कधीकाळी प्राधान्यक्रमावर असलेली शेती आता प्रत्येकाच्याच लेखी दुय्यम ठरते आहे. आपल्या पोरानं शेती करावी, असं खुद्द शेतकर्यालाही वाटेनासे झाले आहे. त्यामुळे गावातली पोरं ‘साहेब’ बनण्यासाठी शहरात दाखल होताहेत अन् गावाकडच्या शेतजमिनीचे ‘प्लॉट्स’ तयार होऊन विकायला काढले जाताहेत. कालपर्यंत स्वत: पिकवून बाजारात विकणारी माणसंच आता पोटापुरतं पिकवून उर्वरित गरज बाजारातून भागविण्याच्या बाता करू लागली. जगाचा पोशिंदा हताश, हतबल झाल्याचा तो परिणाम असला, तरी भविष्याच्या दृष्टीने हे चित्र काही तितकंसं चांगलं नाही. त्याच्या मनाला नवी उभारी दिली पाहिजे. तुझ्या भरवशावर सारा देश जगणार असल्याची बाब ध्यानात आणून दिली पाहिजे अन् त्याला त्याच्या जबाबदारीचे स्मरणही करून दिले पाहिजे. तोच खचला, तोच मनातून असा कोसळला तर सारेच संपेल, हेही त्याला सांगितलं पाहिजे. सार्या जगाच्या आशा पल्लवीत करण्याची ताकद त्याच्यात आहे, याची जाणीव त्याला करून दिली पाहिजे. या प्रयत्नांचा एक भाग म्हणजे ऍड. अनंत खेळकरांच्या दीर्घ रचनेतील या ओळी आहेत,
मधमाशीची दृष्टी ठेव
फुलांची काही कमी नाही
मधाच्या पोळासाठी मित्रा
कोणतीच रोजगार हमी नाही
घरटे उडते वादळात
बिळा, वारुळात पाणी शिरते
कोणती मुंगी, कोणतं पाखरू
म्हणून आत्महत्या करते?
अकोल्याचे ऍड. अनंत खेळकर यांच्या, हृदयाला भिडणार्या या रचनेतून बळीराजाच्या मनाला उभारणी देण्याचा प्रयत्न झालाय्. त्याला त्याच्या ताकदीचे स्मरण करून देण्याचा, डोक्यावरच्या कर्जाच्या ओझ्यापायी स्वत:ची जीवनयात्रा संपविण्यापासून परावृत्त करण्याचा, त्याला नवी उमेद देण्याचा, मरण्यासाठीच्या कारणांची त्याच्या लेखी कितीही लांबलचक यादी असेल, पण सर्वांगसुंदर जीवन जगण्याचीही कारणे तेवढीच प्रबळ आहेत. चराचरातील जीवजंतूही संकटांची तमा न बाळगता जगण्यासाठी धडपड करीत असतातच. मग सर्व प्राणिजगतात स्वत:ला श्रेष्ठ मानणार्या मानवाने का त्या संकटांची भीती बाळगून मरण पत्करावे?
पॅकेज आले, गळ्याभोवती फास आवळून घेणार्यांच्या कुटुंबीयांना लाखालाखांची मदत झाली, सरकारने पुढाकार घेतला, समाजातली काही हळहळणारी माणसंही सरसावली, अगदी सत्तांतरदेखील झाले... पण, शेतकर्यांच्या आत्महत्यांबाबतचे चित्र फारसे बदलल्याची परिस्थिती मात्र नाही. याचाच अर्थ, या आत्महत्यांच्या मुळाशी इतरही अनेक कारणे दडली आहेत. ज्यातून बाहेर पडण्याची कुणाचीच तयारी नाही अशा पिकांच्या परंपरागत पद्धतींपासून, तर समाजातील रूढी-परंपरांपर्यंतच्या बाबीही शेतकर्यांचे मानसिक खच्चीकरण करण्यास कारणीभूत ठरताहेत. घरात खाण्याची ददात असताना, हातात फुटकी कवडी नसताना, उसनवारी करून तेरवीला गावभोजन देण्याचा अट्टहास एरवी कोण कशाला करतो? मध्यमवर्गीयांच्या महागाईबाबतच्या कल्पनाही शेतकर्यांसाठी मारकच ठरताहेत इथे. बाजारातल्या पाण्याच्या बॉटलची किंवा शीतपेयांची किंमत इथे कधीच कुणालाच जास्त वाटत नाही; पण कांदा, गहू, डाळीचे भाव जरासे वाढले की, मात्र महागाई वाढल्याची लागलीच ओरड होते. पिझ्झा खूप महाग असतो, अशी तक्रार झाल्याचे कुणी कधी ऐकले आहे? पण, कापसाच्या दरातील जराशी वाढ हा सरकारपुढे उभा ठाकलेला नेहमीचाच मोठा पेच ठरतो. कारण मुळातच उद्योजकांना ती वाढ नको असते. मोठ्या संख्येतील मध्यमवर्गीय समाज कुठल्याही सरकारसाठी मतांच्या दृष्टीने एक महत्त्वाचा घटक. त्यामुळे त्याची जराशी घालमेल झाली की, लागलीच राजकीय पातळीवर त्याची दखल घेतली जाते. याउलट, विविध राजकीय पक्षांच्या पाठीशी पैशाचे बळ उभे करणार्या व्यापारी-उद्योजकांना तर कच्चा माल कायम जमेल तेवढ्या कमी किमतीत हवा असतो. त्यांच्यादृष्टीने कापूस, ऊस, धान्य कवडीमोल दरातच त्यांच्या पदरी पडले पाहिजे. बाजारात महागड्या दरात विकण्यासाठीचे कापड तयार करण्याकरिता लागणारा कापूस मात्र त्यांना मातीमोल भावातला हवा असतो. साखरेचे दर आकाशाला भिडावेत म्हणून प्रयत्नात असलेल्या कारखानदारांना, शेतकर्यांच्या हातात उसाचे पैसे सोपवताना मात्र कायम जिवावर येते.
वर्षानुवर्षे हे असेच चालले आहे. बळीराजाच्या पाठीवर थाप ठेवायला हात कुठले उठतच नाहीत. खरं तर आत्महत्येनंतरच्या सांत्वनापेक्षाही ही थाप अधिक महत्त्वाची. मेल्यानंतरच्या आर्थिक मदतीपेक्षाही मरणाच्या दारात जाण्यापासून रोखण्यासाठीचा धीर महत्त्वाचा. पण, नेमके तेच घडत नाही. ‘कांदा, मुळा, भाजी, अवघी विठाई माझी’ म्हणणारा सार्या जगाचा पोशिंदा कुणाकरवी नागवला गेला म्हणून आड्यावरचा दोर गळ्याभोवती आवळतो. आत्महत्या थांबाव्यात म्हणून पॅकेजच्या पैशाचा पाऊस पाडला गेला, दारापुढे जनावरे उभी झाली, सिंचनाच्या सोयी उभाराव्यात म्हणून प्रयत्न झालेत, इकडून-तिकडून पैशाच्या मदतीचे ओघही वाहिलेत, पण मनाने पाऽऽर खचलेल्या शेतकर्याला मानसिक बळ देण्याचे, त्याची हिंमत बांधण्याचे प्रयत्न जरासे तोकडेच पडले. अशात,
काळ्या आईचा लेक कधी
संकटांपुढे झुकला का?
कितीही तापला सूर्य तरी
समुद्र कधी सुकला का?
अशी विचारणा करून, मृत्यू हाच शेवटचा पर्याय नसल्याचे त्याला कुणीतरी सांगायला हवे ना! सहनुभूती मिळत असली, तरी रडणारी माणसं शेवटी दुबळीच ठरतात. सामर्थ्यवान बनायचं तर लढायलाच शिकलं पाहिजे. म्हणूनच,
घाबरू नको कर्जाला
भय, चिंता फासावर टांग
जीव एवढा स्वस्त नाही
सावकाराला ठणकावून सांग
असे मनाला धीर देणारे चार शब्द महत्त्वाचे. जगायला बळ देणारे. संकटांशी दोन हात करण्याची हिंमत देणारे. शोकसभेत उधळल्या जाणार्या खोट्याखोट्या स्तुतिसुमनांपेक्षाही लाखमोलाचे!

दरवेळी सरकारी मदतीकडे आस लावून बघण्याच्या भिकार प्रवृत्तीच्या पेकाटात लाथ मारण्याचाही प्रयत्न त्यातून झाला आहे.
सध्या मराठवाड्यात दुष्काळाची स्थिती आहे. जगभरातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. पण, नैराश्येच्या दारात उभे असतानाही उत्सव ‘साजरे करणे’ मात्र संपले नाहीत. तेरवीला गावभोजन अन् सणवारी भंडार्यातल्या भोजनावळी, याबाबतीत दुष्काळाचे सावट कुठेही जाणवत नाही. ही तर्हा बदलली पाहिजे. प्रथा-परंपरांचा सन्मान राखलाच पाहिजे, पण काळानुरूप बदलही स्वीकारता आले पाहिजे.
नेमक्या पेरण्यांच्या मुहूर्तालाच बाजारात जाणवणारा खतं-बियाण्यांचा तुटवडा, शेतकर्याला लुबाडण्याचा नफेखोर व्यापार्यांचा डाव, शेतमालाला भाव मिळावा म्हणून रस्त्यावर उतरून करावी लागणारी आंदोलनं... अस्मानी संकटांच्या साथीला अजून इतरही खूप सारी संकटं उभी ठाकलेली असतात शेतकर्यांपुढे. एकूणच परिस्थितीशी लढायचे असते त्याला. मनावर दु:खाचे मणभर ओझे बाळगून परिस्थितीशी निकराचा लढा द्यायचा, तर ते इतकं सोपंही नाहीच. पण, तसा लढा देण्याची ताकद निसर्गाने त्यालाच प्रदान केली आहे, हे कसं विसरता येईल? हा कवीही बळीराजाला तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय्... तो म्हणतो,
कष्टकर्याची जात आपली
आपणही हे शिकलं पाहिजे
पिंपळाच्या रोपासारखं
पाषाणावर टिकलं पाहिजे...