Friday, September 28, 2018

प्रश्न व्यभिचाराचा : उत्तर कायद्याच्या चौकटीपलीकडले!

 
न्यायालयाने व्यभिचाराला कुठेही प्रतिष्ठा प्राप्त करून दिलेली नाहीउलट नैतिकतेच्या पातळीवर तो अयोग्यच ठरविला आहेहा यातील अधोरेखित करण्याजोगा दखलपात्र असा महत्त्वपूर्ण मुद्दापरवा रद्दबातल ठरवला गेला तो इंग्रजकालीन कायदाकाळ बदलतोय्‌, समाज सर्वार्थाने बदलतोय्‌. तंत्रज्ञानापासून तर उंचावलेल्या राहणीमानाच्या आडून आलेल्या भौतिक सुविधांपर्यंत सर्वांचेच स्वरूप बदललेसारेकाही बदलतेय्‌, तर मग कायदा प्रवाही नकोकालबाह्य ठरलेल्या सार्याच बाबी जर आम्ही कचर्याच्या टोपलीत टाकत निघालोय्‌, तर मग कायदा कसा दीडशे वर्षांपूर्वीचा असूनही चालवून घेता येईल?तो कसा इंग्रजांच्या पद्धतीने चालेलएकदा जराहा कायदा खारीज करण्यामागील भूमिकाही समजून घेतली पाहिजेते करायचे सोडून,न्यायालयाने जणू विवाहबाह्य संबंधांना परवानगीच दिली असल्याच्या थाटातला थयथयाट करण्यात काही लोकांचा उत्साह ओसंडून वाहतो आहेकालपर्यंत या समाजात विवाहबाह्य संबंध अजीबातच अस्तित्वात नव्हते आणि आता या निर्णयानंतर उद्यापासून लागलीच तसल्या संबंधांना ऊत येणार असल्याचे कुणाचे मत असेलतर मग आमच्यासारखे दांभिक फक्त आम्हीच

वैयक्तिक जीवनातील विवाहबाह्य संबंधांचा मुद्दा थेट न्यायालयाच्या दालनात मांडला गेलानैतिकदृष्ट्या गैर ठरवतफौजदारी कारवाईसाठी मात्र तो अपात्र ठरविण्याचा निर्णय परवा न्यायासनाने जाहीर केला अन्‌ समाजमन पुन्हा एकदा ढवळून निघालेपुन्हा एकदा एवढ्यासाठी कीकाल-परवाच समलैंगिकतेच्या विषयावर ते पुरते ढवळून निघाले होतेआता या मुद्यावरून त्याची पुनरावृत्ती झाली एवढेचआधीसमलैंगिक संबंध ठेवणार्यांना कायद्याच्या कचाट्यातून सूटआणि आता हे प्रकरणमग खूनदरोडे,चोर्याचपाट्या करायलाही कायद्याने मान्यता देऊन टाका एकदाचीम्हणजे समाजात कुणालाच कशाचेच बंधन उरणार नाही...! अशा तीव्र प्रतिक्रियाही स्वाभाविकपणे उमटताहेत या संदर्भात.
 
मुळातच संस्कार आणि नैतिकतेच्या बळावर उभ्या राहिलेल्यावैचारिकदृष्ट्या प्रगत अन्‌ पुरेशा प्रगल्भ अशा भारतीय समाजाने या संदर्भात खूप वेगवेगळ्या दृष्टीने विचार करण्याची गरज आहेन्यायालयाने व्यभिचाराला कुठेही प्रतिष्ठा प्राप्त करून दिलेली नाहीउलट नैतिकतेच्या पातळीवर तो अयोग्यच ठरविला आहेहा यातील अधोरेखित करण्याजोगा दखलपात्र असा महत्त्वपूर्ण मुद्दापरवा रद्दबातल ठरवला गेला तो इंग्रजकालीन कायदाकाळ बदलतोय्‌, समाज सर्वार्थाने बदलतोय्‌. तंत्रज्ञानापासून तर उंचावलेल्या राहणीमानाच्या आडून आलेल्या भौतिक सुविधांपर्यंत सर्वांचेच स्वरूप बदललेसारेकाही बदलतेय्‌, तर मग कायदा प्रवाही नकोकालबाह्य ठरलेल्या सार्याच बाबी जर आम्ही कचर्याच्या टोपलीत टाकत निघालोय्‌, तर मग कायदा कसा दीडशे वर्षांपूर्वीचा असूनही चालवून घेता येईल?तो कसा इंग्रजांच्या पद्धतीने चालेलएकदा जराहा कायदा खारीज करण्यामागील भूमिकाही समजून घेतली पाहिजेते करायचे सोडून,न्यायालयाने जणू विवाहबाह्य संबंधांना परवानगीच दिली असल्याच्या थाटातला थयथयाट करण्यात काही लोकांचा उत्साह ओसंडून वाहतो आहेकालपर्यंत या समाजात विवाहबाह्य संबंध अजीबातच अस्तित्वात नव्हते आणि आता या निर्णयानंतर उद्यापासून लागलीच तसल्या संबंधांना ऊत येणार असल्याचे कुणाचे मत असेलतर मग आमच्यासारखे दांभिक फक्त आम्हीचहे लक्षात घेतले पाहिजे.
 
समाजव्यवस्था सुरळीत चालण्यासाठी एका मर्यादेत कायद्याचीत्याच्या कठोर अंमलबजावणीची गरज असतेहे मान्य केले तरी ही व्यवस्था केवळ तेवढ्यावरच चालत नाहीविशेषतभारतीय समाज तर नैतिकतेच्या अधिष्ठानावर उभा राहिला आहे कित्येक वर्षे.समाजमनात अंकुरलेल्या संस्कारांचीही सुरेख साथसंगत त्याला लाभत आली आहेसंस्कार आणि नैतिकतेची मुळं अधिक खोलवर रुजली असल्याची आणि कायद्याच्या तुलनेत तीच अधिक प्रभावी ठरली आहेत आजवरराजा दशरथाने कैकेयीला दिलेल्या वचनाची पूर्ती करण्याचे बंधनपुत्र म्हणून प्रभू रामचंद्रांना कुठल्या कायद्याने घालता आले असते सांगापणसंस्कारांचे अधिष्ठानच इतके मजबूत होते कीबंधन घालणार्या कायद्याची गरजच पडली नाहीवडिलांनी दिलेल्या वचनाची जबाबदारी आपण का स्वीकारावी,राजिंसहासनावरील अधिकार सोडून वनवास का भोगावाअसा साधा प्रश्नही प्रभू रामचंद्रांना पडला नाहीज्या व्यवस्थेत असल्या कुठल्याही संकेतांचा वा अधिष्ठानाचा अभाव आहेत्यांनी कायद्याच्या बंधनात जखडून समाजरचना सुरळीत राहीलअशी व्यवस्था उभारलीइंग्रजी हुकुमत हद्दपार केल्यानंतरही आम्ही त्याच इंग्रजांचे कायदे डोळे झाकून स्वीकारलेसंकेतनैतिकतासंस्कार बासनात गुंडाळून ठेवतस्वत:ला कायद्याच्या चौकटीत तोलूमापू लागलोनव्हेत्याचा अभिमानही वाटू लागला आम्हालाचौकातला सिग्नलचा नियम पाळायलाही मग पोलिस शिपायाचा धाक अनिवार्य ठरलाघरात वादच उत्पन्न होणार नाहीतअशी व्यवस्था निर्माण करण्याची कल्पना बाद ठरलीउलट घरातलेवैयक्तिक वाद पोलिसन्यायालयाच्या पातळीवर चव्हाट्यावर आणण्याची आणि त्रयस्थांकडून तो सोडवून घेण्याची तर्हा अंगवळणी पडू लागली...
 
प्रश्नाचे मूळ शोधायचे सोडून त्याच्या उत्तराच्या पद्धतीवर वाद घालण्यातच मशगूल आहेत लोक इथेयाच समाजाचा एक भाग असलेल्या वनवासी बांधवांच्या संदर्भात परवा उद्धृत झालेले एक विधान बोलकेच नव्हेतर नागर समाजाच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारे ठरावेसर्वांच्याच लेखी अशिक्षितअडाणीमागास ठरलेल्या आदिवासी समूहातील लोक अंगावर पुरेसे कपडे नसलेल्या अवस्थेत जगताततरीही तिथे बलात्काराच्या घटना घडत नाहीतएकमेकांची फसवणूक करत नाही कुणीघटस्फोटही नाहीत तिथे.वाद उद्भवलाच कधी कुटुंबाततर वनवासी लोक त्यांच्या स्तरावर त्यावरील उपाय योजतातत्याचा गाजावाजा करीत नाहीत अन्‌ बाऊ तर मुळीच करत नाहीततरुणाईला मोकळीक देणारीस्वत:चा साथीदार निवडण्याचे अधिकार प्रदान करणारी समाजमान्य अशीगोटूल’ व्यवस्था सर्वांसाठीच औत्सुक्याचाकुतूहलाचा विषयगोटूल तर त्यांच्यातल्या पुढारलेपणाचे लक्षण मानले जातेफक्त शहरी भागातल्या तरुणांना तसे अधिकार बहाल करायचे म्हटलं कीमात्र लागलीच समाजव्यवस्था बिघडण्याची आवई उठविली जातेदोन व्यक्तींचे लग्न झाल्यावर त्यांच्यात बेबनाव झाला असेलतर तो पोलिस कसा मिटवू शकतीलहा प्रश्नही पडत नाही इथे कुणालाच!लग्नसंस्था टिकावी म्हणून विभक्त होण्याची प्रक्रिया जटिल करण्याची भूमिका इंग्लंडमध्ये अस्तित्वात असणे स्वाभाविक आहे.अन्यथासमाज अनिर्बंध होण्याची भीती त्यांना आहेम्हणून त्यांनी कायदे कठोर केले असतीलतर तेही समजता येईल एकवेळपण,भारतीय समाजाला काय झालंतो का म्हणून त्यांच्या पद्धतीने आपल्या प्रश्नांची उत्तरं शोधतोय्‌? घटस्फोटाची संकल्पना आपल्या व्यवस्थेला कुठे मान्य आहेबरंइंग्रजांकडून आंधळेपणाने उधार घेतलेले कठोरातले कठोर कायदे अस्तित्वात असतानाही अलीकडच्या काळात भारतीय समूहात घटस्फोटांचे प्रमाण कमालीच्या बाहेर का वाढावेआम्ही शोधतोय्‌ त्या कायद्याच्या चौकटीत या प्रश्नाचे उत्तर सापडणारच नाहीयेकारण मुळात ते तिथे दडलेलेच नाही!
 
विवाहबाह्य संबंधांचा तरी कुठे अपवाद आहे यालाइंडियन पिनल कोडमधील ज्या सेक्शन 497 मध्ये या संबंधांचा उल्लेख आहे, 158वर्षांपूर्वी तो उल्लेख कुठून आलाका आला असेलही बाब अस्तित्वात होती म्हणूनकी कसलाही विचार न करता इंग्रजी व्यवस्थेतले कायदे उचलून नव्या भारतीय व्यवस्थेत ते जसेच्या तसे लागू करण्याचा तो परिणाम होतामानवी समूहातील सारेच प्रश्न न्यायालयाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवण्याची सवय जडल्यानेकारवाई करताना स्त्री-पुरुषांपैकी एकाशी भेदभाव करणारी या कायद्यातील तरतूद आक्षेपार्ह ठरवतकुणीतरी न्यायालयात गेलं आणि हा मुद्दा चर्चेत आलाआजघडीला तोच एकमेवऐरणीवरचा विषय असल्याचा आभास माध्यमांनी अगदी व्यवस्थितपणे निर्माण केलासमाजहिताच्या पलीकडे वैयक्तिक स्वातंत्र्याचे स्तोम किती माजवायचेन्यायव्यवस्थेनेही एखाद्याच्या व्यक्तिगत जीवनात कुठवर हस्तक्षेप करायचाकाही गोष्टी वैयक्तिकसामाजिक स्तरावर सोडून देण्याचेही औदार्य दाखवावे नान्यायालयानेही कधीतरी!
 
कलम 377 असो की 497, ते पूर्णतवा अंशतखारीज केल्याबरोबर लागलीच दुसर्या दिवशीपासून अराजक निर्माण व्हायलासमाजात रुजलेले संस्कार आणि नैतिकतेचा पाया इतकाही तकलादू नाहीपणतो दिवसागणिक ठिसूळ होतोय्‌ हे मात्र खरंभारतीयांना असलेले पाश्चिमात्य जीवनशैलीचे प्रचंड आकर्षणत्यानुरूप जगण्याचीसोयीच्या ठरलेल्या मर्यादित चौकटीत संपूर्ण आयुष्याचे सार शोधण्याची धडपडहे त्यामागचे कारण असावे कदाचितपणत्यातून उद्भवलेले प्रश्नकठोर कायद्याच्या माध्यमातून सुटतीलहा मात्र केवळ भ्रम आहेमूल्याधिष्ठित पायव्यावर समाज भक्कमपणे उभा राहिलातर हे प्रश्न उद्भवणारदेखील नाहीत कदाचितपण दुर्दैवाने,नेमके तेवढे करायचे सोडून बाकी सगळं करतोय्‌ आपण...

No comments:

Post a Comment