आता कोरोनाच्या प्रकरणात तरी काय वेगळे घडताहे? परवा, पंतप्रधानांचे भाषण संपल्याबरोबर सर्वात जास्त गर्दी किराणा दुकानात झाली होती. जणू काय उद्यापासून कुठल्याच वस्तू उपलब्ध राहणार नसल्याचा गैरसमज करून घेत, जमेल तितके साठवण्याच्या इराद्याने सारे पटापटा बाहेर पडले होते. पंधरा मिनिटांपूर्वीचे सोशल डिस्टंिंसगचे पंतप्रधानांचे आवाहन विसरून लोक गर्दी करून सामान विकत घेत होते. मुंबईच्या मोहम्मद अली रोडवर लागलेला कालचा बाजार अन् ‘असेच वागत राहिलात तर कोणीही वाचणार नाही हे लक्षात ठेवा’ या शब्दांतले पोलिस अधिकार्यांचे काकुळतीचे आवाहन, अमरावती जिल्ह्यात एका ठिकाणी लागलेला बाजार अन् तिथे खरेदीदारांनी केलेली गर्दी...सारंच अजब, अतर्क्य अन् अनाकलनीय आहे. दुर्दैव हे की शिकलीसवरलेली माणसंच अशी बेजबाबदार वागताहेत. शिक्षणातून माणसं घडतात म्हणे! वैचारिक उन्नती, विचारांची उंची गाठता येते म्हणे शिक्षणातून. चार पुस्तकं वाचली की जबाबदारीचे भान येते म्हणे माणसांत. पण इथे तर कशाचेच दर्शन घडत नाही या माणसांच्या वर्तनातून! की असला बेजबाबदारपणा हीच ओळख झालीय् अलीकडे सुशिक्षितांची?
कोरानाच्या पार्श्वभूमीवर तमाम जगतातील कथित सुशिक्षित, समंजस, सुजाण लोकांची वागण्याची जी विशुद्ध अनाकलनीय पद्धत वैश्विक पातळीवर सिद्ध होतेय्, ती बघितल्यावर इथे वांधा शिकलेल्या लोकांचाच असल्याचे स्पष्टपणे जाणवू लागले आहे. तिकडे रशियात लोकांनी घराबाहेर पडू नये म्हणून सरकारने सिंह रस्त्यावर सोडल्याची वार्ता असो की मग, कोरानामुळे अपरिहार्यपणे वाट्याला येऊ घातलेल्या लॉकडाऊनच्या धास्तीने बाजारपेठेत टायलेट पेपरवर तुटून पडलेल्या लोकांचा अमेरिकेतला किस्सा असो की मग भारतात, गेल्या रविवारी एक दिवसाचा ‘जनता कर्फ्यू’ यशस्वी झाल्याच्या उत्साहात रस्त्यावर गर्दी करून मोर्चे काढणार्या आणि पंतप्रधानांनी घरात बसायला सांगितले, त्यामागील उद्देशालाच हरताळ फासणार्या दीड शहाण्यांची रीत असो, याच वास्तवाची प्रचीती वारंवार येते आहे. विशेषत: अशा गंभीर प्रसंगातील भारतीयांचे बेजबाबदार वागणे तर संतापजनक ठरते आहे. लोकांनी एकमेकांपासून दूर राहावे यासाठी, अर्थव्यवस्था मोडीत निघण्याचा धोका पत्करून लॉकडाऊन जाहीर केले, पंतप्रधान, मुख्यमंत्री अतिशय गांभीर्याने घरात राहण्याचा, अगदीच अपरिहार्यतेशिवाय बाहेर न पडण्याचे आवाहन करीत असताना, लोक घराबाहेर नेमके कशासाठी पडत आहेत? रस्त्यांवरची वर्दळ काय, बाजारपेठांमधली गर्दी काय, मैदानावर चाललेल्या शिकल्या सवरलेल्या, आयटी क्षेत्रातील ज्ञानामुळे ‘हुशार’ ठरलेल्या तरुणाईच्या क्रिकेट मॅचेस काय... जणू काय एन्जॉय करायला लाभलेल्या सरकारी सुट्ट्यांचा हा काळ असल्यागत वागताहेत सारे!
तीन-चार वर्षांपूर्वीचा प्रसंग आहे. न्यूयॉर्कच्या विमानतळावरून मुंबईसाठीचे विमान सुटणार होते. तिथल्या नियम व पद्धतीनुसार प्रवाशांची आसक्रमांकानुसार विविध गटांत विभागणी करण्यात आली होती. त्या गटानुसारच बोिंर्डग पासधारकांनी विमानात प्रवेश करायचा होता. त्याचप्रमाणे पुकाराही होत होता. पण बहुतांश भारतीयांनी गटनिहाय व्यवस्था धुडकावून काऊंटरवर गर्दी केली होती. प्रत्येकाच्या हातात बोर्डिंग पास होता. प्रत्येकाचे आसनक्रमांक सुनिश्चित होते. अगदी शेवटच्या प्रवाशाला घेतल्याशिवाय विमान जागचे हलणार नव्हते. मग एकमेकांना मागे पाडून धडपडत पुढे सरकून विमानात शिरण्याची भारतीय प्रवाशांना झालेली घाई नेमके काय दर्शवित होती? कर्तव्यावर तैनात असलेली तिथली माणसं हा सारा तमाशा बघून हैराण होती. यांना आवरावं कसं हा प्रश्न तर होताच, पण हे लोक ‘असे’ का वागताहेत, हा खरा प्रश्न होता. शिकायला गेलेल्या तरुणांपासून तर फिरायला गेलेल्या जोडप्यांपर्यंत अन् मुलांकडे राहायला म्हणून आल्यावर आता परतीच्या प्रवासाला असलेल्या आजी-आजोबांपासून तर लहान चिल्ल्यापाल्यांपर्यंत सार्यांचेच वागणे एकसारखे होते. बेजबाबदारपणाचे !
आता कोरोनाच्या प्रकरणात तरी काय वेगळे घडताहे? परवा, पंतप्रधानांचे भाषण संपल्याबरोबर सर्वात जास्त गर्दी किराणा दुकानात झाली होती. जणू काय उद्यापासून कुठल्याच वस्तू उपलब्ध राहणार नसल्याचा गैरसमज करून घेत, जमेल तितके साठवण्याच्या इराद्याने सारे पटापटा बाहेर पडले होते. पंधरा मिनिटांपूर्वीचे सोशल डिस्टंिंसगचे पंतप्रधानांचे आवाहन विसरून लोक गर्दी करून सामान विकत घेत होते. मुंबईच्या मोहम्मद अली रोडवर लागलेला कालचा बाजार अन् ‘असेच वागत राहिलात तर कोणीही वाचणार नाही हे लक्षात ठेवा’ या शब्दांतले पोलिस अधिकार्यांचे काकुळतीचे आवाहन, अमरावती जिल्ह्यात एका ठिकाणी लागलेला बाजार अन् तिथे खरेदीदारांनी केलेली गर्दी...सारंच अजब, अतर्क्य अन् अनाकलनीय आहे. दुर्दैव हे की शिकलीसवरलेली माणसंच अशी बेजबाबदार वागताहेत. शिक्षणातून माणसं घडतात म्हणे! वैचारिक उन्नती, विचारांची उंची गाठता येते म्हणे शिक्षणातून. चार पुस्तकं वाचली की जबाबदारीचे भान येते म्हणे माणसांत. पण इथे तर कशाचेच दर्शन घडत नाही या माणसांच्या वर्तनातून! की असला बेजबाबदारपणा हीच ओळख झालीय् अलीकडे सुशिक्षितांची?
थुंकू नका म्हटलं तिथेच थुंकायचं. नेमक्या नो-पार्किंग झोनमध्येच गाड्या पार्क करायच्या. तसे करतानाही, आधी उभ्या असलेल्या गाड्या काढताना संबंधितांना अडचण होईल याची हमखास काळजी घ्यायची. तिकिटांपांसून तर प्रसादापर्यंतच्या प्रत्येकच गोष्टीसाठी रांगा तुडवून गर्दी करायची. रंगवू नका म्हटलं त्याच िंभती रंगवायच्या. तोंडातल्या पानाच्या पिचकार्यांनी लिफ्ट्स चे कोपरे रंगवायचे... वागण्याची हीच तर रीत आहे आपली. आणि आता कोरोना प्रकरणात सोशल डिस्टंिंसगचा नियम मोडून ढोलताशे बडवत गर्दी करून रस्त्यावर उतरलेत शहाणे? तपासण्या टाळून दवाखान्यातून पळून जाताहेत लोक? अरे! या विषाणूची साखळी मोडायची असेल, तर एकमेकांच्या संपर्कात येण्याचे टाळावे लागेल. म्हणून तर घराच्या बाहेर पडू नका म्हणून सांगताहेत सारे! त्यासाठीच तर सरकारी कार्यालयांपासून तर खाजगी उद्योगांपर्यंत सारेकाही बंद करून प्रचंड आर्थिक नुकसानीचा धोका देखील पत्करण्याची तयारी केलीय् सरकारने. वैश्विक पातळीवरही या विषाणूचा संसर्ग रोखण्याचा सोशल डिस्टंिंसग ‘हाच एकमेव’ पर्याय मानला गेला आहे. मग आपल्याला कळत नाहीय् का पंतप्रधान, मुख्यमंत्री, डॉक्टर्सच्या आवाहनाचे मर्म? चीन, इटलीतले भीषण चित्र बघून भीती वाटत नाही का लोकांना? की या विषाणूच्या संसर्गाची भीषणता ध्यानातच येत नाहीय् इथे कुणाच्या? महिनामहिनाभराच्या कालावधीसाठी जगरहाटी ठप्प होण्याची वेळ आलीय् इथे. घरातही एकमेकांपासून अंतर ठेवायला सांगताहे वैद्यकीय क्षेत्रातली तज्ज्ञमंडळी अन् सुशिक्षित तरुणाई मैदानावर क्रिकेटच्या मॅचेस खेळून ‘सुट्ट्या एन्जॉय’ करीत आहे? लोक सार्वजनिक ठिकाणी एकत्र येऊन, गर्दी करून सामान खरेदी करताहेत? अरे तुम्ही एकमेकांच्या संपर्कात येऊ नये म्हणून रेल्वेपासून तर एसटीपर्यंत सारंकही बंद करण्यात आलं आहे. आता तर विमानंही बंद केली जाताहेत. तरीही परिस्थितीचे गांभीर्य ध्यानात येत नसेल, आमच्या तर कठीण आहे सारंच. आता फक्त घराबाहेर पडू नका म्हणून प्रशासनाने प्रत्येकाच्या पाया पडायचे बाकी राहिले आहे. बरं सारंच बंद असताना रस्त्यांवर गर्दी करून लोक नेमके चाललेत कुठे? जीवनावश्यक वस्तू उपलब्ध होतील याची ग्वाही दिल्यावरही इतके अस्वस्थ का होताहेत सारे? की स्वत:ची जबाबदारी कळत नाहीय् आपल्याला? खरंच, एकवेळ पूर्ण अशिक्षित परवडले. पण, सुशिक्षितांचा मूर्खपणा म्हणजे कहर आहे...
====