संबंध काय हो अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा मराठी साहित्य संमेलनाशी? ते सांगतील आता संमेलनं कुठे घ्यायची ते? अन् त्यांच्या तालावर नाचणार आहे महामंडळ? हे संमेलन आहे की तमाशा? साहित्यिकांच्या आपसातल्या वादातूनच घडीभराची फुरसत मिळत नाही इथे कुणाला अन् आता अशा उपर्या संस्थांनी प्रसारमाध्यमांचा ‘वापर’ करून आगीत तेल ओतण्याचा प्रकार केला, तर त्याची एवढी गंभीर दखल घेतली जातेय् इथे? अशी कुठलीही मागणी करायला टीव्हीच्या पलीकडे एक अधिकृत मंच असतो. संबंधित संस्थेचे अधिकृत कार्यालय असते. तिथे काम करणारे पदाधिकारी असतात, हे ठाऊक नाही अनिंसच्या नेत्यांना? त्यातले काहीएक न करता, कुठलाही अधिकृत लेखी अर्ज कुठल्याही अधिकृत पदाधिकार्याकडे न करता, आयोजकांशी एका शब्दाने न बोलता जेव्हा श्याम मानवांसारखे लोक केवळ आणि केवळ कॅमेर्यापुढेच ही मागणी रेटून धरतात, या जगावेगळ्या मागणीची ‘ब्रेकिंग न्यूज’ करणार्या एकाही शहाण्याला, याबाबत संबंधितांकडे लेखी मागणी का करीत नाही, असा साधा प्रश्नही मानवांना विचारावासा वाटत नाही, संमेलन या आश्रमातही होऊ शकते, याची पूर्ण कल्पना असतानाही दबा धरून राहिलेले अनिंसचे नेते स्थळाची घोषणा होताच अचानक हल्ला केल्याप्रमाणे आरडाओरड करीत सुटतात, तेव्हा त्यातून ध्वनित होणारा राजकारणाचा गंध सुसह्य नसतो. आज संपूर्ण बुलडाणा परिसरात असलेली या आश्रमाची प्रतिमा खोटी? आश्रमाच्या कार्याबाबत लोकांच्या मनात असलेली आस्था खोटी अन् फक्त श्याम मानव म्हणतात तेवढंच खरं?
आपल्या देशातल्या काही हुशार मंडळींना प्रसिद्धीचे तंत्र अगदी छान साधले आहे. शासकीय पुरस्कारातले पैसे ठेवून घेत, रिकामी पदकं परत करून ‘पुरस्कार वापसी’ची नौटंकी करणारी स्वयंघोषित पुरोगामी जमात असो, की मग यंदाच्या मराठी साहित्य संमेलनाच्या स्थळावरून वाद उकरून काढून संमेलनाच्या आयोजनाला नख लावणारे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे श्याम मानव, ही याच धाटणीतली मंडळी म्हटली पाहिजे. म्हणजे कसं बघा, हे साहित्य संमेलन कुठे व्हावं, या दृष्टीने ज्या स्थळांची चर्चा गेले कित्येक दिवस सुरू राहिली होती, त्यात बुलडाणा जिल्ह्यातल्या हिवरा आश्रमाचा स्पष्ट उल्लेख होता. स्थानांची यादी जगजाहीर झाली होती. पण, त्या वेळी कुणीही आश्रमातील संमेलनावरून आक्षेप नोंदवला नाही. संबंधितांना एखादे निवेदन देऊन, सारस्वतांची मांदियाळी जमविण्यासाठी हे स्थान योग्य ठरणार नाही, असे मतही कुणी व्यक्त केले नाही किंवा तिथे संमेलन आयोजित करू नये, अशी मागणीही कुणी तोवर केली नाही. सारे कसे चिडिचूप होते! अगदी दिल्ली, बडोदा आणि हिवरा आश्रमाच्या भेटीचा, स्थळपाहणीचा कार्यक्रम पूर्ण होईपर्यंतच्या तीन महिन्यांच्या काळातही कुणी आक्षेपाचे अवाक्षरही काढले नाही. पण, जशी साहित्य संमेलनाच्या स्थळाची घोषणा झाली, तसे श्याम मानव खडबडून जागे झाले! काही वर्षांपूर्वी ज्यावरून न्यायालयाने कानउघाडणी केली होती, आश्रमाची बदनामी न करण्याविषयी स्पष्टपणे सांगितले होते, नेमके तेच करण्याची घिसाडघाई करत ते सरसावले. पूर्वी कधीतरी केलेल्या आपल्या जुन्याच आरोपाचे तुणतुणे वाजवत, मानवांनी हे संमेलन हिवरा आश्रमात होऊ नये, अशी मागणी प्रसारमाध्यमातून सुरू केली. हो! प्रसिद्धी तेथूनच प्राप्त होऊ शकते ना! नाहीतर, अशा मागणीचा रीतसर अर्जतरी त्यांनी, या संदर्भातील निर्णय घेण्याचा अधिकार असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाकडे करायला हवा होता. पण, तिकडे केलेल्या अर्जावर कार्यवाही होऊन तो मान्य झाला अन् हे स्थळ समजा रद्दही झाले असते, तरी त्याचे श्रेय अंधश्रद्धा निर्मूलन समितीला थोडीच मिळाले असते! असा तीन दिवसांत सार्या महाराष्ट्रात गाजण्याचा योग जुळून येणेही जरासे दुरापास्तच होते. त्यामुळे फुकटच्या प्रसिद्धीचा हा सोपा मार्ग त्यांनी स्वीकारला. बाबा कसे बोगस अन् आश्रमातून कसा व्यापार चालतो, हे पालूपदही सुरूच राहिले त्यांचे. या सर्व प्रकरणात अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ अतिशय संशयास्पद रीत्या सावध आणि योजनाबद्ध पद्धतीने मौन राहिले. नव्हे, दुरून तमाशा बघत राहिले. आश्रमातल्या हळव्या कार्यकर्त्यांनी मात्र या तद्दन फालतू वादात पडण्यापेक्षा आयोजनातून माघार घेणे अधिक पसंत केले. त्यांनी स्वत:हूनच तशी घोषणा करून टाकली. दुर्दैवाने, त्यांच्या समंजस भूमिकेचे कौतुक होण्यापेक्षा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचीच भलावण झाली. त्याचे नेते अकारण फुशारक्या मारू लागले. विजयाच्या तोर्यात शहाणपण शिकवू लागले.बरं, मराठी साहित्य महामंडळाची भूमिकाही प्रश्नचिन्ह उभी करण्यालायकच राहिली आहे. महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशी हेदेखील कधीकाळी श्याम मानवांच्या अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीचा एक भाग होते. यंदाच्या संमेलन स्थळनिश्चितीच्या दीर्घ प्रक्रियेत निदान तीन वेळा त्यांनी या आश्रमाला भेट दिली होती. येथील महाराजांबाबतच्या मानवांच्या तेव्हाच्या ‘त्या’ आरोपांबाबत श्रीपाद जोशी अनभिज्ञ होते, असेही नाही. किंबहुना त्यांना त्या आरोपाची पूर्ण कल्पना होती. मग त्यांना का नाही वाटले इथे मराठी साहित्य संमेलन होऊ नये म्हणून? श्याम मानव माध्यमजगताच्या माध्यमातून करीत राहिलेल्या मागणीवर चकार शब्द बोलण्याची गरजही साहित्य महामंडळाच्या एकाही पदाधिकार्याला वाटली नाही. उलट, आश्रमाच्या पदाधिकार्यांनी स्वत:हून माघार घेऊन प्रश्न परस्पर सोडवून टाकला म्हणून सुटकेचा नि:श्वास सोडला महामंडळाच्या स्वनामधन्य नेत्यांनी? ‘‘आम्ही तर त्यांना अधिकृत रीत्या आमचा होकारही कळवला नव्हता, पण त्यांनीच स्वत:हून आयोजनाचा प्रस्ताव मागे घेतला,’’ अशी मल्लिनाथी करून, आपला या प्रकरणाशी काडीचा संबंध नसल्याचे ‘दाखवण्याचा’ निलाजरा प्रयत्न करताहेत महामंडळाचे काही पदाधिकारी आता.संबंध काय हो अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा मराठी साहित्य संमेलनाशी? ते सांगतील आता संमेलनं कुठे घ्यायची ते? अन् त्यांच्या तालावर नाचणार आहे महामंडळ? हे संमेलन आहे की तमाशा? साहित्यिकांच्या आपसातल्या वादातूनच घडीभराची फुरसत मिळत नाही इथे कुणाला अन् आता अशा उपर्या संस्थांनी प्रसारमाध्यमांचा ‘वापर’ करून आगीत तेल ओतण्याचा प्रकार केला, तर त्याची एवढी गंभीर दखल घेतली जातेय् इथे? अशी कुठलीही मागणी करायला टीव्हीच्या पलीकडे एक अधिकृत मंच असतो. संबंधित संस्थेचे अधिकृत कार्यालय असते. तिथे काम करणारे पदाधिकारी असतात, हे ठाऊक नाही अनिंसच्या नेत्यांना? त्यातले काहीएक न करता, कुठलाही अधिकृत लेखी अर्ज कुठल्याही अधिकृत पदाधिकार्याकडे न करता, आयोजकांशी एका शब्दाने न बोलता जेव्हा श्याम मानवांसारखे लोक केवळ आणि केवळ कॅमेर्यापुढेच ही मागणी रेटून धरतात, या जगावेगळ्या मागणीची ‘ब्रेकिंग न्यूज’ करणार्या एकाही शहाण्याला, याबाबत संबंधितांकडे लेखी मागणी का करीत नाही, असा साधा प्रश्नही मानवांना विचारावासा वाटत नाही, संमेलन या आश्रमातही होऊ शकते, याची पूर्ण कल्पना असतानाही दबा धरून राहिलेले अनिंसचे नेते स्थळाची घोषणा होताच अचानक हल्ला केल्याप्रमाणे आरडाओरड करीत सुटतात, तेव्हा त्यातून ध्वनित होणारा राजकारणाचा गंध सुसह्य नसतो. आज संपूर्ण बुलडाणा परिसरात असलेली या आश्रमाची प्रतिमा खोटी? आश्रमाच्या कार्याबाबत लोकांच्या मनात असलेली आस्था खोटी अन् फक्त श्याम मानव म्हणतात तेवढंच खरं? कशासाठी निर्माण केला जातोय् हा वाद अन् कशासाठी चालला आहे हा थयथयाट? अन् मग हेच दावा करतात पुरोगामित्वाचा? अशा वर्तणुकीतून दहशतवाद पसरविणारे लोक सांगतील सहिष्णुता काय असते ते आणि ते आरोप करतील दुसर्यांवर असहिष्णुतेचा?साहित्याची अनेक संमेलने कुठल्याशा शैक्षणिक संस्थेच्या प्रांगणात होतात. तिथे व्यापारी वृत्तीने काम होत नाही, असा दावा कुणाला करता येईल सांगा? नाशिक येथे झालेल्या साहित्य संमेलनाची मुहूर्तमेढ रोवताना पूजेला बकरा कापला गेल्याची चर्चा तर अजून संपलेली नाही! अनिसंच्या कुण्या पदाधिकार्याने आक्षेप नोंदवला होता त्यावर? आळंदीचे संमेलन ज्ञानेश्वरमंदिराच्या परिसरात झाले होते. पण, म्हणून धार्मिक परिसरात संमेलन कशाला, असा सवाल नाही उपस्थित केला कुणी अन् हिवरा आश्रमात संमेलन होऊ घातले तर एवढा गहजब? जे महाराज आज हयात नाहीत, ज्यांच्यावरील आरोपांबाबत न्यायालयाने निर्णय देऊन झाला आहे, इतकेच काय, या आश्रमाविरोधात गेल्या कित्येक वर्षांत खुद्द श्याम मानव वा त्यांचे कार्यकर्तेही एका शब्दाने काही बोलल्याचे ऐकिवात नाही, तिथे संमेलन होऊ घातले, तर लागलीच पोटशूळ उठला यांना? अधिकृत रीत्या तक्रार वा मागणी न करताच पोपटपंची सुरू झाली त्यांची. गरजही काय म्हणा तशी रीतसर तक्रार दाखल करण्याची. तेही, कॅमेर्यासमोर असलं भन्नाट काही बरळलं की, लागलीच त्याची ‘बातमी’ करायला धावणार्या शहाण्यांचा गोतावळा सभोवताल असताना?या प्रकाराचा दुरून तमाशा बघणार्या महामंडळाच्या पदाधिकार्यांना तरी काय म्हणायचे? खरंतर संमेलनाच्या आयोजनासाठीचा एक प्रस्ताव दिल्लीचाही होता म्हणे. सुरुवातीला हर्षोल्हासात आयोजनाची तयारी दर्शविणार्या दिल्लीकरांनी नंतर नकार का दिला, याचे कारण सांगू शकेल कुणी? अन् आता हिवरा आश्रमाच्या पदाधिकार्यांनी फुकाचा वाद नको म्हणून संमेलनाच्या आयोजनाचा प्रस्ताव स्वत:हून मागे घेतला, तर कुणाच्याच मनाला वेदना होत नाहीयेत्. उलट, साहित्य महामंडळाचे पदाधिकारी ‘सुंठेवाचून खोकला’ गेल्याची भावना व्यक्त करताहेत अन् हे म्हणे ‘स्वाभिमानी सारस्वत’ आहेत…! ‘संधिसाधू’ अनिंसने घातलेला योजनाबद्ध धिंगाणा गुमान दुरून बघणारे हतबल ‘सारस्वत’ किती सहन करणार, हे येणारा काळच सांगेल…!
नुसती हाय-वेवरच्या दारू विक्रीवर बंदी घातली कोर्टाने, तर केवढी तारांबळ उडाली लोकांची. महामार्गापासून पाचशे मीटरच्या परिघात तर जणू अवकळा पसरली. त्या कक्षेबाहेरच्या दारू दुकानदारांना मात्र सुगीचे दिवस आलेत मग. आवरता येईना एवढी गर्दी जमू लागली त्या दुकानांसमोर. अगदी, नियंत्रण ठेवायला पोलिस उभे करावे लागावेत इतकी! दारूच्या दुकानासमोर लोक छान शिस्तीत रांगा लावून उभे आहेत. मजूर काय नि साहेब काय, कुठलाच भेद नाही. बडे बडे अधिकारीही कशाचीही पर्वा न करता, लाज न बाळगता आपला नंबर लागण्याची वाट बघताहेत. काऊंटरवर पोहोचले की गुमान पैसे मोजायचे अन् बॉटल घेऊन घराकडे निघायचे. दररोज सायंकाळी हे दृश्य अनुभवले आहे हायवे परिसरातील लोकांनी. काय अस्वस्थता सुरू झाली कोर्टाच्या या निर्णयाने. हाय-वेवरची बंद झालेली दारू दुकाने पुन्हा सुरू व्हावीत म्हणून मतभेद अन् स्पर्धा विसरून एकत्र आले सारे. लॉबी तयार झाली. झालेला निर्णय फिरवण्यासाठी दबावतंत्राचा वापर करण्याचे षडयंत्र रचले गेले. दुकाने बंद झाल्याने रोजगार कसा बुडाला अन् तिथे काम करणारी पोरं कशी उघड्यावर आली, त्यांच्यावर कशी उपासमारीची वेळ आली आहे, याचे किस्से रंगवून सांगू लागले व्यापारी. कधी नव्हे एवढी कणव अचानक दाटून आली त्यांच्या मनात, त्या पोरांसाठी. गरिबांवरील दयेच्या आडून यांच्या धंद्याच्या बाता होऊ लागल्या सरकारदरबारी…
दारूच्या दुष्प्रभावाला, दारुड्या नवर्याच्या जाचाला, त्यांच्याद्वारे घातल्या जाणार्या धिंगाण्याला कंटाळलेल्या महिलांनी एकत्र येऊन मागणी केली, तर गावातले दारूचे दुकान बंद करण्याचा कायदा मंजूर होऊन आता तशी बरीच वर्षे झाली आहेत. त्यानंतर कित्येक गावांमधील दारूची दुकाने पन्नास टक्के महिलांच्या मताधिकाराने बंद झाल्याचीही उदाहरणे आहेत. मुजोर दारू दुकानदारांना यानिमित्ताने महिलांची ताकद कळली. पण, परवा काय झाले कुणास ठाऊक, सारी चक्रं उलटी फिरली. चंद्रपूर जिल्ह्यातल्या वहाणगावातील महिलांनी आपल्या गावातलं दारूचं बंद झालेलं दुकान पुन्हा सुरू व्हावं म्हणून आग्रह धरला. तसा ठराव मंजूर केला. आश्चर्य आहे ना? महिलांचा आग्रह? तेही दारूचे दुकान सुरू करण्यासाठी? हो! तसे घडले खरे! नंतर कळले की, चंद्रपूर जिल्ह्यातली घोषित दारूबंदी प्रभावीपणे अंमलात येत नसल्याने आणि बंदी असतानाही दारू सर्रास विकली जात असल्याने ती अधिकृतपणेच सुरू करून टाका एकदाची, अशा उपरोधातून या ठरावाची कल्पना उदयाला आली. खरंच तसं घडलं असेल तर ती अजूनच वाईट बाब ठरावी. कोण जबाबदार आहे या परिस्थितीला? चांगल्या उद्देशाने लागू करण्यात आलेल्या दारूबंदीचा फज्जा उडवायला, बंदीमुळे ज्यांचा धंदा प्रभावित झाला ती तमाम व्यापारीवृत्तीची मंडळी विरोधाचा झेंडा उभारून सरसावली असेल, तर ते स्वाभाविक तरी ठरेल एकवेळ. पण पोलिसांचे काय? त्यांना चरायला कुरण मिळावे म्हणून लागू झाली होती का इथली दारूबंदी? इथे तर बंदी काय लागू झाली अन् पोलिसांचीच चांदी झाली! अवैध मार्गाने, नको त्या पद्धतीने, खरी-खोटी अशा सर्व प्रकारची दारू, बंदीनंतर मुबलक प्रमाणात उपलब्ध होत असेल, तर हे अपयश कुणाचे आहे? व्यसनमुक्तीच्या एका चांगल्या सामाजिक उद्देशाने दारूबंदीचा आग्रह धरणार्या मंत्र्यांचे? की त्या अंमलबजावणीत खोडा घालणार्या यंत्रणेचे? वहाणगावच्या पंचक्रोशीतील महिलांनी परवा मंजूर केलेला ठराव, ही त्या अपयशी यंत्रणेच्या थोबाडीत मारलेली चपराक आहे!नुसती हाय-वेवरच्या दारू विक्रीवर बंदी घातली कोर्टाने, तर केवढी तारांबळ उडाली लोकांची. महामार्गापासून पाचशे मीटरच्या परिघात तर जणू अवकळा पसरली. त्या कक्षेबाहेरच्या दारू दुकानदारांना मात्र सुगीचे दिवस आलेत मग. आवरता येईना एवढी गर्दी जमू लागली त्या दुकानांसमोर. अगदी, नियंत्रण ठेवायला पोलिस उभे करावे लागावेत इतकी! दारूच्या दुकानासमोर लोक छान शिस्तीत रांगा लावून उभे आहेत. मजूर काय नि साहेब काय, कुठलाच भेद नाही. बडे बडे अधिकारीही कशाचीही पर्वा न करता, लाज न बाळगता आपला नंबर लागण्याची वाट बघताहेत. काऊंटरवर पोहोचले की गुमान पैसे मोजायचे अन् बॉटल घेऊन घराकडे निघायचे. दररोज सायंकाळी हे दृश्य अनुभवले आहे हायवे परिसरातील लोकांनी. काय अस्वस्थता सुरू झाली कोर्टाच्या या निर्णयाने. हाय-वेवरची बंद झालेली दारू दुकाने पुन्हा सुरू व्हावीत म्हणून मतभेद अन् स्पर्धा विसरून एकत्र आले सारे. लॉबी तयार झाली. झालेला निर्णय फिरवण्यासाठी दबावतंत्राचा वापर करण्याचे षडयंत्र रचले गेले. दुकाने बंद झाल्याने रोजगार कसा बुडाला अन् तिथे काम करणारी पोरं कशी उघड्यावर आली, त्यांच्यावर कशी उपासमारीची वेळ आली आहे, याचे किस्से रंगवून सांगू लागले व्यापारी. कधी नव्हे एवढी कणव अचानक दाटून आली त्यांच्या मनात, त्या पोरांसाठी. गरिबांवरील दयेच्या आडून यांच्या धंद्याच्या बाता होऊ लागल्या सरकारदरबारी…चंद्रपूर जिल्ह्यातल्या दारूबंदीनंतर तरी वेगळे काय घडते आहे? कालपर्यंत ज्यांना राब राब राबवून घेत स्वत:चा व्यवसाय उभा केला, ती पोरं दारूबंदीमुळे बेरोजगार झाल्याचा कांगावा हेच व्यापारी करताहेत. मग बंदीनंतरही दारूचा अवैध व्यापार कसा वाढला, दारूअभावी लोकांचे कसे हाल होताहेत, बंदी कशी अपयशी ठरली, बंदी असूनही शाळकरी पोरांचा वापर करून दारू कशी सर्रास विकली जात आहे, याच्या भडक कथा सांगण्यात हीच जमात पुढे आहे.बरं, लोकांचीही मानसिकता जगावेगळीच आहे. यांना गावात कुणी दारू पिऊन धिंगाणा घातलेलाही नको. दारू पिऊन नवर्यानं बायकोला हाणलेलीही नको अन् या सर्व प्रकारांवर आळा घालण्यासाठी बंदीचा प्रयोग केला, तर त्याचे काही प्रमाणातील दुष्परिणामही वाट्याला आलेले नकोत! अन् तरीही समाज सुधारलेला मात्र हवाय् प्रत्येकालाच.इंटरनेटमुळे चांगलं-वाईट सगळंच हाताच्या बोटांच्या टोकांवर उपलब्ध झालं आहे. त्याचा उपयोग चांगल्याप्रमाणेच वाईटासाठीही तेवढाच होतो, हेही ठाऊक आहे सर्वांनाच. सारंकाही आपल्या नियंत्रणाबाहेर चाललं असल्याची जाणीवही मन विषण्ण करून जाते कित्येकदा. पण, तरीही ‘आपल्या’ घरातली पोरं त्या वाटेनं जाऊ नये, अशी सुप्त इच्छा असतेच की प्रत्येकाच्या मनात. तेच हुंड्याचं, वेश्यालयांचं अन् तेच दारूचं. पूर्वीच्या तुलनेत आज आपल्या समाजात हुंड्याचे प्रमाण दखल घ्यावी इतके कमी झाले आहे. कायद्याच्या धाकासोबतच वर्षानुवर्षांच्या जनजागृतीचाही तो परिणाम आहे. व्यसनांच्या बाबतीतही स्थिती वेगळी कशी असेल? पंजाबातली तरुणाई आजघडीला पुरती ड्रग्जच्या कह्यात गेली असल्याचे उमजायलाही ‘उडता पंजाब’ पडद्यावर यावा लागला. तेव्हा कुठे समस्येचे गांभीर्य कळले तमाम सुजाण नागरिकांना. चित्रपट बघितल्यावर खाड्कन डोळे उघडले सर्वांचे. मग सुरू झाली फुकाची चर्चा.एकीकडे व्यसनमुक्तीचे गोडवेही गायचे नि दुसरीकडे दारूबंदीला विरोधही करायचा, हे कसे चालेल? मुळात हे दायित्व समाजाचे आहे, हे ध्यानात घेतले पाहिजे. सरकारी यंत्रणेची काम करण्याची स्वत:ची तर्हा असते. ती दारूचे परवानेही वाटते आणि व्यसनमुक्तीचे कार्यक्रमही चालवते. महाराष्ट्रात गुटखाबंदी लागू करतानाचा अनुभव सर्वांना ठाऊक आहे. गुटख्याचे कारखाने बंद करणे ही राज्य सरकारच्या अखत्यारीबाहेरील बाब होती. पण, त्यावर या राज्यात बंदी आणणे सरकारच्या हाती होते. तेवढे सरकारने केले. आता पुढची जबाबदारी समाजाची होती. ज्यांचे धंदे गुटख्याच्या भरवशावर चालले होते, त्यांनी या बंदीचे समर्थन करण्याचा प्रश्नच नव्हता. पण, समाजही ठामपणे पाठीशी उभा राहिला नाही. उलट तोच ही बंदी अपयशी ठरल्याचे तुणतुणे वाजवीत राहिला. म्हणूनच आज जागोजागी उभ्या असलेल्या पानटपर्यांवरून गुटखाबंदीच्या कायद्याची लक्तरे टांगलेली दिसताहेत. चंद्रपूर जिल्ह्यातल्या दारूबंदीचेही काहीसे तसेच होते आहे. काहींना ती बंदी सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नाने अंमलात आली म्हणून यशस्वी झालेली नको आहे, तर काहींच्या धंद्यावरच आच आली म्हणून त्यांचा बंदीविरुद्ध रोष आहे. ते तर बंदीमुळे या जिल्ह्याची रया कशी लयाला गेली आणि सारा परिसर दारूच्या धंद्यांअभावी भकास कसा झाला, हेच पटवून सांगण्यात व्यग्र आहेत. दारूचे सरळ सरळ समर्थन करता येत नाही म्हणून बंदीच्या अपयशाचा पाढा वाचण्यात दिवस घालवताहेत. जगाच्या पाठीवर कुठेतरी दारूबंदी यशस्वी ठरली का, गांधीजींनी तरी आयुष्यात कधी कुठे दारूबंदीची मागणी केली होती, असे नानाविध प्रश्न त्यांच्या सुपीक डोक्यात आकारास येऊ लागले आहेत. त्या प्रश्नांच्या आडून आपल्या नापाक इराद्यांना आकार देण्याचे निलाजरे प्रयत्न चाललेत सर्वदूर. समाजहिताला मूठमाती देत, दारूवरची ही बंदी यशस्वी होऊ नये यासाठी धडपडणारे लोक, ही संधी साधून खाबुगिरीत रमलेली भ्रष्ट पोलिस यंत्रणा अन् कशाशीच काही घेणेदेणे नसल्यागत दुरून तमाशा बघणारी समाजव्यवस्था… यामुळेच वहाणगावच्या महिलांवर, बंदी अंमलात आणू शकत नसाल तर दारू विक्री सुरू करा, असं म्हणण्याची वेळ आली आहे… धगधगते असले तरी वास्तव हेच आहे…!
इथे भावनिक आवाहन करीत कुणाच्याही भक्तीला साद घालता येते, हा समज खरा की खोटा? सूर अन् ताल भक्तिरसाचाच असला, तरी त्यावर फेर धरताना जराशी सावधगिरी बाळगायला हवी ना लोकांनीही! थेट देव्हार्यात कसे कुणालाही स्थान देऊन बसतो आम्ही? अन् असे कसे कुणाच्याही आरत्या ओवाळायला तयार होतात लोक? कालपर्यंत ज्याला डोक्यावर धरून नाचलो, तो ‘आसाराम’ किंवा ‘राम रहीम’ निघाला की मनातल्या श्रद्धेच्या पाऽऽर चिंधड्या उडतात. कुणाच्या तरी हसण्याचा विषय ठरते आमची भावना. आधीच या देशात हिंदूंची श्रद्धा हा खिल्ली उडविण्याचा विषय असतो. कुणी धर्माच्या नावावर बकर्या कापल्या काय अन् कुणी येशूच्या नावाचं ताबीज हाताला बांधल्यानं तब्येत सुधारण्याचा दावा केला काय, त्याला आव्हान द्यायला कुणीच उतरत नाही इथे मैदानात. एकदा बड्या शहरातल्या मेडिकल स्टोअर्सचे सर्वेक्षण घ्या. कोणत्या धर्माच्या प्रार्थनाघराशी संबंधित लोक सर्वाधिक कंडोम्स खरेदी करतात, याचा शोध लागेल. पण, त्याबाबत ना हाक ना बोंब! आसारामसारख्या चित्रफितीही जारी होत नाहीत त्यांच्या. त्यामुळे त्यांचे चारित्र्य पांढर्या कपड्यांआड दडून जाते… वस्त्रं भगवी असली की मात्र अपेक्षा वाढतात लोकांच्या. हे एका अर्थाने चांगलेही आहे. भगव्याची महती व्यक्त होते त्यातून. त्यामुळे धारण करणार्यांनीही कसोटीच मानली पाहिजे ही.
सच्चा डेराचा प्रमुख राम रहीम याने केलेल्या घृणास्पद कृत्याची शिक्षा तब्बल पंधरा वर्षांनी सुनावल्यावरही, पीडितांना न्याय मिळवून दिल्याच्या आविर्भावात स्वत:ची पाठ थोपटून घेणारी न्यायप्रणाली, ‘‘तू जनावरासारखा वागला, तुला माफी नाहीच,’’ असं, इतक्या वर्षांनंतर दिमाखानं त्याच्या तोंडावर सांगणारे न्यायमूर्ती… धर्माच्या नावाखाली उघडलेल्या आश्रमात चाललेले त्याचे उपद्व्याप. त्याला बळी पडलेले स्त्री-पुरुष, तरुण-तरुणी… या काळात ‘सच्च्या’ डेर्यात निष्पापांचे मुडदे पडल्याचा गंभीर आरोप…. आणि त्याचा गोरखधंदा उघडकीस आल्यानंतर कोर्टानं सुनावलेला फैसला मान्य करायचं सोडून गुरमितच्या समर्थनाचे ओंगळवाणे प्रदर्शन मांडत जाळपोळ करून वस्त्या उद्ध्वस्त करत सुटलेले त्याचे भक्तवजा समर्थक… कुणाला दोष द्यायचा, कुणाचा विरोध करायचा अन् कुणाची बाजू घ्यायची? प्रदीर्घ काळचा अभ्यास आणि कठोर साधनेतून कमावलेल्या आध्यात्मिक बळावर मिळणे अपेक्षित असलेल्या, आश्रमातल्या ‘गाद्यां’वर राम रहीमसारखे लोक विराजमान होत असतील, तर एकदा त्या व्यवस्थेचाच पुनर्विचार झाला पाहिजे. ज्याच्यासमोर शेकडो लोक श्रद्धेनं नतमस्तक होतात अशी पदं कुणाच्या स्वाधीन करायची, ही बाब परंपरागत व्यवस्थेच्या चौकटीतच बंदिस्त राहणार असेल, तर मग न्याय-अन्यायाची भाषा बोलण्याचा अधिकारही उरत नाही कुणालाच. पण, मग आपली न्यायव्यवस्था तरी कशाच्या आधारे पाठ थोपटून घेतेय् स्वत:ची? सादर झालेल्या ज्या तक्रारीचा निवाडा करायला ज्याला एक-दोन नव्हे, तर तब्बल पंधरा वर्षे लागली, ती न्यायव्यवस्था संबंधित पीडितांना न्याय मिळवून देण्याचा दावा तरी कशाच्या आधारावर करतेय्? ती तर तक्रार दाखल झाली म्हणून… अन्यथा चर्चा तरी झाली असती या विषयावर? झाली असती मग राम रहीमला शिक्षा? की संपला असता धर्माच्या आडून चाललेला तमाशा? या प्रकरणी निकाल जाहीर होत असताना ढसाढसा रडत दयेची भीक मागणार्या राम रहीमसमोर कोर्ट जी कठोर भाषा बोलू शकले, तेच खडे बोल, कुठलाही अधिकार नसलेली समान्य माणसं कधीच का सुनावू शकली नाही त्याला? हा त्या गादीबद्दल असलेल्या नितांत श्रद्धेचा परिपाक मानायचा, की तेवढा दरारा, दहशत अन् मुजोरी होती त्याची?दीड दशकापूर्वीच्या एका तक्रारीवर आज शिक्षा ठोठावण्यात आल्यानंतर अन्य साध्वींपासून तर सुरक्षारक्षकापर्यंत सारेच कसे पोपटासारखे बोलू लागलेत बघा. बाबांच्या कारनाम्याचे रंगतदार किस्से सार्या जगाला सांगण्यासाठी धडपडणारी ही जमात कालपर्यंत का गप्प होती मूग गिळून? हा बाबा रोज कुठल्यातरी शाळकरी पोरीला आश्रमात आणून तिची अब्रू लुटायचा म्हणे! कित्येक तरुणांना त्यानं नपुंसक केलं होतं, हे आज लोकांदेखत बेधडक सांगण्याची हिंमत बांधणारी माणसं इतकी वर्षं हा तमाशा उघड्या डोळ्यांनी बघत का राहिली होती? आश्रमातले संन्यासी, कर्मचारी, दरबारात येणारे भक्त, ज्यांच्यावर अत्याचार झालेत त्या मुलींचे पालक… यापैकी कुणालाच धाव घ्यावीशी वाटली नाही कधी प्रशासनाकडे? बाबांच्या दहशतीचा परिणाम, की प्रशासनावरचा अविश्वास होता तो?राम रहीमसारखे लोक उगाच मोठे, गब्बर अन् मुजोर होत नाहीत. सभोवतालची माणसंच हातभार लावत त्यांना मोठं करत असतात. प्रत्यक्षात जे नाही अशा त्याच्या प्रतिमेचे स्तोम माजवत त्याच्या थोरवीचा आभास निर्माण करीत असतात. शिवाय, आपल्या अपार भक्तीचा नजराणा सादर करत कुणासमोरही माना तुकविणार्या भक्तांचीही महती ती काय वर्णावी? एका बलात्कार्याला दोषी ठरवताच आपला क्षोभ व्यक्त करण्यासाठी जाळपोळ करून सार्वजनिक संपत्तीची नासधूस करणारे, वस्त्या उद्ध्वस्त करत सुटलेले लोक खरंच भावभक्तीच्या मार्गाने निघाले आहेत? की हा तमाशा घडवून आणणारा समूह जरासा निराळाच आहे? बलात्कारी असला, लोकांचे शोषण करीत असला, तरी राम रहीमचे त्या गादीवर असण्यातच आपलाही फायदा असल्याची पुरती जाण असलेल्या टोळीने तर हा विध्वंस घडवून आणला नाही ना, भक्तांच्या नावावर? कारण या कृत्याचा ठपका एकदा का भक्तांवर बसला की, बाबाचं मोठेपणही आपसूकच अधोरेखित होतं अन् मग हवा तो धिंगाणा घालायला आपण मोकळे, हे कळायला काही फार हुशार असावे लागण्याची गरज नाही. परवा कोर्टाचा निर्णय घोषित झाल्यानंतर पंजाब- हरयाणात घातला गेलेला हैदोस नेमका ‘सच्च्या’ भक्तांनी घातला की ‘डेरा’च्या लाभात अन् बाबाच्या पापातही भागीदार असलेल्या काही मोजक्या लोकांनी रचलेल्या षडयंत्राचा तो परिपाक होता, याची शहानिशा होण्याची गरज आहे. खरंतर, शक्यता दुसर्या शक्यतेचीच अधिक आहे. पण, बदनामी मात्र सच्च्या भक्तांच्या वाट्याला आली आहे. आपल्या समाजातील एक वर्गतर या जाळपोळीचे निमित्त साधून, एकूणच भक्तांच्या भक्तीवर प्रश्नचिन्ह उभे करून बसला आहे. त्यांच्यावर तोंडसुख घेणे चालले आहे त्या समूहाचे. अगदी जाणीवपूर्वक. त्यांना उत्तर देण्यासाठी म्हणून नाही, पण या घटनेचा बोध खर्या भक्तांनी घेणेही गरजेचे आहे. आपल्या भावभावनांचा कुणी असा बाजार मांडणार असेल, तर त्याला तो मांडू द्यायचा की नाही, हे ठरवण्याचा अधिकार तरी त्यांचा स्वत:चा असावा ना? अगदी परवा परवापर्यंत टीव्हीवरच्या ज्यांच्या प्रवचनाने बहुतांश लोकांच्या दिवसाची सुरुवात व्हायची, ज्यांच्या रसाळ वाणीने भारावलेल्या वातावरणात रममाण होण्याकरिता लाखोंच्या गर्दीत आपले स्थान अबाधित राखण्याकरिता कायम धडपडले, घरातल्या देव्हार्यात परंपरागत देवी-देवतांसोबत या संतांच्या तस्बिरींना स्थान देऊन त्यांच्या आरत्या ओवाळल्या, त्या मंडळींच्या चारित्र्यावर उडत असलेले शिंतोडे मनाला खचीतच वेदना देणारे आहेत. स्त्रियांचे शोषण केल्याच्या आरोपाखाली त्यांचे कारागृहातले वास्तव्य तर अजूनच दु:खदायक आहे.राम रहीमला दोषी ठरविण्याचा निर्णय जाहीर झाल्यानंतर पंचकुला, सिरसामध्ये उसळविण्यात आलेला हिंसाचार, करण्यात आलेली जाळपोळ ही परमेश्वराच्या अस्तित्वावर अगाध श्रद्धा असलेल्या ‘सच्च्या’ भक्तांनी केली नसेल, याबाबतची जनमानसातली खात्री दृढ होईलच कधीतरी, पण तो प्रकार घडला या भक्तांच्याच नावाने, हे वास्तव कसे नाकारायचे? हे असे घडू शकले, याला कारण भक्तांची आंधळी भावना आहे? इथे भावनिक आवाहन करीत कुणाच्याही भक्तीला साद घालता येते, हा समज खरा की खोटा? सूर अन् ताल भक्तिरसाचाच असला, तरी त्यावर फेर धरताना जराशी सावधगिरी बाळगायला हवी ना लोकांनीही! थेट देव्हार्यात कसे कुणालाही स्थान देऊन बसतो आम्ही? अन् असे कसे कुणाच्याही आरत्या ओवाळायला तयार होतात लोक? कालपर्यंत ज्याला डोक्यावर धरून नाचलो, तो ‘आसाराम’ किंवा ‘राम रहीम’ निघाला की मनातल्या श्रद्धेच्या पाऽऽर चिंधड्या उडतात. कुणाच्या तरी हसण्याचा विषय ठरते आमची भावना. आधीच या देशात हिंदूंची श्रद्धा हा खिल्ली उडविण्याचा विषय असतो. कुणी धर्माच्या नावावर बकर्या कापल्या काय अन् कुणी येशूच्या नावाचं ताबीज हाताला बांधल्यानं तब्येत सुधारण्याचा दावा केला काय, त्याला आव्हान द्यायला कुणीच उतरत नाही इथे मैदानात. एकदा बड्या शहरातल्या मेडिकल स्टोअर्सचे सर्वेक्षण घ्या. कोणत्या धर्माच्या प्रार्थनाघराशी संबंधित लोक सर्वाधिक कंडोम्स खरेदी करतात, याचा शोध लागेल. पण, त्याबाबत ना हाक ना बोंब! आसारामसारख्या चित्रफितीही जारी होत नाहीत त्यांच्या. त्यामुळे त्यांचे चारित्र्य पांढर्या कपड्यांआड दडून जाते… वस्त्रं भगवी असली की मात्र अपेक्षा वाढतात लोकांच्या. हे एका अर्थाने चांगलेही आहे. भगव्याची महती व्यक्त होते त्यातून. त्यामुळे धारण करणार्यांनीही कसोटीच मानली पाहिजे ही. तरुणाईसमोर बोलताना एकदा अण्णा हजारे म्हणाले होते, ‘‘ब्रह्मचर्य हे व्रत आहे. साधना आहे. दुधारी तलवार आहे. त्याचा स्वीकार करताना दहा वेळा विचार करा. समाजसेवा करायला ते व्रत स्वीकारलंच पाहिजे असा आग्रह नाही. त्यामुळे नच जमलं तर सोडून द्या. पण, स्वीकार करून त्याला उणेपण आणू नका…’’जे अण्णांना कळते, ते अध्यात्माचा कळस गाठल्याचा दावा करणार्यांना कळत नसेल, भक्तांचा आडोसा घेऊन तेच ब्रह्मचर्याची खिल्ली उडवीत असतील, तर मग या प्रकारावर आळा घालण्याची जबाबदारी भक्तांनीच स्वीकारली पाहिजे…