Friday, January 12, 2018

स्वत:च्या लढाईचे एकाकी शिलेदार...!

 दिवसभरातून जमेल तेवढा वेळ काढायचा. सारे शरीर घामाने ओलेिंचब होईपर्यंत काम करीत राहायचे. कधी कुणी येऊन, काय करतोस म्हणून विचारून जाई. कधी गावातली पोरंबाळं, बाया-बापुडे उभे राहात. याचं काय चाललंय्‌ ते कौतुकानं बघत. हा आपला कधीमधी बघायचा त्यांच्याकडे हसर्‍या चेहर्‍याने, तर कधी सर्वांकडे दुर्लक्ष करून आपल्या कामात रममाण व्हायचा. काबाडकष्ट करून डोंगराचा जमेल तेवढा भाग खोदून काढायचा. दगड, माती एका बाजूला करायचा. दोन वर्षे झालीत त्याच्या या एकाकी लढाईला. खरंतर समोर एवढे मोठे डोंगर अन्‌ त्याचा सामना करायला निघालेला हा निधड्या छातीचा एकटा गडी. पण, हे भले मोठे काम एकट्याने कसे होईल, कधी होईल, असले प्रश्न त्याला कधी पडले नाहीत. अविरत मेहनत आणि समर्पणातून एक लढा साकारला. एव्हाना सुमारे आठ किलोमीटरचा रस्ता तयार झालाय्‌. फुलबनी गाठायला अजून सात किलोमीटरचे अंतर बाकी आहे. पण, पुढील काळात तेही दूर करत गावातील लेकरांसाठी हा रस्ता तयार करूनच मोकळा श्वास घेण्याचा त्याचा निर्धार आहे. खरंतर त्याचं काम गेली दोन वर्षे निर्वेध सुरू आहे. रस्ता पूर्ण होईपर्यंत ते तसेही सुरू राहणारच होते. पण, मधल्या काळात कुठूनतरी जिल्हा प्रशासनापर्यंत ही वार्ता पोहोचली. चारदोन पत्रकारांनी त्याच्या बातम्या केल्या. कलेक्टरसाहेबांनीही त्याची दखल घेतली अन्‌ मग जालंधर हिरो झाला- खर्‍या अर्थाने हिरो! जिल्हा प्रशासनाने त्याचं कौतुक केलं. साहेबांनी सत्कार केला. पण, हा रस्ता आता यापुढे शासन पूर्ण करेल, असं आश्वासन मात्र आलं नाही अजून कुठूनच. त्यामुळे नायक याचा एकाकी लढा पुढील काळातही सुरूच राहणार आहे. गावातली पोरं या मार्गाने शाळेत जातील, त्या दिवसापर्यंत...

म्हटलं तर त्याचं काम फार मोठं. नच म्हटलं तर एका नजरेत बात खल्लास! म्हटलं तर तोंड भरून कौतुक करावं असं. आणि म्हटलंच तर सर्वांनी अनुकरण करावं असंही... दूरवरच्या ओरिसातल्या आडवळणावरच्या एका दुर्गम गावात राहणारा एक आदिवासी माणूस. शहरात राहणार्‍यांच्या लेखी कवडीचीही िंकमत नसलेला. अशिक्षित. अडाणी. मागासलेला. दुर्लक्षित. अदखलपात्र... पण, परवा खुद्द कलेक्टरसाहेबांनी त्याला बोलावलं आपल्या दालनात. चारचौघांत त्याचं कौतुक केलं. सत्कार केला अन्‌ गुमसाही नावाच्या एका छोट्याशा गावातल्या जालंधर नायकच्या कार्याची ब्रेिंकग न्यूज झाली! एकीकडे, विपरीत परिस्थितीशी लढा देत गावकुसातल्याच कशाला, अगदी शहरातल्या शाळांचे संचलनही महत्कठीण ठरत असताना, दूरवरच्या शाळेत जाण्यासाठी ‘आड’ येणारे डोंगर खोदून काढत गावातील पोरांसाठी शाळेपर्यंतचा रस्ता तयार करून देण्यासाठी उभारलेला एक लढा एकट्यानं पण जिद्दीने लढणारा तो शिलेदार ठरला!
तसे गुमसाही गाव अगदीच छोटे. आदिवासी समूहातली काही मोजकी घरं या गावची ओळख सांगत आपलं अस्तित्व जपून आहेत. इथल्या असुविधांचा बाऊ करत कित्येकांनी शेजारची मोठी गावं जवळ केलीत कधीचीच. पण, जालंधर मात्र इथेच राहिला- गावचे सारे उणेपण मनात साठवून. आजघडीला तो वयाच्या पंचेचाळिशीत आहे. स्वत: नाही गेला कधी शाळेत, पण आता घरातली पोरं शिकावीत असं त्याला वाटतं- अगदी मानापासून. पण करणार काय, गावात शाळा नाही. शाळा आहे ती डोंगरापल्याडच्या फुलबनी गावात. तिथवर जायला रस्ता नाही. खूप दूरवरून जायचं तर जरासं जिकिरीचंच होतं पोरांसाठी. मग शाळेत न जाण्याचे बहाणे शोधतात मुलं. जालंधरच्या मनात ही सल खूप दिवसांपासून घर करून बसली होती. मतदारांची फारशी संख्या नसल्याने राजकीय नेते, सरकार, प्रशासन, अधिकारी यांच्यापैकी कुणाच्याही अजेंड्यावर हे गाव असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. परिणामी तिथल्या समस्या, शाळेची गरज, पलीकडच्या गावात जाण्यासाठीचा रस्ता, यांपैकी कुठलीही बाब कुणाच्याही लेखी दखलपात्र ठरली असती तरच नवल! तसली नवलाई घडू न देण्याची काळजी सर्वांनीच घेतलेली! त्यामुळे मूठभर लोकांची ही वस्ती वर्षानुवर्षे तशीच राहिली. उपेक्षित...
पण, जालंधरनं एक गोष्ट मनावर घेतली. कसेही करून गावातल्या चारदोन पोरांना शाळेत पाठविण्याची. नजरेसमोर दिसणार्‍या एका डोंगराचा काही भाग फोडून दूर केला तर फुलबनीपर्यंतचा रस्ता तयार होऊ शकतो, ही कल्पना मनात येण्याचाच अवकाश, हातात सब्बल अन्‌ छन्नी घेऊन तो कामाला लागला. दिवसभरातून जमेल तेवढा वेळ काढायचा. सारे शरीर घामाने ओलेिंचब होईपर्यंत काम करीत राहायचे. कधी कुणी येऊन, काय करतोस म्हणून विचारून जाई. कधी गावातली पोरंबाळं, बाया-बापुडे उभे राहात. याचं काय चाललंय्‌ ते कौतुकानं बघत. हा आपला कधीमधी बघायचा त्यांच्याकडे हसर्‍या चेहर्‍याने, तर कधी सर्वांकडे दुर्लक्ष करून आपल्या कामात रममाण व्हायचा. काबाडकष्ट करून डोंगराचा जमेल तेवढा भाग खोदून काढायचा. दगड, माती एका बाजूला करायचा. दोन वर्षे झालीत त्याच्या या एकाकी लढाईला. खरंतर समोर एवढे मोठे डोंगर अन्‌ त्याचा सामना करायला निघालेला हा निधड्या छातीचा एकटा गडी. पण, हे भले मोठे काम एकट्याने कसे होईल, कधी होईल, असले प्रश्न त्याला कधी पडले नाहीत. अविरत मेहनत आणि समर्पणातून एक लढा साकारला. एव्हाना सुमारे आठ किलोमीटरचा रस्ता तयार झालाय्‌. फुलबनी गाठायला अजून सात किलोमीटरचे अंतर बाकी आहे. पण, पुढील काळात तेही दूर करत गावातील लेकरांसाठी हा रस्ता तयार करूनच मोकळा श्वास घेण्याचा त्याचा निर्धार आहे. खरंतर त्याचं काम गेली दोन वर्षे निर्वेध सुरू आहे. रस्ता पूर्ण होईपर्यंत ते तसेही सुरू राहणारच होते. पण, मधल्या काळात कुठूनतरी जिल्हा प्रशासनापर्यंत ही वार्ता पोहोचली. चारदोन पत्रकारांनी त्याच्या बातम्या केल्या. कलेक्टरसाहेबांनीही त्याची दखल घेतली अन्‌ मग जालंधर हिरो झाला- खर्‍या अर्थाने हिरो! जिल्हा प्रशासनाने त्याचं कौतुक केलं. साहेबांनी सत्कार केला. पण, हा रस्ता आता यापुढे शासन पूर्ण करेल, असं आश्वासन मात्र आलं नाही अजून कुठूनच. त्यामुळे नायक याचा एकाकी लढा पुढील काळातही सुरूच राहणार आहे. गावातली पोरं या मार्गाने शाळेत जातील, त्या दिवसापर्यंत...
उद्दिष्ट होतं पोरांना शाळेत धाडण्याचं. त्यासाठी हवी होती शाळा. घरापासून शाळेपर्यंतच्या भल्या मोठ्या अंतराची िंचता नव्हतीच कधी कुणालाही. फक्त शाळेपर्यंत पोहोचण्यासाठी रस्ता तेवढा हवा होता. काळ्याशार गुळगुळीत रस्त्याची तर कल्पनाही स्वप्नांपलीकडची ठरली असती गुमसाहीवासीयांसाठी. दगडधोंड्यांचाच असला तरी चालेल, फक्त ‘मार्ग’ असावा, एवढीच त्यांची माफक अपेक्षा. स्वातंत्र्याच्या सात दशकांनंतर एवढी साधी सोयही आपल्या वाट्याला येत नाही, याची कुठे खंत नाही, की त्या अधिकारासाठी लढण्याची गरजही नाही. आपल्या स्तरावर आपण काय करू शकतो, एवढं एकानं ताडलं अन्‌ लागला कामाला. परिणाम समोर आहेत...
बिहारमधला तो दशरथ मांझी आठवतो- ‘माऊंटन मॅन’ म्हणून प्रसिद्धी पावलेला? गयाजवळच्या गेहलौर गावातून पहाडापलीकडच्या शेतात काम करणार्‍या दशरथसाठी फाल्गुनीदेवी रोज डबा घेऊन जाई. पूर्ण पहाड चढायचा अन्‌ मग पलीकडच्या बाजूने उतरून नवर्‍याच्या हातात डबा सोपवायचा. परतीचा प्रवास तसाच. पहाड चढणे अन्‌ उतरणे. पावसाळ्यात खूपदा पाय घसरायचा. इजा व्हायची. दुखणे अंगावर यायचे. एकदाचे घसरणे तिच्या जिवावर बेतले. दशरथ अस्वस्थ झाला. शेत काय नि दवाखाना काय, सारंच डोंगराच्या पल्ल्याड. रस्ता नावाचा प्रकार अस्तित्वात नाहीच कुठे. दशरथ एक दिवस कुठल्याशा निर्धाराने उठला. हातात सब्बल, छन्नी घेतली अन्‌ लागला कामाला. दोन गावांच्या मध्ये उभ्या राहिलेल्या डोंगरातून एक रस्ता तयार करायला तब्बल 22 वर्षे लागली त्याला. लोकांनी खिल्ली उडवण्यापासून तर कधीमधी खायला शिदोरी आणून देण्यापर्यंत आणि बघ्याच्या गर्दीने मूर्खात काढण्यापासून, तर पाणावलेल्या डोळ्यांनी कुणी ‘दुवा’ देईपर्यंतचे अनुभव गाठीशी बांधत दशरथ मांझीचं काम अविरत चाललेलं असायचं. टर उडवली गेल्याची खंत नाही, की आपल्या कामाची कुणी दखल घेतल्याचा आनंद नाही. गाठीशी बांधलेल्या निर्धाराच्या पूर्ततेसाठी तब्बल दोन दशक खपला तो माणूस. एक पहाड खोदून काढत, भलेमोठे दगडधोंडे बाजूला करत, 9 मीटर रुंदीचा मार्ग तयार करण्याची प्रक्रिया म्हणजे तपश्चर्याच होती. म्हटलं तर, तोही एक सामाजिक लढाच होता- त्यानं एकाकी लढलेला... उद्दिष्टप्राप्तीनंतर सारेच सरसावले होते कौतुकाची थाप पाठीवर ठेवायला. पण, प्रत्यक्षातील लढाईदरम्यान मात्र सर्वांनीच दुरून तमाशा बघण्याची भूमिका स्वीकारली होती.
1960 ते 1983 या काळात पूर्ण केलेला रस्ता लोकांसाठी उपलब्ध करून दिल्यानंतर दशरथ मांझीच्या डोळ्यांत उमटलेले भाव कुणाला टिपता आलेत ठाऊक नाही, पण डोंगर खोदून तयार केलेला तो मार्ग आजही ‘माऊंटन मॅन’ची आठवण करून देतो. मांझी यांना जाऊनही आता जवळपास एक दशक पूर्ण झालंय्‌. अशात, गुमसाहीच्या जालंधर नायकचा किस्सा समोर आला आहे.
एवढ्यातेवढ्या गोष्टींसाठी सरकारदरबारी रडगाणी गाणारी, कायम मागण्या करीत राहणारी, त्यासाठी मोर्चे काढणारी, न झालेल्या कामांसाठी शासन-प्रशासनाच्या नावाने बोटे मोडणारी माणसं काय थोडीथोडकी आहेत आपल्या समाजात? पण, असल्या कुठल्याच भानगडीत न पडता स्वत:चा लढा, तो लढण्याची स्वत:ची दिशा, त्यासाठीचा जगावेगळा मार्ग सुनिश्चित करून, कुणाच्याही मदतीची अपेक्षा न करता लढत राहणार्‍या एकाकी शिलेदारांची नोंद घेण्याचा, त्याचे अनुकरण करण्याचा इरादा इतर लोकही जाहीर करतील कधीतरी? कायम रडीचा डाव खेळणारी माणसं, अशी स्वत:ची लढाई निश्चित करून ती खुल्या दिलानं लढायला समर्पित भावनेने समोर येतील कधीतरी...?

Saturday, January 6, 2018

माफ करा, बापू...!


माफ करा, पण कालचे कुणाचेच वागणे सौजन्याचे वाटले नाही. शरद पवारांचे नाही अन् संताप व्यक्त करायला रस्त्यावर उतरलेल्या जमावाचेही नाही. सोशल मीडियावरून क्षणाक्षणाला आग ओकून मनं पेटवायला निघालेल्यांच्या उतावीळ वागण्यातून जसे सामाजिक जबाबदारीचे दर्शन घडले नाही; तसेच मोर्चाला प्रत्युत्तर देण्यासाठी कोल्हापुरात शिवसेनेच्या एका आमदाराने काढलेल्या प्रतिमोर्चातील कथित शिवसैनिकांच्या वागण्यातूनही हे सौजन्य झळकल्याचेही कुठे दिसले नाही. इतर कित्येक मार्ग समोर दिसत असताना, लक्षावधी लोकांचा गोतावळा सोबतीला घेऊन बाबासाहेब, भगवान गौतम बुद्धाने दाखविलेल्या मार्गानेच का गेले असतील,  हे अजूनही उमगलेच नाही आम्हाला. भीमा कोरेगावच्या स्तंभासमोर नतमस्तक व्हायला लोक मोठ्या संख्येने यावेत, यासाठी गेली  कित्येक महिने नियोजन करणारी आणि जमा झालेल्या समूहाशी दंगलीला कारणीभूत ठरणारी वर्तणूक करणारी सुपीक डोकीही ठेचून काढण्याच्याच लायकीची आहेत. त्यांना कुठे कळले टिळक, सावरकर अन् छत्रपती शिवराय? खरंतर यांपैकी कुणालाही ना बाबासाहेब समजले ना शिवराय उमगले... आपल्याच तालात बेलगाम वागत सुटलेला, बेताल बरळत निघालेला समुदाय बुद्धाच्या अमृतवाणीचा भोक्ता कसा झाला सांगा? त्यांच्याशी अयोग्य वर्तन करणार्‍यांना तरी छत्रपतींचा वारसा कसा सांगता येईल? 


माफ करा, बापू! शौर्याने पराक्रम गाजवीत स्वातंत्र्याची पताका उंचावर फडकाविण्याची लायकी नव्हतीच कधी आमची; पण शेकडो लोकांच्या बलिदानातून हाती आलेले स्वातंत्र्य धड टिकवून ठेवण्याच्या लायकीचेही राहिलेलो नाही आम्ही आताशा.
गांधीके सपनोका भारत
कातील हैं, हत्यारा हैं
फिरभी सारे जहॉंसे अच्छा
हिंदोस्तॉं हमारा हैं...
या ओळींमधून व्यक्त होणारे वैफल्य, त्यातून ध्वनित होणारा संताप... हे चित्र बदलण्यासाठी धडपडतानाही दिसत नाही कुणी इथे. उलट, तेच वास्तव असल्याचे सिद्ध करून दाखवण्यासाठीचा निलाजरा खटाटोप चाललाय् सर्वदूर.
तेव्हा बापू, खरंच माफ करा! तुम्हीच कशाला, भगवान गौतम बुद्धापासून तर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत, छत्रपती शिवरायांपासून तर राजर्षी शाहू महाराजांपर्यंत, लोकमान्यांपासून तर सावरकरांपर्यंत- सर्वांचीच एकदा मनापासून माफी मागायची आहे आम्हाला आज. अगदी डोळ्यांतून वाहणार्‍या अश्रूंनी पाय धुवायचेत तुमचे. तसाही हा देश बुद्ध, छत्रपती, गांधी, पटेलांचा राहिलाच कुठे आता? हा देश, विठ्‌ठलाभोवती कडे करून त्याला भक्तांंपासून दूर ठेवणार्‍या बडव्यांचा झालाय्. तो दंगलीत मृत पावलेल्यांच्या चितेवर आपल्या राजकीय स्वार्थाच्या भाकरी भाजणार्‍या राजकारण्यांचा झालाय्. अन् झालंच, तर ज्यांचा थेट पाच वर्षांच्या बोलीनं लिलाव होतो आणि तरीही ज्यांचा स्वाभिमान जागा होत नाही, अशा बेजबाबदार मतदारांचा झालाय्. आत्मभान हरपलेल्या, भावनेच्या प्रवाहात दिशाहीन भरकटणार्‍या, ज्यांची टाळकी कुणीही भडकावू शकतो अशा बेलगाम तरुणाईचा झालाय् बापू हा देश. खरंच सांगतो शिवबा... बाबासाहेब, तुम्हालाही तेच सांगतोय्, या समाजातल्या तमाम जनांनी केवळ तसबिरीत बंद करून ठेवलं आहे बघा तुम्हाला. तुमची कर्तबगारी, शौर्य, पुस्तकांतून केलेली धारदार विचारांची पखरण केव्हाच मातीमोल ठरवली आम्ही. तुमचा मानसन्मान केवळ पुतळ्यांत धुंडाळत फिरतात इथली माणसं. पुण्यतिथी, जयंतीच्या दिवशी तुमच्या तसबिरी अन् पुतळ्यांना हार घातले, समोर चार-दोन फुलं वाहिली की, तुमच्या विचारांची माती करायला मोकळे होतात सारे...!
परवा, भीमा कोरेगावच्या घटनेवरून महाराष्ट्रात बंद पुकारताना ज्या पद्धतीने लोक वागलेत. लोकांना रेल्वे-लोकलमधून बाहेर काढताना, रस्त्यांवरच्या वाहनांवर दगडफेक करताना जी शिवराळ भाषा अनेकांच्या तोंडी होती, आपल्याच बांधवांवर आरोपांच्या फैरी झाडताना जणूकाय शत्रूशीच लढायला निघाल्याच्या थाटातला जो आवेश चेहर्‍यावर उमटला होता तो, ‘सारे भारतीय माझे बांधव’ असल्याच्या भावनेला हरताळ फासणारा होता. खरंतर शाळाशाळांमधून वर्षानुवर्षे नुसतीच घोकंपट्‌टी चाललीय् प्रार्थनेतल्या त्या शब्दांची. प्रत्यक्षात त्यातून ध्वनित होणार्‍या सामाजिक आशयापेक्षाही इतर जाती-धर्मांविषयी मनामनांत कालवले जाणारे विष अधिक प्रभावीपणे भिनतेय् अलीकडे भारतीय जनमानसात... माफ करा, पण कालचे कुणाचेच वागणे सौजन्याचे वाटले नाही. शरद पवारांचे नाही अन् संताप व्यक्त करायला रस्त्यावर उतरलेल्या जमावाचेही नाही. सोशल मीडियावरून क्षणाक्षणाला आग ओकून मनं पेटवायला निघालेल्यांच्या उतावीळ वागण्यातून जसे सामाजिक जबाबदारीचे दर्शन घडले नाही; तसेच मोर्चाला प्रत्युत्तर देण्यासाठी कोल्हापुरात शिवसेनेच्या एका आमदाराने काढलेल्या प्रतिमोर्चातील कथित शिवसैनिकांच्या वागण्यातूनही हे सौजन्य झळकल्याचेही कुठे दिसले नाही.
इतर कित्येक मार्ग समोर दिसत असताना, लक्षावधी लोकांचा गोतावळा सोबतीला घेऊन बाबासाहेब, भगवान गौतम बुद्धाने दाखविलेल्या मार्गानेच का गेले असतील,  हे अजूनही उमगलेच नाही आम्हाला. भीमा कोरेगावच्या स्तंभासमोर नतमस्तक व्हायला लोक मोठ्या संख्येने यावेत, यासाठी गेली  कित्येक महिने नियोजन करणारी आणि जमा झालेल्या समूहाशी दंगलीला कारणीभूत ठरणारी वर्तणूक करणारी सुपीक डोकीही ठेचून काढण्याच्याच लायकीची आहेत. त्यांना कुठे कळले टिळक, सावरकर अन् छत्रपती शिवराय? खरंतर यांपैकी कुणालाही ना बाबासाहेब समजले ना शिवराय उमगले... आपल्याच तालात बेलगाम वागत सुटलेला, बेताल बरळत निघालेला समुदाय बुद्धाच्या अमृतवाणीचा भोक्ता कसा झाला सांगा? त्यांच्याशी अयोग्य वर्तन करणार्‍यांना तरी छत्रपतींचा वारसा कसा सांगता येईल?
एका घटनेतून, त्यावरच्या एका प्रतिक्रियेतून पाऽऽर बदलून गेली माणसं. माणुसकीच्या बाता केव्हाच हद्दपार झाल्या होत्या. अन्यायाचा बदला घेण्याच्या इराद्याने पेटून उठलेल्यांकडून माणुसकीची अपेक्षा बाळगणेही दुरापास्त ठरले होते. कालपर्यंत ज्याचा गंधही नव्हता, तो कडवटपणा आता प्रत्येकाच्याच वागण्या-बोलण्यातून झळकत होता. माफ करा बापू, पण तुमच्या अहिंसेवरही विश्‍वास राहिलेला नाही आता इथे कुणाचा. तुमच्या तर्‍हेने आत्मक्लेश वगैरे करून घेत आंदोलनं करण्याची रीत तर केव्हाच बाद ठरवलीय् लोकांनी इथे. स्वत:ला त्रास करून घेत कुठं आंदोलनं करायची असतात? छे! आता तर आंदोलन, मोर्चे म्हटलं की सर्वप्रथम लोकांना त्रास होईल याची तजवीज. तोडफोड, जाळपोळ तर सर्वांचीच पहिली पसंती! सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान तर झाले पाहिजे ना! रस्ते अडवून धरले गेले पाहिजेत. बेलगाम तरुणाईने असे जत्थ्याने घराबाहेर पडायचे. हिरवे, निळे, भवगे, असे कुठल्याशा रंगाचे झेंडे हातात धरले की, मग आपसूकच बळ एकवटते झुंडींच्या मनगटात. मग सार्‍या पंचक्रोशीत थरार माजवणे सहज शक्य होऊन जाते. सर्वसामान्य जनतेच्या मनात जबर धाक, कमालीची दहशत निर्माण झाली नाही तर आंदोलन कसे म्हणायचे त्याला? तत्कालीन विपरीत परिस्थितीशी लढताना खुद्द बाबासाहेबांनी ही असली तर्‍हा कधी उपयोगात आणली नाही. महात्म्यानं केलेली तर सारीच आंदोलनं, त्यानं स्वीकारलेल्या अहिंसेच्या मार्गासाठी प्रसिद्ध पावलीत. माफ करा बाबासाहेब, आम्हाला नाही अनुसरता आला तुमचा मार्ग कधीच. तुम्ही मिळवून दिलेल्या अधिकाराचा उपयोग करताना राखणे अपेक्षित असलेले मर्यादेचे भानही विसरत चाललोय् आम्ही. ‘‘आमची आई इतकी सुंदर असती तर...’’ हे शिवरायांचे वाक्य कुणाच्यातरी तडफदार, आवेशपूर्ण  भाषणातून नुसतं कानावर पडलं, तरी धमण्यांतले रक्त सळसळते आमच्या. पण... शिवबा, मनगटातली ताकद सिद्ध करण्याच्या नादात परवा आमची लेकरं बाया-बापुड्यांना हात लावून गेली... महाराज, खरंच लाज वाटली तो घृणास्पद प्रकार बघून.
दोनशे वर्षांपूर्वीच्या ज्या युद्धावरून सारा प्रकार घडला, त्याचे साक्षीदार आज हयात नाहीत. ज्यांनी इतिहासातील नोंदी जपून ठेवल्या, त्यांनातरी कुठे माहीत होतं भविष्यात आपलीच पोरं या मुद्यावरून एकामेकांच्या जिवावर उठतील म्हणून?
एरवी आधुनिकतेच्या गप्पा मारणारी, जाती-पातीच्या चौकटीबाहेर पडण्याची गरज वारंवार प्रतिपादित करणारी माणसं, त्या दिवशी नाहीच वागली तशी. एक तारखेलाही नाही अन् तीन तारखेलाही नाही. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे म्हणायचे बाबासाहेब, पण इथे तर शिकलेली माणसंच अडाण्यासारखं वागताहेत. पुन्हा एकदा जाती-धर्माच्या वर्तुळात अडकण्याची जिद्द करताहेत. तरीही कॉलर टाईट करून स्वत:ला आधुनिक म्हणून घेताहेत...
माफ करा, पण हे वागणे ना बाबासाहेबांना अपेक्षित, ना ही तर्‍हा गांधींना भावलेली. हेही खरेच की, इथली बडी बडी मंडळी, तुमचेच नाव घेऊन राजकारण करतात. असल्या दंगली, गटातटातल्या असल्या वितुष्टातूनही स्वत:च्या राजकारणाच्या नफ्या-तोट्याचे गणित मांडून मोकळे होणारे नेते निपजलेत स्वातंत्र्योत्तर काळात या देशात. शोकांतिका असली तरी दुर्दैवी वास्तव हेच आहे...
इस मुल्क के माथेपर
एक दाग है अंजुम
कुछ लोग फसादोको यहॉं
त्यौहार समझते हैं...
दुसरीकडे, स्वत:चे शहाणपण गहाण ठेवून, बेभान होत अशा बेईमानांसमोर नतमस्तक झालेल्यांच्या दिशाहीन वागण्याचे परिणाम परवा महाराष्ट्राने भोगले...