जीतनबाबू म्हणजे आपल्या त्या नितीशबाबूंचे खास पट्टशिष्य. ते काय खोटं थोडंच बोलणार आहेत? आणि त्यांनाही केवढी म्हणून काळजी आहे देशातल्या जनतेची. म्हणाले, पिऊ द्या पितात तर! थकून भागून येतात बिचारे घरी. अशात जेवायच्या आधी किंवा नंतर समजा घेतली एखाद्यानं थोडीशी, तर काय बिघडलं? बघा! जगभरातील तमाम मद्यप्रेमींच्या तारणहारानं भरतखंडातील बिहार नामक राज्यात अवतार धारण केला आहे. तशी नुसती वार्ताच कानी पडली, तर जीव भांड्यात पडलाय् कित्येकांचा. व्वा! मानलं आपण जीतनबाबूंना. नेता असावा तर असा. आपल्या राज्यातील नागरिकांच्या मेहनतीची दखल घेणारा. त्यांच्या भावना जपणारा. त्यांच्या गरजा जाणणारा. त्यांच्या आवडीनिवडींची जाणीव असणारा. थकल्या भागल्या माणसाला पाण्यापेक्षाही दारूची गरज अधिक असते, याची जाणीव असलेला ‘जाणता’ राजा म्हणतात तो यालाच!परवा एका जाहीर सभेत जीतनरामांनी ही मुक्ताफळे उधळली. तशी त्यांच्या ‘मुक्त’ चिंतनाची ही काही पहिली वेळ नव्हती. यापूर्वीही त्यांनी त्यांच्या विचारांच्या पुरोगामित्वाचे दर्शन घडवत तमाम प्रतिगाम्यांना चारीमुंड्या चीत केले आहे. त्याची इतिहासात सुवर्णाक्षराने नोंद अद्याप झाली नसली, तरी एकाहून एक अफलातून विधाने करण्यासाठी त्यांची ख्याती आहे.
लोकहो! चला, दारू पिऊया! अरे, असे बघता काय असे वेड्यासारखे? खरंच सांगतोय्. अरे, तुम्ही लोक दिवसभर एवढी मेहनत करता, कुटुंबाला एवढं जिवापाड जपता. त्यांच्या पालनपोषणार्थ चार पैसे कमावता. त्यासाठी रात्रीचा दिवस करता. काबाडकष्ट करून त्यांच्या उज्ज्वल भविष्याच्या चिंतेचे ओझे पाठीवर वाहता. कुणी थंड हवेच्या खोलीत बसून पांढरी कागदं काळी करतो, तर कुणी डोक्यावर भार वाहतो. कुणी शेतात राबराब राबतोय्, तर कुणी दगड फोडून घाम गाळतोय्. अशा तमाम मेहनती लोकांनी थकून भागून घरी आल्यावर जराशी ‘घेतली’ तर बिघडलं कुठे? आणि आता तर काय, स्वत: बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिलीय् आपल्याला. तर बेवडेहो! (सॉरी! बापुडेहो!) चला लागा कामाला. आजपासून आपण सारे जीतनराम मांझी यांचे चेले. त्यांनी दाखवलेल्या मार्गावरून चालत भविष्यात मार्गक्रमण करायचे आहे आपल्याला. ज्या मार्गावरून चालत ते बिहारच्या मुख्यमंत्रिपदापर्यंत पोहोचले, त्याच मार्गाने आपल्यालाही चालत जायचे आहे. आता जीतनबाबू म्हणजे आपल्या त्या नितीशबाबूंचे खास पट्टशिष्य. ते काय खोटं थोडंच बोलणार आहेत? आणि त्यांनाही केवढी म्हणून काळजी आहे देशातल्या जनतेची. म्हणाले, पिऊ द्या पितात तर! थकून भागून येतात बिचारे घरी. अशात जेवायच्या आधी किंवा नंतर समजा घेतली एखाद्यानं थोडीशी, तर काय बिघडलं?
बघा! जगभरातील तमाम मद्यप्रेमींच्या तारणहारानं भरतखंडातील बिहार नामक राज्यात अवतार धारण केला आहे. तशी नुसती वार्ताच कानी पडली, तर जीव भांड्यात पडलाय् कित्येकांचा. व्वा! मानलं आपण जीतनबाबूंना. नेता असावा तर असा. आपल्या राज्यातील नागरिकांच्या मेहनतीची दखल घेणारा. त्यांच्या भावना जपणारा. त्यांच्या गरजा जाणणारा. त्यांच्या आवडीनिवडींची जाणीव असणारा. थकल्या भागल्या माणसाला पाण्यापेक्षाही दारूची गरज अधिक असते, याची जाणीव असलेला ‘जाणता’ राजा म्हणतात तो यालाच!
परवा एका जाहीर सभेत जीतनरामांनी ही मुक्ताफळे उधळली. तशी त्यांच्या ‘मुक्त’ चिंतनाची ही काही पहिली वेळ नव्हती. यापूर्वीही त्यांनी त्यांच्या विचारांच्या पुरोगामित्वाचे दर्शन घडवत तमाम प्रतिगाम्यांना चारीमुंड्या चीत केले आहे. त्याची इतिहासात सुवर्णाक्षराने नोंद अद्याप झाली नसली, तरी एकाहून एक अफलातून विधाने करण्यासाठी त्यांची ख्याती आहे. कुणी मुलांच्या शिक्षणासाठी म्हणून थोडासा भ्रष्टाचार करत असेल, तर त्याचे तोंडभरून कौतुक करत त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप ठेवण्याची भाषा वापरली ती याच जीतनबाबूंनी. नितीशकुमारांच्या कार्यकाळातही भ्रष्टाचार झाला होताच की! मी स्वत:सुद्धा आमदार असताना एकदा लाच दिली होती, असे म्हणत स्वत:च्या कार्यकाळातल्या भ्रष्टाचाराचे निलाजरे समर्थन करणारे महाशय ते हेच! आपण स्वत: उंदीर खायचो असे सांगत, भोजनात उंदीर असणे ही काही फार आक्षेपार्ह बाब नसल्याचा दाखला देणारी जगातली ती महान व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून, दस्तुरखुद्द जीतनबाबूच ते व्यक्तिमत्त्व आहे. मुली या मुलांसाठी फ्रेण्ड बनवण्याकरताच असतात, असे निर्लज्जपणे सांगत आपल्या मुलाने मुलींना फिरवण्याचे जाहीर समर्थन करणारे धाडसी व्यक्तिमत्त्वही त्याच जीतनबाबूंमध्ये दडले आहे... काय कमाल आहे ना या माणसाची? किती म्हणून किती (अव)गुणं ठासून भरली आहेत या एका माणसात! कशाकशाचा उल्लेख करावा तेच कळत नाही बघा!
आपल्या राज्यातल्या नागरिकांनी दारू पिण्याचे समर्थन करत त्यांनी दिलेल्या ‘थोडी थोडी पिया करो’ च्या अनमोल संदेशाला आमचा लाख सलाम! खुद्द गालिबलाही लाजविणारे मद्यसेवनाचे हे खुले समर्थन भारतीय राजकारणाच्या इतिहासात अजरामर ठरणार, यात आम्हाला किंचितही शंका नाही.
तसेही या देशाला असल्या बोलघेवड्यांचे भारी कौतुक. त्यातही बेताल बडबडणार्यांना इथल्या माध्यमांत विशेष स्थान आहे. ती राखी सावंत असो की, मग कॉंग्रेसने मोकाट सोडलेले दिग्विजयसिंह, तो एम. एफ. हुसैन असो की मग आझम खान, ही सारी माणसं बुद्धीनं, कर्तृत्वानं उंच की खुजी, हा मुद्दा कधी नसतोच इथे. कारण ती जरा कुठे बरळली रे बरळली की, त्यांच्या तोंडून बाहेर पडलेले शब्द अलगद टिपण्यासाठी माध्यमातली हुशार माणसं कायम तत्पर असतात इथे. यातूनच मग परवाचा तो गुंडा पप्पू यादवही इथल्या सरकारला, प्रशासनाला कायदा आणि सुव्यवस्था कशी राखायची यावर उपदेश देऊन जातो. ज्याने कालपर्यंत केवळ तलवारीच उपसल्या, बंदुकी रोखून लोकांची लूट केली, गोळ्या झाडून दहशत निर्माण केली, तो दीडशहाणाही भारतातील सुरक्षा व्यवस्थेवर बोट ठेवतो, प्रशासनाला शहाणपण शिकवतो अन् प्रसार माध्यमातली कथित तज्ज्ञ मंडळी, सरकारविरुद्ध बरळणारा कुणीतरी आयताच हाती गवसल्याच्या आनंदात लीन होत त्याच्या शब्दाला मर्यादेपलीकडे महत्त्व देत सुटतात. त्याच्या बेताल बडबडीचीही मग ‘ब्रेकिंग न्यूज’ होते; आणि दुर्दैव असे की, ज्याने आयुष्यभर गुंडगिरी केली, ज्याच्यावर खुनाचे आरोप होते, त्याला कायदा व सुव्यवस्था या विषयावर बोलण्याचा नैतिक अधिकार तरी आहे का, हा प्रश्न इथे कुणाच्या डोक्यातही येत नाही.
खरं तर बिहारच्या मुख्यमंत्र्यांची तथ्यहीन बडबडही त्याच धाटणीतली. पण कोण प्रसिद्धी मिळवून गेली. सारे श्रेय या असल्या बेताल बडबडीच्या दर्दींचे.
दारूचे समर्थन हे तसेही लोकांच्या लेखी पुरोगामित्वाचे लक्षण. प्रत्येक राज्याच्या सरकारतर्फे चालविला जाणारा व्यसनमुक्ती विभाग म्हणजे केवळ शोभेचे बाहुले. बाकी खरी ‘कमाई’ करून देणारा विभाग तो अबकारीच! त्याचे जाहीर समर्थन करणारा मुख्यमंत्रीच गवसलाय् म्हटल्यावर त्या राज्याचं काय होणार, याची चिंता हवी कशाला? खरं आहे, लोकांनी दिवसभर राबराब राबावे. घरी आल्यावर थोडीशी दारू प्यावी आणि जीतनबाबू म्हणतात त्याप्रमाणे खुशाल ताणून द्यावी. सकाळी उठलं की पुन्हा गाड्याला जुंपले जाण्याची रीत सरकारच्या कृपेने वाट्याला आली आहेच. त्यात आनंद मानून आला दिवस घालवावा. भ्रष्टाचार, सरकारी तिजोरीची लूट, स्वत:च्या आणि आपल्या कुटुंबीयांच्या विकासाची जबाबदारी समर्थपणे पेलायला लालूप्रसाद, नितीशकुमार यासारखे समाजधुरीण जन्माला आले आहेतच या राज्यात. तेव्हा इतरांना हवी कशाला त्याची चिंता? रस्ते बांधले गेले काय, शाळेत शिकवण्यास पात्र शिक्षक नेमले गेले काय, घरात वीज उपलब्ध आहे काय, उद्योग चालताहेत काय, असल्या हाय-लेव्हलच्या प्रश्नांची उकल सर्वसामान्य जनता करू लागली, तर ‘परिवर्तन’ घडेल ना राज्यात? ते घडले तर सत्ता जाईल ना यांच्या हातून? सत्ता गेली तर मग जीतनबाबूंचे कसे होईल? सत्ता गेली तर लालू चारा कुठून खाईल अन् नितीशकुमारांना सरकारी बंगला कुठे मिळेल? तेव्हा लोकहो! तुम्ही उगाच असल्या उच्च दर्जाच्या विषयांकडे लक्ष नका देऊ! तुम्ही आपले दोन घूट की पेग काय म्हणतात ते घ्या अन् गुमान झोपा काढा. भ्रष्टाचाराचं सरकारवर सोडून द्या. ते बघून घेतील कुठल्या खात्यातनं किती पैसा लुटायचा ते! विकासाची वाट लावण्याची जबाबदारी ते सध्या पार पाडतातच आहेत. सामान्य लोक डोक्यानं विचार करू लागली की काय चमत्कार घडतो, ते लोकसभा निवडणुकीत सार्या देशानं बघितलं आहे. आता बिहारातही तसे घडले तर कित्येकांचे राजकारण धोक्यात येणार आहे. त्यामुळे लोकांनी डोक्याने विचार करू नयेच, कायम भावनेच्या, भीतीच्या वातावरणात वावरत लालू, नितीश, जीतन यांच्यापैकीच कुणालातरी आलटून पालटून सत्तेवर बसवत राहावे... हे घडायचे असेल, तर लोक शुद्धीत राहून चालणार नाही, याची जाणीव झाल्याने तर लोकांना बेधुंद ठेवण्यासाठीचा हा जीतनबाबूंचा संदेश नसेल ना ? ‘थोडी थोडी पिया करो’चा?
No comments:
Post a Comment