एकीकडे लोकशाहीचा उच्चरवात जयघोष करायचा अन् प्रत्यक्षात मात्र हुकूमशाहीचे कित्ते गिरवायचे, हा या घराण्यातील सदस्यांचा तमाशा गेली कित्येक वर्षे सारा देश केवळ अनुभवतच नाही, तर सहन करतोय्. बिटिशांंची संसदीय प्रणाली ज्यांनी कधीच धुडकावून लावली होती, त्या महात्मा गांधींशी भांडून, तडजोडी करून संसदीय लोकशाही व्यवस्था अस्तित्वात आणायला गांधींना भाग पाडणार्या कॉंग्रेसने, स्वत:च्या पक्षात तरी ही व्यवस्था कधी स्वीकारली? त्या व्यवस्थेची पत्रास त्यांनी कधी अन् किती बाळगली? अन्यथा सरदार पटेलांच्या मृत्यूनंतर लोकशाही मार्गाने लोकांच्या मतांच्या माध्यमातून निवडून आलेल्या पक्षाध्यक्षाला, केवळ पंडित नेहरूंच्या इच्छेखातर राजीनामा का द्यावा लागावा? पंतप्रधानपदावर नरसिंह राव नसते, तर अयोध्येत बाबरी ढाचा कोसळला नसता, या प्रतिक्रियेचा आडमार्गाने निघणारा अर्थ काय? आपल्याच पक्षाच्या सरकारने तयार केलेला अध्यादेशाचा एक मसुदा पत्रकारांसमोर टराटरा फाडून डॉ. मनमोहनसिंगांची ‘लायकी’ सिद्ध करण्याची राहुल गांधींची केविलवाणी धडपड दुसरे- तिसरे काय सांगून जाते? या घराण्याला आपल्यापलीकडे कुणी या देशाच्या पंतप्रधानपदावर विराजमान झालेले सहन होत नाही, हाच त्याचा अर्थ आहे. ना नेहरूंनी कधी ते होऊ दिले, ना इंदिरा गांधींनी. नंतरच्या काळातला राजीव गांधींचा प्रवासही त्याच दिशेने राहिला.
नेहरू-गांधी घराण्याच्या पलीकडे कुणाच्या हातात सत्ता गेल्याची बाब कधी त्यांच्या पचनीच पडली नाही. मग खुद्द कॉंग्रेस पक्षाच्या नरसिंह रावांवर झालेले आरोप असोत, की डॉ. मनमोहनसिंगांच्या नशिबी आलेली अपमानास्पद गच्छंती! त्याचा प्रत्यय वारंवार अनुभवला गेलाय् आजवर. आता तर त्यांच्यालेखी विचारांनी अगदीच विरोधक असलेले लोक सत्तेवर आहेत. ते कसे खपेल यांना? सध्या निर्माण झालेली असहिष्णुतेची खदखद हा गांधी-नेहरू घराण्याच्या हातून सत्ता गेल्याने निर्माण झालेल्या असंतोषाचा परिणाम आहे. सत्ता आपल्या हातात नसणे आणि त्यातही ती विरोधकांच्या हातात असणे, ही बाब न मानवलेले लोक त्याच मुद्याच्या आडून थयथयाट करत सुटले आहेत. संसदेच्या आगामी अधिवेशनात कामकाज चालू न देण्याची राहुलबाबांची धमकीही त्याच थयथयाटाच्या नाट्याचा एक भाग आहे.
एकीकडे लोकशाहीचा उच्चरवात जयघोष करायचा अन् प्रत्यक्षात मात्र हुकूमशाहीचे कित्ते गिरवायचे, हा या घराण्यातील सदस्यांचा तमाशा गेली कित्येक वर्षे सारा देश केवळ अनुभवतच नाही, तर सहन करतोय्. बिटिशांंची संसदीय प्रणाली ज्यांनी कधीच धुडकावून लावली होती, त्या महात्मा गांधींशी भांडून, तडजोडी करून संसदीय लोकशाही व्यवस्था अस्तित्वात आणायला गांधींना भाग पाडणार्या कॉंग्रेसने, स्वत:च्या पक्षात तरी ही व्यवस्था कधी स्वीकारली? त्या व्यवस्थेची पत्रास त्यांनी कधी अन् किती बाळगली? अन्यथा सरदार पटेलांच्या मृत्यूनंतर लोकशाही मार्गाने लोकांच्या मतांच्या माध्यमातून निवडून आलेल्या पक्षाध्यक्षाला, केवळ पंडित नेहरूंच्या इच्छेखातर राजीनामा का द्यावा लागावा? पंतप्रधानपदावर नरसिंह राव नसते, तर अयोध्येत बाबरी ढाचा कोसळला नसता, या प्रतिक्रियेचा आडमार्गाने निघणारा अर्थ काय? आपल्याच पक्षाच्या सरकारने तयार केलेला अध्यादेशाचा एक मसुदा पत्रकारांसमोर टराटरा फाडून डॉ. मनमोहनसिंगांची ‘लायकी’ सिद्ध करण्याची राहुल गांधींची केविलवाणी धडपड दुसरे- तिसरे काय सांगून जाते? या घराण्याला आपल्यापलीकडे कुणी या देशाच्या पंतप्रधानपदावर विराजमान झालेले सहन होत नाही, हाच त्याचा अर्थ आहे. ना नेहरूंनी कधी ते होऊ दिले, ना इंदिरा गांधींनी. नंतरच्या काळातला राजीव गांधींचा प्रवासही त्याच दिशेने राहिला. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर उफाळलेल्या शीखविरोधी दंगलींचा त्यांनी ज्या शिताफीने सत्ता काबीज करण्यासाठी उपयोग करून घेतला आणि त्यानंतरही, लोकांनी भावनावेगात बहाल केलेल्या अतिरेकी सत्तेचा दुरुपयोग करीत त्यांनी विरोधकांची कशी मुस्कटदाबी केली, तो इतिहासही अजून विस्मरणात गेलेला नाही लोकांच्या. उदाहरणे आणिबाणीच्या काळात माजवल्या गेलेल्या अराजकाची असोत वा मग १९८४ मध्ये विरोधकांवर गुदरलेल्या लाजिरवाण्या परिस्थितीची, त्यातून बाब एकच स्पष्ट होते, ती कॉंग्रेसच्या सत्तेसाठीच्या हव्यासाची! तेव्हा त्यांनी सत्तेत राहून हुकूमशाही चालवली होती. आता ते विरोधात बसून हुकूमशाही चालविण्याचा प्रयत्न करताहेत. तेव्हा त्यांनी विरोधकांना गुंडाळून ठेवण्याची षडयंत्रे रचली, आता ते सत्ताधार्यांना नामोहरम करायला निघालेत.
भाजपाच्या सध्याच्या सरकारच्या काळात सार्या जगाला भारताच्या नेतृत्वाचा, त्याच्या आगळ्या कार्यशैलीचा, त्याच्या व्यापक दृष्टीचा परिचय होत असताना, भेटी आणि बोलणीचा परिणाम म्हणून जगभरातील उद्योजक भारतात येण्याबाबत जरा कुठे सकारात्मक होत असल्याचे चित्र असताना कॉंग्रेसच्या नेत्यांना, विशेषत: राहुल गांधींना मात्र या देशात काहीच बरे चालले नसल्याचा जावईशोध लागला आहे. त्याबाबत ते अद्वातद्वा बोलत सुटले आहेत. संसदेच्या आगामी अधिवेशनात कामकाज होऊ न देण्याचा चंग त्यांनी आतापासूनच बांधला आहे. सत्तेत एकतर आम्ही, नाही तर कुणीच नाही, हे त्यांचे हुकूमशाहीदर्शक धोरण राबवायला ते सरसावले आहेत. लढाईच्या नावावर चाललेली त्यांची नौटंकी त्याचाच प्रत्यय देते.
सरकारविरुद्धच्या या कांगाव्यात एकटे कॉंग्रेसचे टोळकेच सामील नाही. कम्युनिस्टांची त्याला साथ आहे. ‘तिसर्या’ श्रेणीत मोडणारी काही मंडळीही दिमतीला आहेच. सर्वांनी मिळून घाट घातला आहे. असहिष्णुततेच्या नावावर केंद्रातल्या सरकारविरुद्ध सध्या सार्या देशात सुरू असलेला थयथयाट हा त्याचाच परिपाक आहे. महाराष्ट्रातही त्याच नाटकाचा कमी-अधिक फरकाने प्रयोग सुरू आहे. यांच्या दृष्टीने आज देशात कुठेच, काहीच चांगले सुरू नाही. सर्वदूर वाईट-वाईटचाच बोलबाला आहे. जणूकाय कालपर्यंत हे दीडशहाणे गांधींच्या कल्पनेतले ‘रामराज्यच’ चालवत होते अन् आता जणूकाय लोक अराजक अनुभवत आहेत, असल्या थाटातली सारी बेताल वर्तने चालली आहेत. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर पंबाजात झालेल्या सभेत हिंदुत्ववाद्यांना चिरडून टाकण्याची नेहरूंची ‘ती’ भाषा नसली, तरी यांचे उपद्व्याप अजून त्याच दिशेने चाललेले दिसताहेत. आपल्या विरोधात सत्तेत आलेल्यांना कामच करू न देण्याचा अगदी पहिल्या दिवसापासून यांनी बांधलेला चंग तेच संकेत देतो.
केंद्रातले सध्याचे सरकार लोकशाही मार्गाने, लोकसभेत तीनशेपेक्षा अधिक जागा मिळवून, यांची दशकाची सत्ता उलथवून, यांच्या नाकावर टिच्चून सत्तेत आले आहे. या घडामोडीत यांना लोकसभेतले विरोधी पक्षनेतेपद मिळवण्याच्या लायकीचेही ठेवले नाही लोकांनी. कधीकाळी चारशेपेक्षा अधिक जागा मिळवून मुजोर झालेल्या कॉंग्रेस नावाच्या ‘राष्ट्रीय’ पक्षाला ४४ वर आणून ठेवत पाऽऽर जेरीस आणले लोकांनी. तरीही आता वस्तुस्थिती स्वीकारून सत्तेतून बाजूला होण्याची आणि निवडून आलेल्यांना सुखाने कारभार करू देण्याची तयारी नाही यांची. अर्थात, ज्यांनी आपल्याच पक्षाच्या डॉ. मनमोहनसिंगांना सुखासुखी कारभार चालवू दिला नाही, ते भाजपाच्या नरेंद्र मोदींना अडथळ्याविना शर्यत पार करू देतील, याची अपेक्षा तरी कशी बाळगायची म्हणा! स्वातंत्र्योत्तरकाळात बहुतांश काळ या देशावर सत्ता गाजविल्यानंतरही लोकांनी यंदा खालच्या पायरीवर आणून ठेवलेला कॉंग्रेस नावाचा, शतकाची परंपरा जोपासणारा पक्ष, त्याच्या साथीला उभे राहत सध्याच्या सत्ताधार्यांविरुद्ध कंठशोष करणारे डावे, उजवे, तिसरे, चौथे... या सर्वांनी मिळून असहिष्णुतेचे मोहोळ उठवीत पुकारलेला बंड, हा त्याच षडयंत्राचा भाग मानला पाहिजे. ज्यांना वैचारिकदृष्ट्या संघ, जनसंघ, भाजपा कधी पटला नाही, त्या कथित पुरोगाम्यांनाही या निमित्ताने अचानक एक मंच उपलब्ध झाला आणि तेही या कथित लढ्यात, नव्हे, कटात सामील झाले. लेखक-कलावंत लोक कधीकाळी सन्मानार्थ मिळालेले पुरस्कार शासनाला परत करू लागले. ज्या लोकशाहीचा आपण कालपर्यंत जयघोष करीत आलो, त्याच लोकशाहीच्या मार्गाने सत्तेत आलेले एक सरकार कुठलेही सबळ कारण नसताना उलथवून लावण्याच्या कुणाच्या तरी षडयंत्रात हातभार लावून त्याच लोकशाहीचा आपण यातून धडधडीत अपमान करतोय्, हे विसरून गेली ही मंडळी. कालपर्यंतच्या कित्येक गंभीर प्रसंगात आपण मौन बाळगले, साधा निषेधही नोंदवता आला नाही आपल्याला, हे विसरून, त्या तुलनेत अगदीच किरकोळ बाबींचा बाऊ करून सरकार अपयशी ठरवायला निघाले हे लोक. ज्यांनी काल आणिबाणी लादली ते आता पुन्हा एकदा लोकशाहीचा गळा घोटायला निघाले आहेत; तर दुसरीकडे कालपर्यंत ज्यांना कंठ फुटला नाही, ते कथित पुरोगामी आता पोपटासारखे बोलू लागले आहेत...

No comments:
Post a Comment