Friday, December 29, 2017

लालूंची आलीशान कैद!

लालू प्रसाद यादवांनी परवा जेलमध्ये कसा स्वयंपाक केला, गुलाबी थंडीत त्यांनी तास-दोन तास उन्हात कसे घालवले, त्यांच्यासाठी पाटण्याहून गुटखा कसा मागवण्यात आला अन्‌ दूरवरच्या दरभंग्यातील शेतातून हिरव्यागार भाज्यांचा रतीब कसा त्यांच्या सेवेत सादर केला जातोय्‌ याचे रसभरीत वर्णन...त्यांच्यासाठी उपलब्ध होणारी सकाळची वर्तमानपत्र, दिवाणखान्यातला टीव्ही, वामकुक्षी आटोपल्यावर दुपारी त्यांना म्हणे भेळ लागते चहाच्या सोबतीला! मग भेळेची व्यवस्था करून द्यायला सभोवतालची यंत्रणा धावली नसती तरच नवल! जरासे निवांत बसले लालू यादव, की मग कैद्यांची गर्दी जमते म्हणे त्यांच्या सभोवताल अन्‌ मग मस्तपैकी रंगते ती गप्पांची मैफल. दरबारच भरतो म्हणा ना साहेबांचा! लालूंसारखेच वेगवेगळ्या गुन्ह्यात तोंड काळे केलेले तिथले इतर कैदीही मग आपली गार्‍हाणी घेऊन हजर होतात. आपापल्या समस्या साहेबांपुढे मांडतात. अन्‌ हा चाराखाऊ भ्रष्ट नेता त्या समस्या सोडवण्याची हमी देतो सर्वांना. मुर्दाड अधिकार्‍यांची हतबल फौज मुकाट्यानं सारा तमाशा बघत राहते. त्या मैफलीतली गर्दी, तिथे रंगलेला गप्पांचा फड आवरण्याची जबाबदारी चालून येते ती तिथल्या सुरक्षा रक्षकांवर...
बघताय्‌ नो कसला तमाशा चाललाय्‌ तो? लालू कारागृहात आहेत की पिकनिकवर? ते निम्न दर्जाचे भ्रष्टाचारी आहेत की उच्चस्तरीय स्वातंत्र्यसंग्राम सैनिक? घोटाळा केला म्हणून त्यांना गजाआड धाडण्यात आले की देशासाठी केलेल्या कुठल्याशा त्यागासाठी परकीयांनी त्यांना ही शिक्षा दिलीय्‌? 
खरंच हा देश अजब आहे. नुसताच अजब नाही तर गुलामांचा देश आहे हा. कमालीच्या पराभूत मानसिकतेत जगतात लोक इथले. एक तर एखाद्याला डोक्यावर बसवताना त्याची लायकी लक्षात घेत नाहीत अन्‌ एकदा बसवलंच डोक्यावर की त्याची पत लक्षात असूनही त्याला जाब विचारण्याची िंहमत कुणी करीत नाही. अशा तर्‍हेने, लोकांनी अकारण डोक्यावर घेतलेली माणसंही मग सुसाट सुटतात. बेताल वागतात. ज्यांनी मानसन्मान दिला, सत्तेतली पदं बहाल केली त्यांनाच पायदळी तुडवतात. पथभ्रष्ट होत बिनधास्तपणे सत्तेचा दुरुपयोग करतात. दुर्दैव असे की अशा पथभ्रष्ट झालेल्यांना ताळ्यावर आणण्याची गरज इथल्या व्यवस्थेला, सर्वसामान्य जनतेलाही वाटत नाही. म्हणूनच मग असल्या बड्यांच्या बेछूट वागण्यावरही टाळ्यांचा कडकडाट करतात सभोवतालचे लोक. त्यांच्या अर्थहीन बरळण्यानेही मैफल सजते फुकाची. त्यांनी भ्रष्टाचार केला, कोट्यवधी रुपयांचे गबन केले, लोकांच्या हक्कावर गदा आणली, अधिकारांचा गैरवापर केला, तरी त्या सर्व बाबींचा विसर पडून कौतुकाचा वर्षाव त्यांच्यावर होत राहतो. राजकारण असो वा क्रिकेट, चित्रपट असो वा उद्योग जगत, तिथे वावरणार्‍या लोकांना तर काहीही करण्याची मुभाच बहाल करून टाकलेली असते, त्यांच्या सभोवताल जमलेल्या षंढांच्या फौजेने. इथल्या सामान्य जनतेला तर तसेही कुणी विचारत नाही. देशावर आणिबाणी लादणार्‍या इंदिरा गांधींना नंतरच्या काळात पंतप्रधानपदी ससन्मान विराजमान करण्याची बाब असो, की चारा घोटाळ्यात दोषी आढळून आल्याने शिक्षा झालेल्या लालूप्रसाद यादव यांच्या, कारागृहातील दिनचर्येवर सध्या चाललेला रंगतदार चर्चेचा बहर असो, खरंच साराच दुर्दैवी प्रकार  आहे...आपल्या चुकीच्या कृत्याची शिक्षा झाली असल्याची त्यांनाही लाज वाटत नाही थोडीशी अन्‌ जनतेलाही त्यांच्या त्या वागण्यात कुठला प्रमाद जाणवत नाही कुठेच. जणू काहीच घडलेले नसल्याच्या थाटातले निर्लज्ज वागणे चालले आहे. त्यांचे, त्यांच्या समर्थकांचे अन्‌ भाबड्या जनतेचेही. जणू काय भलीमोठी कर्तबगारी बजाऊनच जेलमध्ये गेलाय्‌ हा माणूस! त्या घोटाळ्याचं काय, असा सवाल विचारण्याची गरज कुणालाच वाटत नाहीय्‌ इथे? 
लालू प्रसाद यादवांनी परवा जेलमध्ये कसा स्वयंपाक केला, गुलाबी थंडीत त्यांनी तास-दोन तास उन्हात कसे घालवले, त्यांच्यासाठी पाटण्याहून गुटखा कसा मागवण्यात आला अन्‌ दूरवरच्या दरभंग्यातील शेतातून हिरव्यागार भाज्यांचा रतीब कसा त्यांच्या सेवेत सादर केला जातोय्‌ याचे रसभरीत वर्णन...त्यांच्यासाठी उपलब्ध होणारी सकाळची वर्तमानपत्र, दिवाणखान्यातला टीव्ही, वामकुक्षी आटोपल्यावर दुपारी त्यांना म्हणे भेळ लागते चहाच्या सोबतीला! मग भेळेची व्यवस्था करून द्यायला सभोवतालची यंत्रणा धावली नसती तरच नवल! जरासे निवांत बसले लालू यादव, की मग कैद्यांची गर्दी जमते म्हणे त्यांच्या सभोवताल अन्‌ मग मस्तपैकी रंगते ती गप्पांची मैफल. दरबारच भरतो म्हणा ना साहेबांचा! लालूंसारखेच वेगवेगळ्या गुन्ह्यात तोंड काळे केलेले तिथले इतर कैदीही मग आपली गार्‍हाणी घेऊन हजर होतात. आपापल्या समस्या साहेबांपुढे मांडतात. अन्‌ हा चाराखाऊ भ्रष्ट नेता त्या समस्या सोडवण्याची हमी देतो सर्वांना. मुर्दाड अधिकार्‍यांची हतबल फौज मुकाट्यानं सारा तमाशा बघत राहते. त्या मैफलीतली गर्दी, तिथे रंगलेला गप्पांचा फड आवरण्याची जबाबदारी चालून येते ती तिथल्या सुरक्षा रक्षकांवर...
बघताय्‌ नो कसला तमाशा चाललाय्‌ तो? लालू कारागृहात आहेत की पिकनिकवर? ते निम्न दर्जाचे भ्रष्टाचारी आहेत की उच्चस्तरीय स्वातंत्र्यसंग्राम सैनिक? घोटाळा केला म्हणून त्यांना गजाआड धाडण्यात आले की देशासाठी केलेल्या कुठल्याशा त्यागासाठी परकीयांनी त्यांना ही शिक्षा दिलीय्‌? 
लोकांची फसवणूक करणार्‍या सहारा कंपनीचे सुब्रत रॉय असोत की बिहाराचे तत्कालीन मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव, लोकांची फसवणूक, सार्वजनिक मालमत्तेची लूट केल्याबद्दलची शिक्षा ज्या आलीशान पद्धतीने ते भोगताहेत, ज्या पद्धतीने सुब्रत रॉय यांच्यासाठी दिल्लीतल्या अन्‌ लालू प्रसाद यादवांसाठी रांचीच्या कारागृहातल्या वास्तव्याकरता त्यांच्या गरजा पूर्ण करणार्‍या तारांकित सुविधांचा धोधो पाऊस डोळे असून आंधळ्याचे सोंग वठविणार्‍या यंत्रणेच्या नाकावर टिच्चून पडतोय्‌, तो खरोखरच दुर्दैवी आहे. एसीपासून तर पलंगापर्यंत, शेतातल्या भाज्यांपासून तर गुटख्यापर्यंतच्या गोष्टी बाहेरून आणण्याची विशेष परवानगी कायदा खुंटीवर टांगून, नियमांची खिल्ली उडवत बहाल करण्याची तर्‍हा नेमक्या कुठल्या विशेष कर्तबगारीसाठी या धेंडांकरता अनुसरण्यात आली आहे, हे कळू शकेल लोकांना? की घटनेत तरतूद केलीय्‌ कुणी, या देशातल्या राजकीय नेत्यांनी, बड्या उद्योजकांनी, सलमानखान सारख्या चिटपटाचा धंदा करणार्‍या दिवट्यांनी गुन्हा केला असेल, तो सिद्ध झाला असेल, तरी त्यांना शिक्षा होऊ नये याची? लोकलाजेस्तव, नाईलाजाने घोषित करावी लागलीच कधी शिक्षा, तरी कारागृहात त्यांना पंचतारांकित व्यवस्था उपलब्ध करून देण्याची? मग कुठल्या नियमांतर्गत या सार्‍या सुविधा मिळताहेत लालू आणि सुब्रत यांना? 
मीडियातली तमाम हुशार मंडळी ज्या तर्‍हेने लालूंच्या तेथील वर्तनाचा, दिवसभरातील त्यांच्या आचरणाचा, त्यांच्या वागण्या-बोलण्याचा, दिनक्रमाचा वृत्तांत हिरीरिने, प्राधान्याने भारतीय जनतेसाठी उपलब्ध करून देत आहे, लोकही ज्या चवीने त्याचे रसग्रहण करीत आहेत, ते बघितल्यानंतर ही शिक्षा ‘भोगणे’ कमी आणि ‘उपभोगणे’ अधिक चालले असल्याचे स्पष्टपणे  जाणवते. शिक्षा देणार्‍यापासून तर ती भोगणार्‍यापर्यंत अन्‌ कायदा तयार करणार्‍यांपासून तर तो अंमलात आणणार्‍या यंत्रणेपर्यंत सारे मिळून कायद्याचा फुटबॉल करून तो इकडून तिकडे टोलावताना दिसताहेत. अन्यथा लोकांच्या नावाचा गैरवापर करून कोट्यवधी रुपयांचा कागदोपत्री धिंगाणा घालणार्‍या सुब्रत रॉय यांना िंकवा कोट्यवधी रुपयांचा चारा संगनमत करून घशात घालणार्‍या लालूप्रसाद यादवांना ही असली, वर्ल्डकप िंजकून आल्यासारखी व्हीव्हीआयपी ट्रीटमेंट का दिली जावी? तीही कारागृहात? ही शिक्षा आहे की गम्मत, की तमाशा? 
खरं तर खंत आणि लाज वाटली पाहिजे इथल्या एकूणच व्यवस्थेला. आजपासून तीन दशकांपूर्वी उघडकीस आलेल्या एका घोटाळ्याच्या प्रकरणाच्या चौकशीत, न्यायालयीन प्रकियेत तब्बल 32 वर्षे घालविली जातात. त्यानंतर घोषित झालीच शिक्षा तर अशा पद्धतीने त्याची थट्टा उडवणे चालले आहे? इथे खाकी वर्दीतला माणूस समोर दिसला तरी दमछाक होते. कपाळावर घामाचे थेंब उमटतात सामान्य माणसाच्या अन्‌ लालूंसारखा राजकारणी सरकारी तिजोरी लूटूनही बेशरमपणे हसत हसत घालवू शकतो कारागृहातले दिवस? घरात मिळत नसतील एवढ्या, एखाद्या पंचतारांकित हॉटेलात असतील तेवढ्या सुविधा गजाआड असतानाही उपलब्ध होऊ शकतात त्यांना? 
बेशरम नेता, षंढ अधिकारी यांनी मिळून हतबल जनतेपुढे मांडलेला हा तमाशा आहे. अन्यथा नावाला शिक्षा अन्‌ प्रत्यक्षातली ही चैन अन्य कुणाला उपलब्ध आहे सांगा? न्यायालयाला दिसत नाही, त्या व्यवस्थेने ठोठोवलेल्या शिक्षेचे संबंधितांनी कसे खोबरे करून ठेवले आहे ते? 
इथून पुढे एकच व्हावे. व्यक्ती बडी असेल, राजकारणात त्याचे वजन असेल, उद्योगातून तिने भरपूर श्रीमंती कमावली असेल, कुणी प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळवली असेल, तर त्यांच्यासाठी शिक्षा ही ‘अशीच’ असेल, हे न्यायालयानेच एकदा जाहीर करून टाकावे. राहिला प्रश्न ‘कठोर’ शिक्षेचा, तर ती भोगायला गोरगरीब काय कमी आहेत या देशात? त्यांच्या बाबतीत कुठलाच मुलाहिजा बाळगायचा नसतो, हे तर प्रत्येकाला कळते इथे...हो ना?
एक कवी म्हणतो ते खरंच आहे...
यह अजीब मुल्क है
निर्बलोपर हर शुल्क है
अगर आप हो बाहुबली
हर सुविधा नि:शुल्क है...
केलेल्या भ्रष्टाचाराची शिक्षा भोगण्याची लालूंची ही आलीशान तर्‍हा हा त्याचाच प्रत्यय आहे...

Saturday, December 23, 2017

... मग घोटाळा केला कोणी?

या देशात राजकारण्यांनी कितीही भ्रष्टाचार केला, कोणताही घोटाळा केला तरी त्यांना शिक्षा होत नाही, हा लोकांच्या मनातला समज खरा ठरविण्यासाठी धडपडल्या सार्‍या यंत्रणा? की तेच धगधगते वास्तव आहे इथले? हेच, असेच घडत राहणार असेल, तर मग चालवता कशाला न्यायालयात प्रकरणे? बंद करून टाका सार्‍या सुनावण्या. या देशातील एकूण एक राजकारणी धुतल्या तांदळासारखा स्वच्छ असल्याची प्रमाणपत्रे बहाल करून टाका एकदाची अन्‌ व्हा मोकळे. इथे ना कोळसा घोटाळा झाला ना टु जीचा. कॉमनवेल्थ गेम्सच्या आयोजनात कलमाडींनी एका नव्या पैशालाही हात लावला नसल्याचेही जाहीर करून टाका. पण ही असली, पुराव्यांच्या अभावाची, विश्वास बसणार नाही असली फालतु कारणं सांगून कधी सलमानला तर कधी ए. राजाला निर्दोषत्वाची प्रमाणपत्रे बहाल करणं बंद करा. हे खरं आहे की, या देशातली जनता खूप भोळी आहे. विसराळू आहे. मुळात ती स्वत:च्याच विवंचनेत इतकी गुंतली आहे की कधीकाळी या देशात आणिबाणीच्या माध्यमातून हुकूमशाही लादली गेली होती हेही तिला स्मरत नाही अन्‌ त्याच इंदिरांच्या हत्येनंतर शिखांची सरेआम कत्तल करणारी माणसं नंतरची कित्येक वर्षे उजळ माथ्यानं फिरत राहिल्याची बाबही तिच्या, पुरती विस्मरणात गेली आहे. अलीकडच्या काळात तर इतके घोटाळे झालेत. काय काय लक्षात ठेवणार आहेत लोक? त्यामुळे लोकांची िंचता करू नका. खुलेआम घोटाळे करा.

संपूर्ण देशात गाजलेल्या एका भल्या मोठ्या, कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यातून ‘ते’ निर्दोष मुक्त झाले आहेत. अगदी सलमानखान सारखं. तसं बघितलं तर घडलेली घटना खरी होती. कुणाचा तरी मुडदा पडला हेही खरं होतं. त्यात सलमान दोषी होता हे ही सार्‍या जगाला मान्य होतं. पटत होतं. फक्त न्यायासनासमोर ते ‘सिद्ध करण्यात’ यंत्रणा कमी पडली. थोडक्यात, दोष ‘सिद्ध करण्यासाठी’ आवश्यक असलेल्या पुराव्यांची जुळवाजुळव होऊ शकली नाही. आणि  म्हणून सलमान निर्दोष सुटला एवढंच. अगदी तसंच परवा टु जी घोटाळ्याबाबत घडलं.  राजकारणी आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकार्‍यांनी संगनमत करून केलेला घोटाळा असे ज्याचे वर्णन केले जाते, त्या प्रकरणात एकाचाही दोष ‘सिद्ध’ होत नाही, यासारखा दुसरा मोठा विनोद नाही. इथली व्यवस्था इथल्या जनतेला कशी कचरा समजते अन्‌ त्यांना ती कशी कायम मूर्ख बनवत राहते, याचे हे एक ‘उत्तम’ उदाहरण आहे. डॉ. मनमोहनिंसह यांच्या नेतृत्त्वातील तत्कालीन सरकारमधील संबंधित मंत्रालयाने जागतिक पातळीवर निविदा जारी केल्याचा गवगवा करीत काही मोबाईल कंपन्यांना उपलब्ध करून दिलेले सेकंड जनरेशनचे स्पेक्ट्रम वाजवी पेक्षा कमी दराने विकल्याचा आरोप कॅगने त्यांच्या अभ्यासपूर्ण अहवालातून केला आणि सारा देश हादरला. या व्यवहारातून देशाला 30 दशलक्ष रुपये प्राप्त झाल्याचा दावा टेलीफोन रेग्युलॅरीटी अॅथॉरीटी ऑफ इंडियाने तेव्हा केला होता. तर प्रत्यक्षात त्यात 1.76 लक्ष कोटी एवढ्या रकमेची भर पडायला हवी होती असा कॅगचा दावा. त्यावरूनच सरकारची फसवणूक झाल्याचा आरोप झाला. ही फसवणूक काही लोकांनी जाणिवपूर्वक केल्याचा, यात सरकारी तिजोरीत कमी अन्‌ कुणाच्यातरी खिशात गेलेली रक्कम अधिक असल्याच्या निष्कर्षावरही आलेत लोक. या आरोपावरूनच काहींनी न्यायालयात धाव घेतली. प्रकरण केव्हाचे, आरोपपत्र केव्हा दाखल झाले अन्‌ न्यायालयाचा निकाल केव्हा लागला, या सार्‍या बाबी दुर्लक्षिल्या तरी सुमारे सात वर्षांनंतर लागलेल्या निकलातून झाडून सारे लोक ‘बाईज्जत बरी’ व्हावेत ही बाब या देशातील एकूणच न्यायव्यवस्थेवर, कारभाराच्या ‘सरकारी’ तर्‍हेवर, प्रशासनातील अधिकार्‍यांच्या मग्रुरीवर, राजकारण्यांच्या निलाजर्‍या बेफिकीर वर्तणुकीवर शिक्कामोर्तब करणारी आहे. तुमच्याजवळ पद, प्रतिष्ठा, पैसा असेल, तर कोणताही िंधगाणा घाला, या देशात कोणीही तुमचं काही एक वाकडं करू शकत नाही, एवढाच सरळ साधा अर्थ निघतो, या प्रकरणी परवा जाहीर झालेल्या न्यायालयीन निकालातून.
ए. राजा पासून तर कानिमोझी सारख्या राजकारण्यांपर्यंत, सिद्धार्थ बेहुरा पासून तर आर. के. चंडोलियांसारख्या वरिष्ठ अधिकार्‍यांपर्यंत, विनोद गोएंका पासून तर करीम मोरांनींसारख्या सहकारी अधिकार्‍यांपर्यंत, युनिटेक वायरलेस पासून तर रिलायन्स सारख्या उद्योगांपर्यंत कोणी म्हणून कोणीही या प्रकरणात दोषी नसल्याचा जर निष्कर्ष असेल, तर मग हा घोटाळा नेमका केला कोणी? मुळात असला कुठला घोटाळा झाला होता हे तरी येथील व्यवस्थेला मान्य आहे की नाही? की कॅग सारख्या संस्थेने उगाच कुणावर तरी सूड उगवण्यासाठी गंमतीने सादर केली सारी आकडेवारी अन्‌ सीबीआयनं खोट्याच पुराव्यांच्या आधारावर बड्या बड्यांना आरोपीच्या िंपजर्‍यात उंभ केलं? जर घोटाळा घडलाच नव्हता तर मग सर्वोच्च न्यायालयाने दोषींविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे निर्देश कशाच्या आधारावर दिले होते? आता सीबीआय न्यायालयाने क्लीन चीट देताच उसने अवसान प्राप्त झालेले आज डॉ. मनमोहनिंसह ज्या िंहमतीने बोलले, ज्या ताकदीने ते त्यांच्या राजकीय विरोधकांवर तोंडसुख घ्यायला सरसावलेत, ते त्यांना पंतप्रधान पदावर असताना का करता आले नाही? त्यांच्या डोळ्यांदेखत ‘निरागस’ ए राजा, कानिमोझींना सीबीआयनं अटक करून जेलमध्ये घातलं तरी चकार शब्दानं कुणी आक्षेप नोंदवला नाही तेव्हा! सीबीआयनं इतकी मोठी केस उभी केली, त्यावरही विरोधाचा सूर कुणी आळवला नाही. आणि आता निकाल ‘बाजुनं’ लागताच स्फूरण चढले सर्वांना?
पुरावे नव्हते तर आरोपपत्र कसे तयार झाले? प्रकरण न्यायालयात दाखल कसे झाले? संसदेत बसणार्‍या मान्यवर सदस्यांना बखुटं धरून थेट कारागृहात धाडले कसे गेले? की हा सारा तेवढ्यापुरता प्रकरण शांत करण्याचा डाव होता? त्या कॉमनवेल्थ गेम घोटाळ्याचं केलं तसं. त्यात नाही का, कलमाडी नावाचा कॉंग्रेसचा एक नेता काही दिवसांसाठी जेलची हवा खाऊन आला एवढंच. बाकी कोट्यवधी रुपयांच्या अफरातफरीचं काय झालं याला कोण विचारतो? तीन महिने घराऐवजी आलीशान बडदास्त असलेल्या कारागृहात राहिलेत ‘साहेब’. एवढया ‘शिक्षेवर’ निभावलं करोडो रुपयांच्या भ्रष्टाचाराचं प्रकरण. आता सहीसलामत साहेब बाहेर अन्‌ खाबुगिरीचे पैसे बेमालूमपणे ‘अंदर’. लोक तर विसरलेही केव्हाच, इथे कधी तरी कॉमनवेल्थ नावाचा घोटाळा घडला होता ते. तसंच टु जी चेही होणार याबाबत आश्वस्त अन्‌  कुणालाही शिक्षा होणार नाही याची हमखास खात्री असल्याने निर्ढावलेल्या समुहाने तर योजनाबद्ध पद्धतीने हे घडू दिले नव्हते ना? राजकारण्यांपासून तर प्रशासनातील सारेच संबंधित लोक या कटात सामील नव्हते ना?
कारण तसे जर नसेल, तर मग इतक्या मोठ्या घोटाळ्यात एकही जण दोषी नसल्याचा अफलातून निकाल समोर आलाच कसा? ज्यांच्या ज्यांच्या विरुद्ध सीबीआय नावाच्या एका नावाजलेल्या संस्थेने, हातात मावणार नाही एवढ्या संख्येतील कागदपत्रे गठ्‌ठ्याने सादर केली, ती काय नाटकबाजी होती? तत्कालीन विरोधी पक्षाने या मुद्यावरून संसदेत गदरोळ केला तो काय होता? तब्बल सात वर्षे न्यायालयीन सुनावणीची नौटंकी कशाच्या भरवशावर चालली मग? विना पुराव्यानेच चालला हा तमाशा? निर्दोषच होते सारे लोक तर कशाला त्रास दिला सीबीआयने त्यांना? तब्बल सतरा ‘भोळ्या भाबड्या’ लोकांना अकारण त्रास दिल्याच्या, त्यांची नाहक बदनामी केल्याच्या आरोपावरून आता सीबीआयच्या अधिकार्‍यांना चौकात उभे करून चाबकांचा मार द्यायला हवा का मग?
या देशात राजकारण्यांनी कितीही भ्रष्टाचार केला, कोणताही घोटाळा केला तरी त्यांना शिक्षा होत नाही, हा लोकांच्या मनातला समज खरा ठरविण्यासाठी धडपडल्या सार्‍या यंत्रणा? की तेच धगधगते वास्तव आहे इथले? हेच, असेच घडत राहणार असेल, तर मग चालवता कशाला न्यायालयात प्रकरणे? बंद करून टाका सार्‍या सुनावण्या. या देशातील एकूण एक राजकारणी धुतल्या तांदळासारखा स्वच्छ असल्याची प्रमाणपत्रे बहाल करून टाका एकदाची अन्‌ व्हा मोकळे. इथे ना कोळसा घोटाळा झाला ना टु जीचा. कॉमनवेल्थ गेम्सच्या आयोजनात कलमाडींनी एका नव्या पैशालाही हात लावला नसल्याचेही जाहीर करून टाका. पण ही असली, पुराव्यांच्या अभावाची, विश्वास बसणार नाही असली फालतु कारणं सांगून कधी सलमानला तर कधी ए. राजाला निर्दोषत्वाची प्रमाणपत्रे बहाल करणं बंद करा. हे खरं आहे की, या देशातली जनता खूप भोळी आहे. विसराळू आहे. मुळात ती स्वत:च्याच विवंचनेत इतकी गुंतली आहे की कधीकाळी या देशात आणिबाणीच्या माध्यमातून हुकूमशाही लादली गेली होती हेही तिला स्मरत नाही अन्‌ त्याच इंदिरांच्या हत्येनंतर शिखांची सरेआम कत्तल करणारी माणसं नंतरची कित्येक वर्षे उजळ माथ्यानं फिरत राहिल्याची बाबही तिच्या, पुरती विस्मरणात गेली आहे. अलीकडच्या काळात तर इतके घोटाळे झालेत. काय काय लक्षात ठेवणार आहेत लोक? त्यामुळे लोकांची िंचता करू नका. खुलेआम घोटाळे करा. आणि हो! आलाच उघडकीस एखादा घोटाळा तर त्याबाबत न्यायालयात प्रकरण दाखल करून लोकांची पाच पाच, दहा दहा वर्षे फुकट वाया घालवू नका. घटनाकारांनी लाख ठरवलं तरी या देशात समान न्यायाची कल्पना नंतरच्या काळातील सत्ताधार्‍यांनी केव्हाच मातीत गाडली आहे. ही वस्तुस्थिती ध्यानात घेत घोटाळेबाजांना तेव्हाच्या तेव्हा गळ्यात हार, हातात मिठाईचा एखादा डबा अन्‌ निर्दोषत्वाचे प्रशस्तीपत्र देऊन गौरव करीत चला यापुढे...



Saturday, November 11, 2017

मुलींचा जन्म नाकारणारी हीन मानसिकता...


हॉंगकॉंग, पटायामध्ये होणारे मुलींच्या जन्माचे स्वागतही, तेथील समाजाच्या हीन अभिरुचीची, विचारांच्या नीच दर्जाचीच फलश्रृती आहे. त्यामुळे केवळ दुर्गम, ग्रामीण भागातील माणसंच मागासलेली असल्याचा समज करून घेण्याचे कारण नाही. वर्तणुकीतून सिद्ध होणारे विचारांचे मागासलेपण तर दिल्ली, मुंबई, हॉंगकॉंग, पटायामध्येही आहे. पुढारलेपण मिरविणार्‍या या समाजाला मुलींचा जन्म नेमका का नको असतो, याचाही विचार झालाच पाहिजे कधीतरी. कधीतरी आम्हीही समजून घेत हे म्हटलं पाहिजे की,  अंजुम तुम अपने शहरके लडकोसे ये कहो पैरो की बेडीयां नाही, पायल है लडकीयाराणीच्या पोटी मुलगी जन्माला आली की, या कानाची खबर त्या कानाला लागणार नाही अशा बेताने, झाकलेल्या माठात तो जीव ठेवून सूर्योदयापूर्वी दूर कुठे तरी नेऊन पुरण्याची कधीतरी ऐकलेली कहाणी धादांत खोटी असावी असं सारखं वाटत राहायचं परवा परवापर्यंत. माणसं एवढी थोडीच निष्ठूर असू शकणार आहेत, हा ओघानं डोकावणारा प्रश्‍न, तो समज खोटा ठरविण्यासाठी धडपडायचा. पण, परवा सोमलगुड्यातील ती घटना कानावर पडली अन् मातीत पुरल्या जाणार्‍या झाकलेल्या माठातील जीवंत मुलीची कहाणी खोटी ठरविण्याचे कारणच गवसेनासे झाले...
लडकियोंपे क्या गुजरी कुछ बता नही पाती जख्म उम्रभर का है और बेजबानी है... दिल्लीतील ते ‘जगप्रसिद्ध’ बलात्कार प्रकरण मुकाट्यानं सहन करून शेवटी स्वत:चा जीव गमावूनही ‘अनामिकच’ राहिलेल्या त्या तरुणीबाबत एका कवयित्रीच्या भावना शब्दातून अशा व्यक्त झाल्या, तर कुटुंबातील सर्वांनाच वंशाचा दिवा हवा असताना, कुणालाच नको असलेलं स्वत:चं अस्तित्व सिद्ध करायला जगात आलेली चिमुरडी एका वृद्धेनं निर्दयतेनं चिरडून टाकल्याची घटना तर अगदी परवाची आहे... खरंच प्रगत झालोय् आम्ही? की, आधुनिकतेची कास धरणे हा नुसता तोंडदेखलेपणा असतो अन् बुरसटलेल्या विचारांचंच गाठोडं उशाशी बाळगत जगतात लोक इथले? पोरगंच जन्माला घालण्याच्या खुळ्या हट्टापायी, घरात पाऊल ठेवलेल्या तिसर्‍या मुलीचा गळा घोटून अवघ्या सत्तावीस दिवसात तिची इहलोकीची यात्रा संपविण्याच्या कृत्याचं समर्थन अन्यथा कसं आणि का करायचं? एकविसाव्या शतकातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगातही मुलाचाच आग्रह धरणारी मानसिकता, नेमकी कुठे नेणार आहे या समाजाला? घरात दोन मुलींचा जन्म झाल्यानंतरही ‘मुलगा हवाच’चा दुराग्रह कायम राहिला अन् तरीही मुलगीच जन्माला आली तर मागासलेल्या विचारांच्या आजीनं संपवून टाकलं तिला एकदाचं. गुदमरून संपलेला जीव कापसाच्या ढिगाखाली सरकवून ती स्वत: मोकळा श्‍वास तरी कशी घेऊ शकली असेल? या प्रकरणात त्या आजीला अटक झाली आहे. आता पुढची कायदेशीर प्रक्रिया पार पाडली जाईल. पोलिस ठाण्यापासून तर कोर्टापर्यंतच्या फेर्‍याही झडतील. कदाचित म्हातारीला कठोरातली कठोर शिक्षाही होईल. पण...पण इथे मुद्दा असा आहे की, आपल्या स्वयंघोषित पुढारलेल्या समाजाची मानसिकता केव्हा बदलेल? सेक्स टुरिझमसाठी प्रसिद्ध असलेल्या पटायासारख्या प्रदेशात मुलगी जन्माला आलेल्या घरात साजरा होणारा आनंदोत्सव वर्णनातीत असतो म्हणतात. दुर्दैव फक्त एवढंच असतं की, त्या आनंदामागे स्त्री-पुरूष भेद संपविण्याच्या दिशेनं पाऊल टाकण्यासाठीच्या प्रयत्नांचा अंशही नसतो. उलट, वयात येताच तिला बाजारात बसवून, तिच्या माध्यमातून घरासाठी पैसा कमाविण्याच्या योजनेचे गुपित त्यामागे दडलेले असते. मुलगी जन्माला आली की लागलीच नाकं मुरडणार्‍या मातीमोल भारतीय मानसिकतेच्या तुलनेत हा आनंदोत्सव काही फार उंचीवर नेऊन ठेवण्याच्या लायकीचा असतो, अशातला भाग नाही. उलट, उपभोगाच्या पलीकडे स्त्रियांची उपयोगिता शून्य ठरविण्याच्या निम्नस्तरीय विचारशैलीचा तो परिपाक असतो. भारतीय समाजही विचारांची तीच नीच पातळी गाठण्यासाठी धडपडतोय् की काय, असे वाटू लागले आहे अलीकडे. एकीकडे भेदरहित समाज रचनेची कल्पना मांडायची. त्यासाठीचा कमालीचा आग्रह धरायचा. पुरूषांच्या तुलनेत स्त्रियांनी रचलेल्या इतिहासाचे, त्यांनी स्वकर्तृत्वातून निर्माण केलेल्या नवनवीन परिमाणांचे कवित्व गायचे, खांद्याला खांदा लावून चालण्याच्या त्यांच्या कर्तबगारीचे कौतुक करायचे, चूल आणि मूल संकल्पनेपलीकडच्या कल्पना रंगवून मांडायच्या. पण प्रत्यक्षात त्यानुसार वागण्याची वेळ आली की, तेव्हा मात्र सरड्यासारखा रंग बदलत आपल्या कूपमंडूक वृत्तीचे प्रदर्शन निलाजरेपणाने घडवायचे. असे असतानाही तरीही सामाजिक धारणा बदलत चालल्या असल्याची ग्वाही देत, मिरवणार आम्ही? जराशी लाज वाटत नाही इथे कुणालाच, कालपर्यंतच्या विविध समस्यांचे सामाजिक आशय आता बदलत चालले असल्याचा दावा करताना? पुरोगामी म्हणवणार्‍या महाराष्ट्राच्या सुदूर टोकावर आडवळणावरील सोमलगुडा नावाच्या एका छोट्याशा गावातील ही घटना दुर्दैवी तर आहेच, पण ती तेवढीच अनाकलनीयही आहे. समाजाच्या आकलनाच्या मर्यादित कक्षा हळूहळू रुंदावत चालल्या असल्याचे, मुलींकडे बघण्याचा दृष्टिकोनही एव्हाना बदलत चालला असल्याचेही कुणी ठामपणे सांगू शकणार नाही. खरंच, कशासाठी घोटला असेल त्या थेरडीनं २७ दिवसांच्या अर्भकाचा गळा? बरं तशीही ती नात होती तिची. तिच्या आईवडिलांनी जर तिचा स्वीकार केला होता, तर मग आजीचं काय घोडं मारलं गेलं होतं, नातीचा जीव घ्यायला? खरं तर या घटनेनं अनेक प्रश्‍न निर्माण केले आहेत. वैयक्तिक विचारांच्या स्तराबाबत, सामाजिक प्रघातांच्या निकषांबाबत, प्रगतीच्या आमच्या टुकार दाव्यांबाबत, जुन्या-टाकावू रुढी, परंपरांवर आसूड ओढतानाही त्या पदराचा एक टोक धरून ठेवण्यासाठी चाललेल्या आमच्या लज्जास्पद, अर्थविहीन धडपडीबाबत, ‘यत्र नार्यस्तु पूज्यते’ चा मंत्र जपताना ज्यांची जीभ जराही अडखळत नाही, त्यांनीच चालविलेल्या स्त्री-सुलभ भावनेच्या थट्टेबाबत... एकीकडे महिलांना लक्ष्मी-दुर्गा-महाकालीच्या स्थानी विराजमान करण्यासाठी सरसावणारी समाजातली हीच माणसं वेळ आली की याच अवतारांच्या इभ्रतीची लक्तरे वेशीवर टांगतात, तेव्हा जीवाचा जो संताप होतो ना, अगदी तीच स्वाभाविक भावना परवा सोमलगुडाच्या त्या घटनेनं सर्वदूर झाली आहे. अर्थात, इवलासा, नाजुकसा तो जीव निर्दयीपणे असा एका क्षणात संपवून टाकण्याची ही घटना काही अशी अचानक थोडीच घडली असणार? कुठल्याशा एका क्षणी तोल जाऊन त्या म्हातारीनं ते बाळ चिरडून टाकले असण्याचीही शक्यता कमीच. मुळात घरात आधीच दोन मुली असतानाही या यंदा कुटुंबाला मुलगाच हवा होता. पण तिसर्‍याहीवेळी मुलगी झाल्याचा राग हा अशा पद्धतीनं व्यक्त झाला. हवा असतानाही वंशाचा दिवा मिळाला नसल्याचा त्रागा या तर्‍हेने व्यक्त झाला. तो त्रागा, तो राग, वर्षानुवर्षे मानगुटीवर बसलेल्या परंपरागत विचारांच्या पगड्यातून तयार झाला असल्याचे धगधगते वास्तव नाकारता कसे येईल कुणाला? सोमलगुडाच कशाला, हा परिणाम तर बड्या शहरांमधूनही दिसतोच आहे सगळीकडे. भारतातील पाचशेपेक्षा अधिक मोठ्या नगरांमधील दरहजारी पुरुषांच्या तुलनेत महिलांचे प्रमाण केवळ ९०२ एवढे आहे. ग्रामीण भागाच्या तुलनेत या देशातील तमाम बड्या शहरांमधील घसरलेला मुलींचा जन्मदर, हा कशाचा परिणाम समजायचा एरवी? वर म्हटल्याप्रमाणे हॉंगकॉंग, पटायामध्ये होणारे मुलींच्या जन्माचे स्वागतही, तेथील समाजाच्या हीन अभिरुचीची, विचारांच्या नीच दर्जाचीच फलश्रृती आहे. त्यामुळे केवळ दुर्गम, ग्रामीण भागातील माणसंच मागासलेली असल्याचा समज करून घेण्याचे कारण नाही. वर्तणुकीतून सिद्ध होणारे विचारांचे मागासलेपण तर दिल्ली, मुंबई, हॉंगकॉंग, पटायामध्येही आहे. पुढारलेपण मिरविणार्‍या या समाजाला मुलींचा जन्म नेमका का नको असतो, याचाही विचार झालाच पाहिजे कधीतरी. कधीतरी आम्हीही समजून घेत हे म्हटलं पाहिजे की, अंजुम तुम अपने शहरके लडकोसे ये कहो पैरो की बेडीयां नाही, पायल है लडकीया राणीच्या पोटी मुलगी जन्माला आली की, या कानाची खबर त्या कानाला लागणार नाही अशा बेताने, झाकलेल्या माठात तो जीव ठेवून सूर्योदयापूर्वी दूर कुठे तरी नेऊन पुरण्याची कधीतरी ऐकलेली कहाणी धादांत खोटी असावी असं सारखं वाटत राहायचं परवा परवापर्यंत. माणसं एवढी थोडीच निष्ठूर असू शकणार आहेत, हा ओघानं डोकावणारा प्रश्‍न, तो समज खोटा ठरविण्यासाठी धडपडायचा. पण, परवा सोमलगुड्यातील ती घटना कानावर पडली अन् मातीत पुरल्या जाणार्‍या झाकलेल्या माठातील जीवंत मुलीची कहाणी खोटी ठरविण्याचे कारणच गवसेनासे झाले...

Saturday, November 4, 2017

तो वेडा, वाचायला लावतोय् लोकांना!

एकदा रात्री एक फोन आला. फोन एका युवतीचा होता. अमृतच्या आवाजाचा गोडवा अजूनही तिच्या कानात रुंजी घालत असावा बहुधा. ती म्हणाली, मी तुझ्या क्लिप्स नेहमी ऐकते. छान असतात. तुझ्यामुळे कितीतरी पुस्तकं मला ऐकता आली आहेत. तिचा ‘ऐकण्या’वरचा भर ऐकून तो म्हणाला. अगं नुसतं ऐकतेस काय, कधीतरी वाचतही जा...! ती म्हणाली, अरे मी आंधळी आहे. मला वाचता नाही येत... म्हणूनच ‘ऐकते’ मी, तू पाठविलेली पुस्तकं. एकच क्षण... तिचं ते एकच वाक्य... काळीज चिरून गेलं... क्षणभर थबकलाच तो. आणि आता भारतातल्या सुशिक्षित अंधांना ही पुस्तकं कशी वाचता येतील यासाठीची धडपड सुरू केलीय् त्यानं... तो म्हणतो आता मी एकही पैसा कमावत नाही. तरीही समाधान मात्र लाखमोलाचं मिळवतो...
जेमतेम पस्तिशीतला तो तरुण, वाचनसंस्कृती लोप पावत चाललेल्या भारतीय तरुणाईला चक्क वाचनाचं वेड लावतोय्. लोकही वेडे होताहेत त्याच्या त्या आगळ्या प्रयोगानं. त्यासाठी त्यानं भरपूर पगाराची नोकरी सोडली. सीएची प्रॅक्टिस सोडली. आता तो भरपूर पुस्तकं वाचतो. स्वत:साठी नाही, लोकांसाठी. हो! लोकांसाठीच. त्यासाठी त्यानं वाचनासाठीच्या स्वत:च्या आवडीनिवडी बदलल्या. व्यक्तिमत्त्व विकासापर्यंतच मर्यादित असलेल्या त्या विषयांची व्याप्ती एव्हाना त्याच्याही नकळत लव्हस्टोरी, कथा-कादंबर्‍यांपर्यंत येऊन पोहोचली. दर आठवड्यात एक पुस्तक वाचायचं. कुठलंही. अगदी कुठलंही. भारतातल्या टी. रंगराजनपासून तर अमेरिकेतल्या स्टीफन कॉवेपर्यंतच्या कोणत्याही लेखकाचं पुस्तक त्याला भुरळ घालते. पुस्तक हातात पडलं की, झपाटल्यागत पानामागून पानं पलटवत तो पुढे सरकतो. कारण आठवडाभरात ते वाचून पूर्ण करायचं असतं. बरं, पुस्तक नुसतं वाचून संपवणं एवढाच त्याच्या मिशनचा भाग नसतो. नंतर वाचलेल्या पुस्तकाची ‘समरी’ लिहून काढायची. हजारो लोकांना ती व्हाट्‌स ऍप वरून पाठवायची. मग यानं वाचलेल्या शंभर, दोनशे, तीनशे पानांच्या पुस्तकाचं ते छोटेखानी टिपण लोक वाचतात. त्यातून त्यांना त्या पुस्तकाची कल्पना येते. संपूर्ण पुस्तक वाचणं शक्य नसलेल्या लोकांना या सारांशातून पुस्तकाचा आशय कळतो. आतापर्यंत जवळपास चार लाख लोक जुळलेत त्याच्या या ‘मिशन मेक इंडिया रीड’ मध्ये... ठाण्याचा अमृत देशमुख. शिक्षण आणि व्यवसायानं सीए. भरपूर पैसा कमावण्याची ऊर्मी असल्यानं वयाच्या पंचविशीतच त्यानं शिक्षणाला अनुरूप असं, स्टॉक मार्केटमध्ये रीसर्च ऍनालिस्टचं काम सुरू केलं. सुरुवातीला पैसा कमावण्याचं अप्रूप वाटलं. पण काहीच दिवस. मग त्याचं त्यालाच वाटायला लागलं की, अरे, एवढा पैसा कमावूनही आपण जेवतोय् तर तेवढंच जेवढं कालपर्यंत जेवत होतो. आपल्या वैयक्तिक आवडी-निवडीतही त्या पैशांमुळे फार बदल घडून आलेला नाही. मग बदल नेमका घडला कुठे? तर, त्याच्या ध्यानात आलं की, बदल आपल्या आनंदाच्या परिमाणात घडून आलाय्. इतका पैसा कमावला तरी तो आनंद, ते समाधान काही केल्या मिळत नाहीय्. मग अमृतनं, खोर्‍यानं पैसा देणारा तो जॉब एका क्षणात सोडला. मग भटकंती सुरू झाली, सॅटिस्फॅक्शन देऊ शकणार्‍या नव्या जॉबची. सुरुवातीला गरजू तरुणांसाठी सीएची शिकवणी विनामूल्य सुरू केली. अमृतला वाचनाची आवड तशी सुरुवातीपासूनच. त्या वेळी स्टीफन कॉवेच्या ‘सेव्हन हॅबीट्‌स ऑफ इफेक्टिव्ह पीपल’ या पुस्तकाचं वाचन चाललेलं होतं. एक दिवस एका मित्रासोबत चित्रपट बघण्याचा प्लान झाला. तिकीट आधीच बूक केलं होतं. दोघेही चित्रपटगृहात पोहोचले तेव्हा चित्रपट सुरू व्हायला अजून बराच अवकाश असल्याचं लक्षात आल्यावर मित्राबरोबर गप्पा सुरू झाल्या. साहजिकच गप्पांचा विषय, त्याचं वाचन सुरू असलेल्या ‘सेव्हन हॅबीट्‌स’वर येऊन पोहोचला. तेवढ्या अल्पशा वेळात त्या पुस्तकातील मजकुराचं वर्णन अमृतनं ज्या पद्धतीनं केलं ते अक्षरश: कल्पनेपलीकडचं होतं. तो मित्र तर ती इत्थंभूत माहिती ऐकून भारावून गेला होता. हा प्रयोग तू इतर पुस्तकांबाबत का करीत नाहीस, असा सवालच त्यानं विचारला. अरे, वाचन किती कमी झालंय् आताशा लोकांचं. काहींना वाचनाची आवड असली, तरी सवड होत नाही कामाच्या धबडग्यात. अशात एखाद्या पुस्तकाचा सारांश अशा पद्धतीनं थोडक्यात जर का त्यांच्यासाठी उपलब्ध झाला, तर लोक आवर्जून वाचतील ते. आणि महत्त्वाची, वाचनीय असूनही धूळ खात पडून राहिलेली कित्येक दुर्लक्षित पुस्तकं लोकांपर्यंत पोहोचवता येतील या निमित्तानं. एवढं सांगून तो मित्र तर चित्रपटाच्या मूडमध्ये गेला, पण चित्रपटगृहात शिरूनही अन् स्क्रीनवर चित्रपट सुरू असूनही अमृत मात्र त्यात रमू शकला नव्हता. एका अभिनव कल्पनेनं त्याला पुरतं अस्वस्थ करून सोडलं होतं. इतकं, की त्या दिवशी कुठलीशी खोटी सबब सांगून, चित्रपट अर्ध्यात सोडून तो माघारी वळला होता. ती कल्पनाच इतकी भन्नाट होती की, त्या रात्री अमृतला झोपच लागेना. खरंतर पुस्तकं वाचण्याचा संकल्प यापूर्वीही केला होता. कित्येकदा. विशेषत: नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येला तर तो संकल्प हमखास व्हायचा अन् हवेतही विरायचा कधीच. आपण स्वत:साठी वाचू शकलो नाही, ती सारी पुस्तकं आता दुसर्‍यांसाठी वाचायची, असा निर्धार मनाशी झाला तेव्हा कुठे शांत झोप लागली. दुसर्‍याच दिवशी एक मिशन मनात तयार झालं. ‘मिशन मेक इंडिया रीड...’ भारताला वाचायला लावण्याचं ध्येय समोर ठेवून ठाण्यातला अमृत देशमुख नावाचा तरुण सरसावला होता. टी-२०, फास्ट फूड, शब्दांचे शॉर्ट कट्‌स, असा वेगवान आणि थोडक्यातचा प्रघात सर्वदूर प्रचलित होत असताना पुस्तक वाचनाच्या क्षेत्रातही त्याचा प्रयोग साकारायला काय हरकत आहे? झालं. ठरलं. पहिलं पुस्तक वाचलं. त्याचा सारांश तयार केला आणि प्रयोग म्हणून आपल्या संपर्कातल्या पन्नासेक जणांना त्यानं तो व्हॉट्स् ऍपवर पाठवला. त्या पन्नास जणांनी त्यांच्या मित्रांना, त्यांनी त्यांच्या... असं करत करत हा पहिलाच प्रयोग हजारेक लोकांपर्यंत पोहोचला. त्या अनाहूत प्रयोगाला मिळालेला प्रतिसाद उदंड म्हणावा असाच होता. त्यातून मिळालेली ऊर्जा पुढील प्रवासाठीची दिशा आणि प्रेरणा देणारी होती. ‘मेक इंडिया रीड’ मिशनलाही हळूहळू आकार प्राप्त होऊ लागला. अमृतचे काम आपसूकच वाढले होते. दर आठवड्यात एका पुस्तकाचा फडशा पाडायचा. मग त्यातील मजकुराचा सारांश शब्दबद्ध करायचा. तो हजारो लोकांना पोस्ट करायचा... कामं काय थोडी होती या उपक्रमात? पण, सहज म्हणून एकदा आढावा घेतला तर लक्षात आलं की, पुस्तकं वाचण्याचा कंटाळा करणारी माणसं वेगवेगळी कारणं पुढे करत, हा सारांश वाचायचाही कंटाळाच करताहेत. यावर उपाय शोधायला हवा असं वाटू लागलं. या गरजेतून एका नव्या कल्पनेचा जन्म झाला. आता पुस्तकांचा लिखित स्वरूपातील सारांश ऑडिओ क्लिपच्या माध्यमातूनही पाठवला जाऊ लागला. महिलांना स्वयंपाक करता करता, कुणाला गाडीत, बसमध्ये... असे कुठेही, सवडीनुसार पुस्तक ‘ऐकण्याची’ सोय उपलब्ध झाली. या प्रयोगानं तर धमालच केली. मिशनमध्ये सहभागी होण्यासाठी लोकांच्या उड्या पडू लागल्या. दरम्यान, व्हॉटस् ऍपवरून मजकूर पाठविण्याच्या मर्यादेचे तांत्रिक कारणही आडवे आले. काही काळासाठी त्याचा नंबरही ब्लॉक करण्यात आला. पण, आयटी क्षेत्रातील काही तज्ज्ञ मित्रांच्या मदतीने त्यावरचा उपाय शोधला गेला. ‘बुकलेट’ नावाच्या मोबाईल ऍपची निर्मिती, ही या समस्येच्या उत्तराच्या शोधादाखल झालेल्या धडपडीची देण... ऑडिओ क्लिप आणि ऍपमुळे वाचलेली पुस्तकं लोकांपर्यंत पोहोचविणं सोपं झालं आणि या मिशनशी जोडल्या गेलेल्यांची संख्याही त्यामुळे वाढली. या कामी मदत करण्याकरिता अमृतच्या साथीला फरीद सय्यद आणि सुशील धनावडे यासारखे मित्र उभे राहिले. हातातल्या नोकर्‍या सोडून... पुस्तकं निवडण्यापासून तर ऑडिओ क्लिप तयार करण्यापर्यंतच्या प्रक्रियेत त्याला मदत करू लागले. या मिशनची कीर्ती ऐकल्यानंतर अमृतच्या ठाण्याच्या पत्त्यावर स्वत:हून पुस्तकं पाठवून देणार्‍या लेखक, प्रकाशकांची संख्याही एव्हाना वाढली. अगदी, घरात लायब्ररी तयार व्हावी इतकी... एकदा रात्री एक फोन आला. फोन एका युवतीचा होता. अमृतच्या आवाजाचा गोडवा अजूनही तिच्या कानात रुंजी घालत असावा बहुधा. ती म्हणाली, मी तुझ्या क्लिप्स नेहमी ऐकते. छान असतात. तुझ्यामुळे कितीतरी पुस्तकं मला ऐकता आली आहेत. तिचा ‘ऐकण्या’वरचा भर ऐकून तो म्हणाला. अगं नुसतं ऐकतेस काय, कधीतरी वाचतही जा...! ती म्हणाली, अरे मी आंधळी आहे. मला वाचता नाही येत... म्हणूनच ‘ऐकते’ मी, तू पाठविलेली पुस्तकं. एकच क्षण... तिचं ते एकच वाक्य... काळीज चिरून गेलं... क्षणभर थबकलाच तो. आणि आता भारतातल्या सुशिक्षित अंधांना ही पुस्तकं कशी वाचता येतील यासाठीची धडपड सुरू केलीय् त्यानं... तो म्हणतो आता मी एकही पैसा कमावत नाही. तरीही समाधान मात्र लाखमोलाचं मिळवतो...

Friday, September 15, 2017

‘संधिसाधू’ अंनिस आणि ‘हतबल’ सारस्वत…

संबंध काय हो अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा मराठी साहित्य संमेलनाशी? ते सांगतील आता संमेलनं कुठे घ्यायची ते? अन् त्यांच्या तालावर नाचणार आहे महामंडळ? हे संमेलन आहे की तमाशा? साहित्यिकांच्या आपसातल्या वादातूनच घडीभराची फुरसत मिळत नाही इथे कुणाला अन् आता अशा उपर्‍या संस्थांनी प्रसारमाध्यमांचा ‘वापर’ करून आगीत तेल ओतण्याचा प्रकार केला, तर त्याची एवढी गंभीर दखल घेतली जातेय् इथे? अशी कुठलीही मागणी करायला टीव्हीच्या पलीकडे एक अधिकृत मंच असतो. संबंधित संस्थेचे अधिकृत कार्यालय असते. तिथे काम करणारे पदाधिकारी असतात, हे ठाऊक नाही अनिंसच्या नेत्यांना? त्यातले काहीएक न करता, कुठलाही अधिकृत लेखी अर्ज कुठल्याही अधिकृत पदाधिकार्‍याकडे न करता, आयोजकांशी एका शब्दाने न बोलता जेव्हा श्याम मानवांसारखे लोक केवळ आणि केवळ कॅमेर्‍यापुढेच ही मागणी रेटून धरतात, या जगावेगळ्या मागणीची ‘ब्रेकिंग न्यूज’ करणार्‍या एकाही शहाण्याला, याबाबत संबंधितांकडे लेखी मागणी का करीत नाही, असा साधा प्रश्‍नही मानवांना विचारावासा वाटत नाही, संमेलन या आश्रमातही होऊ शकते, याची पूर्ण कल्पना असतानाही दबा धरून राहिलेले अनिंसचे नेते स्थळाची घोषणा होताच अचानक हल्ला केल्याप्रमाणे आरडाओरड करीत सुटतात, तेव्हा त्यातून ध्वनित होणारा राजकारणाचा गंध सुसह्य नसतो. आज संपूर्ण बुलडाणा परिसरात असलेली या आश्रमाची प्रतिमा खोटी? आश्रमाच्या कार्याबाबत लोकांच्या मनात असलेली आस्था खोटी अन् फक्त श्याम मानव म्हणतात तेवढंच खरं? 
आपल्या देशातल्या काही हुशार मंडळींना प्रसिद्धीचे तंत्र अगदी छान साधले आहे. शासकीय पुरस्कारातले पैसे ठेवून घेत, रिकामी पदकं परत करून ‘पुरस्कार वापसी’ची नौटंकी करणारी स्वयंघोषित पुरोगामी जमात असो, की मग यंदाच्या मराठी साहित्य संमेलनाच्या स्थळावरून वाद उकरून काढून संमेलनाच्या आयोजनाला नख लावणारे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे श्याम मानव, ही याच धाटणीतली मंडळी म्हटली पाहिजे. म्हणजे कसं बघा, हे साहित्य संमेलन कुठे व्हावं, या दृष्टीने ज्या स्थळांची चर्चा गेले कित्येक दिवस सुरू राहिली होती, त्यात बुलडाणा जिल्ह्यातल्या हिवरा आश्रमाचा स्पष्ट उल्लेख होता. स्थानांची यादी जगजाहीर झाली होती. पण, त्या वेळी कुणीही आश्रमातील संमेलनावरून आक्षेप नोंदवला नाही. संबंधितांना एखादे निवेदन देऊन, सारस्वतांची मांदियाळी जमविण्यासाठी हे स्थान योग्य ठरणार नाही, असे मतही कुणी व्यक्त केले नाही किंवा तिथे संमेलन आयोजित करू नये, अशी मागणीही कुणी तोवर केली नाही. सारे कसे चिडिचूप होते! अगदी दिल्ली, बडोदा आणि हिवरा आश्रमाच्या भेटीचा, स्थळपाहणीचा कार्यक्रम पूर्ण होईपर्यंतच्या तीन महिन्यांच्या काळातही कुणी आक्षेपाचे अवाक्षरही काढले नाही. पण, जशी साहित्य संमेलनाच्या स्थळाची घोषणा झाली, तसे श्याम मानव खडबडून जागे झाले! काही वर्षांपूर्वी ज्यावरून न्यायालयाने कानउघाडणी केली होती, आश्रमाची बदनामी न करण्याविषयी स्पष्टपणे सांगितले होते, नेमके तेच करण्याची घिसाडघाई करत ते सरसावले. पूर्वी कधीतरी केलेल्या आपल्या जुन्याच आरोपाचे तुणतुणे वाजवत, मानवांनी हे संमेलन हिवरा आश्रमात होऊ नये, अशी मागणी प्रसारमाध्यमातून सुरू केली. हो! प्रसिद्धी तेथूनच प्राप्त होऊ शकते ना! नाहीतर, अशा मागणीचा रीतसर अर्जतरी त्यांनी, या संदर्भातील निर्णय घेण्याचा अधिकार असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाकडे करायला हवा होता. पण, तिकडे केलेल्या अर्जावर कार्यवाही होऊन तो मान्य झाला अन् हे स्थळ समजा रद्दही झाले असते, तरी त्याचे श्रेय अंधश्रद्धा निर्मूलन समितीला थोडीच मिळाले असते! असा तीन दिवसांत सार्‍या महाराष्ट्रात गाजण्याचा योग जुळून येणेही जरासे दुरापास्तच होते. त्यामुळे फुकटच्या प्रसिद्धीचा हा सोपा मार्ग त्यांनी स्वीकारला. बाबा कसे बोगस अन् आश्रमातून कसा व्यापार चालतो, हे पालूपदही सुरूच राहिले त्यांचे. या सर्व प्रकरणात अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ अतिशय संशयास्पद रीत्या सावध आणि योजनाबद्ध पद्धतीने मौन राहिले. नव्हे, दुरून तमाशा बघत राहिले. आश्रमातल्या हळव्या कार्यकर्त्यांनी मात्र या तद्दन फालतू वादात पडण्यापेक्षा आयोजनातून माघार घेणे अधिक पसंत केले. त्यांनी स्वत:हूनच तशी घोषणा करून टाकली. दुर्दैवाने, त्यांच्या समंजस भूमिकेचे कौतुक होण्यापेक्षा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचीच भलावण झाली. त्याचे नेते अकारण फुशारक्या मारू लागले. विजयाच्या तोर्‍यात शहाणपण शिकवू लागले.
बरं, मराठी साहित्य महामंडळाची भूमिकाही प्रश्‍नचिन्ह उभी करण्यालायकच राहिली आहे. महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशी हेदेखील कधीकाळी श्याम मानवांच्या अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीचा एक भाग होते. यंदाच्या संमेलन स्थळनिश्‍चितीच्या दीर्घ प्रक्रियेत निदान तीन वेळा त्यांनी या आश्रमाला भेट दिली होती. येथील महाराजांबाबतच्या मानवांच्या तेव्हाच्या ‘त्या’ आरोपांबाबत श्रीपाद जोशी अनभिज्ञ होते, असेही नाही. किंबहुना त्यांना त्या आरोपाची पूर्ण कल्पना होती. मग त्यांना का नाही वाटले इथे मराठी साहित्य संमेलन होऊ नये म्हणून? श्याम मानव माध्यमजगताच्या माध्यमातून करीत राहिलेल्या मागणीवर चकार शब्द बोलण्याची गरजही साहित्य महामंडळाच्या एकाही पदाधिकार्‍याला वाटली नाही. उलट, आश्रमाच्या पदाधिकार्‍यांनी स्वत:हून माघार घेऊन प्रश्‍न परस्पर सोडवून टाकला म्हणून सुटकेचा नि:श्‍वास सोडला महामंडळाच्या स्वनामधन्य नेत्यांनी? ‘‘आम्ही तर त्यांना अधिकृत रीत्या आमचा होकारही कळवला नव्हता, पण त्यांनीच स्वत:हून आयोजनाचा प्रस्ताव मागे घेतला,’’ अशी मल्लिनाथी करून, आपला या प्रकरणाशी काडीचा संबंध नसल्याचे ‘दाखवण्याचा’ निलाजरा प्रयत्न करताहेत महामंडळाचे काही पदाधिकारी आता.
संबंध काय हो अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा मराठी साहित्य संमेलनाशी? ते सांगतील आता संमेलनं कुठे घ्यायची ते? अन् त्यांच्या तालावर नाचणार आहे महामंडळ? हे संमेलन आहे की तमाशा? साहित्यिकांच्या आपसातल्या वादातूनच घडीभराची फुरसत मिळत नाही इथे कुणाला अन् आता अशा उपर्‍या संस्थांनी प्रसारमाध्यमांचा ‘वापर’ करून आगीत तेल ओतण्याचा प्रकार केला, तर त्याची एवढी गंभीर दखल घेतली जातेय् इथे? अशी कुठलीही मागणी करायला टीव्हीच्या पलीकडे एक अधिकृत मंच असतो. संबंधित संस्थेचे अधिकृत कार्यालय असते. तिथे काम करणारे पदाधिकारी असतात, हे ठाऊक नाही अनिंसच्या नेत्यांना? त्यातले काहीएक न करता, कुठलाही अधिकृत लेखी अर्ज कुठल्याही अधिकृत पदाधिकार्‍याकडे न करता, आयोजकांशी एका शब्दाने न बोलता जेव्हा श्याम मानवांसारखे लोक केवळ आणि केवळ कॅमेर्‍यापुढेच ही मागणी रेटून धरतात, या जगावेगळ्या मागणीची ‘ब्रेकिंग न्यूज’ करणार्‍या एकाही शहाण्याला, याबाबत संबंधितांकडे लेखी मागणी का करीत नाही, असा साधा प्रश्‍नही मानवांना विचारावासा वाटत नाही, संमेलन या आश्रमातही होऊ शकते, याची पूर्ण कल्पना असतानाही दबा धरून राहिलेले अनिंसचे नेते स्थळाची घोषणा होताच अचानक हल्ला केल्याप्रमाणे आरडाओरड करीत सुटतात, तेव्हा त्यातून ध्वनित होणारा राजकारणाचा गंध सुसह्य नसतो. आज संपूर्ण बुलडाणा परिसरात असलेली या आश्रमाची प्रतिमा खोटी? आश्रमाच्या कार्याबाबत लोकांच्या मनात असलेली आस्था खोटी अन् फक्त श्याम मानव म्हणतात तेवढंच खरं? कशासाठी निर्माण केला जातोय् हा वाद अन् कशासाठी चालला आहे हा थयथयाट? अन् मग हेच दावा करतात पुरोगामित्वाचा? अशा वर्तणुकीतून दहशतवाद पसरविणारे लोक सांगतील सहिष्णुता काय असते ते आणि ते आरोप करतील दुसर्‍यांवर असहिष्णुतेचा?
साहित्याची अनेक संमेलने कुठल्याशा शैक्षणिक संस्थेच्या प्रांगणात होतात. तिथे व्यापारी वृत्तीने काम होत नाही, असा दावा कुणाला करता येईल सांगा? नाशिक येथे झालेल्या साहित्य संमेलनाची मुहूर्तमेढ रोवताना पूजेला बकरा कापला गेल्याची चर्चा तर अजून संपलेली नाही! अनिसंच्या कुण्या पदाधिकार्‍याने आक्षेप नोंदवला होता त्यावर? आळंदीचे संमेलन ज्ञानेश्‍वरमंदिराच्या परिसरात झाले होते. पण, म्हणून धार्मिक परिसरात संमेलन कशाला, असा सवाल नाही उपस्थित केला कुणी अन् हिवरा आश्रमात संमेलन होऊ घातले तर एवढा गहजब? जे महाराज आज हयात नाहीत, ज्यांच्यावरील आरोपांबाबत न्यायालयाने निर्णय देऊन झाला आहे, इतकेच काय, या आश्रमाविरोधात गेल्या कित्येक वर्षांत खुद्द श्याम मानव वा त्यांचे कार्यकर्तेही एका शब्दाने काही बोलल्याचे ऐकिवात नाही, तिथे संमेलन होऊ घातले, तर लागलीच पोटशूळ उठला यांना? अधिकृत रीत्या तक्रार वा मागणी न करताच पोपटपंची सुरू झाली त्यांची. गरजही काय म्हणा तशी रीतसर तक्रार दाखल करण्याची. तेही, कॅमेर्‍यासमोर असलं भन्नाट काही बरळलं की, लागलीच त्याची ‘बातमी’ करायला धावणार्‍या शहाण्यांचा गोतावळा सभोवताल असताना?
या प्रकाराचा दुरून तमाशा बघणार्‍या महामंडळाच्या पदाधिकार्‍यांना तरी काय म्हणायचे? खरंतर संमेलनाच्या आयोजनासाठीचा एक प्रस्ताव दिल्लीचाही होता म्हणे. सुरुवातीला हर्षोल्हासात आयोजनाची तयारी दर्शविणार्‍या दिल्लीकरांनी नंतर नकार का दिला, याचे कारण सांगू शकेल कुणी? अन् आता हिवरा आश्रमाच्या पदाधिकार्‍यांनी फुकाचा वाद नको म्हणून संमेलनाच्या आयोजनाचा प्रस्ताव स्वत:हून मागे घेतला, तर कुणाच्याच मनाला वेदना होत नाहीयेत्. उलट, साहित्य महामंडळाचे पदाधिकारी ‘सुंठेवाचून खोकला’ गेल्याची भावना व्यक्त करताहेत अन् हे म्हणे ‘स्वाभिमानी सारस्वत’ आहेत…! ‘संधिसाधू’ अनिंसने घातलेला योजनाबद्ध धिंगाणा गुमान दुरून बघणारे हतबल ‘सारस्वत’ किती सहन करणार, हे येणारा काळच सांगेल…!

Friday, September 8, 2017

त्यांना दारू हवी आहे…!

नुसती हाय-वेवरच्या दारू विक्रीवर बंदी घातली कोर्टाने, तर केवढी तारांबळ उडाली लोकांची. महामार्गापासून पाचशे मीटरच्या परिघात तर जणू अवकळा पसरली. त्या कक्षेबाहेरच्या दारू दुकानदारांना मात्र सुगीचे दिवस आलेत मग. आवरता येईना एवढी गर्दी जमू लागली त्या दुकानांसमोर. अगदी, नियंत्रण ठेवायला पोलिस उभे करावे लागावेत इतकी! दारूच्या दुकानासमोर लोक छान शिस्तीत रांगा लावून उभे आहेत. मजूर काय नि साहेब काय, कुठलाच भेद नाही. बडे बडे अधिकारीही कशाचीही पर्वा न करता, लाज न बाळगता आपला नंबर लागण्याची वाट बघताहेत. काऊंटरवर पोहोचले की गुमान पैसे मोजायचे अन् बॉटल घेऊन घराकडे निघायचे. दररोज सायंकाळी हे दृश्य अनुभवले आहे हायवे परिसरातील लोकांनी. काय अस्वस्थता सुरू झाली कोर्टाच्या या निर्णयाने. हाय-वेवरची बंद झालेली दारू दुकाने पुन्हा सुरू व्हावीत म्हणून मतभेद अन् स्पर्धा विसरून एकत्र आले सारे. लॉबी तयार झाली. झालेला निर्णय फिरवण्यासाठी दबावतंत्राचा वापर करण्याचे षडयंत्र रचले गेले. दुकाने बंद झाल्याने रोजगार कसा बुडाला अन् तिथे काम करणारी पोरं कशी उघड्यावर आली, त्यांच्यावर कशी उपासमारीची वेळ आली आहे, याचे किस्से रंगवून सांगू लागले व्यापारी. कधी नव्हे एवढी कणव अचानक दाटून आली त्यांच्या मनात, त्या पोरांसाठी. गरिबांवरील दयेच्या आडून यांच्या धंद्याच्या बाता होऊ लागल्या सरकारदरबारी…


दारूच्या दुष्प्रभावाला, दारुड्या नवर्‍याच्या जाचाला, त्यांच्याद्वारे घातल्या जाणार्‍या धिंगाण्याला कंटाळलेल्या महिलांनी एकत्र येऊन मागणी केली, तर गावातले दारूचे दुकान बंद करण्याचा कायदा मंजूर होऊन आता तशी बरीच वर्षे झाली आहेत. त्यानंतर कित्येक गावांमधील दारूची दुकाने पन्नास टक्के महिलांच्या मताधिकाराने बंद झाल्याचीही उदाहरणे आहेत. मुजोर दारू दुकानदारांना यानिमित्ताने महिलांची ताकद कळली. पण, परवा काय झाले कुणास ठाऊक, सारी चक्रं उलटी फिरली. चंद्रपूर जिल्ह्यातल्या वहाणगावातील महिलांनी आपल्या गावातलं दारूचं बंद झालेलं दुकान पुन्हा सुरू व्हावं म्हणून आग्रह धरला. तसा ठराव मंजूर केला. आश्‍चर्य आहे ना? महिलांचा आग्रह? तेही दारूचे दुकान सुरू करण्यासाठी? हो! तसे घडले खरे! नंतर कळले की, चंद्रपूर जिल्ह्यातली घोषित दारूबंदी प्रभावीपणे अंमलात येत नसल्याने आणि बंदी असतानाही दारू सर्रास विकली जात असल्याने ती अधिकृतपणेच सुरू करून टाका एकदाची, अशा उपरोधातून या ठरावाची कल्पना उदयाला आली. खरंच तसं घडलं असेल तर ती अजूनच वाईट बाब ठरावी. कोण जबाबदार आहे या परिस्थितीला? चांगल्या उद्देशाने लागू करण्यात आलेल्या दारूबंदीचा फज्जा उडवायला, बंदीमुळे ज्यांचा धंदा प्रभावित झाला ती तमाम व्यापारीवृत्तीची मंडळी विरोधाचा झेंडा उभारून सरसावली असेल, तर ते स्वाभाविक तरी ठरेल एकवेळ. पण पोलिसांचे काय? त्यांना चरायला कुरण मिळावे म्हणून लागू झाली होती का इथली दारूबंदी? इथे तर बंदी काय लागू झाली अन् पोलिसांचीच चांदी झाली! अवैध मार्गाने, नको त्या पद्धतीने, खरी-खोटी अशा सर्व प्रकारची दारू, बंदीनंतर मुबलक प्रमाणात उपलब्ध होत असेल, तर हे अपयश कुणाचे आहे? व्यसनमुक्तीच्या एका चांगल्या सामाजिक उद्देशाने दारूबंदीचा आग्रह धरणार्‍या मंत्र्यांचे? की त्या अंमलबजावणीत खोडा घालणार्‍या यंत्रणेचे? वहाणगावच्या पंचक्रोशीतील महिलांनी परवा मंजूर केलेला ठराव, ही त्या अपयशी यंत्रणेच्या थोबाडीत मारलेली चपराक आहे!
नुसती हाय-वेवरच्या दारू विक्रीवर बंदी घातली कोर्टाने, तर केवढी तारांबळ उडाली लोकांची. महामार्गापासून पाचशे मीटरच्या परिघात तर जणू अवकळा पसरली. त्या कक्षेबाहेरच्या दारू दुकानदारांना मात्र सुगीचे दिवस आलेत मग. आवरता येईना एवढी गर्दी जमू लागली त्या दुकानांसमोर. अगदी, नियंत्रण ठेवायला पोलिस उभे करावे लागावेत इतकी! दारूच्या दुकानासमोर लोक छान शिस्तीत रांगा लावून उभे आहेत. मजूर काय नि साहेब काय, कुठलाच भेद नाही. बडे बडे अधिकारीही कशाचीही पर्वा न करता, लाज न बाळगता आपला नंबर लागण्याची वाट बघताहेत. काऊंटरवर पोहोचले की गुमान पैसे मोजायचे अन् बॉटल घेऊन घराकडे निघायचे. दररोज सायंकाळी हे दृश्य अनुभवले आहे हायवे परिसरातील लोकांनी. काय अस्वस्थता सुरू झाली कोर्टाच्या या निर्णयाने. हाय-वेवरची बंद झालेली दारू दुकाने पुन्हा सुरू व्हावीत म्हणून मतभेद अन् स्पर्धा विसरून एकत्र आले सारे. लॉबी तयार झाली. झालेला निर्णय फिरवण्यासाठी दबावतंत्राचा वापर करण्याचे षडयंत्र रचले गेले. दुकाने बंद झाल्याने रोजगार कसा बुडाला अन् तिथे काम करणारी पोरं कशी उघड्यावर आली, त्यांच्यावर कशी उपासमारीची वेळ आली आहे, याचे किस्से रंगवून सांगू लागले व्यापारी. कधी नव्हे एवढी कणव अचानक दाटून आली त्यांच्या मनात, त्या पोरांसाठी. गरिबांवरील दयेच्या आडून यांच्या धंद्याच्या बाता होऊ लागल्या सरकारदरबारी…
चंद्रपूर जिल्ह्यातल्या दारूबंदीनंतर तरी वेगळे काय घडते आहे? कालपर्यंत ज्यांना राब राब राबवून घेत स्वत:चा व्यवसाय उभा केला, ती पोरं दारूबंदीमुळे बेरोजगार झाल्याचा कांगावा हेच व्यापारी करताहेत. मग बंदीनंतरही दारूचा अवैध व्यापार कसा वाढला, दारूअभावी लोकांचे कसे हाल होताहेत, बंदी कशी अपयशी ठरली, बंदी असूनही शाळकरी पोरांचा वापर करून दारू कशी सर्रास विकली जात आहे, याच्या भडक कथा सांगण्यात हीच जमात पुढे आहे.
बरं, लोकांचीही मानसिकता जगावेगळीच आहे. यांना गावात कुणी दारू पिऊन धिंगाणा घातलेलाही नको. दारू पिऊन नवर्‍यानं बायकोला हाणलेलीही नको अन् या सर्व प्रकारांवर आळा घालण्यासाठी बंदीचा प्रयोग केला, तर त्याचे काही प्रमाणातील दुष्परिणामही वाट्याला आलेले नकोत! अन् तरीही समाज सुधारलेला मात्र हवाय् प्रत्येकालाच.
इंटरनेटमुळे चांगलं-वाईट सगळंच हाताच्या बोटांच्या टोकांवर उपलब्ध झालं आहे. त्याचा उपयोग चांगल्याप्रमाणेच वाईटासाठीही तेवढाच होतो, हेही ठाऊक आहे सर्वांनाच. सारंकाही आपल्या नियंत्रणाबाहेर चाललं असल्याची जाणीवही मन विषण्ण करून जाते कित्येकदा. पण, तरीही ‘आपल्या’ घरातली पोरं त्या वाटेनं जाऊ नये, अशी सुप्त इच्छा असतेच की प्रत्येकाच्या मनात. तेच हुंड्याचं, वेश्यालयांचं अन् तेच दारूचं. पूर्वीच्या तुलनेत आज आपल्या समाजात हुंड्याचे प्रमाण दखल घ्यावी इतके कमी झाले आहे. कायद्याच्या धाकासोबतच वर्षानुवर्षांच्या जनजागृतीचाही तो परिणाम आहे. व्यसनांच्या बाबतीतही स्थिती वेगळी कशी असेल? पंजाबातली तरुणाई आजघडीला पुरती ड्रग्जच्या कह्यात गेली असल्याचे उमजायलाही ‘उडता पंजाब’ पडद्यावर यावा लागला. तेव्हा कुठे समस्येचे गांभीर्य कळले तमाम सुजाण नागरिकांना. चित्रपट बघितल्यावर खाड्‌कन डोळे उघडले सर्वांचे. मग सुरू झाली फुकाची चर्चा.
एकीकडे व्यसनमुक्तीचे गोडवेही गायचे नि दुसरीकडे दारूबंदीला विरोधही करायचा, हे कसे चालेल? मुळात हे दायित्व समाजाचे आहे, हे ध्यानात घेतले पाहिजे. सरकारी यंत्रणेची काम करण्याची स्वत:ची तर्‍हा असते. ती दारूचे परवानेही वाटते आणि व्यसनमुक्तीचे कार्यक्रमही चालवते. महाराष्ट्रात गुटखाबंदी लागू करतानाचा अनुभव सर्वांना ठाऊक आहे. गुटख्याचे कारखाने बंद करणे ही राज्य सरकारच्या अखत्यारीबाहेरील बाब होती. पण, त्यावर या राज्यात बंदी आणणे सरकारच्या हाती होते. तेवढे सरकारने केले. आता पुढची जबाबदारी समाजाची होती. ज्यांचे धंदे गुटख्याच्या भरवशावर चालले होते, त्यांनी या बंदीचे समर्थन करण्याचा प्रश्‍नच नव्हता. पण, समाजही ठामपणे पाठीशी उभा राहिला नाही. उलट तोच ही बंदी अपयशी ठरल्याचे तुणतुणे वाजवीत राहिला. म्हणूनच आज जागोजागी उभ्या असलेल्या पानटपर्‍यांवरून गुटखाबंदीच्या कायद्याची लक्तरे टांगलेली दिसताहेत. चंद्रपूर जिल्ह्यातल्या दारूबंदीचेही काहीसे तसेच होते आहे. काहींना ती बंदी सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नाने अंमलात आली म्हणून यशस्वी झालेली नको आहे, तर काहींच्या धंद्यावरच आच आली म्हणून त्यांचा बंदीविरुद्ध रोष आहे. ते तर बंदीमुळे या जिल्ह्याची रया कशी लयाला गेली आणि सारा परिसर दारूच्या धंद्यांअभावी भकास कसा झाला, हेच पटवून सांगण्यात व्यग्र आहेत. दारूचे सरळ सरळ समर्थन करता येत नाही म्हणून बंदीच्या अपयशाचा पाढा वाचण्यात दिवस घालवताहेत. जगाच्या पाठीवर कुठेतरी दारूबंदी यशस्वी ठरली का, गांधीजींनी तरी आयुष्यात कधी कुठे दारूबंदीची मागणी केली होती, असे नानाविध प्रश्‍न त्यांच्या सुपीक डोक्यात आकारास येऊ लागले आहेत. त्या प्रश्‍नांच्या आडून आपल्या नापाक इराद्यांना आकार देण्याचे निलाजरे प्रयत्न चाललेत सर्वदूर. समाजहिताला मूठमाती देत, दारूवरची ही बंदी यशस्वी होऊ नये यासाठी धडपडणारे लोक, ही संधी साधून खाबुगिरीत रमलेली भ्रष्ट पोलिस यंत्रणा अन् कशाशीच काही घेणेदेणे नसल्यागत दुरून तमाशा बघणारी समाजव्यवस्था… यामुळेच वहाणगावच्या महिलांवर, बंदी अंमलात आणू शकत नसाल तर दारू विक्री सुरू करा, असं म्हणण्याची वेळ आली आहे… धगधगते असले तरी वास्तव हेच आहे…!

Saturday, September 2, 2017

बाबांच्या भक्तांनो…!

इथे भावनिक आवाहन करीत कुणाच्याही भक्तीला साद घालता येते, हा समज खरा की खोटा? सूर अन् ताल भक्तिरसाचाच असला, तरी त्यावर फेर धरताना जराशी सावधगिरी बाळगायला हवी ना लोकांनीही! थेट देव्हार्‍यात कसे कुणालाही स्थान देऊन बसतो आम्ही? अन् असे कसे कुणाच्याही आरत्या ओवाळायला तयार होतात लोक? कालपर्यंत ज्याला डोक्यावर धरून नाचलो, तो ‘आसाराम’ किंवा ‘राम रहीम’ निघाला की मनातल्या श्रद्धेच्या पाऽऽर चिंधड्या उडतात. कुणाच्या तरी हसण्याचा विषय ठरते आमची भावना. आधीच या देशात हिंदूंची श्रद्धा हा खिल्ली उडविण्याचा विषय असतो. कुणी धर्माच्या नावावर बकर्‍या कापल्या काय अन् कुणी येशूच्या नावाचं ताबीज हाताला बांधल्यानं तब्येत सुधारण्याचा दावा केला काय, त्याला आव्हान द्यायला कुणीच उतरत नाही इथे मैदानात. एकदा बड्या शहरातल्या मेडिकल स्टोअर्सचे सर्वेक्षण घ्या. कोणत्या धर्माच्या प्रार्थनाघराशी संबंधित लोक सर्वाधिक कंडोम्स खरेदी करतात, याचा शोध लागेल. पण, त्याबाबत ना हाक ना बोंब! आसारामसारख्या चित्रफितीही जारी होत नाहीत त्यांच्या. त्यामुळे त्यांचे चारित्र्य पांढर्‍या कपड्यांआड दडून जाते… वस्त्रं भगवी असली की मात्र अपेक्षा वाढतात लोकांच्या. हे एका अर्थाने चांगलेही आहे. भगव्याची महती व्यक्त होते त्यातून. त्यामुळे धारण करणार्‍यांनीही कसोटीच मानली पाहिजे ही.

सच्चा डेराचा प्रमुख राम रहीम याने केलेल्या घृणास्पद कृत्याची शिक्षा तब्बल पंधरा वर्षांनी सुनावल्यावरही, पीडितांना न्याय मिळवून दिल्याच्या आविर्भावात स्वत:ची पाठ थोपटून घेणारी न्यायप्रणाली, ‘‘तू जनावरासारखा वागला, तुला माफी नाहीच,’’ असं, इतक्या वर्षांनंतर दिमाखानं त्याच्या तोंडावर सांगणारे न्यायमूर्ती… धर्माच्या नावाखाली उघडलेल्या आश्रमात चाललेले त्याचे उपद्‌व्याप. त्याला बळी पडलेले स्त्री-पुरुष, तरुण-तरुणी… या काळात ‘सच्च्या’ डेर्‍यात निष्पापांचे मुडदे पडल्याचा गंभीर आरोप…. आणि त्याचा गोरखधंदा उघडकीस आल्यानंतर कोर्टानं सुनावलेला फैसला मान्य करायचं सोडून गुरमितच्या समर्थनाचे ओंगळवाणे प्रदर्शन मांडत जाळपोळ करून वस्त्या उद्ध्वस्त करत सुटलेले त्याचे भक्तवजा समर्थक… कुणाला दोष द्यायचा, कुणाचा विरोध करायचा अन् कुणाची बाजू घ्यायची? प्रदीर्घ काळचा अभ्यास आणि कठोर साधनेतून कमावलेल्या आध्यात्मिक बळावर मिळणे अपेक्षित असलेल्या, आश्रमातल्या ‘गाद्यां’वर राम रहीमसारखे लोक विराजमान होत असतील, तर एकदा त्या व्यवस्थेचाच पुनर्विचार झाला पाहिजे. ज्याच्यासमोर शेकडो लोक श्रद्धेनं नतमस्तक होतात अशी पदं कुणाच्या स्वाधीन करायची, ही बाब परंपरागत व्यवस्थेच्या चौकटीतच बंदिस्त राहणार असेल, तर मग न्याय-अन्यायाची भाषा बोलण्याचा अधिकारही उरत नाही कुणालाच. पण, मग आपली न्यायव्यवस्था तरी कशाच्या आधारे पाठ थोपटून घेतेय् स्वत:ची? सादर झालेल्या ज्या तक्रारीचा निवाडा करायला ज्याला एक-दोन नव्हे, तर तब्बल पंधरा वर्षे लागली, ती न्यायव्यवस्था संबंधित पीडितांना न्याय मिळवून देण्याचा दावा तरी कशाच्या आधारावर करतेय्? ती तर तक्रार दाखल झाली म्हणून… अन्यथा चर्चा तरी झाली असती या विषयावर? झाली असती मग राम रहीमला शिक्षा? की संपला असता धर्माच्या आडून चाललेला तमाशा? या प्रकरणी निकाल जाहीर होत असताना ढसाढसा रडत दयेची भीक मागणार्‍या राम रहीमसमोर कोर्ट जी कठोर भाषा बोलू शकले, तेच खडे बोल, कुठलाही अधिकार नसलेली समान्य माणसं कधीच का सुनावू शकली नाही त्याला? हा त्या गादीबद्दल असलेल्या नितांत श्रद्धेचा परिपाक मानायचा, की तेवढा दरारा, दहशत अन् मुजोरी होती त्याची?
दीड दशकापूर्वीच्या एका तक्रारीवर आज शिक्षा ठोठावण्यात आल्यानंतर अन्य साध्वींपासून तर सुरक्षारक्षकापर्यंत सारेच कसे पोपटासारखे बोलू लागलेत बघा. बाबांच्या कारनाम्याचे रंगतदार किस्से सार्‍या जगाला सांगण्यासाठी धडपडणारी ही जमात कालपर्यंत का गप्प होती मूग गिळून? हा बाबा रोज कुठल्यातरी शाळकरी पोरीला आश्रमात आणून तिची अब्रू लुटायचा म्हणे! कित्येक तरुणांना त्यानं नपुंसक केलं होतं, हे आज लोकांदेखत बेधडक सांगण्याची हिंमत बांधणारी माणसं इतकी वर्षं हा तमाशा उघड्या डोळ्यांनी बघत का राहिली होती? आश्रमातले संन्यासी, कर्मचारी, दरबारात येणारे भक्त, ज्यांच्यावर अत्याचार झालेत त्या मुलींचे पालक… यापैकी कुणालाच धाव घ्यावीशी वाटली नाही कधी प्रशासनाकडे? बाबांच्या दहशतीचा परिणाम, की प्रशासनावरचा अविश्‍वास होता तो?
राम रहीमसारखे लोक उगाच मोठे, गब्बर अन् मुजोर होत नाहीत. सभोवतालची माणसंच हातभार लावत त्यांना मोठं करत असतात. प्रत्यक्षात जे नाही अशा त्याच्या प्रतिमेचे स्तोम माजवत त्याच्या थोरवीचा आभास निर्माण करीत असतात. शिवाय, आपल्या अपार भक्तीचा नजराणा सादर करत कुणासमोरही माना तुकविणार्‍या भक्तांचीही महती ती काय वर्णावी? एका बलात्कार्‍याला दोषी ठरवताच आपला क्षोभ व्यक्त करण्यासाठी जाळपोळ करून सार्वजनिक संपत्तीची नासधूस करणारे, वस्त्या उद्ध्वस्त करत सुटलेले लोक खरंच भावभक्तीच्या मार्गाने निघाले आहेत? की हा तमाशा घडवून आणणारा समूह जरासा निराळाच आहे? बलात्कारी असला, लोकांचे शोषण करीत असला, तरी राम रहीमचे त्या गादीवर असण्यातच आपलाही फायदा असल्याची पुरती जाण असलेल्या टोळीने तर हा विध्वंस घडवून आणला नाही ना, भक्तांच्या नावावर? कारण या कृत्याचा ठपका एकदा का भक्तांवर बसला की, बाबाचं मोठेपणही आपसूकच अधोरेखित होतं अन् मग हवा तो धिंगाणा घालायला आपण मोकळे, हे कळायला काही फार हुशार असावे लागण्याची गरज नाही. परवा कोर्टाचा निर्णय घोषित झाल्यानंतर पंजाब- हरयाणात घातला गेलेला हैदोस नेमका ‘सच्च्या’ भक्तांनी घातला की ‘डेरा’च्या लाभात अन् बाबाच्या पापातही भागीदार असलेल्या काही मोजक्या लोकांनी रचलेल्या षडयंत्राचा तो परिपाक होता, याची शहानिशा होण्याची गरज आहे. खरंतर, शक्यता दुसर्‍या शक्यतेचीच अधिक आहे. पण, बदनामी मात्र सच्च्या भक्तांच्या वाट्याला आली आहे. आपल्या समाजातील एक वर्गतर या जाळपोळीचे निमित्त साधून, एकूणच भक्तांच्या भक्तीवर प्रश्‍नचिन्ह उभे करून बसला आहे. त्यांच्यावर तोंडसुख घेणे चालले आहे त्या समूहाचे. अगदी जाणीवपूर्वक. त्यांना उत्तर देण्यासाठी म्हणून नाही, पण या घटनेचा बोध खर्‍या भक्तांनी घेणेही गरजेचे आहे. आपल्या भावभावनांचा कुणी असा बाजार मांडणार असेल, तर त्याला तो मांडू द्यायचा की नाही, हे ठरवण्याचा अधिकार तरी त्यांचा स्वत:चा असावा ना? अगदी परवा परवापर्यंत टीव्हीवरच्या ज्यांच्या प्रवचनाने बहुतांश लोकांच्या दिवसाची सुरुवात व्हायची, ज्यांच्या रसाळ वाणीने भारावलेल्या वातावरणात रममाण होण्याकरिता लाखोंच्या गर्दीत आपले स्थान अबाधित राखण्याकरिता कायम धडपडले, घरातल्या देव्हार्‍यात परंपरागत देवी-देवतांसोबत या संतांच्या तस्बिरींना स्थान देऊन त्यांच्या आरत्या ओवाळल्या, त्या मंडळींच्या चारित्र्यावर उडत असलेले शिंतोडे मनाला खचीतच वेदना देणारे आहेत. स्त्रियांचे शोषण केल्याच्या आरोपाखाली त्यांचे कारागृहातले वास्तव्य तर अजूनच दु:खदायक आहे.
राम रहीमला दोषी ठरविण्याचा निर्णय जाहीर झाल्यानंतर पंचकुला, सिरसामध्ये उसळविण्यात आलेला हिंसाचार, करण्यात आलेली जाळपोळ ही परमेश्‍वराच्या अस्तित्वावर अगाध श्रद्धा असलेल्या ‘सच्च्या’ भक्तांनी केली नसेल, याबाबतची जनमानसातली खात्री दृढ होईलच कधीतरी, पण तो प्रकार घडला या भक्तांच्याच नावाने, हे वास्तव कसे नाकारायचे? हे असे घडू शकले, याला कारण भक्तांची आंधळी भावना आहे? इथे भावनिक आवाहन करीत कुणाच्याही भक्तीला साद घालता येते, हा समज खरा की खोटा? सूर अन् ताल भक्तिरसाचाच असला, तरी त्यावर फेर धरताना जराशी सावधगिरी बाळगायला हवी ना लोकांनीही! थेट देव्हार्‍यात कसे कुणालाही स्थान देऊन बसतो आम्ही? अन् असे कसे कुणाच्याही आरत्या ओवाळायला तयार होतात लोक? कालपर्यंत ज्याला डोक्यावर धरून नाचलो, तो ‘आसाराम’ किंवा ‘राम रहीम’ निघाला की मनातल्या श्रद्धेच्या पाऽऽर चिंधड्या उडतात. कुणाच्या तरी हसण्याचा विषय ठरते आमची भावना. आधीच या देशात हिंदूंची श्रद्धा हा खिल्ली उडविण्याचा विषय असतो. कुणी धर्माच्या नावावर बकर्‍या कापल्या काय अन् कुणी येशूच्या नावाचं ताबीज हाताला बांधल्यानं तब्येत सुधारण्याचा दावा केला काय, त्याला आव्हान द्यायला कुणीच उतरत नाही इथे मैदानात. एकदा बड्या शहरातल्या मेडिकल स्टोअर्सचे सर्वेक्षण घ्या. कोणत्या धर्माच्या प्रार्थनाघराशी संबंधित लोक सर्वाधिक कंडोम्स खरेदी करतात, याचा शोध लागेल. पण, त्याबाबत ना हाक ना बोंब! आसारामसारख्या चित्रफितीही जारी होत नाहीत त्यांच्या. त्यामुळे त्यांचे चारित्र्य पांढर्‍या कपड्यांआड दडून जाते… वस्त्रं भगवी असली की मात्र अपेक्षा वाढतात लोकांच्या. हे एका अर्थाने चांगलेही आहे. भगव्याची महती व्यक्त होते त्यातून. त्यामुळे धारण करणार्‍यांनीही कसोटीच मानली पाहिजे ही. तरुणाईसमोर बोलताना एकदा अण्णा हजारे म्हणाले होते, ‘‘ब्रह्मचर्य हे व्रत आहे. साधना आहे. दुधारी तलवार आहे. त्याचा स्वीकार करताना दहा वेळा विचार करा. समाजसेवा करायला ते व्रत स्वीकारलंच पाहिजे असा आग्रह नाही. त्यामुळे नच जमलं तर सोडून द्या. पण, स्वीकार करून त्याला उणेपण आणू नका…’’
जे अण्णांना कळते, ते अध्यात्माचा कळस गाठल्याचा दावा करणार्‍यांना कळत नसेल, भक्तांचा आडोसा घेऊन तेच ब्रह्मचर्याची खिल्ली उडवीत असतील, तर मग या प्रकारावर आळा घालण्याची जबाबदारी भक्तांनीच स्वीकारली पाहिजे…

Friday, August 18, 2017

व्वा! अशोकराव!

राजमान्य राजेश्री. पत्र लिहिण्यास कारण की, परवा आपण एक भलामोठा विनोद केल्याचे समजले. दूऽऽर राजधानीत केलेल्या त्या विनोदावर सारा महाराष्ट्र खळाळून हसला म्हणे! छान टाईमपास झाला बघा! तसेही कॉंग्रेसच्या नेत्यांना आता तेवढेच एक काम राहिले असल्याचे आमचा बबन म्हणाला. बबन! आमचा गडी हो! इतक्यात लयच बिघडलाय् ताल त्याचा. चार पेपर वाचून, दोन-चार चॅनेल्सवर चालणार्‍या कुठल्याही विषयावरच्या निरर्थक चर्चा ऐकून खूप हुशार समजायला लागलाय् स्वत:ला. त्यामुळे, त्याचं म्हणणं तुम्ही नका घेऊ फारसं मनावर. चव्हाण काय नि ओबामा काय, सर्वांनाच फैलावर घेतो तो अलीकडे. तर सांगायचा मुद्दा असा की, सर्वप्रथम आपण केलेल्या ‘त्या’ धाडसी विधानाबद्दल आपल्याला त्रिवार कुर्निसात! खरं तर भाऊ, जाहीर सत्कारच व्हायला हवा तुमचा. तोही भर चौकात. म्हणजे काय? व्हायलाच हवा. केवढ्या त्वेषाने वार केलेत तुम्ही परवा मोदी सरकारवर. म्हणालात, हे सरकार खादाड आहे. भ्रष्टाचारी आहे. ‘‘ना खाऊंगा ना खाने दुंगा’’ असं म्हणत सारेच खाताहेत्… व्वा! मानलं बुवा तुम्हाला. खरं सांगतो अशोकराव, ऊर अभिमानानं भरून आला बघा, तुमचा तो आवेश बघून. आठवतं? आदर्श घोटाळ्यात, शहीद सैनिकांचे नाव घेऊन मुंबईत निर्माण केलेल्या एका फ्लॅट स्कीममध्ये आपल्या जवळच्या नातवाईकांना फ्लॅटस् मिळवून दिल्यामुळे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता तुम्हाला. नाहीच आठवणार तुम्हाला ते… पण, क्षणभर आम्हालाही विसर पडला बघा त्या घटनेचा, तुमचे कालचे बोलणे ऐकून. आपण केलेले कारनामे विसरूनच समोरच्यावर वार करायचे असतात म्हणे राजकारणात? तुम्ही तर काय राजकारणाचा वारसा घेऊनच जन्माला आला आहात. त्यामुळे स्वत: केलेला आदर्श घोटाळा पदराआड दडवून, जेव्हा तुम्ही मोदी सरकारवर वार करायला आवेशानं तलवार उपसली, तेव्हा तुमच्या हिमतीला तर दादच द्यायला हवी. हो ना? तेव्हा अशोकराव, सलाम तुमच्या त्या करारी बाण्याला… अन् स्वत: घातलेला गोंधळ बेमालूमपणे विसरून जाण्याच्या तुमच्या त्या शैलीलाही…
मा. अशोकराव चव्हाण, 
माजी मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, नांदेड.
ह. मु. मुंबई.
सप्रेम नमस्कार!
राजमान्य राजेश्री. पत्र लिहिण्यास कारण की, परवा आपण एक भलामोठा विनोद केल्याचे समजले. दूऽऽर राजधानीत केलेल्या त्या विनोदावर सारा महाराष्ट्र खळाळून हसला म्हणे! छान टाईमपास झाला बघा! तसेही कॉंग्रेसच्या नेत्यांना आता तेवढेच एक काम राहिले असल्याचे आमचा बबन म्हणाला. बबन! आमचा गडी हो! इतक्यात लयच बिघडलाय् ताल त्याचा. चार पेपर वाचून, दोन-चार चॅनेल्सवर चालणार्‍या कुठल्याही विषयावरच्या निरर्थक चर्चा ऐकून खूप हुशार समजायला लागलाय् स्वत:ला. त्यामुळे, त्याचं म्हणणं तुम्ही नका घेऊ फारसं मनावर. चव्हाण काय नि ओबामा काय, सर्वांनाच फैलावर घेतो तो अलीकडे. तर सांगायचा मुद्दा असा की, सर्वप्रथम आपण केलेल्या ‘त्या’ धाडसी विधानाबद्दल आपल्याला त्रिवार कुर्निसात! खरं तर भाऊ, जाहीर सत्कारच व्हायला हवा तुमचा. तोही भर चौकात. म्हणजे काय? व्हायलाच हवा. केवढ्या त्वेषाने वार केलेत तुम्ही परवा मोदी सरकारवर. म्हणालात, हे सरकार खादाड आहे. भ्रष्टाचारी आहे. ‘‘ना खाऊंगा ना खाने दुंगा’’ असं म्हणत सारेच खाताहेत्… व्वा! मानलं बुवा तुम्हाला. खरं सांगतो अशोकराव, ऊर अभिमानानं भरून आला बघा, तुमचा तो आवेश बघून. आठवतं? आदर्श घोटाळ्यात, शहीद सैनिकांचे नाव घेऊन मुंबईत निर्माण केलेल्या एका फ्लॅट स्कीममध्ये आपल्या जवळच्या नातवाईकांना फ्लॅटस् मिळवून दिल्यामुळे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता तुम्हाला. नाहीच आठवणार तुम्हाला ते… पण, क्षणभर आम्हालाही विसर पडला बघा त्या घटनेचा, तुमचे कालचे बोलणे ऐकून. आपण केलेले कारनामे विसरूनच समोरच्यावर वार करायचे असतात म्हणे राजकारणात? तुम्ही तर काय राजकारणाचा वारसा घेऊनच जन्माला आला आहात. त्यामुळे स्वत: केलेला आदर्श घोटाळा पदराआड दडवून, जेव्हा तुम्ही मोदी सरकारवर वार करायला आवेशानं तलवार उपसली, तेव्हा तुमच्या हिमतीला तर दादच द्यायला हवी. हो ना? तेव्हा अशोकराव, सलाम तुमच्या त्या करारी बाण्याला… अन् स्वत: घातलेला गोंधळ बेमालूमपणे विसरून जाण्याच्या तुमच्या त्या शैलीलाही…
काय गंमत आहे बघा, कोळशापासून तर टुजीपर्यंत, भ्रष्टाचाराच्या आरोपांचा डोंगर ज्यांच्या माथ्यावर आहे, ए. राजापासून तर सुरेश कलमाडींपर्यंत अन् डॉ. मनमोहनसिंगांपासून तर खुद्द अशोक चव्हाणांपर्यंत ज्या पक्षाचे लोक आजही आरोपीच्या पिंजर्‍यात उभे आहेत, त्या पक्षाला आणि त्याच्या नेत्यांना जर आता भ्रष्टाचाराचा वीट आला असेल, तर हा काळाचा महिमा म्हणायचा की सत्ता हातून गेल्यानंतर सुचू लागलेले शहाणपण म्हणायचे, हा तर प्रश्‍नच आहे. पण, ज्या पद्धतीने या पक्षाचे लोक मोदींवर टीकेची बरसात करत सुटलेत अन् भ्रष्ट कारभाराविरुद्धचा त्यांच्या मनातला तिटकारा ज्या तर्‍हेने व्यक्त होतोय् तो बघितल्यावर, सत्तेत असताना आम जनतेच्या भावभावनांचे लचके तोडणारी जमात सत्तेविना कासावीस होत अलीकडे थेट हरीश्‍चंद्राचाच अवतार धारण करू लागलीय् की काय, असा प्रश्‍न पडतो. मुख्यमंत्री असताना पदाचा गैरवापर करून ज्यांना आदर्श इमारतीत फ्लॅट मिळवून दिला, त्या सासूबाईंना ‘दूरचे नातेवाईक’ संबोधणारे तुम्ही अशोकराव! तुम्हाला केव्हापासून भ्रष्टाचारमुक्तीची स्वप्नं पडू लागली हो? कॉंग्रेस पक्षातल्या एकाहून एका मातब्बर भ्रष्टाचारी नेत्यांविरुद्ध कधी चकार शब्द काढला नाही तुम्ही अन् भाजपाच्या कथित खाबुगिरीवर तुटून पडण्याइतके बळ एकवटू लागलात अचानक?
बरं ते जाऊ द्या! राजकारणात वावरायचं तर असली पोपटपंची करावीच लागते म्हणतात. पण, तुम्हीच सांगा अशोकराव, मोदी सरकारला फेकू फेकू म्हणून हिणवताना जराशी लाज वाटत नाही काहो तुमच्या पक्षाच्या एकाही नेत्याला? तो प्रसंग आठवतो? विलासराव मुख्यमंत्री होते. एका निवडणुकीत महाराष्ट्रातले भारनियमन पूर्णपणे संपविण्याचे आश्‍वासन वारेमाप देत सुटले होते कॉंग्रेसचे नेते. पण, तो शब्द नंतरच्या काळात पूर्ण करता आला नाही तेव्हा ‘‘निवडणुकीत असली आश्‍वासनं द्यावीच लागतात,’’ असं हसत हसत म्हणणारे विलासराव देशमुख तुमच्याच पक्षाचे होते ना? त्याबाबत तुमचा संताप कधी व्यक्त झाल्याचे ऐकिवात नाही, चव्हाणसाहेब! का? ती लोकांची फसवणूकही नव्हती अन् फेकाफेकी तर मुळीच नव्हती, असा दृढ विश्‍वास झालाय् तुमचा? सत्तेची दालनं, खुर्च्या, लाल दिव्याच्या गाड्या गेल्यापासून बरेच बावचळल्यासारखे वागताहेत कॉंग्रेसचे लोक. बेतालही आणि बेलगामही… खरं तर सत्तेतल्या तुमच्या सहा दशकांशी तुलना करावी इतकी कामं गेल्या तीन वर्षांत मार्गी लागली आहेत. त्याबाबत कौतुकाचे चार शब्द तुमच्या तोंडून निघण्याची शक्यता, तर जणू राजकारणातला अनपेक्षित चमत्कार ठरेल. अहो, गेल्या सात दशकांत कायम सत्ता हाताशी राहिली, सार्‍या सुविधा पायाशी लोळण घेत राहिल्या, निर्णय घेण्याचे अधिकार ताब्यात होते, तरीही या राज्याचा विकास करू शकला नाहीत तुम्ही. त्याची थोडीशी खंत बाळगायचे सोडून, लोक या सरकारला कंटाळल्याची खोटी बतावणी करत निघालात? अरे, ते तर तुमच्या कारभाराला कंटाळले होते. म्हणूनच इथून तिथून सगळीकडून तुम्हाला हद्दपार करताहेत लोक आता. ग्राम पंचायतीपासून तर राज्य सरकारपर्यंत, सर्वदूर भाजपाचे सत्तेत येणे हा काय लोक त्यांना कंटाळल्याचा परिणाम आहे? तुम्हाला तर निवडणुकी जवळ आल्याशिवाय त्या परिसरात जाण्याचीही फुरसत होत नाही हो साहेब! अन् आता निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही शब्द देताहात त्या मिरा भाईंदरच्या विकासाचा? मग इतकी वर्षे तिथला विकास खुंटला त्याला कोण होतं जबाबदार? नरेंद्र मोदी की देवेन्द्र फडणवीस?
तुम्हीच कशाला, सत्ता गमावलेल्या तमाम जनांना आता अचानक तरतरी आली आहे. पुढची अजून कित्येक वर्षे ही सत्तासुंदरी ताब्यात येण्याची शक्यता नसल्याच्या वास्तवाने बेचैन झाला आहात तुम्ही सारे. मग फेकू म्हणून टर उडविण्याचा प्रकार काय किंवा भ्रष्टाचाराचे पालुपद आळवण्याचा डाव काय, असले निलाजरे प्रकार करून दिवस काढणे सुरू आहे तुमचे. त्यातही आदर्श घोटाळ्यात अडकलेले तुमच्यासारखे नेते जेव्हा इतरांवर भ्रष्टाचाराचा आरोप करता ना, तेव्हा तर हसावं का रडावं तेच कळत नाही बघा! अजून सिद्ध झालेला नसतानाही, पदाच्या वापराचा नुसता आरोप झालेल्या माणसाला मंत्रिमंडळापासून दूर ठेवायला लागणारी ताकद कधीतरी सिद्ध करता आलीय् तुम्हाला? अन् तुमच्या पक्षालाही? कलमाडींसारख्या भ्रष्ट नेत्यांची फौज बाळगणारा पक्ष तुमचा. अरे तुमची तर रीतही ए. राजा, लालू प्रसाद यादवांसारख्या भ्रष्टाचार्‍यांना पाठीशी घालण्याची राहिली आहे. तरीही तुम्ही सांगणार, सध्याचे सरकार खाबुगिरी करतेय् म्हणून? अशोकराव, खरंच कीवच केली पाहिजे बुवा तुमच्या विनोदबुद्धीची!
या देशातल्या लोकांना कवडीची अक्कल नसल्याचा गैरसमज करून घेत सत्ता गाजवत राहिलात आजवर. पण लक्षात ठेवा, आता लोक समजदार झाले आहेत. निवडणुकीच्या काळातली तुमची नौटंकी लागलीच ध्यानात येते आता जनतेच्या. म्हणूनच इतके नक्राश्रू ढाळले तरी मतं पदरात पडत नाहीत अन् सत्ताही हाती गवसत नाहीय् तुमच्या. त्यामुळे होणारा त्रागा मग अशा विनोदबुद्धीतून, कीव करावा इतक्या खालच्या पातळीवरून व्यक्त होतो! खरं ना? पण एक सांगू साहेब! सराव करून घ्या आता. कारण भविष्यात हीच वेळ येणार आहे तुमच्यावर…!
आपला,
एक सामान्य नागरिक.

Friday, August 11, 2017

आओ चिनीयों मैदानमें…

 त्या वेळी डॉ. राजेन्द्र प्रसादांच्या पुढाकारातून राष्ट्रसंतांनी घडवला, नेमक्या त्याच चमत्काराची गरज पुन्हा एकदा निर्माण झाली आहे. चिनी वस्तूंवरील बहिष्कार हा कुण्या एका संघटनेचा अजेंडा नाही, ती संपूर्ण भारत देशाची गरज आहे. बळकावण्यासाठी त्यांनी निवडलेल्या स्थानांची नावं काहीशी बदलली आणि म्हणूनच त्यायोगे येणारे काही संदर्भ तेवढे बदलले, बाकी भारताविरुद्धचे त्यांच मनसुबे काल होते तेवढेच आजही तिरकस अन् तितकेच निलाजरे आहेत. युद्धजन्य स्थिती तेव्हाही होती, आजही आहे. ते कालही भारताविरुद्ध दंड थोपटून उभे ठाकले होते अन् आजही त्यांना या देशाविरुद्ध लढण्याची खुमखुमी आहे. अशा वेळी, ‘‘आओ चिनीयों मैदानमें, देख हिंद का हाथ,’’ हे राष्ट्रसंतांचे धारदार शब्दही मैदानावरील लढाई प्रत्यक्षात लढणार्‍या आपल्या सैनिकांना जर युद्ध लढण्याची प्रेरणा देत असतील, तर मग त्याच चीनविरुद्ध सारा भारत देश आपल्या पाठीशी उभा असल्याचे वास्तव काय थरार निर्माण करू शकेल? कल्पनाही करवणार नाही, इतका जबरदस्त परिणाम साधण्याची ताकद त्या एकोप्यात आहे. चीन बलवान आहेच. कदाचित आमच्यापेक्षा काकणभर जास्तच. म्हणूनच त्याची मुजोरी दिवसागणिक वाढते आहे. त्याला केवळ स्वत:लाच भारतीय भूप्रदेशावर कब्जा करायचा नाहीय्, तर पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या भारतीय भूभागाबाबतही त्याची भूमिका भारताच्या विरोधातलीच आहे. या पार्श्‍वभूमीवर,

‘‘उठो अब हिंद के पुत्रो, पुकारे सोच भारतकी
 करो सब संघटन अपना, मचाओ ना ये मत – मत की…’’
हे राष्ट्रसंतांचे आवाहन अगदीच अस्थानी असल्याचे कोण म्हणेल? आणि
 ‘‘गुलामी फिरसे ना आए हमारे प्रिय भारतमेंलगेगा मुंहको काला, खबर सब सोचलो गत की…’’
हा त्यांचा इशाराही आज संदर्भहीन ठरला असल्याचा दावा कुणाला करता येईल इथे?

‘‘लढ जायेंगे, बढ जायेंगे, हम हिम्मतके साथ, 
मजाल क्या है शत्रूकी, धरे हमारा हाथ, 
आओ चिनीयों मैदानमें, देख हिंद का हाथ…’’
बासष्टच्या युद्धात, समोर पराभव दिसत असतानाही कर्तव्यभावनेने लढत राहिलेल्या भारतीय सैन्याचे खचू लागलेले मनोबल सावरण्यात ज्या प्रेरणादायी गीतानं महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती, त्याच्या निर्मितीची कहाणीही तेवढीच रोचक आहे. केवळ सैनिकांचीच नव्हे, तर सीमेवरील गावांत राहणार्‍या नागरिकांची उडालेली दाणादाणही मन विषण्ण करणारी होती. कारभार सांभाळणार्‍या सत्ताधार्‍यांपासून तर रणांगणात लढणार्‍या सैनिकांपर्यंत, सारेच पराभूत मानसिकतेने ग्रस्त होते. अशा वेळी राष्ट्रपतींनी राष्ट्रसंतांना बोलावून घेतले. परिस्थिती आणि परास्त मनं सावरून धरण्याची गरज विशद केली. त्या स्थितीत राष्ट्रसंतांच्या वाणीतून स्फुरलेल्या शब्दांचा मग मंत्र झाला! त्यांनी रचलेली गीतं ओठांवर आली तरी शत्रूंशी लढण्याची प्रेरणा मिळायची. तुकडोजी महाराजांनी त्या काळात ठिकठिकाणी फिरून चीनविरुद्ध केलेला जागर बघितला तर लक्षात येईल की, त्या देशाबाबत स्थिती अजूनही तीच आहे. धमक्या देण्याची त्यांची रीतही तीच अन् गोड बोलून धोका देण्याची तिरपी चालही तीच. भारतीय सीमेत घुसखोरी करून छोट्याछोट्या जागा बळकावयाच्या, तिथे तळ ठोकून उभे राहायचे. स्वत:च्या नकाशात भारताच्या जमिनीचा समावेश करून जगाच्या डोळ्यांत धूळ फेकायची अन् लक्षात आणून दिलं की, ‘चुकलंच बेटं’ म्हणत, चूक सुधारण्याचं जाहीर आश्‍वासन द्यायचं. ते पाळायचं मात्र जाणीवपूर्वक टाळायचं…
वर्षानुवर्षे हेच चाललं आहे. कधी त्यांनी ईशान्य भारताच्या सीमेतला छत्तीस हजार चौरस फुटाचा भाग ‘चुकीनं’ स्वत:च्या नकाशात दाखवला, तर कधी १९५६ मध्ये मान्य केलेल्या मॅकमहोन रेषेची पुढच्या चारच वर्षांत स्वत:च ऐसीतैसी केली! ५० हजार चौरस मैल जागेवर केलेला चिनी दावा कसा फोल आहे, हे सिद्ध करण्याचा भारताचा खटाटोप अजून सुरूच होता, पण बासष्टमध्ये कधी गलवानच्या खोर्‍याकडून, तर कधी लद्दाखकडून, चिनी चढाई सुरू झाली. अतिक्रमण करून बळकावलेल्या जमिनीचा तुकडा सरळ सरळ हाती येत नाही हे बघून लढाईचा मार्ग त्यांनी स्वीकारला होता. वाटाघाटीसाठी आपला प्रतिनिधी चीनमध्ये पाठविण्याच्या, पंडित नेहरूंच्या घोषणेचे तसेच तीनतेरा वाजले होते…
अस्मितेला आव्हान देत भारताला डिवचण्याची त्यांची पद्धत आजही किंचितशीही बदललेली नाही. तेव्हा लद्दाख होता, आता डोकलामचा परिसर आहे, एवढाच काय तो फरक. दुसरीकडे, आपली ताकद आणि मर्यादांचे भान जपतानाही चीनविरुद्ध प्राणपणाने लढण्याच्या इराद्यात तसूभरही मागे न राहिलेले सैनिक आणि त्यांच्या पाठीशी आपले मनोबल उभे करण्यात जराही कुचराई न करणारे भारतीय नागरिक… गेल्या काही दिवसांत चिनी मालावर बहिष्कार घालून आर्थिक आघाडीवर त्या देशाच्या नाड्या आवळण्याच्या दृष्टीने चाललेला लोकजागर आणि त्या काळात राष्ट्रसंतांनी भजनांच्या माध्यमातून चीनविरुद्ध रान पेटविण्याचा केलेला प्रयत्न, दोहोंचाही संदर्भ एकाच दिशेनं प्रवास करणारा आहे.
भारतीय नागरिकांचे मनोबल उंचावणारी आणि त्यांच्यात शत्रूंविरुद्ध उभे ठाकण्याची जिद्द निर्माण करणारी, अंगावर शहारे आणणारी भजनं गाऊन तुकडोजी महाराजांनी त्या वेळी गावागावांतून लोकजागृती केली. हे खरंच आहे की, सारीच कामं सरकार करू शकत नाही अन् शासकीय पातळीवरून सारे प्रश्‍न सुटतातच असेही नाही. लोकसहभागातून घडू शकणार्‍या चमत्काराला पर्याय तो नाहीच कशाचा. जो त्या वेळी डॉ. राजेन्द्र प्रसादांच्या पुढाकारातून राष्ट्रसंतांनी घडवला, नेमक्या त्याच चमत्काराची गरज पुन्हा एकदा निर्माण झाली आहे. चिनी वस्तूंवरील बहिष्कार हा कुण्या एका संघटनेचा अजेंडा नाही, ती संपूर्ण भारत देशाची गरज आहे. बळकावण्यासाठी त्यांनी निवडलेल्या स्थानांची नावं काहीशी बदलली आणि म्हणूनच त्यायोगे येणारे काही संदर्भ तेवढे बदलले, बाकी भारताविरुद्धचे त्यांच्या मनातले मनसुबे काल होते तेवढेच आजही तिरकस अन् तितकेच निलाजरे आहेत. युद्धजन्य स्थिती तेव्हाही होती, आजही आहे. ते कालही भारताविरुद्ध दंड थोपटून उभे ठाकले होते अन् आजही त्यांना या देशाविरुद्ध लढण्याची खुमखुमी आहे. अशा वेळी, ‘‘आओ चिनीयों मैदानमें, देख हिंद का हाथ,’’ हे राष्ट्रसंतांचे धारदार शब्दही मैदानावरील लढाई प्रत्यक्षात लढणार्‍या आपल्या सैनिकांना जर युद्ध लढण्याची प्रेरणा देत असतील, तर मग त्याच चीनविरुद्ध सारा भारत देश आपल्या पाठीशी उभा असल्याचे वास्तव काय थरार निर्माण करू शकेल? कल्पनाही करवणार नाही, इतका जबरदस्त परिणाम साधण्याची ताकद त्या एकोप्यात आहे. चीन बलवान आहेच. कदाचित आमच्यापेक्षा काकणभर जास्तच. म्हणूनच त्याची मुजोरी दिवसागणिक वाढते आहे. त्याला केवळ स्वत:लाच भारतीय भूप्रदेशावर कब्जा करायचा नाहीय्, तर पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या भारतीय भूभागाबाबतही त्याची भूमिका भारताच्या विरोधातलीच आहे. या पार्श्‍वभूमीवर,
‘‘उठो अब हिंद के पुत्रो, पुकारे सोच भारतकी
करो सब संघटन अपना, मचाओ ना ये मत – मत की…’’
हे राष्ट्रसंतांचे आवाहन अगदीच अस्थानी असल्याचे कोण म्हणेल? आणि
‘‘गुलामी फिरसे ना आए हमारे प्रिय भारतमें
लगेगा मुंहको काला, खबर सब सोचलो गत की…’’
हा त्यांचा इशाराही आज संदर्भहीन ठरला असल्याचा दावा कुणाला करता येईल इथे?
चिनी प्रजासत्ताक अस्तित्वात आल्यापासून भारत अतिशय खंबीरपणे त्याच्या बाजूने उभा राहिला. नेहरूंच्या मनात तर कम्युनिस्टांविषयी कायम प्रेमाचे भरते असल्याने, रशिया अन् चीन तर त्यांनी पोसूनच ठेवले होते उराशी. पण, नंतरच्या काळात भारताने चीनला मागे टाकून साधलेला विकास खरंतर नेत्रदीपक ठरला होता. नेमके काय, कसे अन् का घडले कुणास ठाऊक, पण इंदिरा अन् राजीव गांधींच्या काळात भारताला कितीतरी अंतराने मागे टाकून चीन आश्‍चर्यकारक वेगाने पुढे निघून गेला. आणि तोच आता आपल्याला वाकुल्या दाखवत आपल्याचविरुद्ध कुरघोड्या करतोय्!
जवळपास साडेपाच दशकांचा कालावधी मागे पडेल आता चीनने लादलेल्या ‘त्या’ युद्धानंतरचा! तीच परिपाठी अजूनही कायम आहे. त्यांची तीच मुजोरी, त्याच धमक्या… अन् आमचे तेच धोरण. त्यावेळच्या ‘श्री गुरुदेव’चा चिनी निषेध अंक असेल किंवा मग राष्ट्र संरक्षण विशेषांक, यातून राष्ट्रसंतांनी आरंभलेल्या जनजागृतीच्या मोहिमेची गरज संपल्याचे चित्र अजूनही कुठेही नाही. ‘‘ सारा भारत रहे सिपाही शत्रूओंको दहशाने…’’ या त्यांच्या म्हणण्यातील तथ्य अद्याप मिथ्या ठरलेले नाही. उलट तीच काळाची गरज ठरते आहे. दुर्दैव फक्त एवढेच आहे की, काळाची ही गरज ओळखण्यापेक्षा चिनी मालावरील बहिष्काराचे आवाहन पायदळी तुडवण्याच्या राजकारणात रमली आहे काही मंडळी. या कुरघोड्यांमागील गांभीर्य लक्षात येईल, डोकलाममधील त्यांच्या माघारीतील भारताच्या लक्षणीय विजयाचे महत्त्व जेव्हा कळेल, तेव्हाच राष्ट्रसंतांच्या मनातील तळमळ समजेल आपल्याला अन् आपल्या हद्दीत घुसलेल्यांना हुसकावून लावण्याची गरजही ध्यानात येईल सर्वांच्या. राष्ट्रसंतांच्याच शब्दात सांगायचं झालं तर-
‘‘जागा है भारत मेरा, शत्रूपर देने पहरा
किसकी ताकद है लडने की, हक छिनने आये हमरा
विश्‍व हमारा साथ करे, शत्रू यही अब घात करे
भाई-भाई नारे कहके, अब धोके की बात करे
नीती जिनकी गंदी है, आखे जिनकी अंधी है
वह क्या जितेंगे भारतको, प्रभू हमारे साथी हैं…’’

Friday, August 4, 2017

समस्या व्हीआयपीच हव्यात, बरं का!

मुंबईतल्या मनोरा आमदार निवासातल्या एका खोलीतल्या छताची मोडतोड संबंधित आमदारांनी परवा ज्या पोटतिडिकेनं विधानसभेत मांडली, ती बघून कोणीतरी म्हणालं, यात काय एवढं. सरकारनं दिलेल्या आमच्या घरात येऊन बघा जरा पावसाळ्यात छत कुठनं कुठनं गळतं शोधून दाखवा अन् बक्षीस मिळवा, अशी योजना जाहीर करावी अशी अवस्था. इथे आयुष्यालाच भेगा पडताहेत जागोजागी तिथे भिंतींना गेलेल्या तडा मोजणार तरी कोण हो? रस्त्यांवरच्या खड्‌ड्यांनी बेजार होण्याची वेळ आली आम जनतेवर, पण विधानसभेत बोलतो कोण त्याबाबत? आणि आमदारांच्या खोलीत जराशी गैरसोय झाली तर केवढा गहजब, केवढा अकांडतांडव, केवढी आरडाओरड, केवढी त्याची दखल अन् केवढी त्याची चर्चा? भाग्य असावे तर असे! आमदारांच्या समस्येसारखे! नाही तर इथल्या सामान्यजनांच्या समस्या! अरे हट्. त्यांना काय समस्या म्हणायचे? कुत्रंही विचारत नाही त्यांना तर! पण साहेबांना उद्भवलेली समस्या बघा! डायरेक्ट विधानसभेतच चर्चा त्याची. मग? गंमत आहे का? आमदार निवासातल्या त्या खोलीतल्या छताच्या नुकसानीसाठी कुणी अधिकारी निलंबित झाल्याची बातमी अद्यापतरी बाहेर आलेली नाही. नाहीतर साहेबांचं दुखणं पहिले तर त्यांच्यावरच निघते. एखादातरी अधिकारी आधी सस्पेंड होतो. मग शांतता लाभते सर्वांना. समस्या नाही सुटली तरी चालते, पण अधिकार्‍यांवर कारवाई होणं महत्त्वाचं… म्हणजे, तशी तर्‍हा असते हो सरकारी कारभाराची! फक्त सर्वसामान्य लोकांच्या प्रश्‍नांकडे दुर्लक्ष करणार्‍यांवरच काही कारवाई होत नाही इथे.

आमदारांसाठीची निवास व्यवस्था कशी पॉशच हवी. मग काय तर! लोकप्रतिनिधी म्हटल्यावर त्यांच्यासाठीच्या व्यवस्थेचा दर्जा सुमार असून कसं चालेल? निवास राजेशाही थाटातला अन् भोजन कसे साग्रसंगीत हवे. त्याचा दर्जाही कसा उच्चप्रतीचा हवा. साहेब खोलीतून निघाले की वर्दी देणारी जमात लगबगीनं अग्रेसर व्हावी. वर्दी मिळाली की सेवेकर्‍यांनी कुर्निसात करायला सज्ज व्हावे. केवळ साहेबांनाच नाही, तर त्यांच्या लवाजम्यातल्या प्रत्येकाला मानाची तीच वागणूक अन् पंगतीचा तोच मान मिळावा. कारण तो तर जन्मसिद्ध अधिकारच आहे ना त्यांचा. त्यात कसूर चालायचा नाही म्हणजे नाहीच! मग जेवणातले मीठ असो की नाश्त्यातला रस्सा, तडजोड ना त्याच्या चवीबाबत, ना त्याच्या दर्जाबाबत! अरे, चव कोण घेतोय् त्याची? दस्तुरखुद्द आमदारसाहेब! मग त्याचा काही विचार कराल की नाही? तिकडे मुंबईतल्या इमारतीच्या इमारती कोसळताहेत, पावसाच्या चार सरी बरसताच. पाच-पन्नास लोकांचे प्राण गेले. ते ठीक हो! पण, म्हणून काय आमदार निवासातल्या खोलीचे, जिथे खुद्द साहेब राहतात, त्या खोलीचे छत कोसळावे? छे! छे! मान्यच होणे नाही हा प्रमाद! त्यावरून बघा किती संतापलेत साहेब! म्हणाले, आमदार निवासाच्याच खोल्या ‘अशा’ असतील तर मी सुरक्षित राहणार तरी कसा? आमदार म्हणून, सरकारी खर्चातून लाभलेल्या खोलीतल्या जराशा पडझडीने निर्माण झालेल्या कमालीच्या असुरक्षिततेच्या भावनेने पुरते कासावीस झाले ते. इथेच झोपतो म्हणाले, विधानसभेत! एरवी विधिमंडळात भाषणांदरम्यान, अनेक लोकप्रतिनिधी झोपा काढतात, हे ऐकून ठाऊक होते. त्या राहुल गांधींचा तर चक्क लोकसभेतल्या बेंचवर डोकं ठेवून झोपलेल्या अवस्थेतला फोटो बघितल्यावर, असंही काही घडत असेल, यावर विश्‍वास ठेवण्यावाचून पर्याय उरला नव्हता. पण, हे साहेब तर चक्क गादी टाकून द्या म्हणताहेत विधानसभेत झोपायला. आमदार निवासातल्या खोल्या सुरक्षित राहिल्या नसल्यानं केवढा त्रागा झाला त्यांचा. छे! काहीतरीच! किती असुरक्षित आहेत पुरोगामी महाराष्ट्रातले लोकप्रतिनिधी? महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून मुंबईत जाऊन अधिवेशनं अटेंड करायची. लोकांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी जिवाचा आटापिटा करायचा अन् दिवसभराच्या कामांनी थकूनभागून रात्री जरासा आराम करायला म्हणून खोलीत शिरावं तर हे असं? चक्क छताशी दोन हात करण्याची वेळ यावी? नाही. नाहीच जमणार हे असलं काही! सरकारी झालं म्हणून काय निवासाची अशी अव्यवस्था सहन करायची? तीही आमदारांनी? नाहीच जमणार! अहो, हे मान्य करायला ते काय सर्वसामान्य नागरिक आहेत? या देशात सामान्य नागरिक सोडून इतर सारे लोक व्हीआयपी, व्हीव्हीआयपी सदरात मोडतात. त्यांना कायम वेगळी, दर्जेदार वागणूक लागते, याचे साधे भान राखता येत नाही इथल्या प्रशासनाला? याद राखा. यात जराही कसूर झाली तर खबरदार! मुळीच खपवून घेतली जाणार नाही असला गलथान कारभार. अरे, आमदार म्हणजे काय कोणी ऐरेगैरे असतात? एक, दोन नव्हे, तब्बल तीन लक्ष लोकांचे प्रतिनिधी. केवढी कामं करतात ते! किती लोक भेटतात त्यांना दिवसभरात. विधिमंडळात किती म्हणून किती विषय मांडावे लागतात त्यांना. कितीवेळ सभागृहात असतात ते (हा प्रश्‍न नसून, लोकप्रतिनिधीचं कौतुक करणारे ते विधान असल्याचे सामान्यजनांनी गृहीत धरावे!) तरी ते मीडियावाले कायम सभागृहातल्या रिकाम्या अन् बाहेरच्या कॅण्टीनमधल्या भरलेल्या खुर्च्यांवरच कायम लक्ष का वेधतात, देव जाणे! तर सांगायचा मुद्दा असा की, एवढ्या प्रचंड मेहनतीनंतर सर्वोत्कृष्ट दर्जाचे भोजन मिळणे हा लोकप्रतिनिधींचा अधिकार आहे. असावा की नाही? त्यांना कर्मचार्‍यांकडून उत्कृष्ट दर्जाची सेवा मिळायला हवी का नको? कोणी द्यायची ती सेवा? मुंबईतील आकाशवाणी घ्या की विस्तारित आमदार निवासाचे उदाहरण घ्या. काय अवस्था आहे बघा. छे! छे! सामान्य जनतेचं ठीक हो, ते तर राहतातच सार्‍या अव्यवस्था गुमान सहन करून अन् नाक मुठीत धरून तिथे. पण, आमदारांनी राहायचं असल्या गलिच्छ ठिकाणी?
एक मात्र बरं असतं साहेबांचं. त्यांच्या सेवेत जराही कसूर झालेली खपत नाही त्यांना. तसं घडलंच कधी, तर त्याबाबत थेट विधिमंडळात गार्‍हाणी मांडता येतात त्यांना. लागलीच प्रशासनिक यंत्रणा खडबडून जागी होते. अधिकारीवर्ग सज्ज होतो, त्यांच्या तक्रारीची दखल घ्यायला. नाही तर, सामान्य माणसानं केलेल्या तक्रारींची दखल घेतो कोण इथे? इमारती कोसळल्या काय नि खानावळीतल्या जेवणाचा दर्जा सुमार असला काय, फरक काय पडतो? ते लोक मेले काय नि जगले काय. कोणाच्या बाचं काय जाते इथे? पण साहेबांची कशी, गोष्टच वेगळी! त्यांची गणना अशी सामान्यजनांत करताच येणार नाही बघा! त्यामुळे सामान्यांना मिळणार्‍या(?) सोयींशी, त्यांना उपलब्ध होणार्‍या(?) भोजनाच्या सुमार दर्जाशी, त्यांच्यासाठी असलेल्या(?) किरकोळ सुविधा साहेबांच्या गरजांशी कशा मेळ खाणार? नाही. नाहीच खाणार! मुळात आमदार साहेबांची तुलना अशी सर्वसामान्य माणसाशी करणेच गैर असल्याचे ठाम मत आम्हा बापुड्यांचे आहे.
मुंबईतल्या मनोरा आमदार निवासातल्या एका खोलीतल्या छताची मोडतोड संबंधित आमदारांनी परवा ज्या पोटतिडिकेनं विधानसभेत मांडली, ती बघून कोणीतरी म्हणालं, यात काय एवढं. सरकारनं दिलेल्या आमच्या घरात येऊन बघा जरा पावसाळ्यात छत कुठनं कुठनं गळतं शोधून दाखवा अन् बक्षीस मिळवा, अशी योजना जाहीर करावी अशी अवस्था. इथे आयुष्यालाच भेगा पडताहेत जागोजागी तिथे भिंतींना गेलेल्या तडा मोजणार तरी कोण हो? रस्त्यांवरच्या खड्‌ड्यांनी बेजार होण्याची वेळ आली आम जनतेवर, पण विधानसभेत बोलतो कोण त्याबाबत? आणि आमदारांच्या खोलीत जराशी गैरसोय झाली तर केवढा गहजब, केवढा अकांडतांडव, केवढी आरडाओरड, केवढी त्याची दखल अन् केवढी त्याची चर्चा? भाग्य असावे तर असे! आमदारांच्या समस्येसारखे! नाही तर इथल्या सामान्यजनांच्या समस्या! अरे हट्. त्यांना काय समस्या म्हणायचे? कुत्रंही विचारत नाही त्यांना तर! पण साहेबांना उद्भवलेली समस्या बघा! डायरेक्ट विधानसभेतच चर्चा त्याची. मग? गंमत आहे का? आमदार निवासातल्या त्या खोलीतल्या छताच्या नुकसानीसाठी कुणी अधिकारी निलंबित झाल्याची बातमी अद्यापतरी बाहेर आलेली नाही. नाहीतर साहेबांचं दुखणं पहिले तर त्यांच्यावरच निघते. एखादातरी अधिकारी आधी सस्पेंड होतो. मग शांतता लाभते सर्वांना. समस्या नाही सुटली तरी चालते, पण अधिकार्‍यांवर कारवाई होणं महत्त्वाचं… म्हणजे, तशी तर्‍हा असते हो सरकारी कारभाराची! फक्त सर्वसामान्य लोकांच्या प्रश्‍नांकडे दुर्लक्ष करणार्‍यांवरच काही कारवाई होत नाही इथे.   पण आम्ही म्हणतो, एवढं काय हो कौतुक त्या खोलीतलं छत कोसळण्याचं. नागपुरातल्या आमदार निवासाची अवस्था बघा जरा. तरी बरं दर अधिवेशनात रंगरंगोटी होते अन् दरच अधिवेशनात क्रॉकरी नवीन येते. पण, अधिवेशनाचे पंधरा दिवस मागे पडत नाही तोच अवकळा आल्यागत अवस्था होते, या आमदार निवासाची. कारण अधिवेशन संपल्यावर ना आमदार इकडे फिरकत ना कुणी अधिकारी ढुंकून पाहात तिकडे. मग काय, सामान्यजनांची गर्दी. त्यांना कशाला हव्यात पलंगांवर गाद्या? त्या गाद्यांवर पांढर्‍या शुभ्र चादरी? पांढर्‍याशुभ्र चादरी आमदार साहेबांसाठी. फारतर त्यांच्या चेल्याचपाट्यांसाठी. इतरांसाठी थोडीच असतात त्या. मग त्यांच्या वाट्याला येतात घाणेरड्या, वास लागलेल्या गाद्या. डोक्याखाली घ्याव्याशाही वाटणार नाही अशा उशा अन् अंगावर घ्यावेसे वाटू नये असले दमट वासाचे ब्लँकेट्‌स. पण कधी चर्चा होते, या दुरवस्थेची? नाही. कारण ही अवस्था वाट्याला येते सामान्यजनांच्या. साहेबांच्या नाही. जे साहेबांच्या वाट्याला येत नाही त्याची चर्चाही का म्हणून व्हावी? सोडवायला समस्याही व्हीआयपीच हव्यात ना!

Saturday, July 29, 2017

शहीदांच्या स्वकीयांच्या भावनांची उकल…

नोकरीवर रुजू होऊन तसा खूप काळ मागे पडला नव्हता. एटापल्ली तालुक्यातल्या एका छोट्याशा गावात नक्षलवाद्यांनी डेरा टाकला असल्याची खबर मिळाली होती. क्षणाचाही विलंब न लावता, रोशनकुमार आणि त्यांच्या सहकार्‍यांची टीम सज्ज झाली. फारतर आठ-दहा घरांचे ते ‘गाव.’ दूरवर धानाची शेतं विखुरलेली. त्या रात्रीचं म्हणाल, तर पाऊस धो धो बरसत होता. पावसाची सोबत अन् काळ्याकुट्‌ट अंधाराच्या साक्षीनं लढलेली लढाई पोलिसांनी जिंकली होती. पोलिस विभागाच्या सेवेतलं पहिलंच बक्षीस पदरी पडलं होतं. कधीमधी रस्त्यानं जाताना शाळकरी पोरांनी गमतीनं सॅल्यूट ठोकला, तरी जंगलातल्या प्रतिकूल परिस्थितीत चाललेल्या संघर्षाचा क्षणभर विसर पडून चेहर्‍यावर नकळत स्मित उमटायचं. तसं म्हटलं तर रोशनकुमारचं व्यक्तिमत्त्वच निराळं होतं. सर्वांनाच हवंहवंसं वाटणारं. लोभसवाणं. कुणाच्याही मदतीला तत्परतेनं धावून जाणारं. लग्न झालं. कालौघात संसारवेलीवर एक छानसं फूल उगवलं. पण, नियतीच्या मनात काही वेगळंच असावं बहुदा… नक्षल्यांविरुद्धच्या एका अभियानासाठी एक कुमक चामोर्शीच्या दिशेनं निघाली होती. परतीचं आश्‍वासन देऊनच प्रत्येक जण घराबाहेर पडला होता. पण, नक्षल्यांनी घडवून आणलेल्या स्फोटात या ताफ्यातील एका वाहनाच्या पाऽऽर चिंधड्या उडाल्या… अर्थात, त्यात बसलेल्या रोशनकुमारच्या शरीराच्या अन् त्याच्या स्वप्नांच्याही… भातुकलीच्या खेळामधला ‘राजा’ डाव अर्ध्यावर मोडून निघून गेला होता…

आता नक्षलवाद्यांचे नावही कुणी काढलं ना की, धमण्यांतले रक्त सळसळायला लागते. हाताच्या मुठी नकळत आवळल्या जातात. न्यायाच्या नावाखाली चाललेला तो धिंगाणा थांबला पाहिजे, असं मनोमन वाटून जातं. आमचीच पोलिस ठाणी लुटून शस्त्रं जमा करायची अन् त्याच शस्त्रांचा वापर करून आमच्याच पोलिसांचा जीव घ्यायचा… अजून किती दिवस चालणार हा तमाशा? त्यांच्याशी लढताना शहीद झालेल्या नवर्‍याच्या, हार घातलेल्या तसबिरीसमोर उभं राहताना मनात जागणार्‍या आठवणींनी त्या संतापाची धार अधिकच तीव्र होते. पापण्यांच्या आडून अश्रूंचा लपंडाव सुरू होतो. घरातला कर्ता पुरुष गमावल्याच्या दु:खाने आपण पुरते खचून गेलो असल्याचे वास्तव धगधगते असले, तरी अजून लहान असलेल्या मुलांसमोर आपल्या वेदनांचे प्रदर्शन नको म्हणून पापण्यांच्या ओलावलेल्या कडांना आपसूकच पदर लागतो अन् सारे बळ एकवटून  ‘ती’ धैर्याने कामाला लागते…
लहानपणीच वडिलांची छत्रछाया गमावून बसलेली प्रिया म्हणते, त्यांच्या प्रेमाला पारखं होण्याची सल तर अजूनही मनात आहे. पण, नक्षल्यांशी लढताना वीरमरण आल्यानंतर तिरंग्यात विसावलेले बाबांचे पार्थिव बघितले तेव्हा मन सैरभैर झालं होतं. काहीच सुचत नव्हतं. अश्रूंच्या धारा, प्रयत्न केलातरी थांबत नव्हत्या. पण, राष्ट्रध्वजाने झाकलेल्या शहीदांना दिली जात असलेली ती सलामी बघितली, तो मान बघितला अन् ऊर भरून आला. भरमसाट पैसा गाठीशी असलेल्यांच्या वाट्यालाही न येणारा सन्मान, शहीद झालेल्या माझ्या बाबांच्या वाट्याला आला होता… नंतर सरकारी मदतही दाराशी आली. बाबांच्या जाण्याने निराधार झालेल्या कुटुंबाच्या, किमान गरजा पूर्ण होतील याची तजवीज त्यातून झाली. पण बाबांची उणीव? कितीही पैसा ओतला तरी ती कशी भरून निघेल? पण, एक मात्र खरंच. पोलिस विभागात एका साध्या शिपायाच्या रूपात वावरलेले बाबा आम्हाला खूप काही शिकवून गेले. जगायचं कसं ते अन् मरायचं कसं तेही…
नोकरीवर रुजू होऊन तसा खूप काळ मागे पडला नव्हता. एटापल्ली तालुक्यातल्या एका छोट्याशा गावात नक्षलवाद्यांनी डेरा टाकला असल्याची खबर मिळाली होती. क्षणाचाही विलंब न लावता, रोशनकुमार आणि त्यांच्या सहकार्‍यांची टीम सज्ज झाली. फारतर आठ-दहा घरांचे ते ‘गाव.’ दूरवर धानाची शेतं विखुरलेली. त्या रात्रीचं म्हणाल, तर पाऊस धो धो बरसत होता. पावसाची सोबत अन् काळ्याकुट्‌ट अंधाराच्या साक्षीनं लढलेली लढाई पोलिसांनी जिंकली होती. पोलिस विभागाच्या सेवेतलं पहिलंच बक्षीस पदरी पडलं होतं. कधीमधी रस्त्यानं जाताना शाळकरी पोरांनी गमतीनं सॅल्यूट ठोकला, तरी जंगलातल्या प्रतिकूल परिस्थितीत चाललेल्या संघर्षाचा क्षणभर विसर पडून चेहर्‍यावर नकळत स्मित उमटायचं. तसं म्हटलं तर रोशनकुमारचं व्यक्तिमत्त्वच निराळं होतं. सर्वांनाच हवंहवंसं वाटणारं. लोभसवाणं. कुणाच्याही मदतीला तत्परतेनं धावून जाणारं. लग्न झालं. कालौघात संसारवेलीवर एक छानसं फूल उगवलं. पण, नियतीच्या मनात काही वेगळंच असावं बहुदा… नक्षल्यांविरुद्धच्या एका अभियानासाठी एक कुमक चामोर्शीच्या दिशेनं निघाली होती. परतीचं आश्‍वासन देऊनच प्रत्येक जण घराबाहेर पडला होता. पण, नक्षल्यांनी घडवून आणलेल्या स्फोटात या ताफ्यातील एका वाहनाच्या पाऽऽर चिंधड्या उडाल्या… अर्थात, त्यात बसलेल्या रोशनकुमारच्या शरीराच्या अन् त्याच्या स्वप्नांच्याही… भातुकलीच्या खेळामधला ‘राजा’ डाव अर्ध्यावर मोडून निघून गेला होता…
चार वर्षांपूर्वीची गोष्ट. दिवस गुढीपाडव्याचा. आज स्वरूपकुमारचा उत्साह काही औरच होता. दाराला तोरणं लावण्यापासून तर आईला स्वयंपाकात मदत करण्यापर्यंत, कशी धावपळ चालली होती त्याची! उद्यापासून चार दिवसांकरिता एका मोहिमेवर जायचं. तिथनं परतलो की एक ट्रेनिंग. पण, त्यापूर्वी घरात एक चारचाकी आणायची… त्याच्या मनातल्या भविष्यातल्या योजनांचा जणू पाऊस बरसत होता. खरं तर यापूर्वीही त्यानं त्या अनेकदा बोलून दाखवल्या होत्या. पण, आज त्याची उजळणी करताना त्याचा उत्साह मात्र जणू सारंकाही तो पहिल्यांदाच सांगत असल्याच्या थाटातला होता. ठरल्याप्रमाणे दुसर्‍या दिवशी तो मोहिमेवर रवाना झाला. अद्याप चोवीस तासही मागे पडायचे होते, तर बातमी येऊन धडकली… गुड्‌डू गेल्याची. हिक्केरच्या जंगलात झडलेल्या चकमकीत महाराष्ट्राच्या पोलिस दलाने गमावलेल्या वीर जवानांच्या यादीत गुड्‌डूपण होता. उराशी बाळगलेली स्वप्नं तशीच राहिली होती. अधुरी. पोराच्या पार्थिवावरचे अंत्यसंस्कार बघताना पोरकं होण्याची वेळ इथे आईवरच आली होती…
‘शहादत’ची महती कोण नाकारेल? प्राणांवर उदार होऊन देशासाठी लढले तर ‘ते’, पण त्यांच्या कुटुंबाचा एक भाग म्हणून समाजात आमच्यासाठी व्यक्त होणारा आदर वर्णनातीतच. पण, त्यानं जगण्याची विवंचना थोडीच संपते. भावनिक प्रश्‍न सुटत नाही ते नाहीतच. एकत्र कुटुंबात नात्यागोत्यातली, आपल्या वडिलांच्या दिशेनं धाव घेणारी पोरं बघितली की, आपल्या मुलांच्या पोरकेपणाची जाणीव अधिकच तीव्रतेनं होते. प्रेमात दंग असलेलेच कशाला, अगदी रस्त्यानं सोबतीने जाणारे जोडीदार बघितले, तरी आपल्या जीवनातली त्याची उणीव जाणवण्याइतपत ठळक होऊन जाते. रात्री उशिरा घरी परतल्यावर झोपेत हात चुकूनही कपाळावर दिसला, तरी ‘‘तब्येत बरी नाही का?’’, असं काळजीनं विचारणारं हक्काचं माणूस आपण गमावलं असल्याची सल, जाता जात नाही…
….या सगळ्या भावना आहेत, महाराष्ट्राच्या एका टोकावर वसलेल्या गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांविरुद्ध लढताना शहीद झालेल्या वीर जवानांच्या कुटुंबातील सदस्यांच्या. समाजाच्या रक्षणासाठी जिवावर उदार होत नक्षलवाद्यांशी लढताना मरण पत्करणार्‍यांचा आदर राखला जात असला, तरी त्यांच्या माघारी त्यांचे कुटुंबीय कसे जगत असतील? त्यांना कुठनं मिळत असेल संघर्षासाठीचे बळ? घरचा कर्ता माणूस गमावल्याच्या वेदना सतत उराशी बाळगून वावरणं इतकं का सोपं असतं? अशा, अस्वस्थ करणार्‍या कित्येक प्रश्‍नांच्या उत्तराच्या शोधात निघालेल्या काही धडपड्या कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांतून, गेल्या किमान चार वर्षांपासून इथे वेगवेगळे उपक्रम राबवले जाताहेत. म्हणायला उपक्रम तसे छोटे आहेत, पण त्यांच्या परिणामांची व्याप्ती मात्र मोठी आहे. कुठे नक्षलपीडितांच्या मुलांना सायकलींचे वाटप, तर कुठे अंधारातल्या शाळांना सोलार लाईट उपलब्ध करून देणे, कुठे ओसाड पडलेली वाचनालये पुस्तकांनी सजवण्याचा, तर कुठे क्रीडा साहित्य उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न. बल्लारपूर येथील श्री लक्ष्मी नृसिंह सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास सुंचुवार आणि पुण्यातील आदर्श मित्र मंडळाचे उदय जगताप यांच्या पुढाकारातून हे उपक्रम राबविले जात असतानाच, शहीदांच्या कुटुंबीयांची मनं जाणून घेण्याचा प्रयत्न एका निबंध स्पर्धेच्या माध्यमातून झाला. सुमारे पस्तीस शहीद वीरांच्या कुटुंबीयांनी त्या स्पर्धेत भाग घेत आपल्या भावना शब्दबद्ध केल्या. कुठे पेटून उठायला लावणारा संताप, तर कुठे डोळ्यांतून झरकन् पाणी पडेल अशा ओलावलेल्या भावना. कुठे, बजावलेल्या कर्तबगारीचा सार्थ अभिमान, तर कुठे आयुष्याचा दुवाच हरवल्याची खंत… अशी भावभावनांची सरमिसळ या स्पर्धेच्या निमित्ताने व्यक्त झालेली. श्रीनिवास सुंचुवार यांच्या पुढाकारातून या भावनांचं संकलन एका पुस्तकाच्या माध्यमातून लवकरच होत आहे. नागपूरच्या समाजसेविका डॉ. संध्या पवार या पुस्तकाचं संपादन करताहेत. श्रीनिवास सुंचुवार यांच्या पुढाकारातून या पूर्वी, महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या कारागृहातल्या कैद्यांसाठी आयोजित निबंध स्पर्धेतून ‘कारागृह : एक वेगळे विश्‍व’ हे पुस्तक साकारले होते. यंदा त्यांच्या अभिनव उपक्रमाला शहीदांच्या कुटुंबीयांच्या भावनांचा आधार लाभला आहे…