तुमच्या या प्रश्नावर सरळ नाऽऽही म्हणून उत्तर द्यावं ना त्यांनी? पण, गलबला झाला होऽऽचा! आता आली का पंचाईत! तुमचीही ना थोडीशी गल्लतच झाली बघा राहुलबाबा! तुम्हाला वाटलं समोर सारे कॉंग्रेसचे कार्यकर्ते बसलेत, बुद्धी बासनात गुंडाळून आपल्या हो ला हो म्हणणारे. आपण निघालो की मागेमागे धावणारे. पण झालं भलतंच. तुम्हाला अपेक्षित असलेलं उत्तर समोरून आलंच नाही. जे उत्तर आलं ते तुमचीच फिरकी घेणारं. हुर्योऽऽ उडविणारं. असं का करतात कधी? संस्कार म्हणून काही गोष्टी असतात की नाही. अशी जाहीरपणे टर उडवतात का कधी कुणाची? नव्या पिढीतल्या या पोरांनाही ना काही कळत नाही! अरे, त्यांचं खरं असलं म्हणून काय झालं, राजकारणात वावरताना तुम्हाला बर्याचदा खोटं बोलावं लागतं, हे कळायला नको त्यांना? सत्ता हातून गेल्यापासून तुम्ही जरासे अस्वस्थ झाला आहात, त्यामुळे सरकारच्या कुठल्याच कामात तुम्हाला ‘राम’ दिसत नाही, त्यामुळे मोदींना अडचणीत आणण्याच्या वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवणं, हे पक्ष टिकवून ठेवण्यासाठी तुम्हाला गरजेचं आहे, त्यामुळेच मग तुम्ही असले बाळबोध सवाल विचारता, हे समजून नको घ्यायला त्यांनी? तर नाही. लागलीच तुम्हाला निरुत्तर करणारी उत्तरं देऊन, तुमची टर उडवून मोकळी झाली मंडळी. छे! आपल्याला नाही आवडलं त्यांचं असलं वागणं. लोकांना त्यात तुमची फजिती दिसली असली तरी आम्हाला मात्र, तुमची प्रगल्भता दिसली त्या वेळी. त्यांनी टर उडवल्यावर तुम्ही वाईट नाही वाटून घेतलं. उलट सर्वांसमोर मान्य केलंत की, हो! मोदींचे स्वच्छता अभियान देशात प्रभावीपणे काम करीत आहे आणि त्याचे परिणामही दिसताहेत. याला म्हणतात मनाचा मोठेपणा. विरोधी पक्षात राहून सरकारच्या कामाला दाद द्यायला मन मोठं असावं लागतं. प्रगल्भता असावी लागते. ती तुम्ही दाखवलीत. पण, मग आधीचा तो सवाल झक मारायला विचारला होता का, असा सवाल काही नतद्रष्ट लोक विचारतील. पण, तुम्ही नका लक्ष देऊ त्यांच्याकडे. जळतात सारे तुमच्यावर.
प्रिय राहुलबाबा,
सप्रेम नमस्कार!
बर्याच दिवसांनी पत्र लिहितोय्. तशी सर्वसामान्यांची दखल घेण्याची प्रथा नाही आपल्या पक्षात. पण, जमलंच तर ती प्रथा मोडून, घ्या माझ्या या पत्राची दखल. जमलंच तर त्यातल्या भावना समजून घेण्याचाही प्रयत्न करा.
गेल्या लोकसभा निवडणुकीत जी हाराकिरी पक्षाच्या वाट्याला आली, त्यानंतर गळून पडलेलं अवसान परवाच्या बिहारच्या निवडणुकीत हाती लागलेल्या थोड्याशा यशानंतर अंगात संचारल्याचे जाणवतेय् अलीकडे तुमच्या वागण्या-बोलण्यावरून. भाषणात केवढा जोश असतो तुमच्या! काय जोरकसपणे आव्हान देता तुम्ही मोदींना. अभिमानाने ऊर भरून येतो आमचा. तुमच्याकडे कौतुकाने बघताना आणि तुमच्या भाषणातली आव्हानं ऐकताना छाती कशी छप्पन इंचाची होते आमची, आमच्याही नकळत. कालपर्यंत आईच्या मागे मागे फिरणारं पोर, आज केवढी आव्हानं देत सुटलाय् थोरामोठ्यांना! ज्यांनी या देशावर इतकी वर्षं राज्य केलं, त्या गोर्यांच्या देशात जाऊन एखादा कारखाना काढायचा, हे काय येरागबाळ्याचे काम आहे? नाहीच! लय भारी काम आहे ते! तुम्ही ते करून दाखवताय्. आम्हाला भारी अभिमान आहे तुमचा. काही लोक आरडाओरड करतील, आपला देश सोडून तिकडे जाताय् कारखाना सुरू करायला म्हणून. आपल्या देशात नाही का सुरू करता आला असता एखादा उद्योग, असाही सवाल करतील ते. त्यावरून तुमच्या देशभक्तीवरही प्रश्नचिन्ह उभे होतील. तिकडे असले ‘उद्योग’ करायला जाता म्हणूनच इकडे संसदेत उपस्थित राहात नाही का, असा सवालही विचारतील. त्यांचं जाऊ द्या राहुलजी! नतद्रष्ट लोक आहेत ते. तुम्ही काही केलं तरी विरोधच करणार. तुम्ही चालू द्या तुमचे उद्योग. तिकडे विदेशात उद्योग उभारून पैसा कमावलात तरी या देशात निवडणुकी लढून जिंकण्यात कुठलाच अडथळा येणार नाही तुम्हाला कधी. त्याबाबत अगदी निश्चिंत राहा तुम्ही. तसेही दिल्लीत राहून अमेठीची निवडणूक जिंकताच की! आता लंडनमध्ये राहूनही अमेठी सर करता येईल. इतकी वर्षे आपल्या पक्षानं मूर्ख बनवलं लोकांना, पुढेही बनवता येईल की! तेव्हा राहुलबाबा, त्याची चिंता अजीबात नको! राहिला प्रश्न संसदेतल्या उपस्थितीचा, तर तुम्ही हजर-गैरहजर राहिल्यानं पक्षाच्या कामगिरीत फारसा फरक पडेल असे वाटत नाही कॉंग्रेस पक्षातील कुणाला.
ते सुब्रमण्यम स्वामी का कोण, काय काय आरोप करीत सुटलेत तुमच्यावर. म्हणतात, राहुल गांधींनी इंग्लंडचे नागरिकत्व स्वीकारले आहे. त्यांचे भारतीय नागरिकत्व रद्द करा! हे हे रे! काय गंमत वाटली का यांना तुमचे नागरिकत्व रद्द करणे म्हणजे? चुकूनही ‘गांधी’ नसलेल्या फिरोज यांचे नातू तुम्ही. पण, ‘गांधी’ नावाचा महिमा कळल्यावर, तर आपली भगिनीही लग्न होऊन सासरी गेली तरी ते आडनाव सोडायला तयार नाही अजून! तर अशा घरातून आलेल्या, लोकशाही पद्धतीने घराणेशाही चालवण्याची किमया करणार्या गांधी घराण्याचे प्रतिनिधी आपण. आपले नागरिकत्व ही या देशाची शान आहे. कुणीतरी सुब्रमण्यम स्वामी ती शान मोडीत काढायला निघाले असतील, तर हा देश कदापि गप्प बसणार नाही!
आणि हो! परवा तुम्ही चांगलेच खडसावले त्या स्वामींना. थेट मोदींना आव्हान देऊन टाकलं या प्रकरणात. म्हणालात, करा चौकशी! हिंमत असेल, तर घाला मला जेलमध्ये. खरंच राहुलबाबा कमाल आहे तुमची. पाऽऽर कोंडीत पकडलं त्या भाजपावाल्यांना. कायपण तो खडा आवाज. काय तो तोरा. काय तो आवेश. आणि सरकारला आव्हान देण्याची ती तुमची तर्हा! व्वा! राहुलबाबा, व्वा! मानलं तुम्हाला. चुका करूनही मुजोरी करावी ती अशी!
परवा बंगळुरूमधील त्या कॉलेजातल्या भाषणात केवढ्या उत्साहाने सवाल केलात तुम्ही. पण, ती पोरं भलतीच हुशार निघाली. ‘‘जेवढ्या जोशात सांगितले जाताहे, तेवढ्या स्तरावरून खरंच या देशात स्वच्छता अभियान सुरू आहे असं वाटत मात्र नाही. तुम्हाला वाटतं तसं?’’ तुमच्या या प्रश्नावर सरळ नाऽऽही म्हणून उत्तर द्यावं ना त्यांनी? पण, गलबला झाला होऽऽचा! आता आली का पंचाईत! तुमचीही ना थोडीशी गल्लतच झाली बघा राहुलबाबा! तुम्हाला वाटलं समोर सारे कॉंग्रेसचे कार्यकर्ते बसलेत, बुद्धी बासनात गुंडाळून आपल्या हो ला हो म्हणणारे. आपण निघालो की मागेमागे धावणारे. पण झालं भलतंच. तुम्हाला अपेक्षित असलेलं उत्तर समोरून आलंच नाही. जे उत्तर आलं ते तुमचीच फिरकी घेणारं. हुर्योऽऽ उडविणारं. असं का करतात कधी? संस्कार म्हणून काही गोष्टी असतात की नाही. अशी जाहीरपणे टर उडवतात का कधी कुणाची? नव्या पिढीतल्या या पोरांनाही ना काही कळत नाही! अरे, त्यांचं खरं असलं म्हणून काय झालं, राजकारणात वावरताना तुम्हाला बर्याचदा खोटं बोलावं लागतं, हे कळायला नको त्यांना? सत्ता हातून गेल्यापासून तुम्ही जरासे अस्वस्थ झाला आहात, त्यामुळे सरकारच्या कुठल्याच कामात तुम्हाला ‘राम’ दिसत नाही, त्यामुळे मोदींना अडचणीत आणण्याच्या वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवणं, हे पक्ष टिकवून ठेवण्यासाठी तुम्हाला गरजेचं आहे, त्यामुळेच मग तुम्ही असले बाळबोध सवाल विचारता, हे समजून नको घ्यायला त्यांनी? तर नाही. लागलीच तुम्हाला निरुत्तर करणारी उत्तरं देऊन, तुमची टर उडवून मोकळी झाली मंडळी. छे! आपल्याला नाही आवडलं त्यांचं असलं वागणं. लोकांना त्यात तुमची फजिती दिसली असली तरी आम्हाला मात्र, तुमची प्रगल्भता दिसली त्या वेळी. त्यांनी टर उडवल्यावर तुम्ही वाईट नाही वाटून घेतलं. उलट सर्वांसमोर मान्य केलंत की, हो! मोदींचे स्वच्छता अभियान देशात प्रभावीपणे काम करीत आहे आणि त्याचे परिणामही दिसताहेत. याला म्हणतात मनाचा मोठेपणा. विरोधी पक्षात राहून सरकारच्या कामाला दाद द्यायला मन मोठं असावं लागतं. प्रगल्भता असावी लागते. ती तुम्ही दाखवलीत. पण, मग आधीचा तो सवाल झक मारायला विचारला होता का, असा सवाल काही नतद्रष्ट लोक विचारतील. पण, तुम्ही नका लक्ष देऊ त्यांच्याकडे. जळतात सारे तुमच्यावर. तुमच्या चुकांवर नजर ठेवून असतात ते. तरी बरं एवढे प्रयत्न करूनही तुम्हाला पंतप्रधान नाही करता आलं सोनिया मॅडमना. आता नजीकच्या भविष्यात तरी तुम्ही त्या पदावर विराजमान होण्याची सुतराम शक्यता दिसत नाही. गेल्या निवडणुकीत तुमच्या नेतृत्वात पक्षाच्या एवढ्या चवचिंध्या झाल्या, तरी पुन्हा तुम्हालाच नेतृत्व सोपविण्याची तयारी चालवलीय् ‘मातोश्रीं’नी! त्यांना नकार देण्याची जराशी हिंमत नसलेल्या नंदीबैलांच्या संमतीने पक्षाची धुरा आपल्याकडे येणार लवकरच. पण, या बैलांकडे दुर्लक्ष करून, सभोवतालच्या चमच्यांना दूर सारण्याचा जो सल्ला आपण परवा पंतप्रधानांना दिलात ना, राहुलजी! व्वा! क्या बात है! एकदम लाजबाव! नोंदविणार्यांना नोंदवू देत आक्षेप. करणार्यांना करू देत टीका. कॉंग्रेसच्या नेत्यांना केव्हापासून चमच्यांचे वावडे जाणवू लागलेय्, असे बोचरे प्रश्नही विचारतील काही लोक आता. मग इंदिरा, राजीव यांच्या भोवती कायम होती किंवा आता सोनियांच्या भोवती असते ती गर्दी कुणाची, असे जिव्हारी लागणारे प्रश्नही इतिहासाचे दाखले देत विचारतील काही लोक. राहुलबाबा, दुर्लक्ष करा असल्या अडचणीच्या प्रश्नांकडे. कर्मदरिद्री लोक आहेत ते! दर वेळी तुमच्यातल्या उणिवा चव्हाट्यावर आणण्याची संधी शोधत असतात लेकाचे. बाकी आप, लगे रहो! एकदम सही जा रहे हो!
आपला,
एक चाहता