हिंदू-मुस्लिम संघर्ष हा या देशाचा इतिहास आहे. आता तो कुठेच घडत नाही असे नसले, तरी अलीकडच्या काळात तसला संघर्ष हा अपवाद आहे. एरवी शेजारी राहणारे दोन वेगवेगळ्या धर्माचे लोक धर्माच्या मुद्यावरून दिवसभर एकमेकांशी फक्त भांडतच राहतात असे काही चित्र नाही. अगदी जिथल्या दंगलींवरून रान माजले होते, त्या गुजरातेतही हिंदू-मुस्लिम आज गुण्यागोविंदानेच राहताहेत. देशाच्या इतर भागातही त्यांच्यात दररोज बेबनाव निर्माण होत असल्याचे चित्र नाही. बरं याहीउपर, पुणे शहरातल्या तमाम वस्त्या मुस्लिमविरहित असल्याचीही वार्ता इथे कुणाच्या कानी नाही. मग अन्वरपुढे आसरा मिळविण्यासाठी पर्याय केवळ हिंदूंच्याच घरांचा शिल्लक राहिला होता, या निष्कर्षाप्रत तो कसा, कधी अन् का आला? मुळात इथे मुद्दा वेगळाच आहे. खरोखरीच अन्वरच्या वाट्याला हा अनुभव आला असेल, तर ते वाईटच. एकविसाव्या शतकाच्या दिशेने झेपावण्याच्या ईर्ष्येने निघालेल्या भारताला आता हे जाती-धर्माच्या चाकैटीत बंदिस्त राहिलेले मागासलेपण मानवणारे नाही. एका रिक्षाचालकाच्या मेहनती, होतकरू अन् हुशार मुलाच्या वाट्याला तर असला अनुभव कधीच येऊ नये हेही खरेच. पण, आता त्याच्या त्या विधानाचे राजकारण होऊ लागले आहे. काल आपला छोटासा स्वार्थ पूर्ण करण्यासाठी स्वत:चे नाव बदलण्यास तयार झालेल्या अन्वरलाही आता आपली कहाणी सांगण्यात, नसलेल्या संघर्षाची त्याला जोड देण्यात भूषण वाटू लागले असल्याचे वास्तवही नाही म्हणायला दाहकच आहे.
पहिल्याच प्रयत्नात युपीएससीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या पुण्याच्या अन्वर शेखला शिकत असतानाच्या काळात राहायला घर मिळत नव्हते, म्हणून नाव बदलून शुभम अशी ओळख द्यावी लागल्याची खंत व्यक्त करताच अन् आता मी शेख असल्याचे अभिमानाने सांगू शकतो, असे त्याने म्हणताच, या कथित अन्यायाविरुद्ध पेटून उठलेली शेकडो माणसं पराचा कावळा करू लागली आहेत. या निमित्ताने कुणाला तरी झोडपून काढण्याची संधी अनायासेच हाती लागल्याच्या आनंदात चेकाळल्यागत वागू लागले आहेत काही लोक. एका रिक्षाचालकाचा मुलगा स्वत:च्या मेहनतीच्या बळावर एवढे मोठे यश संपादन करतो, याचे कौतुक आहेच. पण हे यश हाताशी लागताच, त्याला आपल्यावरील अन्यायाचे लागलीच स्मरण होते, त्याचा इश्यू करण्याचा तो प्रयत्न करतो अन् समाजातले काही लोक त्याच्यावरील या कथित अन्यायाविरुद्ध लढण्यास एव्हाना सरसावलेलेही असतात, हे चित्र निदान अन्वरच्या बाबतीत तरी विपर्यस्त ठरू पाहणारे आहे. जाती-धर्मावर आधारलेले भेद आपल्या समाजात अगदीच अस्तित्वात नाहीत हे म्हणण्याचे धाडस कोण करेल? पण, म्हणून राहायला घर मिळवण्यासाठी नाव बदलावे लागल्याचे अन्वरचे म्हणणे विनासायास मान्य होईल असेही नाही.
पुण्याच्या ज्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये या विद्यार्थ्याला प्रवेश मिळतो, त्याला तिथल्या वसतिगृहात प्रवेश मिळणार नाही, असे कसे होईल? चला, मान्य करू या की, त्याला वसतिगृहापेक्षा एखादी खाजगी खोली बघून तिथे राहणे अधिक सोयीचे होते. हेही मान्य करू या की एखाद् दुसर्या घरी त्याला, शेख या नावामुळे खोलीच्या बदल्यात नकार वाट्याला आला. पण, मग त्याने खोली मिळवण्यासाठी एखाद्या मुस्लिम व्यक्तीचा शोध का घेतला नाही? खोलीसाठी नाव बदलण्याची वेळ आलीच असेल, तर मग त्याने कॉलेजातही नाव बदलले होते का? मित्रांमध्ये त्याने कोणत्या नावाने ओळख दिली होती? युपीएससीची परीक्षा त्याने कोणत्या नावाने दिली? कॉलेजात किंवा मित्रांच्या समूहात नाव बदलून आपली ओळख लपविण्याची कधी गरज पडली नसेल, तर मग राहण्याकरिता एक खोली मिळवण्यासाठी त्याला नाव बदलावे लागले, यावर विश्वास कसा ठेवायचा? आणि त्याने तरी ‘अन्यायाच्या’ श्रेणीत जमा करून त्या मुद्याचा बाऊ करत सहानुभूती मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न का करावा?
पुण्यात जणूकाय खोल्यांची वानवा असल्यागत ती मिळवण्यासाठी स्वाभिमानी म्हणवणारा अन्वर आपले नाव बदलतो, त्याच्याच म्हणण्यानुसार घरमालकाशी खोटे बोलून खोली मिळवतो, युपीएससीच्या परीक्षेत यश मिळताच त्याला ही बाब ओरडून सार्या जगाला सांगाविशी वाटते, हा सारा प्रकार अविश्वसनीय वाटावा असा आहे. आणि सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, कालपर्यंत याबाबत चकार शब्द न काढलेल्या अन्वरमध्ये युपीएससी परीक्षेत मिळालेल्या यशामुळे घडून आलेला बदल, त्याला अचानक गवसलेले अवसान धक्कादायक आहे. आडनाव ‘शेख’ असल्यामुळे आपल्याला खोली नाकारली गेल्याचा त्याने जाहीर केलेला निष्कर्ष, परिणामी नाव बदलून ‘शुभम’ ठेवण्याचा, पण कालपर्यंत ज्याची कुठेच वाच्यता झाली नाही, असा त्याच्या लेखी त्याच्यावर ‘ओढावलेला’ प्रसंग, अतिशय नाट्यमय रीत्या, योग्य संधी बघून त्याची मांडणी करण्याचा झालेला प्रयत्न... या देशाच्या एका भावी कलेक्टरची दुर्दैवी मानसिकता स्पष्ट करणारा आहे.
हिंदू-मुस्लिम संघर्ष हा या देशाचा इतिहास आहे. आता तो कुठेच घडत नाही असे नसले, तरी अलीकडच्या काळात तसला संघर्ष हा अपवाद आहे. एरवी शेजारी राहणारे दोन वेगवेगळ्या धर्माचे लोक धर्माच्या मुद्यावरून दिवसभर एकमेकांशी फक्त भांडतच राहतात असे काही चित्र नाही. अगदी जिथल्या दंगलींवरून रान माजले होते, त्या गुजरातेतही हिंदू-मुस्लिम आज गुण्यागोविंदानेच राहताहेत. देशाच्या इतर भागातही त्यांच्यात दररोज बेबनाव निर्माण होत असल्याचे चित्र नाही. बरं याहीउपर, पुणे शहरातल्या तमाम वस्त्या मुस्लिमविरहित असल्याचीही वार्ता इथे कुणाच्या कानी नाही. मग अन्वरपुढे आसरा मिळविण्यासाठी पर्याय केवळ हिंदूंच्याच घरांचा शिल्लक राहिला होता, या निष्कर्षाप्रत तो कसा, कधी अन् का आला?
मुळात इथे मुद्दा वेगळाच आहे. खरोखरीच अन्वरच्या वाट्याला हा अनुभव आला असेल, तर ते वाईटच. एकविसाव्या शतकाच्या दिशेने झेपावण्याच्या ईर्ष्येने निघालेल्या भारताला आता हे जाती-धर्माच्या चाकैटीत बंदिस्त राहिलेले मागासलेपण मानवणारे नाही. एका रिक्षाचालकाच्या मेहनती, होतकरू अन् हुशार मुलाच्या वाट्याला तर असला अनुभव कधीच येऊ नये हेही खरेच. पण, आता त्याच्या त्या विधानाचे राजकारण होऊ लागले आहे. काल आपला छोटासा स्वार्थ पूर्ण करण्यासाठी स्वत:चे नाव बदलण्यास तयार झालेल्या अन्वरलाही आता आपली कहाणी सांगण्यात, नसलेल्या संघर्षाची त्याला जोड देण्यात भूषण वाटू लागले असल्याचे वास्तवही नाही म्हणायला दाहकच आहे. असल्या प्रसंगांच्या कायम शोधात राहणार्यांनाही यातून बरेचकाही हाती लागले असल्याचा भास होऊ लागला आहे. धर्माने मुस्लिम असलेल्या अन्वरला राहण्यासाठी एक खोली मिळवण्यासाठी शुभम या हिंदू नावाचा आधार घ्यावा लागतो, यावरून अकांडतांडव करण्याचा प्रयत्न काही संधिसाधूंनी एव्हाना जोरकसपणे आरंभलाही आहे... इथेच खरी गोम आहे. हेच इथले सामाजिक वास्तव असल्याचे सांगण्याची काही लोकांनी चालवलेली धडपड या मुद्याला वेगळेच वळण देण्याचे प्रयत्न अधोरेखित करणारी आहे.
अन्वरची कथित ‘दर्दभरी’ कहाणी ऐकून जर ‘अरेरे, बिच्चारा!’ असे शब्द कुणाच्या तोंडी येत असतील, तर मग ही परिस्थिती का उद्भवली, याचाही विचार झालाच पाहिजे. अमेरिकेच्या विमानतळावर इतर सार्या प्रवाशांना बाजूला ठेवून शाहरुख ‘खान’चीच तपासणी तीन तीन तास का होते, याचाही शोध अन्वरबाबत सहानुभूती दाखवणार्यांनी घ्यावा. नेहमी सर्वांचाच दोष असतो असे नाही, पण खूपदा सुक्यासोबत ओलेही जळते. अमेरिकेत झाडाझडती झालेल्या शाहरुखचा तरी दोष कुठे होता? पण, मुस्लिमांची जी काही प्रतिमा जागतिक पातळीवर झाली आहे, केवळ भारतातच नव्हे, तर एकूणच जागतिक पातळीवर दहशतवादाला जो हिरवा रंग मधल्या काही दशकांत चढला आहे, त्यावरून अमेरिकन सरकारने सुरक्षेचे कारण पुढे करत कठोर निर्णय घेतले. त्याचे परिणाम दोषी-निर्दोष, सार्यांनाच भोगावे लागताहेत. तिथल्या नियमांबद्दल कुणाचाच आक्षेप नसतो. अगदी पाकिस्तानी सरकारचीसुद्धा त्याविरुद्ध चकार शब्द काढण्याची हिंमत होत नाही. शाहरुखवरील अन्यायाविरुद्ध उठलेल्या आवाजाला केवळ भारतातच बळ मिळते अन् इथल्याच धरतीवर त्याचा धुराळा शांतपणे विसावतो. कारण इथे लोकशाही अस्तित्वात आहे. त्यामुळे फुटकळ बाबींवरही सरकारविरुद्ध, समाज आणि व्यवस्थेविरुद्ध बिनबोभाट ओरड करण्याची मुभा आहे. परीक्षेतले यश हाताशी लागताच अन्वरला फुटलेला कंठही, लोकशाही व्यवस्थेने प्रदान केलेल्या त्याच अधिकारांचे फलित आहे. उपरोक्त परिस्थितीत, नाव बदलावे लागण्याच्या त्याने बयाण केलेल्या कहाणीचे कुणीच समर्थन करणार नाही. त्यातून तो ‘जे’ सांगण्याचा प्रयत्न करतोय्, ते तर इथल्या समाजाचे मुळीच वास्तव नाही. खोलीसाठी कुठेतरी एक-दोन ठिकाणी नकार ऐकावा लागला म्हणून लागलीच कुणी स्वत:चे नाव बदलेल, हेही पटण्यासारखे नाही. शिवाय, खोली मिळवण्यासाठी खोटे बोलणारा, आता आपण अधिकारी होणार असल्याचे लक्षात येताच, धर्माभिमान जागृत झालेला एक तरुण भविष्यात या देशातील कुठल्याशा एका जिल्ह्याचा कारभार एकहाती सांभाळणार आहे, हेही वास्तव आहे. शेख-शुभम-शेख, अशी आपल्या संघर्षाच्या कहाणीची मांडणी करणार्या अन्वरने आणि त्याच्या समर्थनार्थ मैदानात उतरू पाहणार्यांनीही हे वास्तव ध्यानात घेतलेच पाहिजे...

No comments:
Post a Comment