एखादा माणूस जेव्हा भूतकाळातून धडे अन् भविष्याचा वेध घेत वर्तमान जगतो, तेव्हा त्याच्या अनुभवातून सिद्ध झालेल्या धगधगत्या लेखणीवर चाहत्यांच्या उड्या पडल्या नाहीत तरच नवल! १९७० च्या दशकातील ‘फ्युचर शॉक्स’च्या बाबतीत तेच घडलं. नंतरच्या काळातील थर्ड वेव्ह, पॉवरशिफ्ट ही पुस्तकंही त्याच वळणावर सिद्ध झालेली. राजकारण्यांपासून तर उद्योगपतींपर्यंत सर्वांनी स्वीकारलेली. पुस्तकंच कशाला, या विश्वातील लोकांनी तर त्याचं तत्त्वज्ञानही मनापासून स्वीकारलं. आयबीएम, झेरॉक्स, एटीऍण्डटीसारख्या कंपन्यांनी निमंत्रणं देऊन टॉफलर यांना बोलावले. कुणी रीसर्चपेपर लिहिण्याची गळ घातली, तर कुणी कंपनीची धोरणं ठरवण्यासाठी त्यांचा सल्ला मागितला. नाही म्हणायला आल्विन यांनी आयुष्यातला बराच काळ पत्रकारितेतही घालवला. एका वृत्तपत्रासाठी व्हाईट हाऊसमधील घडामोडींचे वार्तांकनही त्यांनी केले. १९५९ मध्ये पुन्हा एकदा न्यूयॉर्कमध्ये दाखल झाल्यानंतर, बंधनं झुगारून मुक्तपत्रकारिता करतानाही चिंतन, मनन, अवलोकन, आकलन, अभ्यास सुरूच होता. तत्कालीन वेगवेगळ्या प्रख्यात लेखकांचा प्रभाव त्यांच्यावर पडला होता. आल्विनचं गेल्या पंधरवड्यात निधन झालं अन् सारं जग हळहळलं. सत्याऐंशी वर्षांच्या आयुष्यात त्यांनी जगभरातील मानवी समूहाला आपल्या वैचारिक बैठकीतून स्वतंत्र विचारांची नुसती देणच दिली नाही, तर त्यांच्यासाठी अमर्याद मुक्तचिंतनाची मुक्तहस्ते उधळण केली आहे.
जग वेगाने बदलत आहे. मानवी जीवनाची मूल्ये बदलताहेत. जगण्याची रीत दिवसागणिक बदलते आहे. या बदलाशी जुळवून घेण्यासाठी आमचा अजूनही संघर्षच चालला आहे. पण, त्याला मात्र पाच दशकांपूर्वीच या बदलांचा वेध घेता आला होता. नव्या युगाशी, नव्या तंत्रज्ञानाशी साधर्म्य साधता आले तरच, अन्यथा जगणे दुरापास्त होईल, असा इशारा सत्तरच्या दशकातच देऊन गेला हा वेडा. सारे जग एकविसाव्या शतकाची आस लावून बसले असताना, उगवण्यापूर्वीच त्या शतकातले जीणे प्रत्यक्षात जगू शकला होता तो! नव्या युगातील बदलती परिस्थिती असो, की त्या परिस्थितीतील मानवी ज्ञानाच्या रुंदावणार्या कक्षांची मांडणी असो, सन २०००च्या आसपास विद्यापीठातील शिक्षणपद्धती पुरती कालबाह्य झालेली असेल, हा त्यांनी बांधलेला अंदाज असो, की मग मानवाच्या, भविष्यात समाजजीवनातील बदलणार्या भूमिकेचे त्यांनी केलेले विवेचन, सार्याच गोष्टी अगदी तंतोतंत खर्या उतरल्या आहेत.
आल्विन टॉफलर. पोलंडमधून अमेरिकेत दाखल झालेल्या रोझ आणि सॅम या ज्यूईश दाम्पत्याच्या घरात जन्माला आलेला एक सामान्य मुलगा. आल्विनचा नंतरच्या काळातला प्रवासही काही खूप जगावेगळा होता, असं नाही. पण, त्यांच्यातल्या एका सामान्य माणसाने मांडलेले सिद्धांत, त्यांनी सातत्याने घेतलेला भविष्याचा वेध आणि तो वेध घेताना त्यांनी जगाला केलेले दिशादर्शन मात्र असामान्य ठरले. बहुधा म्हणूनच हा माणूस लोकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून धरला अन् त्याचे विचारही शिरसावंद्य मानले.
‘‘एकविसाव्या शतकात अशिक्षित तो नसेल, ज्याला लिहिता वाचता येत नाही. तेव्हा अशिक्षित तो असेल, ज्याची नवे काही शिकण्याची तयारी नाही. अशिक्षित ते असतील, ज्यांची जुने ते नव्याने शिकण्याची तयारी नाही.’’ हे सांगताना आल्विन, नवे तंत्रज्ञान स्वीकारण्यास नकार द्याल तर काय अवस्था होईल, हे अप्रत्यक्षपणे सांगून जातो. ‘‘बदल हे जीवनाचे मर्म आहे... छे! बदल हेच जीवन आहे.’’ या एका छोट्याशा वाक्यातूनही टॉफलर मानवी जीवनाचे मर्मच प्रतिपादित करतो. चरितार्थ चालविण्यासाठी एका कारखान्यात कामगार म्हणून काम करताना दिवसभर घाम गाळून सायंकाळी घरी परतल्यावर मनातले काव्यतरंग शब्दांतून कागदावर उमटविण्याची प्रतिभा त्याच्या ठायी असते. कदाचित त्यामुळेच असेल, पण माणसाच्या स्वभावात परिस्थितिनुरूप घडणारे बदलही त्याला तितक्याच सहजतेने टिपता येतात.
‘‘ज्याच्याकडे स्वत:ची धोरणं नसतात, ती व्यक्ती त्याच्याही नकळत दुसर्याची धोरणं राबविणारे माध्यम बनून जाते,’’ हे विधान सहजपणे करून जाणारा टॉफलर याच न्यायानं स्वत:च्या जीवनालाही दिशा देतो. किंबहुना हे विधान त्याच्या स्वत:च्या अनुभवातून सिद्ध झालेले असते.
जगभरात ज्याच्या किमान साठ लक्ष प्रती विकल्या गेल्यात, त्या ‘फ्युचर शॉक्स’चा प्लॉटच मुळात या अनुभवांवर बेतलेला. एखादा माणूस जेव्हा भूतकाळातून धडे अन् भविष्याचा वेध घेत वर्तमान जगतो, तेव्हा त्याच्या अनुभवातून सिद्ध झालेल्या धगधगत्या लेखणीवर चाहत्यांच्या उड्या पडल्या नाहीत तरच नवल! १९७० च्या दशकातील ‘फ्युचर शॉक्स’च्या बाबतीत तेच घडलं. नंतरच्या काळातील थर्ड वेव्ह, पॉवरशिफ्ट ही पुस्तकंही त्याच वळणावर सिद्ध झालेली. राजकारण्यांपासून तर उद्योगपतींपर्यंत सर्वांनी स्वीकारलेली. पुस्तकंच कशाला, या विश्वातील लोकांनी तर त्याचं तत्त्वज्ञानही मनापासून स्वीकारलं. आयबीएम, झेरॉक्स, एटीऍण्डटीसारख्या कंपन्यांनी निमंत्रणं देऊन टॉफलर यांना बोलावले. कुणी रीसर्चपेपर लिहिण्याची गळ घातली, तर कुणी कंपनीची धोरणं ठरवण्यासाठी त्यांचा सल्ला मागितला. नाही म्हणायला आल्विन यांनी आयुष्यातला बराच काळ पत्रकारितेतही घालवला. एका वृत्तपत्रासाठी व्हाईट हाऊसमधील घडामोडींचे वार्तांकनही त्यांनी केले. १९५९ मध्ये पुन्हा एकदा न्यूयॉर्कमध्ये दाखल झाल्यानंतर, बंधनं झुगारून मुक्तपत्रकारिता करतानाही चिंतन, मनन, अवलोकन, आकलन, अभ्यास सुरूच होता. तत्कालीन वेगवेगळ्या प्रख्यात लेखकांचा प्रभाव त्यांच्यावर पडला होता. आल्विनचं गेल्या पंधरवड्यात निधन झालं अन् सारं जग हळहळलं. सत्याऐंशी वर्षांच्या आयुष्यात त्यांनी जगभरातील मानवी समूहाला आपल्या वैचारिक बैठकीतून स्वतंत्र विचारांची नुसती देणच दिली नाही, तर त्यांच्यासाठी अमर्याद मुक्तचिंतनाची मुक्तहस्ते उधळण केली आहे.
‘‘स्पर्धेच्या या युगात तग धरून राहायचे असेल, तर आपल्याला आपली क्षमता शेकडो पटीने वाढविली पाहिजे. समाजातली आपली स्वीकारार्हता आणि क्षमताही शतपटीने वाढवावी लागणार आहे. स्वत:साठी नव्या वाटा धुंडाळण्याचीही तयारी आपल्याला ठेवली पाहिजे. व्यवसाय, धर्म, कुटुंब, समाज, राष्ट्र अशा सर्वच संकल्पनांची मुळं हळहळू सैल होऊ लागली आहेत. पुढील काळात संसाधनांमुळे निर्णयांवर निर्बंध येणार नाहीत. उलट मानवी निर्णयांमधून संसाधनांची उपयोगिता ठरणार आहे...’’
‘‘शिकणे म्हणजे जणू चढावावर चढणे होय. आधुनिकता न स्वीकारणे म्हणजे स्वत:ला मागे लोटण्यासारखे आहे.’’ ‘‘मानवी जीवनाला स्वत:ची एक सूत्रबद्ध रचना असली पाहिजे. अन्यथा त्याचे जगणे पशूसमान आहे.’’
अशा सोप्या शब्दांमधून आशयघन संचित मांडणार्या टॉफलर यांनी संगणकापासून तर एकविसाव्या शतकातील आव्हानांपर्यंत सार्याच बाबींची यथोचित चर्चा कधी ना कधी केली आहे. तंत्रज्ञानाच्या अत्याधुनिकतेतून माणसं आळसावणार असल्याचे सांगण्यापासून, तर भविष्यात आपल्यावरील कामांचे ओझे वाढणार असल्याची बाबही तेवढ्याच शिताफीने सिद्ध करण्याचे कसब पणाला लावावे ते टॉफलरनेच! कालपर्यंत जी कामे अन्य लोक आपल्यासाठी करायचे, ज्यासाठी त्यांना पैसे मोजले जायचे, तीच कामे आता तंत्रज्ञानाच्या नावाखाली आपल्याकडून करवून घेतली जातील अन् त्याचा आर्थिक मोबदलाही आपल्या पदरात पडणार नाही. एटीएम हे त्याचे सर्वात सोपे उदाहरण आहे. आपल्या खात्यातून पैसे काढण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कालपर्यंत बँकेतली एक यंत्रणा आपल्याकरिता काम करायची. त्यासाठी त्यांना वेतन मिळायचे. आता आपले पैसे आपणच काढतो. त्यासाठीची प्रक्रियाही आपणच पूर्ण करतो. आपल्याला त्यासाठी कुठला मोबदलाही मिळत नाही. तंत्रज्ञानातील बदलांमुळे अशी विना मोबदला कामे येत्या काळात मोठ्या प्रमाणात आपल्या वाट्याला येणार असल्याचे संकेत टॉफलरने केव्हाच दिले होते. फरक फक्त एवढाच आहे की, जगाला त्याचा प्रत्यय आता येतो आहे. उद्योगजगतातील ‘प्रॉडक्शन’चा ‘मास प्रॉडक्शन’पर्यंतचा प्रवास आणि संगणकाच्या माहिती युगातील परिवर्तनाचा अंदाजदेखील या भविष्यवेत्त्याला केव्हाच अचूक बांधता आला होता. इतकेच कशाला, अगदी परग्रहावरील मानवी वस्त्यांची कल्पना, जी आज आपण करू शकतोय्, त्याची शक्यता आल्विनला आजपासून कितीतरी वर्षांपूर्वीच जाणवली होती. असा हा टॉफलर, मार्क्सच्या विचारांचा पगडा असलेला, उमेदीच्या काळात कामगारांचा नेता राहिलेला, एक तत्त्ववेत्ता जगाने पंधरा दिवसांपूर्वी गमावला. त्याची सल, हळहळ अजूनही दुनियेच्या कानाकोपर्यातून व्यक्त होते आहे. काळाने त्यांची मुलगी तर सोळा वर्षांपूर्वीच हिरावली होती. पण, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात, दरवेळी, अगदी गाजलेल्या पुस्तकांच्या निर्मितीच्या प्रक्रियेतही त्याच्या साथीने दमदारपणे उभी राहिलेली पत्नी हैदी... तिच्या मनाला मात्र, त्याच्या माघारी, त्याची उणीव अधिक तीव्रतेने जाणवत राहणार आहे...

No comments:
Post a Comment