Saturday, June 4, 2016

राहुल गांधींच्या नेतृत्वात...!

एरवी नेहरूकन्या असलेल्या अन् ‘फिरोज’ यांच्याशी लग्न झालेल्या इंदिरा यांचा ‘गांधी’ नावाचा काय संबंध होता? लग्नानंतरही प्रियांकाला वढेरा सोडून माहेरच्या ‘गांधी’ नावाचे बिरूद लावून मिरवावेसे का वाटावे? पण, त्यांनी हे नामाभिधान स्वीकारले. कारण इंदिरा यांना त्या नावाचा महिमा पुरता ठाऊक होता आणि प्रियांकालाही तो तेवढाच ज्ञात आहे. या घराण्यात जन्म झाला यापलीकडे ज्याचे कर्तृत्व नाही, त्या राहुलकडे पक्षाची धुरा येण्यात तशी नवलाई नाहीच. नेहरूंपासूनचा हा इतिहास आहे. पद पंतप्रधानाचे असो वा मग पक्षाध्यक्षाचे, ते आपल्याकडेच असावे, असे या घराण्यातील लोकांना तेव्हाही वाटत राहिले आणि आताही त्या भूमिकेत किंचितसाही बदल झालेला नाही. मध्यंतरीच्या काळात अगदीच नाइलाज झाल्याने नरसिंह राव, डॉ. मनमोहनसिंग यांच्याकडे पंतप्रधानपद, तर सीताराम केसरींकडे पक्षाध्यक्षपद गेले. पण, कसेही करून ते पुन्हा ‘गांधी’ घराण्याकडे यावे यासाठीची निष्ठावंतांची धडपड काही लपून राहिली नाही. त्यामुळे पात्रतेचा मुद्दा तिथे नेहमीच गौण ठरत आला आहे. सदस्य ‘गांधी’ घराण्यातला असणे एवढी ‘पात्रता’ पुरेशी असल्याने, गेल्या सात दशकांत नेतृत्वाची धुरा अपवाद वा मग नाइलाजानेच ‘गांधी’ घराण्याच्या पलीकडे गेली. कारण ते झालेले ना या घराण्यातल्या कुणाला चालत, ना त्यांच्या सभोवतालच्या वर्तुळात वावरणार्‍यांना ते खपत... अरे! यांना तर शासकीय योजनांना द्यायलासुद्धा जवाहर, इंदिरा, संजय, राजीव यांच्यापलीकडे नावं सुचली नाहीत दुसरी. तिथे पंतप्रधान अन् पक्षाध्यक्षपदासाठी इतरांची नावं चालणे जरासे दुरापास्तच! 
ज्यांचे नेतृत्व नुसते उदयाला येणार म्हटले तरी विरोधी पक्षांत आनंदाचा ‘झिंगझिंग झिंगाट’ सुरू झाला, त्या राहुल गांधींच्या कार्यक्षमतेबाबत पूर्ण खात्री असल्याने, कॉंग्रेस विरोधकांना आता ‘अच्छे दिन’ येणार असल्याची भाषा बोलली जाऊ लागली, असे असतानाच, त्यांच्या नेतृत्वात कॉंग्रेसचे जहाज बुडणार असल्याची खात्री पटलेल्या उंदरांची जहाजातून बाहेर पडण्याची धडपड एव्हाना सुरूही झाली आहे. आपण वेगळा पक्ष स्थापन करणार असल्याचे अजित जोगींचे बोल, हा त्या धडपडीचाच पुरावा आहे. स्वातंत्र्यानंतरच्या काळातील बहुतांश कालावधीत ज्याची सत्ता या देशावर राहिली त्याच्या वाट्याला लोकसभेतले विरोधी पक्षनेतेपदही येऊ नये, अशी दैना झालेल्या पक्षाची धुरा, ज्यांच्याकडून कोणतीच आश्‍वस्त कामगिरी गेल्या कित्येक दिवसात घडलेली नाही, निवडणुकीतले विजय ज्यांच्यापासून कोसो दूर राहिले, त्या कॉंग्रेसच्या ‘युवराजां’कडे येणार म्हटल्यावर विरोधी पक्षात जी आनंदाची लाट उसळली आहे आणि कॉंग्रेस पक्षात जी चलबिचल सुरू झाली आहे, तो ‘युवराजां’च्या कथित कर्तबगारीबाबत सर्वांच्या मनात असलेल्या खात्रीचा परिपाक आहे. पक्षाचा कारभार राहुल यांच्या हातात येणार आणि एकदा का कारभार त्यांच्या हातात आला की, पक्षाचे भवितव्य नेमके काय असेल, याचा अदमास असलेल्या चाणाक्ष राजकारण्यांची ही बोलकी प्रतिक्रिया आहे...
दिल्लीतली घटना आहे. सोबतच्या पत्रकारांशी चर्चा अशी छान रंगत आली होती. वेगवेगळ्या मुद्यांवरून फिरून चर्चा भारतीय लोकशाहीजवळ येऊन थांबली. शरद यादव म्हणाले, इथल्या लोकशाहीचं काही सांगू नका राव! एकाच घराण्यातली माणसं निवडणुकीच्या माध्यमातून निवडून येऊन वर्षानुवर्षे या देशावर राज्य करतात, तिथे लोकशाही अस्तित्वात आहे असे कसे म्हणायचे? ही तर घराणेशाही झाली. शरद यादवांचा रोख गांधी घराण्याकडे होता. पण, त्यांचा रोष बाळासाहेब ठाकरेंवरही होता. ते म्हणाले, आयुष्याच्या शेवटच्या काळात बाळासाहेब अक्षरश: घरातून पक्ष चालवायचे. कुठल्याशा मुद्यावर ‘मातोश्री’तून हुकूम बाहेर यायचा अन् त्याची तामीलही व्हायची. पुरोगामी म्हणवणार्‍या महाराष्ट्रात राजकारणाची ही तर्‍हा खपूनही जाते, हे अधिक आश्‍चर्यजनक आहे. एकूण, सर्वसामान्य लोकांनी लोकशाहीची जर्जरावस्था करण्याबाबतची खंत यादवांच्या बोलण्यातून व्यक्त होत होती. व्योमेशचंद्र बॅनर्जींपासून सुरू झालेली, दादाभाई नौरोजींपासून तर ऍनी बेझंटपर्यंतच्या लोकांनी समर्थपणे पेललेली कॉंग्रेस पक्षाची धुरा सरतेशेवटी राहुल गांधींच्या खांद्यावर येऊन पडावी, याचा अन्वयार्थ या पक्षाच्या वाताहतीचेच संकेत देतो...
कधी नेहरू-गांधी घराण्याच्या नावावर, तर कधी कुठल्याशा लाटेवर तरत आलेली कॉंग्रेस कित्येक वर्षे स्वातंत्र्यलढ्यातील सहभागाच्या पुण्याईवर जगत राहिली. एरवी नेहरूकन्या असलेल्या अन् ‘फिरोज’ यांच्याशी लग्न झालेल्या इंदिरा यांचा ‘गांधी’ नावाचा काय संबंध होता? लग्नानंतरही प्रियांकाला वढेरा सोडून माहेरच्या ‘गांधी’ नावाचे बिरूद लावून मिरवावेसे का वाटावे? पण, त्यांनी हे नामाभिधान स्वीकारले. कारण इंदिरा यांना त्या नावाचा महिमा पुरता ठाऊक होता आणि प्रियांकालाही तो तेवढाच ज्ञात आहे. या घराण्यात जन्म झाला यापलीकडे ज्याचे कर्तृत्व नाही, त्या राहुलकडे पक्षाची धुरा येण्यात तशी नवलाई नाहीच. नेहरूंपासूनचा हा इतिहास आहे. पद पंतप्रधानाचे असो वा मग पक्षाध्यक्षाचे, ते आपल्याकडेच असावे, असे या घराण्यातील लोकांना तेव्हाही वाटत राहिले आणि आताही त्या भूमिकेत किंचितसाही बदल झालेला नाही. मध्यंतरीच्या काळात अगदीच नाइलाज झाल्याने नरसिंह राव, डॉ. मनमोहनसिंग यांच्याकडे पंतप्रधानपद, तर सीताराम केसरींकडे पक्षाध्यक्षपद गेले. पण, कसेही करून ते पुन्हा ‘गांधी’ घराण्याकडे यावे यासाठीची निष्ठावंतांची धडपड काही लपून राहिली नाही. त्यामुळे पात्रतेचा मुद्दा तिथे नेहमीच गौण ठरत आला आहे. सदस्य ‘गांधी’ घराण्यातला असणे एवढी ‘पात्रता’ पुरेशी असल्याने, गेल्या सात दशकांत नेतृत्वाची धुरा अपवाद वा मग नाइलाजानेच ‘गांधी’ घराण्याच्या पलीकडे गेली. कारण ते झालेले ना या घराण्यातल्या कुणाला चालत, ना त्यांच्या सभोवतालच्या वर्तुळात वावरणार्‍यांना ते खपत... अरे! यांना तर शासकीय योजनांना द्यायलासुद्धा जवाहर, इंदिरा, संजय, राजीव यांच्यापलीकडे नावं सुचली नाहीत दुसरी. तिथे पंतप्रधान अन् पक्षाध्यक्षपदासाठी इतरांची नावं चालणे जरासे दुरापास्तच! 
खरं तर शतकाहून अधिक काळाचा इतिहास असलेल्या या पक्षाला आलेली सध्याची अवकळा तशी दुर्दैवीच. या स्थितीतून बाहेर काढण्यासाठी त्याचे नेतृत्व तितक्याच एखाद्या सक्षम व्यक्तीकडे सोपवायला हवे. पण, बहुधा इतर कुणाच्या वाट्याला ‘गांधी’ हे आडनाव आलेले नसल्याने ते आपसूकच स्पर्धेतून बाद झाले. त्याउलट गांधी आडनावाचे पाठबळ अगदी जन्मापासूनच लाभल्याने, त्या निकषांवर राहुल हीच सर्वांची पहिली पसंती ठरली असावी. ज्यांचे शिक्षण कॅम्ब्रिजमध्ये झाले, छोट्याशा उपचारासाठीही लंडनमधल्या डॉक्टरांना ज्यांची प्रथम पसंती असते, ज्यांना भारतातील सामान्य माणसाची नाडी अजून कळलेली नाही, त्या राहुल गांधींना कॉंग्रेसचा सर्वेसर्वा करण्याची कल्पना मांडणार्‍यांच्या अकलेचे दिवाळे निघाले असल्याचे काही लोक बोलताहेत. त्यांच्या खाती नेतृत्व आले की कॉंग्रेसची वाट लावायला अन्य कुणाचीच गरज नाही, एकटे राहुलबाबाच त्यासाठी पुरे आहेत, अशीही कुजबूज एव्हाना सुरू झाली आहे. ही कुजबूज अकारण नाही. अलीकडच्या काळात लोकांनी राहुल गांधी अनुभवले आहेत. त्यांची लोकसभेतली हास्यास्पद वाटणारी भाषणे लोकांनी ऐकली आहेत. बहुधा तेवढीच एक ‘झलक’ निष्कर्ष काढणार्‍यांसाठी पुरेशी ठरली असेल...
अगदी अलीकडच्या काळाचा विचार केला, तरी लोकसभेच्या गेल्या निवडणुकीत कॉंग्रेस पक्षातील राहुल यांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण राहिली आहे. तिथपासून तर अगदी परवाच्या पाच राज्यांतील निवडणुकींपर्यंत, पराभवाशिवाय काहीच वाट्याला आलं नाही कॉंग्रेसच्या. युवराजांनी रणनीती आखली, उमेदवार निवडले, कमी उपस्थिती असली तरी जाहीर सभा संबोधित केल्या, झोपडीत जाऊन जेवण्याची नौटंकी केली, माती-गोट्यांनी भरलेले घमेले खंद्यावर धरून फोटो काढून घेतले, अगदी आपल्याच पक्षाच्या पंतप्रधानांचा निर्णय मूर्खपणाचा ठरवत त्या निर्णयाची कागदं पत्रकारांपुढे टराटरा फाडूनही पाहिली, पण लोकांनी सत्ता काही सोपवली नाही. राहुलला परत न्या आणि प्रियांकाला नेतृत्व सोपवा, असे फलक मात्र गावोगावी लागले. खरं तर फलकांच्या माध्यमातून व्यक्त झाली ती सामान्य कार्यकर्त्याच्या मनातली भावना होती. राहुल गांधी हा पक्ष तारू शकत नाही, हाच त्या भावनांचा अर्थ होता. पण, मोजक्या लोकांच्या कडबोळ्यात राहिलेल्या नेत्याच्या नेतृत्वात रुजलेला पक्ष हा. त्याला सामान्य कार्यकर्त्याच्या मनातली भावना कळणार कशी? जिथे कार्यकर्त्यांचीच दखल घेतली जात नाही, तिथे सामान्य माणसाच्या भावनांची कदर कशी होईल? एक काळ होता. इंदिराजींचा रुबाब होता. तेव्हा लोकांनी सहन केलं. पण, म्हणून आताही सामान्यजनांच्या भावना पायदळी तुडवूनच निर्णय होणार असतील, तर जहाज बुडण्याची चर्चा होणारच...! 

No comments:

Post a Comment