तसा या देशातला सामान्य माणूस भलताच सहनशील. महागाईनं पिचला, समस्यांनी घेरला, सरकारी कार्यालयातल्या उंबरठ्यावर चपला झिजल्या, रेल्वे, बसच्या थांब्यावर रांगेत उभा राहून थकला, तरी तो हूं की चूं करत नाही. घाईत असला तरी समोरून मोर्चाच काय, साधी वरात गेली तरी त्यांचाच पहिला अधिकार असल्याचे मान्य करून निमूटपणे गाडी बंद करून, रस्ता मोकळा होण्याची वाट बघत बसतो. सेलेब्रेटीजच्या नुसत्या दर्शनासाठीही गर्दी करून तासन्तास ताटकळतो. त्यांच्या नुसत्या दर्शनानेही जीवन सार्थकी लागल्याचा भास होतो त्याला. असा- घरात बायकोला भिणारा, रस्त्यावर पोलिसांना बिचकून राहणारा, ऑफिसमध्ये साहेबांना दबकून राहणारा ‘आम’ आदमी जेव्हा इंदिरा गांधींवर चप्पल फेकून मारतो, केजरीवालांच्या श्रीमुखात हाणतो, तेव्हा तो खरोखरीच मनातून खवळलेला असतो. एरवी तर तो सरकारी कार्यालयातल्या चपराशी अन् बाबूलाही ‘साहेब’ म्हणूनच सलाम ठोकतो! अन्याय सहन करण्याची त्याची शक्तीही तितकीच जबरदस्त असते. पण, एकदा का त्याच्या सहनशीलतेची मर्यादा संपली, तो व्यवस्थेने पिचला गेला, त्याला दाखवली गलेली स्वप्नं भंगली की, मग त्याच्या संतापाला पारावार राहत नाही.
हे काय चालले आहे? जो उठतो तो केजरीवालांच्या थोबाडीत हाणून मोकळा होतो! परवा कुणीतरी शाई फेकली अंगावर. मग कुणीतरी गालावर झापड लगावून चालला गेला. काल दिल्लीत आणखी एकानं गळ्यात हार घालण्याचं निमित्त साधलं अन् दिली केजरीवालांच्या श्रीमुखात फडकावून! तसा या देशातला सामान्य माणूस भलताच सहनशील. महागाईनं पिचला, समस्यांनी घेरला, सरकारी कार्यालयातल्या उंबरठ्यावर चपला झिजल्या, रेल्वे, बसच्या थांब्यावर रांगेत उभा राहून थकला, तरी तो हूं की चूं करत नाही. घाईत असला तरी समोरून मोर्चाच काय, साधी वरात गेली तरी त्यांचाच पहिला अधिकार असल्याचे मान्य करून निमूटपणे गाडी बंद करून, रस्ता मोकळा होण्याची वाट बघत बसतो. असा हा सहनशील, सेलेब्रेटीजच्या नुसत्या दर्शनासाठीही गर्दी करून तासन्तास ताटकळतो. त्यांच्या नुसत्या दर्शनानेही जीवन सार्थकी लागल्याचा भास होतो त्याला. असा- घरात बायकोला भिणारा, रस्त्यावर पोलिसांना बिचकून राहणारा, ऑफिसमध्ये साहेबांना दबकून राहणारा ‘आम’ आदमी जेव्हा इंदिरा गांधींवर चप्पल फेकून मारतो, केजरीवालांच्या श्रीमुखात हाणतो, तेव्हा तो खरोखरीच मनातून खवळलेला असतो. एरवी तर तो सरकारी कार्यालयातल्या चपराशी अन् बाबूलाही ‘साहेब’ म्हणूनच सलाम ठोकतो! अन्याय सहन करण्याची त्याची शक्तीही तितकीच जबरदस्त असते. पण, एकदा का त्याच्या सहनशीलतेची मर्यादा संपली, तो व्यवस्थेने पिचला गेला, त्याला दाखवली गलेली स्वप्नं भंगली की, मग त्याच्या संतापाला पारावार राहत नाही. एरवी खाकी वेशातला शिपाई दिसला, तरी जो नकळत दोन पावलं मागे सरतो, तो ‘आम आदमी’ गर्दी भेदून एका राजकीय पक्षाच्या सर्वोच्च नेत्याच्या गाडीवर चढून थेट त्याच्या गालावर हाणण्याची कृती करतो, तेव्हा त्याच्या अनावर झालेल्या संतापाची कल्पना व्यवस्थेतल्या प्रत्येकालाच करता आली पाहिजे. कारण हा आम आदमी शांत आहे तोवर ठीक! पण, एकदा का तो बिथरला की, मग त्याच्यासमोर कुणाचीच खैर नसते. मग त्याला चेहराही नसतो अन् जाती-धर्माचे रंगही नसतात. त्याने केलेली कृतीही प्रातिनिधिक असते. इंदिरा गांधींवर भर जाहीर सभेत भिरकावली गेलेली एक चप्पल, सहाराचे सुब्रत राय यांच्या अंगावर फेकली गेलेली शाई, शरद पवारांना मारली गेलेली थप्पड वा मग केजरीवालांच्या थोबाडीत हाणली गेलेली एक झापड... जनमानसाचा रागरंग स्पष्ट करण्यास पुरेशी असते. ही कृती लोकांच्या मनातल्या भावना स्पष्ट करण्याइतकी बोलकी असते. केजरीवालांच्या बाबतीत आम आदमीची प्रतिक्रिया जरा जास्तच तीव्रतेने व्यक्त होतेय्. त्यासाठीचे प्रसंगही संख्येने अधिक आहेत. त्याची कारणे या पक्षाच्या नेत्यांनी शोधलीही पाहिजेत आणि ओळखलीही पाहिजेत.
There is a joke that I will want you to listen to understand this situation. Once Gorkha got a special appearance from God and he granted him 3 wishes... so the Gorkha spell out his three wishes.. 1) Let there be a huge house... lot of vehicle...... lot of parking space etc...... Wish no 2) Let there be many people living in that house.... and many visitors coming to that place..... and wish no 3.) Give the job of Gorkha Chaukidar in that house....
ReplyDeleteMay be things are not clear to you... but that is the status of peoples expectations... Over the long 67 years of Independence we are so used to the same style of working that we want to follow the same route... We are not realising that What got us here... Will not take us there....
The expectations from Kejriwal are similar... people expect him to behave the same way as other Politicians... Look at this case one CM in 2002 clung to power inspite of so many deaths and killings in his state... but in 2014 one principled man because his main mission bill JanLokPal Bill was not admitted, had the courage to give up power....
The media did never highlight how in just 48 days fulfilled 14 of his 18 promises but projected him as a devil.... Why did AK insist on JanLokPal... Long back Rajiv Gandhi had highlighted how just 15 paise of Re 1 of welfare schemes reach the common man.... we have forgotten that... AK has a list of measures to be implemented but he wants to be sure that full 100 paise out of Re 1/- reach common man, the beneficiary... which would be possible only if the implementors are made accountable and punished if they play with public money... if that is not to happen then what is the point is staying power.... This is AKs line of thought, which the Media never tried to project because of ulterior motives... Now this is what common man has not understood but has received the reverse message....
Hence the rage that people are showing.... if we think dispassionately and rationally, only then we will realise it...