लोकांची कटिंग-दाढी करून देण्याचा नवर्याचा व्यवसाय होता. तो गेला तरी त्या व्यवसायाशी संबंधित सामान अजूनही घरात पडलेले होते. आरसा, कंगवा, कैची, वस्तरा... एक दिवस निर्धार झाला. कंबरेला पदर खोचून बाहेर पडायचे अन् नवर्याचाच व्यवसाय पुढे चालवायचा... आजपासून तीस वर्षांपूर्वी असा क्रांतिकारी विचार करणेही जिथे दुरापास्त होते, तिथे तो निर्णय प्रत्यक्षात अंमलात आणणारी महिला हसुसरखिरे नामक या गावाने अनुभवली. वडाच्या पारावर पोतं टाकून पुरुषांची दाढी, मिशी कापून द्यायला एक महिला सरसावली होती. कौतुक असं की, सारं गाव तिच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहिलं होतं. त्यावेळच्या राजकीय नेतृत्वापैकी एकाने स्वत: पुढाकार घेऊन शांताबाईंकडून सार्वजनिक ठिकाणी, पोत्यावर बसून दाढी करवून घेतली. आपल्याला बघून गावातले इतर लोकही तिच्याकडून दाढी करवून घेतील हा त्यामागचा हेतू. प्रत्यक्षात घडलेही तसेच. उदरनिर्वाह होईल इतके अर्थार्जन होऊ लागले. लोक येतील का आपल्याकडून दाढी करवून घ्यायला, ब्लेड लागली तर, दाढी करताना जखम झाली तर, सुरुवातीच्या काळातले असे कित्येक प्रश्न नंतरच्या काळात अनुभवाच्या शिदोरीतून नामशेष होत गेले. शेवटी काय, रडत बसणार्यांना समस्यांचे बुजगावणे उभे करता येते, पण संघर्ष करणार्यांसाठी मात्र मार्ग खुले होत जातात, हेच खरे!
पावसाच्या सरी कोसळल्या तरी आडोसा शोधणार्या अन् उन्हाचे जरासे चटके बसू लागले की, सावलीचा शोध घेणार्यांच्या गर्दीत संघर्षाला सामोरे जाणार्यांचीच वानवा. अशात आडवळणावरच्या कुठल्याशा एका छोट्याशा गावात शांताक्का आयुष्याचा एक लढा उभारते. जीवनातील समस्यांना सामोरे जाते. ऐन तारुण्यात वाट्याला आलेल्या वैधव्याच्या पार्श्वभूमीवर स्वबळावर उभे राहत चार मुलींचे पालनपोषण करते. पुरुषजातीसाठीच काय, तमाम समाजासाठी नवलाईचे ठरावे अशा पद्धतीने वडाच्या पारावर पोतं टाकून पुरुषांची कटिंग, दाढी करून देण्याचा व्यवसाय स्वीकारणारी शांताक्का एव्हाना संपूर्ण गावासाठी अभिमानाचा विषय ठरते.
कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील हसुसरखिरे नावाचं एक गाव. नावाच्या अक्षरांची संख्याच मोठी, बाकी गाव छोटंसंच. शांताबाई जाधव इथल्याच. लग्न झालं. चार मुली पदरात पडल्या. पण, सुखाच्या संसाराला कुणाचीतरी नजर लागली. एक दिवस घरातला कर्ता पुरुष दगावला अन् शांताक्कावर आकाश कोसळले. सर्वात लहान मुलगी पाच वर्षांची असताना ओढावलेल्या या प्रसंगाने अनेक बरे-वाईट अनुभव गाठीशी बांधले गेले. जबाबदारी टाळण्यासाठी जवळची म्हणवणारी कित्येक नातीही नकळत दुरावली. अशात कुटुंबाचे पालनपोषण कसे करायचे, असा प्रश्न उभा ठाकला होता. ना शेतजमीन, ना मजुरीतून पाच जणांचे पोट भरेल अशी स्थिती. एका झाडाखाली लोकांची कटिंग-दाढी करून देण्याचा नवर्याचा व्यवसाय होता. तो गेला तरी त्या व्यवसायाशी संबंधित सामान अजूनही घरात पडलेले होते. आरसा, कंगवा, कैची, वस्तरा... एक दिवस निर्धार झाला. कंबरेला पदर खोचून बाहेर पडायचे अन् नवर्याचाच व्यवसाय पुढे चालवायचा...
आजपासून तीस वर्षांपूर्वी असा क्रांतिकारी विचार करणेही जिथे दुरापास्त होते, तिथे तो निर्णय प्रत्यक्षात अंमलात आणणारी महिला हसुसरखिरे नामक या गावाने अनुभवली. वडाच्या पारावर पोतं टाकून पुरुषांची दाढी, मिशी कापून द्यायला एक महिला सरसावली होती. कौतुक असं की, सारं गाव तिच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहिलं होतं. त्यावेळच्या राजकीय नेतृत्वापैकी एकाने स्वत: पुढाकार घेऊन शांताबाईंकडून सार्वजनिक ठिकाणी, पोत्यावर बसून दाढी करवून घेतली. आपल्याला बघून गावातले इतर लोकही तिच्याकडून दाढी करवून घेतील हा त्यामागचा हेतू. प्रत्यक्षात घडलेही तसेच. उदरनिर्वाह होईल इतके अर्थार्जन होऊ लागले. लोक येतील का आपल्याकडून दाढी करवून घ्यायला, ब्लेड लागली तर, दाढी करताना जखम झाली तर, सुरुवातीच्या काळातले असे कित्येक प्रश्न नंतरच्या काळात अनुभवाच्या शिदोरीतून नामशेष होत गेले. शेवटी काय, रडत बसणार्यांना समस्यांचे बुजगावणे उभे करता येते, पण संघर्ष करणार्यांसाठी मात्र मार्ग खुले होत जातात, हेच खरे!
आता चारही मुलींची लग्नं झालीत. मुलींच्या माघारी गावात शांताक्का एकटीच राहते. त्याच स्वाभिमानाने जगते. तिचा संसार अजूनही तसाच सुरू आहे- सलूनच्या धंद्यावर. फरक फक्त एवढाच की, आता पोत्याची जागा जरा बर्यापैकी दिसणार्या खुर्चीने घेतली आहे. काळानुरूप अर्थार्जनाच्या पद्धतीतही बदल घडून आला आहे. तेव्हा दाढीच्या बदल्यात धान्य मिळायचे, आता नगदी रक्कम मिळते. केवळ गावातच नाही, आजूबाजूच्या गावातूनही आक्काला निमंत्रणं असतात. कुठे जावळं काढायला, तर कुठे म्हैस भादरायलासुद्धा लोक आक्काला बोलावतात. इतरांच्या दृष्टीने असेलही कदाचित हा कौतुकाचा विषय, पण या गावासाठी शांताक्का म्हणजे आदराचे स्थान आहे. ऐन उमेदीच्या काळात उद्भवलेल्या विपरीत परिस्थितीचा सामना करण्याचे बळ एकवटून तिने निर्माण केलेला आदर्श गावकर्यांसाठी अभिमानाचा विषय ठरला आहे. तेव्हा तिच्या साथीला उभे राहणार्या गावकर्यांची भूमिका आजही किंचितशीही बदललेली नाही.
आज इतक्या दिवसांनी शांताक्काच्या संघर्षाची ही कहाणी आठवण्याचे कारणही तसेच आहे. आयुष्यभर तिनं लढलेल्या लढ्याची गाथा समाजापुढे मांडण्याचा प्रयत्न अलीकडेच कुणीतरी केला अन् हळव्या मनाची माणसं भारावली. संघर्षाची गाथा मांडणार्या चित्रफितीत, स्वयंपाकगृहातील चूल पेटविण्यासाठी फुंकणीने वारा घालण्याचा चाललेला शांताक्काचा अट्टहास बघून मुख्यमंत्री कार्यालयात ओएसडी म्हणून कार्यरत असलेले श्रीकांत भारतीय यांच्या डोक्यात विचारचक्र सुरू झाले. डोळ्यांत चाललेला धूर हाताने दूर ढकलत, फुंकणीने चूल पेटविण्याचा प्रयत्न करणार्या ग्रामीण महिलांसाठी गॅस सिलेंडर उपलब्ध करून देण्यासाठी म्हणून पंतप्रधानांनी केलेल्या ‘गिव्ह इट अप’च्या भावनिक आवाहनाच्या जाहिरातीला साजेशी आजी आपल्या भागात प्रत्यक्षात राहते हे बघून अस्वस्थ झालेल्या मनाने कार्यवाहीचेही एक चक्र सुरू झाले. मध्यरात्री आमदार सुरेश हळवणकर यांना फोन गेला. भाजपाच्या कार्यकर्त्यांची फळी कामाला लागली. शांताक्काच्या घराचा शोध सुरू झाला. कार्यकर्ते घरी पोहोचले. तिच्या कागदपत्रांची तपासणी झाली. रेशनकार्डवर ‘गॅस नसल्याचा’ उल्लेख बघितल्यावर गॅस कनेक्शन आणि शेगडी देण्याची व्यवस्था झाली. कार्यकर्त्यांनी श्रीकांत भारतीय यांचे बोलणे करून दिले. त्या दिवशी आक्काने पहिल्यांदा मोबाईल फोन हातात धरला होता. सुरुवातीला विश्वासच बसेना. जरासाही अंदाज नसताना असे अचानक कुणी मदतीला धावून येणे आश्चर्याचा धक्का देणारे होते. कनेक्शन मिळाले, सुरुवातीचे एक सिलेंडर मिळाले, तरी ते संपल्यावर कसे, हा प्रश्न आक्काच्या चेहर्यावर स्पष्टपणे दिसत होता. त्याचेही उत्तर मिळाले. श्रीकांत भारतीय यांनी स्वत:च्या पैशातून तिही व्यवस्था नेहमीसाठी उपलब्ध करून देण्याचे जाहीर केले. हा सारा घटनाक्रम गेल्या आठवडाभरातला. खरं तर इतकी वर्षे या गावानेच सांभाळून घेतले. आता आयुष्याच्या उत्तरार्धात एका राजकीय पक्षाचे सहृद कार्यकर्तेही साथीला उभे राहिलेत. एक संपले की दुसरे सिलेंडर उपलब्ध होण्याची व्यवस्था अनपेक्षितपणे झाली. अचानक घडलेला हा प्रसंग शांताक्काचे मनोबल उंचावणारा अन् समाजासमोरही नवे उदाहरण सादर करणारा ठरला आहे. शांताक्काच्या संघर्षाची कहाणी तर अजूनच आगळी. जगावेगळी. आभाळ कोसळले असताना ताठ मानेनं उभे राहण्याची जिद्द स्पष्ट करणारी. तीन दशकांचा तिचा प्रवासही तसाच. उमेद जागविणारा. एरवी शांताक्काने स्वीकारलेल्या व्यवसायाची कुणीही खिल्लीच उडवली असती. पण, आपल्याला बघून इतरही लोक तिच्याकडून दाढी करवून घेतील हे लक्षात घेत, स्वत:पासून सुरुवात करणार्या हरिभाई कडुकरांचे कौतुकही करावे तेवढे थोडेच. एकूणच, शांताक्काच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलेल्या या गावालाच दाद द्यायला हवी.
नाही म्हणायला आज ‘गिव्ह इट अप’ची योजना सर्वश्रुत झाली आहे. त्याचा लाभ कुणाला मिळावा याबाबतची कल्पनाही अधोरेखित आहे. पण, गावाकडे राहणारी एखादी महिला आजही चुलीवर स्वयंपाक करते, हे बघून कासावीस होणारी सहृद माणसं समाजात आहेत, हे अधिक महत्त्वाचे. शेवटी हे खरेच की,
जाणवाया दुर्बलांच्या दु:ख आणि वेदना
तेवत्या राहो सदा रंध्रातुनी संवेदना...