.
इथे प्रश्न पोलिसांनी शाहरूखवर कारवाई करण्याचा नाहीच. प्रश्न त्याच्या बेमुर्वतखोर वागण्याचा आहे. सामना संपल्यानंतर रात्री बर्याच उशिरा दारूच्या नशेत आपले सहकारी आणि मुलांसह तो मैदानाच्या दिशेने निघाला. आयपीएलच्या स्पर्धेत सहभागी असलेल्या एका संघाचा मालकच मैदानाकडे निघाला म्हटल्यावर त्याला अडवणार कोण? बहुधा असाच प्रश्न त्याच्याही मनात असावा. त्यामुळेच अगदी ङङ्गमालकाच्या' आवेशातच तो मैदानाच्या दिशेने निघाला. तिथल्या सुरक्षा रक्षकांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. त्यांची ही ङङ्गगुस्ताखी' एका टीम मालकाला कशी सहन व्हावी? एरवी खिजगणतीतही नसलेल्या या रक्षकांवर एक तुच्छ नजर टाकत शाहरूखने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. हे रक्षकही काल आपल्या कर्तव्याबाबत अधिकच जागरूक होते की काय कोण जाणे, पण त्यांनी शाहरूखच्या मैदानाकडील मुसंडीला जोरदार विरोध केला. एवढ्यात मुंबई क्रिकेट असोसिएशनचे काही पदाधिकारीही तिथे हजर झाले. पिऊन तऽऽर्र असला तरी शाहरूख मोठी असामी आहे याचे भान जपत या पदाधिकार्यांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. पण किंग खानांचा पारा आणखीच चढला. हे लोक भलेही एमसीएचे पदाधिकारी असतील, पण किंग खान म्हणजे एका टीमचा मालक. शरद पवार आदी राजकीय नेत्यांनी गेली काही वर्षे भारतात आरंभलेल्या क्रिकेटच्या धांतील तोही एक पार्टनर. त्याला अडविण्याची एमसीएच्या पदाधिकार्यांचीही काय बिशाद? बडी असामी असलेल्या शाहरूखने त्यांनाही चार-दोन शिव्या हासडल्या. ङङ्गइथेच गाडून टाकीन' अशी त्याची भाषा होती असं म्हणतात. दरम्यान रक्षकांना धाबुीही झाली. या प्रकाराने उपस्थित सारेच लोक चकीत झाले. पदाधिकारी व्यथित झालेत. एमसीएच्या काही पदाधिकार्यांना ही शिवीगाळ मनाला बोचली. या प्रकाराला माफी देणे योग्य ठरणार नसल्याचे मत व्यक्त झाले. आपण कुणाविरुद्ध तक्रार नोंदोवतोय् आणि कुणाविरुद्ध बोलतोय् याची कल्पना या पदादिकार्यांना नसावी असे कसे म्हणता येईल? सध्या क्रिकेटजगतावर खेळाडू आणि रसिकांच्या तुलनेत राजकीय नेते, बुकी, उोजक यांचा असलेला ताबा लक्षात घेता उा आपल्यावर हे प्रकरण कसे शेकू शकते, नेत्यांची नाराजी ओढावली जाणार याचीही पूर्ण कल्पना एमसीएच्या पदाधिकार्यांना असतानाही हे प्रकरण पोलिस ठाण्यात गेले. शाहरूखला वानखेडे स्टेडियमची दारेच बंद करण्याची भाषा बोलली जाऊ लागली याचा अर्थ प्रकरण खरंच तेवढं गंभीर असल्याचे मानले जात आहे.
मी घरीच होतो. सामना संपल्यावर मुलांना घ्यायला आपण स्टेडियममध्ये आलो, हे शाहरूखचे स्वतःचे विधान खरे मानले, तर त्याने या स्पर्धेची फ्रॅन्चायझी क्रिकेटवरील प्रेमापोटी नाही, तर केवळ पैशासाठी मिळवली, हे उघड सत्य आहे. जी टीम प्रत्यक्ष मैदानात उतरली होती, त्याचा मालक सामना सुरू असताना जर घरी बसला असेल, तर त्याचा दुसरा कोणता अर्थ निघतो? शरद पवारांचा क्रिकेटशी काय संबंध, हा कधीकाळी या देशातील भोळ्याभाबड्या लोकांना पडणारा प्रश्न मध्यंतरी टीना अंबानी, प्रिती झिंटा, शाहरूख यांच्याबद्दलही पडायचा. आताशा लोक समजदार झालेत. त्यांनाही आता असले क्लिष्ट प्रश्न पडेनासे झालेत. गेले काही वर्ष इतरांप्रमाणेच शाहरूखही या व्यवसायात उतरला आहे. क्रिकेटबद्दल भारतातल्या सर्वसामान्य क्रीडा रसिकांच्या मनात असलेल्या भावनेचा आयपीएलच्या माध्यमातून मांडण्यात आलेल्या बाजाराचा तोही एक गुंतवणूकदार आणि म्हणूनच कोट्यवधीच्या नफ्याचा भागीदार आहे. अशी गुंतवणूक करायला आणि नफा मिळवायला त्या व्यक्तीचा प्रत्यक्षात क्रिकेटच्या खेळाशी संबंध असण्याची गरज नाही. इतर कुठल्याही क्षेत्रातली यशस्वी कारकीर्द, प्रसिद्ध प्रतिमा आणि लोकप्रियता त्यासाठी पुरेशी आहे. पवारांनी मांडलेल्या क्रिकेटच्या व्यापारात कुणी सहभागी व्हायचे आणि कुणी नाही, हा ज्याच्या त्याच्या आर्थिक ऐपतीचा प्रश्न आहे. पण या लोकांचे सार्वजनिक जीवनातले वर्तन कसे असावे, याबाबत प्रश्न उपस्थित करण्याचा अधिकार तरी त्याच्या चाहत्यांना असावा की नाही?
अमेरिकेतल्या विमानतळांवर सुरक्षा अधिकार्यांनी तासन्तास चालवलेल्या चौकशीच्यावेळी मुकाट्यानं उभा राहणार्या शाहरूखला भारतातल्या सुरक्षा रक्षकांवरच कसा हात उचलावासा वाटतो? क्रिकेटवरील प्रेमापेक्षाही पैशासाठी स्पर्धेपुरता एका टीमचा ङङ्गमालक' झाल्याबरोबर तो स्वतःला सर्वेसर्वा कसा समजू लागतो? मैदानावरील प्रवेशाबाबतचे, स्टेडियममध्ये सिगारेट न ओढण्याचे नियम पाळण्याची जराही गरज त्याला का वाटत नाही? हा केवळ मप्रशनाचा तात्कालिक परिणाम आहे, की मुळातच इथल्या व्यवस्थेला न जुमानण्याच्या वृत्तीतून आलेली ही मुजोरी आहे? भारतीय रसिक ज्यांना डोक्यावर घेऊन नाचतात ते पडावरचे कथित हिरो प्रत्यक्ष जीवनात कसे वागतात याचे हे उदाहरण आहे. दोन महिन्यापूर्वी एका खाजगी पार्टीत दारूच्या नशेत फरहा खानच्या नवर्याच्या थोबडीत लगावण्याच्या त्याच्या कृत्याच्या कृत्याची चर्चा आप थांबलेली नसताना वानखेडे स्टेडियममध्ये पाच वर्षांच्या प्रवेशबंदीची शिक्षा ओढावून घेणारी ही घटना शाहरूखबाबत घडली आहे.
आताशा लोक आमीर आणि शाहरूख यांच्या वागण्याची तुलना करू लागले आहेत. चित्रपटातील त्याच्या अभिनय क्षमतेबद्दल पूर्ण आदर राखला तरीही, कुठे सामाजिक भान जपणारा आमीर आणि कुठे सार्वजनिक ठिकाणी एका मुलीला असभ्य भाषेत बोलणारा शाहरूख, असा प्रश्न साहजिकच उपस्थित होतो. या असल्या लोकांना आपण डोक्यावर घेऊन नाचतो का, असाही प्रश्न स्वाभाविकच उपस्थित होतो. हा प्रश्न पडून ज्या दिवशी भारतीय रसिकजन कुण्याही व्यक्तीला या देशातल्या कायदा आणि व्यवस्थेपेक्षा मोठे करण्याइतके डोक्यावर घेणार नाहीत, तो सुदिन!
जाता जाता...
शाहरूख खानच्या वागण्याची गंभीर दखल घेत त्याला वानखेडेवर पाच वर्षांसाठी प्रवेशबंदी करण्याची शिक्षा मुंबई क्रिकेट असोसिएशनने ठोठावली असली तरी भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाचे उपाध्यक्ष आणि भारतीय क्रिकेटच्या बाजारीकरणाचे आणखी एक वाटेकरी राजीव शुक्ला यांनी या बंदीचा अंतिम निर्णय बीसीसीआय घेणार असल्याचे जाहीर केले आहे. शेवटी सारा मामला स्पर्धेच्या आर्थिक व्यवहाराशी संबंधित असल्याने शुक्लांना एमसीएच्या पदाधिकार्यांच्या अवमानापेक्षा, त्यांच्या भावनेपेक्षा आणि त्यांनी घेतलेल्या सामूहिक निर्णयापेक्षा एका टीमच्या मालकाची पाठराखण अधिक महत्त्वाची वाटणे स्वाभाविकच आहे. उा बीसीसीआयने या निर्णयाला केराची टोपली दाखवत शाहरूखची बाजू घेतली तर या वादात विजय शाहरूखचा झाला की क्रिकेटचा हे मात्र क्रिकेट रसिकांनाच ठरवायचे आहे....
मुंबई.
९८८१७१७८३३

..याच शाहरूखला डोक्यावर घेऊन नाचतो आपण?
भारतीय क्रीडा रसिकांच्या कमालीच्या क्रिकेटवेडाचा गैरफायदा घेत त्यांच्या खिशाला हात घालणार्या आणि त्यानिमित्ताने कोट्यवधी रुपयांचा धंदा करणार्या आयपीएल सामन्यातील कोलकाता नाईट राईडर्स या संघाचा मालक असलेल्या शाहरूख खानने परवा मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर घातलेला धिंगाणा आता पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचला आहे. प्रकरण पोलिस ठाण्यात पोहोचले म्हणून लागलीच शाहरूखवर कारवाई होईल असे मानण्याचे कारण नाही. फुटपाथवर झोपलेल्या लोकांच्या अंगावरून गाडी नेऊन त्यांना चिरडणार्या सलमानवर गेली कित्येक वर्षे कारवाई झालेली नसताना, त्याचे काळवीटाच्या शिकारीचे प्रकरणही गंभीर असूनही बर्यापैकी थंड बस्त्यात गेले असताना, एका इसमाला बाईकने उडविणार्या जॉन अब्रहमवर कारवाई करायला आप कुणी धजावले नसताना, धाबुी आणि चार-दोन अर्वाध शिव्या हासडण्याच्या या ङङ्गमामूली' प्रकरणात राज्याचे कर्तबगार प्रशासन आणि आबा पाटलांची ङङ्गसक्षम' पोलिस यंत्रणा काही ठोस कारवाई करेल असा गैरसमज कुणी करून घेण्याची गरज नाही. इथे प्रश्न पोलिसांनी शाहरूखवर कारवाई करण्याचा नाहीच. प्रश्न त्याच्या बेमुर्वतखोर वागण्याचा आहे. सामना संपल्यानंतर रात्री बर्याच उशिरा दारूच्या नशेत आपले सहकारी आणि मुलांसह तो मैदानाच्या दिशेने निघाला. आयपीएलच्या स्पर्धेत सहभागी असलेल्या एका संघाचा मालकच मैदानाकडे निघाला म्हटल्यावर त्याला अडवणार कोण? बहुधा असाच प्रश्न त्याच्याही मनात असावा. त्यामुळेच अगदी ङङ्गमालकाच्या' आवेशातच तो मैदानाच्या दिशेने निघाला. तिथल्या सुरक्षा रक्षकांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. त्यांची ही ङङ्गगुस्ताखी' एका टीम मालकाला कशी सहन व्हावी? एरवी खिजगणतीतही नसलेल्या या रक्षकांवर एक तुच्छ नजर टाकत शाहरूखने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. हे रक्षकही काल आपल्या कर्तव्याबाबत अधिकच जागरूक होते की काय कोण जाणे, पण त्यांनी शाहरूखच्या मैदानाकडील मुसंडीला जोरदार विरोध केला. एवढ्यात मुंबई क्रिकेट असोसिएशनचे काही पदाधिकारीही तिथे हजर झाले. पिऊन तऽऽर्र असला तरी शाहरूख मोठी असामी आहे याचे भान जपत या पदाधिकार्यांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. पण किंग खानांचा पारा आणखीच चढला. हे लोक भलेही एमसीएचे पदाधिकारी असतील, पण किंग खान म्हणजे एका टीमचा मालक. शरद पवार आदी राजकीय नेत्यांनी गेली काही वर्षे भारतात आरंभलेल्या क्रिकेटच्या धांतील तोही एक पार्टनर. त्याला अडविण्याची एमसीएच्या पदाधिकार्यांचीही काय बिशाद? बडी असामी असलेल्या शाहरूखने त्यांनाही चार-दोन शिव्या हासडल्या. ङङ्गइथेच गाडून टाकीन' अशी त्याची भाषा होती असं म्हणतात. दरम्यान रक्षकांना धाबुीही झाली. या प्रकाराने उपस्थित सारेच लोक चकीत झाले. पदाधिकारी व्यथित झालेत. एमसीएच्या काही पदाधिकार्यांना ही शिवीगाळ मनाला बोचली. या प्रकाराला माफी देणे योग्य ठरणार नसल्याचे मत व्यक्त झाले. आपण कुणाविरुद्ध तक्रार नोंदोवतोय् आणि कुणाविरुद्ध बोलतोय् याची कल्पना या पदादिकार्यांना नसावी असे कसे म्हणता येईल? सध्या क्रिकेटजगतावर खेळाडू आणि रसिकांच्या तुलनेत राजकीय नेते, बुकी, उोजक यांचा असलेला ताबा लक्षात घेता उा आपल्यावर हे प्रकरण कसे शेकू शकते, नेत्यांची नाराजी ओढावली जाणार याचीही पूर्ण कल्पना एमसीएच्या पदाधिकार्यांना असतानाही हे प्रकरण पोलिस ठाण्यात गेले. शाहरूखला वानखेडे स्टेडियमची दारेच बंद करण्याची भाषा बोलली जाऊ लागली याचा अर्थ प्रकरण खरंच तेवढं गंभीर असल्याचे मानले जात आहे.