‘वे’नदीच्या काठावर वसलेलं ‘हे’ नावाचं एक गाव. वेल्स नावाच्या देशातलं. त्यामुळेच त्याला हे ऑन वे असं नाव पडलं.गावाची नैसर्गिक ठेवणच अशी की, त्याचा काही भाग थेट दुसरा देश असलेल्या इंग्लंडच्या भूमीवर अतिक्रमण करणारा. निसर्गदत्त सौंदर्याची उधळण तर आहेच, सोबतीला निळ्याशार आकाशाखाली आच्छादलेल्या जमिनीवरची मऊशार हिरवळ दूरवर विखुरलेली. शेजारी खळखळ करत वाहणारा नदीचा प्रवाह. इथं खूप सारे किल्ले आहेत. मॉल्स आहेत. कॅफे आहेत. पुरातन वस्तूंची दुकानंही भरपूर आहेत. पण तरीही या गावाची ओळख आहे, ती मात्र पुस्तकांसाठीचीच. त्यातही नव्या पुस्तकांपेक्षाही जुन्या, सेकंडहॅण्ड पुस्तकांसाठीची त्याची ओळख अधिक गडद आहे. अगदी जागतिक पातळीवर त्या लौकिकाची नोंद एव्हाना झाली आहे. पुस्तकांच्या दुकानांचीच संख्या इतकी मोठी आहे म्हटल्यावर तिथे उपलब्ध असलेल्या पुस्तकांच्या विषयांचे वैविध्य अफलातून असणे हे तर ओघाने आलेच. इथं दरवर्षी साजरा होणारा, खास पुस्तकांसाठीचा ‘हे महोत्सव’ म्हणजे तर वाचनाची आवड असलेल्यांसाठीची खुमासदार मेजवानीच. यानिमित्तानं भरणारं लेखकांचं संमेलन अन् वेगवेगळ्या विषयांवर तिथं रंगणारी चर्चा, जिवाचा कान करून ऐकावी अशीच.
सर्वदूर पुस्तकंच पुस्तकं. गल्लीबोळात, दुकानात, घराघरातल्या कपाटात, घराबाहेच्या फळीत, रस्त्याच्या कडेला, बागेतल्या भिंतींशी लागून तयार करण्यात आलेल्या शेल्फमध्ये, अगदी इथल्या छोट्या छोट्या किल्ल्यांच्या सभोवतालच्या परकोटाच्या भिंतींलगतदेखील… काही कॉफी शॉप्स तर खास पुस्तकं वाचण्याची सोय करण्यासाठीच उघडले गेले आहेत. आणि पुरातन वस्तूंची दुकानं? हो! तिथेही पुस्तकं आहेतच… ही दुकानं, तिथली नक्षीदार ठेवण, त्यातली पुस्तकांची आकर्षक मांडणी, ग्राहकांच्या बसण्याची सोय… सारंच मोहक. पुस्तकांच्या रूपात गावकर्यांनी उभारलेलं ज्ञानाचं भांडार आणि सोबतीला निसर्गसौंदर्यानं भारावलेलं इथलं वातावरण. आहाहा! ज्याला वाचनाची आवड, नव्हे वेड आहे, त्याच्यासाठी या नगरीतले वास्तव्य तर जणू कल्पनेतला स्वर्गानुभवच…
‘वे’नदीच्या काठावर वसलेलं ‘हे’ नावाचं एक गाव. वेल्स नावाच्या देशातलं. त्यामुळेच त्याला हे ऑन वे (हरू ेप ुूश) असं नाव पडलं.
गावाची नैसर्गिक ठेवणच अशी की, त्याचा काही भाग थेट दुसरा देश असलेल्या इंग्लंडच्या भूमीवर अतिक्रमण करणारा. निसर्गदत्त सौंदर्याची उधळण तर आहेच, सोबतीला निळ्याशार आकाशाखाली आच्छादलेल्या जमिनीवरची मऊशार हिरवळ दूरवर विखुरलेली. शेजारी खळखळ करत वाहणारा नदीचा प्रवाह. इथं खूप सारे किल्ले आहेत. मॉल्स आहेत. कॅफे आहेत. पुरातन वस्तूंची दुकानंही भरपूर आहेत. पण तरीही या गावाची ओळख आहे, ती मात्र पुस्तकांसाठीचीच. त्यातही नव्या पुस्तकांपेक्षाही जुन्या, सेकंडहॅण्ड पुस्तकांसाठीची त्याची ओळख अधिक गडद आहे. अगदी जागतिक पातळीवर त्या लौकिकाची नोंद एव्हाना झाली आहे. पुस्तकांच्या दुकानांचीच संख्या इतकी मोठी आहे म्हटल्यावर तिथे उपलब्ध असलेल्या पुस्तकांच्या विषयांचे वैविध्य अफलातून असणे हे तर ओघाने आलेच. इथं दरवर्षी साजरा होणारा, खास पुस्तकांसाठीचा ‘हे महोत्सव’ म्हणजे तर वाचनाची आवड असलेल्यांसाठीची खुमासदार मेजवानीच. यानिमित्तानं भरणारं लेखकांचं संमेलन अन् वेगवेगळ्या विषयांवर तिथं रंगणारी चर्चा, जिवाचा कान करून ऐकावी अशीच.
इथं वास्तव्याला असलेली आणि पर्यटक म्हणून कधीमधी भेट देणारी माणसंही या गावची ही जागतिक ओळख जपण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक करतात. बहुधा म्हणूनच, विकणार्यांपेक्षाही पुस्तकं विकत घेणार्यांची हौस भागवणारं हे ठिकाण ठरलं आहे. इथल्या घराघरांत पुस्तकांचे दुकान थाटले गेलेय् ते त्यामुळेच. मोठमोठी वाचनालये आहेतच. तेवढीच मोठमोठी दुकानंही आहेत. पण त्याहीपेक्षा छोट्या छोट्या टुमदार घरांच्या दाराशी लावलेल्या एखाद्या छोट्याशा शेल्फमधून डोकावणारी मोजकी पुस्तकं मात्र लक्ष वेधून घेतात. या श्रीमंतीला न शोभणार्या एखाद्या झोपडीसदृश दुकानात एखादे लाखमोलाचे दुर्मिळ पुस्तक गवसणार नाहीच, याची खात्री देता यायची नाही. त्यामुळे दुकानाच्या दिसण्यावर, त्याच्या बाह्य स्वरूपावर न भाळता, जमेल तिथे भेट द्यायची. जमेल तेवढी पुस्तकं चाळायची आणि आवडेल ते विकत घ्यायचं. पुस्तकांच्या इथल्या कित्येक दुकानांना स्वतंत्र नाव असे नाहीच. ‘ऑनेस्टी बूक शॉप’ हीच अनेकांची ओळख. त्यापुढे लागलेल्या पाट्यांनीही तेच नाव धारण केलेलं. एकूण काय तर ‘हे ऑन वे’ नावाचं हे एक अनोखं गाव ठरलं आहे पुस्तकांचं. जगभरातले लोक एका छोट्याशा देशातल्या आडवळणावरच्या या छोट्याशा गावात आवर्जून, अगदी दूरदुरून येतात. इथे विखुरलेलं पुस्तकांचं समृद्ध विश्व डोळ्यात साठवण्यासाठी. नजर जाईल तिथवर दिसणारी पुस्तकं आणि ती वाचत बसलेले वेडे लोक… फारशी आवड नसलेल्यांनाही वाचनाचा संदेश देणारे…
इंग्रजांच्या सान्निध्यात रुजलेल्या, वाढलेल्या, एका अनोख्या उपक्रमासाठी जगभरात प्रसिद्धी लाभलेल्या ‘हे ऑन वे’च्या धर्तीवर एक गाव लवकरच महाराष्ट्रात, हो! आपल्या महाराष्ट्रातही साकारते आहे. अर्थात संपूर्ण भारतातलेही पहिलेच ‘पुस्तकांचे गाव’ असणार आहे. महाराष्ट्राच्या शिक्षण विभागाच्या माध्यमातून विनोद तावडे यांनी घेतलेल्या पुढाकारातून ही कल्पना साकारते आहे.
सातारा जिल्ह्यातलं भिलार नावाचं गाव. महाबळेश्वर परिसरातल्या पाचगणीपासून अगदीच जवळ वसलेलं. कालपर्यंत इथल्या गावकर्यांनी केलेला स्ट्रॉबेरी पिकवण्याचा प्रयोग पंचक्रोशीत त्या गावाची ओळख सांगून गेला होता. आता ‘पुस्तकांचं गाव’ म्हणून लाभणारी ओळख, त्याची कीर्ती संपूर्ण देशात पोहोचविणार आहे. काही सार्वजनिक जागा उपलब्ध झाल्या. काहींनी आपल्या घराची ओसरी उपलब्ध करून दिली. काहींनी घराचा काही भागही उपलब्ध करून दिला. भिलारमधली अशी जवळपास पंचेवीस ठिकाणं पुस्तकं ठेवण्यासाठी निश्चित करण्यात आली आहेत. परिसरातल्या सुमारे पंचाहत्तर कलावंतांनी मिळून या जागांना कलादालनाचं स्वरूप दिलं आहे. कुठे नुसतीच रंगरंगोटी, तर कुठे कुंचल्यातून साकारलेल्या विविधरंगी कलाकृती. सध्या, विकत घेण्यापेक्षाही वाचनाची सोय असलेली ही ठिकाणं असतील. सुरुवातीला विविध पंचेवीस साहित्य प्रकारातली निदान पंधरा हजार पुस्तकं इथं उपलब्ध करून देण्यात येताहेत. लोकांनी यायचं. फेरफटका मारायचा. कपाटातून त्यांच्या आवडीची पुस्तकं निवडायची. एखादी आवडीची जागा बघायची अन् निवांत वाचत बसायचं. पुस्तकांसाठीची कपाटं, टेबल्स, खुर्च्या, टी-पॉय, असं सारं काही तिथे असेल. इथल्या निसर्गरम्य, शांत वातावरणाची या वाचन संस्कृतीला झाली तर मदतच होणार आहे. हो! त्याशिवायच का भिलार गावाची निवड झालीय् या आगळ्यावेगळ्या प्रकल्पासाठी?
संपूर्ण गावालाच वाचनालय करण्याचा हा अनोखा उपक्रम राज्य सरकारच्या पुढाकारातून साकारत असला, तरी त्याची भविष्यातील फलश्रुती लोकसहभागातूनच निश्चित व्हायची आहे.
उपक्रम लोकाभिमुख करण्याच्या उद्देशाने सुरुवातीला शालेय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहलींचा एखादा ‘मुक्काम’ भिलारमध्ये असावा यासाठी आग्रह धरला जाणार आहे. त्यानिमित्ताने नव्या पिढीत वाचन संस्कृती रुजवण्याचा प्रयत्न होऊ घातला आहे. शिवाय, वाचनाची आवड असलेल्या इतर वयोगटातील लोकांसाठी कुठलीच अट नसलेला इथला वावर ‘मुक्त’ असणार, हे ओघाने आलेच. भिलारमध्ये साकारत असलेल्या ‘पुस्तकांच्या गावाची’ संकल्पना ‘हे ऑन वे’च्या धर्तीवरच आधारलेली आहे. भविष्यात अशी आणखी ‘पुस्तकांची गावं’ साकारण्याचा शिक्षणमंत्र्यांनी व्यक्त केलेला मानस म्हणूनच महत्त्वाचा अन् मोलाचाही आहे.
विकास आणि सरकारी कामांची मर्यादा रस्ते, पाणी, धरणं, विजेच्या चौकटीत बंदिस्त करून बसलेल्या राजकीय संकल्पनांच्या पलीकडे जाऊन असे एखादे ‘पुस्तकांचे गाव’ साकारण्याची कल्पना तशी जगावेगळीच. निवडणुकीच्या प्रक्रियेत महत्त्वाच्या ठरलेल्या मतांच्या बेरजेची राजकीय गणितं मांडण्यातच वेळ जातो आताशा राजकीय नेत्यांचा. अशात, ती गणितं बाजूला ठेवून एखाद्या समाजाभिमुख उपक्रमाचे द्रष्टे नियोजन मंत्र्यांच्या कल्पनेतून, शासनस्तरावर साकारावे, हे कौतुकास्पदच!
No comments:
Post a Comment