Monday, January 28, 2013


लोकांना मूर्ख बनविणारी नवाबी’ तर्‍हा!

या देशातल्या तमाम मनूष्यप्राण्यांना चुटकीसरशी मूर्ख बनवता येते याची जणू खात्रीच पटल्यागत इथले सत्ताधारी राजकीय नेते वागू लागले आहेत. परवा देशाच्या गृहमंत्र्यांना अचानक भगव्या दशतवादाचे स्मरण झाले. त्यावरच्या वादाचा धुराळा अद्याप स्थिरावलेला नसताना राष्ट्रवादीच्या प्रदेश प्रवक्त्यांनी नवीन राजकीय वादळ निर्माण करण्याचा प्रयत्न चालवला आहे.
जनहिताच्या महत्त्वाच्या सर्व प्रश्‍नांचे गांभिर्य कमी करण्यासाठी आणि त्यावरचे लोकांचे लक्ष विचलीत करण्यासाठी चालणार्‍या या प्रयोगांना प्रसारमाध्यमांकडून मिळणारे अवास्तव महत्त्व देखील त्याला कारणीभूत असेल कदाचितपण राजकारणाच्या क्षेत्रात वावरणार्‍यांना असल्या बरळण्याचे महत्त्व’ आताशा चांगलेच कळू लागले आहे. ते दिग्विजयसिंह असोतसुशील कुमार शिंदे किंवा मग नवाब मलिकया सार्‍यांनाच वादग्रस्त विधानांचे महत्त्व कळले आहे. आपल्या बरळण्याची सकारात्मक असो की नकारात्मकपण बातमी’ होतेयाची कल्पना असल्याने ते असल्या वायफळ बडबडीची एकही संधी दवडत नाहीत.
काही दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या क्रिकेट टीमच्या स्वागतासाठी आतुर झालेलेत्यासाठी शिवसेनेचे संभाव्य आंदोलन चिरडून काढण्याची भाषा बोलणारे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आता भगव्या दहशतवादावर घसरले आहेत. तसे यात नवीन काहीच नाहीया सर्व बातम्या यापूर्वीच जगजाहीर झाल्या असल्याचे सांगायलाही ते विसरले नाहीत. ज्या बातम्या पूर्वीच केव्हातरी जगजाहीर झालेल्या आहेतत्याच्या पुनरुच्चाराची गरज शिंदेंना जयपुरातल्या कॉंग्रेसच्या शिबिरात का जाणवलीपाकिस्तानी सैनिकांनी भारतीय सैन्यातील जवानाचे शीर कापून नेल्याच्या लाजीरवाण्या घटनेची जराशीही खंत मनात न बाळगता हसर्‍या चेह्याने भगव्या दहशतवादाची चर्चा करणे शिंदेंना राजकीयदृष्ट्या योग्य वाटत असली तरीत्यामागचे अर्थ आणि राजकारण लोकांना कळत नाही असे थोडीच आहे?
आणि नवाब मलिकांचे कायत्यांना तर सात वर्षापूर्वी दिल्लीत झालेल्या एका बैठकीचे स्मरण आता अचानक झाले आहे. रा. स्व. संघ आणि भाजपाच्या नेत्यांनी तालिबान्यांचे कट्टर समर्थक असलेल्या पाकिस्तानच्या तत्कालीन विरोधीपक्षनेत्यांसमवेत तीन तास बंदद्वार केल्याची गोपनीय माहिती’ मलिकांनी काल अचानक उघड केली. त्या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली होतीयाचे उत्तर मलिकांना आता हवे आहे. काय मस्त राजकीय चाली आहेत बघा या. दहशतवादी म्हणून मुस्लिमांना हिणवता का मग हा घ्या भगवा दहशतवाद! हिरव्या दहशतवादाबद्दल कधी ब्र काढण्याची हिंमत झाली नाहीत्यांना  भगव्या दहशतवादावर मात्र मुक्तपणे बोलावेसे वाटू लागले. मलिकांचे तर कायसंघभाजपावर तुटून पडणे हा तर आवडता छंद. काल बोलताना त्यांनी भगव्या दहशतवादाचे समर्थन केले नाही. कसे करणारएकदा भगवा दहशतवाद मान्य केला की मग हिरव्या दहशतवादाची चीरफाडही मान्य करावी लागेल ना?  त्यापेक्षा दहशतवादाला धार्मिक रंग नसतात असे मोघम विधान केले की विचारांची वैश्‍विक पातळीही गाठल्याचा आवही आणता येतो आणि नेमके हवे ते दडवूनही ठेवता येते. मलिकांना तब्बल सात वर्षांनी ज्या बैठकीचे स्मरण झालेत्या बैठकीबाबत इतके दिवस त्यांनी झोपा का काढल्याअसा प्रश्‍न इथे कुणीही आपल्याला विचारणार नाहीयाची पुरती खात्री त्यांना असल्याने ते वाट्टेल तेवाट्टेल तसे बरळले. संघ-भाजपाविरोधातली सनसनाटी बातमी हाती पडल्याच्या गगनचुंबी आनंदाच्या नुसत्या कल्पनेनेच वास्तवाचे भान सुटलेल्या मीडियाने  सुसाट वेगाने पळत मलिकांच्या बरळण्याची बातमी’ केली. मलिकांना हवे होते ते घडून आले. मीडियासाठी मलिकांच्या सात वर्षांचे विस्मरण महत्त्वाचे नव्हतेचसंघ आणि भाजपा नेत्यांवरचा आरोप त्यांच्यासाठी अधिक महत्त्वाचा होता. घटना किती वर्षांपूर्वी घडली याला महत्त्व नव्हतेआज त्याची ब्रेकींग न्यूज’ करून लोकांना आजच्यापुरते तरी संभ्रमात टाकणे महत्त्वाचे होते.
पेट्रोलडिझलचे आकाशाला भीडलेले दरदिवसागणिक सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर चाललेली महागाईत्यावर नियंत्रण मिळवण्यात सरकारला आलेले अपयशदिल्लीत एका मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेवरून पेटून उठलेला समाजसीमेपलीकडील सैन्याने आपल्या हद्दीत येऊन आपल्या जवानाचे शीर कापून नेण्यासारख्या लज्जास्पद घटनेवरून जनसामान्यांमध्ये व्यक्त होऊ लागलेला क्षोभमहाराष्ट्रातल्या सात हजार गावांमध्ये असलेली दुष्काळी परिस्थिती... यावरून लोकांचे लक्ष हटविण्याची नामी शक्कल शिंदे अन् मलिकांनी शोधून काढली आहे. त्यातील एकाला भगव्या दहशतवादाचे स्मरण झाले आहेतर दुसर्‍याच्या मनात पाकिस्तानातील तत्कालीन विरोधी पक्षनेत्याच्या तालिबानप्रेमाविरुद्ध अचानक संताप उफाळून आला आहे. आपल्या देशातल्या नागरिकांना यातले काहीच कळत नाही असा या नेत्यांचा भ्रम आहे.
मौलाना फजल उल रहमान हे तालिबान्यांचे कट्टर समर्थक म्हणून भारतात आले नव्हते. ते पाकिस्तानातील तत्कालीन विरोधी पक्षनेते या नात्याने भारतात आले होते. सरकारी शिष्टाचार म्हणून त्यांचे स्वागत करायला अन् त्यांची गाठभेट घ्यायला मलिकांचा विरोध असेल तर मग महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांसमवेत गुंडांचे फोटो यापूर्वी प्रकाशित झाले असल्याचे स्मरणही त्यांना कधीतरी व्हावेच. त्यांच्या पक्षातल्या मंत्र्यांविरुद्ध चौकशी करण्याची परवानगी मागणार्‍या पत्रांच्या फाईलींवर मंत्र्यांच्या स्वाक्षर्‍या महिनोन्महिने होत नाहीत आणि मग भ्रष्टाचाराचे शोधकार्य खोळंबून राहतेयाचेही स्मरण त्यांना कधीतरी व्हावे. पूर्तीवर धाडी टाकायला अनाहूतपणे सरसावलेल्या आयकर विभागाकडे महाराष्ट्राच्या या मंत्र्यांविरुद्ध दाखल झालेल्या तक्रारींच्या फाईलींवर धुळीचा थर साचतोय्. ती धूळ झटकण्याची गरज कधीतरी त्यांना जाणवावी.
समाज जरासा विसरभोळा आहे. त्याच्या विस्मरणाच्या सवयीचा लाभ राजकीय पक्षांना होत आल्याचे इतिहास सांगतो. हर्षद मेहता पासून तर कोळसा खाणक्षपर्यंतचे आणि आदर्शपासून तर सिंचनापर्यंतचे सारेच घोटाळे येणार्‍या काळात लोकांच्या विस्मृतीत जाणार आहेत. दिल्लीतला सामूहिक बलात्कारही असाच काळाच्या ओघात मागे पडेल. अन् सवलतीच्या दरातले सिलेंडर्स नऊपर्यंत मर्यादीत झाल्याची बाबही लोकांच्या सरावाची होईल. पण महत्त्वाच्या प्रश्‍नी लोकांची दिशाभूल करण्याचे राजकीय नेत्यांचे षडयंत्र मात्र कायम सुरू राहणार असल्याचे सुशीलकुमार शिंदे आणि नवाब मलिकांनी पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. मलिकांनी तर गेल्या काही दिवसात लोकांना मूर्ख बनविण्याची नवाबी’ तर्‍हेचे दर्शन जगाला वारंवार घडविले आहे.

Saturday, January 19, 2013


सिलेंडरच्या राजकारणाचा नवा पाढा!

राज्यातल्या गोरगरीब नागरिकांबद्दलचे प्रेम राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या मनात नव्याने उफाळून आले आहे. कालपर्यंत केंद्राने सहा सिलेंडर्स देऊ केले होतेतर ते नऊ व्हावेत अशी यांची मागणी होती. आता केंद्राने अनुदानित सिलेंडर्सची संख्या सहावरून नऊ पर्यंत वाढवताच यांना आता ते बारा झालेले हवे आहेत. गेलेवेळी सहाचे नऊ करताना त्यांनी केलेली नाटकबाजी यावेळी अजूनतरी सुरू झालेली नसली तरी नऊचे बारा करण्याची मागणी आपण रेटून धरणार असल्याचे सांगायला ते विसरलेले नाहीत.
नागरिकांना द्यावयाच्या अनुदानित गॅस सिलेंडर्सची संख्या मर्यादीत करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला तेव्हाच बहुधा ती संख्या नऊ एवढी करण्याचा निर्णय झाला असावा. पण भारतीय जनतेची भाबडी मानसिकता लक्षात घेता आधी सहाची संख्या जाहीर करण्यात आली. त्यातून निर्माण झालेला जनक्षोभ शांत करण्याच्या आणि जनमताचा कौल आपल्या बाजूला वळविण्याच्या उद्देशाने ही संख्या नंतरच्या काळात तीन ने वाढविण्यात आली. पूर्वीच्या अमर्याद सिलेंडर्सची संख्या आता नऊ पर्यंत मर्यादीत झाल्याच्या वेदनेपेक्षा सहाचे नऊ झाल्याचा आनंद भारतीय जनतेच्या चेहर्‍यावर अधिक खुलून दिसतोहे लबाड राजकीय नेत्यांच्या केव्हाच ध्यानात आले आहे. पेट्रोलचे दर पाच रुपयांनी वाढवायचे असतील तर आधी घोषणा सात रुपयांची करायची आणि मग त्यावरून पेटलेली आंदोलने शांत करण्याच्या निमित्ताने ती दरवाढ दोन रुपयांनी कमी करायची. असे केल्याने भाव पाच रुपयांनी वाढल्याची वस्तुस्थिती विसरूनते दोन रुपयांनी कमी झाल्याच्या आनंदात इथली जनता रममाण होते हे या लबाडांना पुरते ठावूक झालेले असल्याने जनतेची अशी सतत फसगत करण्याच्यात्यांना मूर्ख बनविण्याच्या नवनवीन क्लृप्त्या ते शोधत राहतात.
सिलेंडरच्या प्रकरणातही तेच होत आहे. खरे तरगॅसतेलइंधन हा विषय केंद्र सरकारचा आहे. राज्य सरकारांचा त्याच्याशी काहीएक संबंध नाही. तरीही सिलेंडर प्रकरणात कॉंग्रेसने राजकारण केले. केंद्राच्या सहा सिलेंडरमध्ये कॉंग्रेसशासीत राज्यसरकारे अधिक तीन सिलेंडर्सच्या अनुदान राशीचा भार उचलतील असे दिल्लीहूनच जाहीर करण्यात आले. गुजरात आणि हिमाचलच्या निवडणुकी तेव्हा तोंडावर होत्या. कॉंग्रेसशासीत राज्ये किती भाग्यवान आणि विरोधी पक्षाची सरकारे निवडून आपण किती घोर अपराध केला आहेहे त्या राज्यातल्या लोकांच्या लक्षात यावे म्हणून बहुधा ही खेळी खेळण्यात आली होती. पण सार्‍या जगाचे लक्ष लागलेल्या गुजरातेत त्याचा काडीचाही उपयोग झाला नसल्याचे बघून तिथल्या निवडणुकीनंतर पूर्वीच्या षडयंत्रानुसार आता सहाचे नऊ करण्याची घोषणा करण्यात आली आहे.
पण त्यातहीसिलेंडरच्या विषयाशी काहीएक घेणेदेणे नसलेल्या महाराष्ट्र सरकारची लबाडी अधिक खुलून दिसणारी आहे. कॉंग्रेसशासीत राज्ये अधिकच्या तीन सिलेंडरच्या अनुदान राशीचा भार उचलणार असल्याचे दिल्लीहून जाहीर करण्यात आले असले तरी आधीच कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या महाराष्ट्राला वर्षाकाठी दोन हजार कोटींची जुळवाजुळव करण्याचे कसब काही केल्या सिद्ध करता येणार नव्हते. इकडे तीन सिलेंडर्सची घोषणा कॉंग्रेस नेत्यांनी करून टाकली तर सारे श्रेय त्या पक्षाला मिळेल या नुसत्या विचारांनीच राष्ट्रवादीचे नेते कासावीस झाले होते. काहीही झाले तरी या निर्णयाचे श्रेय एकट्या कॉंग्रेसला मिळू नये याची गणितं मांडली गेली. जणू काय आपणच ही मागणी पहिल्यांदा करीत असल्याच्या थाटात सहाचे नऊ करण्याची मागणी या पक्षाचे लोक बेंबीच्या देठापासून ओरडून करू लागले. प्रेसनोट कायपत्रपरिषदा काय,मुख्यमंत्र्यांना भेटायला थाटामाटात निघालेली शिष्टमंडळे काय... नाटकबाजीचे झाडून सारे पर्याय अंमलात आणले गेले. निर्णय सप्टेंबरपासून अंमलात येणार होता. त्यानंतरचा तीन सिलेंडर्सचा केंद्राचा कोटा संपायला अजून अवकाश होता. तरीही राज्य सरकार तीन सिलेंडर्स देणार असल्याचा निर्णय  दिवाळीच्या तोंडावर जाहीर करण्याची घाई करण्यात आली. मुख्यमंत्रीही केवढे हुशार बघा! राज्याची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याचे आणि इतकी मोठी रक्कम उपलब्ध करून देणे या राज्याला शक्य नसल्याचे त्यांचे पत्र केंद्राकडे केव्हाच गेले होते. तरीही दिवाळीच्या तोंडावर तीन सिलेंडर्सच्या रकमेचा भार उचलण्याची घोषणा त्यांनी राणाभीमदेवी थाटातचेहर्‍यावरची हास्याची लकेर जराही खळू न देता केली. प्रत्यक्षात द्यायचेच नाहीत म्हटल्यावर घोषणांचा बार हवेत उडवायला इथे कुणाचे काय जाणार होते?
घोषणा तेवढी झाली. लोकही खूश. एवढ्यांदा आपटी खाल्ली तरी पुन्हा एकदा मूर्ख बनायला तयार. सप्टेंबरनंतर चौथा सिलेंडर विकत घेण्याची वेळ आलेल्या या राज्यातल्या ग्राहकांना जरा विचारा एकदात्यांना तो चौथा सिलेंडर सवलतीच्या दरात मिळाला का ते! का नाही मिळत चौथा सिलेंडर सवलतीच्या दरातराज्य सरकारने तर घोषणा केली होती. केंद्राचे तीन संपले की नंतरचे तीन सिलेंडर आम्ही देऊ म्हणून. मग कुठे गेले राज्याच्या कोट्यातले तीन सिलेंडर्सकाय झाले मुख्यमंत्र्यांच्या घोषणेचेत्यावेळी मागण्यांची नाटकं करायला पुढं पुढं करणारे राष्ट्रवादीच्या महिलांचे शिष्टमंडळ कुठे गेले आता आता केंद्राची घोषणा झाल्याबरोबर हे नेते पोपटासारखे बोलू लागलेआता राज्य सरकार आपली घोषणा मागे घेणार असल्याचे सांगू लागलेअरेमाघारी फिरायला तुमच्या निर्णयाची अंमलबजावणीच केव्हा झाली होती इथे?
आता राष्ट्रवादीची नवीन नाटकं सुरू झाली आहेत. कालपर्यंत ते सहाचे नऊ  करा म्हणत होते. आता त्यांना नवाचे बारा झालेले हवे आहेत. सरकार यांचेच. तेच सत्तेतले भागीदार. निर्णयप्रक्रियेतही यांचा सहभाग. तरीही निर्णय होताना ते चकार शब्दाने बोलत नाही. निर्णय जाहीर झाला की मग मात्र त्यांना कंठ फूटतो. जनतेवरील अन्यायाचे त्यांना अचानक स्मरण होते. त्याविरुद्ध पेटून उठण्याचे स्फूरण त्यांच्यात नकळत संचारते...
त्यांना तरी दोष देऊन काय उपयोग म्हणा! लोकच भाबडे आहेत. भुलतात त्यांच्या नाटकबाजीला. दिवाळीच्या तोंडावर राज्य सरकारने केलेली घोषणातरी किती लोकांना स्मरतेस्मरली असती तर भांडले नसते लोक चौथा सिलेंडर सवलतीच्या दरात मिळवायलाकशाला मुकाट्याने पूर्ण पैसे मोजून केली असती त्यांनी चौथ्या सिलेंडरची खरेदीत्यांच्यातला विसरभोळेपणा कायम आहे आणि मूर्ख बनण्याची त्यांची तयारी आहेतोवर राजकारण्यांचे फावणारच आहे...

Wednesday, January 2, 2013


सरत्या वर्षातले
मन हेलावणारे मृत्यू


मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवे वर झालेल्या एका अपघातात  चित्रपट कलावंत आनंद अभ्यंकर यांचं निधन झाल्याची बातमी तमाम मराठी रसिक विश्‍वावर शोककळा पसरवून गेलीअन् संतापाने पेटून उठलेल्या हृदयाच्या एका कोपर्‍यातून एक प्रतिक्रिया सहजच उमटली... हे वर्ष केव्हा संपते माहीत नाही. ते सुरू झाल्यापासून एकापाठोपाठ येणार्‍या वाईट बातम्यांची मालिका कशी संपता संपत नाहीय्....
वर्ष सुरू झालं तेव्हापासूनच काळानं समाजजीवनातल्या एकेका हिर्‍याला पारखून त्यावर सावजासारखं झडप घालून टिपणं आरंभल्याचा भास व्हावा असं बेताल वागणं चाललंय बघा त्या नियंत्याचं. पं. रवीशंकर प्रसादबाळासाहेब ठाकरेकुप्प सी. सुदर्शनजीसंत अच्युत महाराज,वामनराव पैपंडित काका धनागरे महाराजनारायण काका ढेकणेराजेश खन्नाजसपाल भट्टी,दारासिंहविलासराव देशमुखमृणाल गोरेयश चोप्राकवी ग्रेस... वाचता वाचता श्‍वास फुलून यावा तरी नावांची यादी मात्र संपायचे नाव घेत नाही.
एक शायर म्हणतो,
मौत को तो मैने कभी देखा नही मगर
यकीनन वो बहोत खुबसुरत होगी
कम्बख्त जो भी उससे मिलता है
जिंदगी जीना ही छोड देता है
मगआपल्यातून गेलेल्या या सर्वांनी याच सुंदर मृत्युला कवटाळले असेलसंगीत साधना करताना जिच्या तारा झंकारत त्यातून सतत मधूर स्वर साकारले ती सतार अबोल करून गेलेले पं. रवीशंकर प्रसादआयुष्यभर धगधगत ठेवलेल्या राष्ट्रभक्तीच्या यज्ञात स्वत:च्या प्राणांची आहुती टाकणारे सुदर्शनजीदेहभान विसरून अंत्यदर्शनाकरता धडपडणार्‍या हजारो चाहत्यांच्या डोळ्यांच्या कडा पाणावून अनंताच्या प्रवासाला निघून गेलेले बाळासाहेब ठाकरेमनातल्या वेदना दडवून केलेल्या विनोदनिर्मितीतून लोकांच्या चेहर्‍यांवर हास्य फुलवणारे जसपाल भट्टीभरकटलेल्या समाजाला ताळ्यावर आणून ईश्‍वरभक्तीच्या मार्गाने नेण्याच्या कठोर तपश्‍चर्येत रमलेले संत अच्युत महाराजवामनराव पैपंडित काका धनागरे महाराजनारायण काका ढेकणेमृत्यू शैय्येवरही ज्यांच्या चेहर्‍यावरची हास्याची लकेर जराही विलोप पावली नव्हती ते विलासराव देशमुख, सामाजिक चळवळी उभारताना नैतिकतेचा बूज जरासाही ढासळू न देण्याची किमया उभ्या हयातीत करत राहिलेल्या मृणाल गोरेभारतीय चित्रपट रसिकांच्या मनावर वर्षानुवर्षे अधिराज्य गाजवणारे राजेश खन्नादु:ख आणि वेदनेशी थेट संवाद साधत काव्याविष्काराचे अंगार फुलवणारे कवी ग्रेस....
हं हं हं! ही यादी इथेच संपत नाही. अजून खूप नावं लिहिली जायचीय् त्यात. तसं तर चंद्रावर ज्यांचं पहिलं पाऊल पडलंत्या नील आर्मस्ट्रँगपासून या यादीची सुरूवात करायला हवी. पण अगदी महाराष्ट्रापुरतं मर्यादीत राहायचं म्हटलं तरी नियतीनं घातलेला घाला किती व्यापक आणि भीषण आहे याची कल्पना यावी. राजकारणकलाजगतसमाजेसवक या क्षेत्रांवर तर जणू सारं लक्ष केंद्रीत केलं होतं यावेळी नियंत्यानं.  नागपूरच्या सुप्रसिद्ध समाज सेविका कुसुमताई वांकर,माजी खा. बाळासाहेब आपटेसंगीतकार अनिल मोहिलेबाळ पळसुलेचित्रपट निर्माता यश चोपडापोलिस अधिकारी हसन गफूरअमरावती विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉ. के. जी देशमुख,मुंबईच्या प्रख्यात नाना पालकर स्मृति समितीचे अध्यक्ष डॉ. अजित फडकेउत्तमराव पाटील,शंकरराव काळेए. के. हंगलदिग्दर्शक संजय सूरकरविधानसभेचे माजी अध्यक्ष शंकरराव जगताप, बाबासाहेब कुपेकरअभिनेत्री नीलम भारद्वाजमोना कपूरबी. आर. इशारादिनेश ठाकूरसाहित्यिक डॉ. गौतम सचदेवभास्कर थेरेकोल्हापूरचे क्रिकेटपटू भाऊसाहेब निंबाळकर आणि आता परवाच्या अपघातात जीव गमावलेले आनंद अभ्यंकरअक्षय पेंडसे...
किती मृत्यू पाहिले यंदाच्या वर्षभरातल्या ३६५ दिवसांनीआत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांची,पुण्यात एका माथेफिरूने भरधाव बस खाली चिरडलेल्या ९ जणांचीवेगवेगळ्या अपघातांमध्ये मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांचीनक्षल्यांच्या हल्लयात प्राण गमावलेल्या आदिवासींची,त्यांच्याशी लढताना शहीद झालेल्या पोलिसांचीरोड रोमिओंच्या वासनेला बळी पडलेल्या तरुणींचीएकतर्फी प्रेमातून गळ्यात फास अडकवून घेतलेल्या तरुणांची तर गणतिही नाही यात. बहुधा नित्याचेम्हणूनच सरावाचे झाल्याने गृहीतच धरलेत समाजाने त्यांचे मृत्यू. हो ना! गोरगरीब शेतकर्‍यांनी आत्महत्या करायची नाही तर काय हसतमुखानं सुखात जीवन जगायचं?१८ इंची पासून तर ७० एमएम पर्यंतच्या पडद्यांवर मनोरंजनाच्या नावाखाली चाललेल्या धुडगुसाने मने चाळवलेल्या तरुणाईने रस्त्यांच्या कडेनं चाललेल्या पोरींची छेड काढायची नाही तर काय राख्या बांधून घ्यायच्या त्यांच्याकडूनत्यांच्या बलात्काराला बळी पडलेल्या तरुणींनी आत्महत्या करणे हे तर मग ओघाने आलेच ना! नेहमीच्याच झाल्यामुळे की काय पणपेटून उठणं तर सोडाचपण या मृत्यूचे शल्य इथे कुणाच्या मनाला शिवतही नाही आताशा. शेतकर्‍यांच्या आत्महत्यांच्या नोंदी ठेवणार्‍या काही संस्थांच्या आकडेवारीत दररोज पडणारी भरपोलिस ठाण्यात असंख्य संख्येत दाखल होणार्‍या बेदखल तक्रारीक्वचितप्रसंगी नातेवाईकांच्या पदरात पडणारी सरकारी तिजोरीतली मदतएवढाच काय तो त्यांच्या निधनाचा सामाजिक परिणाम’!गेल्यावेळेच्या तुलनेत यंदा शेतकर्‍यांच्या आत्महत्या जराशा कमीच झाल्यात हा या देशाच्या कृषीमंत्र्यांसाठी अभिमानाचा विषय ठरतो म्हटल्यावरसमाजालाही लागलीच त्याचा विसर पडण्यात कसले आले नवल!
या गर्दीत’ उपरोक्त समाजधुरीणांचेनामवंतांचे जाणे मात्र काहीसे मनाला चटका लावून जाणारे आणि म्हणूनच दखलपात्र ठरले.  खरं तर मृत्यु यांचा’ काय नि त्यांचा’ कायसारखाच. पण ही परिस्थिती पाहिल्यावर इथे मृत्यूही माणसामाणसात भेद करीत असल्याचे नकळत जाणवून जाते.
खरं तरया जगात जन्माला येणार्‍या प्रत्येकालाच एक दिवस इहलोकीची यात्रा पूर्ण करून परलोकीच्या यात्रेला जायचं आहे. खांडेकरांच्या ययातीत हस्तीनापूरच्या सम्राटाला लिहिलेल्या पत्रात अंगीरस ऋषी म्हणतात,
‘‘मृत्यु हा जीवमात्राला जितका अप्रिय तितकाच तो अपरिहार्य आहे. तो सृष्टिचक्राचा जन्माइतकाच नाट्यपूर्ण आणि रहस्यमय भाग आहे. वसंत ऋतुत वृक्षावर हळूच डोकावणारी तांबूसकोमल पालवी जशी आदिशक्तीची लीला आहे. तशीच शिशिरात गळून पडणारी जीर्ण पिवळी पर्ण ही सुद्धा तिचीच क्रीडा आहे. या दृष्टिनंच आपण मृत्युकडे पाहिलं पाहिजे’’
एक कवीकल्पना आणखीच जगावेगळी आहे. त्यात मृत्युचे भय नाही. उलट आपल्या रसिक कल्पनेतल्या मृत्यूचं साकडं नियतीकडे घातलं आहे. जीवनातला शेवटचा श्‍वास प्रेमिकेच्या मांडीवर घेता यावा अशी शायराना’ कल्पना जगजितसिंहांनी गायिलेल्या एका गझलेतून मांडण्यात आली आहे.
अपने होठोपर सजाना चाहता हू
आ तुझे मै गुनगुनाना चाहता हू
आखरी हिचकी तेरे जांघो पे आए
मौत भी मै शायराना चाहता हू
ऋषी अग्निरसांच्या तत्वज्ञानाच्या आडूनइतकंच काय जगजितसिंहांच्या गझलेतल्या गोड कल्पनेतून  बघितलं तरी समाजातल्या काही लोकांच्या मृत्युच्यामनाला लागलेल्या चटक्याची तीव्रता मात्र जराही कमी होत नाही. उगाच का बाळासाहेबांच्या अंत्यात्रेला उन्हातान्हात ताटकळणारी एवढी गर्दी जमली असेलउगाच का  विलासराव देशमुखांच्या अंत्यसंस्काराच्या दिवशी बाभळगावतल्या एकाही घरात चूल पेटली नव्हतीविस्मृतिच्या त्रासाने ग्रासलेले सुदर्शनजी एक दिवस चेन्नईत सुखरूप घरी पोहोचले नसल्याची नुसती बातमी सुद्धा कित्येकांची मनं कासावीस का करून गेली असेलरक्ताची कुठलीही नाती नसताना मृणाल गोरेवामनराव पै गेल्याची वार्ता ऐकून अनेकांच्या डोळ्यात पाणी का तरळले असेलसंजय सूरकरआनंद अभ्यंकर आता या जगात राहिले नसल्याचे एकून  शेकडो मनं का विषण्ण झाली असतीलजीवनाच्या सारीपाटावर मांडलेले त्यांचे डाव निर्दयीपणे उधळून लावणार्‍या नियतीकडे बघून अगणित मनं का हेलावली असतील?
खरं तर दिल्लीत नराधमांच्या सामूहिक बलात्काराला बळी पडलेल्या तरुणीचा रुग्णालयात मृत्युशी चाललेला लढाही काळीज हेलावणाराच. बहुदा या व्यवहारिक जगातील मानवी मनातल्या कुठलाशा एका कप्प्यात हळवेपण अजूनही शिल्लक असल्याची ती साक्ष असावी. समाजमनं अजूनही जिवंत आणि धगधगती असल्याचं ते प्रतिक असावं. तत्वज्ञान मान्य केलंमृत्यू सहजतेने स्वीकारणारी ती गोड कवीकल्पना मान्य केलीनिसर्गचक्रातली मृत्युची अपरिहार्यताही स्वीकारली तरी काही लोकांचं व्यक्तीमत्वत्यांनी आयुष्यभराच्या साधनेतूनकार्यातून उमटविलेला आगळा ठसा याच हळवेपणाला साद घालणारा ठरत असावा बहुधा. थेट हृदयाच्यात्या’ कप्प्याला घातली जाणारी ही साद मग पाणावलेल्या डोळ्यांमधून व्यक्त होत असेल कदाचित.......!

मुंबई.
९८८१७१७८३३