Friday, March 29, 2019

हा न्यायालयीन अधीक्षेप की राजकारण?

डॉ. नरेंद्र दाभोळकर आणि पानसरे हत्याप्रकरणातील चौकशीच्या संथ गतीवरून काल न्यायालयाने मुख्यमंत्र्याच्या नावाने अक्षरश: शिमगा केला. आता यातही आम्हीच लक्ष घालायचे का, वगैरे प्रश्नांचा भडिमार त्याआडून आला. खरं तर, न्यायालयानेच मागील काही वर्षात आपल्या कार्याच्या कक्षा अकारण विस्तारल्या आहेत. लक्षावधी प्रकरणे न्यायदानासाठी वर्षानुवर्षे रखडली असताना, या न्याय व्यवस्थेला सार्वजनिक विषयांवरील अनेकानेक वादग्रस्त विषयांत लक्ष घालायला बर्‍यापैकी सवड होत असल्याचे चित्र त्यातून आपसूकच निर्माण झाले आहे. शिवाय मानवी जीवनाशी संबंधित कित्येक खाजगी विषयांवर व्यक्त होणारे न्यायालयाचे मत, दरवेळी गरजेचे असतेच असे नाही. पण तरीही अवैध संबंधांपासून तर सामाजिक मूल्यांबाबत शहाणपण शिकवणारी मतं प्रसूत होत राहतात, या व्यवस्थेकडून. गृह विभागाचा कारभार अखत्यारीत असला तरी, गोिंवद पानसरे आणि डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्याप्रकरणाची चौकशी काही स्वत: मुख्यमंत्री करीत नाहीयेत्‌, हे ठावूक असतानाही जर चौकशीच्या संथ गतीवर न्यायालयाला मुख्यमंत्र्यांवर ताशेरे ओढावेसे वाटत असतील, तर आजघडीला न्यायालयात निर्णयाविना पडून असलेल्या सुमारे तीन कोटी केसेसच्या बाबतीत, त्यात न्यायदानाला होत असलेल्या विलंबाबाबत कोणावर ताशेरे ओढायचे हेही स्पष्ट झाले पाहिजे.



लोकशाही व्यवस्थेचे स्तंभ मानल्या गेलेल्या न्याय प्रणालीचा इतर क्षेत्रातला कमालीचा हस्तक्षेप आक्षेपार्ह ठरू लागला असताना, साध्या साध्या, छोट्या छोट्या बाबतीत निर्देश देण्याची वेळ न्याय व्यवस्थेवर वारंवार येत असल्याचे चित्र असताना प्रशासनाचा निलाजरा कारभार पुन्हा वारंवार अधोरेखित होतोय्‌. एक काळ होता, तालुक्याच्या झुणका भाकर केंद्रावर भाकर खाऊन गेलेल्या ग्राहकांच्या यादीत मुख्यमंत्र्यांचे नाव दिसले तर बातमी व्हायची. सरकारी स्वस्त धान्य दुकानातून अमिताभ बच्चन यांना धान्य वितरीत झाल्याचा किस्साही जुना झाला आता. पण संगणक युगात मुख्यमंत्र्यांचे नाव वापरून बिअर बार आणि मुंबई मनपा आयुक्तांच्या नावाने हुक्का पार्लर जारी करणार्‍या प्रशासनाचे कौतुक करावे की चौकात उभे करून थोबाडं फोडून काढावीत एकेकाची, कळत नाही. झोपेत कामं चालली आहेत का यांची? दारू परवान्यासाठी ऑन लाईन अर्ज सादर होतात. त्याची तपासणी करणारी स्वतंत्र यंत्रणा अस्तित्वात आहे. किचकट कायद्यांच्या आडून ढीगभर कागदपत्रांची मागणी करणारी बाबू नावाची जमात, त्या कागदपत्रांची तपासणी करीत नाही. नामसादृश्याची शक्यता गृहीत धरली तरी राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे नाव नजरेखालून गेल्यावर संशय येत नाही कुणाच्याच मनात? सहजासहजी परवाने जारी होतात, त्याच नावाने? हे प्रशासन आहे की तमाशा? खिशात मावणार नाही एवढा पगार अन्‌ त्याहून दुप्पट वरकमाईवर दावा सांगणारे सारे सरकारी बाबू या असल्या तमाशासाठीच प्रसिद्ध पावले आहेत. सामान्य माणसाला दारातही उभे न करण्याची अन्‌ पैसे मोजेल त्याच्यापुढे लोटांगण घालण्याची त्यांची तर्‍हा सरकारच्या बदनामीसही कारणीभूत ठरते अनेकदा.
गोिंवद पानसरे आणि डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्याप्रकरणातील चौकशीच्या संथ गतीवरून काल न्यायालयाने मुख्यमंत्र्याच्या नावाने अक्षरश: शिमगा केला. आता यातही आम्हीच लक्ष घालायचे का, वगैरे प्रश्नांचा भडिमार त्याआडून आला. खरं तर, न्यायालयानेच मागील काही वर्षात आपल्या कार्याच्या कक्षा अकारण विस्तारल्या आहेत. लक्षावधी प्रकरणे न्यायदानासाठी वर्षानुवर्षे रखडली असताना, या न्याय व्यवस्थेला सार्वजनिक विषयांवरील अनेकानेक वादग्रस्त विषयांत लक्ष घालायला बर्‍यापैकी सवड होत असल्याचे चित्र त्यातून आपसूकच निर्माण झाले आहे. शिवाय मानवी जीवनाशी संबंधित कित्येक खाजगी विषयांवर व्यक्त होणारे न्यायालयाचे मत, दरवेळी गरजेचे असतेच असे नाही. पण तरीही अवैध संबंधांपासून तर सामाजिक मूल्यांबाबत शहाणपण शिकवणारी मतं प्रसूत होत राहतात, या व्यवस्थेकडून. गृह विभागाचा कारभार अखत्यारीत असला तरी, गोिंवद पानसरे आणि डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्याप्रकरणाची चौकशी काही स्वत: मुख्यमंत्री करीत नाहीयेत्‌, हे ठावूक असतानाही जर चौकशीच्या संथ गतीवर न्यायालयाला मुख्यमंत्र्यांवर ताशेरे ओढावेसे वाटत असतील, तर आजघडीला न्यायालयात निर्णयाविना पडून असलेल्या सुमारे तीन कोटी केसेसच्या बाबतीत, त्यात न्यायदानाला होत असलेल्या विलंबाबाबत कोणावर ताशेरे ओढायचे हेही स्पष्ट झाले पाहिजे. त्या विलंबाला जर ‘व्यवस्था’ दोषी असल्याचे न्यायालयाचे मत असेल, तर एकूणच ‘सरकारी’ व्यवस्थेला धारेवर धरले पाहिजे. एरवी सर्वसामान्य माणसाने दाखल केलेल्या प्रकरणात कशा तारखांवर तारखा मिळतात अन्‌ सलमानखानवर अटकेची कारवाई होताच त्याला जामीन जारी करण्याचा निर्णय कसा विक्रमी वेळेत होतो, याचा अनुभव तर घेते आहे या देशातली जनता. समर्थन कशाचेच नाही. पण, कोर्टात दाखल झालेल्या एखाद्या प्रकरणात तब्बल वीस-वीस, पंचेवीस-पंचेवीस वर्षांनी निर्णय घोषित करताना जराही खंत न वाटणार्‍या न्यायासनाला, अन्य यंत्रणेच्या माध्यमातून सुरू असलेल्या तपासातील विलंब जरासाही खपत नाही, हे नाही म्हणायला काहीसे आश्चर्यजनकच आहे.
 
भरपूर पगार, भरपूर वरकमाई, सुविधांचा पाऊस, सुट्यांची रेलचेल आणि जबाबदार्‍यांचे जराही झेंगट मागे नसलेल्या सरकारी यंत्रणेतील बाबूगिरी काय लायकीची आहे, काम करण्याची तिची काय तर्‍हा आहे, याची कल्पना न्याय व्यवस्थेला नाही असे थोडीच आहे? पण ती व्यवस्था कशासाठीच जबाबदार नसते, हे खरे दुर्दैव आहे. तिला चुकीसाठी शिक्षा नाही की झालेल्या नुकसानीसाठी दंड नाही. जनतेच्या कामाला उशिर झाल्याचा जाब देण्याची गरज नाही की, काम केले नाही म्हणून कुणी धारेवरही धरत नाही. त्यामुळे दिवसागणिक निर्धास्त, बेजबाबदार होत चालला आहे लोकशाहीचा हा स्तंभ. सामाजिक दायित्व तर सोडाच पण, ज्याच्या मोबदल्यात वेतन मिळते ते काम ईमानदारीने पूर्ण करण्याचे सौजन्यही सिद्ध करीत नाही इथे कुणी. कुणालाच खंत नसते कशाचीच.
 
मुख्यमंत्र्यांच्या, आयुक्तांच्या नावाने कुणीतरी अर्ज सादर करतो अन्‌ प्रशासकीय व्यवस्थेतून तो बिनदिक्कतपणे मंजूर होतो, हा चमत्कार का उगाच घडू शकतो या देशात? या परिस्थितीची पूर्ण कल्पना असलेल्या न्यायप्रणालीने आपल्या देशातील कार्यप्रणालीच्या कार्यपद्धतीवरही बोलले पाहिजे कधीतरी. त्याच्या मुजोरीने त्रस्त झाली आहे जनता. तिला तर भिकही घालत नाही इथे कोणीच. ना कार्यप्रणाली, ना न्याय व्यवस्था. शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये, ही म्हण खरी ठरविण्यासाठीच जणू धडपडताहेत सारे. हरवलेल्यांचा शोध घेण्याचे आदेश जारी करणे, सिनेमा प्रदर्शित करण्याचा निर्णय देणे, पालिका आयुक्ताच्या भूमिकेत रस्त्यांवरचे खड्डे बुजविण्याचे आदेश जारी करणे, हे खरंच न्यायालयाचे काम नाही. पण मग असली प्रकरणे दाखल करून का घेतली जातात? एखादा चित्रपटावर प्रदर्शनापूर्वीच बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका हा चित्रपट निर्मात्याच्या सुपीक डोक्यातून तयार झालेला, प्रसिद्धीचा अफलातून फंडा आहे, हे कळत नाही का न्याय व्यवस्थेला? मग का दुरुपयोग करू दिला जातो कुणालातरी न्याय प्रक्रियेचा? इतर प्रलंबित प्रकरणांकडे दुर्लक्ष करून या बाबींकडे लक्ष देण्याची वेळ न्यायाधीशांवर येणे ही खरं तर लाजिरवाणी बाब. पण, मुद्दा असा आहे की ही लाजिरवाणी परिस्थिती उद्धभवली कशी? कोण जबाबदार आहे त्यासाठी? का उठसूठ न्यायालयात धाव घेऊ लागले आहेत लोक आताशा? इथे न्याय मिळतो (?) हा विश्वास बळावलाय्‌ की कुणालातरी अद्दल घडवायची असेल, तर हे त्यासाठीचे हे ‘योग्य’ ठिकाण असल्याचा समज दृढ होतोय्‌ लोकांच्या मनात अलीकडे?
 
इतके घोटाळे झाले, राजकारण्यांच्या भ्रष्टाचाराची इतकी प्रकरणे अलीकडच्या काळात उजेडात आलीत. प्रशासनातील अधिकार्‍यांच्या सहकार्याविनाच घडू शकलीत ही प्रकरणं? मुंबईतला आदर्श घोटाळा तर राजकारणी आणि प्रशासनिक अधिकार्‍यांच्या आपसातील ‘सामंजस्याच्या’ अफलातून मिलाफाचा परिपाक होता. त्यावेळी मुख्यमंत्रिपदावर विराजमान अशोक चव्हाणांना त्या प्रकरणात राजीनामा द्यावा लागला. पण किती आयएएस अधिकार्‍यांवर कारवाई झाली? घोटाळा तर त्यांनीही केला होता. वाहत्या गंगेत हात तर त्यांनीही धुवून घेतले होते. फ्लॅट्‌स तर त्यांनीही लाटले होते. पण या घोटाळ्यासाठी ते जबाबदार ठरले नाहीत.
 
या एकूणच परिस्थितीचा परिणाम असा आहे की, सामान्य माणसाला कस्पटासमान वागवणारी एक मुजोर सरकारी यंत्रणा इथे अस्तित्वात आली आहे. त्याला पाठीशी घालणारी प्रणालीही सोबतीने उभी राहिली आहे. कधी न्याय व्यवस्थेच्या आडून तर कधी राजकारण्यांच्या वरदहस्ताने. त्यामुळे कार्यपालिकेच्या मुजोर वर्तणुकीला जाब विचारणारा कोणीच नाही. आताही बघा ना, पानसरे, दाभोळकर हत्या प्रकरण घडले या आधीच्या सरकारच्या काळात. खूप दिवसपर्यंत काहीच प्रगती दिसून येत नाही हे लक्षात आल्यावर न्यायालयाने विशेष तपास यंत्रणा नेमली. आधीच्या तपास यंत्रणेचा भोंगळ कारभार ध्यानात आल्यावरची ती कारवाई होती. आताही तपास यंत्रणेबाबत कुणीच काही बोलत नाहीय्‌. अगदी न्यायालय सुद्धा. 2013 मध्ये झालेल्या दाभोळकरांच्या हत्येप्रकरणाचे धागेदोरे गेल्या सहा वर्षात शोधू न शकलेल्या यंत्रणेच्या अपयशावर बोट ठेवायला खुद्द न्यायालयाही तयार नाही. त्यांनाही, या तपास यंत्रणेवर लक्ष ठेवणार्‍या गृहमंत्र्यांवर ताशेरे ओढून मोकळे होणे सोपे वाटले. खरंच, कोण कोणाची पाठराखण करतेय्‌ अन्‌ कोण कशाचे राजकारण करतेय्‌ हेच कळेनासे झाले आहे बघा...

Friday, March 22, 2019

मराठी टिकेल कशी?

आयुष्यभर मराठी माणसाच्या जिवावर राजकारण करीत राहिलेल्या शरद पवारांच्या घरातली पोरं इग्रजी भाषेतून उच्च शिक्षित झालीत. शक्य असतं तर पार्थने परवा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मंचावरून पक्ष कार्यकर्त्यांना इंग्रजीतूनही संबोधित केलं असतं. पण करता काय, राजकारण करायला मराठीचा आधार घ्यावाच लागतो. मग त्यानं कुणीतरी लिहून दिलेलं मराठीतलं भाषण त्याच्या शैलीत वाचून सिद्ध केलं. ते तुटकंफुटकं होतं हे एवढंच. तसेही, अस्खलित कसे असू शकणार होते ते भाषण? कागदावरचे वाचता येईल इतकाही संबंध ठेवला नाही त्यांनी कधी मराठीशी. एवढंच कशाला, जे कायम मराठीचा दुराग्रह धरतात, मराठी माणसाच्या हक्कासाठी यंव-त्यंव करण्याचा दावा करतात, त्या राज ठाकरेंची दोन्ही मुलंसुद्धा इंग्रजी शाळेतच शिकली आहेत. या नेत्यांनी त्यांच्या मुलांंना इंग्रजी शाळेत शिकवण्यावर आक्षेप नाहीच. आक्षेप, तरीही त्यांनी मराठीचा बेगडी दुरभिमान बाळगण्यावर आहे! आक्षेप, तरीही त्यांनी निलाजरेपणाने मराठीचे राजकारण करण्यावर आहे. त्यांच्या राजकारणाच्या या धामधुमीत, मराठी माध्यमांच्या शाळा बंद पडत असल्याचा मुद्दा कुणाच्याच दृष्टीने ऐरणीवरचा नसतो, याचे खरे शल्य आहे.


समाजमाध्यमांवर बर्‍याच दिवसांनी एका चांगल्या विषयावरची चर्चा ऐकण्याचा, बघण्याचा योग परवा आला. निमित्त तसं राजकीयच. पण, तरीही प्रत्येकाच्या आत्मभानाला स्पर्श करणारं. अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारं. अजित पवारांचे चिरंजीव पार्थ यांनी निवडणुकीच्या मैदानात उडी घेतल्यानंतरचं त्यांचं पहिलं भाषण. त्यातून झळकणारं इंग्रजाळलेपण. ‘पवार’ आडनावामुळे ओघानंच पदरी पडलेल्या मोठेपणाचा अपवाद सोडला, तर त्या भाषणाचं कौतुक किती करावं, हा प्रश्न बाकी उरतोच. अर्थात, मुद्दा त्या भाषणावर झालेल्या टीकेचा नाहीच. मुद्दा आहे, पवार घराण्यात जन्माला आलेल्या पार्थच्या कमकुवत मराठीचा. पण, तसा विचार केला तर या बिकट परिस्थितीचा तो एकटा प्रतिनिधी तरी कुठे आहे? शहर-खेड्यातल्या मराठी घरांतून एकदा डोकावलं तरी शेकड्यानं ‘पार्थ’ सापडतील, त्यांचं काय? एक पार्थ पवार धड मराठीतून बोलू शकत नसल्यावरून कुणाला त्याची खिल्ली उडवाविशी वाटत असेल, तर एकदा आपापल्या घरातल्या नव्या पिढीतील पोरांचं मराठी काय लायकीचंं आहे, याची खातरजमा करून घ्यावी सगळ्यांनी. कोण जबाबदार आहे या परिस्थितीला? कुणी केली मराठीची अशी दुर्दशा, याबाबतही सखोल चिंतन होण्याची गरज आहे, ती आहेच.
 
घरात मूल जन्माला आलं कीच शहरातल्या कुठल्याशा प्रतिष्ठित, नावाजलेल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील त्याचा प्रवेश निश्चित करणारी माणसं आपण. मग पुढे त्याच्या फाडफाड इंग्रजी बोलण्यावर भाळणारी, त्याला मराठीतले एकोणनव्वद, ब्याऐंशी, त्रेसष्ट हे आकडे कसे इंग्रजीत समजावून सांगावे लागतात, याचं चारचौघात कौतुक करणारी माणसं आपण... मराठी माध्यमांच्या शाळेत शिकण्यासाठी म्हणून आपल्या पोरांना धाडण्याची तयारी नसताना नगरपालिका, जिल्हा परिषदांच्या मराठी माध्यमांच्या शाळा ओस पडत चालल्या असल्याची खंत आपण नेमकी कशासाठी व्यक्त करतो? जगाच्या पाठीवर कुठेच नसेल, अशी विदेशी भाषेतून प्राथमिक शिक्षण देणारी व्यवस्था स्वीकारून बसलोय्‌ आपण. दोन मराठी माणसं एकमेकांना भेटलेत तरी आपसात हमखास इंग्रजी किंवा  हिंदीतून बोलतात. बारा कोटींची लोकसंख्या लाभलेल्या महाराष्ट्राची राजभाषा असलेल्या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्याचा प्रयत्न गेल्या कित्येक वर्षांत यशस्वी होऊ शकलेला नाही. गेल्या एका दशकाच्या काळात या राज्यातील मराठी माध्यमांच्या सुमारे सातशे शाळा बंद पडल्या आहेत. त्या जगविण्याचेही अजब तंत्र, एकूणच शासकीय धोरणांमधून अन्‌ लोकांच्या वर्तणुकीतून अंमलात आलेय्‌ इथे. मराठी माध्यमांच्या शाळांचे खच्चीकरण थांबवण्यासाठी त्या शाळांमधील अभ्यासक्रमांमध्ये इंग्रजीचा समावेश करण्याचा अफलातून निर्णय झाला. त्याचं कौतुकही झालं. त्यातून काही शाळा बंद पडायच्या थांबल्या. बाकी मराठीचे व्हायचे ते हाल झालेच. तरीही, वर्षानुवर्षे चालत आलेली धोरणं केराच्या टोपलीत टाकण्याची गरज कुणालाच कधीच जाणवली नाही.
 
तिकडे दक्षिणेकडील राज्यात मातृभाषेचा सर्वदूर आग्रह होतो. आग्रह कसला, दुराग्रह असतो. पण, म्हणून तिथल्या विद्यार्थ्यांचे इंग्रजी चांगले नाही असे कुठे आहे? आपल्याकडे मात्र, तसेही भविष्यात उच्च शिक्षण इंग्रजीतूनच घ्यायचे आहे म्हणून प्राथमिक शिक्षणापासूनच त्याचा आग्रह धरण्याची रीत अनुसरली जाते. त्याचे दुष्परिणाम हेच आहेत की, मग पाहुण्यांसमोर, पोराला इंग्रजीच्या तुलनेत मराठी बोलताना कशी अडचण होते, मराठीतले साधेसाधे शब्द, नात्यांसाठीचे शब्दप्रयोग त्याला इंग्रजीतून कसे समजावून सांगावे लागतात, याचेच कोडकौतुक मराठी माणसांना! वर पुन्हा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळत नसल्याची खंत व्यक्त करायला पुढाकार तर असतोच ना आपला! अनुदानाचे पैसे वाचविण्याच्या अजब तर्कटातून साकारलेले, इंग्रजी ज्ञानपीठांना विनासायास परवानगी बहाल करण्याचे धोरण, तिथे मराठीची दुर्गती झाली तरी त्याबाबत चकार शब्द न काढण्याची आपली तर्‍हा, केंद्रीय विद्यालयांमध्ये अगदी पहिल्या वर्गापासूनच मराठी कुंपणाबाहेर राहिली, तरी आपली पोरं इंग्रजी शिकत असल्याच्या वृथा अभिमानाच्या ओझ्याखाली दबून राहण्याची पद्धत, आपलीच मातृभाषा हद्दपार करायला पुरेशी ठरली आहे.
 
गेल्या काही दिवसांत ग्रामीण भागात वाढलेले इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे प्रस्थ, इंग्रजी भोषतून शिकलं तरच मोठं होता येते आणि मराठीतून शिकलं की भविष्याचे तीनतेरा वाजणे निश्चित असल्याचा जो गैरसमज गेल्या काही वर्षांत व्यवस्थितपणे रुजवण्यात आलाय्‌, त्याची फलश्रुती ही आहे, की आर्थिक स्थिती कशीही असो, घरातले शैक्षणिक वातावरण अनुकूल असो का प्रतिकूल, पोर इंग्रजी शाळेतच शिकलं पाहिजे, यासाठी पालकांचा आटापिटा सुरू होतो. शाळेचे शुल्क, पुस्तकं, त्याला सकाळी घरून घेऊन जाणारी व सायंकाळी शाळेतून घरी परत आणून सोडणारी गाडी, शाळेत वेगवेगळ्या निमित्ताने आयोजित होणार्‍या वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठीचा खर्च भागवण्यासाठी कर्ज, उसनवार्‍या करण्याचीही पालकांची तयारी असते. यातले काही विद्यार्थी, इंग्रजीतून शिक्षण झेपत नाही म्हणून मराठी माध्यमांच्या शाळांकडे वळतात. अन्यथा त्यांचीही ‘पहिली पसंती’ इंग्रजीच असते. आयुष्यात काही करायचं, नाव कमवायचं, पैसा कमवायचा तर गणित, इंग्रजी आणि विज्ञानावर भर दिला पाहिजे, हा तर अलिखित नियम आहे इथल्या प्रचलित शैक्षणिक धोरणांचा. यात इतर विषयांच्या सोबतीने मराठीची लक्तरेही आपसूकच खुंटीवर टांगली जातात. शिवाय, इंग्रजी शाळांमधून परत येऊन पुन्हा मराठीतून शिक्षण सुरू करेपर्यंत पाया व्हायचा तेवढा ठिसूळ झालेला असतो. खरंतर या प्रकरणात दोष, पोरांना आग्रहाने इंग्रजी शाळेत घालणार्‍या पालकांचा नाहीच. त्यांना तर पोरांचं भवितव्य घडवायचं आहे. दोष, इंग्रजीतून शिकलं तरंच हे भवितव्य शाबूत राहणार असल्याचे त्यांच्या मनात बिंबवणार्‍या व्यवस्थेचा आहे. त्यापायीच, शाळांमधून मराठी बाद झाल्याचे शल्यही आमच्या मनाला शिवत नाही अन्‌ इथल्या रस्त्यांवरच्या दिशादर्शक फलकांवर मराठीचा लवलेश नसला, तरी कुणाचेच काहीच बिघडत नाही.
 
आयुष्यभर मराठी माणसाच्या जिवावर राजकारण करीत राहिलेल्या शरद पवारांच्या घरातली पोरं इग्रजी भाषेतून उच्च शिक्षित झालीत. शक्य असतं तर पार्थने परवा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मंचावरून पक्ष कार्यकर्त्यांना इंग्रजीतूनही संबोधित केलं असतं. पण करता काय, राजकारण करायला मराठीचा आधार घ्यावाच लागतो. मग त्यानं कुणीतरी लिहून दिलेलं मराठीतलं भाषण त्याच्या शैलीत वाचून सिद्ध केलं. ते तुटकंफुटकं होतं हे एवढंच. तसेही, अस्खलित कसे असू शकणार होते ते भाषण? कागदावरचे वाचता येईल इतकाही संबंध ठेवला नाही त्यांनी कधी मराठीशी. एवढंच कशाला, जे कायम मराठीचा दुराग्रह धरतात, मराठी माणसाच्या हक्कासाठी यंव-त्यंव करण्याचा दावा करतात, त्या राज ठाकरेंची दोन्ही मुलंसुद्धा इंग्रजी शाळेतच शिकली आहेत. या नेत्यांनी त्यांच्या मुलांंना इंग्रजी शाळेत शिकवण्यावर आक्षेप नाहीच. आक्षेप, तरीही त्यांनी मराठीचा बेगडी दुरभिमान बाळगण्यावर आहे! आक्षेप, तरीही त्यांनी निलाजरेपणाने मराठीचे राजकारण करण्यावर आहे. त्यांच्या राजकारणाच्या या धामधुमीत, मराठी माध्यमांच्या शाळा बंद पडत असल्याचा मुद्दा कुणाच्याच दृष्टीने ऐरणीवरचा नसतो, याचे खरे शल्य आहे.
 
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्याचा मुद्दा विधिमंडळात होणार्‍या राज्यपालांच्या अभिभाषणात वर्षानुवर्षे कायम असतो, निदान याची तरी खंत बाळगली जावी ना कधीतरी! संस्कृतच्या धर्तीवर मराठी भाषेसाठीही स्वतंत्र विद्यापीठ असावे, राष्ट्रभाषा प्रचार समितीच्या धर्तीवर मराठीच्याही वेगवेगळ्या परीक्षा असाव्यात, इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधून किमान दहावीपर्यंत मराठी विषय अनिवार्य असावा, दक्षिणेकडील राज्यांनी अनुसरलेल्या प्रथेनुसार मातृभाषेचा आग्रह इथेही धरला जावा, निदान प्राथमिक शिक्षणाच्या बाबतीत तरी मराठी माध्यमाचा आग्रह असावा...
 
शिवाय दरवेळी केवळ सरकारकडूनच सार्‍या अपेक्षा व्यक्त करायच्या अन्‌ आपण आपले गुमान गप्प बसायचे, असे वागणेही नको! मराठीला मानाचे स्थान मिळवून देण्याची जबाबदारी शेवटी लोकांचीही आहेच. त्यांनीही पुढाकार घेतला पाहिजे मराठीसाठीचा लढा उभारण्याकरिता. असे काही उपाय योजले गेले, तर पार्थच्या मराठी भाषेच्या तोकड्या ज्ञानावरून कुणी बोटं मोडण्याची गरज उरणार नाही. अन्यथा, लक्षावधी रुपयांचे सरकारी अनुदान, साहित्य संमेलनांच्या आयोजनात खर्ची घातले काय अन्‌ विश्वकोशांच्या संगणकीकरणाचे प्रस्ताव मांडले गेले काय, मराठीच्या विपन्नावस्थेत बदल घडून येण्याची शक्यता शून्यच असणार आहे...

Saturday, March 16, 2019

चीनच्या विरोधावर नाही, आक्षेप राहुलच्या बरळण्यावर आहे!


अर्थात, राहुल गांधींनी ‘आपल्या’ देशाच्या पंतप्रधानांची किंमत मातीमोल करण्याचा हा काही पहिला प्रसंग नव्हे. मुळात, ती गांधी घराण्याला लागलेली घाणेरडी सवय आहे. त्या घराण्याच्या पलीकडे कुणी पंतप्रधान बनण्याच्या लायकीचा असल्याचे त्यांना कधीच मान्य नसते. या घराण्यात आपण पंतप्रधान बनण्यासाठीच जन्माला आलो असल्याच्या गैरसमजात ते वावरत असतात. त्यांना सोडून इतर कुणी त्या पदावर आले की ते त्यांना सहन होत नाही. मग पंतप्रधानासारख्या बड्या पदावरील व्यक्तीच्या अवमानाच्या क्लृप्त्या अंमलात येतात, गांधी घराण्यातील सदस्यांकडून. याला ना लालबहादूर शास्त्रींचा अपवाद राहिला, ना मोरारजी देसाईंचा. ना पी. व्ही. नरिंसह राव त्यातून सुटले, ना डॉ. मनमोहनिंसग. नरेंद्र मोदी तर आहेतच भाजपाचे. ‘‘गांधी घराण्यातील कुणी पंतप्रधानपदी विराजमान असता तर बाबरी ढाचा पडला नसता,’’ हे विधान असो, की मग डॉ. मनमोहनिंसगांच्या स्वाक्षरीचा कागद पत्रकारांसमोर फाडून हवेत भिरकावण्याचा ‘तो’ प्रसंग... अरे, पंतप्रधानच कशाला, यांना तर कॉंग्रेसच्या अध्यक्षपदावरदेखील गांधी घराण्यापलीकडे कधी कुणी चालला नाही. बसलाच कुणी त्या पदावर, तर कायम त्याचा अपमान करण्याच्या संधी शोधल्यात यांनी. त्यामुळे राहुल यांनी मोदींची टर उडवणे, हा गांधी घराण्याच्या परंपरेचा भाग आहे.



आक्षेप चीनच्या भारतविरोधी भूमिकेवर नाहीच. आक्षेप, राहुल गांधींनी चीनची री ओढण्यावर आहे. चीनने भारतविरोधात पावलं टाकण्यात नवीन काय आहे? पण, गांधी घराण्यातील स्वयंघोषित राजपुत्राला त्याबाबत आनंदाच्या उकळ्या फुटण्याची तर नवलाई आहेच ना! यापूर्वीच्या सत्रात तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी पाकिस्तानविरोधातील भूमिका युनोच्या मंचावर अधिकृतपणे मांडली होती. त्या वेळीही चीन आडवा आला होताच. कणखर भारताला उगाच मलूल व्हावे लागले होते त्या वेळी. पण, म्हणून भारताच्या संसदेत विरोधी बाकांवर बसणार्‍यांपैकी कुणी आनंदाने टाळ्या पिटल्या नाहीत तेव्हा, कॉंग्रेसच्या पंतप्रधानांची नाचक्की झाली म्हणून. जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या असलेल्या मसूद अझहरला आंतराष्ट्रीय दहशतवादी ठरवण्यासाठी म्हणून आंतरराष्ट्रीय सुरक्षा परिषदेत आलेल्या प्रस्तावाला पार्श्वभूमी भारतातील पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याची असली, तरी तो प्रस्ताव भारताच्या पंतप्रधानांनी मांडलेला नाही. तो अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स आदी देशांच्या पुढाकारातून पटलावर आलेला प्रस्ताव आहे. त्याला चीनने प्रखर विरोध करण्याचे तीव्र पडसाद त्या त्या देशांच्या राजकीय भूमिकेवर भविष्यात उमटणारच आहेत. पाकिस्तानी दहशतवादाचा मुक्तभोगी असलेल्या भारताला त्या निर्णयाच्या परिणामांपासून स्वत:ला वेगळे ठेवता येणार नाही, हे खरे असले तरी चीनच्या मुजोरीला लागलीच भारताच्या पराभवाच्या तराजूत तोलून त्याआडून मोदींना अपयशी ठरविण्याच्या नादात आपण आपल्या देशाच्या नुकसानीचा निलाजरेपणाने बाजार मांडतोय्‌ याचेही भान, शंभर वर्षांचा इतिहास लाभलेल्या एका राजकीय पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाला उरले नसेल, तर त्या पक्षातील बुजुर्गांनी आपल्या अध्यक्षाला शहाणपणाच्या चार गोष्टींचा कानमंत्र देण्याची गरज आहे. अजून किती हसे करून घेणार आहेत ते स्वत:चे अन्‌ पक्षाचेही?
 गेले काही दिवस आंतरराष्ट्रीय राजकारणातले परिवर्तन सारे जग बघते आहे. चीनने पाकिस्तानच्या बाजूने उभे राहण्याला, भारताविरुद्ध उभे ठाकण्याला काही संदर्भ आहेत. काही कारणे आहेत. त्याची भूमिका भारताला कडवा प्रतिस्पर्धी मानण्यातून साकारली आहे. इथे पंतप्रधानपदी कोण विराजमान आहे, यावरून त्यांच्या वागण्याची दिशा ठरत नाही. तसे नसते तर नेहरू पंतप्रधान असताना त्यांनी आमच्याविरुद्ध युद्ध पुकारले नसते. अगदी, भविष्यात कधी चुकीने राहुल गांधीही या देशाचे पंतप्रधान झाले, तरी चीनच्या वागण्यात परिवर्तन घडून येण्याची शक्यता सुतराम नाही. या प्रकरणात अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स आदी देशांनी भारताच्या बाजूने भक्कमपणे उभे राहण्यामागील कारणांचे अवलोकन केले तर ही बाब लक्षात येईल की तो, भारताच्या मागील कालावधीत वाढलेल्या ताकदीचा जसा परिणाम आहे, तशीच त्याला त्या देशांच्या चीनविरोधाची किनारदेखील आहे. प्रत्येकाचेच स्वत:चे असे राजकारण आहे इथे. त्यामुळे कुणी बाजूने उभे राहिले म्हणून हुरळून जाण्यात अर्थ नाही, तसेच कुणी विरोधात उभे ठाकले म्हणून लगेच अश्रू ढाळण्याचेही कारण नाही. आंतरराष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सदस्यत्व बहाल करण्यासाठीचा प्रस्ताव दाराशी आलेला असताना, स्वत:ला कमकुवत घोषित करून त्या सदस्यत्वाचे दान चीनच्या पदरात टाकण्याचे पाप पंडित नेहरूंनी केले होते. तोच चीन, त्याच सुरक्षा परिषदेच्या मंचावर आज भारताविरुद्ध दंड थोपटून उभा आहे. इतिहास सांगतो की, सार्‍या जगाला दहशतवादी वाटणारा मसूद अझहर चीनला मात्र आजवर कायम देवदूत वाटत आला आहे. त्याच्यावरील कारवाईला त्या देशाने यापूर्वी निदान चार वेळा विरोध केला आहे. अगदी भारताच्या पंतप्रधानपदी कॉंग्रेसचा नेता विराजमान असतानासुद्धा! फरक फक्त एवढाच आहे की, त्या वेळी राजकारणाची खेळी खेळण्यासाठी कुणी त्याबाबत आनंद व्यक्त केला नव्हता, की आपल्या पंतप्रधानांवर कुणी तुटूनही पडले नव्हते. दुर्दैवाने, आज मात्र तसे घडते आहे. शेजारी देशाच्या भूमिकेवरून ‘आपल्या’ देशाच्या पंतप्रधानांची खिल्ली उडविण्याची तर्‍हा खुज्या राजकारणापायी अनुसरली जात आहे.
 
अर्थात, राहुल गांधींनी ‘आपल्या’ देशाच्या पंतप्रधानांची किंमत मातीमोल करण्याचा हा काही पहिला प्रसंग नव्हे. मुळात, ती गांधी घराण्याला लागलेली घाणेरडी सवय आहे. त्या घराण्याच्या पलीकडे कुणी पंतप्रधान बनण्याच्या लायकीचा असल्याचे त्यांना कधीच मान्य नसते. या घराण्यात आपण पंतप्रधान बनण्यासाठीच जन्माला आलो असल्याच्या गैरसमजात ते वावरत असतात. त्यांना सोडून इतर कुणी त्या पदावर आले की ते त्यांना सहन होत नाही. मग पंतप्रधानासारख्या बड्या पदावरील व्यक्तीच्या अवमानाच्या क्लृप्त्या अंमलात येतात, गांधी घराण्यातील सदस्यांकडून. याला ना लालबहादूर शास्त्रींचा अपवाद राहिला, ना मोरारजी देसाईंचा. ना पी. व्ही. नरिंसह राव त्यातून सुटले, ना डॉ. मनमोहनिंसग. नरेंद्र मोदी तर आहेतच भाजपाचे. ‘‘गांधी घराण्यातील कुणी पंतप्रधानपदी विराजमान असता तर बाबरी ढाचा पडला नसता,’’ हे विधान असो, की मग डॉ. मनमोहनिंसगांच्या स्वाक्षरीचा कागद पत्रकारांसमोर फाडून हवेत भिरकावण्याचा ‘तो’ प्रसंग... अरे, पंतप्रधानच कशाला, यांना तर कॉंग्रेसच्या अध्यक्षपदावरदेखील गांधी घराण्यापलीकडे कधी कुणी चालला नाही. बसलाच कुणी त्या पदावर, तर कायम त्याचा अपमान करण्याच्या संधी शोधल्यात यांनी. त्यामुळे राहुल यांनी मोदींची टर उडवणे, हा गांधी घराण्याच्या परंपरेचा भाग आहे.
बरं, आपण काय बोलतोय्‌, कशाबाबत बोलतोय्‌, याचे तरी भान राखावे ना एवढ्या मोठ्या राजकीय पक्षाच्या एका राष्ट्रीय स्तरावरील पदाधिकार्‍याने? तर तेही नाही. बरं, राहुल यांची अडचण अशी झाली आहे की, त्यांनी स्वत:भोवती चेल्याचपाट्यांची गर्दीही अशी जमवून ठेवली आहे की, त्यांना ग्रामपंचायत निवडणुकीत करावयाचे राजकारण अन्‌ आंतरराष्ट्रीय पातळीवर करावयाचे राजकारण यातील भेदाची कल्पनाही आहे की नाही, याबाबत शंका उपस्थित व्हावी. तसे नसते तर असली पातळीविहीन, हास्यास्पद विधाने त्यांनी केली नसती. निदान देशाबाहेरील शक्तींशी लढताना तरी हा देश, इथले सारे राजकीय नेते एक असल्याची प्रचीती त्यांनी जगाला आणून दिली असती.
 
पाकिस्तानची शकले पाडून बांगलादेशची निर्मिती झाली तेव्हाचा तो प्रसंग अजून हा देश विसरलेला नाही. आपसातले राजकारण मागे टाकून इंदिराजींच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याची अटलजींची भाषा अजून स्मरणात आहे लोकांच्या. कॉंग्रेस पक्षात कुणीच सांगत नसेल का राहुल यांना, अशा प्रसंगात कसे वागायचे असते ते? निवडणुकीचे राजकारण निवडणुकीपुरते असते. तो आयुष्यभर जगण्याचा विषय नसतो. युद्धाच्या प्रसंगात तर देश एकसंध असल्याचे वर्तणुकीतून सिद्ध करण्याचाच ध्यास असला पाहिजे प्रत्येकाचा. पण, इथे तर देशात दुफळी माजली असल्याचे चित्र निर्माण करण्याचीच अहमहमिका लागली आहे प्रत्येकात. नरेंद्र मोदी तुम्हाला पंतप्रधान नको आहेत, भाजपा तुम्हाला सत्तेत आलेली नकोय्‌, त्यासाठीच तुमचा हा सारा जळफळाट चालला आहे, हे तर स्पष्टच आहे. पण, म्हणून आपल्या पंतप्रधानांची टर उडवण्यासाठी, त्यांना कमी लेखण्यासाठी चीनची भलावण करत सुटणार का निर्लज्जांनो? तो मसूद अझहर दहशतवादी असल्याचे सारे जग मान्य करते. अमेरिका, इंग्लंड, फ्रान्ससारखे देश त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर दहशतवादी घोषित करण्याची प्रक्रिया आरंभतात. त्यासाठी सुरक्षा परिषदेत प्रस्ताव मांडला जातो. केलाच चीनने विरोध, तर तो विरोध झुगारून अन्य मार्गाने मसूदवर कारवाई करण्याची कणखर भूमिका उर्वरित जगाने स्वीकारणे, हा भारताच्या रणनीतीचा विजय नव्हे? मग, ज्यात जरासेही आश्चर्य नाही त्या चीनच्या विरोधात मोदींचा पराभव शोधून त्याचे हीन दर्जाचे राजकारण करण्याचा अट्‌टहास कशासाठी चाललाय्‌? भारताचे मोठे होणे जगात कुणालाच नको आहे. मग, शेजारच्या बलाढ्य चीनला ते नको असण्याचे आश्चर्य ते काय असणार आहे? अर्थव्यवस्थेपासून तर आंतरराष्ट्रीय संबंधांपर्यंतच्या क्षेत्रात भारत दिवसागणिक मजबूत होत असल्याची खात्री अमेरिकेपासून जगातल्या इतर देशांना पटू लागली आहे. चीनचा विरोध पत्करून त्यांनी भारताच्या बाजूने उभे राहणे, हा त्याचाच परिपाक आहे. हे राहुल गांधींना उमजत नसेल, त्यांना ते समजावून सांगण्याची गरज त्यांच्या सभोवतालच्या चेल्याचपाट्यांनाही वाटत नसेल, तर आता परमेश्वरानेच सद्बुद्धी द्यावी या बिचार्‍या कॉंग्रेसजनांना!

Friday, March 1, 2019

का नको युद्ध?



जणूकाय भारताला युद्धाची खुमखुमी आहे आणि पाकिस्तान तर जणूकाय जगभरात शांतता नांदावी यासाठीच प्रयत्नशील आहे, अशा थाटातली विधाने तमाम शहाण्यांकडून प्रसृत होऊ लागली आहेत. त्यातही वेदनादायक हे की, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनिंसग यांचाही त्याला अपवाद नाही. दोन्ही देशांनी आततायीपणा न करता शांतीच्या मार्गाने जाण्याचा सल्ला देऊन मोकळे झालेत साहेब! कोणाला देताहेत डॉ. मनमोहनिंसग हा सल्ला? भारताला? भारताने आततायीपणा केला चकोटी- बालकोटमध्ये? अरे, २६/११ च्या हल्ल्यानंतर तुम्ही द्यायला पाहिजे होतं असं चोख उत्तर पाकिस्तानला! पुन्हा हिंमत झाली नसती त्याची भारताकडे मान वर करून बघण्याची. पण, तुम्ही तर कायम शांतीचे पांढरे निशाण फडकावत राहिलात. त्याचे परिणाम सारा देश भोगतोय्‌ आज. भारत काय हल्लेखोर आहे? अरे, युद्ध जिंकून काबीज केलेला रावळिंपडीपर्यंतचा भाग पाकिस्तानला परत करण्याची दानत आहे या देशाची. २६/११ च्या हल्ल्यानंतरही स्वत:चीच लाज झाकत, जगापुढे पुरावे सादर करीत राहिलो आम्ही. हल्लेखोर कसाबला त्याची बाजू मांडता यावी म्हणून न्यायालयात भारताचे वकील उभे केलेत आम्ही. अजून काय करायला पाहिजे हो, शांतीची बूज राखण्यासाठी? पुलवामा घटनेनंतर तरी काय करायला पाहिजे होते भारताने? आर्जवं करायला हवी होती, की विनवण्या करायला हव्या होत्या दहशतवाद्यांना, की नका मारू आमच्या जवानांना या पद्धतीने म्हणून!



पुलवामा घटनेतील चाळीस भारतीय जवानांची शहादत आणि बालकोट-चकोटीत दिले गेलेले त्याचे प्रत्युत्तर... एक सशक्त देश म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची जी देदीप्यमान प्रतिमा साकारली, त्याचा अभिमान बाळगणार्‍यांच्या तुलनेत कथित ‘युद्धतज्ज्ञां’च्या एका नव्याच जमातीची पैदास गेल्या काही दिवसांत इथे उपजली आहे. पाकिस्तानने बोलणीची भाषा वापरल्यानंतर आपण युद्धाची ठिणगी पेटवणे कसे गैर आहे, याबाबत अक्कल पाजळण्यास ती जमात एव्हाना सिद्ध झाली आहे. युद्धनीती, युद्धाबाबतचे ऐतिहासिक दाखले सादर करत, अभ्यासक- चिंतकांच्या आविर्भावात त्याचे विश्लेषण आणि त्यायोगे युद्धाच्या दुष्परिणामांची गणितं जगासमोर मांडण्याची अहमहमिकाही यानिमित्ताने सुरू झाली आहे. हे भारताचं दुर्दैव आहे की, स्वाभिमानाच्या तुलनेत लाचारी पत्करून शांततेचे गोडवे गाणारी जमात इथे अधिक प्रभावी आहे. आताही नेमकी तीच पोपटपंची चालली आहे सर्वदूर. दहशतवाद्यांची बालकोटातील प्रशिक्षण तळं उडवण्याची कारवाई, पुलवाम्यात त्यांनी घडवलेल्या हिंसाचाराला दिले गेलेले प्रत्युत्तर होते. ते अत्यावश्यक होते. केवळ पाकिस्तानलाच नव्हे, तर वैश्विक पातळीवर भारताच्या सामर्थ्याचे अन्‌ भूमिकेचेही दर्शन घडण्यासाठीही त्याचे वेगळे महत्त्व होते. याच्या नेमके उलट, पाकिस्तानने पुढच्या चोवीस तासात स्वत:चे विमान भारतीय हद्दीत घुसविण्याचा प्रयोग करून सार्‍या विश्वाच्या साक्षीने स्वत:चे हसे करून घेतले, अपरिपक्वतेचे सार्वजनिक प्रदर्शन केले... दोन देशांतल्या बोलणीची गरज तर इम्रान खान यांना त्यानंतर सुचली आहे. त्यापूर्वी अमेरिका, चीन अशा कोणी कोणी, किती कितीवेळा त्याची कानउघाडणी केली कुणास ठाऊक, पण इम्रान यांना उशिरा सुचलेल्या शहाणपणाचे कारण त्यात दडले आहे.
जणूकाय भारताला युद्धाची खुमखुमी आहे आणि पाकिस्तान तर जणूकाय जगभरात शांतता नांदावी यासाठीच प्रयत्नशील आहे, अशा थाटातली विधाने तमाम शहाण्यांकडून प्रसृत होऊ लागली आहेत. त्यातही वेदनादायक हे की, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनिंसग यांचाही त्याला अपवाद नाही. दोन्ही देशांनी आततायीपणा न करता शांतीच्या मार्गाने जाण्याचा सल्ला देऊन मोकळे झालेत साहेब! कोणाला देताहेत डॉ. मनमोहनिंसग हा सल्ला? भारताला? भारताने आततायीपणा केला चकोटी- बालकोटमध्ये? अरे, २६/११ च्या हल्ल्यानंतर तुम्ही द्यायला पाहिजे होतं असं चोख उत्तर पाकिस्तानला! पुन्हा हिंमत झाली नसती त्याची भारताकडे मान वर करून बघण्याची. पण, तुम्ही तर कायम शांतीचे पांढरे निशाण फडकावत राहिलात. त्याचे परिणाम सारा देश भोगतोय्‌ आज. भारत काय हल्लेखोर आहे? अरे, युद्ध जिंकून काबीज केलेला रावळिंपडीपर्यंतचा भाग पाकिस्तानला परत करण्याची दानत आहे या देशाची. २६/११ च्या हल्ल्यानंतरही स्वत:चीच लाज झाकत, जगापुढे पुरावे सादर करीत राहिलो आम्ही. हल्लेखोर कसाबला त्याची बाजू मांडता यावी म्हणून न्यायालयात भारताचे वकील उभे केलेत आम्ही. अजून काय करायला पाहिजे हो, शांतीची बूज राखण्यासाठी? पुलवामा घटनेनंतर तरी काय करायला पाहिजे होते भारताने? आर्जवं करायला हवी होती, की विनवण्या करायला हव्या होत्या दहशतवाद्यांना, की नका मारू आमच्या जवानांना या पद्धतीने म्हणून!
या जगाला ‘इट का जवाब पत्थरसे’ दिला तरच त्याचे महत्त्व कळते. ९/११ नंतर अमेरिकेने ज्या तर्‍हेने लादेनला ठेचला अन्‌ जगादेखत त्याच्या चिंधड्या उडवल्या, तीच भाषा कळते दहशतवाद्यांना. युद्धखोरी हा भारताचा स्वभाव नाही. तो तर भारतीयांचाही स्वभाव नाही. युद्धाच्या दुष्परिणामांची त्याला कल्पना नाही, असेही नाही. त्याची त्याला पर्वा नाही, असे तर मुळीच नाही. युद्ध कुणालाच परवडणारे नसते, ती एक न संपणारी प्रक्रिया असते, हे इम्रान खान अन्‌ भारतातल्या काही दीडशहाण्यांना जसे ठाऊक आहे, तसेच सर्वसामान्य भारतीयांनाही त्याची पूर्ण कल्पना आहे. त्यांनातरी कुठे हवे आहे युद्ध? इतकेच कशाला, सीरियात ज्या जिहादाच्या नावे बंदुकी ताणून दहशत पसरवली जाते ना, रोजरोजच्या त्या दहशतीला तर तिथले मुस्लिमही कंटाळले आहेत. नको तो जिहाद, म्हणत तो देश सोडून इतरत्र आसरा शोधण्याच्या भूमिकेपर्यंत आले आहेत ते.
त्यामुळे पहिल्या, दुसर्‍या महायुद्धाचे दाखले देत युद्धाच्या दुष्परिणामांचा पाढा वाचण्याच्या भानगडीत कुणी नाही पडले तरी बिघडणार नाही इथे कुणाचेच काही. परवा पाकिस्तानच्या संसदेत भाषण करताना तिथल्या पंतप्रधानांनीही शांती आणि अमनचे जे गोडवे गायिले, अफगाणिस्तानादी देशातील विद्यमान परिस्थितीची उदाहरणे देत, युद्धातून कुणाच्याच्या हाती काही लागत नसल्याचे शहाणपण त्यांनी शिकवले, त्याची जाणीव त्यांनी दहशतवाद्यांना पोसतानाही बाळगली पाहिजे. तसे घडले तर कित्येक प्रश्न विनासायास सुटतील. भारतात दहशतवादी हल्ल्याच्या घटना घडल्या की दरवेळी पुरावे मागायचे, आपला सहभाग नसल्याचे सांगत सुटायचे, भारत अकारण आपली बदनामी करीत असल्याचा कांगावा करायचा अन्‌ २६/११ च्या घटनेतील पाकिस्तानचा उघड सहभाग जगजाहीर झाला की मात्र मूग गिळून गप्प बसायचे. तरी बरं, आश्रय घ्यायला लादेनलाही पाकिस्तानच गवसला होता या भूतलावर... तरीही ते शहाणे त्यांचा दहशतवादाला पािंठबा नसल्याचे छातीठोकपणे सांगतात. भारतातले काही दीडशहाणेही विश्वास ठेवतात त्यांच्यावर. पाकिस्तानची ही तर्‍हा कुठवर सहन करायची याचाच फक्त विचार होण्याची गरज आहे आता. कारण, एकवेळ पंतप्रधान इम्रान खानच्या प्रामाणिकतेवर विश्वास ठेवून त्यांच्या शांतिधोरणावर फुलं उधळायची म्हटलं, तरी जे इम्रान यांना वाटते नेमके तेच पाकिस्तानी सैन्यालाही वाटते काय, हा खरा प्रश्न आहे... कारण त्यांना जर तसे वाटत नसेल, तर इम्रान खान यांच्या या शहाणपणालाही अर्थ उरत नाही.
पुलवामा घटनेच्या पार्श्वभूमीवर संतापाची लाट कितीही तीव्र असली, तरी भारताने लागलीच उद्यापासून युद्ध सुरू करावे, असे कोणीही म्हणत नाहीय्‌ इथे. किंबहुना युद्ध व्हावेच, अशीही कुणाची टोकाची भूमिका नाही. जनतेचे एकवेळ जाऊ द्या, पण कारभार चालवण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, त्यांनाही युद्धाच्या गंभीर दुष्परिणामांची कल्पना नाही असे असे थोडीच आहे. पण, सरकार जणू युद्ध करायलाच मैदानात उतरले असल्याच्या थाटात, त्याला त्यापासून रोखणारी जमात मात्र नक्राश्रू ढाळायला नको तितकी सरसावली आहे. काहींनी तर युद्धनीती आणि राजकीय चातुर्याबाबत ज्याचा आदर्श ठेवला पाहिजे, त्या इस्रायललाही युद्धखोर ठरवून टाकले आहे या नादात. मुस्लिम आणि दहशतवादी घटकांनी एकट्याने घेरून जे दाहक वास्तव वाट्याला आणले, त्यातून शेकडोंच्या संख्येत ज्यू नागरिक गमावण्याची वेळ आली... इस्रायलच्या वाट्याला आलेल्या या भयाण यातना ज्यांना कधी भोगाव्या लागल्या नाहीत, केवळ ती आणि ती मंडळीच, इस्रायलने त्या आक्रमणांना ताठ मानेने दिलेल्या उत्तराला युद्धखोरीच्या तराजूत तोलू शकते. एरवी तो इस्रायलचा स्वाभिमान ठरतो अन्‌ हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याचा त्याचा अधिकारही... पण करता काय, देशाभिमान गहाण टाकून शांतीच्या पारड्यात मतं टाकणारी मंडळी तमाशाचा फड मांडून बसलीय्‌ इथे. युद्ध नकोची भाषा तिच्या तोंडी आहे.
जणू जगात शांतता नांदविण्याची जबाबदारी नियतीने त्यांच्याच खांद्यावर टाकली असल्यागत तोरा आहे त्यांचा. तीच मंडळी आता युद्धाच्या दुष्परिणामांची चर्चा उच्चरवात करते आहे. यातून आपण आपल्याच देशाची नाहक बदनामी चालवली असल्याची खंत त्यांच्या चेहर्‍यावर झळकत नाही. पाकिस्तान बोलणीची भाषा बोलू लागलाय्‌ ना, बस्स झालं तर! बालकोटमध्ये भारताच्या शक्तीचे प्रदर्शन घडले ना. बस तर मग, पुरे झाले आता...अशी त्यांची भूमिका आहे.
भगवान श्रीकृष्णालातरी कुठे हवा होता महाभारताचा संग्राम? युद्ध टाळण्याचे प्रयत्न त्यांनी शेवटच्या घटकेपर्यंत केलेत, हे कोणाला नाकारता येईल? संपूर्ण राज्याची मागणी टाळून पाच गावांवर समाधान मानण्याची भूमिकाही युद्ध टाळण्यासाठीच होती. जेव्हा बोटाच्या अग्रभागाएवढीही जमीन न देण्याची अरेरावीची भाषा बोलली जाऊ लागली, युद्धाचे रणशिंग तेव्हा फुंकले गेले. मग परिणामांची चिंता नाही वाहिली भगवंतांनी. त्यामुळे, महाभारतातील महासंग्राम हा कौरवांच्या दुराग्रहाचा परिपाक होता. तो समंजस पांडवांना कमकुवत ठरवण्याचाही परिणाम होता... म्हणूनच ते युद्ध शेवटी कौरवांचा नायनाट करूनच थांबलं... शांतिवार्तेची संधी तर वारंवार येईल भविष्यात. भारताला स्वत:ची धमक सिद्ध करण्याची संधी थोडीच वारंवार येणार आहे...?