलाचीही किनार त्याने या संदर्भात स्वीकारलेल्या भूमिकेला लाभलेली असते.
 
वैयक्तिक जीवनातील आचरणाबाबत प्रभू रामचंद्रांचा आदर्श असतो प्रत्येकाच्या ठायी इथेदिलेला शब्द पाळण्यापासून तर त्यासाठी कराव्या लागणार्या संघर्षापर्यंत आणि त्यागापासून तर एकपत्नित्वाच्या व्रतापर्यंत... बदललेल्या परिस्थितिनुरूप कालबाह्य बाबी बाजूला सारून नव्या संकल्पना अंगीकारण्याचीही त्याची तयारी असतेबालविवाहापासून तर हुंड्याच्या पद्धतीपर्यंत कित्येक गोष्टी केराच्या टोपलीत टाकून हा समाज पुढे जाऊ शकला आहेतो त्यामुळेचतरीही विराट कोहली अन्‌ अनुष्का शर्माच्या लग्नाबाबत तो कमालीचा उत्सुक असतोकाही संबंध नसताना सहभागी होतो तोत्या संदर्भातील चर्चेतअभिषेक-ऐश्वर्या बच्चन यांना झालेल्या बाळाचे लाड कसे पुरवले जाताहेतहे जाणून घेण्यासाठीही तो नको तितका उतावीळ झालेला असतोअनुप जलोटाने वयाच्या सत्तराव्या दशकात केलेल्या तिसर्या विवाहाची चर्चा केल्याविनाही त्याला राहावत नाहीजलोटांनी बिग बॉस नामक एका तद्दन फालतू कार्यक्रमात चालवलेली थेरं... यामध्येही नाही म्हणायला त्याचा रस असतो तो असतोचकधीकाळी ज्यांच्या भजनात लोक तल्लीन व्हायचेते जलोटा वयाच्या सत्तरीत बिग बॉसमध्ये कुठल्याशा प्रसंगात राण्यांच्या गराड्यातील राजाची भूमिका साकारण्याचे उपद्व्याप करतातइतक्यातच त्यांचं खरंखुरं नवं लग्नंही झालेलं असते आणि तोच आता लोकांच्याही चघळण्याचा विषय झालेला असतो.अतिशय निम्न दर्जाची फालतुगिरी असूनही ‘बिग बॉस’ यशस्वी का ठरतो माहीत आहेत्याला कारणपूर्ण कल्पना असतानाही त्या फालतुगिरीला लाभणारे लोकांचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पाठबळ हे आहे.
 
दुसरं असं कीपाश्चात्त्यांचे अंधानुकरण करताना किंवा एरवीही अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा उदोउदो करतानाएखाद्याच्या खाजगी आयुष्यात नेमके किती खोलवर शिरायचेत्याची जाहीर रीत्या किती वाच्यता आणि चर्चा करायचीयाचे तारतम्य कुणीच बाळगत नाहीत्या चर्चेची उपयोगिता हा तर आणखीच वेगळा मुद्दा आहेसध्याच्या चर्चेचा अनुप जलोटांवर किती परिणाम झालायाचे मोजमाप करायला कुठलेही परिमाण उपलब्ध नाहीअन्यथा आपण उगाच तोंडाची वाफवेळ किती वाया घालवतो आहोतयाची कल्पना तरी आली असती लोकांनाएरवी वैचारिक प्रगल्भतेच्या गप्पा मारतातच लोकतर मग त्यांच्या त्यांच्या खाजगी जीवनाचा एक भाग म्हणून सोडून देता येणार नाही हा मुद्दा आपल्यालाबरंआयुष्यात दोन-तीन लग्नं केलेली माणसं काय कमी आहेत समाजातएक गायकया पलीकडे अनुप जलोटांचं स्थान काय आहे तुमच्या-आमच्या जीवनातगायनाच्या क्षेत्रात त्यांनी भजन हा प्रकार निवडलाउत्तम दर्जाच्या कलेचे सादरीकरण करीतकितीतरी दिवसपर्यंत लोकांचे मनोरंजन केलेभरपूर पैसा कमावलापणशेवटी जलोटा हे केवळ एक गायक आहेतते काही साधुसंत नाहीतहेही समजून घेतले पाहिजेसंतपदाला पोहोचलेल्या व्यक्तींना अवचित स्फुरलेल्या पंक्तीतून वाहणारी भक्तिधारा सुरांच्या माध्यमातून वर्षानुवर्षे लोकांपर्यंत पोहोचविल्यानंतरही ईश्वरचरणी लीन होण्याची पात्रता त्यांच्या अंगी आली नाही म्हणून त्यांना हिणवतानातसली पात्रता आपण स्वतकमावली असल्याचा दावा करण्याचे धारिष्ट्य किती लोकांना दाखवता येईलतसे काही करता येणार नसेलतर मग जलोटांवर आगपाखड करण्यातत्यांच्यावर तोंडसुख घेण्यात वेळ किती आणि कशाला दवडायचा समाजाने तरी?
 
निदान भारतीय समाजात तरीशारीरिक संबंधांच्या पलीकडे लग्नसंस्थेचे महत्त्व आहेअलीकडच्या विभक्त कुटुंबपद्धतीत ज्येष्ठ नागरिकांना मानसिक आधारासाठी म्हणून भासणारी जोडीदाराची गरजही एव्हाना मान्य करताहेत आपल्याकडचे लोकविचारांचे इतके पुढारलेपण सिद्ध करणार्या भारतीय समूहाने कुणाच्या तरी खाजगी आयुष्यातला लग्नाचा मुद्दाकेवळ तो उतारवयातील असल्याच्या कारणावरून इतका टोकाला जाऊन चर्चेचा ठरवावा आणि त्यासाठी स्वत:चा अमूल्य वेळ खर्ची घालावाहे काहीसे अनाकलनीय आहेव्हीशांतारामपासून तर आयएसजोहरपर्यंत आणि कमाल हसनपासून तर कॉंग्रेसच्या शशी थरुरांपर्यंत भली मोठी यादी तयार होईल एकापेक्षा अधिक लग्न करणार्यांचीकुणाकुणाच्या खाजगी आयुष्यात डोकवायचे समाजानेतेही जलोटा,थरुरांना काडीचा फरक पडत नसतानायातील कुणीहीभारतीय समाजाचे आदर्श नाहीतकालही नव्हतेआजही नाहीत्यामुळे त्यांच्या जराशा निराळ्या वागण्याने समाजमन विचलित होण्याची किंवा ते अगदीच रसातळाला जाण्याची शक्यता सुतराम नाही.शिवायआज तमाम भारतीयांनी गांभीर्याने लक्ष घालावे असे कित्येक प्रश्न दुर्लक्षित राहिले आहेतज्यावर सखोल चिंतनमननमंथन व्हावेअसेही कितीतरी विषय चर्चेविनाच बाजूला सारले जाताहेतअशात जलोटांच्या लग्नाचा कवडीमोल विषयसार्या देशाचे लक्ष जावे इतका फुगवून मोठा अन्‌ महत्त्वाचा केला जाणार असेलतर मग संपलंच सारं..!

2 comments:

  1. खूप सुंदर लिखाण. समाजात राहणारी माणसे कोणी चांगलं केलं की त्याची वाह वाह करायची सुद्धा दखल घेत नाहीत, पण त्याच्यावर नेगेटिव्ह बोलणं कोणी केलं की पूर्ण समाज एक होऊन त्याच्यावर शिंतोडे उडवुनी नालस्ती करायला तयार होतात.

    ReplyDelete