Friday, August 31, 2018

चमच्यांच्या गर्दीत हरवलेले अपात्र नेते!

स्वत:ची शक्ती विसरून कुणाच्या तरी समोर कुर्निसात करीत हयात घालवणार्यांची उणीव नव्हतीच कधी इथेत्यांच्याच तालमीत आणि सल्ल्याने नेत्यांची जडणघडण होत गेलीकार्यकर्ता हा पक्षाची ‘ताकद’ ठरण्याचे दिवस मागे पडलेसंघटनेप्रमाणेच ‘कार्यकर्त्याचे’ अस्तित्वही नेत्यांच्या चरणी लीन होत राहिलेत्याग-बलिदानाची परिभाषा बदलली.तत्त्वासाठी जगणार्यांची गणना मूर्खात होऊ लागलीत्याऐवजी स्वार्थाच्या बाता करणारी मंडळी व्यवहारी अन्‌ म्हणूनच हुशार ठरलीमोठ्या चलाखीने त्यांनी बड्या नेत्यांभोवती कडबोळे करत त्यांना घेरलेअशातआर्थिक नाड्या मुठीत आवळून बसलेल्यांनी मागे राहण्याचे कारण नव्हतेचऔद्योगिक घराण्यांचे प्रतिनिधित्व करणारी मूठभर मंडळी लाचार कडबोळ्याहून सरस ठरलीस्व:च्या ताकदीची कल्पना असल्यानेसत्तेत कोणयाची चिंता वाहण्याची गरज त्यांना कधी पडली नाहीकालांतराने त्याचाही प्रभाव जाणवू लागलागोरगरिबांच्या हिताच्या निर्णय-धोरणांची निश्चिती गर्भश्रीमंतांच्या मर्जीने ठरू लागलीसभोवताल गर्दी करून बसलेले चमचे अन्‌ ओैद्योगिक घराण्यांचा प्रभाव या चौकटीत मर्यादित झालेल्या नेत्यांच्या पसंतीनेगरजेनुसार पक्षसंघटन चालू लागले.आदेशाबरहुकूम वागणार्यांचीतोंडून बाहेर पडलेला प्रत्येक शब्द ओंजळीत अलगद टिपण्यासाठीच्या स्पर्धेत अहमहमिकेने उतरलेल्यांचीअकारण वाहवा करणार्यांची संख्या नको तितकी वाढलीसरकारी लवाजामासुविधांची खैरात... यात वहावलेल्या नेत्यांची एकूणच सर्व यंत्रणांवरील पकड ढिली पडत गेली आणि नेतृत्वही आपोआपच प्रभावहीन होत गेले...


स्वातंत्र्यलढ्याच्या दरम्यान काही लोकांनी स्वीकारलेल्या इंग्रजांच्या मिंधेपणाचा अपवाद सोडलातर बहुतांशत्यागबलिदानाच्या वेदीवर उभे राहिलेले तत्कालीन संघटन हळूहळू स्वार्थाच्या वाटेवर मार्गक्रमण करू लागलेसंस्थात्मक पातळीवर मिळालेली लोकप्रियता काही व्यक्ती आणि कुटुंबांचे उंबरठे झिजवत राहिलीपक्षाचा कारभार मोजक्या चार-दोन लोकांच्या परिघात अन्‌ सत्तेची सूत्रं मूठभर कुटुंबांच्या मुठीत बंदिस्त होऊ लागलीहा प्रकार मान्य नसल्याचे स्पष्टपणे सांगणारीचुकीच्या निर्णय-धोरणांना तात्त्विक विरोध करणारी माणसं नापसंत ठरून कस्पटासमान लेखली जाऊ लागलीत्यांना अस्पृश्य ठरवून सर्वच गोष्टींपासून दूऽऽर... वेशीबाहेर ठेवले जाऊ लागलेमिंध्या लाचारलाळघोट्यांची गर्दी सत्ताधार्यांच्या सभोवताल जमू लागलीनव्हेत्यांचीच चलती वाढली.त्यातून उद्भवलेली अनियंत्रित परिस्थिती अहंकाराची किनार लेऊन थयथयाट करू लागली.
 
सत्तेची सूत्रं एकाच कुटुंबापर्यंत मर्यादित राहणे काहींना सोयीचे वाटू लागलेती तशीच राहावी म्हणून त्यांची धडपड सुरू झालीस्वत:ची शक्ती विसरून कुणाच्या तरी समोर कुर्निसात करीत हयात घालवणार्यांची उणीव नव्हतीच कधी इथेत्यांच्याच तालमीत आणि सल्ल्याने नेत्यांची जडणघडण होत गेलीकार्यकर्ता हा पक्षाची ‘ताकद’ ठरण्याचे दिवस मागे पडलेसंघटनेप्रमाणेच ‘कार्यकर्त्याचे’ अस्तित्वही नेत्यांच्या चरणी लीन होत राहिलेत्याग-बलिदानाची परिभाषा बदलली.तत्त्वासाठी जगणार्यांची गणना मूर्खात होऊ लागलीत्याऐवजी स्वार्थाच्या बाता करणारी मंडळी व्यवहारी अन्‌ म्हणूनच हुशार ठरलीमोठ्या चलाखीने त्यांनी बड्या नेत्यांभोवती कडबोळे करत त्यांना घेरलेअशातआर्थिक नाड्या मुठीत आवळून बसलेल्यांनी मागे राहण्याचे कारण नव्हतेचऔद्योगिक घराण्यांचे प्रतिनिधित्व करणारी मूठभर मंडळी लाचार कडबोळ्याहून सरस ठरलीस्वत:च्या ताकदीची कल्पना असल्यानेसत्तेत कोणयाची चिंता वाहण्याची गरज त्यांना कधी पडली नाहीकालांतराने त्याचाही प्रभाव जाणवू लागलागोरगरिबांच्या हिताच्या निर्णय-धोरणांची निश्चिती गर्भश्रीमंतांच्या मर्जीने ठरू लागलीसभोवताल गर्दी करून बसलेले चमचे अन्‌ ओैद्योगिक घराण्यांचा प्रभाव या चौकटीत मर्यादित झालेल्या नेत्यांच्या पसंतीनेगरजेनुसार पक्षसंघटन चालू लागले.आदेशाबरहुकूम वागणार्यांचीतोंडून बाहेर पडलेला प्रत्येक शब्द ओंजळीत अलगद टिपण्यासाठीच्या स्पर्धेत अहमहमिकेने उतरलेल्यांचीअकारण वाहवा करणार्यांची संख्या नको तितकी वाढलीसरकारी लवाजामासुविधांची खैरात... यात वहावलेल्या नेत्यांची एकूणच सर्व यंत्रणांवरील पकड ढिली पडत गेली आणि नेतृत्वही आपोआपच प्रभावहीन होत गेले...
 
विरोध सोडाआपण मांडलेल्यापेक्षा वेगळे मत मांडण्याचाही कुणी प्रयत्न केलातर तेही खपेनासे झाले नेत्यांनात्यामुळे त्यांनी काहीही बोललं तरी त्याची फक्त री ओढण्याचेच काम इतरांकडे शिल्लक राहिलेया परिस्थितीतनेत्याला विरोध करण्याची हिंमत राहिली नाही कुणाचीचकेलाच कुणी प्रयत्न तसातरी त्याची तर्हा बदललीविनम्रतेच्या निचांक पातळीवरच्या त्या विरोधाची धार आपसूकच बोथट होत गेलीकशापेक्षा काहीतरी महत्त्वपूर्ण ठरले अन्‌ सारे चित्रच बदलत गेलेनेत्याचे मत लोक आणि पक्षहितापेक्षाही श्रेष्ठ ठरत असल्याचे वास्तव बिनदिक्कतपणे स्वीकारणार्या शहाण्यांच्या गर्दीत बिनडोकांचे महत्त्व वाढत गेले.दुर्दैव एवढेच कीबिनडोकांच्या आनंदोत्सवात सहभागी होत टाळ्या पिटणार्यांच्या घोळक्यात सामील झालेल्या शहाण्यांनाही कधीच काही वावगे वाटले नाहीया प्रवासाचा परिणाम एकच झालालायक लोकांची जमात दिवसागणिक नामशेष होत गेलीत्यांचे महत्त्वही लोप पावू लागलेगरज तर नावालाही उरली नाही.भक्तांना विठ्ठलापर्यंत पोहोचण्यात अडथळा आणणार्या बडव्यांचे प्रमाण नको तितके वाढलेसंघटनासंस्थाराजकीय पक्षाचे नेतृत्व करण्यासाठी लायकीपेक्षा घराणे महत्त्वाचे ठरू लागलेकारणपात्रता असणारी मंडली लाचारी पत्करून मौन पाळून बसलीतर क्षमता नसणार्यांच्या मताला कमालीचे महत्त्व प्राप्त झाले.अशा पद्धतीने ‘वारसाहक्काने’ नेतृत्वाची माळ गळ्यात पडली की पितळ कसे उघडे पडतेलाभलेल्या सुवर्णसंधीचे कसे मातेरे होतेनसलेले गुण असल्याचा आव आणण्याच्या नादात कुणाचे कसे हसे होतेयाचा अनुभव सारा देश गेले काही दिवस घेतो आहे.
 
केवळ कॉंग्रेसच नाहीइतरही काही राजकीय पक्षांच्या नेतृत्वाबाबतची गुणांची ही असलीच उधळणराजकारणाच्या गर्तेत वास्तवाचा पडलेला विसरकुणीतरीआपलं’ असल्याचे सिद्ध करण्याच्या तालात आपल्याच मातीशी वैर सांगण्यासाठीची अनाठायी धडपड क्षणोक्षणी सिद्ध होते आहेयात राहुल गांधींना शिखांच्या दंगलीशी कॉंग्रेसचा संबंध नसल्याचा खोटा दावा करावासा वाटलासुप्रिया सुळेंना हिंदूंच्या पूजापद्धतीवर आक्षेप नोंदवावासा वाटलातिकडे अखिलेश यादवांना मुस्लिम समाजातील मुलींबाबतची आत्मीयता अचानक उफाळून आलीतर राज बब्बर यांना पंतप्रधानांबद्दल पातळी सोडून बरळण्याची नितान्त अशी गरज जाणवलीकॉंग्रेसच्या प्रियंका चतुर्वेदींना गुजरातेत हार्दिक पटेलांवरून एक अडचणीचा प्रश्न विचारला गेलातर एका टॉक शोमध्ये त्यांचा भडका उडालाराहुल गांधींना पंतप्रधानपदाची स्वप्नं पडल्याच्या वृत्ताची शाई अद्याप वाळलेली नसतानामहाराष्ट्राच्या जाणत्या राजाला पडू लागलेल्या सत्ताप्राप्तीच्या स्वप्नांची बातमी येऊन धडकली आहेराहुल गांधी यांनी संघकार्याची मुस्लिम दहशतवादाशी केलेली तुलना तर बिनडोकपणाचे अफलातून उदाहरण ठरावेकुठे एकमेकांचे मुडदे पाडायला सरसावलेले दहशतवादी अन्‌ कुठे काश्मीरपासून तर केरळपर्यंतच्या पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी म्हणून गुडघाभर चिखल तुडवत मदत सामग्री घेऊन लोकांपर्यंत पोहोचलेले स्वयंसेवकपणकरता कायगांधी बरळलेमन मानेल तसंअसले काहीबाही बिनधास्तपणे बरळण्याचा परवाना घेऊनच जन्माला आलेत तेत्यांना कोण काय म्हणणारघराण्याचा वारसाच एवढा मोठा लाभलाय्‌ त्यांना कीमी मी म्हणवणारी बडी बडी मंडळी बाजूला ठेवून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद पदरी पडलेय्‌ त्यांच्यात्या माध्यमातून आलेल्या जबाबदारीचे भान राखायचे सोडूनशंभराहून अधिक वर्षांचा इतिहास लाभलेल्या एका राजकीय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षअभ्यास न करताच तद्दन फालतूबेताल बडबडत कसे सुटतातहे जगाला सांगण्यासाठीचा अट्टहास चाललाय्‌ त्यांचा स्वत:चाच.
 
दोष त्यांचा नाहीचदोषी कॉंग्रेस पक्षाचे सर्वसामान्य कार्यकर्ते आहेतज्यांना आपल्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाने चालवलेली ही हास्यास्पद फालतूगिरी जराशीही आक्षेपार्ह वाटत नाहीउलटराजकारणाच्या नावाखाली त्या फालतूपणाचेही समर्थन करण्याचा अनाकलनीय प्रयत्न होतोतेव्हा तर ‘कार्यकर्ता’ नामक समूहाचीच कीव करावीशी वाटतेहीच बाबकेवळ मुलायमिंसहांचे पुत्र म्हणून अखिलेशचे नेतृत्व अन्‌ बेताल वागणे ‘सहर्ष’ स्वीकारणार्यांनाही लागू होते आणि पवारकन्या म्हणून सुप्रियांचा उदोउदो करणार्यांनाहीकुठे गांधीजींच्या उपस्थितीत नेहरूंच्या एखाद्या कथनावर स्वत:चे असे वेगळे मत ठामपणे मांडणारे सरदार पटेल... फक्त मनभेदाच्या टोकापर्यंत जाऊ नकाअसे सांगत आपसातील भिन्न मतांचे समर्थन करणारे अटलजी कुठे अन्‌ राहुलप्रियंकासुप्रियाअखिलेशच्या कुठल्याही म्हणण्याला माना डोलावत हो ला हो लावणारीहुजरेगिरी करण्यात रमलेली होयबांची गर्दी कुठेपरिणाम कशाचा आहे कुणास ठाऊकपण वर्षानुवर्षे हे असंच चाललं आहेहे मात्र खरं...!

Saturday, August 25, 2018

बा! सिद्धू...!

तिकडे पोहोचल्यावर पाकिस्तानच्या लष्करप्रमुखाला मिठी मारण्यातही काहीच गैर वाटलं नाही... सार्या देशाला शरम वाटली रे तुझ्या त्या कृत्याची अन्‌ तूवर पुन्हाउजागरीनं स्वत:च्या त्या वागण्याचं समर्थन करत फिरतोयसतुझ्यातल्या खेळाडूला लाख सलामतुझ्यातल्या प्रभावी वक्त्यालाहजरजवाबीहरहुन्नरी कलावंतालाही त्रिवार कुर्निसातकुठल्याही प्रसंगाला साजेशी अशी शायरी तर एकदम लाजवाबती पेश करण्याची तर्हा तर त्याहून सरसपण... पणपरवाचं तुझं वागणं मात्र कुणालाच अजीबात पटलेलं नाही बघएका निमंत्रणावरून उतावीळपणे थेट पाकिस्तानच्या दिशेने झेपावण्यापूर्वी एकदा आपल्या देशातल्या लोकांच्या भावभावनांचाआपल्या चाहत्यांच्या वैचारिक प्रवाहाचाही विचार करायला हवा होता ना सिद्धूजी आपणतसं म्हटलं तर फरक कशानेच काहीच पडत नाहीएक नवज्योतिंसग सिद्धू इम्रान खानच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहिल्याने ना भारताची मान शरमेने खाली गेलीना पाकिस्तानची मान अभिमानाने उंचावलीवैश्विक पातळीवरील राजकारणाची अपरिहार्यता म्हणून दोन देशांच्या प्रमुखांना गळाभेटीची नौटंकीही करावी लागते बर्याचदा जगाला ‘दाखवण्यासाठी’... पणसिद्धूंसमोर तर अशी कुठलीच राजकीय अपरिहार्यता उभी ठाकली नव्हती.


प्रिय नवज्योतिंसग सिद्धूसाष्टांग दंडवतहो बाबापरवा जो कारनामा तू केलास त्यानंतर तर साष्टांग दंडवतच घालायला हवा ना तुलाकायम भारताच्या विरोधात बरळणारावागणाराक्रिकेटचा मैदानी खेळही इमानदारीने न खेळणारात्यातही सामना भारताविरुद्ध आहे म्हटलं की चवताळून उठणारा पाकिस्तान टीमचा कधीकाळी म्होरक्या राहिलेला इम्रान खान त्या देशाचा पंतप्रधान झाला म्हणून आनंदाला उधाण येणे वा त्याच्या शपथविधी सोहळ्याचे नुसते निमंत्रण मिळाले तरी हुरळून जाणे तुझ्या प्रतिष्ठेला शोभत नाही रे बाबाहे खरं आहे कीअलीकडे तुझी डिमांडनिदान भारतात तरी प्रामुख्यानं ‘कॉमेडी शोपुरती उरली आहेपणम्हणून दरवेळी स्वत:चं हसंच करून घेतलं पाहिजेअसं कुठे आहे राजाशिवायअसल्या एखाद्या सोहळ्याचं निमंत्रण मिळणं एवढं पुरेसं असतंअरे,निमंत्रणं तर ढीगभर वाटलीत त्यांनीमिळालं तरी कुठलं निमंत्रण स्वीकारायचं अन्‌ कुठलं टाळायचंएवढं तर ठरवता आलं पाहिजे ना आपल्याला?
 जे कपिल देवसुनील गावसकरांना कळलं ते तुला उमगलं नाहीयाहून वेदनादायी काय असेल सांगअर्थातयात तुझाही दोष नाही म्हणाइतर सार्या बाबींपुढे इम्रानशी असलेली मैत्री महत्त्वाची वाटली तुलात्याच्याशी इमान राखण्यात धन्यता वाटलीतिकडे पोहोचल्यावर पाकिस्तानच्या लष्करप्रमुखाला मिठी मारण्यातही काहीच गैर वाटलं नाही... सार्या देशाला शरम वाटली रे तुझ्या त्या कृत्याची अन्‌ तूवर पुन्हाउजागरीनं स्वत:च्या त्या वागण्याचं समर्थन करत फिरतोयसतुझ्यातल्या खेळाडूला लाख सलामतुझ्यातल्या प्रभावी वक्त्यालाहजरजवाबीहरहुन्नरी कलावंतालाही त्रिवार कुर्निसातकुठल्याही प्रसंगाला साजेशी अशी शायरी तर एकदम लाजवाबती पेश करण्याची तर्हा तर त्याहून सरसपण...
 पणपरवाचं तुझं वागणं मात्र कुणालाच अजीबात पटलेलं नाही बघएका निमंत्रणावरून उतावीळपणे थेट पाकिस्तानच्या दिशेने झेपावण्यापूर्वी एकदा आपल्या देशातल्या लोकांच्या भावभावनांचाआपल्या चाहत्यांच्या वैचारिक प्रवाहाचाही विचार करायला हवा होता ना सिद्धूजी आपणतसं म्हटलं तर फरक कशानेच काहीच पडत नाहीएक नवज्योतिंसग सिद्धू इम्रान खानच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहिल्याने ना भारताची मान शरमेने खाली गेलीना पाकिस्तानची मान अभिमानाने उंचावलीवैश्विक पातळीवरील राजकारणाची अपरिहार्यता म्हणून दोन देशांच्या प्रमुखांना गळाभेटीची नौटंकीही करावी लागते बर्याचदा जगाला ‘दाखवण्यासाठी’... पणसिद्धूंसमोर तर अशी कुठलीच राजकीय अपरिहार्यता उभी ठाकली नव्हतीत्यांना कुठल्या प्रशासनिक संकेतांचे पालनही करायचे नव्हतेकी प्रोटोकॉलचाही भार नव्हता डोक्यावरबरंगेलेच होते मित्राच्या प्रेमाखातरतर शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहायचं अन्‌ परतायचं ना गुमानपणनाहीसाहेबतुम्ही तर गेलात थेट तिथल्या लष्करप्रमुखाला भेटायलाजावेद बाजवा यांची गाठ पडल्यावर स्वत:ला आवरता तरी यायला हवं होतं.पणदुर्दैवाने तसंही घडलं नाहीतुम्ही तर थेट मिठीच मारली बाजवांनातिही हसतमुखानेकडकडूनउपस्थितांच्या कॅमेर्यांचे फ्लॅश उडाले पटापट अन्‌ तमाम भारतीयांना कळली बातमीभारतातील पंजाब नामक एका राज्याच्या प्रांत सरकारमधील नवज्योतिंसग सिद्धू नामक एका मंत्र्याने पाकिस्तानच्या लष्करप्रमुखाची गळाभेट घेतल्याचीतसे करताना त्यांना किंचितशीही खंत वाटली नसल्याची... सीमेवर 24 तास पावसातउन्हा-तान्हात तैनात असलेल्या भारतीय जवानांना जिवानीशी मारण्याचे षडयंत्र रचणारा आणि आपल्या सैनिकांकरवी त्याची कठोर अंमलबजावणी करवून घेण्यासाठी धडपडणारासीमेपलीकडचा एकही जवान शहीद झाला तरी ज्याला आनंदाच्या उकळ्या फुटताततो निर्दयी अधिकारी तो हाचयाची कल्पना सार्या भारताला आहेपण पाकिस्तानच्या निर्मितीचे चटके ज्यांनी वर्षानुवर्षे सहन केलेपाकड्यांच्या षडयंत्रातून जन्माला आलेल्या दहशतवादाची झळ ज्यांनी वर्षानुवर्षे सोसलीखलिस्तानच्या मागणीपासून तर सुवर्णमंदिर ताब्यात घेण्यापर्यंतच्या त्यांच्या नापाक कारवायांचा जो साक्षीदार राहिला त्या पंजाबातील जनतेचे प्रतिनिधित्व करणार्या सरकारमधील एका जबाबदार मंत्र्याला दोन देशांतील संबंधांच्या तुलनेत स्वत:च्या वैयक्तिक मैत्रीला अधिक महत्त्व द्यावेसे वाटावेयाहून दुर्दैवी बाब ती कोणती असणार?
क्रिकेटचे मैदान असो की मग राजकारणाचा आखाडाभारताच्या बाबतीतली इम्रान खानची भूमिका सहानुभूतीची कधीच राहिली नाहीउलटहिंदुस्थानविरुद्धचा द्वेष आणि रोषच त्याच्या वर्तणुकीतून वारंवार सिद्ध होत राहिला आहेपणआता तो पाकिस्तानचा पंतप्रधान झालाय्‌ म्हटल्यावरअसमर्थनीय असले तरी त्याचे जुने सगळे आक्षेपार्ह वागणे विसरून त्याची गळाभेट घेणे ही तर भारताच्या पंतप्रधानांसाठीचीही अपरिहार्यता ठरणार आहे येत्या दिवसातइच्छा असो वा नसो,त्यांना इम्रानशी हसतमुखानेच भेटावे लागणार आहेनवज्योतिंसग सिद्धू नावाच्या एका भारतीय नागरिकासाठी मात्र तसली कुठलीच अपरिहार्यता पुढ्यात उभी ठाकली नव्हतीआजही नाहीत्या देशाच्या लष्करप्रमुखाची भेट घेण्याचे तर कोणतेही औचित्य नव्हते की प्रयोजनही नव्हतेपणइम्रानने धाडलेल्या नुसत्या निमंत्रणाने उतावीळ झालेले पंजाबचे मंत्रीच तारतम्य हरवून बसले होतेअसल्या प्रसंगी राखणे अपेक्षित असलेल्या गांभीर्याची जाणीवही त्यांच्या चेहर्यावर कुठे झळकत नव्हतीउलटपणी जावेद बाजवा यांची गळाभेट घेतानाचा अनाकलनीय आनंद त्यांच्या चेहर्यावर उमटलेला दिसत होतात्याहीपेक्षापाकभेटीनंतर भारतात आल्यानंतर जे अकलेचे तारे त्यांनी तोडलेतते अधिक वेदनादायक आणि चीड आणणारे आहेतया भेटीमुळे दोन देशांमधील संबंध सुधारणार असल्याचा त्यांचा दावा तर तद्दन फालतूतकलादू अन्‌ हास्यास्पदही आहेतरीही त्यांनी तो केलाय्‌ खरा!
 बासिद्धूपंतप्रधानही तर नवाझ शरीफांना भेटले होतेमग मी भेटलो तर काय झालं इथपासून तर... मग भारतातल्या तमाम विदेशी दूतावासांचा उपयोग काय,इथपर्यंतच्या तुझ्या प्रश्नांमधून तुला नेमकं काय सिद्ध करायचंय्‌ ते ठाऊक नाहीपण स्वत:ची चूक उमगल्यावरलोकांच्या प्रक्षुब्ध भावनांची पुरेशी कल्पना आल्यावर हताश झालेला तूतुझ्याच त्या प्रश्नांमधून झळकलाहे मात्र खरेकाही लोकांनी ठरवला तसा देशद्रोही तू तांत्रिकदृष्ट्या नसशीलही कदाचितपण म्हणून तुझ्या त्या कृत्याचे समर्थन मात्र कदापि होऊ शकत नाहीआपले पंतप्रधानराष्ट्रपती यांच्या भेटीच्या वेळी तिथले जे अधिकारी सलामी द्यायला रांगेत उभे राहतात त्यांना गळाभेटीसाठी पात्र ठरविण्याची किमया भारतीय संसदेचे सदस्य राहिलेल्या नवज्योत सिद्धू यांच्या हातून लीलया घडावीही बाब सार्या भारताला आक्षेपार्ह वाटली असेलतर ती चूक कशी ठरवता येईलआता दुसर्याच कुणालातरी आरोपीच्या पिंजर्यात उभे करून स्वत:ची सुटका करून घेण्याचा प्रयत्न अन्आपल्याच चुकीच्या वागणुकीचे सिद्धूंनी चालवलेले लटके समर्थन योग्य कसे ठरवता येईल?
क्रिकेटचे विश्व सिद्धूंचे स्वत:चेएकट्याचेपणराजकीय वतुर्ळातील त्यांचे अबाधित स्थान निर्माण करण्यासाठीचा भाजपाचा वाटा मोठा राहिलाहे तर खुद्द त्यांनाही नाकारता येणार नाहीत्याच भाजपाचे अर्ध्वर्यू अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनाने सारा देश हळहळत असतानाकधीकाळचा त्या पक्षाचा एक पाईक मात्र अटलजींचा अंत्यविधी टाळून आपल्या एका दूरस्थ मित्राच्या शपथविधीला उपस्थित राहणे अधिक पसंत करतो... काहीही म्हण सिद्धूपण हे काही पटत नाही गड्या मनाला...!
‘‘कहू दोस्तसें दोस्त की बात क्या क्या;
रही दुश्मनोंसें मुलाकात क्या क्या...’’